#जागृती सहकारी
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 7 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
११ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकित कुठेही अपप्रचार घडू नयेत, प्रलोभन तसंच आमिषांचा वापर होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून देखरेख ठेवावी, तसंच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी काल अकोला इथं मतदारसंघात यंत्रणांकडून करण्यात आलेल्या तयारीच्या आढावा बैठकीत दिले.
निवडणुकीत कायदा, सुव्यवस्था काटेकोरपणे राखली जावी, आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, वनविभाग यांनी सजग राहून चेक पोस्टवर तपासण्या कराव्यात,  असे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणांना दिले.
****
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक निधीची ऑनलाईन पद्धतीने हाताळणी तसच सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता, गतिमानता, अचूकता आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं विकसित केलेल्या ‘ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणाली’ संदर्भात भारतीय स्टेट बँक आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्यात नुकताच करार करण्यात आला आहे. या संगणक प्रणालीच्या विकसनाचा, अंमलबजावणीचा आणि देखभालीचा संपूर्ण खर्च भारतीय स्टेट बँकेने उचलला आहे.
****
धार्मिक भावना भडकवणाऱ्या पाच जणांवर नांदेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग करुन वादग्रस्त पद्धतीनं मजकूर तयार करणाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी स्वीप अंतर्गत'सेल्फी विथ सिग्नेचर' ही विशेष मोहीम बीड जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. या मोहीमेत 'सेल्फी विथ सिग्नेचर' असे फलक लावण्यात येतील तसंच मतदानाबद्दल जनजागृती करण्यात येईल.
****
भंडारा जिल्ह्यात काल रात्री सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला. आज सकाळी सुध्दा जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला आहे. या पावसाचा फटका भाजीपाला पिक तसंच आंबा बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे.
****
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
जागृती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड
जागृती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड
तिरोडा, दि.13 : जागृती सहकारी पत संस्था मुंडीकोटाच्या (र.नं. 797) नवीन संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व संचालकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यात अध्यक्षपदी कमलेश आतिलकर तर उपाध्यक्षपदी मनोज डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे. नवीन संचालक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी जोपर्यंत ठेविदारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत जागृती भ्रष्टाचार संघर्ष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ एप्रिल २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ एप्रिल २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
शांघाय सहकारी संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करावं, आणि अशा कृत्यांना मदत करणार्या देशांवर त्याची जबाबदारी निश्चित करावी, असं आवाहन भारतानं केलं आहे. संघटनेच्या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांना काल नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधित केलं. युवकांना दहशतवादाच्या दिशेनं वळवण्यात येत असल्यानं सुरक्षिततेसाठी एक मोठं आव्हान बनलं असल्याचं ते  म्हणाले.
****
नवी दिल्लीतल्या दिल्ली हाट इथं आजवरचं पहिलंच तृणधान्य अनुभव केंद्र कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते सुरु करण्यात आलं. राष्ट्रीय सहकार कृषी विपणन महामंडळानं कृषी मंत्रलायाच्या सहयोगानं हे तृणधान्य अनुभव केंद्र स्थापन केलं आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये तृणधान्याविषयी जागृती करुन त्याचा वापर वाढवण्याचा या केंद्राचा उद्देश आहे.
****
महिला कुस्तीपटुंचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी दोन प्राथमिक अहवाल दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या वतीने बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कुस्तीपटुंच्या याचिकेवरुन केलेल्या कारवाईची माहिती सर्वोच्च न्यायालयात काल दिली. यासंदर्भात पुढची सुनावणी पाच मे रोजी होणार आहे.
****
महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात गुतंवणुकीसाठी एक व्यासपीठ स्थापन करण्यात येणार असून, यासाठी मॉरिशसच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - एमआयडीसी यांच्यात काल एक सामंजस्य करार करण्यात आला. 'इंडो-मॉरिशस बिझनेस फोरम'च्या वतीने आयोजित या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी उद्योग क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांना महाराष्ट्रातली बलस्थानं सांगत, त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक ��रण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं.
****
विविध प्रकारच्या आगींचं नियंत्रण करताना लष्करी आणि नागरी यासह सर्व संयुक्त यंत्रणांच्या क्षमतांचा वापर करण्यासाठी अग्नी दमन हा सराव देहू रोड इथं काल लष्कराच्या दक्षिण विभागातर्फे घेण्यात आला. 32 नागरी यंत्रणांसह 56 अग्निशमन यंत्रणांनी या सरावात सक्रिय सहभाग घेतला होता.
****
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
जागृती पथसंस्थेचे रेकॉर्ड गहाळ प्रकरण | 'त्या' दोन्ही आरोपींना अटक आणि जामीनावर सुटका
जागृती पथसंस्थेचे रेकॉर्ड गहाळ प्रकरण | ‘त्या’ दोन्ही आरोपींना अटक आणि जामीनावर सुटका
तिरोडा, दि.18 : जागृती सहकारी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांच्या घोळ प्रकरणी काही संचालक व कर्मचारी यांना अटक करण्यात आले होते. त्यानंतर घोळ उघडकीस येवू नये म्हणून दोन कर्मचार्‍यांनी रेकॉर्ड गहाळ केले. प्रशासकाने याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोमवारी पहाटे एका आरोपीला अटक केली. तर दुसर्‍या आरोपीला आज बुधवार, 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अटक करण्यात आली. सदर दोन्ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
जागृती सहकारी पतसंस्था रेकॉर्ड गहाळ प्रकरण | एका आरोपीला अटक तर दुसर्‍याचा शोध सुरू
जागृती सहकारी पतसंस्था रेकॉर्ड गहाळ प्रकरण | एका आरोपीला अटक तर दुसर्‍याचा शोध सुरू
तिरोडा : जागृती सहकारी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांच्या घोळ प्रकरणी काही संचालक व कर्मचारी यांना अटक करण्यात आले होते. त्यानंतर घोळ उघडकीस येवू नये म्हणून दोन कर्मचार्‍यांनी रेकॉर्ड गहाळ केले. प्रशासकाने याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोमवारी पहाटे त्याला अटक केली. तर दुसर्‍या आरोपीचा शोध सुरू आहे. चन्द्रशेखर भाऊदास मडावी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
रेकॉर्ड गहाळ प्रकरण : जागृती पत संस्थेच्या कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल
रेकॉर्ड गहाळ प्रकरण : जागृती पत संस्थेच्या कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल
तिरोडा, दि.10 : जागृती सहकारी पत संस्थेत कोट्यवधी रूपयांचा अपहार झाल्याचे प्रकरण उघड झाले होते. त्यानंतर 6 जून 2021 रोजी सुटीच्या दिवशी पूर्वीच्या दोन कर्मचार्‍यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शाखा उघडून महत्वाची कागदपत्रे गहाळ केली. या प्रकरणी आता तिरोडा पोलिसांनी जागृती सहकारी पत संस्थेच्या ‘त्या’ दोन कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे. मुंडीकोटा येथील जागृती सहकारी पत संस्थेच्या व्याप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 September 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १२ सप्टेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचं पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर; पैठण मार्गावर ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत.
लम्पी आजाराबाबत संभ्रम तसंच भीती दूर करण्यासाठी मोहिम राबवावी - विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी.
आणि
ऊसाला एकरकमी हमीभाव देईपर्यंत एकाही साखर कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही-माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा. 
****
राज्यामध्ये अतिवृष्टी तसंच पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचं पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अशी बाधित गावं, वाडी, तांड्यांचं नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना नागरी सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या धोरणानुसार जिल्हा आपत्ती प्रतिसाद समितींच्या माध्यमातून आपत्तीप्रवण क्षेत्र चिन्हांकित करणं आणि पहिल्या टप्प्यातील अतिसंवेदनशील भागांची पुर्नवसन प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां��ी या बैठकीनंतर सांगितलं. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुर्नवसनासाठी धोरण आणण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जाणार आहे. १७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती आहे. या कालावधीत राष्ट्रनेता से राष्ट्रपिता हा सेवा पंधरवडा राबवणार असून यात सर्व प्रकारच्या सेवा तसंच नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मिशन मोडवर निकाली काढले जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. 
