#कर्नाटकात पाऊस
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 04 January 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
राज्यात यंदा अपुरा पाऊस झाल्यानं रब्बी हंगामातील पेरण्या मागील वर्षाच्या तुलनेत एकोणनव्वद टक्क्यांवर स्थिरावल्या आहेत. राज्यातील रब्बीचं क्षेत्र सरासरी चोपन्न लाख हेक्टरच्या घरात असून एक डिसेंबरअखेर त्यापैकी ४८ लाख पासष्ठ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. अपुऱ्या पावसामुळं राज्यात रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता कमी आहे, त्यामुळं कमी पाण्यावर येणाऱ्या ज्वारी आणि करडई पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलं आहे, आता पेरण्यांचा टक्का फारसा वाढण्याची शक्यता नाही, असं विकास आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांनी म्हटलं आहे.
****
दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणूक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या जगभरातील उद्योगांशी उत्तम संपर्क, समन्वय राखा. परिषदेत 'मॅग्नेटिक महाराष्ट्राचं' प्रभावी ब्रॅण्डिंग करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
****
नवी मुंबईतील पावणे औद्योगिक परिसरातील एका रबर कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली. आग वेगानं पसरल्यानं जवळपासच्या सहा दूध आणि टायर कंपन्यांही आगीच्या कचाट्यात सापडल्या. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या आणि पाण्याचे टँकरद्वारे गेल्या पाच तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
****
देशांतर्गत साखर उत्पादनात महाराष्ट्रानं आघाडी घेतली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदार महासंघानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वर्तमान गळीत हंगामात राज्यात आतापर्यंत सुमारे अडोतीस लाख वीस हजार टन साखरेचं उत्पादन झालं आहे. उत्तरप्रदेश चौतीस लाख पासष्ठ हजार टन साखरेचं उत्पादन करुन दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावरील कर्नाटकात चोवीस लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील साखर उताऱ्यात मात्र यंदा आठ पूर्णांक पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत घट नोंदवण्यात आली आहे.
****
अकोला इथं पहिली ते सातवीच्या मूकबधीर विद्यार्थ्यांना विविध विषय डिजीटल माध्यमातून शिकण्यासाठी सॉफ्टवेअर आणि टॅब आदी सुविधांचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते, शासकीय मूकबधीर विद्यालयात करण्यात आला. अकोल्यातली ही शाळा आता महाराष्ट्रातील पहिली डिजिटली समावेशक शासकीय मूकबधीर शाळा ठरली आहे.
मुकबधीरांसाठी तयार करण्यात आलेले अप्लिकेशन्स शिक्षणात सहाय्यक ठरणारं असून हे अप्लिकेशन्स 'लर्न अँड एम्पॉवर'या कंपनी विकसित केलं आहे. या संशोधनाला रोजगार आणि उद्योजकता विकास विभागाच्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेत पारितोषिक मिळालं आहे, अशी अप्लिकेशन्स मूकबधीर शिक्षण घेण्यासाठी सहाय्यक ठरू शकतात. गणित आणि इंग्रजी हे विषय सॉफ्टवेअरद्वारे ऑफलाईन शिकणेही शक्य आहे. यामुळं मुलं सॉफ्टवेअरच्या साह्यानं स्वतःच शिकू शकणार आहेत.
****
केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेला नाशिक जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत यात्रेसाठी तयार केलेली चौदा डिजिटल वाहनं आठशे एकोणऐंशी गावापर्यंत पोहोचली आहेत.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या संदर्भात काल सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्ह्यात आयुष्यमान कार्डासाठी ३९ लाख अठ्ठेचाळीस हजार इतके ला��ार्थी आहेत. मात्र, आतापर्यंत चौदा लाख एकोणसत्तर हजार पाचशे चौरेचाळीस कार्ड वाटप झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, विकसित भारत संकल्प यात्रेचा वेग वाढवावा, तसंच ज्या गावांमध्ये विरोध झाला आहे, तिथं शासकीय योजना पोहचवून पुन्हा ही यात्रा आयोजित करावी, असे आदेशही मंत्री डॉ. पवार यांनी यावेळी दिले.
****
वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नांदेड शहरात आजपासून जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. आज सायंकाळी खडकपूरा भागातल्या मैदानावर जाहीर सभेनं या संवाद यात्रेला प्रारंभ होईल, अशी माहिती प्रदेश प्रवक्ता फारुक अहमद यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
****
२०२३ या वर्षात झालेल्या ट्वेंटी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अव्वल कामगिरी करणाऱ्या २० पैकी ८ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आयसीसी पुरस्कारांच्या निवडीसाठी नामांकन मिळालं आहे. यात भारताच्या सूर्यकुमार यादवसह न्युझीलंडच्या मार्क चॅपमॅन, युगांडाच्या अल्पेश रमजानी आणि झिम्बॉब्वेच्या सिकंदर रजा यांना आयसीसी पुरुष ट्वेंटी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवडण्यात येणाऱ्या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
[Hindi] मान्सून २०२१: तेलंगाना, ओडिशा आणि महाराष्ट्रात मुसलमान बारिश आसर / मान्सून २०२१: कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तेलंगण, ओडिशा आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होऊ शकतो.
[Hindi] मान्सून २०२१: तेलंगाना, ओडिशा आणि महाराष्ट्रात मुसलमान बारिश आसर / मान्सून २०२१: कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तेलंगण, ओडिशा आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होऊ शकतो.
बंगालची उत्तर-पश्चिमी खादी वरील उपरोक्त प्रक्षेपण क्षेत्राचे क्षेत्र आता मैदानी भाग आणि शेष समुद्री भाग बनले आहे. ह�� ओडिशा, छत्तीसगड आणि बंगालची खाडी उत्तर पश्चिमी भागांचा भाग आहे. ��ुढच्या 48 घंटोंमध्ये ही मौसमी सिस्टम ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात जाताना उत्तर-पश्चिमेकडील बाजू वाढविली जाते. त्यानंतर, पूर्वेकडील राजस्थानच्या बाहेरील क्षेत्रापासून, ही मौसमी प्रणाली विशिष्ट आहे आणि उत्तर…
View On WordPress
#ओडिशा मध्ये बारिश#ओडिशामध्ये पाऊस#कर्नाटक मध्ये बारिश#कर्नाटकात पाऊस#गुजरात मध्ये बारिश#गुजरातमध्ये पाऊस#तेलंगणात पाऊस#तेलंगाना मध्ये बारिश#पावसाळ्यात कमी दबाव#बंगाल खाडी खालील दबाव#बंगालच्या खाडीत कमी दबाव#मध्य प्रदेशात पाऊस#मध्य प्रदेशात बारिश#महाराष्ट्रात पाऊस#महाराष्ट्रात बारिश#मानसून मध्ये खालील दबाव
0 notes
Text
ऑन कॅमेरा, कर्नाटकात टोल बूथवर भीषण रुग्णवाहिकेचा अपघात, 4 जणांचा मृत्यू
ऑन कॅमेरा, कर्नाटकात टोल बूथवर भीषण रुग्णवाहिकेचा अपघात, 4 जणांचा मृत्यू
टोल बूथ केबिनला धडकण्यापूर्वीच अॅम्ब्युलन्स एक्वाप्लॅन झाली बेंगळुरू: कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात आज रुग्ण आणि दोन परिचरांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा ताबा सुटला आणि एका टोल बूथवर कोसळली, त्यात तिघेही आणि एक टोल अटेंडंट ठार झाला. चालक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. टोल बूथवरील सीसीटीव्ही कॅमेरा कर्नाटक किनारपट्टी जिल्ह्यातील एका ओल्या रस्त्यावर पाऊस पडला होता तेथे भीषण अपघात…
View On WordPress
0 notes
Text
उद्ध्वस्त महाराष्ट्राला वाली कोण?
