#गौरीपूजन
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
सायबर गुन्ह्यांना प्रतिबंधासाठी आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची छत्रपती संभाजीनगर इथं विविध विषयांवर समाजघटकांशी चर्चा
ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं घरोघरी आगमन-आज गौरीपूजन
आणि
पॅरिस परालिम्पिक स्पर्धेत पदकविजेत्या खेळाडूंना रोख बक्षीसं जाहीर
****
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. आय फोर सी अर्थात भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात काल नवी दिल्ली इथं ते बोलत होते. सायबर सुरक्षा हा विषय देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक असल्याचं त्यांनी नमूद केलं. सायबर गुन्हेगारी आणि त्यापासून बचावाचे उपाय याविषयी जनजागृती करण्यासाठी आय फोर सी मार्फत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. देशभरातल्या ७२ दूरचित्रवाहिन्या, चित्रपटगृहं आणि इतर माध्यमातून जनतेपर्यंत ही माहिती पोहचवली जाणार आहे. सायबर सुरक्षेसाठी १९३० हा दूरध्वनी मदत क्रमांक आय फोरसीनं उपलब्ध करुन दिला असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं लोकप्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, उद्योजक, तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यपालांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत मराठवाडा विकासाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली असून ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यावर लवकरात लवकर राजभवनात विशेष बैठक घेतली जाणार आहे आणि त्यानंतर अंतिम निर्णय केला जाईल असं सत्तार यांनी सांगितलं. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देण्याच्या मागणीसह इतर विविध मागण्यांचं निवेदन राज्यपालांकडे सादर करण्यात आलं.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासात्मक अनेक मुद्द्यांवर सर्वपक्षीय चर्चा झाली असल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाला कालपासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाचं उद्घाटन केलं. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज १५ कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून पाहणार आहे, आणि हा लाभ मिळालेला नसल्यास याबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित कुटुंबाला मार्गदर्शन करणार असल्याचं, मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे. तीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख, विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्यांचा यात समावेश आहे, माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली. मतदान केंद्रापर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी ही समिती नेमल्याचं, दानवे यांनी सांगितलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइनं १२ जागांची मागणी केली आहे.
****
आगामी ईद-ए-मिलाद दरम्यान डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. राष्ट्रीय हरित लवादानं गणेशोत्सवाच्या काळात डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदी घातली आहे, त्यामुळे न्यायालयाने या जनहित याचिकेचा विचार करावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली, मात्र, यावर बंदी हरित लवादानं घातली असेल, तर ही मागणीही हरित लवादासमोरच करावी, असं सांगत, ही सुनावणी पुढे ढकलण्याची सूचना न्यायालयानं केली.
****
ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं काल घरोघरी आगमन झालं. घरोघरच्या विविध पद्धतींनुसार गौरींचं मनोभावे स्वागत करून स्थापना क��ण्यात आली. आज गौरी पूजन आणि उद्या गौरी विसर्जन होईल. तीन दिवसांच्या या सोहळ्यात गौरी पूजनाचं सर्व साहित्य, नैवेद्यासाठी भाज्या आणि फळांसह, विविध प्रकाराच्या फुलांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. विविध साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे.
****
परदेशात गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, याचा आपण दररोज आढावा घेत आहोत. आज आपण अमेरिकेत मिनिसोटा इथं राहणाऱ्या श्रद्धा बरिदे यांच्याकडून तिथल्या गणेशोत्सवाबाबत जाणून घेऊ या...
‘‘मिन्यापोलिसची एक उल्लेखनीय गोष्ट मला तुमच्या बरोबर शेअर करायला आवडेल, ती म्हणजे, मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटा हे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरं करते. जिथे गणपतीची स्थापना ही इथल्या हिंदू मंदिरात होते. ज्यामुळे केवळ मराठीच नव्हे तर भारतातील इतर राज्यातील लोक ॲज वेल ॲज अमेरिकेतील वेगवेगळ्या कम्युनिटीमधील लोकं त्याच्यामध्ये भाग घेतात. आमच्या मित्रमैत्रीणींकडे सुद्धा गणपती असतो आणि तो आम्ही एकत्रितपणे साजरा करतो. जिथे आरतीसाठी आणि प्रसादासाठी जवळजवळ शंभर सव्वासे लोकं आम्ही एकत्र असतो आणि चढाओढीने आरती म्हणतो.’’
