#कंपनीची
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 22 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय • गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन • नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात मराठवाड्यातल्या आठ भाविकांचा मृत्यू • ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ आणि संजय आर्वीकर यांना विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर आणि • वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाअंतर्गत हिंगोली आणि नांदेडमध्ये वाचन उपक्रमांचं आयोजन
डीएपी खतांवर प्रतिटन साडे तीन हजार रुपये विशेष अनुदान पुढे चालू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. शेतकऱ्यांना डीएपी खताच्या ५० किलोच्या पोत्यावर एक हजार ३५० रुपये अनुदान मिळेल, त्याकरता केंद्रीय अर्थसंकल्पात तीन हजार ८५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान विमा योजना तसंच पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू ठेवण्यावर मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. या योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले… ‘‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना उसका एनहांसमेंट उसके अलोकेशन को एनहान्स किया गया। 69,515 करोड किया गया। और ये जिस तरह का अभी तक का अनुभव आया है, जिस तरह से इस स्कीम मे युटीलायजेशन, जिस तरह से रिस्पॉन्स मिला है, जैसे किसानों के जीवन में जो रियल परिवर्तन आया है इस स्कीम से उसके कारण इस ॲलोकेशन को एनहांस किया गया है।’’
गेल्या आठ वर्षांच्या काळात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक ��ाख ७० हजार कोटी रुपये वाटप करण्यात आलं असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. दरम���यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या वर्षातला पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतल्याचं नमूद केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पीकं अधिक सुरक्षित होतील, आणि नुकसानाची भीती कमी होईल, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डी आर आय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनावरण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले… ‘‘कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळालाय. पाच हजारांना अजून दहा महिन्यांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपलं जे स्वप्न आहे की, गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे.’’
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉईड्स मेटल कंपनीची शाळा, रुग्णालय, कर्मचारी निवासस्थानं, जिमखाना आणि बालोद्यान आदी उपक्रमांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. दरम्यान, अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही बससेवा सुरू होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ‘‘मला अतिशय आनंद आहे कारण हा जो सगळा भाग आहे, या भागांमध्ये वर्षानुवर्ष धुळणवळणाची साधनं नव्हती. रस्ते नव्हते. आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला असा हा भाग होता. आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय. आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलं. रस्त्याचे काम असेल पीडब्ल्यूडी ने केलेलं पुलाचं काम असेल याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत. आणि ७५ वर्षानंतर पहिल्यांदा फर्स्ट सेवा या भागामध्ये सुरू होतेय. लोकांना एक मोठी सुविधा मिळते.’’
नक्षल चळवळीच्या नेत्या ताराक्का आणि त्यांच्या दहा सहकाऱ्यांनी काल आत्मसमर्पण केलं. या सर्वांच्या पुनर्वसनाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षल चळवळीचा बिमोड करणाऱ्या सी सिक्स्टी जवानांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गडचिरोली पोलीस दलाला पाच बस, १४ चारचाकी आणि ३० दुचाकींचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांची त्यांनी यावेळी पाहणी केली.
कृत्रिम बुद्धीमत्ता - आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावं, यासाठी राज्याचं पहिलं एआय धोरण तयार करण्याचे निर्देश, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी दिले आहेत. काल आपल्या विभागाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील, तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी कपात केली आहे. मुंबईत आता १९ किलो वजनाचं एलपीजी सिलिंडर एक हजार ७५६ रुपयांना मिळेल. घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी जातांना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात मराठवाड्यातल्या आठ भाविकांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महाकाळा इथं, नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले चार जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. काल दुपारी हा अपघात घडला. मृतांमध्ये दोन महिलांसह एका ११ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या अपघातातले सर्वजण अक्कलकोटहून छत्रपती संभाजीनगरला परतत होते. जखमींना छत्रपती संभाजीनगर इथं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अन्य एका अपघातात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोटमधल्या मैंदर्गी इथं भाविकांची चारचाकी गाडी आणि ट्रकची धडक होऊन चार भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातले हे सर्व भाविक अक्कलकोटहून गाणगापूरला दर्शनासाठी जात होते.
विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय आणि अन्य वाङ्‌मय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यामध्ये कुसुमानिल ���्मृती समीक्षा पुरस्कार संजय आर्वीकर यांच्या ‘आत्मप्रकाशया ग्रंथाला, तर स्वर्गीय गोपाळराव मुकुंदराव देशपांडे स्मृती संपादन पुरस्कार सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर यांच्या ‘वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत या ग्रंथास प्राप्त झाला आहे. येत्या १४ जानेवारीला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत जालना जिल्ह्यातल्या ��दनापूर तालुक्यात केळीगव्हाण इथल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं, आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं. पाच मेगावॅट क्षमतेच्या या सौर ऊर्जा प्रकल्पातून परिसरातल्या सहा गावांमधल्या अकराशे कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जाणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत अहिल्याबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकणारी तज्ज्ञांची व्याख्यानं, तसंच नाट्य प्रयोग सादर केले जाणार आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाचं एकोणसाठावं प्रदेश अधिवेशन आजपासून लातूर इथं सुरु होत आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात उद्या शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. या अधिवेशनात सहभाग घ्यावा, असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे.
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं काल जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस. एम. रचावाड यांच्या हस्ते उद्घाटन झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज सामूहिक वाचन करण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ मध्ये बनावट पिक विमा भरणाऱ्या किती शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली, याची सविस्तर माहिती देण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे. यासंदर्भात त्यांनी काल एक निवेदन देऊन, गुन्ह्यांची माहिती, अपहाराची रक्कम याविषयी नव्याने माहिती देण्याची मागणी केली.
परभणी इथं जिंतूर मार्गावर तबलिगी इज्तेमा सुरु असल्यामुळे परभणी शहर वाहतूक मार्गात तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. वाहनधारकांनी पर्यायी वळण मार्गाचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत ‘100 दिवसांचे लक्ष्य अंतर्गत’ विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी तसंच तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र समिती ��्तरावरून निर्गमित करण्यासाठी विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या विशेष शि��ीराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयानं केलं आहे.
देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रेल्वेगाड्या उशीराने धावत आहेत. दिल्लीहून सुटणाऱ्या किंवा तिथे पोहोचणाऱ्या बावीस गाड्या दोन तासांपर्यंत उशीराने धावत आहेत, अशी माहिती रेल्वे व्यवस्थापनाने दिली आहे.
0 notes
yntstore · 2 months ago
Text
Best Custom T-Shirt Service for Personal and Business
Tumblr media
आजकालच्या व्यावसायिक जगात, प्रत्येक व्यवसायाला त्यांची ओळख आणि ब्रँड मूल्य वाढवण्याची आवश्यकता असते.त्या व्यवसायासाठी सानुकूल टी-शर्ट्स ( customise T-shirts ) हे एक उत्तम साधन ठरू शकतात. ठाणे आणि मुंबईतील विविध व्यवसायांसाठी कस्टम टी-शर्ट्स कसे उपयुक्त ठरू शकतात, हे  आपण या लेखात पाहूया.
1. व्यवसायांसाठी सानुकूल टी-शर्ट्सची गरज : 
संस्थेची ओळख:
टी-शर्ट्स तुमच्या व्यवसायाचा प्रचार करण्याचे एक प्रभावी साधन ठरतात. तुमच्या ब्रँडचा लोगो, अथवा संदेश असलेले टी-शर्ट्स सहजपणे डोळ्यात भरतात किंवा एखाद्याचे लक्ष वेधून घेतात . त्यामुळे ग्राहकांच्या मनात तुमची तुमच्या कंपनीची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते.
