#कृषी कायद्याला विरोध
Explore tagged Tumblr posts
marathinewslive · 4 years ago
Text
सोनीपत न्यूज: शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आज रणनीती आखली जाईल - शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्याचे धोरण आज
सोनीपत न्यूज: शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आज रणनीती आखली जाईल – शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्याचे धोरण आज
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका चक्का जाम झाल्यानंतर शेतकरी संघटनांनी आज सोनीपत येथे बैठक घेऊन सरकारवर दबाव आणण्यासाठी आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याचे धोरण आखले जाईल. त्याचबरोबर देशभरात चळवळ निर्माण करण्यासाठी चर्चा केली जाईल. रविवारी बहादूरगडच्या टेकरी सीमेवर रविवारी आणखी दोन धानसा किनारी शेतकर्‍यांचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
आज ‘भारत बंद’ | शेतकरी संघटनांना राजकीय पक्षांचाही पाठिंबा, या सेवांवर होणार परिणाम
आज ‘भारत बंद’ | शेतकरी संघटनांना राजकीय पक्षांचाही पाठिंबा, या सेवांवर होणार परिणाम
मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) तीन नवे सुधारित कृषी कायदे पारित केले आहेत. या कायद्याला विरोध दर्शवत मागील जवळपास दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे (Farmer) आंदोलन हे सुरु आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज (सोमवारी) शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. त्या अनुषंगाने दिल्ली येथे बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शिवाय राज्यातील शेतकरी संघटना आणि काही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
शेतकरी नेते निवडणूक लढवू शकतात
शेतकरी नेते निवडणूक लढवू शकतात
नवी दिल्ली :  कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी एकवटलेली शेतकऱ्यांची एकजूट भारतीय जनता पक्षाला डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. कारण या कृषी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत शेतकरी नेते उतरण्याचे संकेत दिले.  टिकैत यांनी केंद्र सरकारला दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे, की शेतकरी नेत्यांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड - १९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ३३ कोटींचा टप्पा पार
** ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप तसंच वंचित आघाडीचा आंदोलनाचा इशारा
** जालना इथल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्रासाठी १६५ कोटी रुपये निधी
आणि
** इंधन, खाद्यतेल तसंच जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ रद्द करण्यासाठी भाकपचं पंतप्रधानांना निवेदन
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणाने ३३ कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत ४४ लाख ३३ हजार ८५३ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून, लसीच्या एकूण ३३ कोटी २८ लाख ५४ हजार ५२७ मात्रा देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य तसंच केंद्रशासित प्र��ेशांना कोविड लसीच्या ३२ कोटी १३ लाख ७५ हजार ८२० मात्रा उपलब्ध करून दिल्या आहेत. यापैकी ३१ कोटी ४० लाख ७५ हजार ६५४ मात्रा वापरल्या गेल्या आहेत. राज्य-केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या ७३ लाखांपेक्षा जास्त मात्रा शिल्लक असून, २४ लाख ६५ हजार ९८०मात्रा पुढील ३ दिवसात राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कृषी संजीवनी मोहिमेचा उद्या एक जुलै रोजी कृषी दिनी समारोप होणार आहे. २१ जूनपासून सुरु झालेल्या या मोहिमेत सुमारे ४० हजार गावांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये सुमारे ६ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. या समारोप सत्रात पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात उद्या दुपारी साडे बारा वाजता हा कार्यक्रम होणार असून, कृषी विभागाच्या युट्यूब चॅनलवरुन या कार्यक्रमाचं प्रसारण होणार असल्याचं कृषी संचालक विकास पाटील यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांमध्ये जुजबी बदल करून, या कायद्यांमधील बहुतांशी तरतुदी राज्यात नव्या कायद्याच्या रूपाने लागू करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र सरकारने सुरू केले आहेत, या कायद्याला किसान सभेचा विरोध असल्याचं, किसान सभेचे डॉ अजित नवले यांनी सांगितलं आहे. ते आज अहमदनगर इथं बोलत होते. शेतकऱ्यांना, शेतकरी संघटनांना तसंच किसान सभेला विश्वासात न घेता संशयास्पद घाई करून, हे तीन केंद्रीय कृषी कायदे लागू करण्य��चे प्रयत्न केले तर किसान सभा राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा डॉ नवले यांनी दिला. यासंदर्भात महाविकास आघाडीचे वर्तन अत्यंत निषेधार्ह आणि संशयास्पद असल्याची टीका नवले यांनी केली.
****
महाविकास आघाडी सरकार आल्यापासून समाजा- समाजमध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. ते आज सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते, मात्र राज्य सरकारने ते केले नाही. इतर मागासवर्गीय - ओबीसींना दिलेले संवैधानिक अधिकार काढून घेण्याचे  प्रयत्न होत आहेत, ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका पडळकर यांनी केली.
****
सर्वोच्च न्यायालयानं वारंवार मुदत देऊनही ओबीसी समाजाबाबतचा इम्पिरिकल डेटा महाविकास आघाडी सरकारला सादर करता आला नाही. त्यामुळेच ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप आमदार अतुल सावे यांनी केला आहे. सावे यांनी औरंगाबाद इथं ��ाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकातून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. अपयश झाकण्यासाठी आघाडी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे खोटारडेपणा करीत केंद्र सरकारवर दोषारोप करत असल्याचं सावे यांनी म्हटलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यासाठी आघाडी सरकारने तातडीने हालचाली कराव्या, अन्यथा या समाजाच्या असंतोषाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने तयार रहावं, असा इशाराही आमदार सावे यांनी दिला आहे.
****
राज्य सरकारनं ओबीसींचा इम्पिरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करावा. अन्यथा वंचित बहुजन आघाडी मराठवाड्यात रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा वंचित आघाडीचे मराठवाडा विभाग प्रवक्ते डॉ. धर्मराज चव्हाण यांनी दिला आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. ओबीसी आणि भटके विमुक्तांच्या नावाखाली उभे केले जात असलेले आरक्षणाचे लढे म्हणजे, जनतेची दिशाभूल करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी आखलेला डाव असल्याची टीका चव्हाण यांनी केली. न्यायमूर्ती रोहिणी आयोग स्वीकारण्यात यावा आणि ओबीसींचे त्रिस्तरीय वर्गीकरण करण्याची मागणीही धर्मराज चव्हाण यांनी केली आहे.
****
राज्यात नांदेडसह ५ ठिकाणी उर्दू घर निर्मितीचं काम सुरू आहे. या उर्दू घरांची कामे लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून त्यांच्या व्यवस्थापनासंदर्भातही धोरण निश्चित करण्यात आलं असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. नांदेड इथल्या उर्दू घरासाठी ८कोटी १६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या घराचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच त्याचं लोकार्पण करण्यात येईल. राज्यात सांस्कृतिक चळवळ अधिक वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने उर्दू घरे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.
****
प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राज कौशल यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ४९ वर्षांचे होते. राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरूवात केली होती. प्यार में कभी कभी, अँथनी कौन है, शादी का लड्डू या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केले. अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे ते पती होत.
****
ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना न्युमोनिया झाल्यानं, त्यांना मुंबईत हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शाह यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना उद्या रुग्णालयातून सुटी दिली जाईल, अशी शक्यता त्यांचे व्यवस्थापक जयराज पाटील यांनी वर्तवली आहे.  