****
नाशिक जिल्ह्यात उर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या १ हजार ४९८ कोटी ६१ लाख रुपये खर्चास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता मंत्रिमंडळानं दिली आहे. हा प्रकल्प आदिवासी क्षेत्रात असून गोदावरील नदीच्या उपनद्यांवर आहे. नाशिक, अहमदनगर, आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यात एकूण ७४ हजार २१० हेक्टर सिंचन क्षेत्रास या प्रकल्पाचा लाभ होईल.
****
प्रत्येक गावातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचं संगणकीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेसाठी राज्याचा वाटा देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महिनाअखेर पर्यंत होणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र विक्री कर न्यायाधिकरणाच्या मुंबई, पुणे आणि नागपूर खंडपीठास मुदतवाढ, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
****
लम्पी आजारापासून पशुधन वाचविण्यासाठी यंत्रणेनं तातडीने पाऊले उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एक्नाथ शिंदे यांनी मंत्रिमडळ बैठकीत दिले. लम्पी आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक १ ९ ६ २ देण्यात आला आहे अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, यांच्यासह अनेक मान्यवरांनी औरंगाबाद विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे यांचं स्वागत केलं.
पैठण इथं मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार आणि जाहीर सभा सध्या सुरू आहे. या सभेला केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड, रावसाहेब दानवे यांच्यासह राज्य ��ंत्रिमंडळातले सदस्य संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, अतुल सावे, उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत.
दरम्यान, औरंगाबादहून पैठणकडे जाताना रस्त्यावरच्या सर्वच गावांमध्ये मुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांची लाडूतुला, पेढेतुला करण्यात आली.
****
लम्पीग्रस्त जनावरांच्या दुधाबद्दल नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम, भीती दूर करण्यासाठी मोहिम राबवण्याची मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. आज मुंबईत विशेष पत्रकार परिषद घेऊन पवार यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली. सद्यस्थितीत राज्यातल्या १७ जिल्ह्यातल्या ५९ तालुक्यात हजारो जनावरे लम्पी आजारानं ग्रस्त असून त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दुधउत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती आणि जनावरांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राज्य सरकारने हाती घ्यावा, लम्पी आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई मिळावी, पशुधनाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली होऊ नये, या आजाराला विमा संरक्षण नसल्याने ते मिळवून देण्यासाठी सरकारने विमा कंपन्यांशी चर्चा करावी, अशा मागण्याही अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान, राज्याचे पालकमंत्री जाहीर न झाल्यावरून पवार यांनी टीका केली आहे. १८ पैकी १४ मंत्र्यांनी अद्याप कार्यभार स्वीकारलेला नाही, याकडेही पवार यांनी लक्ष वेधलं. मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सभेसाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात आलं आहे. अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजेरी लावली, तर अंगणवाडीतल्या मुलांची काळजी कोण घेणार, असा प्रश्नही पवार यांनी विचारला आहे.
****
राज्यातील साखर कारखानदार जोपर्यंत ऊसाला एकरकमी हमीभाव देत नाही तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची धुराडी पेटू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते आज सोलापूर इथं बोलत होते. राज्यातल्या अनेक साखर कारखान्यांकडे मागील गळीत हंगामातील कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे. शिवाय ऊसाचं वजन करताना होणाऱ्या काटामारीकडेही शेट्टी यांनी लक्ष वेधलं. यावर जोपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही असा इशारा शेट्टी यांनी दिला.
****
वाराणसी इथल्या ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणी दा���ल याचिकेवर सुनावणी चालू ठेवण्याचे निर्देश वाराणसी जिल्हा न्यायालयानं दिले आहेत. ज्ञानवापी मशीद परिसरातील शृंगार गौरीची पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिका पाच महिलांनी दाखल केली आहे. अंजुमन इंतजामिया मशीद समितीनं या याचिकेच्या सुनावणीच्या पात्रतेवर शंका उपस्थित करत, ज्ञानवापी ही वक्फची संपत्ती असल्याचं म्हटलं. मात्र मुस्लि�� समाजाची ही मागणी फेटाळून लावत न्यायालयानं, ही सुनावणी पुढे चालवणं योग्य असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २२ सप्टेंबरला होणार आहे.
****
स्थानिक स्वराज संस्थेतल्या लोकप्रतिनिधींनी मोदी सरकारनं केलेल्या कामाचा जनसामान्यांपर्यंत प्रसार करावा, असं आवाहन माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. कल्याण मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी ते तीन दिवसांच्या कल्याण दौऱ्यावर आले आहेत. त्याअंतर्गत तिथल्या सरपंच आणि इतर प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत ते आज बोलत होते. नागरिकांनी फक्त अधिकारांचं भान ठेवू नये तर कर्तव्यांची जाणीवही ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्याचं राज्य सरकार राज्यातल्या जनतेला विकास आणि भरभराटीच्या मार्गावर नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
३ कोटी ३० लाखाची अफरातफर प्रकरण नागमोतीची जामीनावर सुटका
३ कोटी ३० लाखाची अफरातफर प्रकरण नागमोतीची जामीनावर सुटका
जागृती सहकारी संस्था मर्या. मुंडीकोटा येथील प्रकरण: एक लाखाच्या जात मुचलक्यावर सुटका गोंदिया, दि.18 : जागृती सहकारी संस्था मर्या. मुंडीकोटा येथील ३ कोटी ३० लाख ७१ हजार ३२५ रूपयाची अफरातफर प्रकरणी तिरोडा पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीला दिड वर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने १ लाख रूपयाच्या जातमुचलक्यावर जामीन दिलेला आहे. हा जामीन १३ जून रोजी दिला आहे. (नागमोतीची जामीनावर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
संस्थाध्यक्ष नागमोती को हायकोर्ट से मिली जमानत | मामला करोड़ों रुपये की धोखाधड़ी का
संस्थाध्यक्ष नागमोती को हायकोर्ट से मिली जमानत | मामला करोड़ों रुपये की धोखाधड़ी का
गोंदिया, दि.18 : जिले की तिरोड़ा तहसील अंतर्गत मुंडीकोटा स्थित जागृती सहकारी पत संस्था में करोड़ों रु. की धोखाधड़ी प्रकरण में बंदी संस्थाध्यक्ष भाउराव नागमोती की नागपुर हायकोर्ट ने जमानत मंजूर की है. इस जमानत के लिए नागपुर के एड. डागा ने याचिका दाखिल की थी. इस पर सुनवाई कर न्यायमूर्ति अनिल किल्लोर ने 1 लाख रु. के मुचलके पर जमानत दे दी है. भाऊराव नागमोती उल्लेखनीय है कि जागृती सहकारी पत संस्था में…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
जागृती भ्रष्टाचार संघर्ष समितीचे आमदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
जागृती भ्रष्टाचार संघर्ष समितीचे आमदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
तिरोडा, दि.25 : जागृती सहकारी पतसंस्था मर्या. मुंडीकोटा येथे ठेवीदारांच्या कोट्यवधी रूपयांचा अपहार करण्यात आला. त्यामुळे हजारो लोकांची मोठी फसवणूक झाली. या प्रकरणात खातेदारांनी तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप ठेवीदारांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आज गुरुवार, 25 नोव्हेंबर रोजी जागृती भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या वतीने आमदार विजय रहांगडाले यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 July 2021 Time 7.10AM to 7.20AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १६ जुलै २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-त��ंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार.
·      पंतप्रधान पीक विमा योजनेला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ.
·      राज्यात पर्यटन विकासासाठी २५० कोटी रुपयांचा निधी तातडीनं वितरित करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश.
·      कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव नसलेल्या गावांमध्ये शाळा सुरू.
·      राज्यात आठ हजार १० नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यू तर २९४ बाधित.
आणि
·      यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे, २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल, आज जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता मंडळाच्या संबंधित संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल दिली. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. याबाबत माहिती देताना शिक्षण मंत्री गायकवाड म्हणाल्या –
दहावीच्या परीक्षेसंदर्भामधे आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे. आपण तो जो निकाल आहे तो दुपारी एक वाजता लावत आहोत. एकूण मुले जे आहेत ते आहेत नऊ लाख नऊ हजार ९३१ आणि या परीक्षेमधे मुलींची संख्या आहे सात लाख अठ्ठेचाळीस ६९३ अशी एकूण सोळा लाख अठ्ठावन हजार ६२४ मुलं या परीक्षेमधे मुलांनी सहभाग घेतला.
