#तारखेनुसार
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 June 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जून २०२३ सकाळी ७.१० मि.****
चालू वर्षासाठी, मूल्य समर्थन योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून तूर, उडीद आणि मसूर खरेदीवरची मर्यादा रद्द
प्राथमिक कृषी पतसंस्थेला देशभरात दोन हजार प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रं उघडण्यास परवानगी
छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार साडे तीनशेवा राज्याभिषेक दिन सोहळा काल राज्यभरात उत्साहात साजरा
परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात पुन्हा पहिल्या क्रमांकावर
राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन यादीत महाराष्ट्रातल्या सदुसष्ट शैक्षणिक संस्थांचा समावेश
जालना इथं शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू
मोसमी पावसाचा प्रवास मंदावण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
आणि
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून लंडन इथं कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना
****
केंद्र सरकारनं चालू वर्षासाठी, मूल्य समर्थन योजनेअंतर्गत तूर, उडीद आणि मसूर डाळीच्या खरेदीवरची ४० टक्क्यांची मर्यादा रद्द केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांकडून कोणत्याही मर्यादेशिवाय, किमान आधारभूत किमतीला डाळींची खरेदी करता येईल. सरकारकडून किफ��यतशीर किमतीला या कडधान्यांच्या खरेदीची खात्री मिळाल्यावर, या धान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना आगामी खरीप आणि रब्बी पेरणीच्या हंगामात तूर, उडीद आणि मसूर या पिकांच्या पेरणीचं क्षेत्र वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. डाळींची साठेबाजी आणि कृत्रिम दरवाढ रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यात दोन जून रोजी, अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ लागू करून तूर आणि उडीद डाळीच्या साठवणीवर मर्यादा लागू केली होती. डाळींचे घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठे साखळी विक्रेते, गिरणी मालक आणि आयातदार यांच्यासाठी ही मर्यादा लागू आहे.
****
प्राथमिक कृषी पतसंस्थेला देशभरात दोन हजार प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रं उघडण्यास केंद्र सरकार परवानगी देणार आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्लीत रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. यापैकी एक हजार जन औषधी केंद्रे या वर्षी ऑगस्टपर्यंत आणि पुढची एक हजार केंद्रे डिसेंबरपर्यंत उघडली जातील. या निर्णयामुळे पतसंस्थेचं उत्पन्न वाढवण्यासोबतच रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, तसंच ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना परवडणाऱ्या किंमतीत औषधं उपलब्ध होणार आहेत.
****
छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार साडे तीनशेवा राज्याभिषेक दिन सोहळा काल राज्यभरात उत्साहात साजरा झाला. किल्ले रायगडावर रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात पार पडला. शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ एक सोहळा राहिला नसून, तो एक लोकोत्सव झाला असल्याचं, संभाजी राजे छत्रपती यावेळी म्हणाले. राज्यातले पन्नास किल्ले शासनानं आपल्या ताब्यात दिल्यास शासनाकडून काहीही निधी न घेता स्वखर्चानं त्या किल्ल्यांचं संवर्धन करू, असा प्रस्तावही त्यांनी दिला. पाचाड इथं शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या पन्नास कोटी रुपयांच्या निधीबाबत छत्रपतींनी समाधान व्यक्त केलं. शिवराज्याभिषेक समितीनं आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन झालं. यावेळी 'शिव वंदना' हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. पुण्यात लाल महालात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
औरंगाबाद इथं क्रांती चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पू���न करण्यात आलं.
कोल्हापूर इथं नवीन राजवाड्यात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी ��िवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर युवराज यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यानिमित्त झांज पथक, बँड वादन, पोवाडे आणि मर्दानी खेळ सादर करण्यात आले. सोलापूर इथेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवज्योत फेरी आणि व्याख्यान घेण्यात आले.
****
‘शासन आपल्या दारी‘ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात क्रांती आणणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं या कार्यक्रमाला सुरुवात करताना बोलत होते. सरकार आणि जनता यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी हा उपक्रम राज्यभरात राबवला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना शहात्तर कोटी रुपयांचा लाभ आजच्या एका दिवसात देण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमधल्या विविध विकासकामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या नऊ वर्षातली कारकीर्द हा देशासाठी सुवर्णकाळ असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक कालपासून मुंबईत सुरू झाली. ही समिती उद्या द्वैमासिक आर्थिक धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. किरकोळ महागाई दर गेल्या दीड वर्षात पहिल्यांदाच पाच टक्क्यांच्या खाली, म्हणजे चार पूर्णांक सात टक्क्यांवर आला असून, हा दर उतरला असला तरी, समिती प्रमुख व्याज दरांच्या स्थितीत बदल करणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं दोन हजार रुपयांची ��ोट चलनातून परत घेतल्यानंतर आर्थिक धोरण समितीची ही पहिलीच बैठक आहे.
