#झुकणार
Explore tagged Tumblr posts
Text
‘महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही’, आदित्य ठाकरे मुंबईतील वज्रमूठ सभेत कडाडले
मुंबई : छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील वर्जमूठ सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाविकास आघाडीची मुंबईत आज तिसरी वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेला आज विशेष महत्त्व आहे. कारण आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस आहे. त्यामुळे या सभेत संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय…
View On WordPress
0 notes
Text
“कुणासमोर झुकणार नाही!”, गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिनी पंकजा यांचं कार्यकर्त्यांना संबोधन
“कुणासमोर झुकणार नाही!”, गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिनी पंकजा यांचं कार्यकर्त्यांना संबोधन
“कुणासमोर झुकणार नाही!”, गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिनी पंकजा यांचं कार्यकर्त्यांना संबोधन बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde Birth Anniversary) याची आज जयंती आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जात त्यांना अभिवादन केलं. त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे (Pankaja…
View On WordPress
#“कुणासमोर#आजच्या प्रमुख घडामोडी#कार्यकर्त्यांना#गोपीनाथ#जयंतीदिनी#झुकणार#नाही#पंकजा#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मुंडेंच्या#यांचं#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शासन#संबोधन#सरकार
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 September 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १२ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस
मुंबईत गणपती विसर्जनाच्यावेळी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात वाद, २५ जणांविरोधात गुन्हा दाखल
केंद्र सरकारपुढे राष्ट्रवादी काँग्रेस झुकणार नाही, - पक्���ाध्यक्ष शरद पवार
राज्य सरकारनं अतिवृष्टी पीडितांना जाहीर केलेली मदत योजना फसवी असल्याची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पैठणला सत्कार आणि जाहीर सभा
जिल्हा परिषद शिक्षकांचा मुख्यालय वास्तव्याचा मुद्दा शैक्षणिक गुणवत्तेशी जोडल्याच्या विरोधात, औरंगाबादमध्ये सन्मान मोर्चा
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचं मध्यप्रदेशात नर��िंहपूर इथं निधन
आणि
आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं श्रीलंकेला विजेतेपद
****
राज्यात काल कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक प्रकल्पांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे.
औरंगाबाद शहर आणि परिसरात काल दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे वाळूज महानगर आणि तिसगाव परिसरातल्या नदी, नाल्यांना पूर आला, या पुरात तीन राजस्थानी महिला वाहून गेल्या. वाळूज अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. यामध्ये दोर्घींना वाचवण्यात यश आलं असून, एका महिलेचा शोध लागलेला नाही. फुलंब्री तालुक्यातल्या खामगावामध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलं तर अनेक घरांमध्ये पाणी घुसलं. दरम्यान, या पावसाने औरंगाबाद लगतचा हर्सुल तलाव भरून वाहू लागला आहे. जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे प्रत्येकी चार फुट उघडण्यात आले असून, ७५ हजार ४५६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल दुपारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
अंबड तालुक्यातल्या मसई तांडा इथं काल अंगावर वीज कोसळून श्रीराम जाधव या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दुपारी शेतात काम करत असताना पाऊस आल्यामुळे जाधव हे झाडाच्या आश्रयाला थांबले. त्याच वेळेस झाडावर वीज कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
दरम्यान, परतूर तालुक्यातल्या लोअर दुधना धरणाचे सहा दरवाजे एक फूट उघण्यात आले असून, नदीपात्रात सहा हजार ६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नांदेड शहरात काल रात्री जोरदार पाऊस झाला. शहरालगतच्या विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. लोहा तालुक्यातल्या लिंबोटी प्रकल्पाचेही दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी आणि मन्याड नदीला पूर आला असून, नदीकाठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातल्या चिखली, आमसरी, सुजातपुर, पिंप्री देशमुख, लांजुड परिसरात मका तसंच कपाशी पिकाचं नुकसान झालं आहे. खामगाव परिसरात चिखली, आमसरी भागात शेतामधला मका मुसळधार पावसामुळे पूर्णपणे आडवा पडला. प्रशासनानं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात ��ेत आहे.
****
येत्या दोन दिवसात राज्यातल्या सर्व विभागांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. याकाळात विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं मराठवाड्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, या जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या, तर पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे.