****
फलोत्पादन वाढीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या सूचनांवर, राज्य शासन सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये काल ‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’, या विषयावर झालेल्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतलं उत्कृष्ट वाण उपलब्ध करणं, फलोत्पादनवाढीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देणं, प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचं वैशिष्ट्यपूर्ण फळपिक विकसित करुन त्या��ी ओळख निर्माण करणं, वसंतदादा शुगर इन्स्ट्यिट्यूटच्या धर्तीवर फळपिकांच्या संशोधनासाठी स्वतंत्र संस्था उभी करुन, प्रत्येक जिल्ह्यात फळनिहाय शाखा निर्माण करणं, आदी सूचना शरद पवार यांनी या बैठकीत केल्या. राज्यात फलोत्पादन वाढ आणि फळनिर्यातीला मोठी संधी असून, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र फळपिक जिल्ह्याचं वैशिष्ट्यं म्हणून विकसित करता येईल, असं शरद पवार यांनी या प्रसंगी सूचवलं.
****
नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून केंद्रानं सुरु केलल्या पंतप्रधान पीक विमा योजनेला यंदाच्या खरीप हंगामात २३ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्रानं याबाबत पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचा काल शेवटचा दिवस होता. कोविड-19 ची परिस्थिती आणि शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन, ही मुदतवाढ करत असल्याचं भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त सुनिलकुमार यांनी आदेशात म्हटलं आहे.  
पिक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचं आहे, त्यांनी तात्काळ पिक विम्याची नोंदणी करावी, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलं आहे.
****
राज्यातल्या रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीनं पुढं येऊन रक्तदान करावं, असं आवाहन, अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे. स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणेतल्या सर्व घटक, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसिलदार, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेवून, नियमांचं पालन करुन रक्तदान शिबिरं आयोजित करावीत, असंही त्यांनी आपल्या आवाहनात म्हटलं आहे. वाढदिवस तसंच थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी आणि इतर तत्सम कार्यक्रमांच्या दिवशी रक्तदान शिबीरं आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. थॅलेसेमिया, कॅन्सर रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदात्यांनी पुढं यावं, असं त्यांनी नमूद केलं.
****
राज्यात पर्यटन विकासासाठी २५० कोटी रुपये निधी तातडीनं वितरित करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पर्यटन विकासाच्या प्रकल्पांचा आढावा, आणि पर्यटनवाढीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात, काल झालेल्या बैठकीत त्यांनी या संदर्भातल्या सूचना केल्या. राज्यातल्या पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या दहा जिल्ह्यांमध्ये, प्रायोगिक तत्वावर जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिल्याचंही, त्यांनी यावेळी सांगितलं. जिल्ह्यातल्या पर्यटन विकासात खाजगी संस्थांना सहभागी करुन घेण्यासाठी, जिल्ह्यांमध्ये पर्यटन संस्था स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. १९ जुलैपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. सुमारे दोन तास चाललेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या ग्रामीण भागात जिथं कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव नाही, अशा अनेक गावांमध्ये काल अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली. ज्या गावांमध्ये गेल्या एक महिन्यापासून एकही संसर्ग बाधित आढळलेला नाही अशा ठिकाणी, आखून दिलेल्या नियमांचं पालन करून, इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करायला, राज्य सरकारन परवानगी दिली होती. त्यानुसार मराठवाड्यात एक हजार ९०० शाळा सुरु झाल्या. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातल्या ५९५ गावांमधल्या, ८५२ शाळांचा समावेश आहे. मोठ्या खंडानंतर सुरु झाल्यानंतरही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची समाधानकारक उपस्थिती असल्याचं दिसून आलं.
दरम्यान, राज्यातल्या ग्रामीण भागात सरपंचाकडून ना हरकत प्रमाणपत्र अडवून ठेवल्यानं, खाजगी इंग्रजी माध्यमांच्या दोन हजार शाळा सुरू करण्यात आल्या नसल्याचा आरोप, औरंगाबाद इथल्या खाजगी इंग्रजी माध्यमांची संघटना, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन – ‘मेस्टा’ या संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी म्हटलं आहे.
****
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद - एआयसीटीईनं अभियांत्रिकी तसंच विविध व्यावसायिक तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग एक ऑक्टोबरपासून, तर नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग २५ ऑक्टोबरपासून सुरु होतील.
****
राज्यात काल आठ हजार १० नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६१ लाख ८९ हजार २५७ झाली आहे. काल १७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २६ हजार ५६० झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक चार दशांश टक्के झाला आहे. काल सात हजार ३९१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक १७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख सात हजार २०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल २९४ कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले मराठवाड्यात सर्वाधिक १४३ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ५१, औरंगाबाद ४८, लातूर ३२, परभणी १४, नांदेड तीन, जालना दोन, तर हिंगोली जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला.  
****
राज्यात इतर मागास वर्गाच्या स्थगित झालेल्या राजकीय आरक्षणासाठी, सर्व पक्षांनी एकत्र येत सार्वत्रिक नेतृत्व करुन आरक्षण टिकवलं पाहीजे, असं राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ��जबळ यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल मुंबईत या संबंधी विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यासाठीचं नेतृत्व फडणवीस यांनी जरी केलं तरी आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असंही भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.
****
यंदाच्या शैक्षणिक प्रवेश सत्रासाठी राज्यातल्या ४१७ शासकीय आणि ५४९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी, काल प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते या प्रक्रियेचा प्रारंभ झाला. यंदा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ९२ हजार, तर खाजगीमध्ये ४४ हजार, अशा एकूण एक लाख ३६ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. एकूण ९१ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असून, ८० अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण, तर अकरा अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण किंवा अणुत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा इथल्या डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा बँक परवाना, भारतीय रिझर्व्ह बँकेनं रद्द केला आहे. बँकेच्या बिकट वित्तीय परिस्थितीमुळे ही कारवाई करण्यात आली. बँकेतून पैसे काढणं, जमा करणं, कर्ज देणं आदी व्यवहारांवर या अंतर्गत निर्बंध आणल्याची माहिती, रिझर्व बँकेनं दिली आहे. सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे कुलसचिव यांनीही ही बँक बंद करून बँकेसाठी अधिकारी नेमण्याचे आदेश जारी केले आहेत.
****
औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, महापालिका आणि उद्योगांच्या संघटनांतर्फे, काल औरंगाबाद शहरातल्या विविध भागात कोविड लसीकरण जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, उद्योजक मानसिंग पवार आणि जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फेरीची सुरुवात झाली. वाहनांवर चित्रफित आणि लोकगीत सादर करून यावेळी जनजागृती करण्यात आली, तसंच दुकानदारांच्या भेटी घेऊन लसीकरणाचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं. ज्या व्यापाऱ्यांचं लसीकरण झालं आहे, त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं. नागरिक तसंच भाजी आणि फळ विक्रेत्यांना या प्रसंगी मास्कचं वाटप करण्यात आलं.
****
राज्य शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाअंतर्गत येणाऱ्या, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला, आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं नांदेड इथं भूजल पुनर्भरण माहिती घडीपत्रिका आणि भिंतीपत्रिकेचं विमोचन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते काल झालं. विविध संवर्गातल्या भूजल वापर��र्त्यामध्ये भूजलाबद्दल जाणीव जागृती होण्याच्या दृष्टीनं, जिल्ह्यात सुमारे ११ वेबिनार घेण्यात आले असून, हे यापुढेही चालू ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती, भूजल विकास यंत्रणेकडून देण्यात आली.
दरम्यान, संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्हा कार्यालयाच्यावतीनं काल रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं.