****
राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी तसंच वीज साठवणुकीच्या दृष्टीनं उपयुक्त ठरणाऱ्या, उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर अधिक भर देण्यात येत असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. काल मुंबईत राज्य शासनाचे नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि टोरंट पॉवर लिमिटेड यांच्याशी राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले, त्यावेळी फडणवीस बोलत होते. अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातलं हे वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान असून, उदंचन जलविद्युत प्रकल्पांद्वारे राज्यातल्या शेती, ��द्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातली विजेची वाढती मागणी भागवता येणं शक्य होणार आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
****
परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात पुन्हा पहिल्या क्रमांकावर आल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भातली ताजी यादी काल जाहीर झाली असून, त्यात महाराष्ट्र तीन वर्षांनी पुन्हा पहिल्या क्रमांकावर आल्यामुळे, राज्यातून प्रकल्प बाहेर गेले, असा आरोप करणाऱ्यांना योग्य ते उत्तर मिळालं आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
****
राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन यादीत महाराष्ट्रातल्या सदुसष्ट शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. समग्र संस्थांच्या श्रेणीमध्ये निवडलेल्या देशातल्या शंभर शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातल्या अकरा, तसंच शंभर सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत, दहा विद्यापीठांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट शंभर संशोधन संस्थांच्या यादीत राज्यातल्या पाच तर अभियांत्रिकी संस्थांच्या यादीत आठ संस्थांचा समावेश आहे. राज्यातल्या तीन महाविद्यालयांना आणि नऊ व्यवस्थापन संस्थांनाही या यादीत स्थान मिळालं आहे. देशातल्या शंभर सर्वोत्कृष्ट औषधीय संस्थांच्या यादीत राज्यातल्या अठरा संस्था असून, त्यात औरंगाबादच्या वाय.बी.चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी, या संस्थेला ऐंशीवं स्थान मिळालं आहे. सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयात राज्यातली दोन तर दंत महाविद्यालयांच्या यादीत राज्यातली सात महाविद्यालयं आहेत.
****
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी ही नियुक्ती जाहीर केली. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ संजय घनश्याम भावे यांची नियुक्ती झाली आहे.
****
दलित पॅंथर संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम काल नागपूर इथं साजरा झाला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पँथर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी चळवळीदरम्यानचे आपले अनुभव कथन केले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाला किमान एक मंत्री पद मिळावं, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
राज्यात नवीन वाळू धोरण राबवण्यास सुरुवात आहे. वर्धा, भंडारा, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, हिंगोली या केंद्रांवर वाळू विक्रीला सुरुवात झाली असून, या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद देत नागरिक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी करत आहेत. यासाठी ‘महाखनिज’ या संकेतस्थळावर नोंदणी केल्यास सहाशे रुपये ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक, म्हणजे १२ हजार ६३३ ब्रास वाळूची विक्री झाल्याची माहिती सरकारनं दिली आहे.
****
जालना तालुक्या��ल्या सामनगाव इथं शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली. मृतांमध्ये भागवत इंगळे, त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा प्रशांत इंगळे, तसंच भागवत आणि ओमकार पडूळ या दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. शेततळ्यात पोहण्यासाठी उतरलेली मुले बुडत असल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी भागवत इंगळे हे पाण्यात उतरले. मात्र त्यांच्यासह सर्व बालकांचा बुडून मृत्यू झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
****
गुजरातच्या पोरबंदरच्या दक्षिणेला अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा वायव्येला सरकण्याची, आणि त्याचं रूपांतर चक्री वादळात होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या स्थितीमुळे मोसमी पावसाच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता असून, केरळमध्ये मान्सूनचं आगमन होण्याला उशीर होऊ शकेल. मात्र देशभरातल्या एकूण पावसावर याचा फारसा परिणाम होणार नाही, असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.
