#कोळसा
Explore tagged Tumblr posts
Text
केंद्रीय कोळसा मंत्र्यांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ही मागणी
केंद्रीय कोळसा मंत्र्यांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ही मागणी
केंद्रीय कोळसा मंत्र्यांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ही मागणी मुंबई – कोळसा काळ्या रंगाचा असतो. स्वच्छ व्यवहार होईल. या घटकाला वाढविण्याचं काम केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी करताहेत. कोळसा खदानीच्या लिलावाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. गेल्यावर्षी कोळसा संकट होतं. त्यामुळं ऊर्जानिर्मितीनं मोठं यश मिळेल, असा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कोळसा परिषदेमध्ये ते बोलत…
View On WordPress
#‘शिंदे#आजच्या प्रमुख घडामोडी#एकनाथ#केंद्रीय#केली#कोळसा#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मंत्र्यांसमोर#मागणी#मुख्यमंत्री#यांनी#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शासन#सरकार#ही
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• संविधान दिन आज देशभर होणार साजरा, राष्ट्रपतींच्या उपस्थितीत संसदेत मुख्य कार्यक्रमाचं आयोजन. • केंद्रीय मंत्रिमंडळाची रे��्वेच्या तीन ‘मल्टीट्रॅकिंग’ प्रकल्पांना मंजुरी, अजिंठा-वेरुळ पर्यटनस्थळाला होणार लाभ. • मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेऊ, अजित पवार यांचं प्रतिपादन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड. आणि • बॉर्डर- गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत भारताची विजयी सलामी, पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी विजय.
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. या निमित्तानं आजपासून २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. हा उत्सव देशाचा असून नागरिकांनी त्यात उत्साहानं सहभागी व्हावं, असं आवाहन रिजिजू यांनी केलं. दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात आज एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते भारतीय न्यायपालिकेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
आजच्या संविधानदिनानिमित्त काल नवी दिल्लीत हमारा संविधान हमारा स्वाभिमान पदयात्रा काढण्यात आली. डॉ. मनसुख मांडवीय, पीयुष गोयल, किरेन रिजिजू, रक्षा खडसे या केंद्रीय मंत्र्यांसह अनेक खासदार आणि ऑलिम्पिकपटू, राष्ट्रीय छात्रसेना तसंच सेवायोजनेचे विद्यार्थी आणि इतर स्वयंसेवी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते.
संविधान दिनानिमित्त आज धाराशिव इथं मतदार जनजागरण समिती आणि संविधान अमृतमहोत्सवी समितीच्या वतीने संविधान जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे, जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या हस्ते सकाळी साडे दहा वाजता हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात होईल. डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने सायंकाळी भीमगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जालना महापालिकेच्यावतीने शहरातल्या नागरीकांसह सर्व शासकीय कार्यालय, सामाजिक, राजकीय पक्षाची कार्यालय यांना संविधान उद्देशिका भेट म्हणून देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पा��चाळ यांना संविधान उद्देशिकाची फोटो फ्रेम भेट देऊन या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यासाठी महापालिकेने ६० हजार संविधान उद्देशिका छापल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं आज भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन समितीतर्फे रॅली काढण्यात येणार आहे. क्रांती चौक इथून सकाळी ११ वाजता ही रॅली निघेल.
केंद्रीय मंत्रिमंडळानं रेल्वे मंत्रालयाच्या एकूण अंदाजे सात हजार ९२७ कोटी रूपयांच्या प्रकल्पांना काल झालेल्या बैठकीत मंजूरी दिली. यात जळगाव-मनमाड चौथी मार्गिका, भुसावळ-खांडवा तिसरी आणि चौथी मार्गिका, आणि प्रयागराज-माणिकपूर तिसरी मार्गिका यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमधल्या सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या तीन प्रकल्पांमुळे, भारतीय रेल्वेच्या विद्यमान संपर्क जाळ्याचा विस्तार सुमारे ६३९ किलोमीटरने वाढणार आहे. याचा लाभ अजिंठा आणि वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला या पर्यटनस्थळांना होणार आहे. तसंच ज्योतिर्लिंग आणि धार्मिक स्थळांना हा रेल्वेमार्ग जोडला जाणार आहे. कृषी उत्पादने, खते, कोळसा, पोलाद, सिमेंट, मालवाहक कंटेनर इत्यादींच्या वाहतुकीसाठी हा आवश्यक मार्ग आहे. त्यावरील वाहतुकीची क्षमता वाढवण्याच्या कामांमुळे प्रतीवर्ष ५१ दशलक्ष टनाची अतिरिक्त मालवाहतूक होवू शकणार आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन कालपासून सुरु झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच दिवंगत खासदार वसंत चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्यसभेतही कामकाज सुरु झाल्यावर दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. अदानी उद्योग समूहाविरोधातल्या कथित लाचखोरी प्रकरणावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान, संविधानदिनानिमित्त आज संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल आयसीए जागतिक सहकार परिषदेचं दिल्ली इथं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा प्रारंभ केला. जगासाठी सहकार हे एक मॉडेल असेल पण भारतासाठी ती एक संस्कृती आहे, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वराज्य अभियानामुळे सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. महात्मा गांधीजी के ग्राम स्वराज ने सामुदायिक भागीदारी को .