#दुचाकी कर्ज
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस २८ मे ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज मुंबईत बोलत होते. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर गौरव दिनी आयोजित करण्यात येणार आहेत. सावरकरांच्या अतुलनीय योगदानाला आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि तरुण पिढीला त्यांच्या देशभक्ती, धैर्य आणि प्रगतीशील विचारांना पुढे न्यायचं असेल तर त्यांचा जन्मदिवस साजरा करणे आवश्यक आहे, असे सामंत यांनी या पत्रात म्हटलं होतं.
****
थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विट संदेशातून महात्मा फुले यांना अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या औरंगपुरा इथल्या महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सर्व पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात येत आहे.
वाशिम इथं समाज कल्याण कार्यालयातर्फे सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी संदेश फेरी काढण्यात आली.
बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात माळी समाज आणि विविध सामाजिक संघटनाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं, त्यानंतर शहरातून दुचाकी फेरी काढण्यात आली आणि शासकीय रुग्णालयात फळवाटप करण्यात आलं.
****
धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने ��ालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाहणी करणार आहेत. धाराशिव तालुक्यात धारूर तसंच वाडी बामणी या गावांना ते भेट देणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातल्या चितोडा, हिंगणा कारेगांव परिसरात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. कृषी आणि महसूल विभागाने वस्तुनिष्ठ़ पंचनामे करावे, नियमांची आडकाठी आणू नये, मदतीसंदर्भात शासन निर्णय घेईल, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकार्यांना यावेळी दिले.
****
राज्यांनी अनुदानाचा योग्य हिशोब ठेवण्यासाठी, वित्तीय तूट कमी करून महसुली तूट दूर करण्यासाठी आणि थकित कर्ज स्वीकार्य पातळीवर ठेवण्यासाठी पावलं उचलायला हवी, असं भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, गिरीश चंद्र मुर्मू यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत वार्षिक महालेखापाल परिषदेत ते बोलत होते. राज्यांनी कर्ज आणि आगाऊ देयकांसह सर्व भांडवली खर्च त्यांच्या स्वत:च्या महसुलाच्या स्रोतातून भागवयला हवा, असं त्यांनी नमूद केलं.
****
शालेय स्तरावर मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती जे.पी. पारदीवाला यांच्या पीठाने सर्व राज्यांना शाळांमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहांची उपलब्धता आणि सॅनिटरी पॅडचा पुरवठा याबाबत माहिती देण्यास सांगितलं आहे. यासंदर्भात दाखल एका याचिकेत मासिक पाळी व्यवस्थापन हा शिक्षणात मोठा अडथळा असल्याचं म्हटलं आहे. यावर केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी न्यायालयात बाजू मांडली. राज्यांनी विद्यमान धोरणांची माहिती दिल्यास केंद्रही त्याप्रमाणे धोरण राबवू शकतं, असं भाटी यांनी सांगितलं. त्यावर न्यायालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना चार आठवड्यांच्या आत मासिक पाळी स्वच्छता धोरण लागू करण्याचे निर्देश दिले. केंद्राने सर्व राज्यांशी समन्वय साधून एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करावं, जेणेकरून ते राज्यांच्या समायोजनासह प्रभावीपणे लागू करता येईल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
राज्यात काल ३२८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर २४७ रुग्ण बरे झाले. राज्यात सध्या ६६७ रुग्णांवर उपचार सु��ु आहेत. मुंबईत सर्वाधिक २२८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानंतर पुण्यात ५०, नागपूरमध्ये १८, अकोल्यात १०, लातूरमध्ये ८ तसंच नाशिक आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी पाच रुग्ण आढळले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं १७ एप्रिलला रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारानं आयोजित या मेळाव्यात, सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
****
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 
//**********//
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
कार फायनान्स मिळवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जेणेकरून नंतर कोणतीही अडचण येणार नाही
कार फायनान्स मिळवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जेणेकरून नंतर कोणतीही अडचण येणार नाही
नवी दिल्ली. भारतासारख्या देशात कार खरेदी करणे हा अजूनही मोठा निर्णय मानला जातो. येथे आपली पहिली कार खरेदी करणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. आजकाल अनेक फायनान्स कंपन्या कमी व्याजाचे आमिष दाखवून कार लोन देतात. प्रक्रियेशी संबंधित संभाव्य तोटे विचारात न घेता ग्राहकांना अनेकदा घाई करण्याचा मोह होतो. कारसाठी वित्तपुरवठा करणे हे ग्राहकासाठी नंतर खूप तणावाचे काम असू शकते, जर त्याने योग्यरित्या…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
हिरो इलेक्ट्रिक ऍक्सिस बँक टू व्हीलर फायनान्सिंग टू व्हीलर लोन इन्शुरन्स हिरो इलेक्ट्रिक स्कूटर mbh
हिरो इलेक्ट्रिक ऍक्सिस बँक टू व्हीलर फायनान्सिंग टू व्हीलर लोन इन्शुरन्स हिरो इलेक्ट्रिक स्कूटर mbh
नवी दिल्ली. Hero Electric ने आपली इलेक्ट्रिक स्कूटर श्रेणी ग्राहकांना सुलभ वित्त योजनांवर उपलब्ध करून देण्यासाठी अॅक्सिस बँकेशी हातमिळवणी केली आहे. या भागीदारी अंतर्गत, ग्राहक 750 हून अधिक हिरो इलेक्ट्रिक डीलर्सकडे दुचाकी वित्तपुरवठा निवडू शकतात. हिरो इलेक्ट्रिकचे ग्राहक आता किमान कागदपत्रांसह अनेक मूल्यवर्धित आर्थिक लाभ घेऊ शकतात. हिरो इलेक्ट्रिक आपली उत्पादन क्षमता पुढील पाच वर्षांत ५० लाख…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
या बँका दुचाकी वाहनांसाठी १० टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देत आहेत, तपशील पहा
या बँका दुचाकी वाहनांसाठी १० टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देत आहेत, तपशील पहा
सरकारी मालकीची बँक ऑफ इंडिया ही या विभागातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक आहे. बँक टू व्हीलरसाठी ६.८५ टक्के व्याजाने कर्ज देत आहे. या व्याजदरावर, 1 लाख रुपयांच्या कर्जावर 3 वर्षांच्या कालावधीसाठी 3,081 रुपयांचा EMI भरावा लागेल. ,
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
ई-स्कूटर खरेदी करणे आता सोपे होणार, या बँका कमी व्याजावर कर्ज देणार, पहा तपशील
ई-स्कूटर खरेदी करणे आता सोपे होणार, या बँका कमी व्याजावर कर्ज देणार, पहा तपशील
नवी दिल्ली. भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या Ather Energy ने ग्राहकांना सुलभ कर्ज देण्यासाठी HDFC बँक IDFC First शी हातमिळवणी केली आहे. कंपनीने आपल्या खरेदीदारांसाठी ईव्ही खरेदी सुलभ आणि तणावमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या भागीदारी अंतर्गत, एथर एनर्जीच्या ग्राहकांना एचडीएफसी आणि आयडीएफसी फर्स्ट बँकांकडून कमी व्याजदरात आणि जास्तीत जास्त एलटीव्ही…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 June 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २९ जून २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. सर्वांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले, तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      आत्मनिर्भर भारत योजनेला, ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ; आरोग्यासह विविध आठ क्षेत्रांसाठी एक लाख दहा हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर.
·      इतर मागासवर्गीय समाजाचं राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल.
·      राज्यात सहा हजार ७२७ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात आठ जणांचा मृत्यू तर ३१२ बाधित.
·      शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी नांदेड जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम आनंदा कोमवाड याला, सात वर्ष सक्तमजुरी आणि १८ लाख ८० हजार रुपयांचा दंड.
·      औरंगाबाद शहरातील गुंठेवारी भागातील नियमावली लवकरच जाहीर करणार - पालकमंत्री सुभाष देसाई.
आणि
·      कृषी विभागाच्या रब्बी हंगाम पीक स्पर्धेत, उस्मानाबाद जिल्ह्यातील आर्सोलीचे शेतकरी सोमनाथ मुंडेकर ज्वारी उत्पादनात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर.
****
देशात उद्भवलेल्या कोविड पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आत्मनिर्भर भारत योजनेला, ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आरोग्यासह विविध आठ क्षेत्रांसाठी एक लाख दहा हजार कोटी रुपयांचं पॅकेज, सीतारामन यांनी जाहीर केलं. आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यातून पायाभूत वैद्यकीय सुविधांचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे. २५ लाख ��ोट्या व्यावसायिकांसाठी अर्थमंत्र्यांनी कर्ज हमी योजना जाहीर केली, या योजनेअंतर्गत छोट्या पतसंस्थांकडून व्यावसायिकांना सव्वा लाख रुपयापर्यंत कर्ज घेता येईल.
शेतकऱ्यांना खतांवर अनुदानापोटी, १४ हजार ७७५ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी २३ हजार २२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, उद्योग, बालपोषण, डिजीटल इंडिया, पर्यटन, या सह इतरही विविध क्षेत्रांसाठी, अर्थमंत्र्यांनी योजना जाहीर केल्या. कर्मचारी संख्या १००च्या आत असलेल्या कंपन्या, आणि दरमहा १५ हजार रुपयापर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा, भविष्य निर्वाह निधीचा दोन्हीचा मिळून २४ टक्के वाटा, येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत सरकारकडून भरला जाईल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाची दररोज १५ लाख कोविड मात्रांच्या लसीकरणाची तयारी असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत मालाड इथं समर्पित कोविड रुग्णालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असल्यानं, अधिक सावध राहिलं पाहिजे, सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी, दुसरी लाट परत उलटू नये म्हणून गर्दी टाळणं, मास्क घालणं हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.