****
पर्यावरणपूरक इमारतींच्या रचनांवर अधिक भर देऊन हरीत इमारतीची संकल्पना वृद्धींगत करण्यावर भर दिला पाहिजे, असं मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पांच्या विकास कामांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. भोकर इथं उभारण्यात येणारं शंभर खाटांचं रुग्णालय निसर्गपूरक करण्यावर भर द्यावा, असं त्यांनी यावेळी सांगितलं. नारवट इथल्या बांबू प्रकल्पाचा देखील त्यांनी आढावा घेतला. इमारतीच्या वास्तुस्थापत्यामध्ये कोणत्याही त्रुटी असू नये, याबाबत प्रत्येक विभाग प्रमुखांनी दक्षता घेण्याच्या सूचना, चव्हाण यांनी दिल्या.
****
नांदेड शहरालगतच्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे सर्व दरवाजे काल सायंकाळी बंद करण्यात आले. हे दरवाजे बंद केल्यामुळे गोदावरी नदी पात्रातील पुराचे पाणी ओसरत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड इथं जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल इंधन दरवाढ विरोधात जुना मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी तसंच सायकल मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार अमरनाथ राजूरकर, माजी राज्यमंत्री डी पी सावंत, माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
****
हवामान
राज्यात आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात बर्याच ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 April 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.
****
** पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचं वार्षिक मूल्यमापन न करता उत्तीर्ण करण्याचा राज्यसरकारचा निर्णय
** कोरोना वि��ाणू संसर्ग रोखण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं वृत्तपत्र संपादक, मालक, मराठी नाट्य निर्माता, चित्रपटगृह चालक तसंच व्यायाम शाळांच्या मालक, संचालकांना आवाहन
** कोविड संसर्ग साखळी तोडण्यासाठी तपासण्यांची व्याप्ती वाढवण्याची केंद्र सरकारची राज्यांना सूचना
** राज्यात ४९ हजार ४४७ नवे कोविड रुग्ण, मराठवाड्यात ८२ रुग्णांचा मृत्यू तर ५ हजार ३७६ बाधित
** औरंगाबाद जिल्ह्यात रात्रीच्या संचारबंदीत ���० एप्रिलपर्यंत वाढ
आणि
** काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एन. एम. कांबळे आणि माजी राज्यमंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांचं निधन
****
राज्यात पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना २०२०-२१ या चालू शैक्षणिक वर्षात वर्गोन्नती देण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. सर्व विद्यार्थ्यांचं वार्षिक मूल्यमापन न करता त्यांना उत्तीर्ण केलं जाणार आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं हा निर्णय घेतला आहे. त्या म्हणाल्या....  
राज्यामधले जे विद्यार्थी आहेत जे पहिली ते आठवीचे विद्यार्थी आहेत. शिक्षण हक्क अधिकारांच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट जे आहे, त्यांना पास करुन त्यांना पुढच्या वर्गामध्ये पाठवण्या संदर्भामधला निर्णय हा शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही आज घेत आहोत. आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की, आपण विविध मार्गातून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न या मधल्या काळामध्ये करण्याचं काम केलं. परंतु पहिले ते आठवीचे विद्यार्थी आहेत त्यांची वर्गोन्नती करण्याचा आ‍पण या ठिकाणी निर्णय घेतला आहे.
 इयत्ता ९ वी तसंच ११ वीच्या विद्यार्थ्यांबाबतही लवकरच असा निर्णय घेण्याचे संकेत गायकवाड यांनी दिले. विद्यार्थ्याना वर्गोन्नती देत असताना त्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे मार्फत निर्गमित करण्यात येतील, असं गायकवाड यांनी सांगितलं.
****
दरम्यान, या आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कुठलीही कपात न करण्याचा निर्णय, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतला आहे. गेल्या वर्षी अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आलेल्या प्रकरणांचा तसंच विषयांचा नव्या वर्षात समावेश करण्यात आला आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्षात या इयत्तांचा ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला होता.
****
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वृत्तपत्रांचे संपादक, मालक, वितरक, मराठी नाट्य निर्माता, आणि मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह चालक संघटनेचे प्रतिनिधी तसंच राज्यातल्या व्यायाम शाळांचे मालक, संचालक यांच्याशी दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला. कोविड विषाणू विरुद्धची लढाई एकट्या सरकारची नाही, सरकार करत असलेल्या प्रयत्नांना सर्वांनी राजकारण न करता, साथ दिली पाहिजे, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कोरोनाशी लढताना राज्यात भीतीचं वातावरण नसावं, एकमेकांची योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने समाजात जागृती व्हावी, आणि या कामी माध्यमांनी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. सरकारला टाळेबंदी करणं आवडत नाही. कुणाच��ही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही, मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवं आव्हान उभं राहिल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. राज्याच्या हिताचा म्हणून जो निर्णय घ्यावा लागेल, त्यामध्ये व्यायामशाळा-जिम चालकांनी सर्व शक्तीनिशी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. चित्रपटगृह चालक-मालक संघटनेलाही मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं.
****
टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनता, हातावरचे पोट असणारे गोरगरीब, कष्टकरी, बारा बलुतेदार, छोटे उद्योजक यांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने प्रथम व्यवस्था उभी करावी मगच टाळेबंदीचा विचार करावा, असं भारतीय जनता पक्षाने म्हटलं आहे. पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काल पत्रकार परिषदेत पक्षाची ही भूमिका मांडली. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आपण कोरोनाच्या संकटात सरकारला साथ देऊ, मात्र सरकारने सामान्य जनतेचा पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा, असं उपाध्ये यांनी नमूद केलं. राज्यातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, कोरोना चाचणी सुविधा मोफत उपलब्ध करुन द्यावी आणि कोविडवर शासकीय तसंच खाजगी रुग्णालयात मोफत उपचार करावेत, अशी मागणीही उपाध्ये यांनी केली.
****
कोविड संसर्ग साखळी तोडण्यासाठी तपासण्यांची व्याप्ती वाढवणं तसंच प्रतिबंधित क्षेत्र निर्माण करण्याची सूचना केंद्र सरकारने ११ राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. यामध्ये महाराष्ट्रासह पंजाब, कर्नाटक, दिल्ली, हरियाणा आणि छत्तीसगढ या राज्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक तसंच आरोग्य सचिवांची उच्चस्तरीय बैठक घेऊन, कोविड प्रतिबंधासाठी तत्काळ प्रभावी उपाययोजना करण्याचे तसंच मार्गदर्शक सूचनांचं कठोर पालन करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, आरोग्य कर्मचारी आणि कोरोना काळात आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता  नसल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. काही अपात्र लाभार्थी लसीकरणासाठी या श्रेणीतून नोंदणी करत असल्याचं आढळून आलं आहे, यामुळे  नियमांचं उल्लंघन होत असल्याचं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
राज्यात काल ४९ हजार ४४७ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २९ लाख ५३ हजार ५२३ झाली आहे. काल २७७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५५ हजार ६५६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८८ शतांश टक्के झाला आहे. काल ३७ हजार ८२१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २४ लाख ९५ हजार ३१५ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८४ पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात चार लाख एक हजार १७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या ५ हजार ३७६ ��ोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८२ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २१, नांदेड जिल्ह्यातल्या २६, जालना आठ, तर परभणी जिल्ह्यातल्या सहा रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल १ हजार ३९५ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार २०७, लातूर ६९२, जालना ५६५, परभणी ५२७, बीड ४३४, उस्मानाबाद ३४३, तर हिंगोली जिल्ह्यात २१३ रुग्ण आढळून आले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात रात्रीच्या संचारबंदीची वेळ वाढवण्यात आली आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत रात्री आठ वाजेपासून सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी असेल. याबरोबरच दर शनिवा�� आणि रविवारचा सप्ताहांत टाळेबंदीही ३० एप्रिलपर्यंत कायम असेल.
काल जिल्ह्यातील सप्ताहांत टाळेबंदीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. शहरातली बहुतांश दुकानं बंद दिसून आली. रस्त्यावर वाहतुकही तुरळक स्वरुपात होती. जिल्ह्यात आजही पूर्ण टाळेबंदी लागू राहणार आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल खुलताबाद आणि फुलंब्री तालुक्यात प्रत्यक्ष भेट देऊन अधिकारी, नागरिकांशी संवाद साधला. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात, लसीकरणावर अधिक भर द्यावा, अशा सूचना त्यांनी प्रशासकीय तसंच वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या.