****
जालना इथल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्रात पायाभूत सुविधा उभारणीसाठी ���ाज्यशासनाकडून १६५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली़. जालना शहरातल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपक्रेंद्रास आज भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. या उपकेंद्रासाठी मंजूर २०३ एकर जमिनीचे रेखांकन करुन ही जमीन ताब्यात घ्यावी, तसंच पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले़
****
वाढती बेरोजगारी, महागाई आणि जनतेची उपासमार या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसंच देशभरातल्या सर्व डाव्या पक्षांनी १६ ते ३० जून दरम्यान देशभर पंधरा दिवस आंदोलन केलं, या आंदोलनाचा आज समारोप झाला. आंदोलक पक्ष संघटनांच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांचं निवेदन पंतप्रधान तसंच मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा शाखेच्या वतीने सादर केलेल्या निवेदनात, पेट्रोल-डिझेलच्या किमती तात्काळ कमी कराव्या, खते बी-बियाणे अवजारे आणि शेती विषयक औषधे यांच्या किमतीत झालेली वाढ रद्द करावी, सर्व जीवनावश्यक वस्तू, खाद्यतेले आणि धान्याच्या वाढलेल्या किंमती कमी कराव्यात, कराचा भरणा करत नसलेल्या सर्व कष्टकरी कुटुंबांना दरमहा साडे सात हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटात आत्तापर्यंत ४१ हजार नागरिकांना कोविड लसीचा किमान पहिला डोस देण्यात आला आहे. साठ वर्षाच्या पुढील ६६% नागरिकांना लसीचा किमान एक डोस तर दुर्धर आजार असणाऱ्या ७० टक्के नागरिकांना लसीकरण करण्यात आलं आहे. असे सर्व मिळून जिल्ह्यात दोन लाख ९६ हजार नागरिकांना कोविड लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.
//*********//
0 notes
rajnetanewscom · 4 years ago
Text
पवारांच्या 'त्या' पत्रामागचं सत्य काय? शरद पवारांचा APMC खा��गीकरणाला पाठिंबा?
पवारांच्या ‘त्या’ पत्रामागचं सत्य काय? शरद पवारांचा APMC खाजगीकरणाला पाठिंबा?
मुंबई : नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादीचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
केंद्राच्या तरतुदी लादल्यास राज्य कृषी कायद्याला विरोध
केंद्राच्या तरतुदी लादल्यास राज्य कृषी कायद्याला विरोध
पुणे ः राज्याकडून नवा कृषी कायदा लागू करण्याबाबत मसुदा तयार झाला आहे. येत्या अधिवेशनात या कायद्यासाठी विधेयक मांडण्याच्या हालचाली महाविकास आघाडीत सुरू झाल्या आहेत. मात्र अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीशी संलग्न शेतकरी संघटनांनी राज्याच्या नव्या कायद्याला विरोध केला आहे.  ​केंद्रीय कायद्यांमधील तरतुदी राज्य सरकारने मागील दाराने महाराष्ट्रात आणू पाहत आहे. तसे झाल्यास आम्ही कडवा विरोध करू, अशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
शेतक of्यांच्या बाजूने आवाज उठविला गेला, 65 वर्षांच्या वृद्धांना भारी किंमत मोजावी लागली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
शेतक of्यांच्या बाजूने आवाज उठविला गेला, 65 वर्षांच्या वृद्धांना भारी किंमत मोजावी लागली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
फासा कृषी कायद्याविरोधात शेतकरी चळवळीबद्दल ज्या प्रकारच्या वादावादी व आक्रोश केला जात आहे त्याबद्दल संपूर्ण देशभरात ज्या वादाची चर्चा झाली आहे त्यापासून आपणास चांगलेच माहिती असेल. कृषी कायद्यांबाबत दोन प्रकारचे गट तयार झाले आहेत याची जाणीव ठेवा. या कायद्याला पाठिंबा देणारा एक गट आणि या कायद्याला विरोध दर्शविणारा एक गट आहे, परंतु या दरम्यान अशी बातमी समोर आली आहे की, पटियालामधील काही लोक कृषी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 March 2021 Time 7.10am to 7.25am Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.
****
** आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रणासह मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश  
** राज्यभरात उद्यापासून रात्रीची जमावबंदी लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना
** राज्यात नवे ३६ हजार ९०२ कोविडग्रस्त; मराठवाड्यात ५७ रुग्णांचा मृत्यू तर नव्या चार हजार ५९७ रुग्णांची नोंद
** हिंगोली जिल्ह्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात पूर्ण निर्बंध; लातूर तसंच बीड जिल्ह्यात चार एप्रिल पर्यंत टाळेबंदी लागू
** कृषी कायद्यांच्या विरोधात पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद
** लग्नाचा बनाव करून पैसे लुटणाऱ्या चौकडीला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून अटक
आणि
** जा��तिक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतला सुवर्णपदक
****
आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी गर्दीवर नियंत्रण ठेवावं तसंच कोविड संदर्भात मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी, राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात होळी-धुलिवंदन, शब-ए-बारात, तसंच ईस्टर संडे या सणांच्या अनुषंगानं सर्व जिल्हा प्रशासनांनी तसंच पोलिस विभागानं खबरदारी घ्यावी, तसंच नागरिकांच्या जागरुकतेसाठी अभियान राबवण्यास सांगितलं आहे. नागरिकांनी मास्कचा योग्य वापर करावा, तसंच शारीरिक अंतराचा नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
संपूर्ण राज्यभरात उद्यापासून रात्रीची जमावबंदी लावण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल सर्व विभागीय आयुक्त, आणि प्रशासकीय यंत्रणेशी संवाद साधून कोविड स्थितीसंदर्भात आढावा घेतल्यानंतर हे निर्देश दिले. जनतेने कोविडचे नियम पाळले नाहीत, तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान, राज्यात ५२ लाख लोकांना आतापर्यंत कोविड लस देण्यात आली असून, सध्या देशभरात लसीकरणामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
राज्यात काल ३६ हजार ९०२ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २६ लाख ३७ हजार ७३५ झाली आहे. काल ११२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५३ हजार ९०७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक चार दशांश टक्के झाला आहे. काल १७ हजार १९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २३ लाख ५६ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८७ पूर्णांक दोन दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात दोन लाख ८२ हजार ४५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार ५९७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५७ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २६, नांदेड जिल्ह्यातल्या १४, परभणी सहा, जालना पाच, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ७८७ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ९७०, लातूर ५३८, जालना ४१५, बीड ३८३, परभणी २६३, उस्मानाबाद १५५, तर हिंगोली जिल्ह्यात १८६ नवे रुग्ण आढळून आले.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या प्रतिबंधित क्षेत्रातली सर्व दुकानं तसंच नागरिकांच्या व्यवहारांवर पूर्ण निर्बंध घालण्यात आले आहेत. कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर, वारंगा या बाजारपेठेच्या ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यात आला. नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी नियमांचं पालन करण्याचं तसंच लसीकरण करून घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केलं आहे.