दरम्यान, नऊ आणि दहा तारखेला मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे.
****
कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आजपासून लंडनच्या ओवल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सलग दुसऱ्यांदा कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. २०२१ ते २०२३ च्या कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया ६६ पूर्णांक ६७ अंकांनी तालिकेमध्ये प्रथम स्थानी आहे. नुकत्याच झालेल्या बॉर्डर - गावस्कर चषक मालिकेमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला दोन - एकनं हरवून ५८ पूर्णांक आठ गुण मिळवत अंतिम फेरीतलं स्थान पक्कं केलं.
****
दक्षिण कोरियात सुरु असलेल्या आशियाई २० वर्षांखालील ॲथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या गोळा फेक स्पर्धेत भारताच्या सिद्धार्थ चौधरीनं सुवर्ण पदक पटकावलं. तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत शारुक खाननं, भालाफेकमध्ये शिवम लोहकरेनं, तर लांब उडी प्रकारात सुश्मितानं रौप्य पदक जिंकलं. आठशे मीटर धावण्याच्या शर्यतीत शकीलनं कांस्य पदक जिंकलं. भारताच्या मिश्र रिले गटानं देखील काल या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं.
****
जर्मनीतल्या सुहल इथं सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतानं काल दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. पुरुषांच्या २५ मीटर पिस्टल प्रकारात अमनप्रीतसिंहनं सुवर्ण पदक जिंकलं. तर महिलांच्या २५ मीटर सांघिक प्रकारात मेघना सादुला, पायल खत्री आणि सीमरनप्रीत कौर यांच्या संघानं सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेत आतापर्यंत पाच सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य पदक जिंकून भारत पहिल्या स्थानावर आहे.
****
सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांत, पी राजवत तसंच अर्जुन आणि ध्रुव कपिला या जोडीनं काल दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पी. व्ही सिंधू, सायना नेहवाल आणि एच एस प्रणॉय यांना मात्र पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला.
****
दिव्यांगांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी शासनानं हाती घेतलेल्या, “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी”, या अभ��यानाची अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. या अभियानाबाबतच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. उपक्रमाच्या यशासाठी जिल्ह्यातल्या दिव्यांगांचं गावनिहाय सर्वेक्षण निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता, पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. किमान ऐंशी ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याची शिफारस कृषी विद्यापीठानं केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कृषी विभाग लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात एक विशेष मोहीम राबवणार आहे. आजपासून येत्या बारा तारखेपर्यंत चालणाऱ्या ‘खरीपाची तयारी कृषी विभाग आपल्या दारी’, या मोहिमेतून आधुनिक लागवड तंत्रज्ञान, पिकांवरच्या रोगांचं नियंत्रण आणि कृषी विभागाच्या प्रमुख योजना, याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
****
शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत आज परभणी इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात विविध नामांकित उद्योजक आणि कंपन्या सहभाग नोंदवणार आहेत. जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयंम डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर सहभाग नोंदवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी: शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार?; महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच मतभेद
शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी: शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार?; महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच मतभेद
शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी: शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार?; महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच मतभेद आज राज्यभरामध्ये तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेकडून मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. असं असतानाच राज्यात सत्तेत असणाऱ्या…
View On WordPress
#“शिवजयंती#आघाडीतील#की#घटक#तारखेनुसार#तिथीनुसार#पक्षांमध्येच#बातम्या#मतभेद#महाविकास#राष्ट्रवादी#विरुद्ध#शिवसेना
0 notes
Photo
