#दौऱ्यावर;
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 18 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• विद्यार्थ्याची क्षमता, अंगभूत कौशल्य आणि कामातला आनंद या गोष्टींना अधिक महत्त्व देण्याचं पंतप्रधानांचं परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून आवाहन • पंतप्रधान मोदी फ्रान्स दौऱ्यावर, आज भूषवणार कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद • छत्रपती संभाजीनगर इथं जीवन प्राधिकरण अंतर्गत एक हजार १६४ योजनांची कामं जलदगतीने पूर्ण करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश • आजपासून बारावीची परीक्षा - छत्रपती संभाजीनगर विभागात एक लाख ८५ हजारावर विद्यार्थ्यांची नोंदणी आणि • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १२९ पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर
विद्यार्थ्याची क्षमता, अंगभूत कौशल्य आणि कामातला आनंद या गोष्टींना परीक्षेतले गुण, स्पर्धा आणि इतरांशी तुलना यापेक्षा अधिक महत्त्व देण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात ते काल नवी दिल्लीत विद्यार्थ्यांशी बोलत होते. इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करावी, तसंच परीक्षेआधी तणाव येऊ न देता उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. ते म्हणाले.., बॅटस्‌मन उस प्रेशर की परवाह नही करता, उसका पुरा ध्यान उस बॉल की ओर होता है। अगर आप भी इस प्रेशर को मन मे न लेते हुये अपना ध्यान आज मैने इतना पढना तय किया था, ये अगर कर लेते है। आप आराम से उस प्रेशर मे से भी अपने आप को निकाल सकते है।
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं स्वरुप आता बदललं असून तो, सात भागात सादर होणार आहे. आतापर्यंत बंद सभागृहात किंवा प्रेक्षागृहात होणारा हा कार्यक्रम काल नवी दिल्लीतल्या एका रोपवाटिकेत पार पडला. पंतप्रधानांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना तिळगूळ देऊन गोड बोलायचा संदेश दिला. दरम्यान, या कार्यक्रमानंतर पंतप्रधान काल फ्रान्सच्या ��ौऱ्यावर रवाना झाले. पॅरिस इथं पोहोचल्यानंतर भारतीय समुदायानं त्यांचं भव्य स्वागत केलं. पॅरिसमध्ये आज आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं पंतप्रधान, सह अध्यक्षपद भूषवणार आहेत. ** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा‘ हा कार्यक्रम पाहिला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकप्रकारे जीवनाचा मंत्र मिळत असल्याचं ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर इथं विविध शैक्षणिक संस्थांनी आपले विद्यार्थी तसंच शिक्षकांसाठी या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दाखवण्याची व्यवस्था केली होती. सरस्वती भुवन प्रशालेतले विज्ञान शिक्षक मयूर साबळे आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाबाबत आपलं मत या शब्दांत व्यक्त केलं.. बाईट – मयूर साबळे, युवराज वायाळ, चैतन्य मोरे आणि वेदांत कुलकर्णी
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा झाली. राज्यसभेत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी या चर्चेला सुरुवात करताना, सरकारचं उत्पादन क्षेत्राविषयीचं धोरण अपयशी ठरल्याची टीका केली. त्याला उत्तर देताना भाजपा नेते जे पी नड्डा यांनी, सरकारनं उत्पादन क्षेत्रासाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत सहभागी होत भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी, या अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्रासाठी विक्रमी निधी देण्यात आला असून, राष्ट्रीय हिताची पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचं नमूद केलं. नोटबंदीच्या वेळी जाहीर केलेलं कोणतंही उद्दिष्ट साध्य करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे, असं काँग्रेसच्या मनीष तिवारी यांनी सांगितलं. अर्थसंकल्पात दाखवलेल्या वित्तीय तुटीबद्दल त्यांनी सवाल उपस्थित केले. दोन्ही सभागृहात आजही ही चर्चा सुरु राहणार आहे.
जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. राज्यसभेत त्या काल शून्य प्रहरात बोलत होत्या. सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रासह विविध राज्यात सोयाबीन आणि इतर पिकांच्या खरेदीला मुदतवाढ दिली आहे. सामाजिक संपर्क माध्यमावरुन त्यांनी ही माहिती दिली. राज्यात २४ दिवसांसाठी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आल्याचं ��्यांनी सांगितलं.