फिर से नई उर्जा दी। उन्होंने खादी और ग्रामोद्योग जैसे क्षेत्र मे सहकारीता के माध्यम से एक नया आंदोलन खडा क���या और आज खादी और ग्रामोद्योग को हमारी को ऑपरेटीव्हज् ने बडे बडे ब्रांच से भी आगे पहोंचा दिया है। ही परिषद सर्वांसाठी एकसंध, शांततापूर्ण आणि समृद्ध भविष्य घडवण्यासाठी सहकारी संस्थांची भूमिका जाणून घेणार आहे. या सहा दिवसीय परिषदेत भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे आणि फिजीचे उपपंतप्रधान मनोआ कामिकामिका यांच्यासह जवळपास तीन हजार विदेशी आणि भारतीय प्रतिनिधी सहभागी होत आहेत. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी या परिषदेत केलेल्या भाषणात, यंदा साजरं होत असलेलं सहकार वर्ष हे महिला, शेतकरी आणि गरीबांच्या सक्षमीकरणासाठी सहायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्रिपदासंदर्भात महायुतीतले तीनही पक्ष मिळून निर्णय घेऊ आणि राज्याला स्थिर सरकार देऊ, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल कराड इथं प्रितीसंगम या त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर अजित पवार बोलत होते. ज्यांच्या विचारधारा आणि आदर्शांवर आम्ही लोकसेवेचा वारसा पुढे नेत आहोत, चव्हाण यांच्या दूरदृष्टीतील समृद्ध महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकसेवेच्या माध्यमातून योगदान देण्याचा दृढ संकल्प आपण केला असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. विधानसभेच्या गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची तर प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
क्रिकेट बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना भारतानं २९५ धावांनी जिंकला आहे. भारतानं विजयासाठी दिलेलं ५३४ धावांचं लक्ष्य गाठतांना यजमान संघ काल सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात अवघ्या २३८ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने तीन-तीन, वॉशिंग्टन सुंदरने दोन तर हर्षित राणा आणि निशित रेड्डीने एक एक बळी घेतला. दोन्ही डावात मिळून आठ बळी घेणारा बुमराह, सामनावीर ठरला. मालिकेत पुढचा सामना सहा डिसेंबरपासून ॲडलेड इथं खेळवला जाणार आहे.
अलिगड इथं महाराणी अहिल्याबाई होळकर क्रीडा मैदानावर सुरु असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो - खो स्पर्धेत काल सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने विदर्भावर ३७-२६ अशा फरकाने विजय मिळवला. तर मुलींच्या संघाने मध्यप्रदेशवर ४०-१२ फरकाने मात केली. या स्पर्धेत कुमार आणि मुली गटातून प्रत्येकी ३० संघ सहभागी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागात जल प्रकल्पातल्या पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. यंदा पाऊस चांगला झाल्याने बहुतांश प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. या पाण्याचं पिण्यासाठी, शेतीसाठी तसंच उद्योगासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना त्यांनी दिली. दरम्यान, काही तांत्रिक कारणामुळे जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही कालव्यात उतरू नये, आपापली लहान मुले तसंच पशुधनाची काळजी घेण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या ६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी कालपासून जिल्हास्तरावरील विविध २४ केंद्रांवर सुरू झाली. नांदेड केंद्रावर १३ संघ सहभागी होणार आहेत. नांदेड शहरासह परभणी जिल्ह्यातल्या विविध संघांचे प्रयोग या केंद्रावर सादर होतील. ही स्पर्धा ६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं उद्घाटन काल गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते झालं. विचार आणि आचार संकुचित होणा-या काळात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची गरज आहे असे मत गांधी यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी अध्यक्षस्थानी प्रख्यात सिनेअभिनेते तथा चित्रपट आणि मालिकांचे दिग्दर्शक किरण माने होते. या महोत्सवात कवी संमेलन, शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गझल गायन महफिल, शेतकरी परिषद आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर, परभणी जिल्ह्यात कालपासून एकविसाव्या पशुगणनेस प्रारंभ झाला. २८ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या पशुगणना कालावधीत पशुगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकास वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असं आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आलं आहे.