 दरम्यान, नागरी तसंच औद्योगिक क्षेत्रात सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत, दीर्घकालीन नियोजन करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यातल्या नागरी तसंच औद्योगिक क्षेत्रातल्या सांडपाणी प्रक्रिया तसंच घनकचरा व्यवस्थापनाबाबतच्या आढावा बैठकीत, ते काल बोलत होते. सांडपाणी प्रक्रियेतून मिळणाऱ्या शुद्ध पाण्याचा कसा वापर होणार, त्यासाठीच्या जलवाहिन्यांचे जाळे, अशा गोष्टींबाबतही नागरी भागासाठी नियोजन करावं, विदेशात उंच इमारतीमधील पाण्याच्या पुनर्वापराबाबत निश्चित धोरण आहे, अशा धोरणांचा अभ्यास करून त्यांचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आगामी काळात कोविडसारखं संकट आल्यास किंवा अन्य आपत्कालीन स्थितीत, उद्योगांकडे निश्चित असे पर्याय असावेत. औद्योगिक क्षेत्रातच मनुष्यबळाच्या निवासाची व्यवस्था करता येईल, अशा टाऊनशिपचा विचार व्हावा, जेणेकरून उद्योगांतील उत्पादन थांबणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं.
****
इतर मागासवर्गीय - ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या सहा जिल्हा परिषद आणि ४४ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका ��ुढे ढकलण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.
****
पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ - बालभारतीनं, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक अॅप तयार केलं आहे. ई-बालभारती अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नोंदणी करताना एकदाच ५० रुपये शुल्क आणि कराची रक्कम दिल्यावर, वर्षभरासाठी याचा वापर करता येईल. कुटुंबातले कुठल्याही इयत्तेतले, कितीही विद्यार्थी नोंदणीच्या आधारे याचा लाभ घेऊ शकतील. सध्या पहिली ते पाचवीसाठी मराठी माध्यम, आणि दहावीच्या मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाचा अभ्यासक्रम, यावर उपलब्ध आहे. इतर इयत्तांचा अभ्यासक्रमही लवकरच यावर उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची माहिती, बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली.  
****
राज्यात काल सहा हजार ७२७ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६० लाख ४३ हजार ५४८ झाली आहे. काल १०१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २१ हजार ५७३ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक एक दशांश टक्के झाला आहे. काल दहा हजार ८१२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५८ लाख ९२५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ९९ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख १७ हजार ८७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३१२ कोविड बाधितांची नोंद झाली, तर आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच, तर परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात १२९ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ६७, औरंगाबाद ४५, परभणी ३३, लातूर १६, जालना १३, नांदेड सहा, तर हिंगोली जिल्ह्यात तीन नवे रुग्ण आढळून आले.
****
कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या तुटवड्यामुळे, औरंगाबाद शहरात आज फक्त प्रोझोन मॉल इथल्या ड्राईव्ह - इन लसीकरण केंद्र, आणि कोव्हॅक्सीन लसीची तीन लसीकरण केंद्रं सुरु राहणार आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.
दरम्यान, काल वाळूज इथल्या एका लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या ठिकाणी काही नागरिकांची चेंगराचेंगरी आणि धक्काबुक्की झाली. वाळूज पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवलं.
****
परभणी महानगरपालिकेच्या आठ नागरी आरोग्य केंद्रासह सहा खाजगी केंद्रांवर, आज लसीकरण होणार आहे. कोवॅक्सिन लसीची फक्त दुसरी, तर कोविशील्ड लसीची पहिली तसंच दुसरी मात्रा दिली जाणार असल्याची माहिती, महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिली.
****
शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी नांदेड जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम आनंदा कोमवाड याला, न्यायालयानं स��त वर्ष सक्तमजुरी आणि १८ लाख ८० हजार रुपये दंड ठोठावला आहे. २०१६ मध्ये घडलेल्या या अपहार प्रकरणी नांदेडचे मुख्य न्याय दंडाधिकारी सचिन पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी १८ लाख रुपये रक्कम जिल्हा परिषदेला देण्याचे आदेश न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ग्रामविकासासाठी आलेल्या निधीतून कोमवाड याने, एक कोटी १८ लाख ८२ हजार रुपये रक्कम वळती करून घेतल्याचं, ऑगस्ट २०१६ मध्ये निदर्शनास आलं होतं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर, कोमवाड याला पोलिसांनी अटक केली होती.
****
औरंगाबाद इथं शनिवार - रविवार बाजारपेठ उघडण्याबाबत विचार करता येईल, असं सूचक वक्तव्य पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघातर्फे विविध मागण्यांचं निवेदन, काल पालकमंत्री देसाई यांना सादर करण्यात आलं. या निवेदनात बाजारपेठांच्या वेळात बदल आणि शनिवार-रविवार संपूर्ण बाजारपेठ उघडी ठेवण्याबाबत मागणी करण्यात आली. यावर पालकमंत्र्यांनी, दुकानांच्या वेळा बदलता येणार नाहीत, मात्र, शनिवार - रविवार बाजारपेठ उघडण्याबाबत विचार करता येईल, असं सांगितलं. नव्यानं लावण्यात येणाऱ्या आस्थापना कराविषयी मनपा प्रशासक यांच्याशी चर्चा करून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी पालकमंत्र्यांनी दर्शवल्याचं, संघटनेकडून सांगण्यात आलं.
 दरम्यान, औरंगाबाद शहरातील गुंठेवारी भागातील नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं, पालकमंत्री देसाई यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद शहरातल्या शहागंज इथं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या निधीतून, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण देसाई यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. शासनानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे शहरातल्या नागरिकांनी पालन केलं, त्यामुळेच आपण कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणू शकलो, याबद्दल त्यांनी शहरवासियांचे आभार मानले.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रगती पेट्रोल पंपाचं उद्घाटन, तसंच औरंगाबाद शहर पोलिसांसाठी डायल-११२ या योजनेअंतर्गत, ७४ दुचाकी वाहनांचं, पालकमंत्र्यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. महानगरपालिकेच्या वतीनं शहरात एकूण पाच पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार असल्याचं, महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यावेळी सांगितलं
पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या विविध विकास कामांचा, एका बैठकीत आढावा घेतला. औरंगाबाद शहर विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मनपाने आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश, पालकमंत्री देसाई यांनी दिले.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड शहराची वाढती लोकसंख्या पाहता, राज्य सरकारने ४१ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेच्या कामाचं भूमिपूजन, राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा नांदेड जिल्ह्याचे ��ालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते, काल मुदखेड इथं करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्याच्या विकासात सर्व यंत्रणांनी परिणामकारक योगदान द्यावं, आणि योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करावी, असं जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुरुड ग्रामीण रुग्णालयात मंजूर झालेलं ट्रामा केअर सेंटर त्वरित सुरू करुन, रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना, त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना केली आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात चाटोरी इथं विद्युत महावितरणच्या ३३ के.व्ही. उपकेंद्र उभारणीचं भूमिपूजन, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते काल झालं. हे उपकेंद्र उभारल्याने चाटोरीसह परिसरातल्या अनेक गावांच्या विजेचा प्रश्न कायमचा सुटणार असल्यानं, नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.
****
जालना शहरासह तालुक्यातल्या अनेक भागात काल दुपारनंतर पाऊस झाला. मानेगाव आणि मोतीगव्हाण दरम्यान रस्त्यावरच्या पुलाचं पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालं. अंबड तालुक्यातल्या मठपिंपळगाव, दुधपुरी, शेवगा, आलमगाव, आदी भागातही पावसाने समाधानकारक हजेरी लावली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे नांदेड, परभणी जिल्ह्यातही शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
****
कृषी विभागाने जाहीर केलेल्या गेल्या रब्बी हंगाम पीक स्पर्धेत, उस्मानाबाद जिल्ह्याच्या भूम तालुक्यातल्या आर्सोली इथले सोमनाथ बापूराव मुंडेकर, यांनी हेक्टरी ९४ पूर्णांक ३० क्विंटल ज्वारीचं उत्पादन घेऊन, राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. उस्मानाबाद तालुक्यातल्या चिखली इथले राजेंद्र ज्ञानदेव चव्हाण यांनी हेक्टरी ७३ क्विंटल ज्वारीचं उत्पादन घेऊन, लातूर विभागात पहिला क्रमांक पटकावला. भूम तालुक्यातल्या आनंदवाडी इथले निलेश यादव खामकर यांनी, हेक्टरी ६५ पूर्णांक ५० क्विंटल ज्वारीचं उत्पादन घेऊन, उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथम, तर भूम तालुक्यातल्या आरसोली इथले बाळासाहेब आप्पाराव मुंडेकर यांनी हरभरा पिकाचे हेक्टरी ४७ पूर्णांक ३० क्विंटल उत्पन्न घेऊन, जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
****
औरंगाबाद इथं एका बेरोजगार युवकाला सरकारी नोकरी लावून देतो, म्हणून सात लाख रुपयांची फसवूणक करणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आली आहे. मधुकर गायकवाड असं या भामट्याचं नाव असून, तो पैठण तालुक्यातल्या आडूळ इथला रहिवासी आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातल्या कव्हळ इथला बीपीएड झालेल्या रामेश्वर खरात याला, शासकीय नोकरी लावून देण्याचं आश्वासन गायकवाड दिलं होतं. खरात यानं शेती विकून पैशाची जमवाजमव करुन गायकवाड याला सात लाख रुपये दिले होते.
