#दाम्पत्याला
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 July 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा, बळीराजाच्या कल्याणासाठी मुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाला साकडं
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सर्वपक्षीय बैठक
वंचित बहुजन आघाडीकडून २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा
आणि
टेनिसपटू सुमित नागलची स्वीडीश ओपनमध्ये आगेकूच, एटीपी क्रमवारीत ६८ व्या स्थानी झेप
****
शेतकरी, वारकरी, कष्टकरी यांच्यासह राज्यातल्या प्रत्येक वर्गाला सुख - समृद्धी लाभू दे असं साकडं विठ्ठलाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली, त्यानंतर ते बोलत होते.
“बळीराजाला सुखी कर, बळीराजावरचं संकट दूर कर, चांगला पाऊस येऊ दे, चांगलं पीक येऊ दे, सुगीचे दिवस येऊ दे, आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे, सुख– समृद्धी येऊ दे. कारण वारकरी म्हणजे शेतकरीच आहेत. शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माता – भगिनी, युवक, ज्येष्ठ सगळे, सगळेच, या राज्यातला प्रत्येक घटक जो आहे, तो सुखी – समृद्ध झाला पाहिजे, हीच आमची पांडुरंगाकडे प्रार्थना असते.”
नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातल्या अंबासह इथले आशाबाई आणि बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसह शासकीय पुजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. या महापूजेनंतर या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
आषाढी यात्रेदरम्यान वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. व्हीआयपी लोकांपेक्षा सर्वसामान्यांना दर्शनासाठी पहिल्यांदा प्राधान्य मिळावं असा आपला अट्टाहास असल्याचं त्यांनी सांगितलं. पंढरपूरच्या मंदीराचा विकास आराखडा स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन तयार करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, यावेळी उपस्थित होते. यावेळी मानाच्या पालख्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं
****
पंढरपूर इथं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३४ फलाटांच्या चंद्रभागा यात्रा बसस्थानकाचं लोकार्पण होत आहे. हा राज्यातला एसटी महामंडळाचा पहिलाच भव्य प्रकल्प आहे, सुमारे ३३ कोटी रुपये खर्चून अकरा हेक्टर जागेवर या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे.
****
राज्यभरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिभावाने, उत्साहात साजरा होत आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं वाळूज नजिक असलेल्या पंढरपुरातही विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. आसपासच्या अनेक गावातून शेकडो भाविक दिंड्या पताका घेऊन पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असल्याचं दिसून येत आहे.
****
लातूरच्या सत्संग प्रतिष्ठानकडून एक हजार ७०० वारकरी यंदा पंढरपूरला रवाना झाले. या वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ३१ बस, विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष वैशाली देशमुख यांच्या उपस्थितीत मार्गस्थ झाल्या.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत येत्या ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेची अंतिम मुदत १५ जुलैला संपत होती. मात्र, राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पीक विमा भरलेला नाही; त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती.
****
नांदेड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी, तसंच या कामांच्या सद्य:स्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. भोकर इथल्या जलजीवन मिशन आणि वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमां��र्गत एक हजार २३४ कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, तर २८ पाणी पुरवठा योजनांची कामं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत राबवण्यात येत आहेत. ही कामं निश्चित कालमर्यादेत पूर्ण होणं आवश्यक असल्याचंही पवार म्हणाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सहा ऑगस्टला सुनावणी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाला या याचिकेबाबत दोन आठवड्यात उत्तर देण्यास, तर शरद पवार गटाला या उत्तरावर प्रतिवाद करण्यासाठी न्यायालयाने एका आठवड्याची मुदत दिली आहे.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण स्थगित करण्यात आलं आहे. मसुरीच्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीने खेडकर यांना पत्र पाठवून ही माहिती देत, महाराष्ट्र राज्य सरकारच्या या कार्यक्रमातून पदमुक्त करत, अकादमीत परत बोलावलं आहे. कोणत्याही परिस्थितीत २३ जुलै पूर्वी अकादमीत हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश खेडकर यांना देण्यात आले आहेत.
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २२ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं २१ जुलैला सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. २३ जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम देशाचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अधिवेशनात सादर करतील.
****
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याचा विरोधी पक्षाकडे कोणता कायदेशीर मार्ग आहे, याची माहिती देण्याचं आवाहन, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. या मुद्यावर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहिले असते, तर यावर त्यांची भूमिका स्पष्ट झाली असती, असं ते म्हणाले.