****
मुंबईत प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनाच्यावेळी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या वादातून, शनिवारी ठाकरे गटातल्या शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाला मारहाण केली. या वेळी झालेल्या वादानंतर सुमारे १२ शिवसैनिकांसह इतर २५ जणांविरोधात काल दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याप्रकरणी विभागप्रमुख महेश सावंत आणि चार शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या वेळी पोलीस ठाण्याच्या आवारात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला असून, त्याप्रकरणी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
राज्यात जालना आणि वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी याठिकाणचे ड्रायपोर्ट, कृषिमाल निर्यातीचे हब व्हावेत, अशी अपेक्षा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. अॅग्रो व्हिजन फाऊंडेशन आणि राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमानं काल नागपूर इथं, ‘शेतीसाठी ड्रोनचे महत्त्व’ या विषयावरच्या चर्चासत्रात गडकरी बोलत होते. ड्रायपोर्टवरून कृषी मालाची वाहतूक होते, पण आता ही ठिकाणं कृषी माल निर्यातीची केंद्रं व्हायला हवीत, असं ते म्हणाले. रासायनिक आणि सेंद्रीय औषध फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञान उपयोगी आहे. सध्या ड्रोनची किंमत अधिक आहे, मात्र केंद्र शासन किसान ड्रोन योजना आणत आहे, त्याचा लाभ शेतकऱ्यांना करुन देता येईल, असं गडकरी यांनी सांगितलं. राज्यातल्या कृषी क्षेत्रात समृद्धी आणण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.
****
देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं, असं आवाहन, केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी केलं आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी त्यांनी काल डोंबिवली इथं संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या प्रगतीमध्ये आपण सर्व आपापल्या क्षमतेनुसार प्रयत्न करू शकतो, असं ते म्हणाले. दरम्यान, भाजपच्या संघटनात्मक बांधणी कार्यक्रमात ठाकूर यांनी, काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो ��ात्रेवर टीका केली. ब्रिटीशांच्या विचाराने चालणारा काँग्रेस पक्ष आज भारत जोडण्याची यात्रा करत आहे, मात्र त्यांनी नेहमीच तोडण्याचं काम केलं असल्याचा थेट आरोप अनुराग सिंह यांनी केला.
****
सरकारी संस्थांचा दबाव, तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या केंद्र सरकारपुढे राष्ट्रवादी काँग्रेस झुकणार नाही, असं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा तरुण पक्ष असून, नव्या पिढीचं नेतृत्व तयार होत असल्याचं ते म्हणाले. महिला सन्मान, शेतकर्यांचे प्रश्न, चीनशी सीमावाद यासरख्या मुद्यावर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
****
राज्य सरकारनं अतिवृष्टी पीडितांना जाहीर केलेली तीन हजार कोटींची मदत योजना फसवी असल्याची टीका, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचे निकष एक हेक्टरने वाढवून सुद्धा, प्रत्यक्षात मदतीची रक्कम कमी करण्यात आली आहे. अद्याप अनेक नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्यात आला नाही. पिकांच्या प्रतवारी नुसार मदत करणं आवश्यक असताना, सरकारने तुटपुंजी मदतीची फसवी घोषणा केल्याचं दानवे म्हणाले. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले, पूल वाहून गेले, त्यासाठी कोणतीही मदत नाही देण्यात आली नाही, त्यामुळे सर्वच नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे करा अशी मागणी त्यांनी केली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांचं औरंगाबाद विमानतळावर आगमन होईल, त्यानंतर ते पैठणकडे रवाना होतील. पैठण इथं मुख्यमंत्र्यांचा सत्कार आणि जाहीर सभा होणार आहे. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन आणि आपेगाव इथल्या संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत. सायंकाळी ते औरंगाबाद विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करतील. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी काल सभास्थळाची पाहणी केली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ७०१ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख १० हजार ८३२ झाली आहे. या संसर्गानं काल तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर एक हजार ५६ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ५६ हजार ३२४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य आठ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सहा हजार २२० रुग्णांवर ��पचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या १५, औरंगाबाद चार, जालना तीन, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा मुख्यालय वास्तव्याचा मुद्दा शैक्षणिक गुणवत्तेशी जोडल्याच्या विरोधात, शिक्षक भारती या संघटनेच्या वतीनं काल औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आमखास मैदानापासून सुरु झालेल्या या शिक्षक सन्मान मोर्चात, आपल्या विविध मागण्यांचे फलक घेवून जिल्ह्यातल्या शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शिक्षकी पेशावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याविरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. यावेळी झालेल्या सभेत आमदार प्रशांत बंब यांचा निषेध व्यक्त करत, त्यांच्यावर टीका करण्यात आली.