जलजीवन मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं जीवन प्राधिकरण अंतर्गत एकूण एक हजार १६४ योजनांची कामं जलदगतीने पूर्ण करण्यासंदर्भातील कार्यवाहीचा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल आढावा घेतला. नळ पाणी पुरवठा अंतर्गत १०० टक्के नळ जोडणी पूर्ण झालेल्या ७१७ योजना असून, उर्वरित ४४० कामं पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पाटील यांनी दिले.
राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने राज्यात नांदेडसह पाच जिल्ह्यांत हत्तीरोग दुरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राबवण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला, राज्यस्तरावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेत हत्तीरोगग्रस्त नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन आबिटकर यांनी केलं.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. १८ मार्चपर्यंत ही परीक्षा चालेल. छत्रपती संभाजीनगर विभागात ४६० केंद्रांवर ही परीक्षा होत असून, एक हजार ४०८ महाविद्यालयातल्या एक लाख ८५ हजार ३३० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षेदरम्यान कॉपी मुक्त अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, गैरप्रकार टाळण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी परीक्षा केंद्रांच्या परिसरात परीक्षा कालावधीत जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हिंगोली जिल्ह्यात २४ संवेदनशील परीक्षा केंद्र असून, या केंद्रांवर विशेष लक्ष असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. जिल्हास्तरावर एका भरारी पथकासोबतच पाच तालुक्यांचं पाच भरारी पथक कार्यरत असेल. नांदेड जिल्ह्यात १०७ केंद्रावर ४२ हजार ५२२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. जिल्ह्यातल्या संवेदनशील परिक्षा केंद्रावर केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक बदलण्यात येणार असून, एकूण १० भरारी पथकं नेमण्यात आली आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामं गुणव��्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहेत. धाराशिव इथं ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. मुख्यमंत्र्यांचा १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रभावीपणे राबवण्याची सूचनाही त्यांनी केली.
उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पेंटॅथलॉन मध्ये महाराष्ट्राच्या दीप्ती काळमेघ आणि सौरभ पाटील यांनी सुवर्ण पदक जिंकलं. ज्युदो मध्ये महिलांच्या ५२ किलो गटात राज्य��च्या श्रद्धा चोपडे हिने सुवर्ण पदक पटकावलं, तर ४८ किलो वजनी गटात अकांक्षा शिंदेनं रौप्य पदक जिंकलं. जिम्नॅस्टिक्सच्या आर्टिस्टिक प्रकारात राज्याच्या महिला संघाला रौप्य पदक मिळालं. या स्पर्धेत ३३ सुवर्णांसह १२९ पदकं जिंकत महाराष्ट्र आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. यामध्ये ४८ रौप्य आणि ४८ कांस्य पदकांचा समावेश आहे. ४७ सुवर्ण पदकांसह सेना दल पहिल्या, तर ३२ सुवर्ण पदकांसह कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे.
धाराशिव जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी मंजूर १४१ कोटी १४ लाख रुपयांपैकी, १०५ कोटी १५ लाख रुपये विविध यंत्रणांना वितरित करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत यापैकी ९८ कोटी ७७ लाख रुपये खर्च झाले आहेत. विकास कामांसाठी निधी खर्च करण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात येत असून, निधी पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी काल आंदोलन केलं. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतातील पिकांना पाणी देणं अवघड होत आहे. वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.
0 notes
darshanpolicetime1 · 2 months ago
Text
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात पाच निरनिराळ्या मूर्ती देऊन घडविले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन!
नवी दिल्ली, 12 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर होते. काल आणि आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एकूण 7 मान्यवरांच्या भेटी घेतल्या. या भेटीदरम्यान त्यांनी 5 निरनिराळ्या मूर्ती भेट देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
automaticthinghoagiezine · 5 months ago
Video
youtube
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर..
0 notes
6nikhilum6 · 5 months ago
Text
PM Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण
PM Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण – MPC…
0 notes
mhlivenews · 5 months ago
Text
Kolhapur : देशाच्या सहकार क्षेत्रात महिलांचे विशेष योगदान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गौरवोद्गार
Kolhapur : महिलांची प्रगती ही देशाच्या उन्नती आणि विकासामध्ये महत्वाची आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोल्हापूरात प्रतिक्रिया. वारणा समूहाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला राष्ट्रपतींची हजेरी, तरुणांना केले उद्योजक बनण्याचे आवाहन. महाराष्ट्र टाइम्स.कॉमराष्ट्रपती द्रुपदी मुर्मू यांनी महिलांच्या योगदानाचे कौतुक केले नयन यादवाड, कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 11 months ago
Text
0 notes
gajananjogdand45 · 1 year ago
Link
https://marmikmaharashtra.com/union-minister-bhupendra-yadav-on-a-two-day-visit-to-hingoli-district/
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर
https://bharatlive.news/?p=177521 पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर
नवी ...