****
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा ���ाढण्यात येणार आहे. विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत चैत्यभूमी इथून या यात्रेला प्रारंभ होणार असून, विदर्भ तसंच मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यात मार्गक्रमण करत, आठ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर इथं या यात्रेची सांगता होणार आहे. ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे, एसटी एससी शिष्यवृत्ती वाढ झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना एसटी एससी शिष्यवृत्ती लागू झाली पाहिजे, तसंच जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, या मागण्यांचा या यात्रेच्या माध्यमातून प्रचार करणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.
****
मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कळंबोली इथल्या एम��ीएम रुग्णालयात काल भेट देऊन अपघातातल्या जखमींची चौकशी करुन, उपचाराचा खर्च सरकारच्या वतीने करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. आषाढी एकादशीनिमित्त ही बस डोंबिवलीहून पंढरपूरकडे जात असतांना, लोणावळ्याजवळ काल पहाटे झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला.
****
टेनिसपटू सुमित नागलनं स्वीडीश ओपन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या सामन्यात स्वीडनच्या इलिस येमेरचा सहा - चार, सहा - तीन, असा पराभव केला. या विजयानंतर सुमित एटीपी क्रमवारीत आतापर्यंतच्या सर्वोत्तम अशा ६८ व्या स्थानी पोहचला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय टेनिसपटू ठरला आहे.
दरम्यान, या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या सामन्यात सुमित आणि पोलंडच्या कॅरोल ड्रझेविकी जोडीला फ्रान्सच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.
****
संगणकीय प्रणालीमुळे म्हाडाची सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक झाली असल्याचं, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ- म्हाडाची प्रधानमंत्री आवास योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत संगणकीय सोडत काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सोडतीत घर मिळालेल्या लाभार्थ्यांचं अभिनंदन करत, दोन महिन्यात आणखी एक सोडत काढण्यात येणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचं काम वेळेत मार्गी लावण्यासाठी भूसंपादनाचा कालबद्ध कार्यक्रम राबवण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
****
धाराशिव नगर परिषदेला सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानअंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामांना ऑगस्ट महिन्यात सुरुवात होईल, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी दिली.
****
गंगाखेड इथल्या परभणी जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी मधुकर जाधव यांची तर सचिव पदी गवळण लटपटे यांची निवड झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
Text
धुमधडाक्यात लग्न, पण दाम्पत्याला नातं नकोसे; तीन दिवसांतच घेतला घटस्फोट, काय घडलं असं?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : धूमधडाक्यात लग्न केल्यानंतर एकमेकांशी पटत नसल्याने अवघ्या तीन दिवसांत वेगळे राहणाऱ्या युवा दाम्पत्याने परस्पर समतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी मंजूर केला. तीन दिवस एकत्र राहिल्यानंतर वैचारिक मतभेदांमुळे एकत्र राहू शकत नसल्याचे सांगून या जोडप्याने एकमेकांशी काडीमोड घेतला. काय आहे प्रकरण?लग्नसोहळा हा दोन्ही कुटुंबांसाठी…
View On WordPress
#arranged marriage#divorce case#divorce case hearing#divorce case verdict#family dispute case#love marriage#कौटुंबिक न्यायालय
0 notes
Text
कन्नड अभिनेत्याच्या कारची दाम्पत्याला धडक; महिलेचा मृत्यू
https://bharatlive.news/?p=154178 कन्नड अभिनेत्याच्या कारची दाम्पत्याला धडक; महिलेचा मृत्यू
पुढारी ...
0 notes
Text
गुना दोषींवर कारवाई : 'महाराज' आणि 'उपनिवडणूक' कनेक्शन
गुना दोषींवर कारवाई : ‘महाराज’ आणि ‘उपनिवडणूक’ कनेक्शन
[ad_1]
गुना, मध्य प्रदेश : मंगळवारी उत्तर प्रदेशातील गुनामधून एका शेतकरी दाम्पत्याला मारहाण करताना पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर नुकतेच भाजपच्या गोटात दाखल झालेले ज्योतिरादित्य शिंदे(Jyotiraditya Scindia) लगेचच ‘अॅक्शन’मध्ये आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही डॅमेज कंट्रोलसाठी दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची भूमिका घेतली. मुख्यमंत्री चौहान (cm…
View On WordPress
#Jyotiradiya Scindia#video viral#ज्योतिरादित्य शिंदे#मध्य प्रदेश#व्हिडिओ व्हायरल#शेतकरी दाम्पत्याला मारहाण
0 notes
Text
आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते.