****
लम्पी या जनावरांमधल्या साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृती दल गठीत करण्याची मागणी, किसान सभेच्या वतीनं करण्यात आली आहे. किसान सभेचे अध्यक्ष डॉ अजित नवले यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन सादर केलं आहे. तालुकास्तरावर कृती दल गठीत करून प्रतिबंध आणि उपचार या दोन्ही पातळीवर काम करावं, लम्पीचा प्रादुर्भाव झालेल्या भागात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करावी, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी तातडीने मनुष्यबळ तैनात करावे, अशा मागण्या नवले यांनी या निवेदनातून केल्या आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. १३ ते २२ सप्टेंबर या काळात जिल्ह्यातल्या सर्व गावात ग्रामसभांचं आयोजन करण्यात आलं असून, जिल्ह्यातले सर्व जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात उमरगा, कळंब, भूम, परंडा, लोहारा या तालुक्यात जनावरांमध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानं, लसीकरण हाती घेण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि १७ सप्टेंबरला साजऱ्या होत असलेल्या हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर, काल बीड शहरापासून ते बिंदुसरा धरणापर्यंत बिंदुसरा नदीच्या दोन्ही काठावर, १६ किलोमीटर अंतरावर वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांच्या हस्ते काल सकाळी या मोहिमेला सुरूवात झाली. यावेळी एकूण पाच हजार ९७० वृक्षांची लागवड करण्यात आली. या मोहिमेत सर्व स्तरातल्या नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.
****
बी रघुनाथ महोत्सवाला कालपासून परभणी इथं प्रारंभ झाला. येत्या १४ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात काल सायंकाळी एक पुस्त�� एक दिवस या विषयावर. अमोल उदगीरकर यांच्या न-नायक या पुस्तकावर मान्यवरांचं भाष्य झालं. आज सायंकाळी कवी संमेलन, उद्या सायंकाळी प्राचीन भारतीय मंदिरे या विषयावर दीपा मंडलिक यांचं व्याख्यान, तर परवा समारोपाच्या दिवशी राहुलदेव कदम यांचं गजल गायन होणार आहे.
****
पणजी इथं झालेल्या पहिल्या मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन -२०२२ मध्ये, औरंगाबाद इथल्या मुक्त सृजन साहित्य पत्रिका यांच्या वतीनं दिला जाणारा, राज्यस्तरीय कै. नारायणराव दहिफळे मुक्त सृजन ललितगद्य स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मानव विद्याशाखेच्या अधिष्ठाता, पदव्युत्तर मराठी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. मोना चिमोटे यांच्या, 'पळसबंध', या ललित पुस्तकाला हा पुरस्कार, केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
****
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचं काल मध्यप्रदेशात नरसिंहपूर इथं निधन झालं, ते ९९ वर्षांचे होते. गुजरातमधलं शारदा पीठ तसंच आणि बद्रीनाथ इथल्या ज्योतिर मठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी, स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता. त्यात सुमारे १५ महिने तुरुंगवास भोगला होता. राम मंदिर लढ्यातही त्यांचा मोठा सहभाग होता.
शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
श्रीलंकेनं आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव केला. श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात सहा बाद १७० धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल पाकिस्तानचा संघ १४७ धावाच करु शकला.
****
0 notes
Text
' चौकशी गुंडाळून घेऊ अन तुम्हाला मुख्यमंत्री बनवू फक्त.. ', भाजपकडून खुल्ली ऑफर ?
‘ चौकशी गुंडाळून घेऊ अन तुम्हाला मुख्यमंत्री बनवू फक्त.. ‘, भाजपकडून खुल्ली ऑफर ?
केंद्रातील सत्तारूढ भाजप पक्षाने आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करण्याची खुली ऑफर दिलेली असून तुम्हाला मुख्यमंत्री बनवू आणि तुमच्या पाठीमागे सुरू असलेली सीबीआय चौकशी गुंडाळून घेऊ , असे अनेक खळबळजनक दावे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलेले आहेत. आपल्या विरोधातील आरोप हे धादांत खोटे असून कटकारस्थाने आणि भ्रष्ट लोकांसमोर आपण झुकणार नाही असे देखील त्यांनी ठणकावले आहे. गुजरातमध्ये सध्या…
View On WordPress
0 notes
Text
' चौकशी गुंडाळून घेऊ अन तुम्हाला मुख्यमंत्री बनवू फक्त.. ', भाजपकडून खुल्ली ऑफर ?
