#खिंडार?
Explore tagged Tumblr posts
news-34 · 2 months ago
Text
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 November 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
• केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सतर्कता इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ. • विधानसभा निवडणुकीत उमेदवाराकडून नमुना मतपत्रिका छापण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी. • बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा विविध वस्तूंच्या खरेदीने सर्वत्र साजरा. आणि • मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडची भारताविरुद्ध दुसऱ्या डावात १४३ धावांची आघाडी.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या फडणवीस यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्या जीविताला धोका असून, तसे कट रचले जात असल्याची माहिती, गुप्तचर यंत्रणांकडून राज्यातील यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर सतर्क झालेल्या राज्य पोलिस दलाने ��त्काळ फडणवीस यांच्या सुरक्षेचा संपूर्ण आढावा घेत, सुरक्षेत वाढ केली. आता नेहमीच्या बंदोबस्तासोबत ‘फोर्स वन'चे १२ सैनिक देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी, नागपूर इथल्या निवासस्थानी तसंच त्यांच्या कार्यक्रमात सुरक्षा देण्याची सूचना पोलीस दलाला देण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते. फडणवीसांच्या उपस्थितीत अनिल कौशिक यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नवी मुंबईतील काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे.
भाजपाचे बंडखोर आमदार गोपाळ शेट्टी यांनी बोरीवली विधानसभा मतदारसंघातून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आपण पक्ष सोडलेला नाही, पक्षानं आपल्याला बाहेर काढलं तरीही आपण पक्ष सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. आपलं प्रत्येक पाऊल पक्षाच्या हितासाठी, पक्षात राहून पक्षाची हानी करणाऱ्यांच्या विरोधात आहे, असं ते म्हणाले.
माहिमचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनीही निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. माहिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माहिमची उमेदवारी जाहीर करताना विश्वासात घेतलं नसल्याचं म्हटलं आहे.
विधानसभेच्या मतदानावेळी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारातील मतपत्रिका, उमेदवाराला आता नमुना मतपत्रिका म्हणून छापता येणार नाहीत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यावर निर्बंध राहणार असल्याचं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं. पॅम्प्लेट, पोस्टर, फ्लेक्स या प्रचार साहित्यावर प्रकाशक, मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव, पत्ता आणि प्रतींची संख्या नसेल तर गुन्हा दाखल केला जाणार आहे. मात्र, आयोगाने निश्चित केलेल्या कागदावर नमुना मतपत्रिकेचा वापर उमेदवारांना करता येईल. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांबाबत सर्व राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यंत्रणेला कळवावी लागणार आहे.
दरम्यान, उमेदवारांन�� आपल्या निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्यातूनच व्यवहार करणं आवश्यक असल्याचं, आयोगानं कळवलं आहे. उमेदवारांने निवडणूक खर्चासाठी असलेली संपूर्ण रक्कम संबंधित बँक खात्यामध्ये जमा करावी, आणि त्याच खात्यातून धनादेश, धनाकर्ष, आरटीजीएस, एनईएफटीद्वारे निवडणूक खर्च करणं आवश्यक आहे. उमेदवारांनी आपल्या विरोधात गुन्हे दाखल असल्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करणंही आवश्यक असणार आहे. जाहिरातीचा खर्च निवडणूक खर्चाची बाब म्हणून गणला जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सुपा टोलनाक्यावर एका गाडीतून २३ कोटी ७१ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिसांनी या गाडीच्या संशयित हालचालींवरून गाडी थांबवून तपासणी केली असता, हा मुद्देमाल मिळाला. ही गाडी छत्रपती संभाजीनगर कडून पुण्याकडे निघाली असल्याचं चालकानं सांगितलं. याप्रकरणी पुढचा तपास सुरु आहे.
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांनी केलं आहे. बाईट – विवेक ���ीमनवार
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या चार धामपैकी एक असलेल्या गंगोत्री धामचे दरवाजे आजपासून बंद करण्यात आले. अन्नकूट उत्सवानिमित्त आज अभिजीत मुहूर्तावर भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे दरवाजे विधीपूर्वक बंद करण्यात आले. दर वर्षी हिवाळ्यामध्ये गंगोत्री धामचे दरवाजे बंद करण्यात येतात. या वर्षी आतापर्यंत आठ लाखांहून अधिक भाविकांनी गंगोत्री धामला भेट दिली आहे. याशिवाय रुद्रप्रयागमधल्या केदारनाथ धाम आणि उत्तरकाशीतल्या यमुनोत्री धामचे दरवाजेही बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे.
आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा, बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे चांगल्या उपक्रमांची सुरुवात किंवा महत्त्वाची खरेदी आज केली जाते. घर, वाहन किंवा आभुषणं खरेदीसाठी आजचा मुहूर्त साधण्याकडे बहुतेकांचा कल असतो. आज बाजारपेठांमध्ये भेटवस्तू, तसंच मोबाईल फोन्स, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठी दुकानं, मॉल्स, घाऊक बाजारपेठा, सराफकट्टे गजबजले आहेत. याशिवाय अनेकांनी ऑनलाईन खरेदीलाही पसंती दिली आहे. विक्रम सं��त २०८१ ला आजपासून प्रारंभ झाला. देशाच्या अनेक भागात हा नव��र्षाचा प्रारंभ मानला जातो. गुजराती नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर शुभेच्छा दिल्या. हे नवीन वर्ष सर्वांसाठी आनंद, सफलता, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो, अशी कामना त्यांनी व्यक्त केली आहे. आज देशभरात गोवर्धन पूजा साजरी झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवर्धन पूजेनिमित्त समाजमाध्यमावरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. बहीण भावाच्या नात्यातला स्नेह वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सण उद्या साजरा होत आहे, या पार्श्वभूमीवर बस स्थानकं तसंच रेल्वे स्थानकं प्रवाशांच्या गर्दीनं फुलून गेले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र दिवाळी साजरी करण्याची बारामतीच्या पवार कुटुंबियांची परंपरा आज खंडीत झाली. बारामतीमध्ये आज दिवाळी पाडवा साजरा झाला, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वेगवेगळा पाडवा उत्सव पार पडला. शरद पवार यांचा पाडवा गोविंद बागेत तर अजित पवार यांचा पाडवा काटेवाडीत पार पडला. शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना, अनेक वर्षापासून चालत आलेली एकत्रित पाडवा साजरा करण्याची पद्धत कायम राहिली असती तर आनंद झाला असता, असं मत व्यक्त केलं. अजित पवार यांनी, ट्विट करून या कार्यक्रमाची माहिती दिली, आजचा हा पाडवा, मोठ्या स्नेहभावानं साजरा झाल्याचं सांगत, अनेक वर्षांचं हे नातं असंच वृध्दींगत होत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या आदर्श गावातल्या ग्रामस्थांनी दीपोत्सव साजरा केला. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सर्व ग्रामस्थांनी प्रथम दिवे प्रज्वलित करून असा दीपोत्सव प्रत्येक वर्षी साजरा करण्याचा निर्धार केला. प्रत्येक कुटुंबातून १ दिवा किंवा पणती, प्रत्येक संस्थेची एक पणती आणि सर्व मंदिरांचा एक दिवा, अशा एकूण ८५० दिवे प्रज्वलित करून जलस्रोतात सोडण्यात आले, शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य जपणूक, जलदेवतेची आराधना आणि वीजेची बचत अशा ३ तत्वांवर प्रत्येक हा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडने भारताविरुद्ध दुसऱ्या डावात १४३ धावांची आघाडी घेतली आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव २६३ या धावसंख्येवर संपुष्टात आला. शुभमन गिल ९० धावा करून बाद झाला. आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडने दुसऱ्या डावात नऊ बाद १७१ धावा केल्या आहेत.
अमेरिकेच्या कोलोराडो इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या जागति�� मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कृषा वर्मानं सुवर्णपदक जिंकलं. तिनं जर्मनीच्या लेरिका हिचा ५-० असा पराभव केला. ४८ किलो वजनी गटात चंचल चौधरी, ५७ किलो वजनी गटात अंजली सिंग, तर पुरुषांच्या ७५ किलो वजनी गटात राहुल कुंडू यांना मात्र अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागल्यानं रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
भाजपमध्ये खिंडार ! प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांचा राजीनामा
https://bharatlive.news/?p=175414 भाजपमध्ये खिंडार ! प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांचा राजीनामा
पिंपरी : ...