0 notes
nashikfast · 1 year ago
Text
शिंदे सरकार रिक्षावाल्याचे नाही चार्टर्ड विमानवाल्याचे सरकार : अतुल लोंढे
मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी कशासाठी? मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यावर सरकारी तिजोरीमधून मोठा खर्च करण्यात आला. रिक्षावाले मुख्यमंत्री अल्पावधीत चार्टर्डवाले झाले आहेत. २०१५ च्या दावोस दौऱ्यावर ६२ लाख २८ हजार रुपये खर्च झाला होता तोच जानेवारी २०२३ च्या दौऱ्यावर ३२ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. “ही…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 day ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
विद्यार्थ्याची क्षमता, अंगभूत कौशल्य आणि कामातला आनंद या गोष्टींना अधिक महत्त्व देण्याचं पंतप्रधानांचं परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून आवाहन
जनगणनेला विलंब झाल्याने १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिल्याचा सोनिया गांधी यांचा आरोप
सांडपाणी पुनर्वापरासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करणार-पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा
आणि
उद्यापासून बारावीची परीक्षा-छत्रपती संभाजीनगर विभागात एक लाख ८५ हजारावर विद्यार्थ्यांची नोंदणी
****
विद्यार्थ्याची क्षमता, अंगभूत कौशल्य आणि कामातला आनंद या गोष्टींना परीक्षेतले गुण, स्पर्धा आणि इतरांशी तुलना यापेक्षा अधिक महत्त्व देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज नवी दिल्लीत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी बोलत होते. इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करावी, तसंच परीक्षेआधी तणाव येऊ न देता उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. परीक्षेदरम्यानचा ताणतणाव आणि चिंतेवर मात कशी करावी याबद्दल ते म्हणाले –
बॅटस्‌मन उस प्रेशर की परवाह नही करता, उसका पुरा ध्यान उस बॉल की ओर होता है। अगर आप भी इस प्रेशर को मन मे न लेते हुये अपना ध्यान आज मैने इतना पढना तय किया था, ये अगर कर लेते है। आप आराम से उस प्रेशर मे से भी अपने आप को निकाल सकते है।
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं स्वरुप आता बदललं असून तो, सात भागात सादर होणार आहे. आतापर्यंत बंद सभागृहात किंवा प्रेक्षागृहात होणारा हा कार्यक्रम आज नवी दिल्लीतल्या एका रोपवाटिकेत पार पडला. पंतप्रधानांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना तिळगूळ देऊन गोड बोलायचा संदेश दिला. दरम्यान, या कार्यक्रमानंतर पंतप्रधान आज फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना झाले. पॅरिसमधे आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद ते भूषवणार आहेत.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम पाहिला. राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान तसंच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकप्रकारे जीवनाचा मंत्र मिळत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले –
परीक्षा पे चर्चा याच्या माध्यमातनं विद्यार्थ्यांशी संवाद साधत, त्यांच्या मनातली भीती, त्यांच्या मनातले प्रेशर, त्याच्यावरचे उपाय हे या चर्चेतनं ते त्यांना सांगतात. आणि एक प्रकारे जीवनाचा मंत्र हा विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत असतो.
छत्रपती संभाजीनगर इथं विविध शैक्षणिक संस्थांनी आपले विद्यार्थी तसंच शिक्षकांसाठी या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दाखवण्याची व्यवस्था केली होती. सरस्वती भुवन प्रशालेतले विज्ञान शिक्षक मयूर साबळे आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाबाबत आपलं मत या शब्दांत व्यक्त केलं.