****
राज्यात येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान ��ात्यानं वर्तवली आहे. या भगात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ७५ शतांश टक्के
** औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे सात नवे रुग्ण
** सक्त वसुली संचालनालयाकडून गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड कंपनीची २५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, आमदार रत्नाकर गुट्टे यांना अटक  
आणि
** औरंगाबाद विभागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी अधिकाधिक मदत मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची केंद्रीय पाहणी पथक प्रमुखांची ग्वाही
****
��ेशात कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असून, ते ९७ पूर्णांक ७५ शतांश टक्के झालं आहे. काल ३० हजारांहून अधिक रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ९६ लाख ९३ हजार रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. काल नव्या २४ हजार ७१२ रुग्णांची नोंद झाली, तर ३१२ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या एक कोटी ९९ हजार ५६० इतकी झाली आहे. देशात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत एक लाख ४६ हजार ७५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४५ शतांश टक्के इतका आहे. देशात सध्या दोन लाख ८३ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या संसर्ग तपासणीसाठी काल सुमारे १० लाख ३९ हजार चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत १६ कोटी ५३ लाख चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे.  
****
औरंगाबाद शहरातल्या सिडको एन ५ इथल्या एका ५५ वर्षीय कोविड बाधित महिलेचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला तर सात नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४५ हजार १४१ झाली असून १ हजार १९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज आठ जणांना उपचारानंतर बरे झाल्यानं सुटी देण्यात आली.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांनी केलं आहे.  
****
शेतकऱ्यांच्या कर्ज रकमेच्या गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी, बीड आणि धुळे इथली सुमारे २५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागानं आज या प्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २०१७ मध्ये परभणीच्या गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याने २९ हजार शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर ६ बँकाकडून सुमारे ३२८ कोटींचे कर्ज घेतलं होतं. गुट्टे यांनी शेतकऱ्याच्या नावे उचलेल्या कर्जाची रक्कम गंगाखेड शुगर एनर्जी लिमिटेडच्या माध्यमातून त्यांच्या योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेड आदी कंपन्यांमध्ये लावली होती, ज्यांच्यावर आता सक्त वसुली संचालनालयानं कारवाई केली आहे. सक्त वसुली संचालनालयानं काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडची २४७ कोटी रुपये किंमतीची यंत्रं त्याचप्रमाणे पाच कोटी रुपयांची जमीन, योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलर पॉवर लिमिटेडच्या परभणी, बीड आणि धुळे  इथल्या बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या गुंतवणुकीचे समभाग आदी मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नव्या कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांना केंद्र सरकारनं पुन्हा एकदा चर्चेसाठी पत्र पाठवून आमंत्रित केलं असल्याची माहिती केंद्रीय कृषी विभागाचे सचिव विवेक अग्रवाल यांनी दिली आहे. शेतकरी संघटनेच्या नेत्यांना पत्र लिहून सरकार मोकळ्या मनानं शेतकऱ्यांसोबत चर्चेला आणि शेतकऱ्यांच्या मुद्��्यांवर समाधानकारक उत्तरं द्यायला तयार असल्याचं या पत्रात नमुद करण्यात आलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
नवीन कृषी कायद्यामुळं शेतकऱ्यांना स्वातंत्र्य आणि अधिक मोबदला मिळणार असून हिंमत असेल तर हे कायदे परतवून दाखवावेत असं भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात किसान आत्मनिर्भर यात्रा उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. मराठा समाजातल्या तरुणांना आर्थिक दुर्बल घटकांसाठीची सवलत देणं हे राज्य सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण असून उशिरा घेतलेल्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांचं एक वर्षांचं शैक्षणिक नुकसान झालं असल्याचं शेलार म्हणाले.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि संपन्नता घेवून येवो, अशी प्रार्थना राज्यपालांनी आपल्या संदेशाद्वारे केली आहे. यंदाचा नाताळ आपण सर्वांनी उत्साहात, आनंदात साजरा करत असताना राज्य शासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करुन साजरा करावा, असं नमुद करत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनतेला नाताळाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
औरंगाबाद आणि पुणे विभागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पाहणी पथकाचे प्रमुख रमेशकुमार यांनी दिली आहे. जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा या पथकानं प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. या विभागात सोयाबिन, उडीद, तूर, कापूस, बाजरी या पिकांचं तसंच पालेभाज्या आणि फळांचं मोठं नुकसान झालं आहे. याचबरोबर रस्ते, वीज, घरे यासारख्या पायाभूत सुविधांवर परिणाम झाला असल्याचं दिसून आलं असल्याचं पथकातल्या सदस्यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अद्याप संपला नसून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी तसंच धार्मिक स्थळावर गर्दी करु नये, असं आवाहन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना केलं आहे. कोरोना विषाणू संदर्भातल्या जिल्हा कृती दलाच्या बैठकीत ते आज बोलत होते. जिल्ह्यात सध्या रुग्णांची संख्या घटली असली तरी या आजाराच्या साथीचा प्रादुर्भाव थांबला नसल्याचं सांगून नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष दक्षता घेण्याचं आवाहनही दिवेगावकर यांनी केलं आहे.
****
परभणी शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट कायम असून आज पहाटे ८ पुर्णांक २ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागानं दिली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू टाळेबंदीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ७४ कोटी ���६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही माहीती दिली. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये ३२ हजार २३८ गुन्हे नोंदविण्यात आले असून १९ हजार ४६२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय २ हजार ६६३ वाहनं जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी दिली.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीष महाजन यांनी आज राळेगणसिद्धी इथं अण्णांची भेट घेतली. हजारे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून उपोषणाचा इशारा दिला होता. यापूर्वीही पक्षाचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन उपोषणाचा निर्णय मागं घेण्याची विनंती केली होती.
****
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक करुन चोरलेली १५ लाख रुपये किंमतीची वाहनं जप्त केली आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथले तीन आणि आखाडा बाळापूर इथला एक अश्या या चार दुचाकी चोरांनी २३ दुचाकी चोरल्या आहेत.
****
महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध तसंच सफाई कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राबवण्यात याव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 June 2020 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ८ जून २०२० सायंकाळी ६.०० ****  औरंगाबाद इथं कोरोना विषाणूग्रस्त दोन कैदी कोविड सुश्रुषा केंद्रातून पसार  औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या २ हजार ६९ वर  अंबाजोगाई इथं कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेचं पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि  अंबडचे माजी आमदार अण्णासाहेब उढाण यांचं निधन **** औरंगाबाद इथं कोरोना विषाणूग्रस्त असलेले दोन कैदी कोविड सुश्रुषा केंद्रातून पसार झाले आहेत. सय्यद सैफ सय्यद असद आणि अक्रमखान अयाजखान अशी या दोघांची नावं आहेत. दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीत असलेल्या या दोघा कैद्यांनी रविवरी रात्री खिडकीचे गज वाकवून, चादरीच्या सहाय्याने खाली उतरून पलायन केलं, सुरक्षा व्यवस्थेवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेऊन हे दोघे पसार झाल्याचं, मध्यवर्ती कारागृहाकडून सांगण्यात आलं आहे. या दोन्ही कैद्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं असून, नियंत्रण अधिकाऱ्याविरोधात विभागीय चौकशीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. किले अर्क परिसरात उभारण्यात आलेल्या या कोविड सुश्रुषा केंद्रात, १९ कैद्यांवर उपचार सुरू आहेत. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत आज दुपारनंतर आणखी चार रुग्णांची वाढ झाली. यामध्ये पंढरपूर इथले तीन तर मिलकॉर्नर परिसरातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. आज दिवसभरात ४९ रुग्ण आढळल्यानं, जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या २ हजार ६९ झाली आहे. यापैकी १०४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, १ हजार २२४ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ७४१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. **** नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे साडे चार हजारावर संशयितांच�� नमुने तपासण्यास आले असून, त्यापैकी आतापर्यंत १९२ जण कोरोना विषाणूने बाधित आढळले होते, यापैकी ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १३१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. **** सातारा जिल्ह्यातील कोरोनाविषाणू बाधितांची संख्या १० ने वाढली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील बाधितांची एकूणसंख्या ६३१ झाली आहे. आतापर्यंत २६ जणांचा या संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. **** सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५ व्यक्तिंना कोरोनाविषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाविषाणू बाधितांची एकूण संख्या १२६ झाली आहे. यापैकी २२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेला आहे . **** सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर शहरातले पाच रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गामुक्त होऊन घरी परतले आहेत. आता शहरात एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २ जणांना कोरोनाविषाणूची लागण झाली. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ८२ झाली असून ३१ रुग्णांना प्रकृती सुधारल्यानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. आतापर्यंत ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. **** गडचिरोली जिल्ह्यात आणखी एकाला कोरोनाविषाणूचा संसर्ग झाला आहे. हा रुग्ण मुंबईहून आलेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून २७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून १६ जणांवर उपचार सुरु आहे. **** धुळे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात ५६ रुग्ण कोरोना विषाणू बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २४८ झाली आहे. आतापर्यंत ११२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण नियंत्रण क्षेत्रांची संख्या ७१ झाली आहे. दरम्यान, शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयाला आजपासून कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात आलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** सर्व घटकांना मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, परिस्थिती सुरळीत होईल, असा विश्वास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज सांगली इथं पत्रकारांशी बोलत होते. जनतेकडून गोळा झालेल्या करातून सरकारचं कामकाज चालत असत, मात्र टाळेबंदीच्या काळात कर संकलन झालेलं नाही, विविध मार्गाने पैसा उभा करण्याचं प्रयत्न सरकार करत आहे, प्रसंगी कर्ज काढून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार केले जातील, असंही पाटील यांनी सांगितलं. **** औरंगाबाद इथलं कोविड सुश्रुषा केंद्र येत्या आठवडाभरात तयार होईल, असं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितलं आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या या रुग्णालयात अडीचशे खाटांची व्यवस्था असेल. या रुग्णालयासाठी साठ आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, इथल्या आरोग्य सुविधांबाबत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाला प्रस्ताव पाठवल्याचं, औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितलं. सहा कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात सर्व गरजेची उपकरणं परवा दहा जूनपर्यंत दाखल होतील, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. **** बीड जिल्ह्यात अंब��जोगाई इथल्या स्वामी राम���नंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातल्या पहिल्या कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेचं जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. या प्रयोगशाळेत बीड सह आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या कोरोना संशयित रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करता येईल. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी याची मदत होईल असा विश्वास मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. बीड जिल्ह्यातल्या संशयितांचे नमुने आतापर्यंत लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आ. संजय दौंड, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. **** अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयातल्या परिचारिकांनी कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केलं. राज्याच्या मुख्य सचिवांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये यासंदर्भात दिलेल्या आदेशाची आरोग्य विभाग पायमल्ली करत असल्यानं याच्या निषेधार्थ कास्ट्राईब संघटनेच्या वतीनं संघटनेचे महासचिव एस टी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. पगार कपातीचा निर्णय मागे घ्यावा अशीही मागणी या परिचारिकांनी केली आहे. गोंदिया इथंही बंधपत्रित ४९ परिचारिकांनी याच मागणीसाठी आज एक दिवसीय काम बंद आंदोलन केलं. **** बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं शेगाव मार्गावर असलेल्या एका हॉटेलमधल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून १८ जणांना अटक केली आहे. या कारवाईत मोबाईल, चारचाकी, दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण १३ लाख ४७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींमध्ये हॉटेलचा संचालक योगेश जाधव याच्यासह आणखी १८ जणांचा समावेश असून या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात केलसुला गावातल्या महिलांनी अवैध दारू विक्रीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. यापूर्वी सेनगाव तहसील कार्यालयात निवेदन देऊनही प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही. आज या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून, उपोषणाचा इशारा दिला आहे. **** परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात कावलगाव शिवारात गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूची चोरी करणाऱ्या तस्करांविरूध्द पोलिसांनी आज धडक कारवाई केली. यामध्ये एक टेम्पो, दोन ट्रॅक्टर, वाळू उपसा करणारी बोट, असा एकूण २१ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. **** जालना जिल्ह्यातल्या अंबडचे माजी आमदार अण्णासाहेब उढाण यांचं आज निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. १९६७ ते ७२ या काळात त्यांनी अंबड मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. घनसावंगी तालुक्यात कंडारी या गावी राहत्या घरीच त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्��िव देहावर आज सायंकाळी कंडारी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातलं पहिलं वर्ष यशस्वी ठरलं असून, कोरोना विषाणू संसर्गाविरूध्द लढतांना अनेक योजनांच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना मदत केली असल्याचं, नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. ते आज नांदेड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यात रोजगार गेलेल्या गोरगरीब दिड लाख लोकांना अन्नधान्याची पाकिटं, तसंच कम्युनिटी किचन या उपक्रमातून एक लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती चिखलीकर यांनी दिली. **** परभणी जिल्ह्यात ५ लाख नागरिकांना आर्सेनिक अल्बम-30 या औषधीचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचं, आमदार डॉ.राहुल पाटील यांनी सांगितलं आहे. परभणी शहरात प्रभाग क्रमांक ४ च्या भारतीय बाल विद्या मंदिर इथं शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात ते बोलत होते. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 April 2020 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ एप्रिल २०२० दुपारी १.०० वा. **** औरंगाबाद इथं आज आणखी दोन जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे. शहरातल्या समता नगर इथं ५१ वर्षाची एक व्यक्ती आणि २५ वर्षीय युवक या दोघांचेही कोरोनाचे अहवाल सकारात्मक आले असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं. दरम्यान शहरात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३८ झाली आहे, यापैकी पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. **** भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद - आयसीएमआर ने आतापर्यंत देशभरात चार लाख ६२ हजार ६२१ संशयितांच्या घशातल्या स्रावाची तपासणी केली असून, काल दिवसभरात २६ हजार ८४३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. देशभरात आतापर्यंत २१७ सरकारी तर ८७ खासगी प्रयोगशाळांना कोरोना विषाणू संसर्ग चाचण्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे, दरम्यान गेल्या २४ तासांत देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचे एक हजार ३८३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशभरातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या १९ हजार ९८४ झाली आहे. यापैकी ६४० जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये गेल्या चोवीस तासात दगावलेल्या ५० लोकांचा समावेश आहे. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत तीन हजार ८७० रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे झाल्यानं, त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. **** कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या आढाव्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पथकानं आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत मुंबईतल्या धारावी भागाला भेट दिली. याठिकाणी असलेला ट्रांझिट कॅम्प, क्वारंटाईन सुविधेची पाहणी त्यांनी केली. विलगीकरणाची सुविधा बाराशे खाटांवरून दोन हजार खाटांपर्यंत वाढवण्याची सूचना या पथकानं केल्याची माहिती टोपे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. **** केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भारतीय चिकित्सक संघ - आयएमएच्या डॉक्टरांशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. डॉक्टरांच्या कार्याचं कौतुक करत शहा यांनी, डॉक्टरांना सर्व सुरक्षा सुविधा पुरवण्याबाबत आश्वासन दिलं,चं, त्यानंतर आयएमएने लाक्षणिक विरोधाचा इशारा मागे घेतला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात अनेक महिला, नागरीक ही पुढाकार घेत आहेत. परभणी शहरातील शिवरामनगरातील शिवानी रत्नपारखी आणि स्नेहल सुवर्णकार या दोन सासुसुना भारूडाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत. या दोघींनी सादर केलेले भारूड सामाजिक संपर्क माध्यमावर चर्चेचा विषय ठरत आहे. **** लातूर शहरात काल दिवसाभरात ५०४ वाहनधारकांकडून तब्बल एक लाख ८१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. संचारबंदीचे नियम न पाळल्यामुळे ४० दुचाकी आणि चार चाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत. पोलिस उपाधीक्षक सचिन सांगळे यांनी ही माहिती दिली. विनापरवाना दुकाने उघडलेल्या अशा सहा दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांची दुकाने सील करण्यात आली आहेत. **** भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना शेतकऱ्यांसाठी असलेल्या अल्प मुदतीचं पीक कर्ज आणि त्वरित परतफेड प्रोत्साहन लाभाची मुदत येत्या ३१ मे पर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक शेतकरी लॉकडाऊन मुळे परतफेडीसाठी बँकामध्ये येवू शकत नसल्यामुळे बँकांनी परतफेडीवर कोणतही विलंब शुल्क आकारू नये असंही बँकेनं म्हटलं आहे.यासोबतच कोणत्याही प्रकारच्या कर्जावरही शुल्क न लावण्याबाबतही बँकेनं सूचित केलं आहे. **** शहरी क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी राहत असलेल्या व्यक्ती, प्रीपेड मोबाईल रिचार्ज केंद्र तसंच अन्नधान्याशी संबधित प्रक्रिया केंद्रांना लॉकडाऊन मधून सूट देण्यात आली असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. गृहमंत्रालयानं या संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य ���चिवांना पत्र लिहिलं आहे. यात ब्रेड उत्पादन करणाऱ्या कंपन्या, दुग्ध प्रक्रिया संयंत्र, पीठं आणि डाळ मिल यांचा समावेश असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्ह्टल आहे. **** सहकारी संस्थांच्या सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने वार्षिक अहवाल पाठवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठवलं आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता अहवाल छपाईच्या अडचणी आणि खर्चाला फाटा देण्यासाठी ही मागणी केल्याचं देशमुख यांनी सांगितलं. या मागणीला थोरात यांनी अनुकूलता दर्शवल्याचं, देशमुख यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. **** जागतिक वसुंधरा दिन आज पाळला जात आहे. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालनपोषण आणि कनवाळूपणाबद्दल पृथ्वीचे आभार मानले आहेत. यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी पृथ्वीला अधिक स्वच्छ, अधिक निरोगी आणि अधिक समृद्ध करण्यासाठी कार्य करण्याचा संकल्प करण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे. कोविड १९ चा पराभव करण्यासाठी भरभरून योगदान देत असलेल्या सर्वांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे. *****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14  October 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १४ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा प्रचारांचा धुमधडाका; प्रचार सभांचा भडिमार ** केंद्र सरकारची धोरणं आणि कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी गरीब - पंतप्रधान ** अच्छे दिन आलेत का, असा प्रश्न विचारत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सरकारवर जोरदार टीका ** राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय जनता पक्ष अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या राज्यात ठिकठिकाणी सभा आणि ** दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात, भारताचा एक डाव आणि १३७ धावांनी दणदणीत विजय ** **** राज्य विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आठ दिवसांवर आलं असून जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धुमधडाका सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच�� अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अन्य छोट्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी काल जोरदार प्रचार केला. सर्वांनी राज्याच्या विविध भागात प्रचार सभा घेत प्रतिस्पर्धी पक्षांविरूद्ध आरोपांच्या तोफा डागल्या. भंडारा जिल्ह्यातल्या साकोली विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार परिणय फुके यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, केंद्र सरकारची धोरणं आणि कार्यक्रम