#काँग्रेसकडून
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 22 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 December 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपताच, बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल-मुख्यमंत्र्यांची ग्वाही.
विधान परिषदेच्या सभापतिपदी प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध निवड.
२०२४-२५ च्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी.
आणि
चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामने तटस्थ ठिकाणी घेणार असल्याचं आयसीसीकडून स्पष्ट.
****
उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव उपसभापती हरिवंश यांनी फेटाळून लावला. सभापतींची प्रतिष्ठा डागाळण्याच्या उद्देशाने अत्यंत घाईगडबडीत आणलेल्या या प्रस्तावात त्रुटी असल्याचं उपसभापतींनी सांगितलं. घटनात्मक संस्थांवर चिखलफेक करणं, हाच या प्रस्तावाचा उद्देश असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे.
****
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात कालही व्यत्यय आला. लोकसभेचं कामकाज प्रथम दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.
राज्यसभेतही कामकाज सुरु झाल्यावर विरोधकांनी या मुद्यावर दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर सत्ता��ारी पक्षाच्या खासदार फागनोक कोन्याक यांनी खासदार राहुल गांधी यांच्या सदनाबाहेरच्या आक्षेपार्ह वर्तनाबाबत सभापतींकडे तक्रार केली.
दरम्यान, संसद भवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा काँग्रेसकडून होत असलेल्या अपमानाविरोधात भाजपाच्या खासदारांनी आंदोलन केलं, तर बाबासाहेबांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपचे प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत धक्का लागून पडल्याने जखमी झाले. आपल्याला राहुल गांधी यांचा धक्का लागल्याचा आरोप सारंगी यांनी केला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी याचा निषेध करत, राहुल गांधी यांनी या वर्तनाबद्दल माफी मागावी, असं म्हटलं आहे.
या धक्काबुक्कीत आपल्यालाही इजा झाल्याचं कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. या प्रकाराची सविस्तर चौकशी करण्याची मागणी त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडे केली.
या प्रकरणी, भाजपनं राहुल गांधी यांच्याविरोधात तर काँग्रेसनं भाजप खासदारांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांच्या समर्थकांनी काल राज्यात मुंबई, छत्रपती संभाजीनगर, हिंगोलीसह अनेक ठिकाणी आंदोलनं केली.
दरम्यान, कोणताही राजकीय पक्ष किंवा खासदारांना संसद भवनाच्या कोणत्याही प्रवेशद्वारासमोर आंदोलन करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले आहेत.
****
मागच्या सरकारनं सुरू केलेल्या सर्व योजना आपलं सरकार सुरू ठेवणार असून, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपताच, बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. गेल्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत उत्तर दिलं, त्यावेळी ते म्हणाले.
आज यानिमित्त या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की, कोणतीही शंका मनात ठेवू नका. ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आहोत.
लाडकी बहीण योजनेतल्या अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकण्याचं सुतोवाचही त्यांनी केलं. नऊ लाख कृषीपंप आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. मागेल त्याला सौरपंप आपण देणार असून, तीन महिन्यात सौरपंपाची जोडणी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढतांना, सध्या ईव्हीएमसोबत कार्यरत असलेली व्हीव्हीपॅट यंत्रणा म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घेतल्यासारखंच असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. विविध पक्षांच्या नेत्यांनी मतदानाच्या टक्क्याबाबत, टपाली मतदानाबाबत, तसंच इतरही अनेक मुद्यांवर घेतलेल्या आक्षेपांचं मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उदाहरणं देत निरसन केलं. जनतेनं दिलेला कौल विरोधकांनी स्वीकारावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
****
विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चेला उत्तर दिलं. महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करतानाच, विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची असून, आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन देत असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
****
परभणी आणि बीड जिल्ह्यात झालेल्या घटना या पुरोगामी महाराष्ट्राला तसंच संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत, अशी टीका, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल परभणी आणि बीड जिल्ह्यातल्या घटनेबाबत विधानसभेत बोलत होते. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही असा प्रश्न त्यांनी विचारला.
