Tumgik
#कार दर यादी
darshaknews · 3 years
Text
BMW ने जगभरात 1 दशलक्षाहून अधिक कार परत बोलावल्या, इंजिनला आग लागण्याचा धोका होता
BMW ने जगभरात 1 दशलक्षाहून अधिक कार परत बोलावल्या, इंजिनला आग लागण्याचा धोका होता
नवी दिल्ली. जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी BMW ने जगभरात विकल्या गेलेल्या दहा लाखांहून अधिक कार परत मागवल्या आहेत. या गाड्यांच्या इंजिन व्हेंटिलेशन सिस्टीममध्ये मोठी त्रुटी असल्याने गाडीला आग लागण्याचा धोका होता. बीएमडब्ल्यूच्या प्रवक्त्याने सांगितले की, यूएसमधून सुमारे 9.17 लाख सेडान आणि एसयूव्ही परत मागवण्यात आल्या आहेत. याशिवाय कॅनडातून 98 हजार आणि दक्षिण कोरियातून 18 हजार कार परत मागवण्यात…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 November 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २० नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
·      एक लाख कृषी पंपांना वीज जोडण्यांसाठी राज्य सरकारचं नवीन धोरण; दिवसा आठ तास वीज पुरवठ्याचं नियोजन.
·      सोमवारपर्यंत वीज देयकं माफ न केल्यास प्रत्येक जिल्ह्यात जनआंदोलन - मनसेचा इशारा.
·      कार्तिकी वारी प्रतिकात्मक स्वरुपात साजरी करावी - सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा राज्य सरकारकडे प्रस्ताव.
·      नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न करणारा एकही दहशतवादी जिवंत परतणार नाही - सैन्यप्रमुख जनरल मनोज नरवणे.
·      राज्यात कोविडचे साडे पाच हजारावर नवे रुग्ण; मराठवाड्यात नव्या साडे चारशे रुग्णांची नोंद.
·      जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात तीन सख्ख्या भावांचा वीजेचा धक्का लागून मृत्यू.  
आणि
·      परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत सरपंचपदांची आरक्षण सोडत जाहीर.
****
शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंपांना वीज जोडण्यांसाठी राज्य सरकारने नवीन धोरण जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे धोरण जाहीर करण्यात आलं. त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्विस कनेक्शन आणि सौर कृषीपंप याव्दारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षात टप्प्याटप्याने कायमस्वरूपी दिवसा आठ तास वीज पुरवठा करण्याचं नियोजन आहे. कृषी फिडर आणि वितरण रोहित्रावरील मीटर अद्ययावत करणं, तसंच सद्य:स्थितीत कार्यरत असणाऱ्या कृषीपंपाना कॅपॅसिटर बसवण्यात येणार आहेत.   यासाठी पायाभूत सुविधांच्या खर्चापोटी शासनामार्फत दरवर्षी पंधराशे कोटी रुपये याप्रमाणे २०२४ पर्यंत भागभांडवल स्वरूपात निधी महावितरण कंपनीस देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे.
 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. ही वाढ सुमारे दहा टक्के असून प्रस्तावित वाढीव दर हे राष्ट्रीय महामार्गावरील पथकरांच्या तुलनेत कमीच आहेत. तर कार, जीप, एसटी, स्कूल बसेस आणि हलकी वाहने यांची पथकरातली सूट कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या डीबीटी प्रणालीसाठी कोटक महिंद्रा बॅंकेत उघडलेले खाते चालू ठेवण्यास विशेष बाब म्हणून सूट देण्याबाबत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महा-डीबीटी पोर्टलद्वारे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरता डीबीटी प्रणाली विकसित होईपर्यत प्रकल्पाच्या अंमलबजावणीत खंड पडू नये आणि शेतकऱ्यांना अनुदान वितरणात अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून प्रकल्पाचे कोटक महिंद्रा बॅंकेत उघडलेले बॅंक खाते चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
****
राज्यभरातल्या एक हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता नव्यानं जाहीर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी काल ही घोषणा केली. १९ जिल्ह्यातल्या या निवडणुकांसाठी २४ फेब्रुवारी २०२० ला कार्यक्रम जाहीर केला होता, पण टाळेबंदीमुळे हा कार्यक्रम रद्द केला गेला. तसंच सुधारित मतदार यादी २५ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नव्यानं नाव नोंदवलेल्या मतदरांना मतदान करता यावं तसंच निवडणूक लढवता यावी म्हणून लवकरच ही यादी जाहीर केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
टाळेबंदी काळातलं वाढीव वीज बिल माफ करण्याबाबत मागणी केली जात असली तरी, त्यासाठी राज्याच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार करावा लागेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसच्या मंत्र्यांकडील खात्यांना पुरेसा निधी दिला जात नाही असा आक्षेप काही मंत्र्यांनी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. आपण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून, यासंदर्भातल्या त्रुटी लवकरच दूर होतील, असं ते म्हणाले.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वीज देयक माफीच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारपर्यंत वीज देयकं माफ करा, अन्यथा प्रत्येक जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. वीजबिलात माफी देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे जनतेत संतापाची भावना असल्याचं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, भारतीय जनता पक्षानं मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, तसंच आपणही आंदोलनात उतरणार असल्याचं विधापरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सांगितलं.