****
पॅरिस परालिम्पिक स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंना केंद्र सरकारने रोख बक्षीस जाहीर केलं आहे. सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी ७५ लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना ५० लाख तर कांस्यपदक विजेत्यांना ३० लाख रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचं, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. मिश्र स्पर्धेत पदक विजेत्यांना प्रत्येकी साडे बावीस लाख रुपये बक्षीस दिलं जाईल.
दरम्यान सात सुवर्णांसह ���९ पदकं मिळवणारा हा संघ काल भारतात परतला. दिल्ली विमानतळावर संघाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे काल दुपारी उघडण्यात आले. आता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणात आज पहाटे सुमारे १५ हजार ८६७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत होती.
दरम्यान, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा असल्याने यंत्रणेने सज्ज राहावं, असे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत. काल जिल्हा प्रशासनाच्या या संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते.
****
मुंबईचं यशवंतराव चव्हाण केंद्र आणि जळगावच्या भंवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रानकवी ना. धों. महानोर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पहिले पुरस्कार जाहीर झाले आहेत. साहित्य, शेती आणि पाणी या तीन क्षेत्रांत एकूण सहा पुरस्कार दरवर्षी देण्यात येणार आहेत. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर इथले कवी गणेश घुले यांचा समावेश आहे. येत्या १९ तारखेला मुंबईत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून पुन्हा उपोषणाचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते काल जालन्यात वडीगोद्री इथे बोलत होते. आपल्याला राजकारणात जायचं नसून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आपला लढा असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली.
****
किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ मध्ये ज्वारी खरेदीची मुदत येत्या ३० सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पणन अधिकारी व्ही.यू, राठोड यांनी ही माहित दिली. ही मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली होती.
****
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तत्काळ देण्यात यावी, तसंच सोयाबीनला ८ हजार रुपये भाव जाहीर करावा या मुख्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. या मागण्या तत्काळ मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी दिला.
****
भटकेविमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने काढण्यात आलेली राज्यव्यापी संवादयात्रा काल नांदेड शहरात दाखल झाली. २८ ऑगस्ट रोजी पुण्यातल्या फुलेवाडा इथून सुरू झालेल्या या संवादयात्रेचा २३ सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयात समारोप होणार आहे.
****
0 notes
Photo
श्री महालक्ष्मी प्रसन्न, #गौरीपूजन #गौरीगणपती #महालक्ष्मी #महालक्ष्मी_प्रसन्न #नागपूर #अमरावती #महाराष्ट्र #हिन्दू #गणेशोत्सव२०२० #tvkhode #agrofirst #agrofirstin #wownettech #nagpur #amravati #maziamravati #nagpuri (at Nagpur) https://www.instagram.com/p/CTwKzM6MlYw/?utm_medium=tumblr
#गौरीपूजन#गौरीगणपती#महालक्ष्मी#महालक्ष्मी_प्रसन्न#नागपूर#अमरावती#महाराष्ट्र#हिन्दू#गणेशोत्सव२०२०#tvkhode#agrofirst#agrofirstin#wownettech#nagpur#amravati#maziamravati#nagpuri
0 notes
Photo
Today Pooja shri Mahalaxmi Temple kolhapur Maharashtra २६ : ८ : २०२०...(गौरीपूजन) आजची श्री महालक्ष्मी ची पूजा..जगतजननी आई अंबाबाईचा उदो उदो https://www.instagram.com/p/CEWgq-cAoWj/?igshid=yz94t6obbz48
0 notes
Photo
गौरीपूजन हा महाराष्ट्रातील सण आहे.यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात.भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरी बसवितात.ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात.तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात. (at धामणगाव रेल्वे) https://www.instagram.com/p/B2Ir-BFB37l/?igshid=fp0uov4wpg1l
0 notes
Text
Ganesh Utsav 2018 : जाणून घ्या, गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्रींचं महत्व
Ganesh Utsav 2018 : जाणून घ्या, गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्रींचं महत्व
या व्रतवैकल्यांमध्ये हरितालिका, ऋषिपंचमी आणि गौरीपूजन यांना विशेष महत्व आहे.