महाराष्ट्र उन्हाने करपलेला आहे. मृग नक्षत्र संपले…. पुढच्या दोन्ही नक्षत्रांनी धोका दिला. तिकडे चेरापुंजीत चार हजार मि.मि. पाऊस कोसळून गेला. इकडे महाराष्ट्रात कडक उन्हात शेती करपून निघाली. केलेल्या पेरण्या फुकट गेल्या. पुन्हा पेरणीची पाळी आली. एकरी दोन हजार रुपयांचा खर्च… वरती मजूरी, एवढे करून पाऊस येईल की, नाही याची खात्री नाही…. सामान्यप��े खरीप हंगाम जवळ आला की, राज्याचा कृषीमंत्री विभागवार दौरे करून बी-बियाणे वाटपांची व्यवस्था कशी आहे, पुरवठा करणा-यांकडे पुरेसे बियाणे पोहोचले की नाही, जिल्ह्याचे कृषी अधिकारी यांची त्यासाठी नेमणूक झाली की नाही, बियाणे वाटपांची जबाबदारी कोणत्या कृषी अधिका-यावर आहे… अशा अनेक व्यवस्था विभागवार बैठका घेवून कराव्या लागतात… सध्या महाराष्ट्राचा कृषीमंत्री कोण? ते नाव कोणालाही माहिती नाही… जे दादा भुसे नावाचे कृषीमंत्री आहेत, ते आसाममध्ये जावून चेरापुंजीचा पाऊस बघत बसलेले आहेत. अशा अवस्थेत सारा महाराष्ट्र होरपळून चालला असताना तिकडे मेघालयातील चेरापुंजीत देशाच्या संपूर्ण मोसमातील अर्धा पाऊस कोसळून गेला. इकडे महाराष्ट्रात सरकार कोसळल्यात जमा आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत कधीही झाले नाही, असे राजकीय धिंगाणे सुरू आहेत. आरोप-प्रत्यारोप, आमदारांची पळापळ, सरकार जागेवर नसणे, सारे काही महाराष्ट्राला पार बदनाम करून टाकणारे घडले आहे. पुढे काय होईल, कोणाला सांगता येत नाही. सत्तेच्या साठमारीत सत्तेवर कोण येईल? याचे भविष्य वर्तवता येत नाही. कोणीही आला तरी आता महाराष्ट्राची विस्कटलेली घडी आणि उद्ध्वस्त झालेला शेतकरी, याला सावरण्याची कुवत असलेला नेता आता महाराष्ट्रात शिल्लक नाही. सगळे सत्तेभोवती आणि त्यातून मिळवायच्या पैशांभोवती रिंगण घालणारे आहेत. आषाढी एकादशी जवळ आल्यामुळे आळंदी- देहूतून ज्ञाानोबा- तुकोबांच्या पालख्या पंढरपूरकडे निघाल्या. या कठीण परिस्थितीतही करपवणारे ऊन अंगावर झेलून लाखो लोक या वारीत होते. महाराष्ट्राच्या एकाही वृत्तवाहिनीला भक्तीच्या रिंगणाची, या परंपरेची थेट दखल घ्यावीशी वाटली नाही. वाहिन्यांचे कॅमेरे सूरत, गुवाहटीला पोहोचले. ए.बी.पी. माझा तर जाहिरातच करत राहीले की, आमचा माणूस सुरत येथे पोहोचलाय….. पण आळंदी, देहू ,पंढरपूरला पोहोचावे, असे कोणालाच वाटले नाही. महाराष्ट्र भलतीकडेच निघाल्याची ही लक्षणे आहेत. आता या महाराष्ट्राला कोणी सावरू शकेल, अशी स्थिती नाही. राजकीय पक्ष विकलांग झाले आहेत. केंद्रात बसलेला भाजपा पक्ष मिळेल त्या मार्गाने एक-एक राज्य पाडण्याच्या मागे आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे सरकार कोसळेपर्यंत वेळ आली. वृत्तपत्रांत निवेदने दिली जात होती… ‘महाआघाडीचे सरकार ५ वर्षे पूर्ण करेल….’ पण, ही निवेदने करणा-यांच्या ��ोळ्यासमोर राज्याच्या ग्रामीण गृहमंत्र्यासोबत ३५ आमदार पळाल्याचे समजलेसुद्धा नाही… या मंत्र्यांनी आपली सुरक्षा व्यवस्था परत पाठवून दिली. तेही मुख्यमंत्र्यांना कळले नाही. सगळे विधानसभेत बसलेले आहेत. विधान परिषदेचे मतदान आटोपले आहे… आणि ३५ आमदार ठाण्याच्या महापौरांच्या बंगल्यावर जेवण करून सुरतेकडे निघाले…. राज्य चालवताना जो चाणक्षपणा लागतो, सावधपणा लागतो, त्याचा पूर्ण अभाव आणि हे का घडले, हे समजून न घेण्याची भूमिका, यातून महाराष्ट्रात अराजक निर्माण झाले. सत्तेवर असलेले आणि सत्तेतून पळालेले दोघेही या भयानक परिस्थितीला, आणि महाराष्ट्रातील जनतेला वा-यावर सोडण्याला जबाबदार आहेत. याही स्थितीत महाराष्ट्रातील जनता हे सगळे राजकीय भयानक नाट्य विनोदाने घेत होते. त्यामुळेच हे चार दिवस थोडे सुस झाले. ‘पंतप्रधान मोदी तुकोबांच्या भेटीला देहूला आले आणि एकनाथाला घेवून पळाले…’ ‘या आषाढीला आता माझी पूजा कोणता मुख्यमंत्री करणार? असा प्रश्न पंढरपूरचा विठुराया विचारतोय….’ अशा हलक्या-फुलक्या विनोदांनी दिवस ढकलले जात होते. पण हे तात्पुरते विनोद आहेत. त्या विनोदाने क्षणभर हसू आल्यावर महाराष्ट्राची गंभीर राजकीय परिस्थिती बदलत नाही, असे विनोद पावला-पावलावर होतात. माझ्या एका मित्राने गाडी घेतली… शोरूममध्ये ती गाडी बघायला गेलो, ‘होंडा अमेझ…’ गाडी घेणा-याने विचारले ‘डिकी मोठी आहे का?’ शोरूमच्या माणसाने डिकी उघडून दाखवली. ‘खूप मोठी डिकी आहे’. तो किती विनोदी होता… डिकी उघडताना तो म्हणाला… ‘दोन आमदार सहज बसून, गुवाहटीपर्यंत जावू शकतील….’ जे गुवाहटीला गेले त्यांचे भले होओ… पण आजच सांगून ठेवतो… यातील ५० टक्के आमदार आपल्यावरील ई.डी.ची बला टळो, या हिशोबाने गेले आहेत. कोणी आमदार जाधव मॅडम आहेत… यांनी तर ते जाहीरच करून टाकले… केंद्रातील भाजपाच्या सरकारचे हेच धोरण आहे… जी राज्ये आपली नाहीत, तिथं सर्व केंद्रीय यंत्रणा वापरून त्या सरकारांची तोडफोड करायची. कर्नाटकात तेच झाले… मध्यप्रदेशमध्ये पुन्हा शिवराजमामा मुख्यमंत्रिपदी त्याच पद्धतीने आले. तिथेही आमदार फोडले. तोच प्रयोग महाराष्ट्रात झाला. नुसात झाला नाही तर या भयानक राजकीय नाट्याची अतिशय पद्धतशीर आखणी करून झाला. कोण चूक, कोण बरोबर? याची चर्चा होत राहील…. पण खंत एवढीच वाटते की, महाराष्ट्राचे आघाडीचे सरकार एवढे झोपून कसे राहिले… त्यामुळे गाफील रहाणा-या सरकारने बेफीकीरीमध्येच हे सरकार कोसळेपर्यंत वेळ आणली. राज्याचा गृह राज्यमंत्री (शंभुराजे देसाई) सुद्धा सुरतपर्यंत पोहोचतो… त्याचा पत्ता लागत नाही. एखाद्या जादूगाराने २४ तास संपूर्ण विधानभवनातील नेत्यांना गुंगीचे औषध द्यावे, तशी स्थिती आहे. उद्धवसाहेब म्हणाले, ‘माझ्याच लोकांनी मला फसवले….’ अर्थात जे गेले त्यांची हालत खराब होईल, हे तर नक्कीच आहे… एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे सांगितले की, ‘आमच्या मागे महाशक्ती आहे…’ ही महाशक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही… अमेरिका, रशिया नाही… तर मोदी, शहा यांचीच ही महाशक्ती आहे. त्यांच्या संमतीनेच हे सगळं घडले… भाजपा आता यांना वापरून घेणार आणि एकनाथ शिंदे सोडले तर बाकीच्यांना वापरले की, चोथा करून फेकून देणार… हे असेच घडणार…. महाराष्ट्रात फडणवीसांनी हा प्रयोग यापूर्वीही केला… त्यावेळच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील यांनाच त्यांनी पळवले… माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना पळवले.. तिकडे राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष मधुकर पिचड यांना पळवले… बबन पाचपुते यांना पळवले… मराठवाड्यात सूर्यकांता पाटील आणि माजी मंत्री भास्करराव खतगावकर यांना पळवले. आज हे सगळेजण पस्तावलेले आहेत. भास्करराव पाटील तर काँग्रेसमध्ये परत आले. शिंदे यांच्यासोबत जे ३५-४० आमदार असल्याचे सांगितले जाते, त्यांचीही हालत अशीच होईल. या सगळ्यांना सत्ता द्यायची म्हटली तर जे भाजपासाठी वर्षांनुवर्षे काम करत आहेत त्यांना बाजुला फेकून द्यावे लागेल…. आजही त्यांच्यामधील असंतोष नेत्यांनी समजून घेतला नाही तर उद्या भाजपामध्येही एखादा ‘एकनाथ शिंदे’ निघेल. आता शिंदेंच्या माणसांना ठाण्यात मंत्री करायचे तर…. संजय केळकर यांना फेकून द्यावे लागेल. निष्ठावंत माधव भंडारी आयुष्यभर सतरंज्या उचलत आहेत… असे भाजपामध्येही हळूहळू असंतोषाचे स्फोट होवू लागतील. एकनाथ शिंदे यांना अगदी स्पष्टपणे सांगायला हवे की, आज तुम्हाला हे बंड जरी गोड वाटत असले तरी…. जेव्हा सत्तावाटप होईल तेव्हा तुमचेच अर्धे लोक तुमच्या विरोधात उभे राहतील… यापूर्वी असे घडलेले आहे. सर्वांना सत्तेत सामावून घेता येणे शक्य नाही. तुमच्या भोवती जमलेले कोणीही ‘त्यागी’ आणि ‘सेवाभावी’ आहे, असे अजिबात समजू नका… सत्तेसाठीच ते तुमच्या भोवती आहेत. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठींबा दिला तोही फार मोठ्या तात्विक भूमिकेने दिला, असे अजिबात नाही. त्यात राजकीय ��डजोड होतीच…. ‘भाजपा नको’, ही भूमिका होतीच… आणि ती योग्यच होती. पण सत्ता मिळणार याचा लोभ जास्त होता आणि ती मिळाल्यानंतर अडीच वर्षे आघाडीच्या सगळ्याच पक्षांच्या डोक्यात सत्ता गेली. सेनेच्या डोक्यात जास्त गेली. आमदार शिरसाट यांचे पत्र शांतपणे वाचा… असंतोष का निर्माण झाला, याची कारणं त्यात आहेत आणि ती नेमकी आहेत. संजय राऊत यांच्याबद्दल सेनेच्या आमदारांचीच काय भावना होती, हे त्या पत्रात स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. उद्या उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरल्यानंतर शिवसेनेचे लढाऊ सैनिक त्यांच्या सोबत राहतील. आजचा संघर्ष थोडासा अडचणीचा वाटला तरी शिंदे यांच्या सेनेला महाराष्ट्रात पाठींबा मिळणार नाही…. ठाण्यातसुद्धा मामुली पाठिंबा मिळेल. आज जो पाठिंबा आहे तो तात्पुरता आहे. शिवसेनेचे नेते म्हणून उद्धव ठाकरे पुन्हा रस्त्यावर उतरले तर त्यांच्याच बाजूने शिवसेनेचे कडवे लोक उभे राहतील. पण त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल. -मधुकर भावे Read the full article
0 notes
Text
आगमन पुन्हा लांबलं; मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला
आगमन पुन्हा लांबलं; मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला
महाराष्ट्रातील आगमनासाठी १२ जूनचा नवा मुहूर्त सिंधुदुर्ग : यंदाच्या वर्षी लवकर येणार म्हणता म्हणता मान्सूननं हवामान खात्याला चांगलंच तोंडघशी पाडलंय. कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास १२ ते १३ जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, उत्तर…
View On WordPress
0 notes
Photo
वादळ रायगडच्या दिशेने:25200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले, नुकसानीचा अंदाज बांधणे कठीण वादळाचा परिघ 35 किमी, याच क्षेत्रात वाऱ्याचा वेग अधिक तौक्ते चक्रीवादळाने शनिवारी रात्री उशिरा दिशा बदलली. ते १०० किमी पूर्वेकडे सरकले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर रात्री ते धडकण्याची शक्यता असून या भागातून सुमारे अडीच हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी दुपारी हे वादळ रौद्ररूप धारण करून गोव्यापासून १२० किमी अंतरावरून पुढे सरकले. मात्र, यामुळे ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे आणि पावसाने दाणादाण उडवून दिली. केरळमध्ये आता या वादळाचा जोर ओसरला असून वाऱ्याचा वेगही मंदावला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सध्या वादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत. वादळाचा परिघ ३५ किमी, याच क्षेत्रात वाऱ्याचा वेग अधिक या वादळाच्या केंद्राचा परिघ ३० ते ३५ किमी असून या कक्षेबाहेर फार ढग नाहीत किंवा अति वेगवान वारेही नाहीत. या परिघात मात्र ताशी १५० किमी वेगाने वारे वाहत आहेत. हे वादळ किनारपट्टीवर धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी १०० ते १२० किमी होईल असा अंदाज आहे. तेव्हा या वादळाचे रौद्ररूप दिसेल. वादळाने दिशा थोडी बदलल्याने ते गुजरातमधील द्वारकेला न धडकता आता १८ मे रोजी पाेरबंदर व महुआदरम्यान दीवच्या भागांत धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईसह कोकणात या वादळाच्या प्रभावामुळे जोरदार पाऊस आणि वारे पाहता पूर्ण खबरदारी घेण्यात आली असून शहरातील जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांना स्थलांतरित करण्यात आले आहे. रुग्णालयांचा वीजपुरवठा व आॅक्सिजन याची खबरदारी घेण्यात येत आहे. कर्नाटकात चौघांचा मृत्यू, गोवा-महाराष्ट्रात मुसळधार #maharashtra वादळामुळे कर्नाटकात चौघांचा मृत्यू झाला. ७ जिल्ह्यांत ७३ गावे प्रभावित झाली असून ३०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर ५६ पथके सज्ज आहेत. गोव्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसले. मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता. किनारपट्टीवर एनडीआरएफची १०१ पथके तैनात. सर्वात मोठा धोका गुजरातला. https://www.instagram.com/p/CO9mdlQpNTD/?igshid=12qf5u13an19k
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशात सर्वसमावेशक विकासाचं आदर्श प्रारूप तयार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन.