गरीबांना केंद्रस्थानी ठेऊन तयार केली आहेत, असं सांगितलं. गेल्या काही महिन्यात ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत’ एकट्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या खात्यांमधे दोन हजार कोटी रुपये जमा केले आहेत, अशी माहिती मोदी यांनी दिली. भंडारा-गोदिंयातल्या दीर्घकाळ प्रलंबित सिंचन आणि जल संधारणाच्या कामांना नव्यानं सुरु झालेल्या जलजीवन अभियानाअंतर्गत गती मिळाली असल्याचं, त्यांनी सांगितलं. गोसीर्खुद धरणाची प्रलंबित कामंही आता पूर्ण होत आहेत. असं मोदी म्हणाले. जळगाव इथं प्रचारसभेला उपस्थित जनसमुदायाला जनादेश देणार का असा प्रश्न मराठीतून विचारत मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. महाजनादेशासाठी महाराष्ट्र सज्ज आहे असंही ते म्हणाले. लोकसभेत दिलेल्या मताधिक्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. **** लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी काल प्रचार सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अच्छे दिन आले का, असा प्रश्न विचारत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारनं शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नसून, केवळ बड्या उद्योगपतींचं कर्ज माफ केल्याचं ते म्हणाले. देशात बेरोजगारी वाढत असून, राज्यातले उद्योग गुजरातकडे वळवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठवाडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, असं कॉँग्रेस नेते अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. कलम ३७० आणि काश्मिरसारखे प्रश्न असे मुद्दे राज्याच्या निवडणुकीत कसे होऊ शकतात, असा प्रश्न जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी उपस्थित केला. मुंबईत चांदिवली इथं झालेल्या सभेत राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वीच्या ‘फोडा आणि लुटा’ या इंग्रज नितीचा वापर करून भाजप सरकार देशाला लुटत असल्याचा त्यांनी आरोप केला. राफेल विमान खरेदी प्रकरणी पुन्हा एकदा त्यांनी सरकारविरूद्ध आरोप केले. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री जाणुनबुजून बोलत नसल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. **** राज्यातला तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या बाजूनं असून, भाजप, शिवसेनेला सत्तेतून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी आश�� राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी मतदारसंघात पक्षाचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत ते काल बोलत होते. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तीन वर्षात होईल, असं सांगणाऱ्या सरकारनं स्मारकाची अद्याप एक वीटही रचली नाही. या सरकारची ऑनलाईन कर्जमाफी फसवी असून, राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हजारो तरुण बेरोजगार झाले, अशी टीका पवार यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथंही काल पवार यांची सभा झाली. **** यापूर्वीच्या काँग्रेस आघाडीच्या सरकारनं महाराष्ट्राला सापत्न भावाची वागणूक देत विकासनिधी देण्यात आखडता हात घेतला, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली. ते काल कोल्हापूर इथं प्रचारसभेत बोलत होते. मोदी सरकारनं आतापर्यंत महाराष्ट्राला साडे चार लाख कोटी रुपयांचा विकास निधी दिला असं त्यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या कराड इथंही शहा यांची सभा झाली. भाजप हा छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारा पक्ष असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. **** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथं महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. जम्मू-काश्मीरचं कलम ३७० रद्द करण्याकरता संसदेत विरोध करणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला, जनतेकडे मतं मागण्याचा अधिकार नाही, असं ते म्हणाले. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** केंद्रात आणि राज्यात सरकारनं जनहिताची अनेक कामं केल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी आणि पालम इथं महायुतीचे उमेदवार राहूल पाटील आणि विशाल कदम यांच्या प्रचारसभेत बोलत होते. परभणी जिल्ह्यात मिळालेल्या यशामुळेच एकेकाळी शिवसेनेला राजकीय मान्यता मिळाली होती. जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी पक्ष प्रयत्न करील, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांच्या प्रचारार्थ आखाडा बाळापूर इथंही काल ठाकरे यांची सभा झाली. राज्यात विरोधी पक्ष संपूर्ण जमीनदोस्त झाला असून, या विधानसभेत धनुष्यबाण आणि कमळ हे दोनच निवडणूक चिन्ह शिल्लक असल्याचं ते म्हणाले. लोहा इथं महायुतीचे उमेदवार मुक्तेश्वर धोंडगे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरे यांची काल सभा झाली. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथंही ठाकरे यांनी उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. हिंगोली इथं भाजप उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा झाली. उशिरा का होईना महाराष्ट्रात राहुल गांधी प्रचारात उतरले, त्यामुळे भाजपचा एकतर्फी विजय सोपा होईल, असं योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथंही काल योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. काश्मीरसाठीचं कलम ३७० हटवण्याचं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न भाजपनं पूर्ण केल्याचं ते म्हणाले. **** वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब आणि तुळजापूर तालुक्यातल्या काक्रंबा इथं ��ाहीर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेना सरकारच्या कारभारावर टीका केली. शेतमालाला योग्य भाव, सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी वंचित आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केलं. बीड इथंही रात्री आंबेडकर यांची जाहीर सभा झाली. केंद्र आणि राज्यातलं सरकार हे संपूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका त्यांनी यावेळी केली. ना शेती मालाला हमी भाव ना, वंचित घटकाला न्याय, केवळ टीआरपीवर हे सरकार चालत असल्याचं ते म्हणाले. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारूक अहमद यांच्या प्रचारासाठी अंजली आंबेडकर यांनी काल सभा घेतली. **** महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल, मुंबईत दिंडोशी आणि मागाठाणे इथं सभा घेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची काल सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ इथं सभा झाली. विरोधकांना चौकशी यंत्रणांचा धाक दाखवून राज्यातली सत्ता पुन्हा काबीज करू पाहणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल, असं सांगून त्यांनी सरकारवर टीका केली. मराठा आणि धनगर आरक्षणाच्या बाबतीत सरकारनं लोकांची फसवणूक केली, असा आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केला. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ काल महिला आघाडीच्या वतीनं क्रांती चौक ते टीव्ही सेंटर दरम्यान दुचाकी रॅली काढण्यात आली . महापौर नंदकुमार घोडेले यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. **** पुण्यात गहुंजे क्रिकेट मैदानावर काल झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात, भारतानं दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि १३७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. सामन्याच्या कालच्या चौथ्या दिवशी चहापानानंतर, दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १८९ धावांत संपुष्टात आला. उमेश यादव आणि जडेजानं प्रत्येकी तीन, अश्विननं दोन, तर ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. **** औरंगाबाद इथल्या स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था आणि संबंधित गटानं औरंगाबाद शहराचा वैशिट्यपूर्ण ‘पर्यावरण विषयक जाहीरनामा’, केला आहे. शहरातल्या पर्यावरण प्रेमी आणि अभ्यासकांशी एकत्रित चर्चा करून हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. शहरातल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारांना तो देण्यात येणार असून या जाहीरनाम्याचा समावेश त्यांच्या जाहीरनाम्यात करण्याची विनंती करण्यात येत असल्याचं यासंबंधीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 October 2019 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ६.०० **** केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आतापर्यंत मिळणारा १२ टक्के भत्ता आता १७ टक्के झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एक जुलैपासून हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर १६ हजार कोटी रूपयांचा बोजा पडणार असून, ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्तीवेतन धारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. **** भारतीय स्टेट बँकेनं व्याज दरात कपात केली आहे. बचत खात्यावर शिल्लक रकमेवर आता तीन पूर्णांक २५ शतांश दराने व्याज मिळेल. एक नोव्हेंबरपासून हे नवीन दर लागू होतील. कर्जाच्या व्याजदरातही शून्य पूर्णांक दहा शतांश टक्क्यांनी कपात झाली आहे. पूर्वीच्या आठ प���र्णांक पंधरा शतांश टक्के ऐवजी आता आठ पूर्णांक पाच दशांश टक्के दराने कर्ज मिळेल. **** काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतला पराभव मान्य केला असल्यामुळेच, इकडे निवडणूक प्रचार सुरू असताना, ते बँकाँक फिरायला गेले असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ��े आज शहादा इथं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या जाहीर सभेत बोलत होते. काँग्रेस आघाडीने जाहिरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांवरही फडणवीस यांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी या सभेत, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. **** युती सरकारने दिलेला कुठलाही शब्द पाळला नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते आज अकोला जिल्ह्यात काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वाडेगाव इथल्या जाहीर सभेत बोलत होते. पुलवामा, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, बेरोजगारी, अशा अनेक मुद्यांवरून त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. **** राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याबाबत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलेलं विधान हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही स्वतंत्र पक्ष असून, भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी लढा देण्याकरता दोन्ही पक्ष सोबत असल्याचं, पवार यांनी सांगितलं. **** औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना - भाजप महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ आज दुचाकी फेरी काढण्यात आली. एमआयएमचे नासेर सिद्दीकी, महाआघाडीचे कदीर मौलाना, वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ, भाकपचे अभय टाकसाळ यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. औरंगाबाद पूर्व मतदार संघात महायुतीचे अतुल सावे आणि एमआयएमचे डॉ. अब्दुल गफार कादरी यांनी पदयात्रेद्वारे मतदारांशी संवाद साधला. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातले महायुतीचे संजय शिरसाट यांनी छावणी परिसरात पदयात्रा काढली. **** ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. गेली साठहून अधिक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणारे अरुण काकडे यांनी, १९७१ साली स्थापन केलेल्या ‘आविष्कार’ या संस्थेच्या माध्यमातून अनेक नाटकं रंगभूमीवर आणली. चौऱ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. **** यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर झाला आहे. अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या कार्यवाह डॉ. सविता पानट यांनी ही माहिती दिली. पन्नास हजार रूपये रोख आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पत्रकारिता, साहित्य, कला, समाजसेवा अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका नामवंत व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मराठी साहित्य, समीक्षा आणि भाषा या क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डॉ. रसाळ यांची या वर्षी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. येत्या १७ नोव्हेंबर रोजी डॉ. रसाळ यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. **** सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यासाठी प्रति महिना एक किलो साखर जारी केली आहे. संबंधित लाभार्थींनी साखरेची उचल करावी, असं आवाहन नांदेडच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलं आहे. **** डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं विद्यार्थी स्वयंसेवकांना स्वच्छता मोहीम आणि व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. ****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 May 2019 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १४ मे २०१९ सायंकाळी ६.