ब्रँडिंग:
टी-शर्ट्सद्वारे तुम्ही तुमच्या टीमची एकसंधता दर्शवू शकता. एकाच डिझाइनमध्ये टीम सदस्य एकत्र दिसल्याने, ते एक सकारात्मक आणि व्यावसायिक संदेश प्रसारित करतात. हे एक प्रकारे तुमच्या ब्रँडची विश्वासार्हता आणि व्यावसायिक मूल्य (Brand value) देखील वाढवते.
बजेट-फ्रेंडली मार्केटिंग:
कस्टम टी-शर्ट्स हे बजेट-फ्रेंडली मार्केटिंग साधन आहेत. पारंपारिक विज्ञापन आणि प्रमोशनच्या तुलनेत, एकदाच टी-शर्ट बनवून तुम्ही दीर्घ���ाळचा प्रचार करू शकता. टी-शर्ट्स एक सोपे , किफायतशीर, आणि दीर्घकालीन प्रचाराचे साधन आहेत.
2. आमच्या टी-शर्ट्सचे प्रकार आणि वैशिष्ट्ये
कॉटन टी-शर्ट्स: 
Tumblr media
210 GSM आणि 260 GSM पोलो टी-शर्ट्स उच्च दर्जाचे आणि टिकाऊ. तुमच्या व्यवसायासाठी सुसंगत, आरामदायक आणि प्रीमियम टी-शर्ट्स.
ड्रायफिट टी-शर्ट्स: 
हलके आणि घाम शोषून घेणारे.
Tumblr media
राऊंड नेक टी-शर्ट्स:
Tumblr media
3. रंगांमधील निवड
ब्रँडच्या रंगाला प्राधान्य: 
तुमच्या ब्रँडच्या रंगाशी जुळणारे टी-शर्ट्स निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रंग तुमच्या ब्रँडच्या थीमला प्रकट करतात आणि तुम्हाला ग्राहकांच्या मनावर चांगली छाप सोडण्यास मदत करतात.
रंग उपलब्धता:
टी-शर्ट्स विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत: लाल, निळा, पांढरा, काळा आणि इतर विविध शेड्स. तुम्ही तुमच्या ब्रँडच्या अनुरूप योग्य रंग निवडू शकता. या मध्ये २० पेक्षा जास्त रंगसंगती उपलब्ध आहेत. 
Tumblr media
4. प्रिंटिंग व एम्ब्रॉयडरी सेवा
प्रिंटिंगचे प्रकार:
स्क्रीन प्रिंटिंग:
मोठ्या ऑर्डरसाठी उत्तम, स्वस्त आणि टिकाऊ. मोठ्या प्रमाणात ब्रँडेड टी-शर्ट्स तयार करणे शक्य आहे.
2. डिटीफ प्रिंटिंग : 
विविध रंगसंगती तसेच मोठया व छोट्या कमी संख्येच्या ऑर्डरसाठी उपयुक्त आहे . स्वस्त आणि टिकाऊ असल्याने ह्या पद्धतीचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात केला जातो. 
Tumblr media
3. व्हिनाइल प्रिंटिंग:
Tumblr media
4. एम्ब्रॉयडरी:
कॉर्पोरेट टी-शर्ट्ससाठी आकर्षक आणि टिकाऊ लोगो डिझाइन. या तंत्रा मध्ये ( Technology ) एम्ब्रॉयडरी  (भरतकाम किंवा धाग्यांची डिझाईन) वापर केल्याने लोगो (Subject) खुप मोठ्या कालावधी पर्यंत टिकुन राहतो .
Tumblr media
5. ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणि फायदे
मोठ्या ऑर्डरवर सवलत:
मोठ्या ऑर्डर्ससाठी खास ऑफर्स आणि सवलती. व्यवसायांच्या मोठ्या प्रमाणावर ऑर्डर घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.
वेळेवर डिलिव्हरी:
ठाणे आणि मुंबईतील व्यवसायांसाठी जलद आणि विश्वासार्ह डिलिव्हरी सेवा. आम्ही वेळेवर तुमची ऑर्डर डिलिव्हर करू.
6. टी-शर्ट्स कसे वापरता येतील?