****
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विट संदेशातून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून अभिवादन केलं. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. मुंबईत राजभवनात राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांना अभिवादन करुन उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातही इंदिरा गांधी यांना अभिवादन करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गा विषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकांत सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी केलं आहे.
****
पंढरपूरची आगामी कार्तिकी वारी प्रतिकात्मक स्वरुपात साजरी व्हावी, मानाच्या दिड्यांनी पंढरीकडे मार्गस्थ होऊ नये, असा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. पांडुरंगाचे धार्मिक विधी पंरपरेनुसार पार पडतील, मात्र वारकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणांना त्यानुसार आदेश द्यावेत, असं त्यांनी म्हटलं आहे. कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी होईल, त्या गर्दीत वयस्क भाविकांना श्वास घेण्यास अडचण येऊ शकते, दर्शन रांगेत-वाळवंटात तसंच विविध मठांमध्ये वारकऱ्यांची गर्दी होऊन सामाजिक अंतराचं पालन होऊ शकणार नाही, अशी शक्यता या प्रस्तावात वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, वारकऱ्यांनी फक्त एकादशीलाच पंढरपुरात गर्दी न करता इतर वेळी टप्प्याटप्याने दर्शनासाठी यावं, सध्या मात्र स्वत:च्या घरी, गावातच कार्तिकी वारी साजरी करावी, असं आवाहन प्रातांधिकारी सचिन ढोले यांनी केलं आहे.
****
दरम्यान, राज्य सरकारने कार्तिकी यात्रा रद्द केल्यास आगामी काळात प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा वारकरी संप्रदायानं दिला आहे. केंद्र आणि राज्य शासनाने घालून दिलेले नियम तसंच वारकरी संप्रदायाने यात्रा नियोजनासंदर्भात राज्य शासनाला दिलेला प्रस्ताव या दोन्हीच्या समन्वयातून कार्तिकी यात्रेचं नियोजन केलं जावं, अशी मागणी ‘कार्तिकी यात्रा समन्वय समिती’नं केली आहे.
****
पुढच्या वर्षीच्या हज यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने केलं आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख दहा डिसेंबर २०२० असल्याची माहिती महाराष्ट्र हज समितीचे कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांनी दिली.
****
नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न करणारा एकही दहशतवादी जिवंत परतणार नाही, असं सैन्यप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे. सुरक्षा दलांनी काल पहाटे जम्मू-काश्मीरमध्ये नागरोटा परिसरात जैश-ए-मोहम्मदच्या ४ दहशतवाद्यांना ठार केलं, या चकमकीनंतर सैन्यप्रमुखांनी पाकिस्तानला हा इशारा दिला. जम्मू-श्रीनगर महामार्गावर उधमपूर जिल्ह्यात एका पथकर नाक्यावर काल पहाटे ही चकमक झाली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या जवळून ११ एके रायफल, तीन पिस्तुलं, २९ हातगोळे आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आलं. या चकमकीत एक पोलीस जखमी झाला.
****
राज्यात काल आणखी पाच हजार ५३५ कोविड बाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख ६३ हजार ५५ झाली आहे. काल १५४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४६ हजार ३५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल पाच हजार ८६० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ७९ हजार ७३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ७९ टक्के इतका आहे.  
****
मराठवाड्यात काल कोविडचे नवे साडे चारशे रुग्ण आढळले तर ९ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल पाच रुग्णांचा मृत्यू झाला तर १७० नवे रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला तर आठ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला तर ९३ नवे रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात ७५, लातूर ३५, उस्मानाबाद ३१, नांदेड ३६, तर हिंगोली जिल्ह्यात नवीन दोन कोविडबाधित रुग्ण आढळले.  