0 notes
Text
0 notes
Link
#विद्या #शक्ती #शिक्षण #प्रसारक #मंडळ #येथे #वाचन #प्रेरणा #दिन #साजरा #news #marmikmaharashtra
0 notes
Text
“कोयला रोको आंदोलन” : उमरेड कोळसा खाणी समोर १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध, विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्णय
गोंदिया : विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन २०२३ अंतर्गत विदर्भ मिळवू औंदा या घोषणेची अंबलबजावणी करण्याच्या दृष्टीने ��ेट केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या कोळसा या खनिजाचे उत्पादन करून वीज/उर्जा निर्मितीकरिता देशभर जाणारा कोळसा दि. १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून उमरेड जवळील कोळसा खाणीमधून बाहेर जाणारा कोयला रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन त्या दिवशी दु. १२ वाजता सुरु…
View On WordPress
0 notes
Text
जावई नाही हो बरा
जावई नाही हो बराहवा होता गोरा ।चमकतो कसा कितीकाळा कोळसा निरा । दिवसभर असतो खातकिती जाड त्याचा घेरा ।ऐकतच नाही बिलकुलम्हटल बारीक हो जरा । डोक्यावर टक्कल आणित्याचा भिंगाचा चष्मा ।मला तर वाटते बापातो निसर्गाचाच करिश्मा । कसाही असला तरी तोबोलायला मोठा गोड ।म्हणतो कसा मला पाहाकिती झालो मी रोड ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
राज्यात ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १ : महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोली सारख्या दुर्गम भागात देशातील सर्वांत मोठा स्टील प्लांट सुरू करू शकतो, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसूलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या कोळसा आणि खनिकर्म गुंतवणूकदारांच्या राष्ट्रीय परिषदेत सांगितले. ताज…
View On WordPress
0 notes
Text
राज्यात ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १ : महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोली सारख्या दुर्गम भागात देशातील सर्वांत मोठा स्टील प्लांट सुरू करू शकतो, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसूलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या कोळसा आणि खनिकर्म गुंतवणूकदारांच्या राष्ट्रीय परिषदेत सांगितले. ताज…
View On WordPress
0 notes
Text
भारत बंदचा परिणाम महाराष्ट्रात खोलवर, कोळसा पोहोचला नाही तर अनेक भागात अंधार पडेल.
भारत बंदचा परिणाम महाराष्ट्रात खोलवर, कोळसा पोहोचला नाही तर अनेक भागात अंधार पडेल.
कोळसा पुरवठा करणारे कर्मचारी आणि कामगारही संपात उतरल्याने महाराष्ट्रात त्याचा जोरदार परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो आणि कोळशाच्या संकटामुळे अनेक भागात वीज खंडित होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सोमवारी आणि मंगळवारी भारत बंद राहणार आहे. इमेज क्रेडिट स्रोत: TV9 तेलुगु आज (सोमवार, 28 मार्च) आणि उद्या (मंगळवार, 29 मार्च) भारत बंदभारत बंद)…
View On WordPress
0 notes
Text
कोळसा खाणवाटप घोटाळा: विजय दर्डा, मनोजकुमार जयस्वाल यांच्या शिक्षेला स्थगिती
https://bharatlive.news/?p=151016 कोळसा खाणवाटप घोटाळा: विजय दर्डा, मनोजकुमार जयस्वाल यांच्या शिक्षेला ...
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 31.10.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज देशभरात राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी होत आहे. नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पटेल चौक इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.
गुजरातमध्ये केवाडिया इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. एकतानगर इथं असलेल्या पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला त्यांनी पुष्पांजली अर्पण क���ली.
आता आपण नव नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक या दिशेनं काम करत आहोत, ज्यामुळे भारताची लोकशाही मजबूत होईल, भारताच्या संसाधनांचा इष्टतम परिणाम मिळेल आणि विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी देशाला नवी गती मिळेल असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. एक राष्ट्र एक नागरी संहितेकडे देखील भारत वाटचाल करत असून, जी धर्मनिरपेक्ष नागरी संहिता असल्याचं त्यांनी सांगितलं. सरदार पटेल यांचं दिडशेवं जयंती वर्ष आजपासून सुरु झालं असून, पुढचे दोन वर्ष देश हा जयंती उत्सव साजरा करेल, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
आज आपण एकता दिवस आणि दिवाळी दोन्ही एकत्र साजरे करत असून, यामुळे भारत जगाशी जोडला जात असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
****
देशाच्या आठ प्रमुख क्षेत्रांतल्या उत्पादनात चालू वर्षात गेल्या महिन्यात दोन टक्क्यांची वाढ नोंदवल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर काळात या प्रमुख क्षेत्रांतली वाढ चार पूर्णांक दोन दशांश टक्के इतकी होती. सिमेंट, रिफायनरी उत्पादन, कोळसा, खते आणि स्टील उत्पादनात गेल्या महिन्यात चांगली वाढ झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत सिमेंट क्षेत्रातल्या उत्पादनात सात पूर्णांक एक दशांश टक्के, रिफायनरीत पाच पूर्णांक आठ दशांश टक्के वाढ झाली आहे. कोळसा क्षेत्रात दोन पूर्णांक सहा, खत क्षेत्रात एक पूर्णांक नऊ आणि स्टिल क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत एक पूर्णांक पाच दशांश टक्के वाढ नोंदवली आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी याच महिन्याच्या तुलनेत यावर्षी कच्च्या तेलाच्या उत्पादनात तीन पूर्णांक नऊ दशांश टक्के घट झाली आहे. नैसर्गिक गॅस उत्पादनातही एक पूर्णांक तीन दशांश टक्के आणि वीज क्षेत्रात अर्ध्या टक्क्यानं घट नोंदवण्यात आली आहे.
