#केरळ बातम्या
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
इस्रोचा स्पेस डॉकिंग प्रयोग यशस्वी-अशी कामगिरी करणारा भारत हा जगातला चौथा देश
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार-राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची घोषणा
आणि
हिंगोली जिल्ह्यात सारंगवाडी इथं भाजीचा महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं स्पेस डॉकिंग प्रयोगाअंतर्गत अवकाशात उपग्रहांची जोडणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. इस्रोनं सामाजिक माध्यमावर ही घोषणा केली. या तंत्रज्ञानात यश मिळवणारा भारत हा जगातला चौथा देश बनला आहे. या यशस्वी प्रयोगाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. येत्या काही वर्षांत भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारतीय वायू दल एक शानदार हवाई प्रदर्शन सादर करणार आहे. कर्तव्य मार्गावर एकूण ४० विमाने फ्लायपास्ट करतील, ज्यामध्ये वैविध्य, अचूकता आणि कौशल्याचं सादरीकरण केलं जाईल, अशी माहिती विंग कमांडर म���ीष शर्मा यांनी दिली आहे. भारताची सर्वोत्तम लढाऊ विमाने आणि शस्त्रागारातील बहुमुखी यंत्रे, या फ्लायपास्टमध्ये सहभागी होणार आहेत.
****
केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. सातव्या वेतन आयोगाचा कालावधी २०२६ मध्ये संपणार आहे, आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे आयोगाच्या शिफारशी मिळविण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले –
केंद्र सरकार के सभी कर्मचारियों के लिये 8th Pay Commission के मंजुरी दे दी है। प्रधानमंत्रीजी ने एक रेग्युलर रिदम के साथ पे कमिशन बनाने का जो एक संकल्प लिया है, उसके हिसाब 2016 मे सेवंथ पे कमिशन स्टार्ट हुआ था, तो 2026 मे इसका टर्म कंप्लिट होता है।
२०४० पर्यंत चांद्रमोहिमेसाठी ३ हजार ९८५ कोटी रुपये खर्चाच्या तिसऱ्या लाँच पॅडला मंजुरी देण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
****
न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायमूर्ती चंद्रन यांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती चंद्रन हे केरळ उच्च न्यायालयातही न्यायाधीश राहिले आहेत.
****
सरकार नागरिकांसाठी रस्ते सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं ‘रस्ते सुरक्षा-भारतीय रस्ते ॲट २०३०: सुरक्षित जागा’ या विषयावरील दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेला ते संबोधित करत होते. रस्त्यावर संपूर्ण सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी लोकांना खबरदारी घेण्याबाबत शिक्षित करण्याचे आवाहन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना केलं.
****
राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचं, मुख्यमंत्र्यांनी ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दीप प्रज्वलन करून उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रामध्ये आम्ही इनोव्हेशन सिटी ही तयार करू. ज्या प्रकारे गिफ्ट सिटी तयार झाली आहे, तशा प्रकारे इनोव्हेशनचा फोकस असलेली सर्व प्रकाराने उपयुक्त अशा प्रकारची एक इनोव्हेशन सिटी आम्ही तयार करणार आहोत. आणि अतिशय वेगाने. With the speed, we want to create this city.
महाराष्ट्र ही भारताची स्टार्टअप राजधानी असून, यात छत्रपती संभाजीनगर सह सर्वच शहरांचा मोलाचा वाटा असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. काळाची गरज ओळखून स्टार्ट अप धोरणाचा नवीन मसुदा उद्योजकांना सूचनांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक महिला संचालक राज्य असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली, ते म्हणाले –
मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्र हे आता स्टार्टअप्स मध्ये सर्वाधिक महिला डिरेक्टर असलेलं राज्य देशामध्ये झालेलं आहे, ही देखील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि देशातल्या स्टार्टअप ईकोसिस्टीमच्या पहिल्या सात राज्यामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाचं राज्य हे महाराष्ट्र आहे ही देखील आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.
****
अभिनेता सैफ अली खान यांच्यावर मुंबईतल्या राहत्या घरी हल्ला असून, सैफ यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज पहाटे सैफ अली खान यांच्या घरी दरोड्याचा प्रयत्न झाला, हा दरोडा रोखण्याच्या प्रयत्न करणाऱ्या सैफ यांच्यावर दरोडेखोराने चाकूने सहा वार केले, त्यातल्या दोन जखमा खोल आहेत. त्यामुळे सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या हल्ल्याचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या एकूण १५ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ८ आणि मुंबई पोलिसांच्या ७ पथकांचा समावेश आहे.
****
मुंबई - अमरावती, पुणे - अमरावती वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. आतापर्यंत राज्यात पुणे आणि मुंबई इथून वंदे भारत रेल्वे गाड्या धावतात, या गाड्या सोलापूर, शिर्डी, गोवा, कोल्हापूर आणि जालना शहरांमध्ये जातात.
****
प्रयागराज इथं कुंभमेळ्यात आज भव्य सांस्कृतिक महाकुंभ होत आहे. यामध्ये विख्यात कलाकार भारतीय संस्कृतीची समृद्धी दर्शवणारे कला प्रकार सादर करत आहेत. गंगा पंडालमध्ये होत असलेल्या मुख्य व्यासपीठावर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांचं विशेष सादरीकरण होत आहे. आज यमुना आणि सरस्वती मंडळांमध्ये ��ांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. २१ जानेवारीपासून त्रिवेणी पंडालमध्ये कार्यक्रम सुरू होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. यंदाचं राज्याभिषेकाचं तीनशे पंचेचाळीसावं वर्ष आहे. यानिमित्तानं सर्वत्र संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे. धुळ्यातही अभिवादन कार्यक्रम पार पडला
****
चित्रपट क्षेत्रात स्वतःचं स्था�� निर्माण करता आलं पाहिजे असं मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार तिग्मांशू धुलिया यांनी व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज दुसऱ्या दिवसी मास्टर क्लास या सदरात धुलिया यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली, कलाकाराला विद्रोही होता आलं पाहिजे असं मतही धुलिया यांनी यावेळी व्यक्त केलं. हिंदीतले प्रसिद्ध लेखक उदय प्रकाश यांच्या 'दिल्ली की दिवार' या कथेवर चित्रपट बनवणार असल्याची माहिती धुलिया यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी इथल्या डोंगरावर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी भाजीचा महाप्रसाद आयोजित केला जातो. आज या ऐतिहासिक यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली. सुमारे दीड लाख भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे –
परिसरातील शेतांमध्ये पिकलेल्या ४० प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या व कंदमुळे यांचा समावेश असलेल्या १४० क्विंटल भाजीच्या महाप्रसादाचा लाभ उपस्थित भाविकांनी घेतला. भाजीच्या महाप्रसादाचे सेवनाने वर्षभर रोगराई होत नाही अशी गाढ श्रद्धा असलेल्या भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.
****
बीड इथं महारेशीम अभियानाअंतर्गत चित्ररथाला निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात केली. हे अभियान ९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. राज्यात बीड जिल्हा रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकावर असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे –
सध्या बीड जिल्ह्यात सुमारे साडे पाच हजार शेतकरी रेशीम उद्योगात कार्यरत आहेत, कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत विभागाकडून शासनमान्य कोष खुली बाजारपेठ उभारण्यात आली असून यामध्ये होणाऱ्या कोष खरेदीत बीड जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. उसतोड कामगारांचा जिल्हा ही ओळख मागे पडून आता बीडची रेशीम उत्पादक जिल्हा म्हणून ओळख निर्माण होत आहे.
रवी उबाळे आकाशवाणी बातम्यांसाठी बीड.