#धर्मरक्षक #छत्रपती #श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा #१६_जानेवारी #तारखेनुसार #sambhajiraje #shambhu #sambhajinagar #shambhuraje #shambhurajyabhishek #shivray #shivrajyabhishek #rajyabhishek #suvarnakshan #chatrapati #chatrapatishivajimaharaj #chatrapati_sambhajimaharaj #jagdamb #lovekeshrameshkachi #jagdambcreativehubpvtltd #pune #puneigers #punecity (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/CKE0S6qhu0J/?igshid=1i4z9n8ndo1hx
#धर्मरक्षक#छत्रपती#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा#१६_जानेवारी#तारखेनुसार#sambhajiraje#shambhu#sambhajinagar#shambhuraje#shambhurajyabhishek#shivray#shivrajyabhishek#rajyabhishek#suvarnakshan#chatrapati#chatrapatishivajimaharaj#chatrapati_sambhajimaharaj#jagdamb#lovekeshrameshkachi#jagdambcreativehubpvtltd#pune#puneigers#punecity
0 notes
Text
SBI PO Recruitment 2022
SBI PO Recruitment 2022
भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती 1. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी. (SBI PO Recruitment 2022) 2. नोंदणीची प्रक्रिया फक्त तेव्हाच पूर्ण होते जेव्हा फी भरण्यासाठी शेवटच्या तारखेला (12.10.2022) किंवा त्यापूर्वी बँकेकडे ऑनलाईन पद्ध���ीने फी जमा केली जाते. 3.…
View On WordPress
#Accenture Recruitment 2022#Amazon Jobs 2022#Amazon Jobs 2022|technical government job all meet mam#Amazon Recruitment 2022#Amazon Recruitment 2022|Tech Mahindra Recruitment 2022||Flipkart Recruitment 2022|#Amazon Vacancy 2022#Amazon work From Home Jobs|technical Government job meet mam#Android#Best app for earning#Best App to Make Money Online#Best earning app#Best Earning apps 2022#Best earning apps for anroid#Copy paste jobs#Copy Paste jobs online#data entry jobs#Data Entry Jobs Work From Home#data Entry Work#earn money#Earn money Online#earn paytm cash#Flipkart Recruitment 2022#Free paytm cash#freelance Jobs#Full time jobs#govt jobs#govt jobs aug 2022#govt jobs dec 2022#govt jobs in dec 2021#govt jobs sep 2022
0 notes
Text
महाराष्ट्र SSC, HSC 2023 च्या तात्पुरत्या परीक्षेची तारीख mahahsscboard.in वर जाहीर केली आहे
महाराष्ट्र SSC, HSC 2023 च्या तात्पुरत्या परीक्षेची तारीख mahahsscboard.in वर जाहीर केली आहे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, MSBSHSE ने SSC इयत्ता 10वी आणि HSC इयत्ता 12वी बोर्ड परीक्षांसाठी तात्पुरती तारीख पत्रक जाहीर केले आहे. तात्पुरत्या तारखेनुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत तर एसएससीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत होईल. महाराष्ट्र उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षा 2023 21 फेब्रुवारी ते 20 मार्च…
View On WordPress
0 notes
Text
#हिंदवी_स्वराज्य_संस्थापक #छत्रपती_शिवाजी_महाराज यांच्या पुण्यतिथी विनम्र अभिवादन...
#तारखेनुसार...
शिवछत्रपतींचा गुण घेऊया..!!
भयावह संकटाच्या वेळी आवश्यकता असल्यास माघार घेणे, दोन पावले मागे जाऊन संकटाचा अंदाज घेणे हा शिवछत्रपतींचा अत्यंत महत्त्वाचा गुण. शिवछत्रपतींच्या पुण्यतिथी निमित्त हा गुण अंगिकारण्याचा प्रयत्न करूया...!
अभिवादनकर्ते :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
1 note
·
View note
Photo
महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपूत्र संभाजी महाराज यांच्या जडणघडणीत सिंहांचा वाटा असणार्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा तारखेनुसार 17 जून हा पुण्यतिथीचा दिवस आहे. Follow us 👉@jmmasale👈 Follow us 👉@jmmasale👈 Follow us 👉@jmmasale👈 #maharashtra #maharashtratourism #ig #mumbai #sahyadri #marathi #india #clickers #desha #pune #kokan #forts #igers #incredibleindia #nature #insta #travel #maharashtradesha #durg #photography #maratha #nashik #trekking #marathistatus #kolhapur #marathimulgi #majha #maharashtratravel #punekar #jmmasale (at Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CQNa0HuFvVi/?utm_medium=tumblr
#maharashtra#maharashtratourism#ig#mumbai#sahyadri#marathi#india#clickers#desha#pune#kokan#forts#igers#incredibleindia#nature#insta#travel#maharashtradesha#durg#photography#maratha#nashik#trekking#marathistatus#kolhapur#marathimulgi#majha#maharashtratravel#punekar#jmmasale
0 notes
Text
राज्यात मॉन्सून रेंगाळणार
[ad_1]
पुणे ः बंगालचा उपसागर आणि उत्तर अंदमान समुद्रात हवेचे कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मान्सूनोत्तर पाऊस काही दिवस रेंगाळण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.
हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेनुसार राज्याच्या उत्तर भागातून ५ ऑक्टोबरला माघारी घेण्याची शक्यता होती. तर मुंबईतून माघारी घेण्याची तारीख ८ ऑक्टोबर होती. मात्र, चालू वर्षी हवामान विभागाने…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 06 June 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०६ जून २०२३��दुपारी १.०० वा.
****
छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार साडे तीनशेवा राज्याभिषेक सोहळा आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पहाटेपासून महाड ते किल्ले रायगड पर्यंत जवळपास २४ किलोमीटर अंतरावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गर्दीमुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार न होताच परतावं लागल्यानं, शिवभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. प्रचंड गर्दी पाहून किल्ले रायगड कडे जाणारा मार्ग पोलिसांनी बंद केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुण्यात लाल महालात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
औरंगाबाद इथं क्रांती चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं.
****
नवीन सहकार धोरणाची सुरुवात पुढील महिन्यात होण्याची शक्यता असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. सर्व संबंधित संस्था, राज्य सरकारं, केंद्रीय मंत्रालयं आणि राष्ट्रीय सहकारी संस्थांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच, हे धोरण जाहीर करण्यात येईल, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. नवीन राष्ट्रीय सहकार धोरण दस्तऐवजाचा मसुदा तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासमोर या मसुद्याचं सादरीकरण केलं. देशभरात तळागाळातल्या स्तरावर नवीन सहकार धोरणाला बळकटी देण्यासाठी काय करता येईल, याबाबत अमित शहा यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
****
आर्थिक सर्वसमावेशनासाठी आंतरदृष्टीय डॅशबोर्डचा प्रारंभ भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या हस्ते काल झाला. या डॅशबोर्डच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाबाबत प्रगतीचा आढावा घेता येईल, तसंच देशभरात सुरु असलेल्या कामावर देखरेख ठेवता येईल. सद्य:स्थितीत केवळ रिर्जर्व्ह बँकेच्या आंतरिक कामांमध्ये या डॅशबोर्डचा वापर केला जाणार असून, आगामी काळात त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.
****
गेल्या नऊ वर्षांत भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याची माहिती, केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारताचं अंतराळ क्षेत्र प्रगती करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. प्रक्षेपणाच्या मूलभूत कार्याशिवाय भारत हा अंतराळ क्षेत्रा��, १३० स्टार्टअपच्या माध्यमातून लोकांसाठी वेगवेगळ्य़ा संधी निर्माण करणारा स्त्रोत ठरला असल्याचं, जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.
****
नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विशिष्ट मार्गावरील विमानसेवेच्या वाढत्य़ा दरांवर चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली इथं झालेल्या विमानसेवेच्या सल्लागार गटाच्या बैठकीत तिकिट दरावर चर्चा करण्यात आली. विमानसेवा कंपन्यांनी स्वत: निश्चित केलेल्या दरावर लक्ष ठेवायला हवं, असं सिंधिया म्हणाले. आपत्तीच्या काळात तिकिट दरात कपात केली जावी, तसंच ओडिशा दूर्घटनेतल्या आपत्तीग्रस्तांना नि:शुल्क वाहतूक सेवा प्रदान करावी, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
दक्षिण कोरियात सुरु असलेल्या आशियाई २० वर्षांखालील ॲथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या गोळा फेक स्पर्धेत भारताच्या सिद्धार्थ चौधरीनं सुवर्ण पदक पटकावलं. तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत शारुक खाननं, भालाफेकमध्ये शिवम लोहकरेनं, तर लांब उडी प्रकारात सुश्मितानं रौप्य पदक जिंकलं. आठशे मीटर धावण्याच्या शर्यतीत शकीलनं कांस्य पदक जिंकलं. भारताच्या मिश्र रिले गटानं देखील आज या स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं.
****
कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणार आहे. लंडनच्या ओवल मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सलग दुसऱ्यांदा कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. २०२१ ते २०२३ च्या कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया ६६ पूर्णांक ६७ अंकांनी तालिकेमध्ये प्रथम स्थानी आहे. नुकत्याच झालेल्या बॉर्डर - गावस्कर चषक मालिकेमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला दोन - एकनं हरवून ५८ पूर्णांक आठ गुण मिळवत अंतिम फेरीत आपला स्थान पक्कं केलं आहे.
