#डॉ। दाभोलकर
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज थांबणार-परवा सोमवारी मतदान
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून एक जून पर्यंत अंतरिम जामीन
डॉ नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप आणि ५ लाख रुपये दंड-पुराव्या अभावी तिघांची सुटका
आणि
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रोत्साहन पुरस्कार
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संपत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराने आता जोर धरला आहे. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, परवा १३ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधन-सामुग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही महिती दिली. या अकरा मतदार मतदारसंघांत एकूण २९८ उमेदवार निवडणूक लढवत असून, एकूण २३ हजार २८४ मतदान केंद्रांवर, ५३ हजार ९५९ बॅलेट युनीट, २३ हजार २८४ कंट्रोल युनीट आणि २३ हजार २८४ व्हीव्हीपॅट यंत्राच्या आधारे, दोन कोटी २८ लाख १ हजार १५१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
दरम्यान, पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूसंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल��या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नागपुरात गुन्हा दा��ल झाला असून, भाजपानं वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केलेल्या वादग्रस्त जाहिराती प्रकरणी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती चोक्कलिंगम यांनी दिली.
दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात राज्यातल्या अकरा मतदारसंघात एकूण सरासरी ६३ पूर्णांक ५५ शतांश टक्के मतदान झाल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नंदुरबार इथं महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. वंचित वर्गाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी आपण सदैव कार्यरत राहून, अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गाचं आरक्षण कमी करुन धर्माच्या आधारे आरक्षण देऊ देणार नाही, याचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेस मात्र या मुद्द्यावर काहीही बोलायला तयार नसल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना विरोध, राम मंदिरासंदर्भात काँग्रेसची भूमिका या मुद्यांवरूनही त्यांनी टीका केली. सीकल सेल ॲनिमिया निर्मुलनासह नंदुरबारमधल्या विकासकामांचा दाखला त्यांनी दिला.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळामुळे विरोधकांसमोर यंदाच्या निवडणुकीत काहीही मुद्दे शिल्लक नसल्याचं, राज ठाकरे यांनी नमूद केलं.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातले महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे काल छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. बुथ प्रमुखांच्या मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केलं. ही निवडणूक देशाच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आणि देशाला महासत्ता बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
शिंदे यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं सभा घेतली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काँग्रेससंदर्भातल्या भूमिकेशी एकनिष्ठ न राहिल्याबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली. महागाई, कृषीमालाला हमीभाव, उद्योगधंद्यांचं परराज्यात पलायन यासह अनेक मुद्यांवरून त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. जालना इथंही महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ काल महाविकास आघाडीची सभा ��ाली. मात्र काही कारणामुळे उद्धव ठाकरे या सभेस पोहोचू शकले नाहीत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, अमित देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सभेला उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं.
****
अहमदनगर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासाठी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल अहमदनगर इथं सभा घेतली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्यातल्या भातकुडगाव फाटा इथं सभा घेतली.
****
‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात आजच्या भागात आपण ठाणे लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम सामाजिक संपर्क माध्यमांवरूनही ऐकता येईल.
****
मद्यधोरण प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं एक जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी न्यायालयानं केजरीवाल यांना ही मुभा दिली असून, दोन जून रोजी आत्मसमर्पण करण्यास सांगितलं आहे.
****
छत्तीसगडमधे, बिजापूर जिल्ह्यात काल सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत १३ नक्षलवादी मारले गेले. जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दलाचं संयुक्त पथक शोधमोहिम राबवत असताना ही चकमक घडली. सुमारे चार तास चाललेल्या या चकमकीत दोन सैनिकही जखमी झाले.
****
अंधश्रद्धा निर्मुलन क्षेत्रात कार्यरत ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना पुण्यातल्या विशेष न्यायालयानं, जन्मठेप आणि पाच लाख रुपये दंड ठोठावला आहे. मात्र या प्रकरणातले अन्य आरोपी डॉ. विरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची न्यायालयानं पुराव्या अभावी, सुटका केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचं दाभोलकर कुटुंबियांनी स्वागत केलं आहे. मात्र पुराव्याअभावी मुक्तता केलेल्यांना शिक्षा व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं आहे. पुण्यात सुमारे ११ वर्षांपूर्वी २० ऑगस्ट २०१३ च्या सकाळी दाभोळकर यांची हत्या झाली होती.