०० **** पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सात दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त आनंद रायत�� यांनी याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे. राज्य सरकारनं शिक्षणासाठी मराठा आरक्षण लागू करण्यापूर्वीच यावर्षीच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली होती. त्यामुळे यावर्षी हे आरक्षण लागू न करता ते पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करावं, हा नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे मराठा आरक्षणानुसार प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. न्यायालयातील याचिकांमुळे प्रवेश प्रक्रियेत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील सात दिवस, म्हणजे येत्या सोमवारपर्यंत पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचं आयुक्तांनी या पत्रकात म्हटलं आहे. **** आयसीआयसीआय बँक आणि व्हिडीओकॉन कर्ज प्रकरण आणि काळा पैसा वैध केल्याप्रकरणी, बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर आज दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी, सक्तवसुली संचालनालय ईडी समोर हजर झाले. कोचर यांची कालही दिवसभर चौकशी झाली. कोचर दाम्पत्याची यापूर्वी मुंबई कार्यालयात चौकशी झालेली आहे. या वर्षी एक मार्च रोजी ईडीनं कोचर आणि व्हिडीओकॉन समुहाच्या कार्यालयांवर छापे घातले होते, त्यामध्ये कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडीओकॉन कंपनीला मंजूर केलेल्या एक हजार आठशे पंचाहत्तर कोटी रुपयांचं कर्ज प्रक्रियेत अनेक अनियमितता असल्याचं निदर्शनास आलं होतं, त्यानंतर कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन समूहाचे वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून, चौकशी सुरू केलेली आहे. **** दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याचा पाणी पुरवठा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. ते आज नागपूर जिल्हा प्रशासनाशी ऑडिओ ब्रीजद्वारे बोलत होते. ***** २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भातल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आपले वडील हयात नाहीत, असं अभिनेता रितेश देशमुख यांनी म्हटलं आहे. भा��प नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात केलेल्या टीकेला ते उत्तर देत होते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, आपल्या मुलाला, या विषयावरच्या चित्रपटात भूमिका मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते, असं विधान गोयल यांनी नुकतंच केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. चित्रपट निर्माता दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आणि अभिनेता पुत्र रितेश या दोघांना, देशमुख यांनी, दहशतवादी हल्ल्यानंतरच्या पाहणी दौऱ्यावर सोबत नेलं होतं. यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. **** ठाणे इथल्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं, कल्याण डों��िवली महापालिकेतल्या शिवसेनेच्या नगरसेवकाला, एका कंत्राटदाराकडून एक लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी आज अटक केली. गोरख जाधव असं या नगरसेवकाचं नाव असून, कंत्राटदाराला मिळालेल्या साडे नऊ लाख रुपयांच्या कंत्राटातून त्यानं दहा टक्के लाच मागितल्याचं, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. **** छत्रपती संभाजी महाराज यांची ३६२ वी जयंती आज सर्वत्र साजरी झाली. यानिमित्त औरंगाबाद शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. टीव्ही सेंटर चौकात संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवरांनी संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली. **** जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद-वरुड रस्त्यावर, सोनगिरी फाट्याजवळ आज दुपारी दुचाकी उलटून झालेल्या अपघातात दुचाकीवरचे दोनजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. सचिन भगवान शेळके, अमोल माधवराव बागल, अशी मृतांची नाव आहेत. हे सर्वजण कोळेगाव इथले रहिवासी आहेत. चालकाचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** अमरावती जिल्ह्यात राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत एक कोटी ९ लाख ३८ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आलं आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत हा उपक्रम राबवला जाणार आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 May 2019 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ मे २०१९ सकाळी ७.१० मि. ****
·      लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदानः मात्र टक्केवारी घटली.
·      सरन्यायाधीश रंजन गोगोईंविरुद्धचे लैंगिक छळाचे आरोप तथ्यहीन : सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी समितीचा निर्वाळा.
·      केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सी.बी.एस.ई.च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर.
आणि
·      देवदर्शनासाठी गेलेल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या कुटुंबाच्या मोटारीला तामिळनाडूत अपघात- सात जणांचा मृत्यू.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान काल कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडलं, मात्र आतापर्यंतच्या मतदानाच्या तुलनेत या टप्प्यात मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं दिसून आलं. या टप्प्यात सरासरी ६३ पूर्णांक ५ टक्के मतदान झाल्याचं. निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. सात राज्यातल्या ५१ मतदारसंघात हे मतदान झालं. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, राज्यवर्धन सिंह राठोड, अर्जुन मेघवाल आणि जयंत सिन्हा, भाजप नेते राजीव प्रताप रूडी आणि अर्जुन मुंडा तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि जितीन प्रसाद या प्रमुख नेत्यांचं भवितव्य काल मतपेटीत बंद झालं.
****
लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या मतदान यंत्रांशी, भ्रमणध्वनी मनोरे किंवा वायफायद्वारे छेडछाड होण्याची भीती असून, सुरक्षेसाठी मतदान यंत्रं ठेवलेल्या ‘स्ट्राँग रूम’ मध्ये ‘जॅमर’ बसवण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना देखील हे जॅमर कार्यान्वीत असले पाहिजे, अशीही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मतमोजणी दरम्यान एका फेरीचा निकाल जाहीर केल्यानंतरच पुढील फेरीची मतमोजणी सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.  
****
सरन्यायाधीश रंजन गोगोईंविरुद्धच्या लैंगिक छळाच्या आरोपात तथ्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी समितीनं काल स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयातल्या एका माजी महिला कर्मचाऱ्यानं सरन्यायाधीश गोगोई यांच्यावर हे आरोप केले होते. न्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीला या आरोपात तथ्य आढळलं नसल्याचा अहवाल समितीनं सादर केला असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या सरचिटणीस कार्यालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सी.बी.एस.ई.च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. १७ लाख, साठ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९१ पूर्णांक एक दशांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, पाचशे पैकी ४९९ गुण मिळवून १३ विद्यार्थी पहिल्या क्रमांकावर आहेत. उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. हा निकाल सीबीएसईच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधे ‘पाण्याच्या बदल्यात पाणी’ तत्वावर सामायिक पाणी वाटपाचा सामंजस्य करार करण्याची राज्य शासनाची मागणी कर्नाटक राज्याच्या सरकारनं तत्वतः मान्य केली आहे. कर्नाटकचे जलसंसाधन मंत्री डी. के. शिवकुमार यांनी याबाबत चर्चा करण्यासाठी बेळगाव, विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यांतले ज्येष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली. विजयपुरा तालुक्यातल्या तुबची बाबळेश्वर उपसा सिंचन योजनेतून रब्बी आणि खरीप हंगामासाठी प्रत्येकी दोन दशलक्ष घनमीटर पाणी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याला देण्याची मागणी आपल्या राज्यानं केली. त्या बदल्यात तेवढंच पाणी उन्हाळ्यात महाराष्ट्राकडून राजापूर धरणातून कृष्णा नदीत सोडलं जाईल. या पाण्यासाठी यापूर्वी कर्नाटक सरकार शुल्क भरत होतं, मात्र आता त्याऐवजी ‘पाण्याच्या बदल्यात पाणी मिळावं’ अशी मागणी महाराष्ट्रानं केली असल्याचं शिवकुमार यांनी सांगितलं.
****
गडचिरोली जिल्ह्यात पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी काल आणखी एका व्यक्तीची हत्या केली. काल सकाळी एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांभिया गावानजीक ही हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे. एक्केचाळीस वर्षीय शिरीष मंडल या दुचाकी दुरुस्त करणाऱ्या बंगाली भाषिकाची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. त्याचा मृतदेह गट्टा- बांडे मार्गावर आढळला. नक्षलवाद्यांनी परवा आणखी एका व्यक्तीची पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली होती.
****
भारतीय नौदलाच्या स्कॉर्पिन श्रेणीतल्या ‘वेला’ या चौथ्या पाणबुडीचं काल मुंबईत माझगाव गोदीत जलावतरण झालं. संरक्षण उत्पादन सचिव डॉक्टर अजय कुमार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यापूर्वी तत्कालीन सोवियत रशियाकडून घेतलेल्या पाणबुड्यांच्या ताफ्यातल्या वेला नावाच्या पाणबुडीचं नाव या नव्या पाणबुडीला दिलं आहे. या प्रकारातल्या एकूण चार पाणबुड्यांची बांधणी फ्रान्सच्या सहकार्यानं माझगाव गोदीत सुरू आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जिल्ह्यातल्या गंगापूर, वैजापूर, कन्नड तालुक्यातल्या विविध गावांना भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लोणी खुर्द, खंडाळा, आदी ठिकाणी शेततळे, रोजगार हमी योजना कामांची पाहणी, चारा छावण्या, नदी खोलीकरण, जलयुक्त शिवार अभियानातील कामांना भेट देऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. नाशिक जिल्ह्यात सिन्नर, निफाडसह काही भागात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन दुष्काळी स्थितीची काल पाहणी केली.
****
बीड जिल्ह्यात सुरू असलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची, जलयुक्त शिवार योजनेतली मंजूर कामं आणि अपूर्ण असलेली सर्व कामं तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पाणी फाऊंडेशनच्या समन्वयकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. जिल्ह्यात ज्या गावांनी पाणी फाऊंडेशनमध्ये सहभाग घेऊन सहकार्य केले, त्या गावांमध्ये जलसंधारणाची चांगली कामे झाली असल्याचं पाण्डेय यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या मौजे अरबुजवाडी इथं पाणी फाउंडेशनच्या वतीनं काल श्रमदान करण्यात आलं. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ग्रामस्थांसोबत श्रमदानात सहभाग घेवून जल संवर्धनाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं. तसंच पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गंगाखेड तालुक्यातल्या अरबुजवाडी, सुप्पा जहांगिर, सुप्पा खावसा या गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली.