कर्मचाऱ्यांसाठी युनिफॉर्म:
टी-शर्ट्स आपल्या कर्मचार्‍यांसाठी एक आदर्श युनिफॉर्म ठरू शकतात. यामुळे व्यावसायिक ओळख निर्माण होईल.
इव्हेंट आणि प्रमोशन्स:
प्रदर्शन, रोड शो, किंवा फेस्टिव्हल्ससाठी कस्टम टी-शर्ट्स उत्तम पर्याय आहेत. हे तुमच्या ब्रँडला लोकांच्या नजरेत आणण्यास मदत करतात.
कस्टम गिफ्ट्स:
कर्मचारी किंवा ग्राहकांसाठी ब्रँडेड गिफ्ट्स म्हणून तुम्ही कस्टम टी-शर्ट्स देऊ शकता. यामुळे तुमचा व्यवसाय त्यांना लक्षात राहील आणि व्यवसाय वृद्धी मध्ये मदत होईल.
7. आमची विश्वासार्हता आणि अनुभव
कामाचा दांडगा अनुभव : 
आम्हाला कस्टम टी-शर्ट्सच्या क्षेत्रात चार वर्षांचा अनुभव आहे. हे आम्ही अनेक व्यवसायांना उत्कृष्ट सेवा देऊन सिद्ध केले आहे.
समाधानी ग्राहक:
आमच्याकडे अनेक समाधानी ग्राहक आहेत आणि ते पुन्हा आमच्याकडे येत  (Repeat orders) आहेत. आम्ही त्यांना उच्च दर्जाचे फॅब्रिक्स आणि तंत्रज्ञान प्रदान केले आहे.
8. थेट संपर्क करा
ठिकाण:
तुम्ही आमच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी ठाणे आणि मुंबईतील कोणत्याही ठिकाणाहून आपण आम्हाला संपर्क करू शकता. 
गुगल मॅप पुढील प्रमाणे: https://maps.app.goo.gl/BrM1k6SLkX87GTsV9
ऑनलाइन सेवा:
तुम्ही आमच्या वेबसाइटवरून किंवा फोनद्वारे ऑर्डर देण्यासाठी पुढील नावावर क्लिक करु शकता YNT STORE
फोन नंबर: 7738180909
इमेल आयडी: [email protected]
कस्टम टी-शर्ट्स वापरून तुमच्या व्यवसायाची ओळख निर्माण करा आणि तुमच्या ब्रँडला एक नवा आयाम द्या. आजच आमच्याशी संपर्क साधा! YNT STORE 
0 notes
news-34 · 3 months ago
Text
0 notes
kvksagroli · 4 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताह (२३ ते २८ सप्टेंबर ) निमित्य बेळकोणी येथे रब्बी हंगामातील पिक बदल या विषयावर चर्चासत्र…. संस्कृति संवर्धन मंडळ कृषि विज्ञान केंद्र सगरोळी व अमृतालयम् शेतकरी उत्पादक कंपनी बेळकोणी त्यांच्या संयुक्त विद्यमाने बेळकोणी ता. बिलोली येथे रब्बी हंगामातील पीक बदल या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात रब्बी हंगामातील हरभरा पिकाला पर्यायी पिके (करडई, रब्बी ज्वारी, धने, राजमा, चिया, रब्बी उडीद ,रब्बी तुर ई .) व फळबाग लागवड (आंबा,पेरू, सिताफळ, पेरू,जांभूळ .लिंबू ) या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी रिलायन्स फाउंडेशन कडून श्री नासेर अली व इफको नांदेड जिल्हा व्यवस्थापक श्री सचिन घाडगे यांनी सहभाग नोंदवला आणि हवामान अनुकूल तंत्रज्ञान व फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञान, नॅनो युरिया व नॅनो डीएपी याविषयी शेतकऱ्यांना अवगत केले. अमृतालयम् शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री माधव तरकंटे यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची यशोगाथा शेतकऱ्यांसमोर मांडली. या कार्यक्रमासाठी तालुका तंत्र व्यवस्थापक बिलोली श्री कांबळे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे, डॉ. कृष्णा अंभोरे, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. प्रवीण चव्हाण यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी बेळकोणी व परिसरातील १५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. #कृषिविज्ञानकेंद्र #सगरोळी #शेतकरी #नांदेड #महाराष्ट्र #कृषिसमृद्धी #कृषक #स्वर्णमहोत्सव #समृद्धी #सप्ताहा #तंत्रज्ञान #agriculture #farming #farmer #technology #innovation #development #Maharashtra #India