****
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, आपण उपचारासाठी मुंबईला रवाना होत असल्याची माहिती खडसे यांन��� दिली. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना विषाणूची चाचणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
येत्या २३ नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरु होणार असून, त्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. औरंगाबाद महानगरपालिकेनं शिक्षकांच्या चाचणीसाठी १६ केंद्रं उभारली आहेत. काल एक हजार ४४ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी केल्याचं महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोविडसाठी वाढवण्यात आलेल्या सर्व आरोग्य उपचार सुविधा पूर्ण क्षमतेने जानेवारी पर्यंत सुरू ठेवाव्यात, असे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील ���व्हाण यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. कोविड-19 च्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांचं आणि जनजागृतीचं प्रमाण वाढवावं, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनीही काल कोविड-19 आढावा बैठक घेतली. लातूर जिल्ह्यात औषधाचा मुबलक साठा असून, व्हँटिलेटरची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी, असं जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात तीन सख्ख्या भावांचा वीजेचा धक्का लागून विहिरीत पडल्यानं बुडून मृत्यू झाला. ज्ञानेश्वर जाधव, रामेश्वर जाधव आणि सुनील जाधव अशी मृतांची नावं आहेत. विद्युत मोटार सुरु करत असतांना ज्ञानेश्वर याला विजेचा धक्का लागला, त्याला वाचवतांना अन्य दोन भाऊही विजेचा धक्का लागून विहीरीत पडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भोकरदन तालुक्यात पळसखेडा इथं परवा रात्री ही घटना घडली.
****
माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांनी नागरिकांना कोविडपासून बचावासाठी त्रिसुत्रींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या ४२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काल निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार आशिषकुमार बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काढण्यात आली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानंतर काही ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या १६ तालुक्यातल्या ग्राम पंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती काल ठिकठिकाणच्या तालुका तहसील कार्यालयात काढण्यात आल्या. जिल्ह्यातल्या कुंटूर, मालेगाव, लहान, रोही पिंपळगाव या मोठ्या ग्राम पंचायतीचं सरपंच पद सर्व साधारण वर्गासाठी राखीव झालं तर महादेव पिंपळगाव आणि बारड ग्रामपंचायती अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी महानगरपालिकेनं परवानगी नसलेल्या १५ बाटलीबंद पाणी उद्योगांना टाळं ठोकलं आहे. परभणी महापालिका हद्दीत पाणी शुद्धीकरणाचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून, कुठलीही तपासणी न करता नागरिकांना पाणी पुरवण्यात येत असल्याचं, प्रदूषण नियामक मंडळाने महापालिकेला कळवलं होतं, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
****
लातूर शहरात नागरिकांकडून घरोघरी जाऊन संकलित केलेला कचरा एकत्रित करून तो डेपोवर पाठवण्यासाठी उभारण्यात आलेले नऊ रॅम्प बंद करण्यात आले आहेत. आता फक्त दोन रॅम्पवर कचरा एकत्र करण्याचं काम सुरू आहे. लवकरच हे भागही कचरा मुक्त होणार असल्याचं महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन केलं जाणार असल्याचं, कारखाना व्यवस्थापनानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल जागतिक शौचालय दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये वैयक्तिक शौचालयाची स्वच्छता, हातांची स्वच्छता, महिलांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठीचे प्रयत्न, असे विविध उपक्रम राबवण्यात आले.