****
अहिल्यानगर इथं रेशीम शेती जनजागृती अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माहिती रथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात साडे नऊशे एकर क्षेत्र नोंदणीचा लक्षांक देण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही ��पलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त परभणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या हस्ते झालं. ग्रंथ प्रदर्शन येत्या २८ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
****
0 notes
Text
हिजाबिनी ओणम लोक विद्यार्थी विद्यार्थांचा व्हिडिओ व्हायरल | केरळमधील विद्यार्थिनींनी शाळेत हिजाब घालून ओणम साजरे केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला काँग्रेस नेते शशी थरूर यांना पीआरपी ९३ ला लाईक
हिजाबिनी ओणम लोक विद्यार्थी विद्यार्थांचा व्हिडिओ व्हायरल | केरळमधील विद्यार्थिनींनी शाळेत हिजाब घालून ओणम साजरे केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला काँग्रेस नेते शशी थरूर यांना पीआरपी ९३ ला लाईक
उत्तरे के मल्प्पुरम काँग्रेसमधील वंडळ दूरवर एकामध्ये होत आहे. हा व्हिडीओ युद्धाचे युद्ध लाय शशी थरूर यांनी ट्विट केले आहे. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ मोठी पाहिला जात आहे. या व्हिडीओमध्ये वंदूर सरकारी कन्या उच्च माध्यमिक विद्यालयातील काही हिजाब परिधान विद्यार्थिनी त्यांच्या संगीतावर इतर विद्यार्थिनीं स्थानिक ओणम उत्सवाच्या नाचत आहेत. सोशल मीडियावर हजारो लोक त्या कौतुक करत आहेत.…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/56a4988c11aaa589246f7439b0e02167/ef28d0bf014cd7f0-4c/s540x810/b892c8f959222da6c51c11b36560f22a22794e5a.jpg)
View On WordPress
#काँग्रेस नेते शशी थरूर#केरळ बातम्या#केरळच्या मुली हिजाब घालून ओणम साजरा करतात#ट्रेंडिंग व्हिडिओ#मुलींचे हिजाब#व्हायरल बातम्या#व्हायरल व्हिडिओ#हिजाब#हिजाब परिधान करून ओणम साजरा करताना मुली
0 notes
Text
घरगुती इलेक्ट्रिक कार, 5 रुपयात 60 किमी धावते
घरगुती इलेक्ट्रिक कार, 5 रुपयात 60 किमी धावते
घरगुती इलेक्ट्रिक कार: गरज ही शोधाची जननी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या काळात या महागाईतून जनतेला दिलासा मिळू शकेल अशा साधनांची गरज आहे. हीच गरज लक्षात घेऊन केरळमधील एका ६७ वर्षीय व्यक्तीने अवघ्या ५ रुपयांत ६० किमीचा प्रवास करणारी इलेक्ट्रिक कार बनवली आहे. केरळच्या कोल्लम जिल्ह्यात राहणाऱ्या अँटोनी जॉनने हा पराक्रम केला आहे. त्याने आपल्या घरी इलेक्ट्रिक कार डिझाईन केली आहे. ते तयार…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ad2c4bc6fe20e5a345684dd925a11460/47fd02d380f3b2c9-9e/s540x810/8b93973dc622f3c93e1c1c5410a030bfa5572ffe.jpg)
View On WordPress
#इलेक्ट्रिक कारची किंमत#इलेक्ट्रिक वाहन विक्री#ऑटो बातम्या#ऑटो बातम्या हिंदी मध्ये#केरळ अँटनी जॉनने इलेक्ट्रिक कार बनव��ी#केरळ बातम्या#घरगुती इलेक्ट्रिक कार#भारतात इलेक्ट्रिक कारची किंमत#भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी
0 notes
Text
घटस्फोटासाठी पती-पत्नीने एक वर्ष वेगळे राहणे आवश्यक नाही, केरळ हायकोर्टाचा मोठा निर्णय
घटस्फोटासाठी पती-पत्नीने एक वर्ष वेगळे राहणे आवश्यक नाही, केरळ हायकोर्टाचा मोठा निर्णय
घटस्फोटासाठी पती-पत्नीने एक वर्ष वेगळे राहणे आवश्यक नाही, केरळ हायकोर्टाचा मोठा निर्णय Kerala high court on divorce : केरळ उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, परस्पर संमतीने पती-पत्नी घटस्फोट घे��� असल्यास त्यांना एक वर्ष वेगळे रहायला लावणे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. Kerala high court on divorce : केरळ उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, परस्पर संमतीने पती-पत्नी…
View On WordPress
#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#आवश्यक!#एक#ऑनलाईन बातम्या#केरळ:#घटस्फोटासाठी#ठळक बातम्या#ताज्या घडामोडी#नाही#निर्णय#न्यूज फ्लॅश#पती-पत्नीने#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#मोठा#राहणे#लेटेस्ट बातमी#वर्ष#वेगळे#हायकोर्टाचा
0 notes
Video
केरळ मध्ये मृत्युमुखी पडलेल्या हत्तीणीचा हृदयद्रावक व्हिडिओ #webnewswala #बातम्या #मराठी #ताज्याबातम्या #marathi #mimarathi #मराठीबोलाचळवळ #महाराष्ट्र #बातमी #news #marathinews #corona #coronavirus #coronamemes #covid #covid19 #covid_19 Please Follow Our other social Media Handle फेसबुक https://www.facebook.com/webnewswala/ Instagram https://www.instagram.com/webnewswala/ Twiter https://twitter.com/WebNewswala Helo https://m.helo-app.com/al/cdewybMYZR Share chat https://b.sharechat.com/bL1CpY2Fm5 YouTube https://www.youtube.com/channel/UCfyx9cToeIyDYIEqMy2EhyQ/about?disable_polymer=true https://www.instagram.com/p/CA_ywGrgUac/?igshid=ydg5nmd27j2k
#webnewswala#बातम्या#मराठी#ताज्याबातम्या#marathi#mimarathi#मराठीबोलाचळवळ#महाराष्ट्र#बातमी#news#marathinews#corona#coronavirus#coronamemes#covid#covid19#covid_19
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
संसदेच्या कामकाजाला आज सुरुवात होताच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एका उद्योगसमुहाचे कथित लाचखोरी प्रकरण तसंच संभल आणि मणिपूर ��रिस्थितीवर चर्चेची मागणी केली. या गदारोळातच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढल्यानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही सदनातील गोंधळानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही विरोधी पक्षाच्या खासदारांनी याच मुद्यांवर चर्चेची नोटीस सभापतींना दिली. काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी सदनात गोंधळाला सुरुवात केली. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज सुरुवातील बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते उद्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रीय दिव्यांग सशक्तीकरण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. २२ व्यक्ती आणि ११ संस्थांना नवी दिल्ली इथं होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
यावर्षी नौदल दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचं आयोजन ओडिशातील पुरी इथं करण्यात येणार आहे. परवा, चार डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली नौदल दिन साजरा करण्यात येणार आहे. नौदलप्रमुख ऍडमिरल डी के त्रिपाठी यांनी आज नवी दिल्ली इथं आयोजित पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.
आरोग्य क्षेत्राला परवडण्याजोगं आणि सुलभ करण्याला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं माध्यमांना संबोधित केलं. देशात २०१४ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ३८७ होती, ती आता ७८० एवढी झाल्याचं मांडवीय म्हणाले. आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. देशातल्या १२ कोटी नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य कवच या योजनेमुळं मिळत आहे. तसंच या योजनेची व्याप्ती वाढवून ७० वर्षांवरील नागरिकांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे, असं मांडवीय यांनी सांगितलं. दरम्यान, विकसित भारत युवा नेतृत्व संवादाचं आयोजन १२ जानेवारी या राष्ट्रीय युवा दिनी करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत तसंच युवकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मांडवीय यांनी दिली.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धोकादायक इमारतींचं २०२४-२५ या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आलं आहे. सर्वेक्षणानंतर ५२७ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या इमारतींचा वापर तत्काळ थांबवण्यात यावा असं आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. तसंच ३० वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या इमारतींचं संरचना परीक्षण महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्यांकडून किंवा संरचना अभियंत्यांकडून करून घेणं अनिवार्य करण्यात आलं आहे. इमारतींचं संरचनात्मक परीक्षण येत्या ३१ मार्च पूर्वी पूर्ण करून याबाबतचा अहवाल सादर करावा, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, यूपीआय च्या माध्यमातून महिनाभरात विक्रमी १६ पूर्णांक ५८ दशलक्ष रुपयांचे व्यवहार झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत युपीआय व्यवहारात ४५ टक्क्यांची वाढ झाली. ६३२ बँका युपीआयला जोडलेल्या आहेत.
इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये ९ फेब्रुवारी या एकाच दिवशी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी शाळा नोंदणी आणि विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात वाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क आणि अति विशेष विलंब शुल्कासह ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचं राज्य परीक्षा परिषदेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगण्यात आलं आहे.
भारतीय शेअर बाजाराला आज मोठ्या घसरणीसह सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स ४७१.५१ अंकांच्या घसरणीसह ७९ हजार ३३१ अंकांवर उघडला. एनएसई निफ्टी निर्देशांक ११९.४५ अंकांनी घसरून २४ हजार ११ अंकांवर आला आहे. सकाळच्या सत्रानंतर निफ्टीमध्ये नंतर थोडी सुधारणा दिसून आली.
फेंजल चक्रीवादळ आणि कमी दाबाच्या पट्ट्याच्या पार्श्वभूमीवर केरळ आणि तामिळनाडूला पुढील चार दिवसांसाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 12 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आजपासून केंद्र शासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली तसंच दमण आणि दीवच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज जम्पोर इथं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार आहेत. तर, उद्या त्या सिलवासा इथल्या नमो मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च इंस्टीट्यूटला भेट देणार आहे.