****
हवामान
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सात ते नऊ जून दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाज आहे.
//************//
0 notes
Text
…तर मला विजय चौकात फाशी द्या : सुप्रिया सुळे
…तर मला विजय चौकात फाशी द्या : सुप्रिया सुळे
…तर मला विजय चौकात फाशी द्या : सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर सीबीआय, ईडी, आयकर या संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय. तसेच या संस्था स्वतंत्र असल्याचा दावा करतात मग कोणावर धाड पडणार हे ४-५ दिवस आधी ट्विटरवर कसं समजतं? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. याबाबत तारखेनुसार पुरावे सादर करू शकते, असंही सुप्रिया सुळेंनी नमूद केलं. त्या लोकसभेत…
View On WordPress
0 notes
Photo
गनिमी काव्या मुळे औरंग्या पुरता खचला होता... हिंदवी स्वराज्यावर वाकडी नजर ठेवणाऱ्याचा काळच संपला होता... #धर्मवीर #छत्रपती_श्रीसंभाजी_महाराज जयंती (तारखेनुसार) १४_मे Contact us for design service: 📲Mob No. : (+91) 90 494949 38 Landline ☎️ : (020) 24 4949 38 📧Email :[email protected] Jagdamb Creative Hub Pvt.Ltd. डिजिटल युगात, नो टिव टिव, ओन्ली CREATIVE !! #jagdamb #jagdambcreative #jagdambcreativehubpvtltd #lovekeshrameshkachi #pune #digitalmarathi #digitallovekesh #marathicalligraphy #hinduvyavasayik #marathivyavsayik #vyavasaywala #sambhajimaharaj #swarajyarakshaksambhaji #sambhaji #sambhajinagar #sambhajiraje #chatrapati_sambhajimaharaj #chatrapatisambhajimaharaj #sambhaji_maharaj #chatrapati #marathiculture #maratha96k #shambhuraje (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/CO0WoX9L30S/?igshid=ihhh4d13ha49
#धर्मवीर#छत्रपती_श्रीसंभाजी_महाराज#jagdamb#jagdambcreative#jagdambcreativehubpvtltd#lovekeshrameshkachi#pune#digitalmarathi#digitallovekesh#marathicalligraphy#hinduvyavasayik#marathivyavsayik#vyavasaywala#sambhajimaharaj#swarajyarakshaksambhaji#sambhaji#sambhajinagar#sambhajiraje#chatrapati_sambhajimaharaj#chatrapatisambhajimaharaj#sambhaji_maharaj#chatrapati#marathiculture#maratha96k#shambhuraje
0 notes
Photo
शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार? राज ठाकरे म्हणाले औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा आपल्यासाठी एक सण आहे आणि हा सण आपण वर्षातले ३६५ दिवस साजरा करायला पाहिजे.
0 notes
Photo
महाराजांची जयंती तारखेनुसार करायची का तिथीनुसार करायची?,DJ लावून करायची?, लाखो रुपये खर्चून मिरवणुका काढून करायची?, वाहनांवर झेंडा किंवा स्टिकर लावून मिरवून करायची का? या सर्वांचं उत्तर आहे 'गडसंवर्धन' करून करायची कारण किल्लेच महाराजांचं अस्तित्व आहेत. महाराज गडपती होते. किल्ल्याचं महत्त्व त्यांनी जाणले म्हणून त्यांनी किल्ले बांधले आणि इंग्रजांनी किल्ल्यांचे धोके जाणले म्हणूनच ते उद्धवस्त केले. आणि आज याच किल्ल्यांचा वापर काही कर्मदरिद्री लोकं दारूपिण्यासाठी करतात , कचरा करून घाण करतात. महाराजांनी आपल्या आयुष्यात बांधलेल्या किल्ल्यांची निगा आपण नाही राखू शकत, पण 3,500 कोटींचे स्मारक बांधून दरवर्षी त्याच्या निगेसाठी हजारो कोटी रुपये खर्च करणार आहोत का? याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. Follow @malvanikattaa 🤟 . PC @gajanan_patil_artworks . #प्राउड2Bमालवणी #malvanikatta🐟 #मालवणी_कट्टा . 🌾अश्���ाच गावाकडच्या खूप🌿🌾 साऱ्या पोस्ट साठी अभिमानाने फॉलो करा... 😎 🌊🏞️🌾🌴🐟🥭 ➡पोस्ट आवडल्यास नक्की-Like❤_Comments✉_Share✉ करा..!! . आणि Follow करा आपलं अस्सल कोकणी-मालवणी Instagram Page 👇👇 . @malvanikattaa 🌴🌴 . 