बाईट – मयूर साबळे, युवराज वायाळ, चैतन्य मोरे आणि वेदांत कुलकर्णी
****
जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. राज्यसभेत शून्य प्रहरात त्या बोलत होत्या. सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आज अर्थसंकल्पावर चर्चा झाली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रयागराज इथं महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं. त्यांनी अक्षयावत आणि बडे हनुमान मंदिरालाही भेट देऊन, डिजिटल महाकुंभ केंद्रातून कुंभमेळ्याची पाहणी केली. दरम्यान, १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या कुंभमेळ्यात आतापर्यंत ४३ कोटींपेक्षा जास्त भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आपल्याला मान्य नसल्याचं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुलुंड इथे शिक्षक सेनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात आज ते बोलत होते. राज्य सरकारच्या विविध योजनांवर ठाकरे यांनी टीका केली.
****
सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पर्यावरण विभाग सर्वसमावेशक आराखडा तयार करणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. आयआयटी पवई इथं ‘स्थानिक स्वराज्य संस्थांमधे सांडपाण्याचं व्यवस्थापन आणि शाश्वत उपाययोजना’ या विषयावरच्या परिषदेत त्या बोलत होत्या. नद्यांच्या काठालगत असलेल्या ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रात प्रदूषित पाण्याचा नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने पुनर्वापर करण्यासाठी तांत्रिक कक्षाची स्थापना करण्यात येईल, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने उद्या ११ तारखेपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. १८ मार्चपर्यंत ही परीक्षा चालेल. छत्रपती संभाजीनगर विभागातील ४६० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यात एक हजार ४०८ महाविद्यालयातील एक लाख ८५ हजार, ३३० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षे दरम्यान कॉपी मुक्त अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी परीक्षा केंद्रांच्या परिसरात परीक्षा कालावधीत जमावबंदी आदेश जारी केले आहेत. विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूच्या पार्श्वभूमीवर तिथे कोम्बिंग ऑपरेशन कोणी केलं, लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले, पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारले आहेत. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राहुल सोलापूरकर यांच्या विधानाबाबतही आव्हाड यांनी टीका केली.
****
राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने आजपासून राज्यातल्या नांदेडसह ५ जिल्ह्यांत हत्तीरोग दुरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राबवण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला, राज्यस्तरावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेत हत्तीरोगग्रस्त नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन आबिटकर यांनी केलं.
****
धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर १४१ कोटी १४ लाख रुपयांपैकी १०५ कोटी १५ लाख रुपये विविध यंत्रणांना वितरित करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत यापैकी ९८ कोटी ७७ लाख रुपये खर्च झाले आहेत. विकास कामांसाठी निधी खर्च करण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात येत असून, निधी पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सोयाबीन खर��दी पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील निलंगा इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, छावा संघटना, युवा सेना इत्यादी पक्षांच्या काही कार्यकर्त्यांनी बीएसएनएलच्या टॉवरवर चढून घोषणाबाजी केली. सरकारने किमान नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन तरी हमी भावानं खरेदी करावं अन्यथा प्रति क्विंटल १ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना द्यावं, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
****
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतातील पिकांना पाणी देणं अवघड होत आहे. वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.
****
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहराला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या कार्यालयाजवळच्या रोहित्राला आज आग लागली. नागरीकांची सतर्कता तसंच पोलीस, आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे ही आग आटोक्यात आली.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 months ago
Text
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा उद्या महाराष्ट्र दौरा - महासंवाद
केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकपूर्ती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती नवी दिल्ली २ : उपराष्ट्रपती जगदीप धनखड ३ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार असून, मुंबई येथे विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपराष्ट्रपती श्री. धनखड भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
automaticthinghoagiezine · 6 months ago
Video
नरेंद्र मोदी युक्रेन दौऱ्यावर झालें अशी भेट..
0 notes
knowledgenews1 · 2 years ago
Text
PM Modi In Pune : हातात छत्री चेहऱ्यावर हास्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. यावेळी हातात छत्री घेऊन मोदी विमानातून उतरले. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राज्यपाल रमेश बैस यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 11 months ago
Text
मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली; चंद्रकांत पाटलांचे बारामतीत पवारांना चॅलेंज
बारामती : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला शरद पवार यांना पराभूत करायचे आहे. महाराष्ट्र नुकसान कुणी केले तर पवार साहेबांनी केले असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते बारामती येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशात सरकार येणार येणार म्हणून सर्वांना झुलवत कुणी ठेवले तर ते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 1 year ago
Text
0 notes
gajananjogdand45 · 1 year ago
Link
https://marmikmaharashtra.com/inspection-of-the-damaged-agriculture-by-the-guardian-minister-abdul-sattar-stands-with-the-government-farmers/
0 notes