आरोग्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार असून कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार आहे, असं न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज यांच्या द्विसदस्यीय पीठाने काल झालेल्या सुनावणीत म्हटलं. तसंच दिवाळीच्या काळात दिल्लीत फटाक्यांवर बंदी आणण्यात अपयश का आलं अशी विचारणा प्रशासनाला करत फटाक्यांवर बंदी आणण्याबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पुण्यात प्रचार सभा घेणार आहेत. तत्पूर्वी आज दुपारी चिमुर आणि नंतर सोलापूर इथंही मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत दोन सभांना संबोधित करतील. काँग्रेस नेते राहुल गांधी हे चिखली आणि गोंदिया मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही आज सोलापूर इथं सभा आहे. भाजपनेते उप��ुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डहाणू आणि पालघर इथं सभा होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आज नाशिक जिल्ह्यात पाच सभांचं आयोजन करण्या आलं आहे.
११ राज्यांतल्या ३३ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी काल संध्याकाळी प्रचार संपला. राजस्थानमध्ये ७, पश्चिम बंगाल ६, आसाम ५, बिहार ४, कर्नाटकात ३ आणि मध्य प्रदेश-सिक्कीममधे प्रत्येकी २ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. केरळ, छत्तीसगड, गुजरात, मेघालय मधे प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध अंमलबजावणी संस्थांच्या कारवाईत १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. तर सी व्हिजिल ऍपवर आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कर्यालयानं दिली आहे.
मुंबईत नेरूळमध्ये एका घरातून २ कोटी ६० लाखां रुपयांची रोख रक्कम नवी मुंबई पोलिसांनी जप्त केली. कोल्हापूर विधानसभा मतदार संघात आतापर्यंत १० कोटी ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या मांडेसर इथं आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला, हे तिघे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी थैली मध्ये साहित्य वाटप केल्याची चित्रफित निवडणुक आयोगाच्या अधिकार्यांना प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अकोला जिल्ह्यातील मतदान पथकांना मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांपर्यंत ने-आण करण्यासाठी १९ आणि २० राज्य नोव्हेंबर रोजी मार्ग परिवहन महामंडळाच्या १२० जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ७४१ मतदान केंद्रं आहेत.
शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या सख्या बहीण भावाचा तलावाच्या पाण्यात बुडून करुण अंत झाला. भंडारा जिल्ह्यातील खडकी इथं ही दुर्घटना घडली. प्रेम राजेंद्र वाढवे (९) आणि दिव्या राजेंद्र वाढवे, वय १४ अशी मृत बहीण भावांची नावे आहेत.
प्रबोधिनी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथल्या मंदिरात श्री विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते आज पहाटे ��रण्यात आली. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरचे बाबूराव सगर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई यांना महापूजेचा मान मिळाला. सगर दाम्पत्य गेली 14 वर्ष पंढरीची वारी करत आहे. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये तीन लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.
इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार, ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नोईस यांना दिला जाणार आहे. माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. गोव्यात २० नोव्हेंबरपासून हा महोत्सव सुरू होणार असून, २८ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या महोत्सवासाठी १०१ देशा���तून १ हजार ६७६ प्रवेशिका आल्या होत्या, त्यापैकी ८१ देशातले १८० चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भारतीय सिनेमा देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं योगदान देत असल्याची माहिती माहिती प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी दिली. नव्या चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट नवोदित भारतीय दिग्दर्शक पुरस्कार यंदापासून सुरू होणार आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 04 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये सात हजार ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मात्र यापैकी किती उमेदवार माघार घेतात आणि किती उमेदवारी निवडणूक रिंगणात कायम राहतात, हे आज सायंकाळनंतरच स्पष्ट होईल. राज्यात मराठवाड्यातल्या ४६ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत, यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्या खालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात ९८, तर बीड विधानसभा मतदार संघात ९० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहिम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी मतदारसंघात प्रत्येकी सहा, तर शिवडी आणि कुडाळमध्ये प्रत्येकी सात उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांची आज काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचं कन्हेरे यांनी जाहीर केलं.
मराठा आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना त्यांनी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. कोणताही उमेदवार उभा राहणार नसल्याचं ते म्हणाले. कालपासून झालेल्या बैठकीनंतर मनोज जरांगें पाटील यांनी आज सकाळी वार्ताहरांशी बोलताना हा निर्णय जाहीर केला.
नागपूर इथं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भाजपच्या तीन निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन होणार आहे. यात दक्षिण नागपूर इथं मोहन मते यांच्या, पूर्व नागपूर इथं कृष्णा खोपडे यांच्या आणि मध्य नागपूर मतदारसंघातील प्रवीण दटके यांच्या कार्यालयांचा समावेश आहे. त्यानंतर उमेदवारांसाठी गडकरी यांच्या जाहीर सभा होणार आहेत.
महायुतीच्या प्रचाराला कालपासून प्रारंभ झाला. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबईत कुर्ला इथं शिवसेना - महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ काल पहिली प्रचार सभा घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांनाही आजपासून प्रारंभ होत आहे. पहिली जाहीर सभा डोंबिवलीत तर दुसरी ठाण्यात होणार आहे.
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस हमीभावाने खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पं��प्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून, ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना, २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भीती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत ही बाब शासनानं लक्षात घ्यावी असं पटोले यांनी या पत्रात म्हटलं आहे.
जळगाव इथं रूशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शहरातल्या चिमुकले श्रीराम मंदिरात १ हजार १५१ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर आजपासून १४व्या हॉकी इंडिया ज्येष्ठ पुरूष राष्ट्रीय स्पर्धेला सुरुवात होत आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ३१ संघ आठ गटांमध्ये सहभागी होणार आहेत. सुरूवातीला उत्तर प्रदेशचा सामना केरळ तर कर्नाटकचा सामना उत्तराखंडशी होणार आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी ही माहिती दिली.
परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात चाटोरी परिसरातील नागरिकांनी भारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसहित 'कृतज्ञता सोहळा' आयोजित करून दिवाळी साजरी केली. गावातील २५ सैनिकांचा यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह सन्मान करण्यात आला.
दिवाळी सुट्टीसाठी रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी 7435 विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. राज्यात मुंबई, पुणे, नांदेड येथून प्रवाशांसाठी या विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. रेल्वेच्या या सुविधेबद्दल प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
हवामान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्यापासून सर्वत्र हवामान सूर्यप्रकाशयुक्त कोरडं राहील.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
रेल्वे तिकिटांचं आरक्षण आता १२० दिवसांऐवजी ६० दिवस आधी करता येणार आहे. भारतीय रेल्वे विभागानं आजपासून, म्हणजेच १ नोव्हेंबरपासून हा बदल लागू केला आहे. काल ३१ ऑक्टोबरपर्यंत आरक्षित केलेल्या तिकिटांमध्ये मात्र कुठलाही बदल करण्यात येणार नाही. विदेशी पर्यटकांना रेल्वे तिकिटं ३६५ दिवस आधी, अर्थात १ वर्ष आधी आरक्षित करावी लागतात. यातही कोणताच बदल करण्यात आलेला नाही. या नवीन आरक्षण प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि संग्रह कमी होईल, प्रवाशांसाठी अधिक तिकिटं उपलब्ध राहतील आणि तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार, पद्मश्री विवेक देबरॉय यांचं आज सकाळी निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलगुरू पद���वरून अजित रानडे यांना हटवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर, देबरॉय यांनी सप्टेंबर महिन्यात कुलपतीपदाचा राजीनामा दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबरॉय यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘देबरॉय हे ज्ञानी व्यक्तिमत्व होतं. अर्थकारण, इतिहास, संस्कृती, अध्यात्म अशा विविध विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून देशाची ध्येयधोरणं ठरवण्यात ते पारंगत होते, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ, हरयाणा आणि मध्यप्रदेश या राज्यांचा आज स्थापना दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही राज्यातल्या नागरिकांना सामाजिक माध्यमांवरील संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
****
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज ६२ रुपयांची वाढ झाली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. विमानाचं इंधन, म्हणजेच ATF च्या किमतीत ३ हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
****
शिवसेना शिंदे गटाचे मुंबईतले माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी, आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं आज पुन्हा म्हटलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून, भारतीय जनता पक्षानं त्यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, असं सरवणकर यांनी सांगितलं.