****
विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडण��ीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राम शिंदे यांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
****
वर्ष २०२४-२५ च्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजूरी देण्यात आली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सात हजार ४९० कोटी २४ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा समावेश आहे. पुरवणी मागण्यांवरील मुद्यांना मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तर देणार असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सांगितलं. फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी या चर्चेत सहभागी होत, आपल्या मतदार संघातल्या विविध रस्त्यांच्या कामाचे कार्यारंभ आदेश निघून पाच महिने उलटून गेल्यावरही कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नसल्याकडे लक्ष वेधलं. विहित मुदतीत काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराचं कंत्राट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. 
****
केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर लावलेलं २० टक्के शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यांनी केंद्रीय व्यापार ��णि उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
****
पाकिस्तानात होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान सामने, तटस्थ ठिकाणी होणार असल्याचं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल स्पष्ट केलं. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत यजमान पाकिस्तानसह भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांचा समावेश आहे. स्पर्धेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
पुढच्या वर्षी भारतात होणारी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, तसंच २०२६ मध्ये भारत-श्रीलंकेत होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकातल्या भारत पाक सामन्यांसाठी हाच नियम लागू राहणार आहे.  
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयात येत्या मंगळवारपर्यंत सुशासन सप्ताह राबवण्यात येत आहे. या सुशासन सप्ताहात जनतेने सहभागी व्हावं असं आवाहन उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी केलं आहे.
हा जो सप्ताह आहे तो केंद्र सरकारने साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत या सप्ताह मध्ये ज्या काही सर्व सामान्य जनतेच्या -गोरगरिबांच्या ऑन लाईन आणि ऑफ लाईन दोन्ही प्रकारच्या तक्रारींचा निपटाला करायचा आहे मी आपल्या जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करते की आपण या सप्ताह मध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या ज्या काही अडचणी असतील ज्या विभागाशी बंधित असतील त्या विभागाशी आपण संपर्क करावा.
****
हिंगोली जिल्ह्यात २४ डिसेंबरदरम्यान सुशासन सप्ताह पाळला जात आहे. काल पहिल्याच दिवशी जिल्ह्यात विविध कार्यालयातर्फे नागरिकांची सनद वाचनाने या सप्ताहास प्रारंभ झाला. आज याअंतर्गत जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालयामार्फत सामाजिक सहाय्य योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग परिसरातल्या कुरनूर पाणी वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी मंजूर निधीपैकी, १३ कोटी ९७ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. १० गावांतल्या तीन हजार ६४३ हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार असल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
दरम्यान, टेंभुर्णी- लातूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारने ५७४ कोटी रुपये मंजूर केल��� आहेत. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ही माहिती दिली.
****
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं काल आसूड मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं.
****
केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून संपूर्ण देशभर २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीमध्ये "देश का प्रकृती परीक्षण" अभियानाचा पहिला टप्पा राबवण्यात येत आहे. धाराशिवच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाकडूनही शहराच्या विविध भागात जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी, नागरिकांना या अभियानात आरोग्य तपासणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे.
****
जालना तालुक्यात इंदेवाडी इथं जमिनीच्या फेर दुरुस्तीसाठी २० हजार रुपये लाच घेणाऱ्या तलाठ्यास जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं. शिवदास प्रेमसिंग पवार असं या तलाठ्याचं नाव आहे.
****
0 notes
nagarchaufer · 1 month ago
Text
घड्याळावर निवडणूक लढवून पराभूत झाल्यावर काँग्रेसवर खापर फोडलं , नगर जिल्ह्यातील उमेदवार म्हणतात की..
घड्याळावर निवडणूक लढवून पराभूत झाल्यावर काँग्रेसवर खापर फोडलं , नगर जिल्ह्यातील उमेदवार म्हणतात की..
काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात दाखल झालेले श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडे यांनी ,’ मागील पाच वर्षात मतदार संघात भरीव विकास कामे केलेली आहे. वाटलं नव्हतं पण पराभव झाला मात्र आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या ताकदीनिशी लढवणार असून प्रत्येक गावात आणि वार्डात राष्ट्रवादीची स्थापना करण्यात येणार आहे ,’  असे म्हटलेले…
0 notes
automaticthinghoagiezine · 11 months ago
Video
youtube
आमदार रोहित पवार यांच्या चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध..