विरोधकांच्या एकजुटीमुळेच भाजप जुन्या मित्र पक्षांना गोळा करत असल्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिर्काजुर्न खरगे यांची टीका.
सभापती तसंच उपसभापतींना पक्षांतर बंदी कायदा लागू नाही-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आणि
मोसमी पाऊस राज्यभर सक्रीय.
****
देशात सर्वसमावेशक विकासाचं आदर्श प्रारूप तयार होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अंदमानची राजधानी पोर्टब्लेयर इथं ��ीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एकीकृत टर्मिनलचं आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्यसंवाद प्रणालीने उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. विकासाचं हे प्रारूप अत्यंत व्यापक असून, यामध्ये प्रत्येक क्षेत्र आणि समाजाच्या सर्व घटकांचा तसंच शिक्षण, आरोग्य आणि जीवनावश्यक मुद्यांचा विकास अंतर्भूत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. पंतप्रधानांनी अंदमानासह देशभरात राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. दरम्यान, आज उद्घाटन झालेल्या या टर्मिनलवरून दररोज ११ हजार प्रवाशांना सेवा पुरवता येणार आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या, मोदी आडनाव मानहानी प्रकरणात शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्याला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात येत्या शुक्रवारी, एकवीस तारखेला सुनावणी होणार आहे. या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिका सत्र न्यायालय तसंच गुजरात उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज “सहारा इंडिया रिफंड पोर्टल”चं उद्घाटन केलं. यामुळे सहारा इंडिया समूहात आर्थिक गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारनं याप्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत होती. याबाबतीत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानंतर केंद्र सरकारनं हे पोर्टल सुरू केलं आहे.
****
सव्वीस विरोधी पक्षांची एकत्रित दुसरी बैठक आज कर्नाटकात बंगळुरू इथे पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, नीतिशकुमार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. विरोधकांच्या या आघाडीचं नाव इंडियन नॅशनल डेव्हेलपमेंटल इंक्लुसिव्ह अलायन्स, - इंडिया असं असेल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही महिती दिली. विरोधकांच्या एकजुटीमुळेच भाजप आपल्या जुन्या मित्र पक्षांना गोळा करण्याचे प्रयत्न करत आहे, असा दावा खरगे यांनी यावेळी केला.
राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना, ही लढाई देशाच्या आवाजासाठी आहे, म्हणून हे नाव निवडलं आहे असं सांगितलं. भाजपची विचारधारा, हेच आमचं लक्ष्य आहे, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलतांना, वेगवेगळ्या विचारधारा असूनही आम्ही सव्वीस पक्ष एकत्र आलो कारण आमचा हुकूमशाहीला विरोध असल्याचं सांगितलं. एक व्यक्ती किंवा एक पक्ष म्हणजे देश नव्हे, असं मतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. या आ��ाडीची पुढची बैठक मुंबईत होणार आहे.
****
भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचीही आज नवी दिल्लीत बैठक सुरू आहे. देशाच्या प्रगतीला अजून पुढे नेण्यासाठी आमची युती सतत प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधानांनी या बैठकीच्या पार्श्वभूमीवर एका ट्विट संदेशात म्हटलं आहे. अडतीस पक्ष सोबत असल्याचा दावा भाजपनं केला आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित आहेत. दरम्यान, आत्मविश्वास नसलेले सर्व विरोधक एकत्र येऊन ही त्यांचा नेता ठरत नसल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांच्या बैठकीवर केली. आमची युती विचारांची आहे आणि राज्यातलं सरकार आता आणखी मजबूत झाल्याचं शिंदे यांनी नमूद केलं.
****
अपात्रतेसंदर्भातली सुनावणी आणि निकाल पूर्ण होईपर्यंत डॉक्टर नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावर बसण्याचा अधिकार आहे, असं खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज विधान परिषदेत बालत होते. नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्याच सदस्य आहेत, शिंदे गट हाच मूळ शिवसेना असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे आणि पक्षांतर बंदीचा कायदा इथे लागू होत नाही, असं ही उपमुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय सभापती, उपसभापती झाल्यानंतर पक्षाच्या राजीनाम्याचं बंधन नसतं, असं ते म्हणाले. विरोधकांनी उपस्थित केलेला उपसभापतींच्या अपात्रतेचा मुद्दाच चुकीचा असून, पक्षांतरबंदीचा कायदा उपसभापतींना लागू होतच नाही, असं उपमुख्यमंत्र्यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं.
याआधी सकाळी विधानपरिषदेत कामकाज सुरू होताच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला मात्र उपसभापतींच्या अपात्रतेच्या मुद्यावर चर्चा होऊ द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली. प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा मुद्दा मांडावा, यावेळी तालिका सभापती सभागृहाचं कामकाज सांभाळतील, असं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. आज सकाळी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत तोडगा निघालेला आहे, त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा मुद्दा मांडावा असं उपसभापती नीलम गोर्हे यांनीही सांगितलं. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरळीत सुरू झाला.
****
राज्यात पोलीस दलातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लोकसंख्येनुसार नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. १९७१ नंतर पहिल्यांदाच या पद्धतीने अधिकारी - कर्मचाऱ्याची नियुक्ती होत असल्याचे ते म्हणाले. पोलिस दलातल्या विविध पदांची भरती सरकारनं सुरू केली असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र विधान परिषदेचा शतकोत्तर महोत्सव परिसंवाद, प्रदर्शनं, संदर्भसमृद्ध प्रकाशनं याद्वारे, संस्मरणीय ठरेल अशा पद्धतीने साजरा करण्यात यावा, अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात आज विधानभवनात विधान परिषदेचे गटनेते आणि सदस्या��ची एक बैठक झाली, त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. माजी ज्येष्ठ सदस्यांनाही या ऐतिहासिक क्षणांचं साक्षीदार होता यावं, यासाठी विभाग स्तरावरही कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
****
विशिष्ट कंपनीचं खत खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या किंवा अनधिकृत खतांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना त्वरित तक्रार नोंदवता यावी, यासाठी तात्काळ एक व्हॉट्स अप नंबर सुरू करून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. ते आज कृषी विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यावर त्यांची ओळख गोपनीय ठेवावी आणि संबंधित जिल्ह्यातल्या भरारी पथकानं त्या ठिकाणी जाऊन तपासणी करावी, असं मुंडे यांनी सांगितलं. बियाण्यांबाबतच्या तक्रारींसाठी ��क सर्वसमावेशक ॲप किंवा पोर्टल तयार करण्याच्या सूचनाही मुंडे यांनी या बैठकीत दिल्या.
****
राज्यभरात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात आज मुसळधार पाऊस झाला. पश्चिमी उपनगरात चोवीस तासांत सुमारे ब्याण्णव मिलिमीटर पाऊस झाल्याचं वृत्त आहे. कोकणात महाड शहरासह रायगड जिल्ह्याच्या विविध भागात आज मुसळधार पाऊस झाल्यानं, जिल्ह्यातल्या सावित्री, काळ, आंबा, कुंडलीका आणि गांधारी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून मोठा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात विविध भागांत मोठा पाऊस झाला आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असल्यानं नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातले आठ प्रमुख मार्ग बंद झाले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागड जवळच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं भामरागड-आलापल्ली मार्ग बंद झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातही काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून या जिल्ह्यातल्या सगळ्या नद्या नाले पूर्ण भरून वाहत असल्याचं वृत्त आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आठही तालुक्यांमध्येही काल रात्रीपासून भीजपाऊस सुरू आहे.
****
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०७ मे २०२३ सकाळी ११.०० वाजता****
कर्नाटकात सत्ताधारी भाजप सरकारविरोधात केलेल्या आरोपांसंदर्भात निवडणूक आयोगानं कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षांना नोटीस बजावली आहे. या आरोपांच्या पुराव्यांसह आज सायंकाळी सात वाजेपर्यंत उत्तर देण्यास निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. भाजप सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप करणाऱ्या जाहिराती काँग्रेसनं वृत्तपत्रातून प्रकाशित केल्या आहेत.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट आज देशातल्या ४९९ शहरांमध्ये होणार आहे. देशाबाहेर जगातल्या १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार असल्याचं यासंदर्भात जारी पत्रकात म्हटलं आहे.
****
दरम्यान, मणिपूरमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इथं होणारी नीटची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या उमेदवारांच्या परीक्षेची नवीन तारी�� लवकरच जाहीर केली जाईल, असं एनटीएने म्हटलं आहे.
मणिपूर मधल्या परिस्थितीत सुधार होत असून, राज्यात सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी निमलष्करी दल प्रयत्न करत आहे. मणीपूरच्या राज्यपाल अनसुया उईके यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांना राज्याभिषेकाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चार्ल्स यांचा राज्याभिषेक काल झाला. उपराष्ट्रपती धनखड आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुदेश धनखड या समारंभाला उपस्थित होते.
****
बीड जिल्ह्यात केज तालुक्यात होळ इथल्या एका व्यायामशाळेत ४५ किलो चंदनासह एक गावठी कट्टा, एक पिस्तूल, दोन लोखंडी कोयते, पंधरा जिवंत काडतूसं यासह इतर घातक साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. या प्रकरणी तीन आरोपींविरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला. चंदन तस्करांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
****
धाराशिव शहर आणि परिसरात मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, द्राक्षं तसंच रब्बी हंगामातल्या काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होत आहे.