****
जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यानं काही गावं स्वयंस्फूर्तीनं बंद पाळत आहेत. भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगी गावात दोन दिवसांची जनता संचारबंदी पाळण्यात येत असल्यानं काल रस्त्यांवर, बाजारात शुकशुकाट दिसून आला. घनसावंगी तालुक्यातल्या वालसावंगी इथं दोन दिवसांपासून पुकारण्यात आलेल्या बंदला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करत सैलानी बाबा यात्रा उत्सव भरवल्या प्रकरणी १ हजार ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैलानी इथं भरणारी हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा दरगाह परिसरात भरणारी यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र, परवा २ एप्रिलला संध्याकाळी, संदल मिरवणुकीच्या वेळी अचानक, हजारो भाविक या भागात जमा झाले. हा जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. नियंमांचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिली.
****
पुण्यात बंदच्या दरम्यान बससेवा चालू ठेवण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. वाढत्या कोविड संसर्गामुळे पुण्यात आठवडाभरासाठी सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे
****
ख्रिस्ती धर्मियांचा येशूच्या पुनरुत्थानाचा सण ईस्टर संडे आज साजरा होत आहे. यानिमित्त राज्यपा�� भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या कठीण काळात येशू ख्रिस्तांचा मानवता, प्रेम, दया, क्षमा आणि त्यागाचा संदेश सर्वांकरताच मार्गदर्शक असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एन. एम. कांबळे यांचं काल मुंबई इथं निधन झालं. ते शंभर वर्षांचे होते. मूळ साताऱ्याचे कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं होतं. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खाती सांभाळली आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे दोन वेळा अध्यक्ष, तसंच १९५७-६२ दरम्यान ते मुंबईचे महापौर होते.
****
राज्याचे माजी राज्यमंत्री तथा नांदेडचे माजी खासदार गंगाधरराव कुंटुरकर यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. कुंटूरच्या सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणारे कुंटुरकर यांनी, बिलोली पंचायत समितीचे सभापती तसंच नांदेड जिल्हा परिषदेचे दीर्घकाळ अध्यक्षपद भुषवलं होतं. दोन वेळी आमदार तर एकदा खासदारपदी निवडून गेलेले कुंटुरकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही काम केलं होतं. काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी अनेक वर्ष सांभाळल्यावर, राष्ट्रवादी पक्षातही त्यांनी अनेक वर्ष काम केलं. गेल्या दीड वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. नायगाव तालुक्यातल्या जय अंबिका साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, राज्य सहकारी बँकेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं. कुंटुरकर यांच्या निधनानं, ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेला नेता हरपला, अशा शब्दात, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण आणि, माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
****
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचं काल नाशिक इथं कोविड संसर्गामुळे निधन झालं. देशपांडे यांनी विमा कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून सुमारे पाच दशकं भरीव कार्य केलं आहे. देशपांडे यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या कामाला प्रत्यक्ष १५ मार्चपासून सुरवात झाली आहे. या ५४ किलोमीटरच्या मार्गातील सर्वेक्षण पूर्ण झालं असून, ज्या ठिकाणी रेखांकन पूर्ण झालेलं आहे, अशा ठिकाणी भूसंपादन केलं जात असल्याचं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं. किती गावातल्या किती नागरिकांच्या जमिनी संपादित केल्या जाणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. या रेल्वे मार्गासाठी ��हिल्या टप्प्यात २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब शहरात बनावट नोटा बाजारात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. असरफ अली असं या इसमाचं नाव असून, पोलिसांनी सापळा रचून राहत्या घरातून त्याला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली असता. कचऱ्याच्या डब्यात पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या तीन तर दोनशे रुपये दर्शनी मूल्याच्या पाच बनावट नोटा आढळल्या. या आरोपीला काल न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
//**********//
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 October 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक -१९ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि. ****  विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस  पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांच्या सभांना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद  भाजपकडून प्रचार मोहिमांमध्ये अडथळे निर्माण केले जात असल्याचा कॉंग्रेसचा आरोप  माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून बारा तास चौकशी आणि  औरंगाबाद जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस; पिकांचं नुकसान **** विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराची मुदत आज सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. जाहीर प्रचारासाठी आजचा शेवटचा दिवस असल्यानं, सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी आणि उमेदवारांचा अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. प्रचार सभा, प्रचार फेऱ्या, कोपरा बैठकांसह पदयात्रांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर सभा झाली. महाराष्ट्रात गेल्या जवळपास पाच दशकांत आपल्या पदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. बहुतांशी सरकारी कामं ऑनलाईन झाल्यामुळे भ्रष्टाचार कमी होत असल्याचं ते म्हणाले. आपल्या सरकारनं केलेल्या विकास कामांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. नवभारतासोबत नव महाराष्ट्र, दुष्काळमुक्त महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प केला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तर, महायुतीसमोर कोणीही राजकीय विरोधक नसल्याचं सांगत, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमधला विचार संपून आता विकार उरला असल्याची टीका केली. **** केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल गडचिरोली जिल्ह्यात आल्लापल्ली इथं भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली. गडचिरोली जिल्हा येत्या पाच वर्षांत नक्षलमुक्त करण्यात येईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. शहा यांची यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथंही सभा झाली. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची काल बीड जिल्ह्यात केज - परळी मतदारसंघात अंबाजोगाई इथं सभा झाली. या परिसरात नवीन कारखाने येण्याची गरज असून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणं आवश्यक असल्याचं, पवार यावेळी म्हणाले. पवार यांनी काल पंढरपूर तसंच सातारा इथंही सभा झाली. सातारा इथं पडत्या पावसात पवार यांनी सभेला संबोधित केलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवाराची निवड करताना चूक झाल्याचं पवार म्हणाले. **** काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल सांगली इथं प्रचारसभा घेतली. जात, धर्म, मंदिर आणि मशीद यांची चर्चा करण्याऐवजी बेरोजगारांना रोजगार मिळवून देणं महत्त्वाचं असल्याचं शिंदे म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काल उमरगा इथं प्रचार सभेला संबोधित केलं. देशभरात पायाभूत सुविधा आणि माहिती तंत्रज्ञानाचं जाळं काँग्रेसच्या कार्यकाळात विकसित झाल्याचं, खरगे म्हणाले. **** काँग्रेस आणि रा��्ट्रवादी काँग्रेस पक्षानं खऱ्या अर्थानं आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेश करण्याची वेळ आली नसती, असं भाजपचे ज्येष्ठ नेते उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात राशीन इथं महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. परळी इथंही उदयनराजे यांनी सभा घेतली. **** महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यातल्या कोथरुड इथं प्रचारसभेला संबोधित केलं. कोथरुडमध्ये महायुतीकडून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यावरुन ठाकरे यांनी, कोथरुडमध्ये बाहेरचा उमेदवार लादला, अशी टीका केली. मनसेला विरोधी पक्ष बनवण्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. **** दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल नागपूर इथं सभा घेतली. वीज पुरवठ्याबाबत दिल्ली सरकारला जमलं ते महाराष्ट्र सरकारला का जमलं नाही, असा प्रश्न त्यांनी केला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यातल्या भोर इथं प्रचारसभेला संबोधित केलं. शिवसेनेला संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, असं ते म्हणाले. **** भारतीय जनता पक्ष हा आपल्या नेत्यांच्या प्रचार मोहिमांमधे अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षानं केला आहे. काँग्रेस आघाडीच्या नेत्यांचे निवडणूक प्रचार दौरे, हवाई मार्गांमधे तांत्रिक अडचणी निर्माण केल्या जात आहेत असं पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्यांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना हवाई मार्गाने प्रवासाची परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुंबईत सक्तवसुली संचालनालय ईडीने जवळपास बारा तास चौकशी केली. कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या कथित व्यवहाराप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. दरम्यान, एअर