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
मी ओबीसी असल्यामुळे काँग्रेसकडून अपशब्दांचा वापर; पीएम मोदींकडून प्रचारसभेत आरोप
https://bharatlive.news/?p=186771 मी ओबीसी असल्यामुळे काँग्रेसकडून अपशब्दांचा वापर; पीएम मोदींकडून ...
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
एनडीटीव्ही प्रकरणात काँग्रेसकडून हल्लाबोल तर सोशल मीडियात ' नरेंद्र दामोदरदास टीव्ही '
एनडीटीव्ही प्रकरणात काँग्रेसकडून हल्लाबोल तर सोशल मीडियात ‘ नरेंद्र दामोदरदास टीव्ही ‘
देशात सध्या काही मोजकीच प्रसारमाध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक चैनल सरकारला प्रश्न विचारण्याचे काम करत असून त्यात एनडीटीव्ही या च��नलचा आवर्जून उल्लेख केला जातो. केंद्र सरकारला प्रश्न विचारणारा एनडीटीव्ही हा देखील केंद्र सरकारचे जवळ समजले जाणारे उद्योजक गौतम आडाणी हे खरेदी करणार असल्याने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारवर काँग्रेसकडून कठोर शब्दात टीका करण्यात आलेली आहे. ‘ आपल्या जवळच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
एनडीटीव्ही प्रकरणात काँग्रेसकडून हल्लाबोल तर सोशल मीडियात ' नरेंद्र दामोदरदास टीव्ही '
एनडीटीव्ही प्रकरणात काँग्रेसकडून हल्लाबोल तर सोशल मीडियात ‘ नरेंद्र दामोदरदास टीव्ही ‘
देशात सध्या काही मोजकीच प्रसारमाध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक चैनल सरकारला प्रश्न विचारण्याचे काम करत असून त्यात एनडीटीव्ही या चैनलचा आवर्जून उल्लेख केला जातो. केंद्र सरकारला प्रश्न विचारणारा एनडीटीव्ही हा देखील केंद्र सरकारचे जवळ समजले जाणारे उद्योजक गौतम आडाणी हे खरेदी करणार असल्याने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारवर काँग्रेसकडून कठोर शब्दात टीका करण्यात आलेली आहे. ‘ आपल्या जवळच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
एनडीटीव्ही प्रकरणात काँग्रेसकडून हल्लाबोल तर सोशल मीडियात ' नरेंद्र दामोदरदास टीव्ही '
एनडीटीव्ही प्रकरणात काँग्रेसकडून हल्लाबोल तर सोशल मीडियात ‘ नरेंद्र दामोदरदास टीव्ही ‘
देशात सध्या काही मोजकीच प्रसारमाध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक चैनल सरकारला प्रश्न विचारण्याचे काम करत असून त्यात एनडीटीव्ही या चैनलचा आवर्जून उल्लेख केला जातो. केंद्र सरकारला प्रश्न विचारणारा एनडीटीव्ही हा देखील केंद्र सरकारचे जवळ समजले जाणारे उद्योजक गौतम आडाणी हे खरेदी करणार असल्याने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारवर काँग्रेसकडून कठोर शब्दात टीका करण्यात आलेली आहे. ‘ आपल्या जवळच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
एनडीटीव्ही प्रकरणात काँग्रेसकडून हल्लाबोल तर सोशल मीडियात ' नरेंद्र दामोदरदास टीव्ही '
एनडीटीव्ही प्रकरणात काँग्रेसकडून हल्लाबोल तर सोशल मीडियात ‘ नरेंद्र दामोदरदास टीव्ही ‘
देशात सध्या काही मोजकीच प्रसारमाध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक चैनल सरकारला प्रश्न विचारण्याचे काम करत असून त्यात एनडीटीव्ही या चैनलचा आवर्जून उल्लेख केला जातो. केंद्र सरकारला प्रश्न विचारणारा एनडीटीव्ही हा देखील केंद्र सरकारचे जवळ समजले जाणारे उद्योजक गौतम आडाणी हे खरेदी करणार असल्याने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारवर काँग्रेसकडून कठोर शब्दात टीका करण्यात आलेली आहे. ‘ आपल्या जवळच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
एनडीटीव्ही प्रकरणात काँग्रेसकडून हल्लाबोल तर सोशल मीडियात ' नरेंद्र दामोदरदास टीव्ही '
एनडीटीव्ही प्रकरणात काँग्रेसकडून हल्लाबोल तर सोशल मीडियात ‘ नरेंद्र दामोदरदास टीव्ही ‘
देशात सध्या काही मोजकीच प्रसारमाध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक चैनल सरकारला प्रश्न विचारण्याचे काम करत असून त्यात एनडीटीव्ही या चैनलचा आवर्जून उल्लेख केला जातो. केंद्र सरकारला प्रश्न विचारणारा एनडीटीव्ही हा देखील केंद्र सरकारचे जवळ समजले जाणारे उद्योजक गौतम आडाणी हे खरेदी करणार असल्याने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारवर काँग्रेसकडून कठोर शब्दात टीका करण्यात आलेली आहे. ‘ आपल्या जवळच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 23 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळला
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपताच, बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल-मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीनं रद्द करावं-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्राकडे मागणी
आणि
चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तान आणि तटस्थ ठिकाणी होणार असल्याचं आयसीसीकडून स्पष्ट
****
उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव उपसभापती हरिवंश यांनी फेटाळून लावला आहे. सभापतींची प्रतिष्ठा डागाळण्यासाठी अत्यंत घाईगडबडीत आणलेल्या या प्रस्तावात त्रुटी असल्याचं उपसभापतींनी सांगितलं. घटनात्मक संस्थांवर चिखलफेक करणं, हाच या प्रस्तावाचा उद्देश असल्याचं निरीक्षण उपसभापतींनी नोंदवलं आहे.
****
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही व्यत्यय आला. लोकसभेचं कामकाज प्रथम दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.
राज्यसभेतही कामकाज सुरु झाल्यावर विरोधकांनी या मुद्यावर दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर सत्ताधारी पक्षाच्या फागनोक कोन्याक यांनी खासदार राहुल गांधी यांच्या सदनाबाहेरच्या आक्षेपार्ह वर्तनाबाबत सभापतींकडे तक्रार केली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनीही राहुल गांधी यांच्या वर्तनामुळे दोन खासदार पडून जखमी झाल्याचं सांगत, गांधी यांनी माफी मागावी, असं म्हटलं आहे.
****
दरम्यान, संसद भवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा काँग्रेसकडून होत असलेल्या अपमानाविरोधात भाजपाच्या खासदारांनी आंदोलन केलं, तर बाबासाहेबांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला.
****
मागच्या सरकारनं सुरू केलेल्या सर्व योजना आपलं सरकार सुरू ठेवणार असून, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपताच, बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. गेल्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत उत्तर दिलं, त्यावेळी ते म्हणाले –
आज यानिमित्त या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की, कोणतीही शंका मनात ठेवू नका. ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आहोत.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढतांना, सध्या ईव्हीएमसोबत कार्यरत असलेली व्हीव्हीपॅट यंत्रणा म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घेतल्यासारखंच असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. विविध पक्षांच्या नेत्यांनी मतदानाच्या टक्क्याबाबत, टपाली मतदानाबाबत, तसंच इतरही अनेक मुद्यांवर घेतलेल्या आक्षेपांचं मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उदाहरणं देत निरसन केलं. जनतेनं दिलेला कौल विरोधकांनी स्वीकारावा, असं आवाहनही त्यांनी केलं
हे जे मॅनडेट जनतेने आम्हाला दिलेलं आहे, कृपया मॅनडेट स्वीकारा. जेव्हा तुम्ही मॅनडेट नाकारता, आमचा अपमान नाहीये. आम्हाला तर भारताच्या संविधानाने इथं बसवलंय. पण त्याचे संविधानाने ज्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार दिलाय, त्याचा अपमान याठिकाणी करू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे.
विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चेला उत्तर दिलं. महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतानाच, विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. मागील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरूवात झाली असून आता समृध्द महाराष्ट्र हे आमचं एकत्रित मिशन असल्याचं शिंदे म्हणाले. आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ, अशी ग्वाही देतानांच, जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन देत असल्याचं, शिंदे यांनी नमूद केलं.
****
परभणी आणि बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला तसंच संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज परभणी आणि बीड जिल्ह्यातील घटनेबाबत विधानसभेत बोलत होते. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.