दरम्यान, राज्यात येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 April 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
मराठवाड्यात अनके भागात गारपिटीसह पाऊस
बारसू रिफायनरी तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पीपणाची - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, पोलिस बळाचा वापर करून रिफायनरीसाठी सर्वेक्षण न करण्याचं विरोधी पक्षाचं आवाहन
शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागानं स्वीकारला
येत्या महाराष्ट्र दिनापासून नव्या रेती धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार -महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील
'पहिले पाऊल' या शाळास्तर उपक्रमाचा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ
छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतल्या रस्त्यांसाठी सत्तर कोटी रुपयांचा निधी
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सचा मुंबई इंडियन्स संघावर ५५ धावांनी विजय
सविस्तर बातम्या
मराठवाड्यात अनके भागात काल गारपिटीसह पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यात दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा, वरूड, दांडेगाव, दिग्रस बुद्रुक, या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली, तर वसमत तालुक्यातल्या कवठा, किन्होळा, कुरुंदा या भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक घरांवरचे पत्रे तसंच दुकानांचे फलक उडून गेले. डोंगरकडा, कुरुंदा, दांडेगाव, जवळा पांचाळ या भागात केळी��्या बागांचं तसंच आंब्याचं मोठे नुकसान झालं. हळद काढणीचं काम सुरू असल्यानं शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या काही भागात काल दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. राणीउंचेगाव शिवारात वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली, तर घनसावंगी तालुक्यातल्या गंगाचिंचोली शिवारात काही वेळ बोराच्या आकारांच्या गारा पडल्या. एकलेहरा इथं शेतात बांधलेल्या म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला.
नांदेड शहर आणि परिसरात काल वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. अर्धापूर, माहूर, हिमायतनगर, किनवट, कंधार, लोहा, हदगाव तालुक्यात अवकाळी पाऊस पडला. लोहा तालुक्यात वीज पडून चार जनावरं दगावली.
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात काल वादळी वार्यासह पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, हळद, कांदा पिकांचं मोठं नुकसान झालं.
दरम्यान, येत्या एकोणतीस तारखेपर्यंत मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्���म स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. याशिवाय तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशाराही या केंद्रानं दिला आहे.
****
राज्य विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून दोन आठवड्यांसाठी स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर तत्कालिन रजायपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता, सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून आमदारांची नवीन यादी तयार करण्यात येत आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. यावर न्यायालयानं राज्य सरकारला दोन आठवड्यांनी उत्तर देण्यास सांगितलं आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे, असा आरोप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल कर्नाटकात विजयापुरा इथं माध्यमांशी बोलत होते. रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळात निश्चित झाल्याचं ते म्हणाले. ही ग्रीन रिफायनरी आहे, त्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. शांततापूर्ण आंदोलकांशी आपण चर्चा करू, मात्र फक्त राजकारणासाठी विरोध करणाऱ्यांना खपवून घेणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
दरम्यान, राज्य सरकार पूर्णपणे स्थिर असून, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, असं फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. २०२४ ची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
****
बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी बद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. ही रिफायनरी व्हावी, असं पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला दिलं होतं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आंदोलकांच्या मागण्या समजून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असून, माध्यमांनी फक्त विरोधाच्या बातम्या न दाखवता, रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बातम्याही दाखवाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं. या प्रकल्पाचं सर्वेक्षण थांबवायचं असेल तर सगळ्या विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प आम्हाला नको, असं सांगावं, म्हणजे काय करायचं ते ठरवता येईल, असं सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या रिफायनरीसाठी पोलिसी बळाचा वापर करून सर्वेक्षण करू नये, अस आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केलं आहे. या बाबत केलेल्या एका ट्विटमध्ये पवार यांनी, या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश असल्याकडे लक्ष वेधत, खारघरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे. या रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही, सरकारनं आंदोलकांवर दडपशाही न करता सर्वेक्षण थांबवावं, असं मत एका ट्विट संदेशाद्वारे व्यक्त केलं आहे.
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या संदर्भात सरकारवर टीका केली आहे. सरकार दडपशाही करत असून, सर्वेक्षण थांबवण्याची मागणी त्यांनी केली. प्रकल्प काय आहे हे जनतेला समजावून सांगावं, एक जाहीर सादरीकरण द्यावं आणि अंतिम मान्यता ही भूमिपुत्रांची असावी, अशी महाविकास आघाडी सरकारची अट होती, असं ते म्हणाले. तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे फायदे समजावून सांगण्यासाठी स्थानिकांशी संवाद साधण्याची मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.
****
शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागानं स्वीकारला असून, याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याचं, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या एका बैठकीत बोलत होते. सत्तार यांनी यासंदर्भातला अहवाल काल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सोपवला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि कृषी परिषद यांनी तज्ज्ञांची समिती नेमून, या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा, असं केसरकर यांनी सांगितलं. तर, कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे साहित्य आणि मदत लागेल, ते देण्याची कृषी विभागाची भूमिका असल्याचं अब्दुल सत्तार यांनी आश्वस्त केलं.
****
येत्या महाराष्ट्र दिनापासून नव्या रेती धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली. यासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासनानं जाहीर केलेल्या नव्या वाळू धोरणानुसार वाळूचं उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यात येणार असून, सर्वसामान्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाळू मिळणार असल्याची माहितीही, विखे पाटील यांनी दिली. या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास सहाशे रुपये, म्हणजेच एकशे तेहतीस रुपये प्रति मेट्रिक टन दरानं वाळू उपलब्ध होईल.
****
'पहिले पाऊल' या शाळास्तर उपक्रमाचा काल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी सी फेस शाळेतून या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असा विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. इंग्रजी ही केवळ आंतरराष्ट्रीय संवाद साधण्याची भाषा असून, प्रगती करणाऱ्या देशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं, हे वास्तव लक्षात घेत, येत्या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम इंग्रजीसह त्या-त्या राज्याच्या मातृभाषेतूनही शिकवले जाणार असल्याचं केसरकर यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या दोन हजार दोन उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर ��ोणाऱ्या शासकीय ध्वजावंदन कार्यक्रमानंतर पात्र निवडक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येतील.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात महत्वपूर्ण असलेल्या, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतल्या रस्त्यांसाठी, शासनानं सत्तर कोटी रुपयांचा निधी दिला असून, या निधीतून चांगले रस्ते होणार असल्यानं उद्योगांची भरभराट होणार आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत चिकलठाणा आणि शेंद्रा औद्येागिक क्षेत्रातल्या, विविध विकास कामांचं भूमिपूजन काल सामंत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारं पोषक वातावरण असल्यानं, पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकरता शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही सामंत यांनी दिली. पालकमंत्री संदिपान भुमरे तसंच सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, मराठवाडा लघू उद्योजक आणि कृषी संघटना -मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ.बाबासा���ेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पाच अभ्यास मंडळाची निवडणूक काल घेण्यात आली. बिनविरोध निवडून आलेल्या १९ सदस्यांसह ४२ जण आता विद्या परिषदेचे सदस्य बनले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी ही माहिती दिली. अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये मराठीसाठी डॉ. सर्जेराव जिगे, हिंदी - डॉ. अपर्णा पाटील, इतिहास - डॉ. हरी जमाले, वनस्पतीशास्त्र - डॉ. अरविंद धाबे, तर रसायनशास्त्रासाठी डॉ. मोहम्मद आरेफ अली पठाण विजयी झाले.
****
राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातल्या रिक्त पदं येत्या एकतीस ऑक्टोबर पर्यंत भरण्याची सूचना, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिली असल्याची माहिती, छत्रपती संभाजीनगरच�� खासदार इम्तियाज जलिल यांनी दिली आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार जलील यांनी या संदर्भात जनहित याचिका दाखल केली असून, ते स्वतः युक्तिवाद करत आहेत. घाटीत सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आलं आहे, मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इथं शस्त्रक्रिया होत नसल्याकडे जलिल यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. जिल्ह्यातल्या विविध शासकीय आणि इतर संस्थांमधल्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात देखील खासदार जलील यांनी याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठानं संबंधित संस्थांना नोटीस बजावली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत उस्मानाबाद पंचायत समितीअंतर्गत, २०२१-२२ आणि २०२२-२३ मध्ये झालेल्या २४ कामांमध्ये, आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या निर्देशानुसार नियुक्त चौकशी समितीच्या अहवालात ही बाब नमूद आहे. या कामांवर हजेरीपटांवरील मजूरांची, एकूण ६३ लाख ७७ हजार ७६७ रुपये एवढी मजूरी, त्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा न होता, इतर खात्यांवर जमा झाल्याचं निदर्शनास आलं आहे. तसंच याशिवाय कामांच्या प्रत्यक्ष स्थळ पाहणीत, १७ कामांमध्ये मूल्यांकनापेक्षा १९ लाख ४५ हजार रुपये जास्तीचा खर्च झाल्याचं निदर्शनास आलं आहे. या प्रकरणी जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून, ही रक्कम त्यांच्याकडून वसूल का करण्यात येऊ नये, असं विचारण्यात आलं आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी देखील निर्देश दिले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरासह औद्योगिक वसाहतींच्या क्षेत्रात अनेक अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असून, त्यांना पोलिसांचं अभय असल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या भागात सुरू असलेल्या गुटखा विक्री, मटका, मुरुम चोरी, बिअर शॉप, रेती व्यवसाय आणि गॅस रिफिलींग अशा अवैध व्यवसायांवर कारवाई करावी, अशा मागणीचं पत्र दानवे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, संभाजीनगरचे पोलीस आयुक्त तसंच लाललुचपत विभागाच्या महासंचालकांना लिहिलं आहे. या अवैध व्यवसायिकांकडून पोलीस प्रशासन वसुली करत असल्याचा आरोपही दानवे यांनी यात केला असून, त्याबद्दलचे पुरावे सादर करण्याची तयारी दाखवली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सवर ५५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत गुजरातच्या संघानं निर्धारित २० षटकात २०७ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला मुंबईचा संघ १५२ धावातच सर्वबाद झाला.