****
औरंगाबाद लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं असून, मतदान प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध पुरस्कार देणार असल्याचंही जाहीर केलं. ७५ टक्क्यांपर्यंत मतदान झालेल्या गावांना आणि पंचायतींना समृद्ध लोक��ाही गाव, ग्रामपंचायत पुरस्कार दिला जाणार आहे. तर ९० टक्क्यांपर्यंत मतदान झालेल्या गृहनिर्माण सोसायटी आणि एक हजारापेक्षा अधिक कामगार असलेल्या औद्योगिक संस्थांना देखील, समृद्ध लोकशाही गृहनिर्माण सोसायटी आणि औद्योगिक संस्था पुरस्कार दिले जाणार आहेत.
****
जालना लोकसभा मतदारसंघात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी तसंच पोलीस कर्मचाऱ्यांनी काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात टपाली मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, १३ मे या मतदानाच्या दिवशी जालना कृषी उत्पन्न बाजारसमितीचे व्यवहार बंद राहणार असल्याचं समितीकडून कळवण्यात आलं आहे.
****
वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेचा सण काल साजरा झाला. भगवान परशूराम आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंतीही आज साजरी झाली. यानिमित्तानं छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेडसह सर्वत्र अभिवादन, शोभायात्रा, वाहनफेऱ्यांसह विविध कार्यक्रम घेण्यात आले.
तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेची काल अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केलेले विविध दागिने देवीला घालण्यात आले होते. असंख्य भाविकांनी काल देवीचं दर्शन घेतलं.
****
नांदेड इथल्या खासगी वित्त कंपन्यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने काल छापेमारी केली. नाशिक आयकर विभागातील जवळपास शंभर अधिकारी आणि कर्मचारी सकाळी सात वाजल्यापासून शहरातल्या शिवाजी नगरामधल्या पाच ते सात ठिकाणी तपास करत होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या परतूर नगरपरिषदेचा मुख्याधिकारी अभिषेक परदेशी याच्यासह फायरमन अनिल पारीख यांना ५५ हजार रुपयांची लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ अटक केली. परतूर नगरपरिषदेतून बल्लारपूर इथं बदली झालेल्या कर्मचाऱ्याचं निलंबन काळातील पगार बिल काढून दिल्याचा मोबदला तसंच बदली झालेल्या ठिकाणी सेवापुस्तिका आणि पगारपत्रक पाठविण्याकरता त्यांनी ही लाच मागितली होती.
****
नांदेड जिल्ह्यात एक प्रवासी जीप गोदावरी नदीत पडल्याने गाडीतील दोन जण जागीच ठार झाले. काल सायंकाळी मुदखेडहून मारतळाकडे जात असलेली जीप येळी - महाटी पुलावरून नदीपात्रात कोसळली. रात्री उशीरापर्यंत नदीपात्रात तपास मोहीम सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले. या दरम्यान दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल���. दरम्यान, पुढील दोन दिवस मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याचा वारा तसंच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
अमृतसर इथून सुटणारी अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेसची उद्या रविवारची फेरी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबद्दल दिलगीर असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जचा ३५ धावांनी पराभव केला. गुजरातच्या संघानं प्रथम फलंदाजी करत २० षटकात २३१ धावा केल्या. शुभमन गिलनं १०४, तर साई सुदर्शननं १०३ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल चेन्नईचा संघ निर्धारित षटकात आठ बाद १९६ धावाच करु शकला.
आज या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स संघात सामना होणार आहे.
****
0 notes
Text
डॉ. दाभोलकर खून प्रकरणात सरकारी साक्षी पुरावे संपले
https://bharatlive.news/?p=139522 डॉ. दाभोलकर खून प्रकरणात सरकारी साक्षी पुरावे संपले
पुणे; पुढारी ...