‘ चौकशी गुंडाळून घेऊ अन तुम्हाला मुख्यमंत्री बनवू फक्त.. ‘, भाजपकडून खुल्ली ऑफर ?
केंद्रातील सत्तारूढ भाजप पक्षाने आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करण्याची खुली ऑफर दिलेली असून तुम्हाला मुख्यमंत्री बनवू आणि तुमच्या पाठीमागे सुरू असलेली सीबीआय चौकशी गुंडाळून घेऊ , असे अनेक खळबळजनक दावे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलेले आहेत. आपल्या विरोधातील आरोप हे धादांत खोटे असून कटकारस्थाने आणि भ्रष्ट लोकांसमोर आपण झुकणार नाही असे देखील त्यांनी ठणकावले आहे. गुजरातमध्ये सध्या…
View On WordPress
0 notes
Text
' चौकशी गुंडाळून घेऊ अन तुम्हाला मुख्यमंत्री बनवू फक्त.. ', भाजपकडून खुल्ली ऑफर ?
‘ चौकशी गुंडाळून घेऊ अन तुम्हाला मुख्यमंत्री बनवू फक्त.. ‘, भाजपकडून खुल्ली ऑफर ?
केंद्रातील सत्तारूढ भाजप पक्षाने आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करण्याची खुली ऑफर दिलेली असून तुम्हाला मुख्यमंत्री बनवू आणि तुमच्या पाठीमागे सुरू असलेली सीबीआय चौकशी गुंडाळून घेऊ , असे अनेक खळबळजनक दावे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलेले आहेत. आपल्या विरोधातील आरोप हे धादांत खोटे असून कटकारस्थाने आणि भ्रष्ट लोकांसमोर आपण झुकणार नाही असे देखील त्यांनी ठणकावले आहे. गुजरातमध्ये सध्या…
View On WordPress
0 notes
Text
' चौकशी गुंडाळून घेऊ अन तुम्हाला मुख्यमंत्री बनवू फक्त.. ', भाजपकडून खुल्ली ऑफर ?
‘ चौकशी गुंडाळून घेऊ अन तुम्हाला मुख्यमंत्री बनवू फक्त.. ‘, भाजपकडून खुल्ली ऑफर ?
केंद्रातील सत्तारूढ भाजप पक्षाने आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करण्याची खुली ऑफर दिलेली असून तुम्हाला मुख्यमंत्री बनवू आणि तुमच्या पाठीमागे सुरू असलेली सीबीआय चौकशी गुंडाळून घेऊ , असे अनेक खळबळजनक दावे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलेले आहेत. आपल्या विरोधातील आरोप हे धादांत खोटे असून कटकारस्थाने आणि भ्रष्ट लोकांसमोर आपण झुकणार नाही असे देखील त्यांनी ठणकावले आहे. गुजरातमध्ये सध्या…
View On WordPress
0 notes
Text
' चौकशी गुंडाळून घेऊ अन तुम्हाला मुख्यमंत्री बनवू फक्त.. ', भाजपकडून खुल्ली ऑफर ?
‘ चौकशी गुंडाळून घेऊ अन तुम्हाला मुख्यमंत्री बनवू फक्त.. ‘, भाजपकडून खुल्ली ऑफर ?
केंद्रातील सत्तारूढ भाजप पक्षाने आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करण्याची खुली ऑफर दिलेली असून तुम्हाला मुख्यमंत्री बनवू आणि तुमच्या पाठीमागे सुरू असलेली सीबीआय चौकशी गुंडाळून घेऊ , असे अनेक खळबळजनक दावे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलेले आहेत. आपल्या विरोधातील आरोप हे धादांत खोटे असून कटकारस्थाने आणि भ्रष्ट लोकांसमोर आपण झुकणार नाही असे देखील त्यांनी ठणकावले आहे. गुजरातमध्ये सध्या…
View On WordPress
0 notes
Text
' चौकशी गुंडाळून घेऊ अन तुम्हाला मुख्यमंत्री बनवू फक्त.. ', भाजपकडून खुल्ली ऑफर ?