****
चला जाणू या नदीला या अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं काल आसना नदी जनसंवाद यात्रेचा समारोप जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत झाला. नदीची सभ्यता नष्ट होण्यापूर्वी तिथली जैविक सभ्यता नष्ट होत असते, त्यामुळे सभ्यता टिकवण्यासाठी सर्वानी पाऊल उचलण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
बीड तालुक्यातल्या कोळवाडी गावानं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धेत मराठवाड्यातून प्रथम क्रमांक पटकावला. काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर विभागीय आयुक्त यांच्या हस्ते, कोळवाडीचे सरपंच, उपसरपंच, तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचातय सदस्य आणि ग्रामस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि १० लाख रुपये असा हा पुरस्कार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथं उद्या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात नामांकित कंपनींसाठी मुलाखती घेण्यात येणार असून, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी नायगावच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित रहावं, असं आवाहन, नांदेडच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी केलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 April 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.****
कोविड पार्श्वभूमीवर आज देशभरात वैद्यकीय यंत्रणेच्या सज्जतेची सराव चाचणी
वन्यजीव संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त
जनतेचे प्रश्न सोडवण्यास राज्य सरकार असमर्थ-खासदार शरद पवार यांची टीका
नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची गांभीर्याने दक्षता घेण्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे शासकीय यंत्रणेला निर्देश
राज्यात का��ही अवकाळी पाऊस; अकोल्यात मंदिराची शेड कोसळून सात जण ठार
ई पीक पाहणीची अट रद्द करून सरसकट अनुदान देण्याची कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
काँग्रेस पक्षाच्या जयभारत सत्याग्रहाला आज ठाणे इथून प्रारंभ
मनमाड ते जालना रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण अंतिम टप्प्यात
आणि
प्रियांशू राजावतला फ्रान्समधल्या ऑरलिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद
****
कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, आज देशभरात वैद्यकीय यंत्रणेच्या सज्जतेची सराव चाचणी -मॉक ड्रील करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय हरयाणात झज्जर इथं एम्स रुग्णालयात या सरावाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या दरम्यान संबंधित रुग्णालयात खाटा, औषधं, प्राणवायूची उपलब्धता, याची प्रात्यक्षिकं घेण्यात येतील. देशभरात अशी प्रात्यक्षिकं घेण्याची सूचना आरोग्य मंत्र्यांनी गेल्या शुक्रवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत केली होती.
दरम्यान, वाढत्या कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा, केरळ आणि पुदुच्चेरी या तीन राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंध��कारक केलं आहे. हरियाणा सरकारनं सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं असणाऱ्या रुग्णांना कोविड चाचणी देखील बंधनकारक केली आहे.
महाराष्ट्रात कोविडच्या सक्रीय रुग्णांची संख्या साडेचार हजाराच्या वर गेली आहे. राज्यात काल ७८८ नव्या रूग्णांची नोंद झाली, ५६० रुग्ण बरे झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला.
****
वन्यजीव संरक्षण हा वैश्विक मुद्दा असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल कर्नाटकात म्हैसुरू इथं, व्याघ्र प्रकल्पाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. आंतरराष्ट्रीय व्याघ्र आघाडी `इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स`, या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं. हा वाघांच्या संरक्षणाचा एक प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली. व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवाप्रित्यर्थ खास नाण्याचं अनावरणही त्यांनी केलं. देशाचं वनक्षेत्र दोन हजार २२० चौरस किलोमीटर झालं असून, वाघांची संख्या तीन हजार १६७ वर पोहोचल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशात चित्त्यांचा जन्म होतो, ही बाब देशातली जैव विविधता वृद्धिंगत होत असल्याचं द्योतक आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, काल सकाळी पंतप्रधानांनी बांदीपूर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. त्यांनी यावेळी ऑस्कर पुरस्कार प्राप्त माहितीपट `द एलिफंट व्हिस्परर्स` चे कलाकार बोम्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. वन्यप्राण्यांची शिकार तसंच प्राण्यांच्या अवयवाची तस्करी रोखण्यासंदर्भात केल्या गेलेल्या उपाययोजनांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.
****
येत्या २०३० पर्यंत २० गिगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष्य आहे. हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, अमेरिका आणि फ्रान्स पाठोपाठ भारत जगातला तिसऱ्या क्रमांकाचा अणुऊर्जा उत्पादक देश बनेल, असं अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत भाभा अणुसंशोधन केंद्रातल्या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या आढावा बैठकीत बोलत होते. देशाच्या आण्विक स्रोतांद्वारे वर्ष २०४७ पर्यंत नऊ टक्के ऊर्जा योगदानाची शक्यता असल्याचं सिंह यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यास राज्य सरकार असमर्थ असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यातल्या जनतेला मदतीची गरज आहे, बेरोजगारी तसंच महागाई सारखे मोठे प्रश्न जनतेसमोर उभे असून, त्यावर मार्ग काढण्याची गरज आहे. परंतु आज धर्म आणि जात यावर वाद सुरू आहे तर कोणी द���्शनाला जात आहे, नेमकं प्राधान्य कशाला द्यायचं, हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायला पाहिजे, असं पवार म्हणाले. आमची श्रद्धा ही शेतकऱ्यांशी निगडित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही ठाम भूमिका घेणारच, असं ते म्हणाले. अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीचा आपला आग्रह नाही, मात्र विरोधकांची तीच मागणी असल्यास आपणही पाठिंबा देऊ असं शरद पवार यांनी काल स्पष्ट केलं.
****
राज्य सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असून, अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर कृषीमंत्री लक्ष ठेवून असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल अयोध्येत पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या अनुषंगाने केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले...
‘‘इथून आमचं सगळं सुरू आहे. तिथे कृषी मंत्री आहेत. ते स्पॉटला जातायत. अधिकारी जातायत. शेतकऱ्यांसाठी काय केलं पूर्वीच्या सरकारनं हे आपल्याला माहितेय. घोषणा त्यांनी केल्या आणि पूर्तता आम्ही केली. कशाला बोलायचं. आणि आम्ही सरकार जे आहे संवेदनशील आहे. शेतकरी, बळीराजा संकटातून बाहेर आला पाहिजे, त्याच्यावरची संकटं दूर झाली पाहिजे ही देखील प्रार्थना आम्ही प्रभू रामचंद्राकडे करतोय.’’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पवार यांनी केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना, टीका करणं हे विरोधकांचं कामच असल्याचं मत व्यक्त केलं. महात्मा गांधीजींचं रामराज्याचं स्वप्न साकार करायचं असेल, तर रामाचं दर्शन घ्यावंच लागेल, असं फडणवीस म्हणाले...
‘‘त्यांचं काम आहे टीका करणं. त्यांना कदाचित आस्था नसेल, आम्हाला आस्था आहे. आणि प्रभु श्रीराम हे एक असं व्यक्तिमत्व आहे, की ज्यांनी राज्यकारभार कसा चालवावा हे आपल्याला सांगितलं. गांधीजींची संकल्पना काय होती? रामराज्याची संकल्पना होती. मग रामराज्याची संकल्पना जर राबवायची असेल तर रामाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे.’’
दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातले अनेक सदस्य तसंच आमदारांनी काल अयोध्येमध्ये श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि महाआरती केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी श्रीरामाच्या नव्या मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली, तसंच हनुमान गढीचं दर्शन घेतलं. लक्ष्मण किला इथं झालेल्या कार्यक्रमात संतमहंतांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा धनुष्यबाण, गदा तसंच श्रीरामांची प्रतिमा देत सत्कार केला. अयोध्येत उभारल्या जात असलेल्या महाराष्ट्र भवनाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. सायंकाळी शरयू नदीच्या आरती सोहळ्यातही मुख्यमंत्री तसंच अन्य मंत्रिगण सहभागी झाले होत��.
****
एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची गांभीर्याने दक्षता घेण्याचे निर्देश, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शासकीय यंत्रणेला दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यापाठोपाठ काल बीड जिल्ह्यातल्या नुकसानीची कृषी मंत्र्यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या काही दिवसात अवकाळी पाऊस तसंच गारपिटीने, राज्यातल्या दोन हजार पेक्षा जास्त गावात नुकसान झाल्याची माहिती, सत्तार यांनी दिली. या नुकसानाबाबत मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा होत असून, मदतीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी, महिलांशी संवाद साधत कृषीमंत्र्यांनी त्यांना मदतीचं आश्वासन देत, दिलासा दिला.
****
धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल केली. या पावसामुळे गहू, ज्वारीसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. महसूल प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी दिल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
बीड जिल्ह्यात परवा झालेल्या नुकसानाची आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल थेट बांधावर जाऊन पाहणी केली. वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची त्यांनी भेट घेतली. शेतीच्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला यावेळी दिल्या.
****
राज्यात अनेक भागात कालही अवकाळी पाऊस झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात जेहूर, तांदुळवाडी, मुंगसापूर, औराळा परिसरात गारपीट झाली. या पावसाचा सर्वाधिक फटका कांदा, उन्हाळी बाजरी, मका, कांदा, सूर्यफूल या पिकांना बसला आहे.
हिंगोली जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह पाऊस, तर काही भागात गारपीटही झाली. कनेरगाव नाका इथं मोठ्या आकाराच्या गारा पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
परभणी जिल्ह्यातही पूर्णा, गंगापूर तालुक्यात पाऊस झाला.
नाशिक तसंच अहमदनगर जिल्ह्यातही काल पाऊस झाला, तर काही भागात गारपीट झाली.
वाशिम जिल्ह्यातही वादळी वारे आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं.
अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात पारस गावात पावसामुळे मंदीराच्या शेडवर झाड कोसळून सात जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजन ४० जण अडकल्याची शक्यता आहे. पारस गावातल्या बाबूजी महाराज संस्थानात काल सायंकाळी आरती सुरु असताना ही घटना घडली. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरु होतं.
****
कांद्याला सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी ई पीक पाहणीची अट तत्काळ रद्द करून सरसकट कांदा अनुदान देण्याची मागणी, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी या मागणीचं पत्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काल नाशिक इथं सादर केलं. बऱ्याच शेतकऱ्यांकडे अत्याधुनिक मोबाईल तसंच त्यासाठी लागणारी इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने, ई पीक पाहणी नोंद होऊ शकलेली नाही. त्यामुळे ही अट रद्द करून सरसकट कांदा अनुदान देण्याची विनंती संघटनेनं केली आहे. ही मागणी मान्य न ��ाल्यास राज्यभरात सरकार विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे.
****
ओबीसी समाज बांधवांमध्ये काँग्रेसच्या विरोधात काही भावना असेल, तर माफी मागून प्रकरण संपवलं पाहिजे, असं माजी आमदार आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. काँग्रेस नेते राहुल यांनी 'मोदी' आडनावावरून केलेल्या विधानासंदर्भात ते बोलत होते. यापूर्वी राहुल गांधी यांना 'चौकीदार चोर है' प्रकरणी तसंच राफेल प्रकरणी बिनशर्त माफी मागावी लागली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. लोकशाही पक्ष असल्याचा अभिमान बाळगणारा काँग्रेस पक्ष लोकशाही पद्धतीने केलेल्या सूचनेवर नोटीस बजावतो, हा मोठा विनोद असल्याची टीका देशमुख यांनी केली.
****
परदेशातून कापसाच्या पंधरा लाख गाठी आयात क���ल्यानंच राज्यासह देशांतर्गत कापसाचे भाव पडले, असं माजी मंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. निर्यातीला प्रोत्साहन आणि आयातीवर बंधन आणण्याचं धोरण केंद्र सरकारनं आखलेलं नसल्यानं राज्य शासनानं ते तातडीनं आखून कापूस उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी देशमुख यांनी केली.