****
शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित वाळवावं, त्यातलं आर्द्रतेचं प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची, तसंच ते सोयाबीन एफ-ए-क्यू दर्जाचं असल्याची खात्री करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने केलं आहे. विक्रीकरिता आणलेलं सोयाबीन जास्त आर्द्रतेमुळे परत नेण्याची वेळ येऊ नये, यासाठी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि अधिमान्यता परिषद-नॅकच्या वतीनं काल अपेक्षित गुणनिकष पूर्ण केल्याबद्दल 'ए-प्लस' मानांकन जाहीर करण्यात आ��ं आहे. मराठवाड्यात बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन विद्यापीठ पुढे जात असून, आगामी काळात देखील विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करू अशी भावना, कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी व्यक्त केली आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून मुंबईत वानखेडे स्टेडीयमवर खेळला जात आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत न्युझीलंडच्या तीन बाद १२५ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडने या मालिकेतले दोन सामने जिंकून दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर हवामान कोरडं राहील, असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळी, तर सांगलीत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातल्या मिरज, तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि पलूस तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी आज सकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
जागतिक भवितव्याला आकार देण्यात भारत पुढाकार घेत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. एका खाजगी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेला पंतप्रधानांनी आज संबोधित केलं. जग एआयला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून ओळखत असताना, आपल्या देशासाठी एआय म्हणजे आकांक्षी भारत असल्याचं मोदी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या पहिल्या १२५ दिवसांत नऊ लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधांविषयीचे प्रकल्प मंजूर करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. तसंच १५ नव्या वंदे भारत रेल्वेंची सुरुवात, आठ विमानतळांचे बांधकाम, पाच लाख घरांवर सौरछत आणि ९० लाखांहून अधिक वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.
****
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजन आणि प्रशिक्षण यासंदर्भात या बैठकीत विचारविनिमय होईल. सर्व प्रदेशाध्यक्ष, संघटना महामंत्री आणि राजकीय पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. विद्यमान अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार नड्डा यांनी संघटनात्मक निवडणुकांसाठी निवडणूक अधिकारी सहअधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
****
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसंदर्भात आज काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. दोन्ही राज्यांच्या उमेदवारांच्या निवडीबाबत या बैठकीत विचारमंथन होणार आहे. मात्र दोन्ही राज्यातल्या निवडणुकांसाठी काँगेसनं अद्याप एकाही उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं नाही. महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या एका समितीनं केंद्रीय निवडणूक समितीच्या विचारार्थ ६२ उमेदवारांच्या यादीला मंजुरी दिली होती. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी संयुक्त जनता दलानं दोन उमेदवार जाहीर केले आहेत.
****
��ोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शहीद पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते.
****
बुलडाणा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने तिनही विद्यमान आमदारांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. जळगाव जामोद मतदारसंघातून डॉ संजय कुटे, खामगाव मधून विधीज्ञ आकाश फुंडकर आणि चिखलीमधून श्वेता महाले निवडणूक लढवणार आहेत.
****
पुण्यातल्या मंडई मेट्रो स्थानकात तळमजल्यावर फोमच्या साहित्याला लागलेली आग आटोक्यात आली आहे. या आगीचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. मध्यरात्री या ठिकाणी आग लागल्यानंतर तातडीनं अग्निशमन दलानं ५ वाहनांच्या मदतीनं आग आटोक्यात आणल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
सामान्य नागरिकांसाठी किफायतशीर दराने विमानप्रवास उपलब्ध करुन देणाऱ्या उडाण योजनेला आज आठ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी संबोधित केलं. या योजनेअंतर्गत ३४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ६०१ हवाईमार्गांनी जोडले आहेत. तर, आतापर्यंत एक कोटी ४४ लाख प्रवाशांना या योजनेचा लाभ झाला आहे.
****
येत्या २४ तासांत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर आणि उत्तर अंदमान समुद्रालगतच्या भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच उद्या कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ बुधवारपर्यंत तयार होईल आणि गुरुवारी ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीवर ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह धडकेल असंही विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठला आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमसाठीचा दर ७८ हजार ४०० रुपये आहे, तर एक किलो चांदीचा दर ९८ हजार १९० रुपये आहे. आज, देशांतर्गत शेअर बाजारात चांगली खरेदी दिसून येत असून सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांत वाढ नोंदवली. सुरुवातीला निफ्टीने वाढीसह २४,९५० चा टप्पा पार केला तर सेन्सेक्समध्ये ४०० हून अधिक अंकांची वाढ दिसून आली.
****
भारताच्या दीपिका कुमारीने मेक्सिकोमध्ये झालेल्या तिरंदाजी विश्वचषक़ स्पर्धेत महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे. दीपिकाला अंतिम फेरीत चीनच्या ली झियामनकडून पराभव पत्करावा लागला. तिरंदाजी विश्वचषकात दीपिकाकुमारीनं पाचव्यांदा उपविजेतेपद पटकावलं आहे.
****
काश्मीर खोऱ्यात श्रीनगरमध्ये काल पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पोलो मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन आणि २१ किलोमीटर अर्ध मॅरेथॉनमध्ये देशभरातील सतराशेहून अधिक धावपटू आणि १२ परदेशातील खेळाडूंनी भाग घेतला.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्��ादेशिक बातम्या
दिनांक: १८ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर हुसैन राणाला भारताच्या ताब्यात देण्याचा निर्णय अमेरिकेच्या अपील न्यायालयानं दिला आहे. भारत-अमेरिका उभय देशातल्या हस्तांतरण करारानुसार सध्या लॉस एंजलिसच्या तुरूंगातील राणाचं हस्तांतरण होऊ शकतं. राणा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या डेविड हेडलीशी संबंधित असून, त्याचा पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयशी संबंध असल्याचाही आरोप आहे.
****
नागरिकत्व सुधारणा अधिनियम अर्थात सीएए अंतर्गत विस्थापीत १८८ हिंदूंना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज अहमदाबाद इंथ एका कार्यक्रमात भारताचं नागरिकता प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. गुजरातच्या दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री शाह यांनी अहमदाबाद महापालिकेच्या अनेक विकास कामांचं उद्धाटन आज सकाळी केलं.
****
मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी आज विजा आणि जोराच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांत पश्चिम बंगालसह हिमालयाशी जोडलेला भाग ईशान्येकडील राज्ये तसंच केरळ,तमिलनाडु आणि लक्षद्वीपमध्येही तीव्र स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
काँग्रेस पक्षातर्फे परवा मंगळवारी वीस ऑगस्टला माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी मुंबई इथं कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष-राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसह कॉंग्रेसचे वरीष्ठ नेते उपस्थित असणार आहेत.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तब्बल पावणे पाच कोटी रुपये किंमतीचं अंमली पदार्थ कोकेन जप्त करत आरोपीला ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. इथिओपिया एयरलाईन्स विमानातून प्रवास करणाऱ्या केनियन इसममाची तपासणी केली असता अंमली पदार्थाच्या गोळ्या शरीतून लपवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
****
छत्रपती संभाजीनगर इंथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं ६६ व्या वर्धापनदिनी देण्यात येणारा जीवनसाधना पुरस्कार ज्येष्ठ लोककलावंत पां��ुरंग घोटकर यांना जाहीर केला आहे. हा पुरस्कार वर्धापनदिनी २३ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान केला जाणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारनं सढळ हस्ते मदत केल्यानं गेल्या चार महिन्यात एक लाख कोटींची गुंतवणूक राज्यात झाली. राज्यात मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींचा निधी मंजूर झाल्यानं राज्यात जगातील सर्वात मोठं मेट्रोचं जाळं पुण्यासह मुंबई परिक्षेत्रात विणलं जात असल्याचं शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने राज्याला काय दिलं असे विचारणाऱ्या विरोधकांवर खासदार देवरा यांनी या माहितीद्वारे उत्तर दिलं. वाढवण बंदरासाठीच्या निधीचाही यात समावेश असल्याचं देवरा म्हणाले.
****
भारतानं आर्थिक राष्ट्रवाद स्वीकारुन उद्योग, व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राने टाळता येण्यासारखी आयात टाळत स्थानिक उत्पादनास प्राधान्य देण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते काल व्यंकटचलमच्या स्वर्ण भारत ट्रस्ट इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. देशाचं चलन भांडार रितं होण्यासह भारतीय कामगारांच्या रोजगाराच्या संधी कमी होणं आणि उद्योजकतेच्या विकासामध्ये होणारा अडथळा यामुळे आयातीचा अर्थव्यवस्थेवर होणारा नकारात्मक परिणाम याद्वारे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केला. एक देश म्हणून, आपल्याला दीर्घकालीन राष्ट्रीय हितांऐवजी सहज-झटपट आर्थिक लाभाला प्राधान्य देणं परवडणारं नाही असही ते म्हणाले.