0 notes
Text
'बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर'- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
‘बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर’- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
बीड जिल्ह्यातील मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले या वारकरी दाम्पत्याला महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचे वितरण सोलापूर /पंढरपूर दि. 10(जिमाका) :-आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्य��� निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्र: राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या, मुंबईतील खारो येथे बांधलेल्या घरावरील बेकायदा बांधकामाबाबत बीएमसीने दुसरी नोटीस बजावली
महाराष्ट्र: राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या, मुंबईतील खारो येथे बांधलेल्या घरावरील बेकायदा बांधकामाबाबत बीएमसीने दुसरी नोटीस बजावली
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना मुंबईतील खार भागातील घरावर बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रतिमा क्रेडिट स्रोत: फाइल बृहन्मुंबई महानगरपालिकेने शनिवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना मुंबईतील खार भागातील त्यांच्या घरावर बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी ��णखी एक नोटीस बजावली आहे. बीएमसीने राणा दाम्पत्याला…
View On WordPress
0 notes
Text
महाधनच्या बनावट फर्टिलायझरची विक्री ; संगमनेर पोलिसांची पंचवटीतील दाम्पत्याला अटक
महाधनच्या बनावट फर्टिलायझरची विक्री ; संगमनेर पोलिसांची पंचवटीतील दाम्पत्याला अटक
नाशिकचा कृषी विभाग मात्र अंधारातच नाशिक : महाधन ब्रँडच्या नावाने मीठ मिसळलेले बनावट विद्राव्य फर्टिलायझर बनवून त्याची शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या पंचवटीतील खते व बी-बियाणे विक्री करणाऱ्या दाम्पत्याला संगमनेर पोलिसांनी पंचवटीतून ताब्यात घेतले आहे.ही कारवाई पंचवटीत झाली असली तरी नाशिकचा कृषी विभाग माञ अंधारात असल्याने संशय व्यक्त केला जात आहे. संजय मावळे आणि मिनाक्षी मावळे (रा. म्हसरूळ) असे…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 July 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा, बळीराजाच्या कल्याणासाठी मुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाला साकडं
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सर्वपक्षीय बैठक
वंचित बहुजन आघाडीकडून २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा
आणि
टेनिसपटू सुमित नागलची स्वीडीश ओपनमध्ये आगेकूच, एटीपी क्रमवारीत ६८ व्या स्थानी झेप
****
शेतकरी, वारकरी, कष्टकरी यांच्यासह राज्यातल्या प्रत्येक वर्गाला सुख - समृद्धी लाभू दे असं साकडं विठ्ठलाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली, त्यानंतर ते बोलत होते.
“बळीराजाला सुखी कर, बळीराजावरचं संकट दूर कर, चांगला पाऊस येऊ दे, चांगलं पीक येऊ दे, सुगीचे दिवस येऊ दे, आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे, सुख– समृद्धी येऊ दे. कारण वारकरी म्हणजे शेतकरीच आहेत. शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माता – भगिनी, युवक, ज्येष्ठ सगळे, सगळेच, या राज्यातला प्रत्येक घटक जो आहे, तो सुखी – समृद्ध झाला पाहिजे, हीच आमची पांडुरंगाकडे प्रार्थना असते.”
नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातल्या अंबासह इथले आशाबाई आणि बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसह शासकीय पुजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. या महापूजेनंतर या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
आषाढी यात्रेदरम्यान वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. व्हीआयपी लोकांपेक्षा सर्वसामान्यांना दर्शनासाठी पहिल्यांदा प्राधान्य मिळावं असा आपला अट्टाहास असल्याचं त्यांनी सांगितलं. पंढरपूरच्या मंदीराचा विकास आराखडा स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन तयार करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, यावेळी उपस्थित होते. यावेळी मानाच्या पालख्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं
****
पंढरपूर इथं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३४ फलाटांच्या चंद्रभागा यात्रा बसस्थानकाचं लोकार्पण होत आहे. हा राज्यातला एसटी महामंडळाचा पहिलाच भव्य प्रकल्प आहे, सुमारे ३३ कोटी रुपये खर्चून अकरा हेक्टर जागेवर या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे.