****
राज्यात उन्हाचा पारा वाढला असून परभणीसह मराठवाड्याच्या तापमानातही वाढ झाली आहे. काल परभणी इथं ४२ अंश सेल्सियश तापमानाची नोंद झाली. येत्या तीन - चार दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे असं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं सांगितलं.
****
औरंगाबाद इथं अन्नदाता शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काल मोर्चा काढला. बारा मे रोजी जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात पाणी न सोडल्यास तेरा मे रोजी जायकवाडी धरणात जलसमाधी आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. पिक विम्यातली फसवणूक दूर करावी, दुष्काळी मदत मिळावी आणि खरीप पेरणीसाठी सरकारनं आर्थिक मदत करावी आदी मागण्यांचं निवेदन अन्नदाता शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलं.  
****
जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातल्या खासगावचे तलाठी भगवान काकड यांना एक हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहात पकडलं. खरेदी केलेल्या जमिनीचा फेर घेण्यासाठी काकड यांनी ही लाच मागितली होती.
****
तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातल्या अंबूर गावाजवळ काल एका ट्रेलरनं मोटारीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात सात जण जागीच ठार झाले. अपघातातील सर्व जण हे बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावचे रहिवासी असून सहा जण एकाच कुटुंबातील आहेत. हे सर्वजण मोटारीनं देवदर्शनासाठी गेले होते.
****
औरंगाबाद इथल्या वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या कास्ट झी या रासायनिक कंपनीला काल आग लागली. ही आग शेजारील तायो निपोन सान्सो या गॅस उत्पादन करणाऱ्या कंपनीत सुद्धा पसरली होती. अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी आणि खाजगी टँकरद्वारे ही आग विझविण्यात आली. या आगीत एक कामगार भाजला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात भानस हिवरा यात्रेत घोडा बैलाच्या शर्यतीचं आयोजन करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या यात्रेत शेमिगोंडा शर्यती म्हणजे घोडा -बैलाची शर्यत आयोजित केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून त्यांनी खुणेगाव शिवारात छापा टाकून ही कारवाई केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
धुळ्याजवळ पारोळा पुलावर कांदा भऱलेल्या ट्रकवर इंदूरहून मुंबईकडे जाणारी खाजगी प्रवासी बस पाठीमागून आदळल्यानं झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर अन्य २५ जण जखमी झाले आहेत. काल पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.
****
पवित्र महिना रमजान महिन्यास आजपासून सुरूवात झाली आहे. महिनाभर सुर्योदय ते सुर्यास्त दरम्यान उपवास पाळून हा सण साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सणानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षय तृतीयेचा सण आज साजरा होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला हा सण नव्यानं आर्थिक आणि मालमत्तेचे व्यवहार करण्यासाठी शुभ मानला जातो.  
****
महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत लातूर जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या एक हजार २३७ बचत गटांना यावर्षी विविध बँकांच्या माध्यमातून २३ कोटी रूपये कर्ज वाटप करण्यात आलं आहे. बचत गटांना कर्ज वाटपात लातूर जिल्हा मराठवाड्यात अव्वल ठरला आहे. महिला बचत गटांचं कर्ज परतफेडीचे प्रमाणही ९९ टक्के असल्याचं महिला अर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक मंसूर पटेल यांनी सांगितलं.
****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 March 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २६ मार्च २०१९ दुपारी १.०० वा. **** भारतीय जनता पक्षानं, पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांना लोकसभा निवडणूक लढवू नये, असं सांगितलं आहे. पक्षानं, यंदाच्या निवडणुकीत वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या अनेक विद्यमान खासदारांना संधी दिलेली नाही, नव्वद वर्षांचे लालकृष्ण अडवाणी यांच्यासह, बी सी खंडुरी, करिया मुंडा यांच्यासह अनेक ज्येष्ठांच्या या यादीत आता मुरली मनोहर जोशी यांचं नावही समाविष्ट झालं आहे. जोशी हे कानपूरचे विद्यमान खासदार आहेत. त्यापूर्वी ते २००९ मध्ये वाराणसी मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करत होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्यांनी २०१४ मध्ये वाराणसी ऐवजी कानपूर मतदार संघातून निवडणूक लढवली होती. **** निवडणूक आयोगानं, निवडणूक काळात संभाव्य वापरात येणारं सुमारे ५४० कोटी रुपये किंमतीचं साहित्य जप्त केलं आहे. यामध्ये अवैध मद्यसाठा, अंमली पदार्थ, दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे. अशा कारवाईत तमिळनाडू प्रथम स्थानावर तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली. **** भाजप नेते नीतीन गडकरी यांनी आपल्याकडे २५ कोटी बारा लाख रुपयांची मालमत्ता असल्याचं, उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात नमूद केलं आहे. यामध्ये सुमारे सात कोटी रुपयांची अचल संपत्ती तर सुमारे सत्तर लाख रुपयांची चल संपत्ती आहे. आपल्यावर सुमारे दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचं कर्ज असल्याचंही गडकरींनी यात नमूद केलं आहे. **** देशात वैद्यकीय संशोधनाला चालना देण्यासाठी, आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयानं औषधं आणि चिकित्साशास्त्रीय चाचण्या नियम २०१९ जारी केला आहे. या नव्या नियमांमुळे नवी औषधं आणि चाचण्यांच्या, मंजूरी संबंधी नियमांमध्ये, बदल केले जातील. नवीन औषधं, मानवी उपचारासाठी नव्या औषधांचा शोध, तसंच चिकित्सात्मक चाचण्यांवर हे सर्व नियम लागू होतील. **** छत्तीसशे कोटी रूपयांच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहाराप्रकरणी, अंमलबजावणी संचालनालय -इडी ने दिल्लीतून एकाला अटक केली आहे. सुषेण गुप्ता असं त्याचं नाव असून, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारासह, संरक्षण दलाच्या अनेक व्यवहारात त्याचा सहभाग होता, अशी माहिती इडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. काळा पैसा वैध करण्यास प्रतिबंध कायद्याखाली त्याला अटक करण्यात आली. राजीव सक्सेना याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. याच प्रकरणात गौतम खेतान आणि ख्रिश्चेन मिशेल या दोघांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. **** सिंगापूर विमान कंपनीच्या मुंबई सिंगापूर विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे नियंत्रण कक्षात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. हे विमान काल रात्री मुंबईहून सिंगापूरकडे निघालं होतं, आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते सिंगापूर विमानतळावर सुखरूप उतरलं. विमानात २६३ प्रवासी होते. मुंबईहून मुरूड जंजिऱ्याकडे जाणाऱ्या एस टी बसमध्येही काल बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. ही बस अलिबाग जिल्ह्यातल्या रेवदंडा स्थानकात येताच, बसची संपूर्ण तपासणी करण्यात आली. पूर्ण तपासणी अंती ही अफवा असल्याचं स्पष्ट झालं. कर्जत आगाराच्या एका बसमध्ये नुकताच बॉम्ब सापडला होता, त्यापार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जात आहे. **** बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा इथं काल वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटातल्या ३० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, एका नगरसेवकासह ११ जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यापैकी आतापर्यंत १७ आरोपींना अटक करण्यात आली असून, १३ आरोपी अजून फरार आहेत. **** जालना जिल्ह्यात आज पहाटे रस्ता अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पुलाचा अंदाज न आल्यानं दुचाकी खड्यात पडून हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** नवी दिल्ली इथं आज सुरु होणाऱ्या भारतीय खुल्या सुपर 500बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूचा सामना प्रतिस्पर्धी मुग्धा आग्रे हिच्याशी होणार आहे. महिला एकेरी सामन्यात वृषाली गुम्मादी, साईउत्तेजिता राव यांच्यामध्ये, तर किदंबी श्रीकांत याचा सामनाहाँगकाँगच्या विंग की विनसेंस सोबत असेल. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 December 2018 Time - 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २० डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.०० ****
लोकसभेत आज ‘ग्राहक संरक्षण विधेयक २०१८’ पारित करण्यात आलं. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ग्राहक तक्रार निवारण आयोग स्थापन करण्याची तरतूद या विधेयकात आहे. जिल्हा आयोगाला एक कोटी, राज्य आयोगाला १५ कोटी आणि राष्ट्रीय आयोगाला ��्यापेक्षा जास्त रकमेच्या दाव्यांशी संबंधित तपासणी करण्याची परवानगी या विधेयकाअंतर्गत देण्यात आली आहे. अन्न भेसळ करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतुदही या विधेयकात आहे.
****
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत पुरवणी मागण्या सादर केल्या. यात ७१ पुरवणी मागण्या आणि दोन विनियोजन विधेयकांचा समावेश आहे. यामध्ये ८५ लाख ९४९ कोटी रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. तसंच त्यांनी कंपनी सुधारणा विधेयक २०१८ ही लोकसभेत सादर केलं.
****
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या विक्री केलेल्या कांद्यासाठी २०० रुपये प्रती क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळानं घेतलेल्या या निर्णयाबद्��ल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व मंत्रिमंडळ सदस्यांचे आभार मानले आहेत. नगण्य बाजारभावामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीनं अनुदान देण्याबाबत मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत रावते यांनी मागणी केली होती.
डॉ. होमी भाभा विद्यापीठ उभारण्यासही आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबईची शासकीय विज्ञान संस्था, एलफिन्स्टन महाविद्यालय आणि शासकीय अध्यापक महाविद्यालय यांचा समावेश करुन हे विद्यापीठ उभारण्यात येणार असून, यात रोजगार निर्मिती पूरक अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत.