****
चीनमध्ये चेंगडू इथं परवा मंळवारी वीस तारखेपासून सुरू होणाऱ्या १५ आणि १७ वर्षांखालील कनिष्ठ गट आशियाई अजिंक्य पद बडमिंटन स्पर्धेसाठी भारताचा ३९ खेळाडूंचा संघ रवाना झाला आहे.मागिल वर्षी या स्पर्धेत भारतानं एका सुवर्णासह तीन पदकं पटकावली होती.दरम्यान, पुढील वर्षी कनिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्य पद स्पर्धेचं यजमानपद भारतानं स्वीकारलं आहे
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 04 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०४ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
पश्चिम घाट परिसर ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करणारी मसुदा अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी
अन्य राज्यातल्या आयुर्वेदिक पदवीधरांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
राष्ट्रीय अवयवदान दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा उपान्त्य फेरीचा सामना
आणि
नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून जायकव��डीसाठी आत्तापर्यंत पाच हजार दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग
****
पश्चिम घाट क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या महाराष्ट्रासह सहा राज्यांमधल्या ५६ हजार ८०० चौरस किलोमीटर पेक्षा जास्त परिसराला, ‘पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन मसुदा अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या सहा राज्यांचा यात समावेश आहे. या संदर्भात सरकारनं जनतेकडून येत्या साठ दिवसांमध्ये सूचना आणि हरकती मा��वल्या असून, नागरिक [email protected] या संकेतस्थळावर त्याची नोंद करू शकतात. सहा राज्यातला हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यानंतर या भागात उत्खनन, खाणकाम आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास, आदी कामांवर बंधनं येतील, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
अन्य राज्यातून बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन बी ए एम एस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. काल मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. या विद्यार्थ्यांना आता राज्याच्या शासकीय आणि खाजगी अनुदानित ८५ टक्के तसंच खाजगी विना अनुदानित ७०टक्के कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे.
****
राज्यातल्या सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसह १६३ शासकीय तंत्र विद्यालयातल्या संविधान मंदिरांचं, येत्या १५ ऑगस्टला एकत्रित दूरदृश्य पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य कौशल्य विद्यापीठ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याठिकाणी विद्यार्थ्यांना घटनात्मक अधिकार समजण्यासाठी कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. २६ जूनला संविधान मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला होता.
****
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग आणि आयुष संचालनालय यांच्यावतीनं काल राष्ट्रीय अवयवदान दिन पाळण्यात आला. मुंबईत विधानसभा अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर यांच्या हस्ते अवयवदान जनजागृती प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय - घाटीच्या वतीनं गेल्या जवळपास महिनाभर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वक्तृत्व, भित्तीपत्रक, रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात आल्या. काल जनजागृती फेरीने या उपक्रमांचा समारोप झाला. जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार, घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांच्या उपस्थितीत निघालेली ही जनजागृती फेरी शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, पुन्हा घाटी रुग्णालयात विसर्जित झाली. अवयवदानाविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता पालकमंत्री सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली.
धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबसे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमानंतर अवयवदान जनजागृती ��ेरी काढण्यात आली. यावेळी पथनाट्य, काव्यवाचन, घोषणा, वक्तृत्व, रांगोळी यासारख्या उपक्रमांमधून अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात आली, तसंच सर्वांना अवयवदानाची शपथ देण्यात आली.
****
नांदेड इथं डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या वतीने काल सकाळी जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी झाले.
****
पत्री सरकारचे जनक, महान स्वातंत्र्यसेनानी आणि बीडचे माजी खासदार क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाणे इथल्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसन सोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता हा सामना सुरु होईल. भारतीय हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीत आज ब्रिटनसोबत लढत होणार आहे.
दरम्यान, काल या स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हिला २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकाराच्या अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. मनूने या स्पर्धेत आतापर्यंत दोन कांस्यपदकं मिळवली आहेत. भारताच्या दीपिका कुमारीला तिरंदाजीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तर नेमबाजीतही महिला एकेरीत भजन कौरचा पराभव झाला.
****
भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज होत आहे. कोलंबो इथं दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत परवाचा पहिला सामना अनिर्णित राहिला होता.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नियोजन करतांना शिक्षण आणि आरोग्य या घटकांना प्राधान्य देऊन सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गेल्या वर्षाचा आर्थिक अहवाल सादर करण्यात आला, तसंच २०२४-२५ या वर्षासाठी ७७३ कोटी ९० लाख रुपयांच्या खर्चाला मंजूरीही देण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या ६७२ कोटी ११ लक्ष ३७ हजार रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली.
दरम्यान, सिल्लोड, सोयगाव तालुक्यातल्या जलसंधारण प्रकल्पांचा पालकमंत्री सत्तार यांनी काल आढावा घेतला. घाटनांद्रा बंधाऱ्यावरील प्रकल्पाची पुनर्रचना आणि बांधणी करण्यासाठी प्रकल्पाचा आराखडा तयार करून तात्काळ मंजुरी घ्यावी आणि जलसंधारणाचं काम पूर्ण करावे, असे निर्देश सत्तार यांनी यावेळी जलसंपदा विभागाला दिले.
****
परभणी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत चालू आर्थिक वर्षांत नागरिकांना विविध योजनासांठी ३४५ कोटी रुपयांच्या विकास कामांना पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील स्थानिक गरजा लक्षात घेत, लोकप्रतिनधींशी समन्वय साधून विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना बनसोडे यांनी दिल्या.
****
लातूर पोलीस दलाच्या दामिनी पथकातर्फे तयार करण्यात आलेल्या 'इंस्पेक्टर दामिनी' या चित्रमय पुस्तकाचं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकात छोट्या गोष्टी आणि चित्रांच्या माध्यमातून दामिनी पथक आणि ११२ या मदत क्रमांकाच्या सेवेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
****
राज्य सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा १५ ऑगस्टपासून जुन्या जालन्यातील गांधी चमन इथं आमरण उपोषण करण्याचा इशारा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी दिला आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं समितीची राज्यव्यापी बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविड संसर्ग झालेले नवे पाच रुग्ण आढळले. यामध्ये एक पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. सध्या शहरात कोविडचे १६ सक्रीय रुग्ण आहेत, वयोवृद्ध नागरिकांनी तसंच रक्तदाब-मधुमेहाचा इतिहास असणाऱ्या रुग्णांची काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, असं आवाहन करण्यात आला आहे.
****
नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीसाठी आत्तापर्यंत पाच हजार दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या नांदूर-मधमेश्वर,दारणा धरणांमधून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण ७५ टक्के भरलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात रात्री पावसाच्या तुरळक सरी बरसल्या मात्र, रात्री उशिरा हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.
दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवसांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबई, ठाणे, कोकण, आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
पश्चिम घाट परिसर ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करणारी मसुदा अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी
सर्वोच्च न्यायालयाच्या लोक अदालतीमध्ये एक हजारांहून अधिक खटले निकाली
अन्य राज्यातल्या आयुर्वेदिक पदवीधरांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
राष्ट्रीय अवयवदान दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा
आणि
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकारात नेमबाज मनू भाकरला पदकाची हुलकावणी
****
पश्चिम घाट क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या महाराष्ट्रासह सहा राज्यांमधल्या ५६ हजार ८०० चौरस किलोमीटर पेक्षा जास्त परिसराला ‘पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन मसुदा अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या सहा राज्यांचा यात समावेश आहे. या संदर्भात सरकारनं जनतेकडून येत्या साठ दिवसांमध्ये सूचना आणि हरकती मागवल्या असून नागरिक [email protected] या संकेतस्थळावर त्याची नोंद करू शकतात.
सहा राज्यातला हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यानंतर या भागात उत्खनन, खाणकाम आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास, आदी कामांवर बंधनं येतील, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या लोक अदालतीमध्ये एक हजारहून अधिक खटले निकाली निघाले आहेत. याअंतर्गत दिवाणी, भूसंपादन आणि विवाहविषयक अनेक खटले मार्गी लागले अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचं ७५ वं स्थापना वर्ष साजरं करण्यासाठी न्यायालयानं हाती घेतलेल्या विशेष लोक अदालत उपक्रमाचा आज अखेरचा दिवस आहे.
****
जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं ३२व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं, त्या वेळी ते बोलत होते. देशात रसायनमुक्त, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या परिषदेत सुमारे ७५ देशांच्या एक हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. ‘शाश्वत कृषी-अन्न प्रणालीच्या दिशेने परिवर्तन’ ही ��ावर्षीची परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे.
****
अन्य राज्यातून बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज वर्षा या निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. या विद्यार्थ्यांना आता राज्याच्या शासकीय आणि खाजगी अनुदानित ८५ टक्के तसंच खाजगी विना अनुदानित ७० टक्के कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
****
राज्यातल्या सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, १६३ शासकीय तंत्र विद्यालयातील संविधान मंदिरांचं, येत्या १५ ऑगस्टला एकत्रित दूरदृश्य पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य कौशल्य विद्यापीठ इथं झालेल्या प��्रकार परिषदेत ही माहिती दिली. याठिकाणी विद्यार्थ्यांना घटनात्मक अधिकार समजण्यासाठी कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. २६ जूनला संविधान मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला होता.