0 notes
6nikhilum6 · 5 months ago
Text
Nigdi : निगडीतील अपंग विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरे
एमपीसी न्यूज – निगडीतील यमुनानगर (Nigdi) येथील मॉडर्न हायस्कुलमधील स्काऊट गाईड पथकाच्या मुलींनी यमुनानगर येथील अपंग विद्यालयातील मुलांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी मॉडर्न हायस्कुलच्या स्काऊट गाईडच्या मुलींनी अपंग मुलांना औक्षण करून त्यांना राखी बांधून पेन आणि खाऊ दिला. Chinchwad : सात दुकानदारांकडून बजाज फायनान्स कंपनीची फसवणूक या दिव्यांग मुलांना रक्षाबंधनाचा आनंद घेता यावा यासाठी…
0 notes
mahavoicenews · 1 year ago
Text
IBM चा प्रभाव अनलॉक करणे: मराठी बातम्यांनी नवीन मार्ग उघडले
तांत्रिक नवकल्पना आणि कॉर्पोरेट प्रभावाच्या गजबजलेल्या लँडस्केपमध्ये, IBM एक बेहेमथ म्हणून उभी आहे, सतत डिजिटल जगाची रूपरेषा तयार करत आहे. तथापि, त्याच्या जागतिक उपस्थितीत, प्रादेशिक बातम्यांमध्ये, विशेषतः मराठीत, IBM च्या प्रवेशामुळे, सर्वसमावेशकता आणि प्रवेशयोग्यतेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा प्रयत्न केवळ IBM ची पोहोच वाढवत नाही तर मराठी भाषिक समुदायांना संबंधित आणि वेळेवर माहिती देऊन सक्षम बनवतो.
IBM च्या भांडारात मराठी बातम्यांचे एकत्रीकरण विविध सांस्कृतिक लँडस्केप्सची सूक्ष्म समज आणि स्थानिक संवेदनशीलता पूर्ण करण्याचे महत्त्व दर्शवते. मराठी, भारतातील प्रमुख प्रादेशिक भाषांपैकी एक, समृद्ध वारसा आणि विशाल प्रेक्ष�� अभिमान बाळगते मराठी बातम्यांचा स्वीकार करून, IBM भाषिक विविधतेचे महत्त्व मान्य करते आणि तंत्रज्ञान आणि प्रादेशिक समुदायांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न करते.
मराठी बातम्यांमध्ये IBM च्या उपक्रमाचा प्रभाव केवळ भाषिक समावेशकतेच्या पलीकडे आहे. हे मराठी भाषिक प्रेक्षकांशी सखोल संबंध वाढवते, त्यांना IBM चे उपक्रम, सेवा आणि तंत्रज्ञानातील प्रगती त्यांना सोयीस्कर असलेल्या भाषेत गुंतवून ठेवण्यास सक्षम करते हे पाऊल माहितीच्या प्रवेशाचे लोकशाहीकरण करते, व्यक्तींना माहिती ठेवण्यासाठी आणि डिजिटल युगात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी सक्षम करते.
शिवाय, IBM चा मराठी बातम्यांमध्ये प्रवेश, स्थानिकीकरण आणि सामुदायिक सहभागासाठी कंपनीची बांधिलकी अधोरेखित करते. हे सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित सामग्री प्रसाराच्या महत्त्वावर जोर देऊन कॉर्पोरेट संप्रेषण धोरणांमध्ये एक प्रतिमान बदल दर्शवते. मराठी बातम्यांचा स्वीकार करून, IBM भाषिक अडथळ्यांना पार करते आणि मराठी भाषिक भागधारकांशी अर्थपूर्ण संबंध जोपासते.