शासनानी जे ६० ��र्षाच्या वरचे आणि ४५ च्या वरचे जे लोकं ज्यांना काहीतरी पुर्वीपासून काही आजार असेल अशा लोकांना जे व्हॅक्सीनेशनची जे सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्या सुविधाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे.कारण आतापर्यंतचा आमचा जो अनुभव आहे की जरी व्हॅक्सीनेशन केल्यानंतर जरी कोविड झाला की कोणाला पण मृत्यू होत नाही. म्हणजे व्हॅक्सीनेशन जर केला आणि त्याचे दोन्ही डोस घेतले.आणि व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये गॅप ठेवला तर कोविडमुळे स्वत:च्या जीवाला जो धोका असतो तो जवळपास १०० टक��के खत्म होवून जातो.
****
औरंगाबाद जिल्ह्यात नागरिकांनी आगामी सण उत्सवांच्या काळात एकत्र न येता, शारीरिक अंतराच्या नियमाचं पालन करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. चव्हाण यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले...
हा लढा आपला रोगाशी आहे. मग या रोगाशी लढा देत असतांना चांगल्या प्रकारचे प्रोटोकॉल म्हणजे लोकांनी नाही एकत्र येणे हे पाळणे गरजेचं आहे. म्हणून आम्ही कुठलेही फेस्टीवल या काळात होवू नये अशी जिल्हा प्रशासनाची आणि राज्यशासनाची भुमिका राहील.याच्यामुळे आपण ज्या उपाय योजना करतो आहे. तुम्ही जे आम्हाला साथ देत आहेत. आपल्याला लोकं या कोविडमधून बाहेर आणयचे आहेत आणि असे फेस्टीवल जर केले आपण तर पुन्हा लोकं एकत्र येतील, संसर्ग होण्याचं प्रमाण वाढेल आणि म्हणून रिक्वेस्ट करतो आपल्याला की आपण मला टेस्टींगसाठी मदत करा, माझे माणसं आयएल आणि सारीच्या सर्वेक्षणासाठी आल्यानंतर त्यांना मदत करा, आणि आपल्या घरात ४५ प्लस कोणी असेल  किंवा ६० प्लस कोणी असेल तर त्यांना व्हॅक्सीनेशन सेंटर पर्यंत घेवून जा
****
लातूर जिल्ह्यात कोविड प्रतिबंधासाठी आजपासून ४ एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले. जिल्ह्यातले सर्व जिम, व्यायामशाळा, क्रीडांगणं, जलतरण तलाव, उद्यानं, पानटपरी, चहाटपरी, मंगल कार्यालये, चित्रपट तसंच नाट्यगृहं, सभागृहं बंद राहतील. उपाहारगृहांना फक्त पार्सल सुविधा देता येणार आहे. होळी, धुलीवंदन, रंगपंचमी, हे सण आपल्या कुटुंबात साजरे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
****
बीड जिल्ह्यात कालपासून चार एप्रिल पर्यंत टाळेबंदी लागू झाली. काल पहिल्या दिवशी नागरिकांनी टाळेबंदीचं काटेकोरपणे पालन केल्याचं दिसून आलं.
****
नांदेड जिल्ह्यात कोविड-19 च्या रुग्णांसाठी पुरेशा रुग्णखाटा उपलब्ध असल्याचं, जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी स्पष्ट केलं आहे. काल रुग्णालयांची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनी गृहविलगीकरणात राहून उपचार घ्यावेत, सौम्य लक्षणं आढळून आली तरी कोविड तपासणी करून घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.
दरम्यान, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात “कोविड-19 चौकशी कक्ष” सुरु करण्यात आला आहे. २४ तास कार्यरत राहणाऱ्या या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02462-22 92 21 असा आहे. रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी खाटा उपलब्ध आहेत किंवा नाही याची माहिती, या कक्षातून दिली जाईल.
****
जालना जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन लावण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही, असं जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केलं आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित अंतराचे नियम पाळावेत, मास्कचा वापर करावा, असं आवाहन बिनवडे यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता, जिल्ह्यातल्या ११ खासगी रुग्णालयांचं अधिग्रहण करुन २२३ रुग्णखाटा कोविड रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले.
****
परभणी शहरात स्टेशन रोडवर जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीमध्ये कोविड सुश्रुषा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. काल या केंद्रात पाच कोविडग्रस्तांवर उपचार सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. सर्व सोयींनीयुक्त २०० रुग्ण खाटांच्या या केंद्रात ५०० रुग्णखाटापर्यंत नियोजन करता येईल, असं डॉ नागरगोजे यांनी सांगितलं.
****
मुंबईतल्या भांडूप इथं कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत दगावलेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयं सुरु आहेत, त्या ठिकाणच्या अग्निसुरक्षेची तत्काळ तपासणी करण्याचे निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काल पहाटे झालेल्या या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला.
****
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. लातूर इथं काँग्रेस भवनासमोर पक्षातर्फे एकदिवसीय उपोषण करत केंद्र सरकारच्या निर्णयांचा विरोध करण्यात आला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे आणि आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत उपोषण करण्यात आलं, तर उस्मानाबाद इथं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री रमेश बागडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.
****
लग्नाचा बनाव करून पैसे लुटणाऱ्या चौकडीला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या टोळीची मुख्य सूत्रधार आशा खडसे ��िच्या चौकशीतून एकाच महिलेचा अनेकांशी बनावट विवाह केल्याचं समोर आलं. सदर महिलेच्या सात बनावट आधारकार्डसह आरोपींकडून ७ मोबाईल, एक इंडिका कार असा सुमारे साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीने नाशिक, जळगाव, औरंगाबादसह गुजरात राज्यातही अशी फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.
****
जागतिक नेमबाजी क्रीडा महासंघ -आयएसएसएफच्या नवी दिल्लीत सुरू असलेल्या वर्ल्डकप-२०२१ च्या विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंत हिने सुवर्णपदक पटकावलं आहे. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन मिक्स्ड टीम इव्हेंट प्रकारात तेजस्विनी सावंत आणि संजीव राजपूत या दोघांनी सुवर्णपदकाची कमाई केली. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स टीम इव्हेंटमध्येही भारतानं सुवर्णपदक पटकावलं. स्पर्धेत १२ सुवर्ण पदकांसह २५ पदकं पटकावत भारत पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.
****
क्रिकेट
पुणे इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंड संघानं भारतीय संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करत, पाहुण्या संघासमोर ३३७ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, इंग्लंड संघानं ४४ व्या षटकांत चार गड्यांच्या बदल्यात हे लक्ष्य साध्य केलं. मालिकेत दोन्ही संघ आता १-१ ने बरोबरीत असून, तिसरा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातल्या हिप्परगा इथल्या राष्ट्रीय शाळेला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आठवणी जागवणाऱ्या या शाळेला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल भेट देऊन, शाळेच्या परिसरात स्मारक कशा स्वरूपात उभारता येईल, याबाबत संबंधितांशी चर्चा केली. या स्मारकाबाबत नागरिकांनी सूचना कराव्यात, असं आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केलं आहे.
****
लातूर शहरात प्रमुख रस्ते तसंच चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी ही माहिती दिली. यासाठी ८२ लाख रुपये खर्च येणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री अ���ित देशमुख यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत या खर्चाला मान्यता दिली आहे.
****
नांदेड इथले लोककलावंत गणेश वनसागर यांचं काल पहाटे कोविड संसर्गानं निधन झालं. ते ५० वर्षांचे होते.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या कासारशिरसी इथले डॉ. मनोहरराव पाटील यांचं काल दुर्धर आजाराने निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते.