****
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग आणि आयुष संचालनालय यांच्यावतीनं आज राष्ट्रीय अवयवदान दिन पाळण्यात आला. यानिमित्त राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुष महाविद्यालयामार्फत अवयवदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
मुंबईत विधानसभा अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर यांच्या हस्ते अवयवदान जनजागृती प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विभागाद्वारे अवयवदात्यांचा गौरव करण्यात आला. अवयवदान मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन नार्वेकर यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय - घाटीच्या वतीनं गेल्या जवळपास महिनाभर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वक्तृत्व, भित्तीपत्रक, रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात आल्या. आज जनजागृती फेरीने या उपक्रमांचा समारोप झाला. जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार, घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांच्या उपस्थितीत निघालेली ही जनजागृती फेरी शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, पुन्हा घाटी रुग्णालयात विसर्जित झाली. अवयवदानाविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता पालकमंत्री सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली.
धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबसे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमानंतर अवयवदान जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी पथनाट्य, काव्यवाचन, घोषणा, वक्तृत्व, रांगोळी यासारख्या उपक्रमांमधून अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात आली. तसंच सर्वांना अवयवदानाची शपथ देण्यात आली.
****
नंदुरबार शहरातूनही आज अवयवदान दिनानिमित्त जनजागृती फेरी काढण्यात आली. यात शासकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग होत अवयवदाना विषयी जनजागृती केली. यावेळी भित्तीपत्रक, रांगोळी यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं.
****
बीडचे माजी खासदार क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे इथल्या निवासस्थानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
****
पॅरीस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आज आठव्या दिवशी भारताची नेमबाज मनू भाकर हिला २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकाराच्या अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मनूने या स्पर्धेत आतापर्यंत दोन कांस्यपदकं मिळवली आहेत. भारताच्या दीपिका कुमारीने तिरंदाजीमध्ये महिला गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. नेमबाजीत महिला एकेरीत भजन कौरचा इंडोनेशियाच्या दयानंद कोइरुनिसाकडून पराभव झाला. बॉक्सिंगमध्ये, निशांत देव आज रात्री पुरुषांच्या ७१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत मेक्सिको विरुद्ध खेळणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नियोजन करतांना शिक्षण आणि आरोग्य या घटकांना प्राधान्य देऊन सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गेल्या वर्षाचा आर्थिक अहवाल सादर करण्यात आला, तसंच २०२४-२५ या वर्षासाठी ७७३ कोटी ९० लाख रुपयांच्या खर्चाला मंजूरीही देण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या ६७२ कोटी ११ लक्ष ३७ हजार रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली.
दरम्यान, सिल्लोड, सोयगाव तालुक्यातल्या जलसंधारण प्रकल्पांचा पालकमंत्री सत्तार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीत आढावा घेतला. घाटनांद्रा बंधाऱ्यावरील प्रकल्पाची पुनर्रचना आणि बांधणी करण्यासाठी प्रकल्पाचा आराखडा तयार करून तात्काळ मंजुरी घ्यावी आणि जलसंधारणाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश सत्तार यांनी यावेळी जलसंपदा विभागाला दिले.
****
लातूर पोलीस दलाच्या दामिनी पथकातर्फे तयार करण्यात आलेल्या 'इंस्पेक्टर दामिनी' या चित्रमय पुस्तकाचं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. जिल्ह्यात चाकूर तालुक्यात जानवळ इथल्या जनार्धनराव राजेमाने आश्रमशाळेत झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब माने, प्राचार्य निलेश राजेमाने, दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले, आदर्श मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकात छोट्या गोष्टी आणि चित्रांच्या माध्यमातून दामिनी पथक आणि ११२ या मदत क्रमांकाच्या सेवेबद्दल सविस्तर माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे. विद्यार्थिनींना अडचणीच्या वेळी दामिनी पथकाच्या माध्यमातून मदत घेण्याचं आवाहन पोलिस अधीक्षक मुंडे यांनी यावेळी केलं.
****
राज्य सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा १५ ऑगस्टपासून जुन्या जालन्यातील गांधी चमन इथं आमरण उपोषण करण्याचा इशारा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं समितीची राज्यव्यापी बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीला ३० जिल्ह्याचे समन्वयक उपस्थित होते. ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आ��्थिक महामंडळ स्थापन करावं, समाजातील विद्यार्थांसाठी प्रत्येक जिल्हयात वसतीगृह उभारावं, सर्वांना मोफत शिक्षण द्यावं, पौरोहित्य करणाऱ्यांना प्रतिमहा पाच हजार रुपये मानधन द्यावं, आदी मागण्या समितीने केल्या आहेत.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणखी चार उमेदवार जाहीर
नांदेड जिल्ह्यातल्या दोन लाखाहून अधिक महिलांची शंभर टक्के मतदान करण्याची शपथ
आणि
छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी परिसरातल्या एका कापड दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा होरपळून मृत्यू
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपत असून, सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार शक्तिप्रदर्शन करत आ��ले अर्ज दाखल करत आहेत.
केरळ मधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी कलपेट्टा इथं एका रोड शोचं नेतृत्व केलं. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, के सी वेणुगोपाळ आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते.
****
नांदेड लोकसभा मतदारसंघात आज नऊ अर्ज दाखल झाले असून, आतापर्यंत १९ उमेदवारांचे २० अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. यावेळी माजी मंत्री अमित देशमुख उपस्थित होते.
परभणी लोकसभा मतदरासंघात आज १८ उमेदवारांनी ३० अर्ज दाखल केले. यामध्ये स्वाभिमानी पक्षाचे किशोर ढगे यांचा समावेश आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षातले नेते यावेळी उपस्थित होते. पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत धोत्रे यांनी शक्तिप्रदर्शन करुन हा अर्ज दाखल केला.
वर्धा इथं भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
अमरावती इथं प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं.
यवतमाळ लोकसभा मतदरासंघात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख यांच्यासह चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या मतदारसंघात आतापर्यंत आठ अर्ज दाखल झाले आहेत.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात आज सहा उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर, पालघर - भारती कामडी, जळगाव - करण पवार आणि हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाविकास आघाडीतल्या जागावाटपानुसार आम्ही उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत, मुंबईत उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मित्रपक्ष काँग्रेसने निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले.
****
दरम्यान, जळगावचे भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मुंबईमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार पाटील यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं.
****
बळीराजा पक्षानेही आज सात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. लातूर लोकसभा मतदारसंघातून शंकर तडाखे, तर परभणीतून कैलास पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेक इथून संविधान लोखंडे, मावळ- संभाजी गुणाट, हातकणंगले - शिवाजीराव माने, तर सांगली इथून आनंदराव नालगे -पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांनी आज सांगली इथं दिली.
****
आगामी लोकसभा निवडणूक शांततापूर्ण वातावरणात आणि को��त्याही प्रलोभनांना बळी न पडता पार पाडण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. आयोगानं आज राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या कायदा अंमलबजावणी संस्थाची आढावा बैठक घेतली, त्यात हे निर्देश देण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था स्थिती, अनुचित प्रकारांना आळा घालणं तसंच आंतरराज्यीय सीमा आणि आंतरराष्ट्रीय सीमांवर देखरेख याबद्दलचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
****
राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
राज्यसभेच्या नवनिर्वाचित उमेदवारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी, केंद्रीय मंत्री डॉ एल मुरुगन यांच्यासह महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे आणि मेधा कुलकर्णी यांना सदस्यत्वाची शपथ दिली. माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह यांच्यासह ५६ राज्यसभा सदस्यांनी या आठवड्यात आपला कार्यकाळ पूर्ण केला.
****
इयत्ता पहिली, दुसरी, सातवी, आठवी, दहावी आणि बारावीची ३३ लाख शालेय पाठ्यपुस्तकं देशभरातल्या पुस्तक विक्रेत्यांकडे पाठवल्याचं राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं म्हटलं आहे. अन्य इयत्तांची पुस्तकं या महिन्यात उपलब्ध होतील, त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी घाबरण्याचं कारण नाही, असंही परिषदेनं म्हटलं आहे. बाजारात पुस्तकं उपलब्ध नसल्याच्या वृत्तांवर परिषदेनं आज हे स्पष्टीकरण दिलं.
****
नांदेड जिल्ह्यात वडेपूरी इथं आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत महिला बचत गटांसाठी मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला. लोकशाही बळकटीकरणासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या मोहिमेअंतर्गत आज जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात सुमारे दोन लाखाहून अधिक महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी परिसरातल्या एका कापड दुकानाला भीषण आग लागून एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कपड्याच्या दुकानात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक बाईकच्या चार्���रचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं अग्नीशमन दलानं सांगितलं. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. दुकानाला आग लागली तेव्हा हे सर्व वरच्या मजल्यावर झोपलेल�� होते, त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या हट्टा जवळील चिखली फाटा इथं कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. गयाबाई आणि शिवाजी भालेराव अशी मृतांची नावं असून, आज सकाळच्या सुमारास परभणीकडे जात असताना हा अपघात झाला.