0 notes
mukundbhalerao · 2 years ago
Link
0 notes
kokannow · 5 years ago
Photo
Tumblr media
आमडोस मध्ये स्वाभिमानला खिंडार ; उपसरपंचांसह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश मालवण : मालवण तालुकयातील आमडोस येथील स्वाभिमान पक्षाच्या उपसरपंच भारती आयरे यांसह स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्ते व ग्रामस्थांनी गुरुवारी आमदार वैभव नाईक, शिवसेना महिला संपर्क प्रमुख सूचिता  चिंदरकर , जिल्हा संघटक जान्हवी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
संजय राऊत माघारी फिरताच शिवसेनेला नाशिकमध्ये खिंडार
संजय राऊत माघारी फिरताच शिवसेनेला नाशिकमध्ये खिंडार
ठाकरे गटाचं डॅमेज कंट्रोल करण्यात संजय राऊत अपयशी नाशिक : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. तब्बल 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, नाशिक दौऱ्यावर आलेले संजय राऊत मुंबईला माघारी फिरताच ठाकरे गटातील माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
शिवसेनेनंतर एकनाथ शिंदेंचा भाजपलाच जोर का झटका!
Tumblr media Tumblr media
Picture Credit/Facebook/Eknath shinde मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेला खिंडार पाडलं. शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदार आणि वेगवेगळ्या शहरांमधल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पडलं. आता मुंबईमधल्या 100 पेक्षा जास्त महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. दहिसरमध्ये शिंदे गटाने भाजपला गळती लावली आहे. शिवसेनेनंतर एकनाथ शिंदेंनी भाजपलाच जोर का झटका दिला आहे. शिंदे गटाने भाजपमधले पदाधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा हा सोहळा पार पडला. प्रकाश सुर्वे यांचा मतदारसंघ असलेल्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले पण आता याच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिंदेंनी त्यांच्या पक्षात प्रवेश दिला आहे. Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, आशिया चषक 2022: कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे यांनी श्रीलंकेला विजयावर शिक्कामोर्तब करण्यास मदत केली | क्रिकेट बातम्या
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, आशिया चषक 2022: कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे यांनी श्रीलंकेला विजयावर शिक्कामोर्तब करण्यास मदत केली | क्रिकेट बातम्या
कुसल मेंडिस‘ धमाकेदार सुरुवात आणि भानुका राजपक्षेच्या खालच्या फळीतील महत्त्वाच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने शनिवारी आशिया चषक सुपर 4 स्पर्धेत अफगाणिस्तानवर चार गडी राखून विजय मिळवला. विजयासाठी १७६ धावांचे आव्हान, श्रीलंकेने ६२ धावांची आक्रमक सलामी दिली. पाठुम निस्संका शारजाह येथे (35) आणि मेंडिस (36) यांनी पाच चेंडू राखून लक्ष्य गाठले. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या मधल्या फळीला खिंडार…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
उद्धव ठाकरेंची खमकी बाजू मांडणारे भास्कर जाधवांचा भाजप मंत्र्यांच्या गाडीतून प्रवास
उद्धव ठाकरेंची खमकी बाजू मांडणारे भास्कर जाधवांचा भाजप मंत्र्यांच्या गाडीतून प्रवास
रत्नागिरी:-(आबा खवणेकर):- महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज नाही. गेल्या दोन महिन्यांमधील घडामोडी हे त्याचं ताजं उदाहरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे असणारे अनेक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे गेले. त्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यापासून आमदार भास्कर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 2 months ago
Text
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
मराठवाडा, विदर्भातल्या नद्यांना जोडणाऱ्या १६ प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मान्यता.
राज्यात २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीला मान्यता.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
आणि
भारतासमोर दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रील���केचं २१६ धावांचं आव्हान.
****
मराठवाडा आणि विदर्भातल्या नद्यांना जोडणाऱ्या १६ पुलांच्या प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. यासंदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. यामुळं नांदेड, हिंगोल���, यवतमाळ जिल्ह्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. यामध्ये उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण ते निम्न पैनगंगा प्रकल्प क्षेत्रापर्यंत एकूण सात बंधारे, पूर्णा नदीवरचे चार बंधारे यांचा समावेश आहे. कयाधू नदीवर १२ प्रस्तावित बंधाऱ्यांपैकी नऊ बंधाऱ्यांचं काम जलसंधारण विभागमार्फत करण्यात आलं असून उर्वरीत कामांना गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले. या प्रकल्पामुळं सदर भागातल्या ऊस, हळद उत्पादक शेतकऱ्यांचा किमान ४० किलोमीटरचा फेरा वाचणार आहे.