‘ चौकशी गुंडाळून घेऊ अन तुम्हाला मुख्यमंत्री बनवू फक्त.. ‘, भाजपकडून खुल्ली ऑफर ?
केंद्रातील सत्तारूढ भाजप पक्षाने आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करण्याची खुली ऑफर दिलेली असून तुम्हाला मुख्यमंत्री बनवू आणि तुमच्या पाठीमागे सुरू असलेली सीबीआय चौकशी गुंडाळून घेऊ , असे अनेक खळबळजनक दावे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलेले आहेत. आपल्या विरोधातील आरोप हे धादांत खोटे असून कटकारस्थाने आणि भ्रष्ट लोकांसमोर आपण झुकणार नाही असे देखील त्यांनी ठणकावले आहे. गुजरातमध्ये सध्या…
View On WordPress
0 notes
Text
भाजप म्हणाली, 'आप' तोडून या, खटला संपेल, पण मी राजपूत आहे... - सिसोदिया
भाजप म्हणाली, ‘आप’ तोडून या, खटला संपेल, पण मी राजपूत आहे… – सिसोदिया
गुजरातला रवाना होण्यापूर्वी सिसोदिया म्हणाले, ‘मला भाजपचा संदेश मिळाला आहे – आप तोडा आणि भाजपमध्ये जा, सीबीआय आणि ईडीची सर्व प्रकरणे बंद करू. भाजपला माझे उत्तर- मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे, मी राजपूत आहे. मी माझे डोके कापून टाकीन, परंतु भ्रष्ट-कारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया. (फाइल) प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय मनीष सिसोदिया आज गुजरातला रवाना झाले…
View On WordPress
0 notes
Text
“ना राऊत जी झुकणार नाही आणि तो मोडणार नाही….”: प्रियांका चतुर्वेदी
“ना राऊत जी झुकणार नाही आणि तो मोडणार नाही….”: प्रियांका चतुर्वेदी
“ना राऊत जी झुकणार नाही आणि तो मोडणार नाही….”: प्रियांका चतुर्वेदी “ना राऊत झुकणार आहेत, ना त्यांचा लढण्याचा संकल्प मोडणार आहे. त्याला अधिक शक्ती, “प्रियांका चतुर्वेदी… “ना राऊत झुकणार आहेत, ना त्यांचा लढण्याचा संकल्प मोडणार आहे. त्याला अधिक शक्ती, “प्रियांका चतुर्वेदी जोडले. शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सोमवारी सांगितले की, शिवसेना नेते संजय राऊत झुकणार नाहीत आणि…
View On WordPress
#आणि#आताची बातमी#चतुर्वेदी#जी#झुकणार#ट्रेंडिंग बातमी#तो#ना&8230;!#नाही#न्यूज अपडेट मराठी#प्रियांका#फ्रेश बातमी#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#मोडणार#राऊत#राजकीय#राजकीय अपडेट#राजकीय उलथापालथ#राजकीय घटना#राजकीय घडामोडी#राजकीय चढउतार#राजकीय नेते#राजकीय प्रश्न#राजकीय बातम्या#राजकीय वाटचाल#राजकीय समाचार
0 notes
Photo
मुंबईत येण्यापूर्वी कंगनाचं ट्विट 'ना घाबरणार, ना झुकणार' हा वाद पुन्हा वाढण्याची चिन्ह दिसत आहेत | #Mumbai #kangana #Tweet http://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/kangana-will-come-today-in-mumbai/?feed_id=9630&_unique_id=5f58656d44aa8
0 notes
Text
प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात , अटक मात्र नाही
प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात , अटक मात्र नाही
काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या सोनभद्र या ठिकाणी पीडितांची भेट घेण्यासाठी गेलेल्या असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही झुकणार नाही. मी हिंसाचारात बळी गेलेल्या पीडितांना भेटण्यासाठी आले आहे मला अटक करण्यात आली आहे असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. मात्र प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आलेलं नाही तर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे…
View On WordPress
0 notes
Text
प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात,अटक मात्र नाही
प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात,अटक मात्र नाही
काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या सोनभद्र या ठिकाणी पीडितांची भेट घेण्यासाठी गेलेल्या असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही झुकणार नाही. मी हिंसाचारात बळी गेलेल्या पीडितांना भेटण्यासाठी आले आहे मला अटक करण्यात आली आहे असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. मात्र प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आलेलं नाही तर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे…
View On WordPress
0 notes
Photo
अंधाराची वाट आहे... पण भगव्याची साथ आहे....! मोडेन पण झुकणार नाही.... हि शिवसैनिकांची जात आहे.....! (at Shivsena Bhavan)
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 July 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ११ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
**** अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जण ठार तर १९ भाविक जखमी झाले आहेत. अनंतनाग जिल्ह्यात काल रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन पोलिस चौक्यांवर गोळीबार करून पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांनी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. यात पाच पहिलांसह सात जण ठार झाले. मृत यात्रेकरूंमध्ये महाराष्ट्रातल्या पालघर आणि डहाणू इथल्या दोन महिलांचा समावेश आहे. अमरनाथ दर्शनानंतर भाविकांना घेऊन, ही बस जम्मू कडे परतत होती. सुरक्षा पुरवलेल्या वाहनांच्या ताफ्यात नसलेली ही बस, सायंकाळी सात वाजेनंतरही रस्त्यावर उतरवून, बसचालकानं अमरनाथ यात्रेच्या नियमाचा भंग केल्याच��, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून, अशा भ्याड हल्ल्यांसमोर भारत कधीही झुकणार नाही, असं म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. **** कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भेट वस्तूंसंदर्भात सरकारनं वस्तू आणि सेवा कराचे निकष स्पष्ट केले आहेत. पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या भेटवस्तू करपात्र ठरणार असून, त्यापेक्षा कमी किंमतीच्या भेटवस्तू जीएसटीच्या अंतर्गत येणार नाहीत, असं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. **** केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काल नवी दिल्लीत आयकर दात्यांसाठी आयकर सेतु या नव्या ई सेवेचं लोकार्पण केलं, या ॲपच्या सुविधेमुळे करदात्यांना आयकर भरता येईल, तसंच पॅनसाठी अर्ज करता येईल. त्याचबरोबर कर विषयक माहिती मिळणं, अधिक सुलभ होईल, असं जेटली म्हणाले. आयकर सेतु मुळे आयकर विभागाचा करदात्यांशी थेट संवाद होणार असून, कर दात्यांनी नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसच्या माध्यमातून आवश्यक माहिती तसंच सूचना वेळोवेळी दिल्या जाणार आहेत. **** केंद्र आणि राज्यांतली महाविद्यालयं, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमधल्या प्राध्यापकांच्या वेतनात २२ ते २८ टक्क्यांची वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं, विद्यापीठ वेतन आयोग समितीद्वारे प्राध्यापकांच्या वेतनात वाढ करण्यास मंजुरी दिली असून अन्य भत्यांविषयीचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचं, मनुष्य़बळ विकास मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं. या निर्णयामुळे आठ लाख प्राध्यापकांना वेतनवाढ मिळणार आहे. सहा हजार रुपये मूळवेतन असलेल्या सह प्राध्यापकांच्या वेतनात १० हजार ३९६ रुपये वाढ होणार आहे. तर सहयोगी प्राध्यापकांच्या वेतनात २३ हजार ६६२ रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. **** दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर तातडीनं कारवाई करणं आवश्यक असल्याचं, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. काल राजभवनात कृषी विद्यापीठांच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. गुणात्मक कृषी शिक्षणासाठी विद्यापीठांनी संलग्न कृषी महाविद्यालयांच्या दर्जावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, जी महाविद्यालयं आवश्यक निकषांनुसार काम करत नसतील, त्यांची मान्यता काढण्याबाबत विचार करावा, असंही राज्यपालांनी यावेळी स्पष्ट केलं. कृषी महाविद्यालयं आणि विद्यापीठांमधली रिक्त पदं भरण्यासाठी विभागानं तातडीनं कारवाई कराव���, असे निर्देशही राज्यपालांनी दिले. **** मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत पुढच्या चार वर्षात राज्यात एक हजार नळ पाणी पुरवठा प्रकल्प राबवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम आणि जलस्वराज्य प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांत, पाणी पुरवठा विषयक विविध १७१ प्रकल्पांचं ई भूमिपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सध्या बंद असलेल्या ८३ प्रादशिक पाणी पुरवठा योजना पुनरुज्जीवित करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असं ते म्हणाले, भूमिपूजन झालेल्या या १७१ प्रकल्पांमध्ये मराठवाड्यात जालना जिल्ह्यातल्या पराडा तसंच नांदेड जिल्ह्यातल्या सगरोळी आणि अर्जापूर इथल्या पाणी पुरवठा योजना, तसंच जिल्ह्यातल्या १७ गावात पाणी शुद्धीकरण संयंत्र, हिंगोली, लातूर, परभणी, जालना, इथल्या पाणी तपासणी प्रयोगशाळा, तसंच मंठा इथल्या जल वेधशाळेचा समावेश आहे. **** कर्ज मुक्तीचा लाभ मिळालेल्या ८९ लाख शेतकऱ्यांची यादी बॅंकांकडून येत्या आठ दिवसात देण्यात यावी, अशी मागणी करत शिवसेनेनं काल राज्यभर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसमोर ढोल वाजवा आंदोलन केलं. पक्षाचे नेते तथा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, या आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली. कर्ज वसुलीसाठी बँक शेतकऱ्यांच्या घरासमोर ढोल वाजवून दबाव आणत असे, त्याच धर्तीवर राज्यभरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसमोर ढोल वाजवा आंदोलन केल्याचं, कदम यांनी सांगितलं. चिनी बनावटीच्या वस्तू, पाकिस्तानसोबत क्रिकेट या दोन्ही बाबींना विरोध करत, कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भूमिकेवरही टीका केली.