//**********//
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
शेतकरी, ग्राहकांनी  कृषी कायद्यांना विरोध करावा 
कागल, जि. कोल्हापूर : नव्या कृषी कायद्यांमुळे शेतीमाल उद्योगपतींना विकावा लागणार आहे. त्यामुळे बाजारात उद्योगपतींची मक्तेदारी निर्माण होईल. याचा फटका शेतकऱ्यांना व ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांनी जागृत होऊन या नव्या कायद्याला विरोध करावा, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.  संघटनेच्या वतीने येथील गाताडे मळ्यात प्रबोधनात्मक शेतकरी शिबिर झाले.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 October 2020 Time 18.00 to 18.10
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०४ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.०० **** ** देशात कोविडच्या सक्रीय रुग्णांची संख्या सलग तेराव्या दिवशी दहा लाखापेक्षा कमी ** कोरोना विषाणूवरची लस उपलब्ध होण्यासंदर्भात कालमर्यादा निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समित्या स्थापन ** २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ** औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन कोविडग्रस्त��ंचा मृत्यू - जिल्ह्यातल्या कोविडग्रस्तांची एकूण संख्या ३४ हजार १९३ आणि ** अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाची परभणीत प्रवीण दरेकर यांच्याकडून तर जालन्यात राजेश टोपे यांच्याकडून पाहणी **** देशात कोविडच्या सक्रीय रुग्णांची संख्या सलग तेराव्या दिवशी दहा लाखापेक्षा कमी राहिल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. आज देशात कोविड संसर्ग झालेले ९ लाख ३७ हजार ६२५ सक्रीय रुग्ण आहेत. ही संख्या कालच्या सक्रीय रुग्णांपेक्षा ७ हजार ३७१ ने कमी असल्याचं, आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीत नमूद आहे. कोविड चाचण्यांचं प्रमाणही वाढवण्यात आलं असून, गेल्या दहा दिवसांपासून दररोज सरासरी साडे अकरा लाख नमुन्यांची कोविड तपासणी केली जात असल्याचं, या बाबतच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे. देशातली बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ४९ हजार ३७३ झाली आहे. यापैकी ५५ लाख ९ हजार ९६६ रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून बरे झाले आहेत. त्यामुळे देशातलं कोविड संसर्ग मुक्तीचं प्रमाण ८४ पूर्णांक १३ शतांश टक्के एवढं झालं आहे. या संसर्गाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख एक हजार ७८२ झाला आहे. मात्र संसर्गातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याने मृत्यूदर आता एक पूर्णांक ५५ शतांश टक्के एवढा कमी झाला आहे. **** कोरोना विषाणूवरची लस उपलब्ध होण्यासंदर्भात कालमर्यादा निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समित्यांची स्थापना केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. साप्ताहिक संवाद कार्यक्रमात त्यांनी आज कोविड उपचारासंदर्भातल्या भावी उपाय योजनांची माहिती दिली. देशात कोविड लसीचं परीक्षण तिसऱ्या टप्य्यात असून, लस तयार झाल्यावर पुरवठा आणि साठा पर्याप्त प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी सरकार लस तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान लोकांना त्यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भावासंबंधी मार्दर्शनक सूचनाचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. **** २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते आज उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. भारतीय जनता पार्टीचे खासदार भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू केली असून कृषी सुधारणा कायद्यामुळे शेतमालाला मिळणारे हमीभाव बंद होणार नाहीत तसंच कृषी उत्पन्न बाजार समित्याही ही बंद होणार नाहीत असं दानवे यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्ष आपली बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी या कायद्याबाबत जनतेत संभ्रम पसरवत आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली. **** केंद्र सरकारनं केलेल्या शेतकरी हिताच्या कायद्याला फक्त विरोध करायचा म्हणून राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार विरोध करत असल्याचा आरोप केंद्रीय मनुष्यब�� विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केला आहे. केंद्र सरकारनं केलेले कृषी सुधारणा कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं, जनतेला समजावून देण्यासाठी ते आज वाशिम इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. **** अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्सनं दिलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई शहराला बदनाम करणाऱ्यांचं पितळ उघडं पडलं असल्याचं म्हटलं आहे. ‘सुशांत सिंह हत्या कि आत्महत्या असं प्रश्नचिन्ह, महाराष्ट्र - मुंबई महानगरपालिका -मुंबई पोलीस यंत्रणा यांच्यावर निर्माण केलं गेलं होतं. ज्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करण्याच षडयंत्र केलं होतं, त्याचं पितळ उघडं पडलं असून त्यांना ही मोठी चपराक आहे.’ असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे. **** राज्यात उद्यापासून ५० टक्के क्षमतेनं हॉटेल्स आणि अन्य रेस्टॉरंटस सुरू करण्यात येणार आहेत. यासाठीच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनानं जारी केल्या आहेत. या दिशा निर्देशांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यानुसार ग्राहकांची तापमान आणि लक्षणं विषयक तपासणी केल्यानंतरच, हॉटेलमधे प्रवेश देता येणार आहे. याशिवाय ग्राहकांना मास्क अनिवार्य असून, परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंटमधे ग्राहकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ग्राहकांना फक्त शिजवलेले खाद्य पदार्थ द्यावेत, कच्चे पदार्थ देणं टाळावं, संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो डिजीटल पेमेंटचा पर्याय वापरावा, असं या नियमावलीत सुचवण्यात आलं आहे. **** राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. २४ सप्टेंबरला त्यांची कोविड चाचणी बाधित आली होती. रुग्णालयात १० दिवस उपचार घेतल्यावर ते कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना आज सुटी देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन कोविड बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या मृतांची संख्या आता ९५५ झाली आहे. जिल्ह्यातल्या कोविडग्रस्तांची एकूण संख्या आता ३४ हजार १९३ झाली आहे. यापैकी २८ हजार ६७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या ४ हजार ५६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. **** सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविडग्रस्तांच्या संख्येमध्ये सातत्यानं घट होत आहे. दिवसाला १५० च्या पुढे रुग्ण आढळत होते, ती संख्या आता शंभरच्या आत आली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही चांगलं असून मृत्यूचं प्रमाणही कमी झालं आहे. सध्या जिल्ह्यात ९३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. **** उत्तर महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ८८ पूर्णांक एक शतांश टक्के झालं आहे. मृत्यू दरातही घट झाली असून हा दर एक पूर्णांक ९९ शतांश टक्के झाला आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यात मिळून गेल्या २४ तासात १ हजार ९५० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर याच कालावधीत १ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. **** अतिवृष्टीने मराठवाड्यात झालेल्या पीक नुकसानाचे सरसकट पंचनामे करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यांनी केली आहे. दरेकर यांनी आज परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या नावकी शिवारात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून आपद्ग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिकांची, फळबागांची मोठी हानी लक्षात घेऊन राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, बागायतदारांना हेक्टरी ५० हजार रुपये आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये तत्काळ मदत देण्याची मागणी दरेकर यांनी केली. पीकविमा संदर्भातही त्वरीत निर्णय घ्यावेत, असं नमूद करत दरेकर यांनी आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी भाजप भक्कमपणे उभा असल्याचं सांगितलं. **** जालना जिल्ह्यातल्या परतूर आणि मंठा तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज पाहणी केली. मंठा तालुक्यातल्या हातवन तसंच निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करून