****
नागपूर नजिक हिंगण्याजवळील जुनापाणी इथं दिव्यांग लहान मुलांच्या पुनर्वसनासाठीच्या विशेष केंद्राचं उद्घाटन, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल झालं. हे देशातलं पहिलं सर्वसमावेशक असं दिव्यांग लहान मुलांसाठी काम करणारं केंद्र आहे.
****
राज्यात काँग्रेस पक्षातर्फे आजपासून, जयभारत सत्याग्रह सुरु करण्यात येणार आहे. आज, ठाणे इथून या सत्याग्रहाला प्रारंभ होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिली. ठाणे इथं आज होत असलेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत, सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगानं अनेक ठरावांसह नवी कार्यकरिणीही जाहीर होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मनमाड ते जालना रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण अंतिम टप्प्यात पोहोचलं असून, पुढच्या दोन आठवड्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरपासून जालना औद्योगिक वसाहतीमधल्या दिनेगाव रेल्वेस्थानकापर्यंतच विद्युतीकरण पूर्ण झालं आहे. सिकंदराबाद इथले रेल्वेचे सुरक्षा आयुक्त पी.डी. मिश्रा, विद्युत अभियंता सीएच.एस.रेड्डी यांच्या विशेष पथकानं विद्युत इंजिन चालवून या विद्युतीकरणाची नुकतीच यशस्वी चाचणी घेतली. दरम्यान जालन्यासाठी मंजूर झालेल्या पीटलाईनचं कामही प्रगतीपथावर असून, जालना रेल्वेस्थानकाजवळील भुयारी रेल्वे पुलाचं कामही अंतिम टप्प्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विशेष उपक्रम घेण्यात येणार आहेत. उद्या ११ एप्रिलपासून ते १८ एप्रिल दरम्यान विद्य���पीठातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि अभ्यास केंद्रातर्फे, या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विचारवंतांची व्याख्यानं, कवी संमेलन, परिसंवाद, रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धा, १८ तास अभ्यास तसंच सांस्कृतिक कार्यक्रम आदींचा यात समावेश आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत, काल अहमदाबाद इथं झालेल्या
सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सला तीन गडी राखून पराभूत केलं. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकात चार बाद २०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने सात गडी गमावत २०७ धावा केल्या. शेवटच्या षटकांत २९ धावा आवश्यक असताना रिंकू सिंगने पाच चेंडूत पाच षटकार झळकावत विजय खेचून आणला. दरम्यान या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार राशिद खान याने सतराव्या षटकातल्या पहिल्या तीन चेंडूवर आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि शार्दुल ठाकूर यांना बाद करत, या हंगामातली पहिली हॅटट्रिक नोंदवली.
हैदराबाद इथं झालेल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाने पंजाब किंग्जचा आठ गडी राखून पराभव केला. पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेलं १४४ धावांचं लक्ष्य, हैदराबादच्या संघाने सतराव्या षटकात केवळ दोन गडी गमावत पूर्ण केलं.
****
भारताचा बॅडमिंटनपटू प्रियांशू राजावतनं फ्रान्समधल्या प्रतिष्ठेच्या ऑरलिन्स मास्टर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या ���ुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात प्रियांशूनं डेन्मार्कच्या मॅग्नस जोहान्सनवर मात केली. रंगतदार झालेल्या अंतिम लढतीत प्रियांशूने २१-१५, १९-२१, २१-१६ असा विजय मिळवला.
****
व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातल्या २२३ पत्रकारांचा मोफत विमा काढण्यात आला. संघटनेच्या वतीने देशभरातल्या पत्रकारांच्या पाल्यांसाठी शिक्षण तसंच आरोग्य सेवासंदर्भात विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
Text
दक्षिण प्रद्वीप मी जारी रहा प्रीमियम मन्सून बारिशच्या क्रियाकलाप
दक्षिण प्रद्वीप मी जारी रहा प्रीमियम मन्सून बारिशच्या क्रियाकलाप
वेटर ऑनलाईन एप्रिल 15, 2021 1:01 दुपारी | स्कायमेट वेदर टीम कॅरलमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्री मॉनसूनचा पाऊस आणि वेळोवेळी बर्निश होता. 14 एप्रिल पर्यंत केरळमध्ये सामान्य पासून 33% जास्त बारिश झाली आहे. मागील दोन दिवसांपासून कर्नाटक आणि तमिलनाडुमध्ये बारिशच्या हालचाली वाढल्या आहेत. तेलंगाना आणि आंध्र प्रदेशात गेल्या 24 ते 48 घंट्यांवरील प्राइम मानसून बारिशच्या क्रियाकलाप प्रविष्ट करा. गेल्या…
View On WordPress
#आंध्र प्रदेशात पाऊस#कर्नाटकात हवामान#केरळात पाऊस#तमिळ नाडू मध्ये विणणे#दक्षिण भारतात हवामान#बेंगलुरू पाऊस#रायसलसीमात पाऊस
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 May 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०२ मे २०२२ दुपारी १.०० वा. ****
देशात जाणीवपूर्वक धृवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातल्या जनतेनं शांतता राखावी, आम्ही परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. ते एका खा��गी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ‘ईद’च्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेनंतर संवेदनशील भागांसाठी विशेष सूचना गृह मंत्रालयाकडून करण्यात येणार असून, त्यांच्या भाषणाबाबत कायदेशीर मतं जाणून कारवाई करणार असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल चार लाख दोन हजार १७० नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १८९ कोटी २३ लाख ९८ हजार ३४७ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या तीन हजार १७५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, २६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ७२३ रुग्ण बरे झाले. देशात सध्या १९ हजार ५०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेनं २०२३-२४ या शैक्षणिक सत्रासाठी चार वर्षांच्या एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या अंतर्गत बीए - बीएड, बीएससी - बीएड आणि बीकॉम - बीएड पदवी प्रदान केली जाईल. शिक्षक शिक्षणाशी संबंधित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चं हे मुख्य उद्दिष्ट असल्याचं शिक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे राष्ट्रीय सामायिक प्रवेश ���रीक्षेतून प्रवेश दिला जाईल. चार वर्षांचा एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम इयत्ता १२ वी नंतर शिकवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला असेल. संपूर्ण शिक्षक शिक्षण क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण योगदान देईल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
इंडोनेशियाने खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरी भारतातल्या खाद्यतेलाच्या स्थितीवर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचं सरकारने म्हटलं आहे. देशात सुमारे २१ लाख मेट्रिक टन खाद्यतेल उपलब्ध आहे. याशिवाय या महिन्यात सुमारे १२ लाख मेट्रिक टन खाद्यतेल देशात पोहोचेल, असं ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने म्हटलं आहे. २०२१-२२ या वर्षात देशात सोयाबीनचे उत्पादन १२६ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त झालं आहे, जे मागील वर्षी ११२ लाख मेट्रिक टन होतं. मोहरीच्या लागवडीखालील क्षेत्रात ३७ टक्के वाढ झाल्यानं राजस्थानसह सर्व प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये या कालावधीत उत्पादन ११४ लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
****
राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष पदी सुशीबेन शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाच्या अध्यक्षांसह सात सदस्यांच्या नावांची अधिसूचना महिला आणि बाल विका�� विभागाने जारी केली. पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचं अधिसूचनेत म्हटलं आहे.
****
औरंगाबाद इथून आज रात्री अकरा वाजून १५ मिनिटांनी सुटणाऱ्या औरंगाबाद - तिरुपती विशेष रेल्वे गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. निझामाबाद स्थानकानंतर मार्गात बदल करण्यात आला असून, ही गाडी काझीपेट, विजयवाडा मार्गे धावेल, असं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
कर्नाटकात बंगळुरू इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धेत काल झालेल्या हॉकीच्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला कांस्य पदक मिळालं. योग प्रात्यक्षिकांमध्ये पुरुषांच्या गटात तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं सुवर्णपदक पटकावलं, तर शिवाजी विद्यापीठानं रौप्य पदक मिळवलं. पुरुषांच्या कुस्तीमध्ये ग्रीको रोमन प्रकारात १३० किलो गटात भारती विद्यापीठाच्या तुषार दुबेनं कांस्यपदक मिळवलं.
****
उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याच्या इशारा दिला आहे. उष्णतेशी संबंधित आजारांवर प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी सर्व जिल्ह्यांनी योग्य त्या उपाय योजना कराव्यात आणि मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात असं पत्र या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना लिहिलं आहे.
****
हवामान - राज्यात उन्हाची काहिली वाढली असून काल चंद्रपूर इथं राज्यातलं सर्वाधिक ४६ पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला, वर्धा, मालेगाव, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अमरावती, बुलडाणा, गोंदिया आणि नागपूरमध्येही पारा ४० च्या वरच होता. विदर्भात आजही उष्णतेची लाट कायम आहे. उद्या आणि परवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 September 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ सप्टेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** साकीनाका लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी पोलिसांच्या तपासाबाबत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून समाधान व्यक्त
** माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन
** हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणाचा पाणीसाठा ९८ टक्क्यांवर
आणि
** केज आणि अंबाजोगाई तालुक्यात साठवण तलावांची निर्मिती करण्याची आमदार नमिता मुंदडा यांची मागणी
****
मुंबई इथल्या साकीनाका लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं समाधान व्यक्त केलं आहे. राज्य शासन याप्रकरणी संपूर्ण न्याय द���ईल असा विश्वास व्यक्त करताना आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये, असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांना या घटनेच्या अनुषंगानं चर्चेसाठी आज मुंबईत बोलावलं होतं. या घटनेकडे राज्य शासन गांभिर्यानं पहात आहे. पीडीतेच्या कुटूंबाला योग्य तो मोबदला देण्यात येवून तिच्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी देखील घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोगाला सांगितलं आहे.
****
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचं आज कर्नाटकात मंगळुरू इथं निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपूर्वी ऑस्कर फर्नांडिस यांना डोक्याला दुखापत झाल्यानं, मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या, त्या काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या उपचारादरम्यान फर्नांडिस यांचं आज निधन झालं. केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री असलेले फर्नांडिस हे अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष होते.