0 notes
Text
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण न्यायालय में विचाराधीन होने पर भी सनातन संस्था को दोषी ठहरानेवाले अंधश्रद्धा निर्मूलन समिति के अविवेकी पदाधिकारियों पर कानूनी कार्रवाई करेंगे !
http://dlvr.it/StnNMy
0 notes
Text
आनंद पटवर्धन की डॉक्यूमेंट्री कारण डर की संस्कृति को उजागर करता है
आनंद पटवर्धन की डॉक्यूमेंट्री कारण डर की संस्कृति को उजागर करता है
आनंद पटवर्धन की 2018 की डॉक्यूमेंट्री फिल्म रीज़न पहली बार भारत में इंग्लिश सबटाइटल के साथ दिखाई दे रही है आनंद पटवर्धन का कारण चीख की तरह है – यह आपको खोखला कर देता है। एडवर्ड मंक की 19 वीं सदी के अंत में काम करने का समय दिमाग के सुन्न हो जाने के कारण था; पटवर्धन सामाजिक कार्यकर्ता डॉ। एनए दाभोलकर और वामपंथी राजनीतिज्ञ गोविंद पानसरे, दोनों तर्कवादियों की हत्याओं का नतीजा था। अंग्रेजी उपशीर्षक…
View On WordPress
#आनंद पटवर्धन#आनंद पटवर्धन कारण#कारण अंग्रेजी उपशीर्षक#गोविंद पानसरे#डॉ। दाभोलकर#दलितों और मुसलमानों पर फिल्म#पुरस्कार विजेता भारतीय वृत्तचित्र#बुद्धिवाद पर फिल्में#हिंदुत्व पर फिल्में
0 notes
Text
Naseeruddin Shah On Murdered Rationalist Narendra Dabholkar
Naseeruddin Shah On Murdered Rationalist Narendra Dabholkar
उन्होंने कहा, “मैं हैरान था कि यहां एक व्यक्ति था जिसने अपने जीवन के सामने अपने विश्वास को रखा”, उन्होंने कहा। मुंबई: दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह ने शुक्रवार को यहां कहा कि डॉ नरेंद्र दाभोलकर के काम को मिटाया नहीं जा सकता और उनके पदचिन्ह गहरे रहेंगे। मारे गए बुद्धिजीवियों पर एक कला प्रदर्शनी ‘वी आर ऑन ट्रायल’ का उद्घाटन करने के बाद बोलते हुए उन्होंने कहा कि अंधविश्वास से लड़ने के लिए उसी तरह…
View On WordPress
0 notes
Text
'तुमको अगला गांधी बना दिया जाएगा': सनातन संस्था ने दाभोलकर को धमकी देते हुए कहा था
‘तुमको अगला गांधी बना दिया जाएगा’: सनातन संस्था ने दाभोलकर को धमकी देते हुए कहा था
अंधविश्वास विरोधी कार्यकर्ता और तर्कवादी डॉ नरेंद्र दाभोलकर की हत्या के मुक़दमे में गवाह के तौर पर पेश हुए उनके बेटे डॉ हामिद दभोलकर ने पुणे की एक अदालत को बताया कि उनके पिता ने एक कट्टरपंथी संगठन, सनातन संस्था की गतिविधियों के बारे में एक फाइल राज्य के आतंकवाद विरोधी दस्ते को सौंपी थी। बतौर गवाह हामिद दभोलकर ने अदालत को यह भी बताया कि सनातन संस्था द्वारा प्रकाशित एक दैनिक सनातन प्रभात के माध्यम…
View On WordPress
0 notes
Link
0 notes
Text
डॉ नरेंद्र दाभोलकर हत्याकांड में शामिल आरोपियों के खिलाफ सीबीआई की मांग
डॉ नरेंद्र दाभोलकर हत्याकांड में शामिल आरोपियों के खिलाफ सीबीआई की मांग #CBI #Narenderadabholkar #maharashtra
केंद्रीय जांच ब्यूरो (सीबीआई) ने शनिवार को महाराष्ट्र की अदालत में दलील दी कि 2013 में डॉ नरेंद्र दाभोलकर की हत्या के पांच आरोपियों पर गैरकानूनी गतिविधियां (रोकथाम) अधिनियम (यूएपीए) के तहत मामला दर्ज किया जाना चाहिए। एजेंसी ने कहा कि आरोपी ने “लोगों के एक वर्ग के बीच आतंक” करने के लिए हत्या की।कोर्ट ने दोनों पक्षों की सुनवाई करते हुए मामले की सुनवाई की अगली तारीख सात सितंबर तय की है. पांचों…
View On WordPress
0 notes
Photo
Ncp Leader Supremo Sharad Pawar Commented On Sushant Singh Rajput Cbi Case Dr Narendra Dabholkar Murder | एनसीपी सुप्रीमो का तंज- उम्मीद है इस मामले में जांच का हाल डॉ. दाभोलकर जैसा न हो, महाराष्ट्र सरकार सीबीआई को पूरा सहयोग करेगी मुंबई3 घंटे पहले कॉपी लिंक शरद पवार ने ट्वीट में सुशांत केस को लेकर अपनी बात रखी। महाराष्ट्र में शिवसेना के साथ एनसीपी और कांग्रेस की गठबंधन सरकार है। सुशांत केस की जांच को लेकर मुंबई पुलिस सवालों के घेरे में है। - फाइल फोटो
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार उद्या संपणार-सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला
मद्यधोरण प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जून पर्यंत अंतरिम जामीन
डॉ नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप आणि ५ लाख रुपये दंड-पुराव्या अभावी तिघांची सुटका
आणि
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रोत्साहन पुरस्कार
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार उद्या संपत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराने आता जोर धरला आहे. या टप्प्यात मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना आणि बीड लोकसभा मतदारसंघांसह राज्यातल्या नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नंदुरबार इथं महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