टोपे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वीच प्रशासनाला दिले आहे. पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असं टोपे यांनी यावेळी सांगितलं. **** राज्य शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयं सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. बीड इथल्या सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. कोविड महामारीच्या काळात होमिओपॅथी देखील अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे होमिओपॅथी ही अहिंसक आणि सर्वांना परवडेल अशी उपचार पद्धती असल्याचं देशमुख म्हणाले. **** नाशिक जिल्ह्यात देवळाली लष्करी छावणीत अवैधरित्या छायाचित्रण करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. छावणीतल्या रुग्णालयाची छायाचित्रं काढताना काही सैनिकांनी या तरुणाला पकडून त्याचा मोबाईल तपासला असता, त्यानं ही छायाचित्रं पाकिस्तानातल्या एका वॉट्सॲप समूहावर पाठवल्याचं निदर्शनास आलं. संजीवकुमार असं या तरुणाचं नाव असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळचा बिहारमधला रहिवासी असलेला हा तरुण देवळाली छावणीत एका बांधकामावर कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. **** सातारा इथल्या तहसीलदारांची शासकीय धनादेश पुस्तिका चोरुन त्यातल्या ३ ��नादेशांच्या वापराने शासकीय खात्यातल्या १४ लाख रुपयांचा अपहार झाल्याचं उघडकीस आलं आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालायातल्या पुरवठा शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यानं हा अपहार केला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 September 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २९ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा. ****
कृषी सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक शेतकरी विरोधी असून, त्यांना दलालांचा विकास हवा असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तराखंड राज्यात ‘नमामी गंगे मोहिमे’अंतर्गत ६ मोठ्या योजनांचा दूरदृश्य संवाद पद्धतीने प्रा��ंभ केल्यानंतर बोलत होते. या नव्या कायद्यांमुळे अनेकांचा ��ाळा पैसा कमावण्याचा मार्ग बंद होणार असल्यानं, ते या कायद्यांना विरोध करत असल्याचं, मोदी यांनी नमूद केलं. काही लोक फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करत आहेत, ते शेतकऱ्यांसोबतही नाहीत आणि सैनिक किंवा तरुणांसोबतही नाहीत, असं मोदी म्हणाले. दरम्यान, नमामी गंगे अभियान हे देशातलं सर्वात व्यापक नदी संरक्षण अभियान असल्याचं, ते म्हणाले. जलजीवन मिशनच्या बोधचिन्हाचं तसंच या मिशनअंतर्गत ग्रामपंचायती तसंच पाणी समित्यांसाठीच्या मार्गदर्शिकेचंही पंतप्रधानांनी अनावरण केलं.  
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ मध्ये बदल करीत अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी कुटुंबांना निवासालगतच्या वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सदर अधिसूचनेमुळे अनुसूचित क्षेत्रात परंपरेने राहत असलेले वननिवासी तसेच अनुसूचित जमातीतील लोकांना दिलासा मिळणार असून त्यांचे मूळ गावातून स्थलांतर कमी हाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
****
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आपण गेले दहा दिवस विलगीकरणात असल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असून लवकरच जनतेच्या सेवेत हजर होऊ असं त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितलं.
****
मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ५५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत रुग्णांची संख्या २ लाख ७७५ झाली असून एकूण मृतांचा आकडा ८ हजार ८३१ वर पोहचला आहे
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३३ हजार १७४ झाली आहे. यापैकी २६ हजार ३५९ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९२५ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ५ हजार ८९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ५ हजार २३४ झाली असून त्यापैकी ४ हजार ३९५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २२२ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६१७ जणांवर उपचार सुरु आहेत.  
****
बालिका योजनेच्या नावाखाली गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी केंद्र शासनातर्फे पन्नास हजार रूपये देण्याची योजना असल्याचं वृत्त एका संकेतस्थळावर प्रसिद्ध झालं होतं. ही बातमी चुकीची असून अशी कोणतीही योजना आणली नसल्याचं पत्र सूचना कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक हे अंमली पदार्थांचे व्यवहार करणाऱ्या गटाचे सक्रीय सदस्य असल्यानं, या प्रकरणात त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. याबाबतचं एक शपथपत्र एनसीबीने न्यायालयात सादर केल��� आहे. या दोघांनी अंमली पदार्थ व्यवहारांना उत्तेजन दिलं असून, पैसाही पुरवला असल्याचं, या शपथपत्रात म्हटलं आहे. रिया आणि शौविक या दोघांनाही या महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीने अटक केली होती, सध्या हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.
****
मुंबईत सचिवालयानजिकच्या आमदार निवासात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी आल्यानं, हे आमदार निवास काल रात्री तत्काळ रिकामं करण्यात आलं. या संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर कोठेही बॉम्ब आढळला नाही, त्यामुळे ही अफवा असल्याचं निष्पन्न झालं, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पोषण आहार योजने अंतर्गत सांगली जिल्ह्यात महापालिका शाळेत वितरित करण्यात येत असलेला डाळीचा साठा अन्न आणि औषध विभागाने जप्त केला आहे. शालेय मुलांना देण्यात येणारी हरभरा आणि मूग डाळ निकृष्ट प्रतीची असून ती अप्रमाणित असल्याचं लक्षात आल्यानंतर अन्न आणि औषध विभागाने महापालिकेच्या शाळा क्रमांक तीन मध्ये छापा टाकून या डाळीचा साठा जप्त केला.
****
येत्या दोन दिवसांत देशातल्या नैऋत्य मोसमी पावसाची परतीच्या प्रवासाला उत्तर भारतातून सुरुवात होईल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. या वर्षीच्या एकूण मोसमात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.  
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 September 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा. ****
केंद्र सरकारनं साखरेच्या निर्धारित निर्यातीसाठी तीन महिने मुदतवाढ दिली आहे. अतिरिक्त उत्पादित होणारी ६ दशलक्ष टन साखर दरवर्षी सप्टेंबर महिन्या संपणाऱ्या विपणन वर्षापर्यंत निर्यातीला परवानगी असते. यंदा आतापर्यंत पाच पूर्णांक सात दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीचे करार झाले असून, पाच पूर्णांक सहा दशलक्ष टन साखर कारखान्यांमधून रवाना झाल्याची माहिती अन्न मंत्रालयाचे सहसचिव सुबोधकुमार सिंह यांनी दिली. मात्र कोविड प्रादुर्भावामुळे काही कारखान्यांना साखरेची वाहतुक करता आलेली नाही, या कारखान्यांना साखरेची वाहतुक शक्य व्हावी, यासाठी ही मुदत डिसेंबरपर्यंत वाढवत असल्याचं, सुबोधकुमार यांनी सांगितलं.
****
देशाचा कोविड संसर्गातून मुक्त होण्याचा दर ८२ पूर्णांक ५८ शतांत टक्के झाला आहे. गेल्या २४ तासांत देशात ७४ हजारापेक्षा अधिक रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ५० लाख १६ हजारावर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत या संसर्गाचे ८२ हजार १७० नवे रुग्ण आढळले, त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या ६० लाखावर गेली आहे. देशात काल या संसर्गाने एक हजार ३९ रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची एकूण संख्या ९५ हजार ५४२ झाली आहे. मृत्यूचं हे प्रमाण जगात सर्वात कमी एक पूर्णांक ५७ शतांश टक्के असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात सात लाख नऊ हजारांवर नमुन्यांची कोविड तपासणी करण्यात आली. देशात आतापर्यंत एकूण सात कोटी १९ लाखांवर नमुन्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोविड १९ संसर्गावरील लसीची माहिती देणारं पोर्टल तयार केलं आहे, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी आज या पोर्टलचं अनावरण केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ९९३ झाली आहे. यापैकी २६ हजार ११६ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतपर्यंत ९१६ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला असून, सध्या ५ हजार ९६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या माकणी थोर गावातलं हनुमान मंदिर उघडल्यामुळे सरपंच श्रीनिवास अशोक यांनी मंदिर व्यवस्थापनाला नोटिस बजावली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या मंदिरं उघडण्यास मनाई आहे.