मराठवाड्यातही औरंगाबाद सह जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद, इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर तसंच सर्व तालुक्यांमध्ये बँकेच्या शाखांसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आलं. या योजनेत लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झाल्��ाचा आरोप करुन शिवसनेनं कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीनं १० हजार रुपये कर्ज वाटप करावं, यासह विविध मागण्या केल्या. उस्मानाबाद इथं आंदोलनानंतर आपल्या मागण्यांचं निवेदन पक्षाच्या वतीनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. **** आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं वृत्त चुकीचं असून, पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळत असल्याचं, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल शिर्डी इथं वार्ताहरांशी बोलत होते. **** देशातल्या एचआयव्ही - एड्स बाधितांसाठीच्या पहिल्या खाजगी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. प्रदीप उगीले ��ांचं काल मुंबई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं, ते ५० वर्षांचे होते. पित्ताशयाच्या आजारासाठी त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज लातूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. **** वैद्यकीय व्यावसायिकांच्या ‘कट प्रॅक्टिस’विरुद्धच्या कायद्याचा मसुदा तयार झाला असून, लवकर त्याला अंतिम स्वरूप दिलं जाणार आहे. या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचे सदस्य तथा वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ प्रवीण शिनगारे यांनी ही माहिती दिली. या मसुद्यात दोषी असलेल्या डॉक्टरांना तीन वर्षापर्यंत सक्तमजुरीच्या शिक्षेसह डॉक्टरांची सनद रद्द करण्याची तरतूद असल्याचं त्यांनी सांगितलं. या मसुद्यात जनतेच्या सूचनांचा अंतर्भाव करून, तो न्याय विभागाकडून योग्य त्या दुरुस्त्यांसह मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे. **** महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या फेर परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. २८ जुलैपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले दहा हजार ८९८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरपासून शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्याची सुविधा आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात नाही. याशिवाय गुणवत्ता वाढवण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा देता येते. *** परभणी शहर आणि परिसरात काल अनेक दिवसांच्या उघडिपीनंतर पावसानं हजेरी लावली. रात्री उशीरा झालेल्या या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे. जालना, तसंच औरंगाबाद इथंही काल सायंकाळच्या सुमारास पावसानं हजेरी लावली. **** पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या डॉ. कविता चौतमल यांची तर उपमहापौरपदी माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत यांची बिनविरोध निवड झाली. शेतकरी कामगार पक्ष आघाडीच्या उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्यानं ही निवड बिनविरोध झाली. **** लातूर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा येत्या डिसेंबर पर्यंत डिजिटल करण्यात येणार असून या साठी लायन्स क्लब परिवारानं सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं लायन्स क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात बोलत होते. **** नांदेड जिल्ह्यातल्या दोन कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. किनवट तालुक्यातल्या इस्लापूर इथल्या धनेश कृषी भांडार मध्ये बनावट बियाणं आढळल्यानं, तसंच मुखेड तालुक्यातल्या बाऱ्हाळी इथल्या कैलास कृषी सेवा केंद्रातून जादा दरानं खताची ��िक्री होत असल्यानं ही कारवाई करण्यात आली. ****
0 notes