****
राज्यभरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिभावाने, उत्साहात साजरा होत आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं वाळूज नजिक असलेल्या पंढरपुरातही विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. आ��पासच्या अनेक गावातून शेकडो भाविक दिंड्या पताका घेऊन पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असल्याचं दिसून येत आहे.
****
लातूरच्या सत्संग प्रतिष्ठानकडून एक हजार ७०० वारकरी यंदा पंढरपूरला रवाना झाले. या वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ३१ बस, विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष वैशाली देशमुख यांच्या उपस्थितीत मार्गस्थ झाल्या.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत येत्या ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेची अंतिम मुदत १५ जुलैला संपत होती. मात्र, राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पीक विमा भरलेला नाही; त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती.
****
नांदेड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी, तसंच या कामांच्या सद्य:स्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. भोकर इथल्या जलजीवन मिशन आणि वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत एक हजार २३४ कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, तर २८ पाणी पुरवठा योजनांची कामं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत राबवण्यात येत आहेत. ही कामं निश्चित कालमर्यादेत पूर्ण होणं आवश्यक असल्याचंही पवार म्हणाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सहा ऑगस्टला सुनावणी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाला या याचिकेबाबत दोन आठवड्यात उत्तर देण्यास, तर शरद पवार गटाला या उत्तरावर प्रतिवाद करण्यासाठी न्यायालयाने एका आठवड्याची मुदत दिली आहे.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण स्थगित करण्यात आलं आहे. मसुरीच्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीने खेडकर यांना पत्र पाठवून ही माहिती देत, महाराष्ट्र राज्य सरकारच्या या कार्यक्रमातून पदमुक्त करत, अकादमीत परत बोलावलं आहे. कोणत्याही परिस्थितीत २३ जुलै पूर्वी अकादमीत हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश खेडकर यांना देण्यात आले आहेत.
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २२ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं २१ जुलैला सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. २३ जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम देशाचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अधिवेशनात सादर करतील.
****
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याचा विरोधी पक्षाकडे कोणता कायदेशीर मार्ग आहे, याची माहिती देण्याचं आवाहन, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. या मुद्यावर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहिले असते, तर यावर त्यांची भूमिका स्पष्ट झाली असती, असं ते म्हणाले.
****
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत चैत्यभूमी इथून या यात्रेला प्रारंभ होणार असून, विदर्भ तसंच मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यात मार्गक्रमण करत, आठ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर इथं या यात्रेची सांगता होणार आहे. ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे, एसटी एससी शिष्यवृत्ती वाढ झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना एसटी एससी शिष्यवृत्ती लागू झाली पाहिजे, तसंच जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, या मागण्यांचा या यात्रेच्या माध्यमातून प्रचार करणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.
****
मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कळंबोली इथल्या एमजीएम रुग्णालयात काल भेट देऊन अपघातातल्या जखमींची चौकशी करुन, उपचाराचा खर्च सरकारच्या वतीने करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. आषाढी एकादशीनिमित्त ही बस डोंबिवलीहून पंढरपूरकडे जात असतांना, लोणावळ्याजवळ काल पहाटे झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला.
****
टेनिसपटू सुमित नागलनं स्वीडीश ओपन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या सामन्यात स्वीडनच्या इलिस येमेरचा सहा - चार, सहा - तीन, असा पराभव केला. या विजयानंतर सुमित एटीपी क्रमवारीत आतापर्यंतच्या सर्वोत्तम अशा ६८ व्या स्थानी पोहचला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय टेनिसपटू ठरला आहे.
दरम्यान, या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या सामन्यात सुमित आणि पोलंडच्या कॅरोल ड्रझेविकी जोडीला फ्रान्सच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.
****
संगणकीय प्रणालीमुळे म्हाडाची सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक झाली असल्याचं, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ- म्हाडाची प्रधानमंत्री आवास योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत संगणकीय सोडत काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सोडतीत घर मिळालेल्या लाभार्थ्यांचं अभिनंदन करत, दोन महिन्यात आणखी एक सोडत काढण्यात येणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचं काम वेळेत मार्गी लावण्यासाठी भूसंपादनाचा कालबद्ध कार्यक्रम राबवण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
****
धाराशिव नगर परिषदेला सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानअंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामांना ऑगस्ट महिन्यात सुरुवात होईल, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी दिली.