****
नवीन कृषी सुधारणा कायद्यांबाबत काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस पक्षाच्या या डावपेचा��ना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असं जावडेकर म्हणाले. काँग्रेस पक्षाने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात या सुधारणांचा उल्लेख केला होता, याकडे जावडेकर यांनी लक्ष वेधलं.
****
कृषी सुधारणा कायद्याला पंजाबमध्ये होत असलेला विरोध आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही रेल्वे गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे अमृतसर नांदेड ही रेल्वेगाडी उद्या अमृतसर स्थानकावरुन न निघता, दिल्लीहून नांदेडकडे परत येणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे.
****
विडी-सिगारेटच्या सुट्या स्वरुपातल्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागानं जारी केला आहे. विडी-सिगारेटच्या सुट्या स्वरुपातील विक्रीमुळे त्यांच्या पाकीटांवरील आरोग्याच्या धोक्याची कल्पना ग्राहकाला येत नाही म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यामुळे यापुढे कोणालाही त्यांची सुटी विक्री करता येणार नसल्याचं टोपे म्हणाले.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात वाघाने केलेल्या हल्ल्यात एक इसम गंभीर जखमी झाला. बंडू मुकुंदा कुथे असं या ४५ वर्षीय इसमाचं नाव असून, जुनी अरतोंडी या गावी नदीच्या काठावर वाघानं हल्ला केल्याचं त्यानं सांगितलं. घटनास्थळी दोन वाघ असल्याचं, त्यानं सांगितलं. या इसमावर देसाईगंज इथं ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
हुतात्मा भगत सिंग यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. भगत सिंग यांची शौर्य गाथा देशवासियांना शतकानुशतकं प्रेरित करत राहील असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
प्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर आज वयाची ९१ वर्ष पूर्ण करून ब्याण्णवाव्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी त्यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. आपण लता दिदींच्या निरोगी दीर्घायुष्याची कामना करतो, असं पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.  
****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 December 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २५ डिसेंबर २०१९ दुपारी १.०० वा. **** पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक करणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अटल भूजल योजनेचा आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. शेतीत पिकांसाठी गरजेपुरतेच पाणी वापरण्याची, कमी पाण्यात येणारी पिकं घेण्याची तसंच ठिबकसिंचन आणि तुषारसिंचनाद्वारे ऊसाची शेती करण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी व्यक्त केली. गुजरातमध्ये ऊसासाठी तुषारसिंचन पद्धत बंधनकारक केल्यानंतर ऊसाचं उत्पादन वाढलं, शिवाय साखरेचा उताराही वाढल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. सर्व गावांनी पाण्याचा ताळेबंद तयार करावा, असं आवाहन करतानाच, जी ग्रामपंचायत पाण्याचं योग्य नियोजन करेल, त्या ग्रामपंचायतीला प्रोत्साहनपर वाढीव निधी दिला जाईल, असंही पंतप्रधानांनी सांगितलं. दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या या कार्यक्रमात, जलजीवन मिशनसाठीचे दिशानिर्देशही पंतप्रधानांनी जारी केले. लद्दाख मधलं लेह आणि हिमाचल प्रदेशातल्या मनालीला जोडणाऱ्या रोहतांग बोगद्याचं अटल बिहारी वाजपेयी बोगदा असं नामकरण आज करण्यात आलं. आठ किलोमीटर आठशे मीटर लांबीच्या या बोगद्यामुळे मनाली आणि लेहमधलं अंतर शेहेचाळीस किलोमीटरने कमी होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी, अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवा��न करत, देशवासियांना नाताळ सणाच्याही शुभेच्छा दिल्या. **** दरम्यान, उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ इथं सचिवालयात उभारण्यात आलेल्या वाजपेयी यांच्या २५ फूट उंच पुतळ्याचं अनावरण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. लखनऊ इथं, अटल बिहारी वैद्यकीय विद्यापीठाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीत "सदैव अटल" या अटलजींच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, इतर ��ेंद्रीय मंत्री यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी अटलजींच्या समाधीला पुष्पांजली अर्पण केली. **** सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांच्या घरकुल बांधकामांसाठी राज्य सरकारने सत्याण्णव कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांना ऑगस्ट मध्ये आलेल्या महापुराचा १०४ गावांना फटका बसला होता. पुरामध्ये पूर्णत: पडलेल्या घरांसाठी प्रत्येकी पंच्याण्णव हजार रुपये, तर अंशतः पडलेल्या घरांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. सदरचा निधी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाला असून त्याच्या वाटपाचं नियोजन करण्यात आलं आहे. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी ही माहिती दिली. **** मध्य रेल्वेने कल्याण-डोंबिवली मार्गावर ठाकुर्ली इथं पादचारी पुलाच्या कामासाठी आज सकाळपासून रेल्वे वाहतुक बंद ठेवली आहे, त्यामुळे कल्याण बसस्थानक तसंच डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. या कामामुळे जालना दादर जालना जनशताब्दी रेल्वेगाडी आज रद्द करण्यात आली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत हा वाहतुक खंड असेल, त्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत होणार आहे. **** नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ औरंगाबाद इथं राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात आला. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले. हा कायदा कोणत्याही नागरिकाच्या विरोधात नाही, मात्र, गैरसमजातून काही लोक या कायद्याला विरोध करत असल्याचं हरिभाऊ बागडे यांनी सांगितलं. तर तनवाणी यांनी या कायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले. नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनाच्या घोषणा लिहिलेले फलक हाती घेऊन, मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले. **** औरंगाबाद-जालना मार्गावर करमाड जवळ आज सकाळी अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला. शेकटा गावा��वळ एक कार आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या या अपघातात एक प्रवासी जखमी झाला. **** नांदेड जिल्ह्यात माळेगाव इथल्या यात्रेत आज विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये कुस्त्यांची दंगल, महिला बालकल्याण कक्षात पाककृती स्पर्धा, आदी उपक्रमांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं असून, शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. **** नाताळचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. या निमित्तानं ठिकठिकाणच्या चर्चवर रोषणाई करण्यात आली आहे. आज सकाळी चर्चमधून नाताळनिमित्त पारंपरिक कॅरोल गायन तसंच विशेष प्रार्थनासभा घेण्यात आल्या. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 December 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २० डिसेंबर २०१९ सकाळी ���.१० मि. **** ** शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुनरूच्चार; विधायक विकास कामांना स्थगिती न देण्याची ग्वाही ** मराठा आरक्षण याचिकेच्या सुनावणीमधले राज्य शासनाची बाजू मांडणारे वकील बदलले नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण ** नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलनं, काही राज्यात हिंसाचाराच्या घटना ** औरंगाबाद शहरातली पाणीपट्टी एक एप्रिल २०२० पासून अठराशे रुपये करण्याची महापौर नंदकुमार घोडेले यांची घोषणा आणि ** ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार **** शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, विधायक विकास कामांना कधीही स्थगिती न देण्याची ग्वाही काल विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राचा भूभाग राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आपली भूमिका त्यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता, त्याचसोबत भाजपची पालखी कायम वाहणार नाही, असाही शब्द दिला असल्यामुळे, गेले पंचवीस वर्ष वाहत असलेलं ओझं उतरवून ठेवलं, असं ठाकरे यांनी सांगितलं. अभिभाषणाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याच्या आपल्या आश्वासनाबाबत काहीही उल्लेख केला नाही, असा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडला, या मुद्द्यावरून विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच अध्यक्ष नाना पटोले यांनी, अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर मतदान घेऊन, प्रस्ताव संमत झाल्याचं जाहीर केलं. **** महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर झालं. एका वॉर्डातून एकच सदस्य निवडून येईल, अशी तरतूद या विधेयकात आहे. पूर्वीच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती, ती आता रद्द झाली आहे. **** महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात, सर्वोच्च न्यायालयात मांडलेल्या भूमिकेवरूनही विधान परिषदेत गदारोळ झाला. राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा आरक्षणावर परिणाम होईल, अशी चिंता सदस्य विनायक मेटे यांनी व्यक्त केली. यासंदर्भात सरकारनं निवेदन करावं, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये राज्य शासनाची बाजू मांडणारे वकील बदलले नसल्याचं सभागृह नेते सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं. संविधाना��ल्या तरतुदींचं पालन करून तीन पक्षांचं एकत्र सरकार समाजातल्या सर्व घटकांसाठी काम करेल आणि महाराष्ट्राला सुखी करण्याचा प्राणपणाने प्रयत्न करेल असं सांगत त्यांनी, विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. देसाई यांच्या उत्तरानं समाधान नं झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला. **** नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी राज्यासह देशभरात काल विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. उत्तरप्रदेशाच्या काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात अनेक विद्यार्थी आणि युवक संघटनांनी मोर्चा काढला. हजारो निदर्शक यावेळी जमले होते. का कायदा नष्ट करण्याची मागणी करणारे अनेक फलक यावेळी झळकावण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच डाव्या पक्षांनी आझाद मैदानावर निदर्शनं केली. नागपूर इथं मुस्लिम परिषद आणि जमाते हिंद संघटनेनं विधान भवनावर मोर्चा नेला. नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याच्या मागणीसह राज्यात मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षणाची मागणी आंदोलकांनी केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारही या आंदोलनात सहभागी झाले होते. उस्मानाबाद इथं पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या. नांदेड इथं विद्यार्थी कृती समिती आणि विविध १२ विद्यार्थी संघटनांच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयवर विराट विद्यार्थी मोर्चा काढण्यात आला होता. पुणे, सांगली, अमरावती, नाशिक, सोलापूर, सातारा, अहमदनगरसह विविध जिल्ह्यातही काल आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, औरंगाबाद इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं या कायद्याच्या समर्थनार्थ काल डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात मोर्चा काढला होता. मात्र, एमआयएम विद्यार्थी संघटना आणि आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांनी या मोर्चाला विरोध करत निदर्शनं केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं हा मोर्चा विनापरवानगी काढल्याचं पोलिसांनी सांगितलं. **** देशात महिला अत्याचाराच्या घटनांसंदर्भात आणि निर्भया सारख्या प्रकरणी अजून शिक्षा होत नसल्यानं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून राळेगणसिद्धी इथं मौन व्रत धारण करणार आहेत. त्यांनी काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनं काल दोन हजार ७५० कोटी पाच लाख रुपये जमेचा, दोन हजार ७४५ कोटी पाच लाख रुपये खर्चाचा आणि पाच लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. त्याचबरोबर एक एप्रिल २०२० पासून पाणीपट्टी चार हजार पाचशे रुपयांवरुन कमी करुन अठराशे रुपये करण्याची घोषणाही म��ापौर नंदकुमार घोडेले यांनी सभेत केली. महापौरांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात करवसुलीच्या उपाययोजना करण्याचे सर्व अधिकार आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना बहाल करण्यात आले. दरम्यान, उपमहापौरपदाची निवडणूक येत्या ३१ डिसेंबरला होणार आहे. भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांचा राजीनामा महापौर घोडेले यांनी स्वीकारल्यानंतर विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी निवडणुकीसाठी ही तारीख निश्चित केली. **** उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या येरमाळा इथं काल २८२ किलो बनावट खवा पकडण्यात आला. सांगली इथून येणारा बनावट खवा येरमाळा इथल्या खवा वितरण केंद्रातून राज्यासह बाहेर पाठवला जात असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर छापा टाकून हा खवा जप्त करण्यात आला. **** औरंगाबादच्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा शुभारंभ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसंच संस्थेचा ३७वा वर्धापदन दिनही आज साजरा होत आहे. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांचा शरद पवार यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी गौरव यावेळी करण्यात येणार आहे. **** निराधार बालकांचं दत्तकाद्वारे पुनर्वसन करणाऱ्या साकार या संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा आज औरंगाबाद इथं होणार आहे. भानुदास चव्हाण सभागृहात संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या सोहळ्यात, प्रसिद्ध सिने कलावंत चिन्मयी सुमित आणि सुमित राघवन यांची प्रकट मुलाखत होणार आहे. **** ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. लागू यांचं मंगळवारी ह्रदयविकाराच्या झटक्यानच निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. **** पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीनं साखर उद्योगात उल्लेखनीय कार्यासाठी दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यंदा लातूर जिल्ह्यातल्या रेणा साखर कारखान्याला उत्तर-पूर्व विभागातून तांत्रिक कार्य क्षमतेचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. **** परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात, अखिल भारतीय समन्वयीत कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्पाअंतर्गत, ग्रामीण कृषी हवामान सेवा योजनेला २०१८ सालचा देशातले सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून गौरवण्यात आलं. ग्वाल्हेर इथं राजमाता विजयाराजे शिंदे कृषी विद्यापीठात आयोजित १३ व्या वार्षिक राष्ट्रीय आढावा बैठकीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. **** जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातल्या देऊळझरी गावात विकास कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याचे निर्देश खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिले आहेत. काल जालना जिल्ह���धिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या देऊळझरी गावातल्या विकास कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. शासनानं उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या माध्यमातून गावात आरोग्य, वीज, पाणीपुरवठा तसंच शैक्षणिक सुविधा आदी कामे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. **** उस्मानाबाद जिल्ह्यात जीप आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात एक जण ठार तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. उमरगा तालुक्यात जकेकुर गावाजवळ काल दुपारी ही दुर्घटना घडली. उमरगा मार्गे बसवकल्याणकडे जाणारी जीप आणि विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रॅक्टरची आप–आपसात जोरदार धडक होऊन हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातही दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. औंढा नागनाथ तालुक्यात जिंतूर टी पाईंट नजीक परिवहन महामंडळाची बस आणि मोटारसायकमध्ये झालेल्या अपघातात एक तरूण जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी दुसऱ्या तरुणाचा उपचारासाठी नांदेड इथं नेताना मृत्यू झाला. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 December 2019 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगा��ाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.