मराठी बातम्यांवरील IBM च्या उपक्रमाचे परिणाम विविध क्षेत्रांमध्ये उमटतात. तळागाळातील नवकल्पना सुलभ करण्यापासून ते आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यापर्यंत, सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी स्थानिकीकृत दळणवळण माध्यमे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मराठी प्रेक्षकांना तंत्रज्ञान, व्यवसाय ट्रेंड आणि जागतिक घडामोडींवरील बातम्या आणि अपडेट्स उपलब्ध करून देऊन, IBM ज्ञानाचा प्रसार उत्प्रेरित करते आणि डिजिटल क्रांतीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी व्यक्तींना सक्षम करते.
शिवाय, IBM च्या पुढाकाराने भाषिक विविधतेला प्राधान्य देण्यासाठी आणि प्रादेशिक समुदायांशी सक्रियपणे संलग्न राहण्यासाठी इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी एक आदर्श ठेवला आहे. वाढत्या परस्परसंबंधित जगात, सर्वसमावेशक समाजाला चालना देण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी भाषिक बहुलता समजून घेणे आणि त्याचा आदर करणे अत्यावश्यक आहे.
अधिक माहितीसाठी:-
प्रमुख मराठी लोगो
अमरावती बातम्या आज मराठीत
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
मुंबई : कंपनीची ८ कोटी ४९ लाखांची फसवणूक
https://bharatlive.news/?p=166180 मुंबई : कंपनीची ८ कोटी ४९ लाखांची फसवणूक
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ...
0 notes
marmikmaharashtra · 1 year ago
Link
#हिंगोली #पिक #विमा #भरलेला #हप्ता #पाऊस #नुकसान #शेतकरी #दावे #दाखल #करण्याचे #आवाहन #news #marmikmaharashtra
0 notes
cinenama · 2 years ago
Text
'काय' आहे गतीची 'बाईक एक्स्प्रेस' सेवा?
मुंबई: ऑलकार्गो ग्रुप कंपनीची एक भाग असणारी व भारतातील प्रमुख एक्सप्रेस लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन सोल्यूशन्स प्रदात्यांपैकी एक गतीने लिमिटेडने बाईक एक्सप्रेस ही सेवा सादर केली आहे. ही सेवा संपूर्णपणे सुसज्ज, सुरक्षित वेळेवर उपलब्ध असेल जोडीला ही बाईक वाहतूक सेवा संपूर्ण देशव्यापी सेवा नेटवर्कसह डिझाइन केली गेली आहे. व्यावसायिक, नवीन ठिकाणी स्थलांतरित होणारे विद्यार्थी, पर्यटक, दुचाकीस्वार तसेच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 23 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात ८ भाविकांचा मृत्यू
आणि
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम
****
पंतप्रधान विमा योजना सुरू राहणार असून या योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या ��ेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू ठेवण्यावर सरकारनं शिक्कामोर्तब केलं. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले –
प्रधानमंत्री फसल बीमा योजना उसका एनहांसमेंट उसके अलोकेशन को एनहान्स किया गया। 69,515 करोड किया गया। और ये जिस तरह का अभी तक का अनुभव आया है, जिस तरह से इस स्कीम मे युटीलायजेशन, जिस तरह से रिस्पॉन्स मिला है, जैसे किसानों के जीवन में जो रियल परिवर्तन आया है इस स्कीम से उसके कारण इस ॲलोकेशन को एनहांस किया गया है।
गेल्या आठ वर्षांच्या काळात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक लाख ७० हजार कोटी रुपये वाटप करण्यात आलं असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या वर्षातला पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतल्याचं नमूद केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पीकं अधिक सुरक्षित होतील, आणि नुकसानाची भीती कमी होईल, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डीआरआय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनावरण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. या जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळालाय. पाच हजारांना अजून दहा महिन्यांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपलं जे स्वप्न आहे की, गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉईड्स मेटल कंपनीची शाळा, रुग्णालय, कर्मचारी निवासस्थानं, जिमखाना आणि बालोद्यान आदी उपक्रमांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही बससेवा सुरू होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले –
मला अतिशय आनंद आहे कारण हा जो सगळा भाग आहे, या भागांमध्ये वर्षानुवर्ष धुळणवळणाची साधनं नव्हती. रस्ते नव्हते. आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला असा हा भाग होता. आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय. आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलं. रस्त्याचे काम असेल पीडब्ल्यूडी ने केलेलं पुलाचं काम असेल याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत. आणि ७५ वर्षानंतर पहिल्यांदा फर्स्ट सेवा या भागामध्ये सुरू होतेय. लोकांना एक मोठी सुविधा मिळते.