****
0 notes
darshaknews · 3 years
Text
वाहनधारकांना धक्का! पुढील महिन्यापासून वाहन विमा महागणार, पहा नवीन दर यादी
वाहनधारकांना धक्का! पुढील महिन्यापासून वाहन विमा महागणार, पहा नवीन दर यादी
नवी दिल्ली. आता कार, दुचाकी किंवा इतर वाहनधारकांना पुढील महिन्यापासून वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी अधिक रुपये खर्च करावे लागणार आहेत. भारतीय विमा आणि नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने मोटर वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स (तृतीय-पक्ष मोटर इन्शुरन्स प्रीमियम) च्या दरांमध्ये वाढ करण्यासाठी एक मसुदा तयार केला आहे. १ एप्रिलपासून नवे दर लागू होतील. कोविड-19 महामारीमुळे दोन वर्षांनंतर हा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 April 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ एप्रिल २०१९ सकाळी ७.१० मि. ****  शांतताप्रेमी हिंदूंचा दहशतवादाशी संबंध जोडून, बदनाम करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न - पंतप्रधानांची वर्ध्याच्या सभेत टीका  लोकसभा निवडणुकीनंतर सर्व विरोधी पक्षांची एक आघाडी होऊ शकते- काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या रोजगारात वाढ  येत्या आठवड्यात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता - हवामान खात्याचा अंदाज आणि  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक इच्छूक उमेदवारांचे अर्ज दाखल; पुण्यातून काँग्रेसची मोहन जोशी यांना उमेदवारी **** शांतताप्रेमी हिंदूंचा दहशतवादाशी संबंध जोडून, हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधानांनी काल वर्धा इथून, महाराष्ट्रातल्या भाजपच्या निवडणूक प्रचार मोहिमेला प्रारंभ केला. घराणेशाही, भ्रष्टाचार, आदी मुद्यांवरूनही त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार वाऱ्याची दिशा अचूक ओळखतात, त्यामुळेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं मोदी म्हणाले. पवार यांच्या कार्यकाळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मोदी यांनी केला. दरम्यान, काँग्रेस पक्षानं, मोदी यांचा हा आरोप खोटा असल्याचं म्हटलं आहे, वरिष्ठ भाजप नेते, तत्कालीन गृहसचिव आर के सिंह यांनी हिंदू दहशतवाद या शब्दाचा सर्वप्रथम वापर केल्याचं, काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी सांगितलं. **** देशहिताच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरता सर्व विरोधी पक्ष एक झाले आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर सर्व पक्ष एकत्रित येऊन मतदानोत्तर एक आघाडी करू शकतात, असं काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी म्हटलं आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करणं, लोकशाही आणि संविधान वाचवणं या कामाला सर्वाधिक प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय संस्था आणि सामाजिक रचना उद्ध्वस्त करण्यापासून भाजपला रोखणं, विकास आणि अर्थव्यवस्थेला गती देणं, रोजगार निर्मिती, सामाजिक सौहार्द निर्माण करणं तसंच अन्याय आणि असमानतेच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आले असल्याचं गांधी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. **** काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या विरूद्ध केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून भारतीय धर्म जन सेनेचे तुषार वेल्लाप्पल्ली हे उमेदवार असतील, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. केरळमध्ये भाजप आणि भारतीय धर्म जन सेनेची आघाडी आहे. **** लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत येत्या गुरूवारी संपत आहे, त्यामुळे संबंधित मतदार संघात, काल अनेक ठिकाणी इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड, अपक्ष म्हणून संगीता निर्मळ, बहुजन महा पार्टीच्या वतीनं शेख नदीम शेख करिम, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे, तर माढा लोकसभा मतदार संघातून रणजित नाईक निंबाळकर, रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदार संघातून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नीलेश राणे, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे धनंजय महाडिक, शिवसेना-भाजप युतीचे संजय मंडलिक, वंचित बहुजन आघाडीच्या अरुणा माळी यांनी तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसेना भाजप युतीचे धैर्यशील माने, आणि वंचित बहुजन आघाडीचे असलम सय्यद यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. जालना लोकसभा मतदार संघातून अखिल भारतीय सेनेचे गणेश चांदोडे तर शहादेव पालवे यांनी अपक्ष म्हणून, अर्ज दाखल केला आहे. सातारा लोकसभा मतदार संघात बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सहदेव येवले आणि एका अपक्ष उमेदवारानं काल अर्ज दाखल केले. दरम्यान, काल काँग्रेसनं आणखी नऊ उमेदवारांची एक यादी जाहीर केली. यामध्ये पुणे मतदार संघातून मोहन जोशी यांना तर रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. **** महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या रोजगारात १ एप्रिलपासून दरवाढ करण्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या प्रस्तावास निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणारा रोजगार हा कृषी कामगारांच्या ग्राहक मूल्य निर्देशांकाशी संलग्न असून दरवर्षी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, १ एप्रिल रोजी त्याचे नवे दर जाहीर केले जातात. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे ग्रामविकास मंत्रालयानं हे दर जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ�� दर असल्यामुळे ही दरवाढही वेगवेगळी आहे. सध्याच्या दराच्या तुलनेत ही दरवाढ पाच टक्के आणि त्यापेक्षा अधिक आहे. **** येत्या आठवड्यात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नागपूरच्या हवामान केंद्रानं वर्तवली आहे. मराठवाड्यात चार दिवस तर विदर्भात पाच दिवस ही उष्णतेची लाट राहील. काल राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ४३ पूर्णांक ४ डिग्री सेल्सीअंश इतकं नोंदवलं गेलं. दरम्यान, मध्य भारतात यंदा एप्रिल ते जून या काळात, नेहमीपेक्षा अर्धा अंश सेल्सियस अधिक तापमान राहील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. या भागात पुढचे तीन महिने तापमापकाचा पारा कमाल चव्वेचाळीस अंशांपर्यंत वाढू शकतो, अशी शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र ��्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** नांदेड लोकसभा मतदार संघात दोन उमेदवारांना पेड न्यूज प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीसा बजावल्या आहेत. अपक्ष उमेदवार डॉ महेश तळेगावकर यांच्यासंदर्भात दैनिक श्रमिक एकजूट आणि दैनिक नांदेड एकजूट या वृत्तपत्रातून प्रसारीत झालेल्या बातम्यांवरून तसंच दैनिक पुढारी या दैनिकात अपक्ष उमेदवार अशोक चव्हाण यांच्या नावापुढे लोहा असा उल्लेख आल्यानं उमेदवाराची वेगळी ओळख प्रदर्शित झाली. त्यामुळे त्या पेडन्युजच्या व्याख्येत येत असल्याच्या कारणाने दोघाही उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. **** लातूर लोकसभा मतदार संघातली लढत ही तिरंगी होणार आहे. भाजपा सेना युतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मच्छींद्र कांमत हे दोघे करोडपती उमेदवार आहेत, वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राम गारकर त्यांच्याशी झुंज देत आहेत. या तिन्ही उमेदवारांनी आपले संपत्तीविषयक विवरण निवडणूक विभागाला सादर केलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.. भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या परिवाराकडे साडे अठ्ठावीस कोटींची मालमत्ता आहे.तर काँग्रेसचे उमेदवार मच्छींद्र कामत यांच्याकडे अकरा कोटी रूपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. वंचि��� बहुजन विकास आघाडीचे उमेदवार जे निवृत्त शासकीय अधिकारी आहेत राम गारकर यांच्याकडे मात्र अवघे ७९ लाख अठ्याहत्तर हजार आठशे तेहतीस रूपये आहेत. स्वत:च्या मालकिची एक दुचाकी आणि एक स्विफ्ट कार वाहन आहे. आणि या दोघांचा जर विचार केला तर श्रृंगारे आणि मच्छींद्र कामत हे दोघं उद्योजक आहेत त्यामुळे होणारी लढाई ही कोट्याधीशांमधली होणार आहे. **** बीड लोकसभा मतदार संघातल्या शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपासंदर्भात आपणच निवडणूक आयोगाकडं सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल बीडमध्ये वार्ताहरांशी बोलत होत्या. तर खासदारकीचा निधी आपण जिल्ह्याच्या विकास कामांसाठी खर्च केला असून राज्य आणि केंद्र सरकारच्या देखील विविध योजनांचा निधीही जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर आणला असल्याचा दावा यावेळी डॉक्टर प्रितम मुंडे यांनी केला. **** राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनीही प्रचारात आघाडी घेतली असून ते मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर देत आहेत. दरम्यान, सोनवणे यांना जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षानं पाठिंबा दिला आहे. पक्षाचे राज्य समन्वयक अॅड.विशाल कदम यांनी ही माहीती दिली. **** परभणी मतदार संघाचा प्रचाराला गती येत आहे. याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांनी जिंतूर, सेलू इथं शिवेसना भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन प्रचाराचा प्रारंभ केला. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय विटेकर यांनी काल परभणी तालुक्यातील गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर मोहम्मद खान यांनी पालम, गंगाखेड शहराला भेट देवून मतदारांशी हितगुज साधले. हळुहळु सर्व उमेदवारांच्या प्रचाराला वेग येत असल्याचे दिसून येते. **** लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक एन. आर. पाटील आणि चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिशन तेलंग यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी आमदार विनायकराव पाटील उपस्थित होते. **** बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातल्या चिंचाळा तांडा इथं पाण्याचे ड्रम भरून ठेवलेली बैलगाडी उलटून दोन लहान मुले चिरडून ठार झाली. काल ही घटना घडली. पाण्याचे ड्रम भरून ठेवलेल्या या बैलगाडीखाली ही मुलं खेळत असतांना बैलगाडीला लटकल्यामुळं बैलगाडी उलटून ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ***** ***
0 notes