****
विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र छाननीची प्रक्रिया काल पार पडली. राज्यात २८८ पैकी २८७ मतदारसंघातल्या एकूण सात हजार ९६७ उमेदवारांपैकी, सात हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी आजपर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याचं, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने क���वलं आहे. येत्या चार नोव्हेंबरपर्यंत ��र्ज मागे घेता येणार आहेत.
****
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या ४३ मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. या टप्प्यासाठी ७४३ उमेदवार रिंगणात आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातल्या २८ मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी काल पूर्ण झाली. या टप्प्यासाठी ६३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आता उमेदवारांना एक नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. झारखंड विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याकरता १३ नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यासाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून एकंदर १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदेशीर पैसे, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू इत्यादींचा प्रामुख्यानं समावेश असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. राज्य पोलीस विभागानं सुमारे ७५ कोटी रूपये, प्राप्तिकर विभागानं सुमारे ६० कोटी रूपये, तर राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केलेल्या, सुमारे ११ कोटी रूपयांचा यामध्ये समावेश आहे. मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या सी-व्हिजील ॲपवर तक्रार करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्यानं आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.
****
पालघर जिल्ह्यालगत दादरा नगर हवेली मधून महाराष्ट्रात येणाऱ्या एका गाडीमधून पोलिसांनी काल चार कोटी २५ लाख रुपये तपासणी नाक्यावर जप्त केले. नाशिक जिल्ह्यात सातपूर पोलिस ठाणे हद्दीतील पिंपळगाव बहुला नाक्यावर एका मोटारीतून २० लाख ५० हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. तसंच उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिगारी काम करणाऱ्या एका मजुराच्या घरातून ११ लाख रुपये जप्त करण्यात आले. नवी मुंबईतल्या सीवूड्स परिसरात काल एका चार चाकी वाहनातून ८६ लाख ५० हजा��� रोख रक्कम जप्त करण्यात आली.
****
0 notes
Link
#विद्या #शक्ती #शिक्षण #प्रसारक #मंडळ #येथे #वाचन #प्रेरणा #दिन #साजरा #news #marmikmaharashtra
0 notes
Text
खाणीच्या खड्ड्यात जलसमाधी आंदोलन
चंद्रपूर: भद्रावती तालुक्यातील कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड व एम्टाद्वारा संचालित बरांज खुली कोळसा खाण येथील प्रकल्पग्रस्त (मृत) कामगारांच्या वारसदारांना अनुकंपा तत्वावर स्थायी नोकरी व नियमानुसार मिळणारे अर्थसहाय्यासाठी कंपनी प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्याकडे वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र असे करूनही न्याय न मिळाल्याने आज २५ फेब्रुवारीला सकाळपासून मृतांच्या पत्नी व नातेवाईकांनी खाणीच्या…
View On WordPress
0 notes
Text
ब्रिकेटिंग प्लांटच्या मदतीने प्रदूषण कमी करणे आणि कृषी पिकाच्या कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करणे
ब्रिकेटिंग प्लांटच्या मदतीने प्रदूषण कमी करणे आणि कृषी पिकाच्या कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करणे
ब्रिकेटिंग प्लांटच्या मदतीने कृषी पिकांच्या कचऱ्यापासून प्रदूषण कमी करणे आणि संपत्ती निर्माण करणे ब्रिकेटिंग प्लांट हे पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञान आहे जे विविध अवशेष जसे की वनीकरण, औद्योगिक आणि कृषी कचरा जैव इंधनाच्या घन ब्लॉकमध्ये रूपांतरित करते. दंडगोलाकार आकाराचे ब्रिकेट (पांढरा कोळसा) उच्च यांत्रिक दाबासह बाईंडरलेस तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले जातात. त्यासाठी कोणत्याही बाईंडर किंवा…
View On WordPress
#कचरा व्यवस्थापन#कृषी कचरा#ग्रामीण उत्पन्न#पांढरा कोळसा#पिकांचे अवशेष जाळणे#पीक अवशेष व्यवस्थापन#ब्रिकेटिंग वनस्पती
0 notes