****
विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची एकमताने निवड झाली. राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राम शिंदे यांचं स्वागत केल, तसंच त्यांना शुभेच्छा दिल्या.
****
विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी या चर्चेत सहभागी होत, आपल्या मतदार संघातल्या विविध रस्त्यांच्या कामाचे कार्यारंभ आदेश निघून पाच महिने उलटून गेल्यावरही कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नसल्याकडे लक्ष वेधलं. विहित मुदतीत काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराचं कंत्राट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.
****
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातील कुरनूर मध्यम प्रकल्पातील ५५ वर्ष जुन्या पाणी वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी चालु हिवाळी अधिवेशनात १३ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ही दुरुस्ती झाल्यास, १० गावांतील तीन हजार ६४३ हेक्टर क्षेत्राला त्याचा लाभ होणार असल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
****
केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पवार यांनी केंद्रीय व्यापार आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून ही मागणी केली. श्रीलंका सरकारनं कांद्यावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केल्यानं नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांन��� त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांत निर्यात करता यावा असं पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
****
अल्पसंख्याक समाजानं आपल्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांनी केलं आहे. त्या काल जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक अधिकार दिवस पार पडला त्यावेळी बोलत होत्या.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात आज पासून ते येत्या मंगळवार पर्यंत सुशासन सप्ताह राबवण्यात येत आहे. या सुशासन सप्ताहात जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन संगीता राठोड यांनी केलं आहे.
हा जो सप्ताह आहे तो केंद्र सरकारने साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत या सप्ताह मध्ये ज्या काही सर्व सामान्य जनतेच्या -गोरगरिबांच्या ऑन लाईन आणि ऑफ लाईन दोन्ही प्रकारच्या तक्रारींचा निपटाला करायचा आहे मी आपल्या जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करते की आपण या सप्ताह मध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या ज्या काही अडचणी असतील ज्या विभागाशी बंधित असतील त्या विभागाशी आपण संपर्क करावा.
****
हिंगोली जिल्ह्यात आजपासून २४ डिसेंबरदरम्यान सुशासन सप्ताह पाळला जात आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी नुकतेच जिल्ह्यातील सर्व विभागांना सुशासन सप्ताहा बाबत सूचना दिल्या आहेत. आज पहिल्याच दिवशी जिल्ह्यात विविध कार्यालयातर्फे नागरिकांची सनद वाचनाने या सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. उद्या या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामार्फत सामाजिक सहाय्य योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
****
क्रिकेट
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तान आणि तटस्थ ठिकाणी होणार असल्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आज स्पष्ट केलं. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत यजमान पाकिस्तानसह भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांचा समावेश आहे. स्पर्धेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. पाकिस्तान क्रिकेट संघानं २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं.
****
छत्रपती संभाजीनगरच्या महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूनं लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाईन पद्धतीनं वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत.
****
0 notes
nagarchaufer · 1 month ago
Text
गौतम अडाणी यांची जागा तुरुंगात , काँग्रेसकडून अडाणी यांचे कारनामे उघड 
अडाणीचे नाव घेतल्यानंतर राहुल गांधी यांना निशाण्यावर घेण्यासाठी केंद्र सरकार एकही संधी सोडत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गौतम अडाणी यांच्या अटकेची मागणी लावून धरलेली आहे. गौतम अडाणी यांची जागा तुरुंगात असून केंद्र सरकार त्यांना वाचवत आहे , असा देखील राहुल…
0 notes
automaticthinghoagiezine · 1 year ago
Video
youtube
मणिपूरमधील हिंसाचाराचा अकोलेत काँग्रेसकडून निषेध..
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
काँग्रेसकडून सलग सात वेळा खासदार राहिलेल्या संदिपान थोरात यांचे निधन
https://bharatlive.news/?p=78819 काँग्रेसकडून सलग सात वेळा खासदार राहिलेल्या संदिपान थोरात यांचे ...
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
Election | कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये महविकास आघाडीचा डंका; पहा सविस्तर आकडेवारी...