****
औरंगाबाद शहरात येत्या गुरुवारी १६ सप्टेंबरला राष्ट्रीय स्तरावरच्या बँकांची बैठक होणार आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. शहरातील महत्वाकांक्षी दिल्ली - मुंबई औद्योगिक मार्गिका -डीएमआयसी प्रकल्पात मोठे उद्योग कसे येतील याबाबत चर्चा होणार असल्याचं कराड यांनी सांगितलं. केंद्र सरकारने डीएमआयसी प्रकल्पासाठी तीन हजार कोटींचा निधी दिला असून शहराच्या विकासासाठी या प्रकल्पात राष्ट्रीय पातळीवरील मोठे उद्योग कसे आणता येतील याबाबत चर्चा होणार आहे. गरीबांना आणि शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज कसे उपलब्ध करून देता येईल, पंतप्रधान जनधन योजना, पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना, डिजिटल मनी ट्रान्सफर, यासंबंधीही या राष्ट्रीय बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचं डॉ कराड यांनी सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने गंगापूर धरणातून सकाळी ९ वाजेपासून एकूण अडीच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने पालखेड धरणातून ८०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू झाला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरण ९८ पूर्णांक ४८ टक्के भरलं आहे. धरणाच्या वरच्या भागातून पाण्याचा प्रवाह सुरूच असल्यामुळे धरणाचे दोन वक्र दरवाजे आज वीस सेंटिमीटरने वर करुन पाण�� नदी पात्रात सोडण्यात येत आहे. धरणातून सध्या एक हजार ७४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, किनवट आदी तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरग्रस्त भागाची खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पाहणी केली. येवती, मेथी, पाळा, उमरदरी या गावांना त्यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. या भागातील मूग, उडीद, तूर, कापूस, सोयाबीन या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान तत्काळ वाटप करावं अशी मागणी खासदार चिखलीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, नांदेड तालुक्यातील वाजेगाव महसूल मंडळात अतिवृष्टी आणि पूरात झालेल्या नुकसानीची नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनीही आज पाहणी केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचण्याला विमा कंपन्यांचे प्रतिनिधी कमी पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ऑनलाईन तक्रारीची मागणी न करता ऑफलाईन अर्ज घेऊन नुकसान भरपाईची नोंद घेण्याच्या सूचना आमदार अंबादास दानवे यांनी कृषी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना केल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ४० हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार अर्ज केले आहेत. या तक्रार अर्जानुसार जवळपास ३० हजार शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक रामनाथ भिंगारे यांनी दिली.
****
केज आणि अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या १६ गावात साठवण तलावांची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत एक निवेदन त्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे सादर केलं. साठवण तलावांमुळे याठिकाणी शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होईल. यामुळे ऊसतोडीसाठी बाहेर जाणारा मजूर वर्ग आपल्या शेतात काम करेल, परिणामी ऊसतोड मजुरांचं जीवनमान स्थिरावण्यास मदत होईल, असं आमदार मुंदडा यांनी म्हटलं आहे. मांजरा खोऱ्यातील अनेक उपनद्यांचे कोट्यावधी लीटर पाणी प्रतिवर्षी वाहून जातं. हे पाणी अडवून अंबाजोगाई इथं बुट्टेनाथ परिसरात साठवण तलावाची निर्मिती करावी अशी मागणी मुंदडा यांनी केली आहे.
****
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी पाच ऑक्टोबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज यांसदर्भातील घोषाणा केली. तसंच पालघर जिल्हा परिषदेच्या ��णि त्याअंतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील याच दिवशी मतदान होणार आहे. तसंच मतमोजणी सहा ऑक्टोबरला होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ६४९ अहवालामध्ये एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळली नाही.
//********//
0 notes
Text
देशातील काही राज्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, आपल्या राज्यातील हवामान स्थिती वाचा
देशातील काही राज्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, आपल्या राज्यातील हवामान स्थिती वाचा
हवामान बातमी देशातील बर्याच राज्यांत हवामानातील बदल पाहायला मिळत आहेत.काही लोक जोरदार उन्हात आणि कुठेतरी मुसळधार पावसामुळे त्रस्त आहेत. भारत हवामान खात्याने (आयएम��ी) काही राज्यांत वादळी वा .्यासह 8 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. विशेष म्हणजे कर्नाटकात 7 ते 8 जुलै या कालावधीत विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळ��ार पाऊस व वादळी वादळासह…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** देशात पुढच्या ६ ते ८ आठवड्यात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याचा अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांचा इशारा
** आषाढी एकादशीला पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांसाठी राज्य परिवहन महामंडळ मोफत बसगाड्या पूरवणार
** पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात चर्चा
आणि
** शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीनं साजरा होणार
****
देशात पुढच्या ६ ते ८ आठवड्यात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याचा इशारा अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था म्हणजेच एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. सध्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्याचं दिसत असल्यानं, निर्बंध शिथील झालेले असल्याच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आपण अधिक सावध राहण्याची गरजही गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे.
****
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात २ कोटी ८७ लाख कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या मात्रा उपलब्ध असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं. आतापर्यंत मंत्रालयानं २८ कोटी ५० लाखांहून अधिक मात्रा उपलब्ध करुन दिल्या असल्याची माहितीही मंत्रालयानं दिली आहे.
****
कोविडग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा ३२ हजार ४६४ मेट्रीक टन द्रवरुप प्राणवायु आतापर्यंत देशाच्या विविध भागात ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे पोहचवला असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. ४४८ गाड्यांद्वारे १५ राज्यांमध्ये प्राणवायू पोहचवण्यात आला आहे.
****
आषाढी एकादशीला पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. मुंबईत आज ते बोलत होते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीनं करण्याच्या सूचना राज्य शासनानं दिलेल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान महामंडळाला मिळाल्याबद्दल परब यांनी समाधान व्यक्त केलं आहे. १९ जुलै रोजी या बस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थांना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालख्यांचा प्रवास मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंत एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व बसेस निर्जंतुकीकरण करण्यात येतील. तसंच प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीनं उपलब्ध करून देण्यात येईल, असंही परब यांनी सांगितलं.
****
यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी तसंच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वय असावा याकरिता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बंगळूरु इथं भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीदरम्यान येणाऱ्या काळात कृष्णा आणि भीमा नद्यांच्या पूराचं नियंत्रण कशा पध्दतीनं करता येईल आणि त्यात कोणत्या पध्दतीनं दोन्ही राज्यानं समन्वय ठेवता येईल याची चर्चा झाली.
यासंदर्भात माहिती देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.
एकंदर येणारा अलमट्टी धरणातील येवा आणि पुढे जाणारा येवा आणि महाराष्ट्रातील पडणारा पाऊस या सगळ्यावर डायनॉमिकली आपण जर कंट्रोल ठेवला तर मग कुठून कित�� पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती लेवल ठेवायची आणि खास करुन अलमट्टीची वर चांगलं नियंत्रण ठेवता येईल अशी चर्चा झाली. मला खात्री आहे की, आलेल्या पावसाळ्यात आणि पुढे देखील या पद्धतीत अधिक सुधारणा होत जाईल. या वर्षीच्या पावसाळ्यातील येणाऱ्या संभाव्य पुराची येईलचं असं नाही, पण जर आलाच पूर तर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समन्वय चांगल्या पद्धतीने साधण्यासाठी आजची बैठक उपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे.
****
राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रायगड जिल्ह्यात दुपारी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील सावित्री, गंधारी, कुंडलिका, आंबा, गाडी, उल्हास, पाताळ गंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वडखळ ते अलिबाग मार्गावर पर्यटकांची वाहनं मोठ्या प्रमाणात जमली असून कार्ले खिंडीत पर्यटकांची अँटीजेन चाचणी सुरू आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या पर्यटनाला बंदी आहे, पोलिस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड इथ महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महागाई विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं केंद्र सरकार विरूध्द तीव्र निदर्शन केली. परभणी जिल्ह्यातही जिंतूर इथं कॉंग्रेसच्यावतीनं शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करत तहसील कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव इथं एक एकर जागेमध्ये तीन हजार वृक्ष लागवडीची मोहीम आजपासून आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. आनंदवन घनवन योजनेतून एकाच जागी विविध प्रकारचे तीन हजार वृक्ष लागवड करून मियावाकी मिशन २०२१ ��ळकट करण्यासाठीची ही मोहीम आहे.
****
शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीनं साजरा होणार असल्याची माहिती शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन पद्धतीनं राज्यातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. वर्धापन दिन, कोरोना लसीकरण, रक्तदान शिबिरं, शैक्षणिक साहित्यांचं वाटप आदी सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा होणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं.
****
सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाकडून दिव्यांगांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम राबवण्यात आली, यामध्ये दोन हजार जणांना लसीच्या मात्रा देण्यात आली असल्याची माहिती लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी दिली. शासनाच्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींचे तातडीनं लसीकरण पुर्ण करुन घ��ण्याचा सूचना होत्या. त्यानुसार ही मोहीम राबवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुंबई पोलिसांच्या कुटुंबियांसाठी आयोजित केलेल्या कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण विशेष मोहिमेचा शुभारंभ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. या मोहिमेबाबत समाधान व्यक्त करून ठाकरे यांनी या विषाणुच्या उच्चाटनासाठी सर्वांना सरकारी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं.
****
लातूर शहरात उद्यापासून ३० वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. शहरातील जास्तीत जास्त तरुणांनी या मोहिमेचा लाभ घेत लसीकरण करून घ्यावं असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक हजार १३४ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ३८ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार ९९६ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या २५ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५९ हजार ५४६ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ३१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही त्यामुळे मंगल कार्यालयांना टप्याटप्यानं कार्यक्रमासाठी परवानगी मिळवून देण्यात येईल असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिलं आहे. लातूर जिल्ह्यातील मंगल कार्यालयं पूर्ववत सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी मंगल कार्यालय संघटनेच्या शिष्टमंडळानं आज लातूर इथं देशमुख यांची भेट घेऊन केली, त्यावेळी ते बोलत होते. व्यावसायिकांच्या मागणीचा सहानुभुतीपूर्वक विचार करून मार्गदर्शक सुचनांचं पालन करीत निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 May 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ मे २०२१ सकाळी ७.१० मि. ****
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणानं धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
· अरबी समुद्रातलं तौक्ते चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याचा हवामान खात्याचा अंदाज.
· सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात वादळामुळे मोठे नुकसान; मुंबईत खबरदारीच्या उपाययोजना.
· गृहविलगीकरणातल्या रुग्णांचं उत्तम व्यवस्थापन झाल्यास मृत्यू दर कमी होऊ शकतो - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वास.
· राज्यात ३४ हजार ३८९ नवीन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १०८ जणांचा मृत्यू तर तीन हजार ३२६ बाधित.
· काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीत अंत्यसंस्कार करण्यात येणार.
आणि
· मराठा आरक्षणाबाबत भा���तीय जनता पक्ष कायदे तज्ज्ञांची समिती नेमणार.