इंडीया ही विमान कंपनी डबघाईला आणल्याप्रकरणी, तसंच पंजाब - महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणीही पटेल यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणावरून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रमेश कदम यांच्या ठाणे इथल्या एका सदनिकेतून पोलिसांनी काल त्रेपन्न लाख रुपये जप्त केले. वैद्यकीय तपासणीनंतर कारागृहात परत जाताना कदम यांनी, पोलिस पथकाला एका मित्राला भेटण्यासाठी घरी घेऊन जाण्याची विनंती केली, या मित्राजवळून पोलिसांनी ही रक्कम जप्त करत, त्या मित्रालाही ताब्यात घेतलं. या प्रकरणी संबंधित पोलिस पथकावर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या रमेश कदम यांना शेवटच्या टप्प्यात ���्रचार आणि मतदानासाठी जामीन किंवा रजा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. **** निवडणूक प्रचाराच्या काल अखेरच्या सायंकाळी मराठवाड्यात बहुतांशी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार सभा, बैठका आणि पदयात्रांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर- सेलू मतदार संघातल्या भाजपच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ बोरी इथं भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांची सभा झाली. भाजपनं केलेल्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी यावेळी विरोधी पक्षांवर टीका केली. हिंगोली विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसीम अहेमद देशमुख आणि वसमत विधानसभेचे उमेदवार मुनीर पटेल या दोन उमेदवारांनी अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादुल मुसलिमिन - एमआयएमनं आपला पाठिंबा जाहीर केला आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यात शहरातल्या तीन आणि ग्रामीण भागातल्या सहा मतदारसंघातले उमेदवार प्रचाराची मुदत संपण्यापूर्वी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पदयात्रा, कोपरा बैठका घेत आहेत. एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादमधील तिनही मतदार संघांत मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या, तसंच प्रचार सभांना संबोधित केलं. सिल्लोड मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांनी जाहीर सभा घेतली. औरंगाबाद पूर्वचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी ठिकठिकाणी कोपरा सभा घेतल्या. मराठवाडा विकास सेनेचे संस्थापक सुभाष पाटील यांनी औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे अपक्ष उमेदवार राजू शिंदे आणि औरंगाबाद पूर्व मतदारसंघातले महायुतीचे उमदेवार अतुल सावे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. लातूर जिल्ह्यातल्या शिरुर अनंतपाळ इथं महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला अरविंद पाटील यांनी संबोधित केलं. काँग्रेसनं ५५ वर्षांच्या काळात केलेला विकास आणि भाजपनं गेल्या पाच वर्षात केलेला विकास, यावर खुली चर्चा करावी, असं आव्हान त्यांनी यावेळी दिलं. केंद्रीय मंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही काल लातूर आणि शिरुर अनंतपाळ इथं जाहीर सभा घेतल्या. **** औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड, सिल्लोड, सोयगाव आणि खुलताबाद परिसरात काल मध्यमस्वरुपाचा पाऊस झाला. या पावसाचा शेतात उभ्या कपाशीला फटका बसला, तर काढणी झालेल्या मका, सोयाबीन तसंच बाजरीचंही नुकसान झाल्याचं वृत्त आहे. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. लातूर शहरातही विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याचं वृत्त आहे.. **** निवडणुकीत मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी राबवल्या जात असलेल्या मतदार जनजागृती अभियानाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नांदेड शहरात मतदार जागृती अभियानांतर्गत `मी मतदान करणार` अशी स्वाक्षरी मोहिम सुरू करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्यावतीनं नांदेड शहरात मतदान जनजागृतीसाठी पदयात्राही काढण्यात आली. **** हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनु��ी तालुक्यातमधे हिवरा पाटी तपासणी नाक्यावर स्थिर तपासणी पथकानं एक लाख पासष्ट हजार रूपये किंमतीचा अवैध मद्याचा साठा जप्त केला. हा मद्यसाठा एका खाजगी वाहनातून नांदेडहून कळमनुरीकडे नेला जात होता. **** जालना विशेष कृती दलाच्या पथकानं औरंगाबाद-बीड मार्गावरच्या बारसवाडा फाट्याजवळ सापळा लावून एका ट्रकमधून ३७ लाख ८० हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. काल सकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी ट्रकसह एकूण ६२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ट्रक चालकाला ताब्यात घेतलं. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date –18 October 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १८ ऑक्टोबर २०१९ दुपारी १.०० वा. **** राज्यात एकवीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावं या करता जनजागृतीपर विविध उपक्रम ��ाबवण्यात येत आहेत. राज्यात एकूण आठ कोटी अठ्ठ्यान्नव लाख एकोणचाळीस हजार सहाशे मतदार आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. **** भाजप अध्यक्ष अमित शाह आज जालना इथं विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेणार आहेत. शाह यांच्या आज गडचिरोली, यवतमाळ इथंही प्रचारसभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत प्रचारसभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी त्याच बरोबर काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे तसंच मल्लीकार्जून खरगे, आनंद शर्मा आदींच्याही राज्यात ठिकठिकाणी प्रचारसभा नियोजित आहेत. **** भारतीय जनता पक्ष हा आपल्या नेत्यांच्या प्रचार मोहीमांमधे आडथळे निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षानं केला आहे. काँग्रस नेत्यांचे निवडणूक प्रचार दौरे, हवाई मार्गांमधे तांत्रिक अडचणी निर्माण केल्या जात आहेत असं पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे काल पासून सोलापुरमधे अडकून पडले असून, मोदींच्या नियोजित दौ-यांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना हवाई मार्गाची सेवा नाकारण्यात आल्याचा दावाही काँग्रेसचे प्रवक्ते सावंत यांनी केला आहे. **** सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश रंजन गोगोई यांनी न्यायमुर्ती एस ए बोबडे यांची सरऩ्यायाधीश म्हणुन नियुक्ती करावी, अशी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. त्यासंदर्भातलं एक पत्र काल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी कायदा आणि न्याय मंत्रालयाला पाठवलं आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे येत्या सतरा नोव्हेंबरला निवृत होतील. **** भारत जगात सर्वाधिक वेगानं विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेत असून याला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या आर्थिक विकासाच्या दरात घट झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे पण देशाची अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत असल्याचं अर्थमंत्री वाशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. भारत आणि चीनचा आर्थिक विकास दर सहा पूर्णांक एक दशांश टक्के राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं नुकतेच प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात व्यक्त केला असल्याचं त्यांनी सांगितलं. जगातील सर्व अर्थव्यवस्थांमध्ये विकासदरात घट होईल असा अंदाज नाणेनिधीनं व्यक्त केला असल्याचंही अर्थमंत्री सितारामन यावेळी म्हणाल्या. **** पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेधारकांना रिझर्व बॅंकेने घातलेली ठराविक रक्कम काढण्याची अट रद्द करावी, यासाठी खातेधारकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनवाईला सर्वोच्च न्यायलयानं नकार दिला असून यासंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं आज या संदर्भातील निर्देश जारी केले आहेत. दरम्यान, सरकार या प्रकरणी गंभीर असून, सक्तवसुली संचालनालय गुन्हेगारांविरोधात योग्य ती कारवाई करेल असं सॉलीसीटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटलं आहे **** राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुंबईत सक्तवसुली संचालनालयातर्फे चौकशी सुरू आहे. सक्तवसुली संचालनालयानं पटेल यांना चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात काल नोटीस बजावली होती. कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्यासह कथित व्यवहाराप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. **** नांदेड शहरात मतदार जागृती अभियानांतर्गत `मी मतदान करणार` अशी स्वाक्षरी मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आला. नांदेड शहरात मतदार जागृती अभियान अंतर्गत वीस जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यातल��या अधिकाधिक समाजसेवी संस्थानी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केलं आहे. **** हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातमधे हिवरा पाटी तपासणी नाक्यावर स्थिर तपासणी पथकानं एक लाख पासष्ट हजार रूपये किमतीची अवैध दारू जप्त केली आहे. सदर दारू साठा एका खाजगी वाहनातून नांदेडहून कळमनुरीकडे आणली जात होती. अवैध मद्याची पंचावन्न खोकी यावेळी ताब्यात घेण्यात आली असून पुढील कारवाई सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 April 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ एप्रिल २०१९ सकाळी ७.