०० **** नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. नागपूर इथं मुस्लिम परिषद आणि जमाते हिंद संघटनेनं विधान भवनावर मोर्चा नेला. नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याच्या मागणीसह राज्यात मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षणाची मागणी आंदोलकांनी केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारही या आंदोलनात सहभागी झाले. औरंगाबाद इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं या कायद्याच्या समर्थनार्थ आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात मोर्चा काढला होता. मात्र, एमआयएम विद्यार्थी संघटना आणि आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांनी या मोर्चाला विरोध करत निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलिंसाचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखिल भारतीय परिषदेनं हा मोर्चा विनापरवानगी काढल्याचं पोलिंसानी सांगितलं. उस्मानाबाद इथं पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या. सांगली इथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे स्टेशन चौक परिसरात निदर्शनं करण्यात आली. कोल्हापुरातही डाव्या आघाडीनं निदर्शनं केली, अमरावती इथं मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्ह्याधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. नाशिक जिल्ह्यात दस्तुर ए हिंद बचाव कमिटीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. या कायद्यामुळे देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचेल, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली. **** येत्या २३ तारखेला राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिले आहेत. आज नागपूर इथं, शेतकरी कर्तमाफी संदर्भात महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. शेतकरी कर्जमाफी कशा स्वरुपात करायची याबाबत एक निश्चित धोरण ठरवून, त्यानुसार कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. यापूर्वीच्या फडणवीस सरकारनं दिलेली कर्जमाफी बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही, असा आरोपही पवार यांनी केला. **** पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने साखर उद्योगात उल्लेखनीय कार्यासाठी दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यंदा लातूर जिल्ह्यातल्या रेणा साखर कारखान्याला उत्तर-पूर्व विभागातून तांत्रिक कार्य क्षमतेचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. **** परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात, अखिल भारतीय समन्वयीत कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प अंतर्गत, ग्रामीण कृषी हवामान सेवा योजनेला 2018 सालचा देशातील सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून गौरवण्यात आलं. ग्वाल्हेर इथं राजमाता विजयाराजे शिंदे कृषी विद्यापीठात आयोजित १३ व्या वार्षिक राष्ट्रीय आढावा बैठकीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. **** जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातल्या देऊळझरी गावात विकास कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याचे निर्देश खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिले आहेत. आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या देऊळझरी गावातल्या विकास कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. शासनानं उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या माध्यमातून गावात आरोग्य, वीज, पाणीपुरवठा तसंच शैक्षणिक सुविधा आदी कामे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. **** उस्मानाबाद जिल्ह्यात जीप आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात एक जण ठार तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. उमरगा तालुक्यात जकेकुर गावाजवळ आज दुपारी ही दुर्घटना घडली. उमरगा मार्गे बसवकल्याणकडे जाणारी जीप आणि विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रॅक्टरची आपसात जोरदार धडक होऊन हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातही दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. औंढा नागनाथ तालुक्यात जिंतूर टी पाईंट नजीक परिवहन महामंडळाची बस आणि मोटारसायकमध्ये झालेल्या अपघातात एक तरूण जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी दुसऱ्या तरुणाचा उपचारासाठी नांदेड इथं नेताना मृत्यू झाला. **** गावातल्या कमकुवत घटकाच्या सामाजिक तसंच आर्थिक विकासासाठी योजनांची आखणी करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ग्रामपरिवर्तकाने काम करावे, असे निर्देश बीडचे प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 December 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ डिसेंबर २०१९ दुपारी १.०० वा. **** आपापसातले गैरसमज राज्य आणि देशहिताच्या आड येऊ नयेत, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच, असा पुनरुच्चार करताना, विधायक विकासकामांना आपण कधीही स्थगिती देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राचा भूभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता, त्याचसोबत भाजपची पालखी कायम वाहणार नाही, असाही शब्द दिला असल्यामुळे, गेले पंचवीस वर्ष वाहत असलेलं ओझं उतरवून ठेवलं, असं ठाकरे यांनी सांगितलं. अभिभाषणाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याच्या आपल्या आश्वासनाबाबत काहीही उल्लेख केला नाही, असा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडला, या मुद्द्यावरून विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच अध्यक्ष नाना पटोले यांनी, अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर मतदान घेऊन, प्रस्ताव संमत झाल्याचं जाहीर केलं. **** शेतकरी कर्जमाफीसंदर्भाच्या मुद्यावर आज महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच��या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात ९३ लाख हेक्टरवरचं क्षेत्र बाधित झालं. या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या शक्यतेसंदर्भात सर्व मुद्यांवर आजच्या या बैठकीत चर्चा होणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं. **** विदर्भातल्या रुग्णांची सोय होण्यासाठी नागपूरच्या मुख्यमंत्री सचिवालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष पुन्हा सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मध्यंतरी राष्ट्रपती राजवटीच्या काळात या कक्षाचं कामकाज बंद होतं. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासाठी नागपूर विभागीय आयुक्त, उपसंचालक आरोग्य सेवा आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. या कक्षामध्ये गरजू रुग्णांचे अर्ज स्वीकारण्यात येतील आणि ही समिती त्या रुग्णांना द्यायचं अर्थसहाय्य, विहित निकषानुसार निश्चित क���णार आहे. या कक्षाचं कामकाज तात्काळ सुरू करण्याचे आदेशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. **** शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणू नये, अशी आपली राजकीय पक्षांना हात जोडून विनंती असल्याचं, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल यांनी म्हटलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विद्यार्थी संघटनांमधून होत असलेल्या विरोधाच्या अनुषंगाने त्यांनी हे आवाहन केलं. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पोखरीयाल यांनी, विद्यार्थी हिताला आपल्या सरकारचं प्राधान्य असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मोदी सरकार रात्रंदिवस काम करत असल्याचं म्हटलं आहे. **** नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष ‘हम भारत के लोग’ या आघाडीअंतर्गत आज निदर्शनं करणार आहे. मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर होणाऱ्या या आंदोलनात समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल, शेतकरी कामगार पक्ष आणि मुस्लीम लीगसह अनेक लोक सहभागी होणार असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे **** जम्मु काश्मिर इथल्या पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं आज पुन्हा गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघनं केलं. प्रत्त्युतरादाखलं भारतीय सेनेनंही उखळी तोफांचा मारा केला. यात कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचं सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. **** अमरावती जिल्ह्यात अचलपूर इथं, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्रात दीड हेक्टर क्षेत्रावर रंगीत कापूस बियाणांची लागवड करण्यात आली. रंगीत कापसाचा हा राज्यातला पहिलाच प्रयोग आहे. हा रंगीत कापूस केंद्रीय कापूस यंत्र तंत्रज्ञान विभागाला पाठवला जाणार असून यातून नैसर्गिक रंगीत कापड निर्मिती केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्त्तात म्हटलं आहे. **** गोवा मुक्ती दिन आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी, गोवा मुक्तीसंग्रामात प्राणांची आहुती दिलेल्या सेनानींना आदरांजली अर्पण केली आहे. सशस्त्र सेनेच्या पराक्रमी प्रयत्नांना राष्ट्र नमन करत असल्याचं, राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ****
0 notes