****
गंगाखेड इथल्या परभणी जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी मधुकर जाधव यांची तर सचिव पदी गवळण लटपटे यांची निवड झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
Text
'बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर'- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
‘बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर’- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
बीड जिल्ह्यातील मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले या वारकरी दाम्पत्याला महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचे वितरण सोलापूर /पंढरपूर दि. 10(जिमाका) :-आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा…
View On WordPress
0 notes
Text
नंदुरबार : वृद्ध दाम्पत्याला मारझोड करत लांबवले 25 तोळे सोने
https://bharatlive.news/?p=144868 नंदुरबार : वृद्ध दाम्पत्याला मारझोड करत लांबवले 25 तोळे सोने
नंदुरबार : ...
0 notes
Text
हनुमान चालीसा पंक्तीत खासदार-आमदार जोडप्याच्या जामीनाला महाराष्ट्र आव्हान देणार आहे
हनुमान चालीसा पंक्तीत खासदार-आमदार जोडप्याच्या जामीनाला महाराष्ट्र आव्हान देणार आहे
त्यांनी त्यांच्या जामीन अटींचा भंग केल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे. मुंबई : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी महाराष्ट्र सरकार न्यायालयात याचिका करणार आहे, असे विशेष सरकारी वकील अधिवक्ता प्रदीप घरत यांनी एनडीटीव्हीला सांगितले. राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी हनुमान चालीसा प्रकरणी अटक केली होती. श्री. घरत म्हणाले की, या जोडप्याचे…
View On WordPress
0 notes
Text
मिळून साऱ्याजणी पुणे चा सावित्री - जोतिबा समता सहजीवन पुरस्कार सरिता पवार - राजन चव्हाण यांना प्रदान
मिळून साऱ्याजणी पुणे चा सावित्री – जोतिबा समता सहजीवन पुरस्कार सरिता पवार – राजन चव्हाण यांना प्रदान
कणकवली पुणे येथील मिळून साऱ्याजणी मासिकामार्फत दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय सावित्री जोतिबा समता सहजीवन पुरस्कार कणकवली तालुक्यातील शिक्षिका तथा कवयित्री सरिता पवार आणि पत्रकार राजन चव्हाण या दाम्पत्याला पुणे येथील एस.एम.जोशी सभागृहात सावित्री जोतिबा समता उत्सव 2022 या कार्यक्रमात जेष्ठ नाट्यकर्मी अतुल पेठे, मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संपादिका गीताली वि.म., पुरुष उवाच दिवाळी अंकाचे संपादक संदीप…
View On WordPress
0 notes
Text
Sanjay Raut : 'मातोश्री'च्या वाटेला जाऊ नका, 20 फुट गाडले जाल... संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला इशारा
#Sanjay Raut : 'मातोश्री'च्या वाटेला जाऊ नका, 20 फुट गाडले जाल... संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला इशारा #Mumbai #Maharashtra #Shivsena
Shivsena Sanjay Raut : अमरावतीचे बंटी आणि बबलीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला Sanjay Raut : मुंबई (दि २३ एप्रिल २०२२) : शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा अतिशहाणपणा करु नका, मातोश्रीच्या वाटेला जाऊ नका नाहीतर 20 फुट खाली गाडले जाल असा इशारा खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे. राणा दाम्पत्याने मातोश्री समोरील हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम मागे घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया…
View On WordPress
#CMO#CMUdhavThackrey#SanjayRaut#Shivsena#cm uddhav thackeray#hanuman chalisa#matoshree#Navneet Rana#Ravi Rana#sanjay raut#शिवसेना#संजय राऊत
1 note
·
View note
Text
नवनीत राणा : नवनीत राणाला जामीन, तरीही रात्र तुरुंगातच घालवणार, राणा दाम्पत्याला एवढ्या लवकर दिलासा मिळणार नाही
नवनीत राणा : नवनीत राणाला जामीन, तरीही रात्र तुरुंगातच घालवणार, राणा दाम्पत्याला एवढ्या लवकर दिलासा मिळणार नाही
खासदार नवनीत राणा. आमदार रवी राणा (फाइल फोटो) प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय जामीन मिळूनही नवनीत राणा यांची तुरुंगातून सुटका होणार नाही. राणा दाम्पत्याला आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार आहे. नवनीत राणा, खासदार अमरावती, महाराष्ट्रनवनीत राणा) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांचा त्रास अद्याप संपलेला नाही. त्याला मुंबई सत्र न्यायालयात पाठवण्यात आले.मुंबई सत्र न्यायालयबुधवारपासून (4 मे) त्याला…
View On WordPress
0 notes