राज्यात रस्ते सुरक्षा विषयक कामकाज हाताळण्यासाठी शिर्षसंस्था स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. यासाठी सहपरिवहन आयुक्त, परिवहन उपायुक्त, उपअधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त अशा १६ पदांच्या निर्मितीसही मान्यता देण्यात आली.
११ विद्यापीठांसाठी ३२ अधिष्ठातांच्या पदांना मंजुरी, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांची स्थापना करण्यास, अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातल्या तुकाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत २० पाझर तलावात पाणी सोडण्यास, जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता इथं दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
****
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०० रुपये अनुदान देण्याचा राज्य सरकारनं घेतलेला निर्णय आपल्याला पटला नसून, ही रक्कम अपुरी असल्याचं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या पेठ इथं आज ते बोलत होते.  
दरम्यान, बागलाण मधल्या नामपूर बाजार समितीत आज कांद्याला एक रुपया प्रति किलो तर क्विंटलला शंभर रुपये भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांनी लिलाव रोखल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळण्यासाठी आणि भूसंपादन करण्यासाठी महाराष्ट्र ��द्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं राज्य रस्ते विकास महामंडळाला आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २५० कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा धनादेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी विविध संस्थांकडून भूसंपादनासाठी दुय्यम कर्ज स्वरुपाची रक्कम उपलब्ध करून देण्यात येत आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राधाकिशन शिंदे यांच्या विरुद्ध १६ नगरसेवकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आज मंजूर झाला. कर्मचारी आणि सहकारी नगरसेवकांशी उद्धट वर्तन करणं, या कारणावरुन शिंदे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता.
****
जालना इथं सुरु असलेल्या ६२व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आज मल्ल सागर मारकडनं अंतिम फेरीत धडक मारली. तर मल्ल ओंकार लाडनं शिवराज हाके याचा पराभव करुन आणि कोल्हापूरच्या भरत पाटील यानं सुरज अस्वले याचा पराभव करुन कांस्य पदक पटकावलं. मुंबईच्या सचिन पाटीलनं अजय भोईर याचा पराभव करुन कांस्य पदक मिळवलं. तर माती विभागाच्या ७९ किलो वजनी गटात साताऱ्याचा किरण बरकडे यानं अजहर शेखचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं.
****
दरम्यान, या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आज शहरातून पहिलवानांची दुचाकी रॅली काढण्यात आली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ झाला.
****
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 May  2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ मे २०१८ सकाळी ६.५० मि. ****  खरीप पीक कर्ज पुरवठ्याचं जिल्हानिहाय नियोजन मिशन मोडमध्ये करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश  अॅट्रॉसिटी कायदा शिथील केला जाणार नाही - केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांची ग्वाही  राज्यात सतरा केंद्रांवर आज वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता चाचणी  अहमदनगर दुहेरी हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी उल्हास माने याला अटक आणि  उस्मानाबाद इथं सामुहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी एका आरोपीला २७ वर्ष तर बाकी तीन आरोपींना प्रत्येकी २२ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ***** खरीप पीक कर्ज पुरवठ्याचं जिल्हानिहाय नियोजन मिशन मोडमध्ये करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत बोलत होते. खरीप हंगामात गुणवत्ता पूर्ण बियाणं, खतं पुरवठा करतानाच, १०० टक्के कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज देण्यासाठी विशेष लक्ष द्यायला हवं, असं ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेच्या दृष्टीने हा महिना महत्त्वाचा आहे, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. गेल्या वर्षभरात राबवल्या जात असलेल्या, मागेल त्याला शेततळे, उन्नत शेती समृध्द शेतकरी, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, आदी योजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. सुमारे तीनशे कोटी रुपयांचं कृषी यांत्रिकीकरण राबवणारं महाराष्ट्र देशातलं एकमेव राज्य असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. **** प्लास्टिक तसंच थर्माकोल उत्पादक, विक्रेते, वाहतूक आणि साठवणूकदार यांच्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश अप्पर मुख्य सचिव सतीश गवई यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. प्लास्टिक बंदीसंदर्भात २३ मार्च पासून तीन महिन्यांपर्यंत नागरिकांविरूध्द दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश अपर मुख्य सचिवांनी दिलेले आहेत. मात्र विक्रेते, साठेबाज, वाहतुकदार यांच्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल येत्या आठ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयात सादर केला जाणार असल्याचं, अपर मुख्य सचिवांनी सांगितलं. **** राज्यात कुपोषणाला आळा घालण्यासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. राज्यात सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या पाच महि��्यांच्या कालावधीत आदिवासी भागातल्या ३०० बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची तक्रार एका याचिकेत करण्यात आली आहे. यासंदर्भात न्यायालयानं काही दिशानिर्देश जारी केले होते. त्याच्या अंमलबजावणीबाबतही न्यायालयानं काल राज्य सरकारकडे विचारणा केली. मेळघाट आणि नंदुरबार सारख्या आदिवासी भागात वैद्यकीय सुविधा, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र आणि डॉक्टरांची संख्या याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. **** वनेतर क्षेत्रातल्या वृक्षाच्छादनामध्ये महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आलं आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार राज्यात दोन वर्षात वनेतर क्षेत्रात २७३ चौरस किलोमीटरनं वाढ झाली असून, याचं सर्व श्रेय शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात, पर्यावरण रक्षणात सहभागी झालेल्या जनतेला आणि संस्थांना आहे, असं ते म्हणाले. राज्यात एक जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. **** अनुसूचित जाती-जमाती अन्याय प्रतिबंधक अॅट्रॉसिटी कायदा शिथील केला जाणार नाही अशी ग्वाही, केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांनी दिली आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. यासंदर्भातल्या उच्चस्तरीय समितीनं हा कायदा जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं याबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल केली असून, गरज भासल्यास तसा अध्यादेशही जारी केला जाईल असंही त्यांनी सांगितलं. **** वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश पात्रता चाचणी - एन ई ई टी 'नीट' आज देशभरात होत आहे. राज्यात औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, सोलापूर, अहमदनगरसह सतरा शहरांमध्ये ही परीक्षा होत आहे. सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत परीक्षा होणार आहे, सर्व परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रांवर सकाळी साडे सात वाजता हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. परीक्षार्थींनी पोषाखाबाबतचा नियम पाळावा, तसंच प्रतिबंधित साहित्य सोबत बाळगू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. ***** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. ***** अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी उल्हास माने याला काल कर्जत तालुक्यात अटक करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी ही माहिती दिली. जामखेड बाजार समितीच्या आवारात, गेल्या महिन्यात योगेश राळेभात आणि राकेश राळेभात यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, या हत्या प्रकरणानंतर उल्हास माने फरार होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक क���ली आहे. **** उस्मानाबाद तालुक्यातल्या बेंबळी इथं महिलेवर सामुहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं तीन आरोपींना २२ वर्ष सक्तमजुरी, तर एका आरोपीला २७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. चौघा आरोपींना प्रत्येकी ५२ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. २६ ऑक्टोबर २०१५ रोजी ही घटना घडली होती. **** २९ व्या रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत राबवण्यात आलेल्या वाहतूक संरक्षण जनजागृती पंधरवड्याचा काल समारोप झाला. औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालयाच्या वाहतुक विभागाच्या वतीनं यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. शहरातून हेल्मेट जनजागृती दुचाकी फेरी काढण्यात आली. **** शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे द्यावेत, बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानापोटी अनुदान मिळावं या आणि अन्य मागण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं काल खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यात काल चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. या मागणीचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं. **** जालना जिल्ह्यातल्या पात्र शेतकरी लाभार्थ्यांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचं काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. या कामात टाळाटाळ करणारे आणि विलंबास जबाबदार असणारे अधिकारी - कर्मचारी यांच्यावर कारवाईचा इशारा लोणीकर यांनी दिला आहे. **** परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यात खडका इथं, अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी थेट कारवाई करून, तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. काल पहाटे ही कारवाई झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याप्रकरणी सोनपेठच्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात कौडगांव थडी शिवारात गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या महसुल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याचं वृत्त आहे. याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरुन माजलगाव पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. **** स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शेतकरी स्वाभिमान अभियान यात्रा काल औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं पोहोचली. यानिमित्त शहरात विशेष सभा घेण्यात आली. खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केलेल्या भाषणातून राज्य सरकारच्या कृषी विषयक धोरणावर जोरदार टीका केली. **** बीड शहरात जालना रस्त्यावर काल एका टायरच्या दुकानाला आग लागून मोठं नुकसान झालं. आगीच्या भडक्यामुळे दुकानाबाहेर उभ्या दोन खासगी बस तसंच चार दुचाकी जळाल्या तसंच जवळच्या एका रुग्णालयापर्यंत आग पोहोचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. **** सातारा जिल्ह्यात कऱ्हाड इथं आयोजित पहिल्या अखिल भारतीय लोककला संमेलनाचे अध्यक्ष म्हणून औरंगाबाद इथले लोककला - संस्कृतीचे ज्येष्ठ तज्ज्ञ, प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर मांडे यांची निवड झाली आहे. लोकशाहीर पठ्ठेबापूराव कुलकर्णी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षाच्या अनुषंगाने येत्या अकरा ते तेरा मे दरम्यान हे संमेलन होत आहे. **** राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे, या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य सेवेचे सहायक संचालक डॉ. के. आर खरात यांनी नागरिकांना वाढत्या उष्म्यापासून बचावासाठी आवश्यक उपाय योजना करण्याचं आवाहन केलं आहे. बीड जिल्ह्यात तापमानात वाढ झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालयातर्फे उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यात काल दोन तरुणांचा मृत्यू झाला, हे मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. जळगाव इथं काल सुमारे ४३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. *****
0 notes