Tumblr media
Election | राज्यात काल (ता.२९) शनिवार या दिवशी १४७ समित्यांपैकी १४५ समित्यांचे निकाल हाती आले आहेत. अशातच आता ७९ बाजारसमित्यांमध्ये महाविकास आघाडीचा डंका पिटला जातो. तसेच भाजप – शिवसेना युतीला २९ जागा मिळाल्या आहेत. तसेच ३७ जागांवर इतर आघाड्यांवर यश मिळालं आहे. अशातच बीडमध्ये पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. बीड आणि लातूरमध्ये पंकजा मुंडेंना अपयश बीडमधील परळी येथे झालेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना धक्का देत पराभव केला. दुसरीकडे अंबेजोगाई बाजारसमितीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना मोठा धक्का दिलाय. १८ जागांपैकी १५ जागांवर मविआने बाजी मारली. यावर आता पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचे अभिनंदन केलं. तसेच लातूरमध्ये काँग्रेसचा गड कायम राहिला. उदगीरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत पॅनलने झेंडा फडकविला आहे. बारामतीत राष्ट्रवादीचा गड कायम बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि बारामती हे समीकरण नवीन नाही. अशातच काल झालेल्या बाजारसमितीच्या निवडणुकीत १७ पैकी १७ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. भाजपच्या चारी मुंड्या चित केलं. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि विखे पाटलांमध्ये काल बाजारसमित्यांमध्ये चुरस रंगली आहे. विखे पाटलांकडून एकही पॅनेलचे खाते उघडले गेले नाही. या ठिकाणी बाळासाहेब थोरात विजयी झाले. खानदेशात दादा भुसेंवर ब्रेक नाशिकमधील कृषी उत्पन्न बाजारसमितीत दादा भुसे यांच्या पॅनलचा दारुण पराभव करण्यात आला होता. चांदवडमध्ये भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांना सत्ता गमवावी लागली. येवल्यात छगन भुजबळ वरचढ पहायला मिळतात. चंद्रपूर येथे काय झालं सात समित्यांवर काँग्रेस, दोनवर भाजप चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, ब्रह्मपुरी, सिंदेवाही आणि मूल या चार बाजार समित्यांवर काँग्रेसने, तर चिमूर आणि नागभीड बाजार समित्यांवर भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे. यामध्ये सिंदेवाही बाजार समिती काँग्रेसने भाजपकडून, तर चिमूर बाजार समिती भाजपने काँग्रेसकडून हिरावून घेतली आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीत रवी राणा चारी मुंड्या चित अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्���ा पॅनलने सर्व १८ जागांवर कब्जा करीत भाजप, शिंदे सेना आणि आमदार रवी राणा यांच्या शेतकरी पॅनलला चारी मुंड्या चीत केले. कर्जतमध्ये टाय टाय फिश अहमदनगर आणि कर्जतमधील बाजारसमितीच्या निवडणुकीत १८ काहीच निकाल हाती आला आहे. दोन्ही आमदारांना समान कौल मिळाला आहे. भाजप आमदार राम शिंदे गटाला ९ आणि रोहित पवार गट यांना ९ जागा मिळाल्या आहेत. संभाजीनगरात शिंदे – भाजप गटाचा डंका संभाजीनगरमध्ये शिंदे आणि भाजप गटाचा डंका पिटला आहे. १५ पैकी ११ जागांवर भाजप आणि शिंदे गटाने वर्चस्व मिळवलं आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले. Read the full article
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे भारत जोडो यात्रेला मिळत असलेले यश आणि प्रतिसादाचा परिणाम आहे. अख्खा देश पायी चालत भारत जोडो यात्रा काढणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी भारत तर सोडा महाराष्ट्रही अद्याप पूर्णपणे पाहिलेला नाही. इतरांच्या मेंदू विषयी बोलण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. राज ठाकरे यांनी आपला मेंदू भाजप आणि मिंधे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे भारत जोडो यात्रेला मिळत असलेले यश आणि प्रतिसादाचा परिणाम आहे. अख्खा देश पायी चालत भारत जोडो यात्रा काढणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी भारत तर सोडा महाराष्ट्रही अद्याप पूर्णपणे पाहिलेला नाही. इतरांच्या मेंदू विषयी बोलण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. राज ठाकरे यांनी आपला मेंदू भाजप आणि मिंधे…
Tumblr media
View On WordPress
0 notes