****
राज्यात २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीला मान्यता मिळाली असून लवकरच पदभरती सुरु करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असं त्यांनी या बैठकीत सांगितलं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोविड काळातल्या उल्लेखनीय सेवेबद्दल प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत येत्या १६ आणि १७ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत. यावेळी सुमारे २० उद्योगांबरोबर एक लाख ४० हजार कोटी रुपयांचे करार होणार असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. मुख्यमंत्र्यांसह या शिष्टमंडळात उद्योग मंत्री उदय सामंत तसंच वरिष्ठ अधिकारी असतील. मॅग्नेटिक महाराष्ट्राची नवी बलस्थाने संपूर्ण जगाला कळून राज्याकडे जगाचा ओढा कसा वाढेल यावर या जागतिक महत्वाच्या परिषदेत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिंदे हे या परिषदेत बदलत्या पर्यावरणाचे शहरांच्या विकासापुढील आव्हान आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकास यावर मार्गदर्शन करणार आहेत.
****
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे तसंच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांती चौक इथून मिरवणुकीद्वारे अर्ज दाखल करण्यात आला. महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आघाडीतून बाहेर पडणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला. ते म्हणाले –
बुथ लेवलपासून तर विधानसभा लेवलपर्यंत, काही लोकसभा लेवलपर्यंतही ज्यांनी काम केलं आहे, काँग्रेसमधले असे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात येण्याकरता उत्सुक आहेत. राष्ट्रवादीमधले आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर उद्‌धवजीकडले कार्यकर्ते, नेते हे एकनाथ शिंदेजींच्या संपर्कात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत, या पक्षांमध्ये पुढच्या काळामध्ये खिंडार पडणार आहे. आम्ही अनेक वेळा सांगितलं आहे, की २०२४ मध्ये अशी परिस्थिती होईल लोकसभा आणि विधानसभा लढवण्याकरता सुद्‌धा उमेदवार मिळणार नाहीत, अशी स्थिती महाराष्ट्रात होणार आहे.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी प्रहार आणि इंग्रजी शाळा संस्था चांलकाच्या संघटनेतर्फे डॅा.संजय तायडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
नाशिक पदवीधर मतदार संघातून सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचं म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून चर्चेत असलेले धनंजय जाधव आणि धनराज विसपुते यांना अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ९७ वावा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिक नमो ॲप किंवा मायजीओव्ही या खुल्या मंचावरून आपली मतं आणि विचार मांडू शकतात.
****
भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षासोबत आपली कोणतीही तडजोड नसल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज मुंबईत या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली. भारतीय जनता पक्ष ज्यांच्या बरोबर आहे त्यांच्या बरोबर आपण कधीही गेलेलो नाही. हा पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधातलं आपलं भांडण व्यवस्थे विरोधातलं आहे, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा निरोप आल्यामुळं आपण काल त्यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं. शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली तर आपण त्यांच्यासोबत जाऊ, असंही त्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांशी भेटी दरम्यान इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत विविध विषयांबाबत चर्चा केली, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षासोबत युती कधी करायची ते ठरवावं, असं आवाहनही आंबेडकर यांनी यावेळी केलं.
****
राजमाता जिजाऊ तसंच स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. या निमित्तानं राज्यात आज सर्वत्र अभिवादनपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद इथं महानगरपालिक��� मुख्यालयात राजमाता जिजाऊ यांच्या ��्रतिमेला आणि शहरातल्या टीव्ही सेंटर इथल्या स्वामी विवेकानंद उद्यानात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला अतिरिक्त आयुक्त ब.भि.नेमाने आणि रविंद्र निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शहरातल्या टीव्ही सेंटर परिसरातल्या स्वामी विवेकानंद उद्यानातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे तसंच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिवादन केलं. जालना शहरासह जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयं, शासकीय, निमशासकीय कार्यालयं आणि पक्ष संघटनांकडून विविध उपक्रमांनी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातल्या छत्रपती संभाजी उद्यानापासून सकाळी दुचाकी फेरी काढण्यात देखील आली होती. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा इथं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या स्मृतीस्थळी भेट देवून अभिवादन केलं.