वंचित वर्गाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी आपण सदैव कार्यरत राहून अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गाचं आरक्षण कमी करुन धर्माच्या आधारे आरक्षण देऊ देणार नाही, याचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेस मात्र या मुद्यावर काहीही बोलायला तयार नसल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना विरोध, राम मंदिरासंदर्भात काँग्रेसची भूमिका या मुद्यांवरूनही मोदी यांनी टीका केली. सीकल सेल ॲनिमिया निर्मुलनासह नंदुरबारमधल्या विकासकामांचा दाखला त्यांनी दिला. प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात अशा आशयाचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्या अनुषंगाने बोलतांना, मोदी यांनी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना महायुतीमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं.
दरम्यान, शरद पवार यांनी मात्र मोदी यांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. नरेंद्र मोदी यांची अलिकडची सगळी भाषणं समाजात अविश्वास निर्माण करण्यासाठी पोषक असल्याची टीका पवार यांनी केली. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. आपला पक्ष गांधी-नेहरुंच्या विचारधारेवर चालतो. त्यामुळे अशा प्रस्तावाला पाठिंबा देता येणार नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मोदी यांच्या या प्रस्तावावर टीका केली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते होते. भाजपाने या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्व प्रकारची कार्ड वापरली पण कोणतंच कार्ड चालत नसल्याने, मोदी यांना दररोज नवं कार्ड वापरावं लागत आहे, असं पटोले म्हणाले.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर इथं सभा घेणार आहेत. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे.
जालना इथंही महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ आज सभा होणार आहे.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातले महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या घटक पक्षाच्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत.
****
गेल्या वीस वर्षांमध्ये कोणत्याही खासदाराला छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न सोडवता आलेला नाही, असा आरो�� वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अफसर खान यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आदर्श सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन विद्यमान खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी दिलं होतं, पण प्रत्यक्षात ५३८ ठेवीदारांवरच गुन्हा दाखल करण्यात आल्याकडे अफसर खान यांनी लक्ष वेधलं.
****
अहमदनगर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासाठी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज अहमदनगर इथं सभा घेतली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्यातल्या भातकुडगाव फाटा इथं सभा घेतली.
****
'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात आजच्या भागात आपण भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम सामाजिक संपर्क माध्यमांवरूनही ऐकता येईल.
****
मद्यधोरण प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या पीठानं आज हा निर्णय दिला. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी न्यायालयानं केजरीवाल यांना ही मुभा दिली असून २ जून रोजी आत्मसमर्पण करण्यास सांगितलं आहे. केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडीनं अटक केली होती, तेव्हापासून ते तिहार तुरुंगात आहेत.
****
अंधश्रद्धा निर्मुलन क्षेत्रात कार्यरत ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना पुण्यातल्या विशेष न्यायालयानं जन्मठेप आणि ५ लाख रुपये दंड ठोठावला आहे. या दोघांनी दाभोलकर यांच्यावर गोळी झाडल्याची कबुली दिली होती. मात्र या प्रकरणातले अन्य आरोपी डॉ. विरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची न्यायालयानं पुराव्या अभावी, सुटका केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचं दाभोलकर कुटुंबियांनी स्वागत केलं आहे. मात्र पुराव्याअभावी मुक्तता केलेल्यांना शिक्षा व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात सकाळी दाभोळकर यांची हत्या झाली होती.