****
धर्माबाद -मनमाड मराठवाडा एक्सप्रेस येत्या सात आणि दहा एप्रिल रोजी धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या दिवशी ही गाडी मनमाडला जाण्यासाठी धर्माबाद ऐवजी नांदेड इथून सुटेल. आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ही गाडी एक एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान दादरपर्यंतच धावणार आहे. तसंच औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस नऊ एप्रिल रोजी औरंगाबाद येथून वेळेवर सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसपंर्क कार्यालयानं दिली आहे. नांदेड ते एरोड विशेष गाडीला येत्या ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
थायलंड मधल्या फुकेत इथं सुरू असलेल्या जागतिक महिला भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या इंद्रायणी देवीनं ५९ किलो वजनी गटात आज कांस्य पदक पटकावलं. देवीनं एकूण १९६ किलो वजन उचललं. उत्तर कोरियाच्या कँग ह्यॉन ग्याँगला सुवर्ण आणि वॅलेंशियाच्या कँबी मिहेलाला रौप्य पदक मिळालं. राष्ट्रकूल स्पर्धेत इंद्रायणी देवीनं रौप्य पदक पटकावलं होतं.
****
नाशिक जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून, सात तालुक्यातल्या २०३ गावं आणि ४३६ वाड्यांना २१० टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तसंच टँकर आणि गावांसाठी जिल्ह्यातल्या ६७ खाजगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातही भीषण पाणी टंचाई असून, नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 03 March 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०३ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचं आणि राज्याचं भविष्य घडवण्याची मोठी संधी - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या भूखंड विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा खासदार इम्तियाज जलिल यांचा आरोप
आणि
नांदेड जिल्ह्यात दुचाकीच्या अपघातात बारावीच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
****
नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचं आणि राज्याचं भविष्य घडवण्याची एक मोठी संधी मिळाली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बारामती इथं काल नमो महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यापूर्वी नागपूर, लातूर आणि अहमदनगर इथं मेळावे झाले, बारामतीतला हा मेळावा सर्व विक्रम मोडणारा असून, यातून २५ हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी बारामतीचं बस स्थानक, बऱ्हाणपूरच्या पोलीस उप - मुख्यालय इमारतीसह बारामती तालुक्यातल्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, यावेळी उपस्थित होते.
राज्य सरकारनं रोजगाराच्या समस्येकडे लक्ष दिल्याबद्दल ��रद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रसंगी, सरकारच्या विविध उप्रकमांची माहिती दिली. पुढचा रोजगार मेळावा ठाणे इथं सहा आणि सात मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातल्या वढु बुद्रुक इथल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या विकासकामाचं भूमिपूजन देखील काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
****
भारतीय जनता पक्षानं काल लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये उत्तर प्रदेश मधून ५१, मध्य प्रदेश २४, पश्चिम बंगाल २०, गुजरात आणि राजस्थान मधून प्रत्येकी १५, केरळ १२, आसाम, झारखंड आणि छत्तीसगड मधून प्रत्येकी ११, तेलंगणा नऊ, दिल्ली पाच, उत्तराखंड तीन, जम्मू कश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमधून प्रत्येकी दोन, तर गोवा, त्रिपुरा, अंदमान निकोबार, आणि दमन दिव मधून प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कोटा मतदारसंघातून, अमित शहा गांधीनगरमधून, राजनाथ सिंग लखनऊ, स्मृती इराणी अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत.
****
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक संकल्पपत्रासाठी महाराष्ट्रातून १० लाख सूचना पाठवणार असल्याची माहिती, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यभरातले भाजपाचे ३३ हजाराहून अधिक कार्यकर्ते सूचनापत्राची पेटी घेऊन घरोघरी जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. येत्या चार तारखेला नागपूर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. तर केंद्��ीय गृहमंत्री अमित शाह पाच तारखेला अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या कार्यक्रमात सहभागी होतील असं बावनकुळे म्हणाले.
****
नवमतदारांसाठी मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो. यंदा पहिल्यांदा मतदान करणारे छत्रपती संभाजीनगर इथले साक्षी वैद्य आणि कैवल्य जोशी यांनी मतदान करणार असल्याचा संकल्प केला,
****
देशातल्या तेहतीस साखर कारखान्यांच्या, एक हजार ३७८ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्बांधणी करण्याला मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे ६१९ कोटी रुपयांचं अतिरिक्त व्याज पुर्णपणे माफ होणार आहे. या एकूण थकीत कर्जामध्ये महाराष्ट्रातल्या कारखान्यांचं जवळपास ८६१ कोटी रुपये कर्ज थकीत होतं.
****
विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यवसाया��िमुख शिक्षण देण्यासाठी, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, राज्यात सर्वच शैक्षणिक संस्थांनी येत्या जूनपासून करावी, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल नाशिक इथं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आनंदशाळा, या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यासोबतचं मुलींना येत्या १ जूनपासून सर्व शिक्षणाचा लाभ मोफत मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सहकार विभागानं राज्यातल्या सुमारे ३८ हजाराहून अधिक सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लागणारा कर्मचारी वर्ग लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत नागरिकांनी आपल्या शून्य ते ५ वर्ष वयोगटातल्या बालकांचं लसीकरण करण्याचं आवाहन, प्रशासनानं केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत, सुमारे दोन लाख बालकांना पोलिओ डोस देण्याकरीता ६८९ पोलिओ बूथ उभारण्यात आले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात एकूण एक हजार ३४१ लसीकरण केंद्र, नांदेड जिल्ह्यात दोन हजार ७६७, लातूर शहरात २१५ पोलिओ लसीकरण केंद्रांसह, तीन फिरती पथकं, तर जालना इथं एक हजार ५२१ बुथ तसंच १०९ फिरत्या पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या भूखंड विक्रीमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप, खासदार इम्तियाज जलिल यांनी केला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या औद्योगिक वसाहतीत विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेझ च्या अंतर्गत एका बड्या कंपनीनं २००७ मध्ये २३२ एकर भुखंड संपादित केला होता. त्यावर मोठा प्रकल्प उभारण्यात येणार होता मात्र आता या भूखंडाची परस्पर विक्री होत असल्याचं खासदार जलिल यांनी सांगितलं. याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी करत त्यांनी, औद्योगिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातल्या दहेली तांडा नजिक काल, दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर, एक जण गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त तिघे जण, आपला बारावीच्या परीक्षेचा पेपर देवून माहूर तालुक्याच्या अंजनखेड इथून एकाच दुचाकीवरुन वापस येत होते. दुपारच्या सुमारास दुचाकी दहेली तांडा गावाजवळ आली असता, एका वळण रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटून, ती झाडावर आदळली. गावातल्या प्राथमिक उपचार केंद्रात उपचारानंतर त्यांना यवतमाळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र यावेळी दोघांना मृत घोषित करण्यात आलं.
****
शेतकऱ्यांच्या हिताच्या केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत, शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देत, शेती समृद्ध करण्याचं आवाहन, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. जालना इथं कृषी विभागातर्फे आयोजित 'गोदा समृध्दी जालना कृषी महोत्सवाला' काल दानवे यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. महोत्सवातल्या विविध कृषी विषयक दालनांना भेट देउन, त्यांनी शेतक-यांसोबत चर्चाही केली.
****
लातूर जिल्ह्यात पाणी पुरवठ्याचं सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी, जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या, मांजरा प्रकल्पातला पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला असल्यानं, शहरी भागात पाणीपुरवठ्यासाठी इतर पर्यायी उपाययोजना सज्ज ठेवाव्यात तसंच कोणत्याही गावाला पाणी टंचाई सामना करावा लागणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मंत्री बनसोडे यांनी संबंधितांना दिले आहेत.
****
छत्रपती संभाजी नगर इथं जीवन विकास ग्रंथालयाच्या ५१व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवात काल लेखक माणिक पुरी यांच्या "पक्षी येती अंगणी" या कादंबरीवर परिसंवाद घेण्यात आला. पक्षी नसतील तर माणूसही संपुष्टात येईल, या सलीम अली यांच्या वाक्यानं आपल्याला अंतर्मुख केल्याचं, पुरी यांनी यावेळी सांगितलं. त्यांनी पक्षी निरीक्षणाच्या बहुआयामी लेखन प्रवासाबद्दल आपला मनोगत व्यक्त केलं.