****
अरबी समुद्रात उठलेलं तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं पुढे सरकत असून, आज संध्याकाळपर्यंत ते गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हे वादळ १२० ते १५० किलोमीटर प्रतीतास या वेगानं द्वारका, जामनगर आणि भावनगरच्या दिशेनं सरकत आहे. गुजरात सरकारनं किनारपट्टीलगत राहणाऱ्या दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
दरम्यान, या चक्रीवादळामुळे, काल कर्नाटक, गोव्यासह राज्यात कोकण किनारपट्टीत, तसंच अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे कर्नाटकात चौघांचा, तर गोव्यात दोन जणांचा मृत्यू झाला. वादळाचा परिणाम म्हणून जळगाव जिल्ह्यातही अंमळनेर इथं सोसाट्याच्या सुटलेल्या वाऱ्यात झाड पडून दोन बहिणींचा मृत्यू झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत ४० घरांचं नुकसान झालं. वादळाचा सर्वाधिक फटका आतापर्यंत वैभववाडी तालुक्याला बसला. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली असून, तीन शाळांचंही नुकसान झालं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. समुद्रात तीन मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. राजापूर तालुक्यात विजेच्या तारा तुटून पडल्यानं, वीजपुरवठा तसंच दूरध्वनी सेवाही विस्कळित झाली होती.
नाशिक जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहरासह जिल्हाभरात काल सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे उन्हाचा तडाखा काही अंशी कमी झाला.
परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात उमरी शहरात काल दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, जालना जिल्ह्यात जालना तसंच बदनापूर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात काल मुसळधार पावसानं हजेरी लावली.
दरम्यान, चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्यानं, वादळीवारे आणि मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबईत कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या वादळाच्या पार्श्वभूमीवर ओखा-पुरी, ओखा-रामेश्वरम्, राजकोट-सिकंदराबाद, पोरबंदर-सिकंदराबाद, या रेल्वे गाड्यांच्या पुढच्या दोन दिवसांतल्या फेऱ्या, रद्द करण्यात आल्या आहेत.
****
या चक्रीवादळा संबंधीत तयारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काल माहिती दिली. चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, किनारपट्टी प्रदेशात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानंही पूर्ण तयारीनिशी त्यांची ४२ पथकं तैनात केली आहेत, तर २६ पथकं सज्ज ठेवली आहेत. हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीच्या दूरवरून जाणार आहे, त्यामुळे किनारपट्टी प्रदेशावर त्याचा थेट परिणाम होणार ��सला, तरी त्यामुळे पुढचे दोन दिवस समुद्र खवळलेला राहील, तसंच मुसळधार पाऊस पडेल अशी माहिती, हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
****
गृहविलगीकरणातल्या रुग्णांचं उत्तम व्यवस्थापन झाल्यास मृत्यू दर कमी करू शकतो, असा विश्वास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. राज्यभरातल्या फॅमिली डॉक्टरांसाठी घेतलेल्या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेत, मुख्यमंत्री काल बोलत होते. राज्यभरातले गाव पातळीपर्यंतचे सुमारे १७ हजार ५०० फॅमिली फिजीशियन्स, वैद्यकीय चिकित्सक या परिषदेत सहभागी झाले होते. राज्याच्या कृती दलातल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी या सर्व डॉक्टरांना, कोविडवरील वैद्यकीय उपचाराबाबत मार्गदर्शन करत, त्यांच्या शंकांचं निरसन केलं. मुख्यमंत्र्यांनी या परिषदेत मार्गदर्शन करताना, चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या फॅमिली डॉक्टरांनी कोविड विरुद्धच्या या लढाईत उतरावं, असं आवाहन केलं. शक्य असेल तिथे जवळच्या कोविड सुश्रुषा केंद्रात किंवा रुग्णालयात, दिवसाला एकदा तरी जाऊन सेवा द्यावी, त्यामुळे शासनाला सहकार्य तर मिळेलच, परंतू आपल्या भागातले डॉक्टर आपल्याला येऊन पाहून गेल्याचा रुग्णांना आनंदही होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यात काल ३४ हजार ३८९ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५३ लाख ७८ हजार ४५२ झाली आहे. काल ९७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ८१ हजार ४८६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५२ शतांश टक्के झाला आहे. काल ५९ हजार ३१८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४८ लाख २६ हजार ३७१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८९ पूर्णांक ७४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात चार लाख ६८ हजार १०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल तीन हजार ३२६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०८ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या ३७, औरंगाबाद १८, परभणी १४, नांदेड १०, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी नऊ, जालना सहा, तर हिंगोली जिल्ह्यातल्या पाच रुग्णांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ८९७ रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात ६६९, उस्मानाबाद ४९२, लातूर ३९५, जालना २७६, नांदेड २७३, परभणी २५३, तर हिंगोली जिल्ह्यात ७१ नवे रुग्ण आढळून आले.
****
मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात, कर्करोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईक-काळजीवाहू व्यक्तींच्या निवासासाठी, राज्य शासनातर्फे शंभर सदनिका, या रुग्णालयाला काल हस्तांतरित करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते, या सदनिकांच्या चाव्या रुग्णालय व्यवस्थापनाकडे सूपूर्द करण्यात आल्या. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण - म्हाडातर्फे या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
****
काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं, अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांचा पार्थिवदेह अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे. सकाळी साडे दहा वाजता त्यांच्या निवासस्थानासमोरच्या मोकळ्या जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, सातव यांचा पार्थिव देह काल रात्री पुण्याहून कळमनुरी इथं आणण्यात आला. हिंगोली शहरात नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून सातव यांचं पार्थिव देह कळमनुरीकडे नेणाऱ्या वाहनावर, फुलं अर्पण करून, लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.
राजीव सातव यांचं काल पहाटे पुण्यात उपचारादरम्यान निधन झालं. २२ एप्रिल रोजी कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचा अहवाल आल्यानंतर, त्यांच्यावर पुण्यात जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. अलिकडेच ते या आजारातून मुक्त झाले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी फुफ्फुसात संसर्ग झाल्यानंतर, त्यांची प्रकृती बिघडली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निकटवर��तीयांमध्ये समावेश असलेले खासदार सातव, यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं होतं. पंचायत समितीच्या सदस्यापासून राजकारण सुरु केलेले सातव, २००९ साली कळमनुरी विधानसभा मतदार संघातून, पहिल्यांदा आमदार झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २०१९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही, मात्र त्यानंतर गेल्या वर्षी, त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महासचिव असलेले सातव, सध्या काँग्रेस पक्षाचे गुजरात प्रभारी म्हणून काम पाहत होते. राजीव सातव हे काँग्रेस पक्षातले धडाडीचे आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जात. त्यांना चार वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला होता.
****
सातव यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सातव यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. राजीव सातव हे अफाट गुणवत्ता असलेलं उगवतं नेतृत्व होतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातव यांना श्रद्धांजली वाहताना, राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचं अकाली जाणं क्लेशदायक असल्याची भावना व्यक्त केली. एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावलं, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, आपल्या भावना व्यक्त केल्या, तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, मोठी क्षमता असलेला नेता आपल्यातून गेला असल्याचं, आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. पक्षीय राजकारणापलिकडे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणाऱ्या नेत्याचा मृत्यू, हे राज्याचं मोठं नुकसान असल्याचं, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी-वड्रा, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही, आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, माजी खासदार चंद्रकांत खैरे, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सातव यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी या शब्दांत सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली –
माननीय खासदार राजीव सातव यांचं अत्यंत कमी वयामधे दुःखद निधन झालेलंय. ही गोष्ट अतिशय धक्कादायक असून ही बातमी ऐकून आम्हाला धक्का बसलेला आहे. खरं म्हणजे आजचे कमी वयामधे त्यांनी राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणामधे आपला ठसा उमटवलेला होता. आणि मी शिवसेनेच्या वतीनं त्यांना श्रध्दांजली अर्पण करतो.
उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काल राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
परभणी जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी सातव यांना श्रध्दांजली अर्पण केली
****
मराठा आरक्षणाबाबत भाजप कायदे तज्ज्ञांची समिती नेमणार असल्याची माहिती, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी भाजपनं प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, उच्च समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या पहिल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी, ही माहिती दिली. केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च नायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे, राज्य सरकारनंही फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी त्यांनी केली. आरक्षणासाठी मराठा समाजाच्या आंदोलनाची स्वायत्तता कायम राखून भाजप या आंदोलनात सहभागी होईल, असंही पाटील म्हणाले.
****
परभणी जिल्ह्यात टाळेबंदीची मुदत एक जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. या काळात किराणा, भाजीपाला तसंच फळ विक्रीस, सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत परवानगी आहे. मात्र इतर सर्व दुकानं पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील, असं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे. बँकांच्या सेवा नेहमीच्या वेळेप्रमाणे सुरू राहतील, शेतीसंबंधी सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार, सकाळी सात ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील, औद्योगिक कारखाने, ई कॉमर्स सेवा, स्वस्त धान्य दुकानं, घरपोच पिण्याचं पाणी, अन्य अत्यावश्यक सेवा तसंच लसीकरण मात्र सुरू राहणार आहे.
****
औरंगाबाद महापालिका क्षेत्रात, सध्या फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी, कोव्हीशिल्ड लसीची पहिली आणि दुसरी मात्रा देण्यात येत आहे. त्यामुळे लसीची पहिली मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये, असं आवाहन, आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी केलं आहे. याचबरोबर, कोरोना प्रतिबंधात्मक कोव्हीशिल्ड या लसीची एकदा पहिली मात्रा घेतल्यावर, दुसऱ्यांदा घेण्याची मात्रा कमीत कमी ८४ दिवसांनी घेण्याबाबत, नव्यानं सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे अशा पात्र नागरिकांनीच लसीकरण केंद्रावर जावं, असंही कळवण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या ज्या नागरिकांची, कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीची फक्त दुसरी मात्रा घेणं बाकी आहे, त्यांच्यासाठीच एकूण ९२ केंद्रांवर लसीकरण केलं जात आहे. लसीच्या उप��ब्धतेप्रमाणे जिल्ह्यातल्या लसीकरण केंद्रावर लस घेऊन सहकार्य करण्याचं आवाहन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी रेमडीसीविर इंजेक्शनच्या एक ��जार मात्रा, जिल्हा सामान्य रुग्णालयाला मिळाल्या आहेत. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या आमदार निधीतून याची खरेदी करण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळीत औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेचा दुष्परिणाम परिसरातल्या काही गावांवर दिसून येत असल्यामुळे दादाहरी वडगांवच्या ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाला समर्थन देत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित अधिकारी, औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी आणि जिल्हा प्रशासनास यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. राखेच्या ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेची विल्हेवाट निर्जन ठिकाणी करावी, असं मुंडे यांनी म्हटलं आहे.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सेवेकरी शिवराम-मामा जाधव यांचं, काल औरंगाबाद इथं दीर्घ आजारानं निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. शहरातल्या मिलिंद महाविद्यालयाचं बांधकाम सुरु असतांना शिवराम मामांना बाबासाहेब आणि माई आंबेडकरांची सेवा करण्याची संधी लाभली होती.
****
0 notes