****
औरंगाबाद लोकसभा निवडणूक येत्या १३ मे रोजी पार पडणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदान प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत दिली. मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध पुरस्कार देणार असल्याचंही आज जाहीर केलं. ७५ टक्क्यांपर्यंत मतदान झालेल्या गावांना आणि पंचायतींना समृद्ध लोकशाही गाव, ग्रामपंचायत पुरस्कार दिला जाणार आहे, तर ९० टक्क्यांपर्यंत मतदान झालेल्या गृहनिर्माण सोसायटी आणि १००० पेक्षा अधिक कामगार असलेल्या औद्योगिक संस्थांना देखील समृद्ध लोकशाही गृहनिर्माण सोसायटी आणि औद्योगिक संस्था पुरस्कार दिले जाणार आहेत.
****
जालना लोकसभा निवडणूक येत्या १३ मे रोजी होत असून, मतदानाच्या दिवशी जालना कृषी उत्पन्न बाजारसमितीचे व्यवहार बंद राहणार आहेत. शेतकऱ्यांनी या दिवशी बाजारपेठेत कृषी माल विक्रीसाठी आणू नये, असं बाजारसमितीच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे.
****
वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेचा सण आज साजरा होत आहे. भगवान परशूराम आणि महात्मा बसवेश्वर जयंतीही आज साजरी होत असून, यानिमित्तानं शोभायात्रा, वाहनफेऱ्यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं स्वामी विवेकानंद उद्यानात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हा महोत्सव समितीच्या वतीने मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. भगवान परशुराम जयंतीनिमित्त औरंगपुरा इथं भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.
अक्षय तृतीया निमित्त आज धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेची अलंकार महापूजा मांडण्यात आली. या निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केलेले विविध दागिन्यांची तसंच विविध अलंकारांची महापूजा आणि आंब्याची आरासही मांडण्यात आली होती. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने असंख्य भाविकांनी आज देवीचं दर्शन घेतलं.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात अनुभव मंडपाच्या माध्यमातून सामाजिक समस्यावर आळा घातला, असं प्रतिपादन विठ्ठलराव ताकबीडे यांनी केलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेत आज महात्मा बसवेश्वर ��ांना आज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
नांदेड इथल्या खासगी वित्त कंपन्यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने आज छापेमारी केली. आयकर विभागाचे कर्मचारी सकाळी सात वाजल्यापासून शहरातल्या शिवाजी नगरामधल्या पाच ते सात ठिकाणी तपास करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नाशिक आयकर विभागातील जवळपास शंभर अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते.
****
रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. चारचाकीने ट्रेलरला धडक दिल्याने हा अपघात झाला. दरम्यान, या अपघातामुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
****
अमृतसर इथून सुटणारी अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेसची परवा रविवारची फेरी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबद्दल दिलगीर असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आय पी एल क्रिकेट मध्ये आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजल्यापासून सामना सुरू होणार आहे.
****
0 notes
Text
दाभोलकर हत्या प्रकरण:अंदुरे, कळसकर यांनीच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या; प्रत्यक्षदर्शीची कोर्टात साक्ष, गोळ्या झाडल्या तेव्हा साक्षीदार घटनास्थळाजवळ होता
दाभोलकर हत्या प्रकरण:अंदुरे, कळसकर यांनीच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या; प्रत्यक्षदर्शीची कोर्टात साक्ष, गोळ्या झाडल्या तेव्हा साक्षीदार घटनास्थळाजवळ होता
दाभोलकर हत्या प्रकरण:अंदुरे, कळसकर यांनीच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या; प्रत्यक्षदर्शीची कोर्टात साक्ष, गोळ्या झाडल्या तेव्हा साक्षीदार घटनास्थळाजवळ होता Go to Source
View On WordPress
#कळसकर#कोर्टात#गोळ्या#घटनास्थळाजवळ#झाडल्या#डॉ.#तेव्हा#दाभोलकर#दाभोलकरांवर#प्रकरण:अंदुरे#प्रत्यक्षदर्शीची#बातम्या#यांनीच#साक्ष#साक्षीदार#हत्या;#होता
0 notes
Photo
डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला आज सात वर्षे पूर्ण; सीबीआयच्या तपासावर कुटुंबियांची नाराजी कार्यकर्त्यांनी सीबीआयवर नाराजी व्यक्त केली आहे | #narendradabholkar #Murder #7years #CBI http://www.headlinemarathi.com/maharashtra-news/narendra-dabholkars-murder-probe-not-over-even-after-7-years/?feed_id=7576&_unique_id=5f3dfe2de9998
0 notes
Text
Vikram Bhave’s Bail Application Dismissed by Pune Court svk 88 scj 81 | डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपी विक्रम भावेचा जामीन फेटाळला
Vikram Bhave’s Bail Application Dismissed by Pune Court svk 88 scj 81 | डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपी विक्रम भावेचा जामीन फेटाळला
[ad_1]
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विक्रम भावेचा जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. विक्रम भावेवर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात रेकी केल्याचा आरोपा आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी होणार आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात संशयित असलेला विक्रम भावे याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला आहे.
ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप…
View On WordPress
0 notes
Text
संजीव पुनाळेकर की रिहाई के लिए आजाद मैदान में हुआ विराट आंदोलन
संजीव पुनाळेकर की रिहाई के लिए आजाद मैदान में हुआ विराट आंदोलन
21 जून 2019 www.azaadbharat.org 🚩प्रखर राष्ट्रवादी, हिंदुनिष्ठ अधिवक्ता श्री संजीव पुनालेकर ने डॉ. दाभोलकर की हत्या की जांच की तथा असली दिशा न्यायालय के सामने रखकर जांच यंत्रणाओं की पोल खोल दी इसलिए बदले की भावना रखकर अधिवक्ता संजीव पुनालेकर और सूचना अधिकार कार्यकर्ता श्री. विक्रम भावे इन को गिरफ्तार किया गया । हिंदुत्वनिष्ठो की आवाज को इस प्रकार दबाना हिंदू समाज कदापि सहन नहीं करेगा । 🚩इस…
View On WordPress
0 notes
Text
डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने काढलेले वाभाडे मुख्यमंत्र्यांसाठी लज्जास्पद
डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणांकडून होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे संतापून उच्च न्यायालयाने राज्यातील पोलीस यंत्रणेचे वाभाडे काढले आहेत. उच्च न्यायालयाने आपल्या १४ मार्च २०१९ च्या आदेशात सरकारवर आसूड ओढलेले आहेत. राज्यातील पोलीस यंत्रणेची कामगिरी पूर्णपणे निराशाजनक असून उच्च न्यायालयाने वापरलेल्या प्रत्येक शब्दातून उद्वेग दिसून येत आहे. हे राज्याचे गृहमंत्रालय सांभाळत…
View On WordPress
0 notes
Text
ABP Majha Smart Bulletin For 20 August 2020 Latest Updates | स्मार्ट बुलेटिन | 20 ऑगस्ट 2020 | गुरुवार
ABP Majha Smart Bulletin For 20 August 2020 Latest Updates | स्मार्ट बुलेटिन | 20 ऑगस्ट 2020 | गुरुवार
[ad_1]
स्मार्ट बुलेटिन | 20 ऑगस्ट 2020 | गुरुवार | एबीपी माझा
लालपरी पाच महिन्यानंतर आंतर जिल्हा धावण्यासाठी रस्त्यावर, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे रिकाम्या बसेस सोडायची वेळ
सरकारी नोकरींसाठी आता देशभरात एकच सामायिक परीक्षा होणार! मोदी सरकारचा निर्णय
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला सात वर्षे पूर्ण, सीबीआयच्या तपासावर कुटुंबियांची नाराजी
दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाप्रमाणे…
View On WordPress
#ABP Majha Smart Bulletin#Corona updates#coronavirus#covid-19#India#Latest Updates#Maharashtra#maharashtra rain update#Mumbai rain#Rain UPDATE#Smart Bulletin#एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन#कोरोना#कोरोना न्यूज#कोरोना व्हायरस#कोरोनाअपडेट#कोरोनाव्हायरस#महाराष्ट्र#महाराष्ट्र कोरोना#लेटेस्ट अपडेट्स#लॉकडाऊन#स्मार्ट बुलेटिन
0 notes