नक्षल चळवळीच्या नेत्या ताराक्का आणि त्यांच्या १० सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं. या सर्वांच्या पुनर्वसनाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षल चळवळीचा बिमोड करणाऱ्या सी सिक्स्टी सैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसंच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात या योजनांच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गोरे बोलत होते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईल, जेणेकरुन कामात सुलभता निर्माण होईल. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुढील कामे मंजूर करण्यासाठी बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याबाबत प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
कृत्रिम बुद्धीमत्ता- आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले एआय धोरण तयार करा, असे निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी दिले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा शेलार यांनी आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या सांकशी गडावर शिवभक्तांना पाण्याचे टाके साफसफाई करताना शिवकालीन तीन शिल्प मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती काळाच्या ओघात पाण्याच्या टाक्यातील मातीच्या गाळात रुतून लुप्त झाल्या होत्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सेवेकरी आणि धारकरी शिवभक्त गेली अनेक वर्��े गड संवर्धन मोहीमा राबवून विविध गड किल्ले यांची साफसफाई करून आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करतात. आजपर्यंत गडावर ४६ संवर्धन मोहिमा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत.
****
नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी जातांना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ८ भाविक ठार झाले. जालना जिल्ह्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा इथं महामार्गावर नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले चार जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी दोन वाजता हा अपघात घडला. अपघातग्रस्त कारमध्ये सहाजण होते. यातल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांसह एका ११ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण छत्रपती संभाजीनगर इथले रहिवासी आहेत. ते अक्कलकोटहून छत्रपती संभाजीनगरला परतत होते.
अन्य एका अपघातात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोटमधील मैंदर्गी इथं भाविकांची चारचाकी गाडी आणि ट्रकची धडक होऊन चार भाविक जागेवरच ठार झाले तर सात जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महीला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. हे सर्वजण अक्कलकोटहून गाणगापूरला दर्शनासाठी जातांना हा अपघात झाला. गंभीर भाविकांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
****
विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय आणि अन्य वाङमय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली, विदर्भातील प्रसिद्ध लेखकांसह नवोदित लेखकांच्या पुस्तकांना तसेच पाच राज्यस्तरीय पुरस्कार यावेळी दिले जातील. यामध्ये कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार संजय आर्वीकर यांच्या ‘आत्मप्रकाश’ या ग्रंथाला तर स्वर्गीय गोपाळराव मुकुंदराव देशपांडे स्मृती संपादन पुरस्कार सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर यांच्या ‘वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत’ या ग्रंथास प्राप्त झाला आहे. येत्या १४ जानेवारीला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमात रत्नागिरी राज्यात प्रथम ठरला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या भोवतीचं वातावरण तणावरहीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘एक्झाम वॉरियर्स’ चळवळ सुरु केली आहे. त्याचाच भाग असलेल्या 'परीक्षा पे चर्चा' उपक्रमात २८ डिसेंबर रोजी रत्नागिरी राज्यात शून्यावर होता. मात्र दोन दिवसाच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्राथमिक तसंच माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तसंच सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेवून या कामास गती दिली. दोन दिवसात झालेल्या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात जिल्ह्यातील ७८ हजारावर विद्यार्थी, सव्वा आठ हजारावर शिक्षक आणि सुमारे साडे चार हजार पालकांचा सहभाग राहिला आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन होईल. या परिषदेत अहिल्याबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकणारे तज्ञांचे व्याख्यान, तसंच नाट्य प्रयोग सादर केले जाणार आहेत.