****
हिंगोली शहरात जलेश्वर तलाव परिसरातलं अतिक्रमण काल काढण्यात आलं. या तलाव परिसराचं आता सौंदर्यीकरणं करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण धारकांना २९ फेब्रुवारी रोजी नोटीसा बजावण्यात आला होत्या, त्यानुसार ही कारवाई झाली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 09 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
अर्थव्यवस्थेवरची श्वेतपत्रिका सं���देत सादर;विरोधकांकडून काळीपत्रिका जाहीर
राज्यभरातल्या सर्व प्राथमिक शाळा सकाळी नऊ नंतर सुरू करण्याचे राज्य सरकारचे आदेश
छत्रपती संभाजीनगर इथं दोन वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू
आणि
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळण्याची आवश्यकता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडून व्यक्त
****
केंद्र सरकारनं काल संसदेत भारतीय अर्थव्यवस्थेवरची श्वेतपत्रिका सादर केली. योग्य धोरणं, खरे हेतू आणि योग्य निर्णय घेऊन सरकारने आर्थिक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या माध्यमातून, २०१४ पूर्वीच्या काळातल्या प्रत्येक आव्हानावर मात केली असल्याचं यात म्हटलं आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार स्थापन झालं, त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था नाजूक स्थितीत होती. आर्थिक गैर व्यवस्थापन, बेशिस्त आणि मोठ्या प्रमाणातल्या भ्रष्टाचारामुळे अर्थव्यवस्थेची ही दुरावस्था होती, असं यात म्हटलं आहे. विद्यमान सरकारने देशाला शाश्वत उच्च विकासाच्या दृढ मार्गावर नेल्याचं या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन्ही सभागृहात मांडलेल्या या श्वेतपत्रिकेवर, दोन्ही सभागृहात आज चर्चा होणार आहे.
****
दरम्यान, काँग्रेसनं काल नवी दिल्लीत सरकारच्या विरोधात काळी पत्रिका प्रसिद्ध केली. सध्याचं सरकार देशातल्या बेरोजगारीसारख्या मुख्य मुद्द्यांवर बोलत नसल्याचा आरोप, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला. केरळ, कर्नाटक, तेलंगणा या बिगर भाजप राज्यांशी भेदभाव केला जात असल्याचा आरोपही खरगे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसनं सरकार विरोधात काढलेल्या या काळ्या पत्रिकेविरोधात कठोर टीका केली. काल राज्यसभेत बोलताना त्यांनी, आपलं सरकार देशाच्या विकासासाठी काम करत असून, त्याकडे वाकड्या दृष्टीनं पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या ६८ सदस्यांना काल निरोप देण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. देशाला आणि सदनाला त्यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन चिरस्मरणीय असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल आर्थिक वर्ष २०२३-२४ मधला सहावा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. पतधोरण आढाव्यात रेपो दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मुख्य धोरण दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
****
इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं काल जारी केले. सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना हे आदेश लागू होतील. दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांच्या प्राथमिक विभागाचे वर्ग दुसऱ्या सत्रात भरतील, अशी सूचना यात केली आहे. ज्या शाळांच्या व्यवस्थापनांना वेळेत बदल शक्य नाही, त्या प्रकरणी शिक्षणाधिकारी किंवा प्राथमिक शिक्षण निरीक्षकांनी प्रत्येक शाळेनुसार निर्णय द्यावा, असे आदेश राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं दिले आहेत.
****
नाशिक इथं चौतिसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसंच सायबर सुरक्षीत राज्य तयार करण्यासाठी ८३७ कोटी रूपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या स्पर्धेत राज्यभरातून साडेतीन हजार पोलीस खेळाडू सहभागी झाले आहेत.
****
हमीभावापेक्षा कमी किंमतीत कापूस न विकण्याचं आवाहन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूर इथल्या काटोल दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारच्या वतीनं कापूस खरेदी केंद्र वाढवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात, किमान समान कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं काल आपले मुद्दे जाहीर केले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, बियाणे, खतं, कीटकनाशकं, पाणी, वीज आणि डिझेल यांची दरवाढ नियंत्रणात आणावी, एकाधिकार कापूस खरेदी योजना पुन्हा कार्यान्वित करावी, या प्रमुख मुद्द्यांचा त्यात समावेश आहे.
****
राज्यात अनेक ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला असून, ठिकठिकाणी नागरीकांचा या यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
नांदेड शहरात काल ही यात्रा गाडीपुरा आणि वजिराबाद भागात पहोचली. यावेळी महापालिकेच्या अधिकार्यांनी नागरीकांना विविध योजनांची माहिती दिली. आयुष्यमान कार्ड तसंच पंतप्रधान स्वनिधी अर्ज यावेळी भरून घेण्यात आले. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत श्वेता राठोड यांनी त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
यावेळी नांदेड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अब्दुल राफे यांनी या यात्रेदरम्यान आरोग्य विभागाकडून देत असलेल्या योजनांची माहिती दिली:
‘‘मैं डॉ. अब्दुल राफे, मेडीकल ऑफीसर नांदेड महानगरपालिका, हम अलग अलग एरियों मे जाकर आरोग्य कॅम्प रख रहे हैं. जिसमे बीपी, शुगर और हार्ट सभी टाईप के पेशंट की तपासनी करके उनको मेडीसिन दिया जा रहा है और इसमे हमें बहोत अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है, सभी टाईप के लाभार्थी यहां आकर ऊस चिज़ का फायदा उठा रहे हैं.’’
****
मुंबईतील दहिसर विभागातले शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाला. घोसाळकर यांचा मित्र मॉरिस नरोन्हा यानेच काल संध्याकाळच्या सुमारास घोसाळकर यांच्यासोबतची चर्चा सामाजिक संपर्क माध्यमांवर लाईव्ह प्रसारित केल्यानंतर त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या, त्यानंतर स्वतःवर ही गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. हा हल्ला पैशाच्या वादातून आणि वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात बीड वळण रस्त्यावर हायवाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन भावंडांचा जागीच मृत्यू झाला. प्रवीण, प्रदीप आणि प्रतिक्षा अंभोरे अशी त्यांची नावे असून, ते परभणी जिल्ह्यातले रहिवासी होते. अपघातानंतर हायवा चालक फरार झाला.
गंगापूर - वैजापूर रस्त्यावर मांजरी फाट्यावर झालेल्या अन्य एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. मध्यप्रदेशातले शेतमजुर दशरथ ���ंधावे हे आपली दोन मुलं आणि पत्नीला दुचाकीवरुन घेऊन जात असताता, त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात अनुक्रमे तीन आणि एक वर्षीय बालकांसह दशरथ रंधावे यांचा मृत्यू झाला.
****
बदलत्या हवामानामुळे शेतपिकांचं नुकसान होत असून, त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळणं आवश्यक असल्याचं, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे. लातूर इथं काल जिल्हा कृषी महोत्सवाच्या उ��्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भविष्यात बांबूला चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी यावेळी केलं. उद्यापर्यंत चालणाऱ्या या कृषी महोत्सवात कृषी आणि गृहपयोगी वस्तूंचे १७७ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या बाभळगाव इथं रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पर्जन्य जलपुनर्भरण कार्यक्रमाचं उद्घाटन काल कळंब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.व्ही.चकोर यांच्या हस्ते झालं. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जलपुनर्भरण ही काळाची गरज असून, जल आत्मनिर्भरगाव करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्यावतीनं डॉ. रखमाबाई राऊत यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कार इचलकरंजी इथले डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेश पवार यांना जाहीर झाला आहे. मंडळाच्या संचालकांनी काल जालना इथं ही माहिती दिली. देवदासींच्या प्रथा उत्थानासाठी समर्पित सेवा केलेले डॉ.भीमराव गस्ती पुरस्कार मुंबईच्या पत्रकार योगिता श्रीराम साळवी यांना जाहीर झाला आहे. जालना इथं येत्या शनिवारी सेवा भारतीचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री विजय पुराणिक, यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. रोख २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि स्मृतीपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथल्या 'सम्राट अशोक अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेची काल सांगता झाली. या परिषदेत काल सकाळी भिक्खू प्राचार्य डॉ. खेमोधम्मो, भदंत पैय्याबोधी थेरो आणि भिक्खू संघाच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या सत्रात प्रा.डॉ संध्या रंगारी यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान झालं.
****
राज्य कृषी विभागानं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत ४८ कोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. यासंबंधी दोन हजार चारशे ५३ दावे निकाली काढण्यात आले होते. राज्यात सात एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीतल्या ७७ दाव्यांसांठी, एक कोटी ५१ लाख रुपयाचा विमा वितरित करण्यात येणार आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या कुणबी नोंदी धारकांच्या वारसांना जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतीने सुरु आहे. यासाठी वंशावळी जुळवण्याकरता तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.
****
0 notes