१० मि. ****  गरीब कुटुंबांना किमान उत्पन्न आणि रोजगाराची हमी; स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडण्याचं काँग्रेस पक्षाचं जाहीरनाम्यात आश्वासन तर देशासाठी धोकादायक जाहीरनामा असल्याची भारतीय जनता पक्षाची टीका  लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी; उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात आणि  लातूर जिल्ह्यात आचारसंहितेची भिती दाखवून सराफा व्यापाऱ्याला लुटणारे चार पोलिस बडतर्फ **** गरीब कुटुंबांना किमान उत्पन्नाची हमी आणि रोजगार उपलब्ध करून देण्याचं तसंच स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडण्याचं आश्वासन काँग्रेस पक्षानं काल जारी केलेल्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलं आहे. नवी दिल्लीत झालेल्या जाहीर सभेत बोलतांना पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी किमान उत्पन्न हमी योजनेअंतर्गत देशातल्या पाच कोटी गरीब कुटुंबियांना वार्षिक ७२ हजार रूपये, दरमहा सहा हजार रूपयांच्या स्वरूपात त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील, असं सांगितलं. रोजगाराच्या मुद्यावर बोलतांना त्यांनी २०२० पर्यंत २२ लाख रिक्त पदं भरण्याचं तर ग्राम पंचायतींमध्ये दहा लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. तसंच तीन वर्षांपर्यंत देशातल्या तरूणांना आपला उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नसेल असं सांगितलं. शेतकऱ्यांची चिंता दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद केली जाईल, शेतकरी कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्यास त्याला गुन्हेगार न ठरवता हा दिवाणी गुन्हा मानला जाईल, याशिवाय महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचं आश्वासनही पक्षानं जाहीरनाम्यात दिलं आहे. दरम्यान, काँग्रेसनं जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं ही धोकादायक असून यामुळं देशाचं विभाजन होईल अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षानं व्यक्त केली आहे. पक्षाचे जेष्ठ नेते अरूण जेटली यांनी या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया देतांना वास्तव स्वरूपात अंमलबजावणी न होणारा जाहीरनामा असल्याचं म्हटल आहे. राष्ट्रद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं आश्वासन देऊन, काँग्रेसला एकही मत मिळवण्याचा अधिकार नाही, असं ते म्हणाले. काँग्रेस पक्षानं, ते सत्तेत असलेल्या राज्यांमध्ये प्रतिकात्मक रुपातही शेतकरी कर्जमाफी केलेली नाही, अशी टीका जेटली यांनी केली. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यातल्या गोंदिया जिल्ह्यात जाहीर सभा घेणार आहेत. याशिवाय पश्चिम बंगाल आणि ओडिसातही ते प्रचार सभा घेणार आहेत. **** निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. या चौथ्या टप्प्यात राज्यातल्या उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, वायव्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, भिवंडी, कल्याण, ठाणे, पालघर, नाशिक, दिंडोरी, मावळ, शिरुर, शिर्डी, धुळे, आणि नंदुरबार या सतरा मतदार संघात, येत्या २९ एप्रिलला मतदान होणार आहे. या मतदार संघातल्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेण्यास सुरुवात केली असून, येत्या नऊ तारखेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. या अर्जांची छाननी दहा एप्रिलला होणार असून, बारा एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दरम्यान, नाशिक लोकसभा ��तदार संघात काल पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल झाला तर नाशिक आणि दिंडोरी मतदार संघातून एकूण ४१ अर्ज नेण्यात आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पालघर लोकसभा मतदार संघात काल १३ जणांनी ३६ अर्ज घेतले. मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. **** तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपत आहे. या तिसऱ्या टप्प्यासाठी काल अनेक मतदार संघात, विविध पक्षांच्या दिग्गज उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सातारा लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी, अहमदनगर लोकसभा मतदार संघातून आमदार संग्राम जगताप यांनी, रावेर लोकसभा मतदारसंघात डॉ. उल्हास पाटील तसंच शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे यांनी काल नामनिर्देशनपत्र दाखल केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काल वंचित बहुजन आघाडीचे मारुती जोशी तसंच अखिल भारत हिंदू महासभेचे अजिंक्य गावडे या दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रं दाखल केली. औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी काल बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पक्षाचे अरविंद कांबळे यांच्या सह चार अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जालना लोकसभा मतदार संघातून शिवसेना भाजप युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनीही काल उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर महायुतिचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, शहरातून महायुतिच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत काढलेल्या प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतर दानवे यांच्या झालेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी काँग्रेसचा जाहीरनामावर टीका केली. वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर शरच्चंद्र वानखेडे यांनीही शहरातून प्रचार फेरी काढली. आकाशवाणी बातम्यासाठी, बाबासाहेब म्हस्के, जालना. या सभेत, जालन्याचे उपनगराध्यक्ष तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. **** शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना, आचारसंहिता भंग प्रकरणी मुंबईच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. सामना या शिवसेनेनच्या मुखपत्रातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांच्याबाबत, राऊत ���ांनी एका लेखातून केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत, ही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी राऊत यांना आज बुधवारपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. **** कोणावर वैयक्तिक टिका करणं ही आमची संस्कृती नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वैयक्तिक टिका करतात, असं राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटल आहे. कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या एका बैठकीत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी वर्धा इथं झालेल्या जाहीर सभेत पवार आणि गांधी घराण्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. मोदी यांनी या सभेत काही नवीन घोषणा जाहीर करणं अपेक्षित होतं मात्र तसं न करता त्यांनी वैयक्तिक टीका केली, असं ते म्हणाले. **** हे बात���ीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** आचारसंहितेची भिती दाखवून एका सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चार पोलिसांना बडतर्फ करण्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या उदगीर पोलिस ठाण्यात घडली आहे. याबाबतची माहिती काल अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी दिली. श्रीहरी डावरगावे, श्याम बडे, महेश खेळगे आणि रमेश बिरले अशी या चौघा पोलिसांची नावं आहेत. या चौघा पोलिसांनी गेल्या २९ मार्चच्या रात्री एका सराफा व्यापाऱ्याला, आचारसंहितेचा बडगा दाखवून चार तास डांबून ठेवलं, तसंच त्याच्याकडच्या सहा लाख रुपयांपैकी दीड लाख रुपये काढून घेतले असा आरोप होता. चौकशीअंती हे चौघे दोषी आढळल्यानं, त्यांच्यावर कारवाई केल्याचं, जाधव यांनी सांगितलं. **** राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या युवकांना अठराव्या वर्षी निवडणूक लढवता आली पाहिजे, असं मत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी काल औरंगाबाद इथं ‘आदित्य युवा संवाद’ या कार्यक्रमाद्वारे युवकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ‘केजी टू पीजी’ शिक्षणाच्या अभ्यासक्रमात सतत सुधारणा होणे गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी युवक - युवतींनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं आदित्य ठाकरे यांनी दिली. **** अहमदनगर जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराजे गाडे यांचं काल पहाटे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते ५४ वर्षांचे होते. गाडे यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी बारागाव नांदूर या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती असलेले गाडे यांनी मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेचे अध्यक्ष, राहुरी कारखान्याचे उपाध्यक्ष, आदी पदांची जबाबदारीही सांभाळली होती. **** परभणी शहरातील बालाजी मंदिराचे महंत रघूनाथदासजी वैष्णव बाबाजी यांचं काल पहाटे निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. हजारों भाविकांच्या उपस्थितीत काल दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. **** जळगाव जिल्ह्यात पाचोरा इथं खाजगी वाहनातून पाच लाख पंचेचाळीस हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहे. **** लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबईत ‘महा मतदार जागृती अभियान’चा प्रारंभ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्या हस्ते काल झाला. यावेळी कुमार यांच्या हस्ते मतदार जागृती अभियान वाहनाला झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. हवेमध्ये फुगे सोडून मतदार जागृती अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचा संदेश दिला गेला. पुणे, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जळगाव, धुळे आणि कल्याण मतदार संघामध्ये येत्या २८ एप्रिलपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे. **** मुंबईतले शिवसेनेचे नगरसेवक शरद पवार यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. शरद पवार हे शिवसेनेकडून तीन वेळा मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. **** यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सखी मतदान केंद्र उभारण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदान केंद्रांवर मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांपासून ते सुरक्षा रक्षकापर्यंत सर्व जबाबदाऱ्या महिलांकडे असेल. यानुसार उस्मानाबाद इथले चार तर वाशिम जिल्ह्यातले सहा मतदान केंद्र, सखी मतदान केंद्रं असणार आहेत. **** लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं, बीड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक अशोक एम. शर्मा यांनी म्हटलं आहे. काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात, सुक्ष्म निरीक्षकांच्या बैठकीत ते बोलत होते. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 April 2018 Time 6.50AM to 7.00AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ एप्रिल २०१८ सकाळी ६.५० मि. ****  ग्रामीण महाराष्ट्र उघड्यावर शौचापासून शंभर टक्के मुक्त; बांधलेली शौचालयं वापरण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ  कठुआ लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या पीडित बालिकेची ओळख उघड करणाऱ्या वृत्तसंस्थांना, दहा लाख रुपयांचा दंड  नांदेड, बीड आणि परभणी जिल्ह्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज विविध राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचं भूमीपूजन आणि  औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी उदय चौधरी यांची नियुक्ती, सुनिल चव्हाण यांची बदली रद्द ***** राज्याचा ग्रामीण भाग उघड्यावर शौचापासून शंभर टक्के मुक्त झाल्याची घोषणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह, अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. २०१२ पर्यंत पन्नास टक्के ग्रामीण भागात शौचालयं नव्हती, असं एका पाहणीतून स्पष्ट झालं होतं. २०१४ पासून आतापर्यंत राज्यात, ६० लाख, ४१ हजार १३८ वैयक्तिक, आणि सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आल्याची माहिती, मुख्यमंत्र्यांनी दिली. उघड्यावर शौचमुक्त योजनेचा पहिला टप्पा राज्यानं पूर्ण केला असून, या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला कालपासून प्रारंभ झ��ला. बांधलेली शौचालयं वापरण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणं, हा या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. **** कठुआ लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आठ वर्षीय पीडित बालिकेची ओळख उघड करणाऱ्या वृत्तसंस्थांना, दिल्ली उच्च न्यायालयानं, दहा लाख रुपये दंड ठोठावला आहे. पीडितेची ओळख उघड केल्याबद्दल, या वृत्तसंस्थांनी न्यायालयाची माफी मागितली. या वृत्तसंस्थांनी, एका आठवड्याच्या आत, जम्मू काश्मीरच्या पीडित भरपाई निधीमध्ये, प्रत्येकी दहा लाख रुपये जमा करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमधल्या, पीडित व्यक्तींची ओळख जाहीर करण्यावर प्रतिबंध घालणाऱ्या कायद्याबाबत, व्यापक जागृती करण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. **** नवीन जालना इथल्या सिडकोच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल तत्वत: मान्यता दिली. पाणी उपलब्धता आणि अन्य अनुषंगिक सुविधा, आणि प्रकल्प विकसित झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरण याबाबत, सविस्तर अभ्यास करून पुन्हा अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. काल मुंबईत या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रस्तावित जालना सिडको प्रकल्प हा मौजे खरपुडी गावात होणार आहे. सिडकोची नियुक्ती ही विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून करण्यात आली आहे. **** १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी ताहि�� मर्चंट, याचा काल पहाटे पुण्यात ससून रुग्णालयात मृत्यू झाला. बॉम्बस्फोटप्रकरणी पुण्यातल्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ताहीर याला, मंगळवारी मध्यरात्रीनंतर छातीत दुखत असल्यानं, ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यानंतर ह्रदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाला. मार्च १९९३च्या स्फोटानंतर भारत सोडून पळालेल्या ताहीर मर्चंट उर्फ, ताहीर टकल्याला, २०१० मध्ये अबुधाबीतून अटक करण्यात आली होती. विशेष टाडा न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्याच्या फाशीला स्थगिती दिली होती. **** २०१७ मध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांनी, खर्चाचा हिशोब विहित कालावधीमध्ये सादर न केल्यामुळे, एकूण २११ उमेदवारांना, पाच वर्षांकरता उक्त सदस्य म्हणून राहण्यास, किंवा निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आल्याचं, हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं आहे. त्यात हिंगोली तालुक्यातल्या ६७, कळमनुरी तालुक्यातल्या ५२, सेनगाव तालुक्यातल्या १४, औंढा नागनाथ तालुक्यातल्या ३८, तर वसमत तालुक्यातल्या ३९ उमेदवारांचा समावेश आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज मराठवाड्यातल्या नांदेड, बीड आणि परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीत ते ५७ हजार ६७१ कोटी रूपयांच्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा शुभारंभ करणार आहेत. नांदेड इथं ते विकास कामाचं भूमीपूजन करतील. परभणी आणि जालना जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग आणि विविध विकास कामांचं ई-भूमीपूजन, तसंच लोकार्पण सोहळा मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे परभणी इथल्या समाधान शिबिराचा त्यांच्या उपस्थितीत समारोप होईल. बीड जिल्हा भेटीत फडणवीस आणि गडकरी साडे चार हजार कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचं भूमीपुजन करतील, तसंच अंबा सहकारी साखर कारखाना परिसरातल्या सभेला मार्गदर्शन करतील. **** महात्मा बसवेश्वर यांची जयंती काल सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडन इथं थेम्स नदीच्या किनाऱ्यावर उभारलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबाद शहरातल्या बसवेश्वर चौकात खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. त्यानंतर बसवेश्वर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करून, वाहन फेरी काढण्यात आली. तसंच, शहरात अन्यत्र मिरवणूक, आणि अभिवादनाचे कार्यक्रम घेण्यात आले. नांदेड शहरातही यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. जालना, हिंगोली, लातूर, बीड इथंही विविध उपक्रमातून महात्मा बसवेश्वरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. **** भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त काल औरंगाबाद शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातल्या ३० ब्राह्मण संघटना���नी एकत्र येऊन, मिरवणूक काढली. **** औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची नियुक्ती रद्द करून आता चौधरी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. **** औरंगाबाद इथल्या अल्पवयीन कब्बडीपटू वरील बलात्कार प्रकरणी मंगेश गवळी याला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दहा वर्ष सक्त मजुरी आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. २०१५ मध्ये ही घटना घडली होती. **** शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्यासह सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांना भेट देणार आहेत. दोन दिवसांच्या या भेटीत ठाकरे लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहेत. **** शक्तिपात दीक्षा मार्गाचे प्रवर्तक गोविंद पुंड यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं औरंगाबाद इथं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. वामनराव गुळवणी महाराज यांचे शिष्य असलेल्या पुंड यांनी दत्त संप्रदायातल्या लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांचा शक्तिपात दीक्षा मार्गाचा प्रसार करण्याचं काम केलं. यासाठी औरंगाबाद इथं आध्यात्मिक केंद्रही उभारलं. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अकरा वाजता औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. **** अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी निधीची तरदतूद असूनही, गेल्या काही वर्षांपासून तो खर्च केला नसल्याच्या निषेधार्थ, प्रहार संघटनेच्यावतीनं काल औरंगाबाद इथं आंदोलन करण्यात आलं. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महापौर नंदकुमार घोडेले यांना घेराव घातला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलेल्या विविध मागण्या मान्य करण्याचं आश्वासन महापौरांनी दिलं. **** ग्रामस्वराज्य अभियाना अंतर्गत, काल लातूर इथं अनेक ठिकाणी स्वच्छता दिवस, आणि लोकसहभागातून जाणीव जागृती उपक्रम राबवण्यात आले. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉक्टर विपीन इटनकर यांच्या कल्पनेतून आणि प्रत्यक्ष सहभागामुळे आरोग्य केंद्राच्या दर्शनी भागात, बोलक्या भिंती हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात अनेक ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांमधली अनुकरणशील वृत्ती लक्षात घेऊन, त्यांच्या मनात लहान वयापासूनच स्वच्छतेचे संस्कार रूजले, तर ते आपल्या पालकांनाही स्वच्छता मोहीमेत सहभागी करून घेतील, असं इटनकर म्हणाले. **** साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या, अक्षय तृतीया या सणा निमित्त काल औरंगाबादसह मराठवाड्यातल्या सर्वच बाजारपेठांमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. औरंगाबाद शहरात यानिमित्तानं काल वाहन, म���लमत्ता आणि सोने खरेदी करण्यात आली. *****
0 notes