from LoksattaLoksatta https://ift.tt/2C9mhI2
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 AUG. 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३० ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
**** ** मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प; मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम ** दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; राज्यभरातून २४ पूर्णांक ४४ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण ** नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे नऊ डबे ठाण्याजवळ घसरले; या मार्गावरची रेल्वे वाहतुक पूर्णपणे विस्कळीत आणि ** अवयवदानाबाबत जागृती करण्यासाठी काल सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन **** मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात काल मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. मुंबईत काल दिवसभरात २९८ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला, ऑगस्ट १९९७ नंतरचा एका दिवसातला पावसाचा हा उच्चांक आहे. या पावसामुळे अनेक सखल भागांसह रेल्वे मार्गावर पाणी साचल्यानं, उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाली, दृश्यमानता कमी असल्यानं, विमानसेवेवरही परिणाम झाला. रस्त्यावरही अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं, वाहतुकीची कोंडी झाली होती. विक्रोळीत दोन घरं कोसळल्यानं तीन जणां��ा मृत्यू झाला. ठाण्यातही तीन जण पाण्यात बुडाले, यापैकी दोघांचे मृतदेह सापडल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन, आवश्यक ते निर्देश दिले. परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, केंद्र शासनामार्फत सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. मराठवाड्यात कालही पावसाचा जोर कायम राहिला. परभणी जिल्ह्यात कालही जोरदार पाऊस झाला, सेलू, जिंतूर तालुक्यात चांगला पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या पावसामुळे सेलू पाथरी मार्गावरची वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. लातूर जिल्ह्यातही काल पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या बहुतेक सर्व तालुक्यात काल दुपारनंतर पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 63 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. उस्मानाबाद इथंही मोठा पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या पावसानं भूजल पातळीत वाढ होत असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात काल सायंकाळी ३१ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती. नाशिक जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असल्यानं, गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जायकवाडी धरणातली पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात उमरी शहराला पाणी पुरवठा करणारा कुदळे मध्यम प्रकल्प काल पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहत होता. सिध्देश्वर धरणातला पाणी साठा २४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. **** अहमदनगर जिल्ह्यातल्या निंबोडी शाळा दुर्घटनेतल्या मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना राज्यशासनानं पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. जिल्हा परिषदेच्या या शाळेचं छत परवा अतिवृष्टीमुळे कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाचव्या वर्गातल्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत जखमी विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार असून, शाळेचं संरचनात्मक परीक्षण करण्याचे आदेश अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत. **** सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा संचालनालयातल्या ७३८ अस्थायी ब गट वैद्यकीय अधिकाऱ्यांचं रिक्त असलेल्या नियमित पदांवर विशेष बाब म्हणून कायमस्वरुपी एकवेळचे समावेशन करण्यास मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. सध्या आरोग्य विभागाकडे नियमित आस्थापनेवर मंजूर एक हजार ६६ पदांपैकी चारशे ४८ पदं रिक्त आहेत. **** राज्यातल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या संबंधित कलमांमध्ये धारणेसह अध्यादेक्ष पुनर्रप्रस्थापित करण्यासही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. **** दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत राज्यभरातून २४ पूर्णांक ४४ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागातून सर्वाधिेक ३१ टक्के तर कोकण विभागातून सर्वात कमी १३ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद विभागातून २७ टक्के तर लातूर विभागातून २६ पूर्णांक १० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लगेचच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे नऊ डबे काल सकाळी ठाण्याजवळ आसनगाव ते वासिंद दरम्यान घसरले. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र या मार्गावरची रेल्वे वाहतुक पूर्णपणे विस्कळीत झाली. अपघातानंतर या मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्या अंशत: तर काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या. काही रेल्वेगाड्यांचे मार्ग वळवण्यात आले. मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस पुणे, दौंड मार्गे वळवण्यात आली, नांदेड ते मुंबई तपोवन एक्स्प्रेस काल औरंगाबाद पर्यंत तर जनशताब्दी एक्सप्रेस मनमाडपर्यंत धावली, मुंबईहून सुटणारी जनशताब्दी, नंदिग्राम आणि देवगिरी एक्स्प्रेस रद्द काल करण्यात आल्या. मुंबईहून आज सुटणारी तपोवन एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे, नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस तसंच सिकंदराबाद मुंबई देवगिरी एक्सप्रेस काल औरंगाबाद पर्यंतच धावल्या, देवगिरी एक्सप्रेस आज औरंगाबादहून नियमित वेळेवर सिकंदराबादकडे प्रस्थान करेल. मुंबई मार्गावरची रेल्वे वाहतुक सुरळीत होण्यासाठी किमान एका दिवसाचा अवधी लागेल, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान हरियाणात डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांच्या आंदोलनानंतर उद्भवलेल्या कायदा आणि सुरक्षेच्या समस्येमुळे हिंगोली अकोला मार्गे जाणारी नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे, मात्र औरंगाबाद, मनमाड मार्गे धावणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आज आपल्या नियमित वेळेवर धावणार आहे. अमृतसर हून नांदेड कडे येणारी मनमाड औरंगाबाद मार्गे धावणारी सचखंड एक्सप्रेस काल रद्द करण्यात आल्यानं, ही गाडी ��ज नांदेडमार्गावर धावणार नसल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून सांगण्यात आलं आहे. ***** २९ ऑगस्ट हा दिवस अवयवदान दिवस म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केली आहे. ते काल मुंबईत या अनुषंगानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अवयवदानात महाराष्ट्रानं देशात सहाव्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असून, लवकरच राज्य पहिल्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला. मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल संदेश फेरी काढून अवयवदानाबाबत जागृती करण्यात आली. औरंगाबाद इथं आमदार अतुल सावे यांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी इथून या फेरीला प्रारंभ झाला. या अनुषंगानं जालना इथंही संदेश फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला. लातूर इथंही या निमित्त संदेश फेरी काढण्यात आली. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह शालेय विद्यार्थी या संदेश फेरीत सहभागी झाले होते. नांदेड इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या फेरीत पथनाट्याच्या माध्यमातून अवयवदानाबाबत जागृती केली. **** राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त काल सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद इथं सकाळी क्रांती चौकातून शालेय विद्यार्थ्यांनी अभिवादन फेरी काढून हॉकीपटू ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली. **** गणपती पाठोपाठ काल सायंकाळी घरोघरी ज्येष्ठा गौरींचं आगमन झालं. पारंपरिक पद्धतीनुसार घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींची स्थापना झाली. काल दुपारनंतर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं, गौरी पुजनासाठी खरेदी करणाऱ्या भाविकांची तारांबळ उडाली. आज ज्येष्ठा गौरीपूजन. घराघरात उत्सवाच्या वातावरणात गौरींच्या महाप्रसादाची तयारी सुरू आहे. **** औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघ महानंदनं दुधाच्या विक्री दरात प्रतिलीटर चार रुपयांनी कपात केली आहे. परवा एक सप्टेंबरपासून महानंद दूध ४० रुपये प्रतिलीटर दरानं मिळणार आहे. सणासुदीच्या दिवसात दुधाची मागणी पाहता, दरकपात केल्याचं, दूधसंघाकडून सांगण्यात आलं आहे. **** नांदेड जिल्ह्यात मुरूम आष्टा कासार रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला. काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद नजीक काल खासगी प्रवासी जीप आणि दोन दुचाकीच्या अपघातात तीन जण ठार तर आठ जण जखमी झाले, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. ****
0 notes