****
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशचे एकोणसाठावे प्रदेश अधिवेशन उद्यापासून लातूर इथं होणार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. अधिवेशनात सर्व नागरिकांनी उत्साहपूर्वक येणाऱ्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत करावे आणि अधिवेशनात सहभाग घ्यावा, असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे.
****
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन आज जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस.एम.रचावाड यांच्या हस्ते झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
****
बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड मार्फत ‘१०० दिवसांचे लक्ष्य अंतर्गत’ विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी आणि तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र समिती स्तरावरून निर्गमित करण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. या विशेष शिबिराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
****
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
पुणेकराला ' मोबाईल डिलरशिप ' पडली महागात , गाडी आरटीओने पकडली अन ..
महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अजब प्रकार सध्या समोर आलेला असून पुण्यात एका मोबाईल कंपनीची तुम्हाला डीलरशिप मिळून देतो असे सांगत एका व्यक्तीला तब्बल आठ लाख 38 हजार रुपयांना चुना लावण्यात आलेला आहे. कोथरूड परिसरात ही घटना उघडकीला आलेली असून उत्तम चेनाराम सुधार ( वय 28 राहणार भुसारी कॉलनी कोथरूड ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव आहे. उत्तम हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका मोबाईल कंपनीच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
पुणेकराला ' मोबाईल डिलरशिप ' पडली महागात , गाडी आरटीओने पकडली अन ..
महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अजब प्रकार सध्या समोर आलेला असून पुण्यात एका मोबाईल कंपनीची तुम्हाला डीलरशिप मिळून देतो असे सांगत एका व्यक्तीला तब्बल आठ लाख 38 हजार रुपयांना चुना लावण्यात आलेला आहे. कोथरूड परिसरात ही घटना उघडकीला आलेली असून उत्तम चेनाराम सुधार ( वय 28 राहणार भुसारी कॉलनी कोथरूड ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव आहे. उत्तम हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका मोबाईल कंपनीच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
मोटारसायकल चोरांना मध्यप्रदेशातील बालाघाट येथून अटक
गोंदिया, दि.15 : गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारावर रामनगर पोलिसांनी मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट येथून मोटारसायकल चोरांना अटक केली. रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या टिबीटोली परिसरातून दतोरा येथील कृष्णा यादवराव गायधने यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटर सायकल क्रमांक-MH-35/AB-0993 किंमत-30000 रुपयाची 29 जानेवारीला सायंकाळी 6:00 वा. ते 6:30 वाजेदरम्यान अज्ञात चोराने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
startupsetu · 3 years ago
Text
Tumblr media
0 notes
karmadlive · 2 years ago
Text
जायकवाडी धरणाच्या पुलावरून चारचाकी गाडी नदीत कोसळली!
पैठण : पैठण तालुक्यात���ल जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या अरुंद पुलावरून रविवारी दुपारी मारुती सुझुकी स्विफ्ट कार कोसळल्याची घटना घडली सुदैवाने कुठलीही जीवित हानी घडली नाही त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले,कावसान जुने येथील उद्धव भगवान मापारी वय 40 वर्ष व त्यांची पत्नी वर्षा उद्धव मापारी वय 32 व रामभाऊ चेडे हे तिघे मारुती सुझुकी स्विफ्ट व्हीडीआय कंपनीची एमएच- 12 एन जे – 2978 या चार चाकी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
महिंद्रा कंपनीची कॅनडातील व्यवहारांवर बंदी
https://bharatlive.news/?p=145506 महिंद्रा कंपनीची कॅनडातील व्यवहारांवर बंदी
पुढारी ऑनलाईन डेस्क : ...
0 notes