****
भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्या��� तीन बाद ६२ धावा केल्या आहेत. कोलकाता इथं इडन गार्डन मैदानावर सुरू या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करलेल्या श्रीलंका संघाचा डाव ३९ षटकं आणि चार चेंडुंमध्ये २१५ धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजनं ३० धावांमध्ये तीन तर कुलदीप यादवनही ५१ धावांमध्ये तीन गडी बाद केले. उमरान मलिकनं दोन तर अक्षर पटेलनं एक गडी बाद केला. श्रीलंकेचा सलामीवीर नुवानीदू फर्नांडो यानं ६३ चेंडुंमध्ये ५० धावा करतांना एकाकी झुंज दिली.
****
रंगांचं संगीत ज्याला चित्रपटात खेळवता येतं तो खरा दिग्दर्शक असतो असं प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक अरुण खोपकर यांनी केलं आहे. त्यांनी आज आठव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सिनेमा आणि रंग’ या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन केलं, त्यावेळी खोपकर बोलत होते. रंग किंवा प्रकाश योजना हा चित्रपट दिग्दर्शकाचा दृष्टीकोन असतो. तो जेवढे रंग सिनेमातून दाखवतो तेवढेच रंग लपवून ठेवतो आणि ते फार महत्वाचं असतं, असंही खोपकर म्हणाले.
****
राज्यात परवा, शनिवारी मकर संक्रांती-भोगी सणाचा दिवस पौष्टिक तृण धान्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या गावांमध्ये कृषि विभागामार्फत १४ जानेवारी या दिवशी प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद मधील साजापूर पंचायत ��मितीचा ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण निकम याला नऊ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं आज अटक केली. शेतीचा नमुना क्रमांक आठ अचा उतारा देण्यासाठी रामकृष्ण निकम यानं ही लाच मागितली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.  
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मोदींविरुद्ध आघाडी बांधणाऱ्या नितिशकुमारांच्या मंत्रिमंडळाला पहिलं खिंडार पडलंय !
https://bharatlive.news/?p=105134 मोदींविरुद्ध आघाडी बांधणाऱ्या नितिशकुमारांच्या मंत्रिमंडळाला पहिलं ...
0 notes
snehalshelote · 2 years ago
Link
0 notes
loksutra · 3 years ago
Text
उद्धव यांच्या राजीनाम्याची अटकळ, भाजपने घेतला खिंडार, म्हणाले- जगातील सर्वात प्रदीर्घ कार्य महाराष्ट्रात संपणार आहे घरातून
उद्धव यांच्या राजीनाम���याची अटकळ, भाजपने घेतला खिंडार, म्हणाले- जगातील सर्वात प्रदीर्घ कार्य महाराष्ट्रात संपणार आहे घरातून
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची भाजपने खिल्ली उडवली प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क महाराष्ट्रातील राजकीय संकट सतत गडद होत चालले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. राजीनाम्याच्या उहापोहावरून भाजपने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील राजकीय संकट सतत गडद होत चालले आहे. दरम्यान, सूत्रांचे म्हणणे आहे की,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
राजकीय हालचालींना वेग, काँग्रेस आमदारांचा ‘हा’ गट भाजपात विलीन होणार
Tumblr media
Photo- Facebook/BJP & Congressपणजी | महाराष्ट्रातील सत्तानाट्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. महाराष्ट्रातील सत्तातरानंतर गोव्यातील (Goa) राजकारणात देखील मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. गोव्यात काँग्रेसला (Congress) मोठं खिंडार पडलं आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. फुटीर काँग्रेस आमदारांच्या या गटाने मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची (Pramod Sawant) भेट देखील घेतली. काँग्रेस विधीमंडळ गट भाजपमध्ये विलीन करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. एल्टन डिकोस्टा, युरी आलेमांव आणि कार्लुस फेरेरा हे तीन आमदार सोडले तर काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, एकिकडे केंद्रातील भाजप सरकारला तगडं आव्हान देण्यासाठी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेला सुरूवात केली. मात्र, दुसरीकडे गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.   Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
"आता राजा पेटीतून जन्माला येतो" रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका! BJP leader raosaheb danve on uddhav thackeray now kig take birth from voting machine rmm 97
“आता राजा पेटीतून जन्माला येतो” रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका! BJP leader raosaheb danve on uddhav thackeray now kig take birth from voting machine rmm 97
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. बहुसंख्य आमदार आणि खासदार शिंदेगटाकडे असल्याने मूळ शिवसेना कुणाची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार नेमके कोण आहेत? यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे आम्हीच…
Tumblr media
View On WordPress
0 notes