🌴निसर्ग | खाद्य| कला | प्रवास🌴आपला कोकण ♥️ Malvani कट्टाGang🤸मालवणी हास्य स्टेशन😁 . आपल्या निसर्गरम्य कोकणातील तुमचे अनुभव किंवा तुम्ही काढलेली छायाचित्रे/ विडीवो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी/ दाखवण्यासाठी खालील tag वापरा किंवा DM (Direct Message) करा. . Don't forget to doubletap 😍💕 . 🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟 . Facebook Page https://facebook.com/malvanikattaaa . Share chat https://b.sharechat.com/MJ8ke5Wy3 . Twitter http://Www.twitter.com/malvanikattaa . Tiktok https://vm.tiktok.com/96EJ32/ . Join करा आम्हाला telegram वर https://t.me/malvanikattaa 😍 . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #mumbai #motivationalquotesdaily #motivation #motivationalquotes #motivationalquotes #maharashtradesha #maharashtra_majha #mumbai_uncensored #marathiinspirations #music #marathi #maharashtra_ig #motivationalvideos #marathijokes #marathifilm #maharashtra #marathi_premquotes #marathiactress #mumbaidairies #maharashtra_igers #motivationalvideos #marathijokes #marathifilm #marathi_premquotes #maharashtra #pune (at Maharashtra) https://www.instagram.com/p/B8wLITOBD1g/?igshid=12su3hycc3xcl
#प्राउड2bमालवणी#malvanikatta🐟#मालवणी_कट्टा#mumbai#motivationalquotesdaily#motivation#motivationalquotes#maharashtradesha#maharashtra_majha#mumbai_uncensored#marathiinspirations#music#marathi#maharashtra_ig#motivationalvideos#marathijokes#marathifilm#maharashtra#marathi_premquotes#marathiactress#mumbaidairies#maharashtra_igers#pune
0 notes
Text
Shiva jayanati celebrate on the same date abn 97 | ‘शिवजयंती एकाच तारखेला साजरी करा’
Shiva jayanati celebrate on the same date abn 97 | ‘शिवजयंती एकाच तारखेला साजरी करा’
[ad_1]
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार एकाच दिवशी साजरी करण्यात यावी, अशी मागणी मराठा रिव्हालुशन, रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
शासनातर्फे १९ फेब्रुवारीला, तर शिवसेना तिथीप्रमाणे जयंती साजरी करते. त्यामुळे एकाच महापुरुषाची जयंती दोन वेगवेगळ्या तारखांना साजरी होते, हे बरोबर नाही, ही बाब…
View On WordPress
0 notes
Photo
व्हिडिओ : रायगडावर शिवभक्तांचा जल्लोष रायगड / प्रतिनिधी : ३४५ वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर सप्त नद्यांच्या अभिषेकामध्ये सार्वभौम राजाचा राज्याभिषेक सोहळा साजरा झाला होता. बुधवारी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये किल्ले रायगडाच्या राजदराबारामध्ये तारखेनुसार अखिल भारतीय राज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा साजरा झाला. या महोत्सवास किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. छ. संभाजीराजे यांच्यासह त्यांचे सुपुत्र युवराज शहाजीराजे उपस्थित होते. शिवराज्याभिषेकदिनी लाखो शिवभक्तांनी रायगडावर गर्दी केली होती. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
0 notes
Text
महाराजांचे देवत्व - एक विचारमंथन
महाराजांचे देवत्व – एक विचारमंथन
महाराष्ट्राचे प्रातःस्मरणीय शककर्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज “तारखेनुसार” जयंती. त्यानिमित्तानी नुकताच गणेशउत्सवात दिसणाऱ्या “मी येतोय” च्या धरतीवरचा ‘देव येतोय’ असं लिहिलेला वर दिलेला फोटो माझ्या एका मित्रानी एका whatsapp ग्रुपवर पाठवला. पण मला आज हा फोटो पाहून एक गोष्ट खटकते आहे ती म्हणजे महाराजांना आपण देतोय ते ‘देवत्व’. थांबा, कोणतीही टोकाची प्रतिक्रिया देण्या आधी कृपाकरून मी…
View On WordPress
0 notes