#एके ४७ रायफल
Explore tagged Tumblr posts
digimakacademy · 4 years ago
Text
Vikas Dubey encounter: पोलिसांकडून लुटलेली AK-47 विकास दुबेच्या घरात
Vikas Dubey encounter: पोलिसांकडून लुटलेली AK-47 विकास दुबेच्या घरात
[ad_1]
कानपूर: कानपूरच्या बिकरू गावात झालेल्या पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर विकास दुबे याला पोलिसांनी चकमकीत ठार केलं. त्यानंतर आता पोलिसांनी विकास दुबे याच्या घरावर छापेमारी केली. त्याच्या घरात एक एके-४७ रायफल आणि एक इन्सास रायफल जप्त केली आहे. हत्याकांडात सामील असलेल्या आणखी एका आरोपीच्या अटकेनंतर ही छापेमारी केली.
याबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
भीती निर्माण करणारी बोट ऑस्ट्रेलियनची आहे: महाराष्ट्र मंत्री
भीती निर्माण करणारी बोट ऑस्ट्रेलियनची आहे: महाराष्ट्र मंत्री
बोटीवर तीन एके-४७ रायफल आणि काही गोळ्या सापडल्या. मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, तीन एके-47 असलेली बोट एका ऑस्ट्रेलियन जोडप्याची आहे, ज्यांनी इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ती सोडून दिली. प्रथमदर्��नी, कोणताही दहशतवादी कोन नाही, परंतु तो शस्त्रे का घेऊन गेला होता हे अस्पष्ट आहे. मोठ्या कथेवर 10 नवीनतम अद्यतने येथे आहेत: मुंबईपासून १९० किमी अंतरावर रायगडमधील…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 January 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जानेवा��ी २०२१ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७३व्या पुण्यतिथीनिमित्त देशभर त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येत आहे. दिल्लीतल्या राजघाट या महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. याठिकाणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी गांधीजींच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचं स्मरण करण्यासाठी, देशात दोन मिनिटं मौन पाळण्यात आलं.
 धुळे इथं महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी चौकात आज अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीनं गरजू दिव्यांग बांधवांना कपडे आणि शिव भोजन वाटप करण्यात आलं.
****
जम्मू काश्मीर इथल्या पूलवामा जिल्ह्यातल्या लेलहार इथं हिजबूल मूजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांनी आज सुरक्षा दलासमोर आत्मसमर्पण केलं. काल रात्री उशीरा सूरक्षा दलानं केलेल्या नाकेबंदी दरम्यान हे दोन दहशतवादी अडकले होते. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी जखमी झाला तर दोघांनी आत्मसमर्पण केलं. या दहशतवाद्यांकडून दोन एके -४७ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र म���दी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७३वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
देशभरात काल १३ हजार ८३ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १३७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी सात लाख ३१ हजार १३३ झाली असून, आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ५४ हजार १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १४ हजार ८०८ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी चार लाख नऊ हजार १६० रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ६९ हजार ८२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.                            ****
राज्यात काल ५३९ केंद्रांच्या माध्यमातून ४० हजार ५३९ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आलं. आतापर्यंत दोन लाख ६१ हजार ३१९ कर्मचाऱ्यांना लसीकरण झालं असल्याची माहिती, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.
दरम्यान, राज्यात सहा ठिकाणी को-वॅक्सीन लस देण्यात येत आहे.
कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्यात बीड जिल्हा आघाडीवर असून, काल सर्वात जास्त ११३ टक्के लसीकरण झालं. आरोग्य मंत्र्यांनी बीड चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांचं याबद्दल विशेष कौतुक केलं आहे.
****
मुंबई विद्यापीठ अंतर्गत मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरु करण्यासाठी, अभ्यास समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. देशाचा अभिमान असणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त, शासनानं हे महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या संकल्पनेतील या महाविद्यालयात, भारतीय आणि पाश्चिमात्य शैलीतील शास्त्रीय, सुगम आणि इतर शैलीतील संगीत, विविध वाद्यांचा अभ्यास, ध्वनिमुद्रण, संगीत निर्मिती करता यावं, यासाठी अत्याधुनिक सोयी आणि अद्यावत अभ्यासक्रम तयार केले जाणार आहेत. याशिवाय भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या, सात दशकांहून अधिक काळ चाललेल्या, सांगीतिक कारकीर्दीचा मागोवा घेणारं संग्रहालय, विविध सांगीतिक कार्यक्रमांसाठी सभागृहे, वर्तुळाकार प्रेक्षागृहे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, संगीत प्रशिक्षणासाठी खुले रंगमंच, या संकल्पनेचा समावेश देखील, या संगीत महाविद्यालयात करण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या १४३ पिडित महिलांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या ५९ अपत्यांना, जिल्हाधिकारी कार्यालयातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ अंतर्गत, २४ लाख ४० हजार रूपयांची रक्कम थेट बँक खात्यात, कोणत्याही कागदपत्राची विचारणा न करता जमा करण्यात आली आहे. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणक पथक, तसंच जिल्हा रूग्णालयाच्या मदतीनं हे कार्य करण्यात आलं.
****
नांदेड - बंगळूरु - नांदेड उत्सव विशेष गाडी आणि ओखा - रामेश्वर - ओखा उत्सव विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. बंगळूरु - नांदेड गाडीला ३१ मार्च पर्यंत, नांदेड - बंगळूरु गाडीला एक एप्रिलपर्यंत, रामेश्वर - ओखा साप्ताहिक गाडीला २६ मार्च पर्यंत, तर ओखा - रामेश्वार गाडीला ३० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्यानं नाशिक जिल्ह्यातले ११ कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोविड हेल्थ सेंटरच्या खाटा कमी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी घेतला आहे.
****///****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २७ जुलै २०२० सकाळी ११.०० वाजता ****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ६६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातली बाधितांची एकूण संख्या १३ हजार १०४ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतले २३ तर ग्रामीण भागातल्या ४३ रुग्णांचा समावेश आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना विषाणू बाधित ३४० रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्या�� आली. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २८५ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
सांगली जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष आणि मिरज इथल्या शासकीय कोविड रुग्णालयातल्या एकूण २३ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामधे कोविड रुग्णालयातल्या प्रत्येकी १ परिचारक तसंच परिचारिका, २ डॉक्टर, १ कारकून आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. दरम्यान, एका आरोग्य कर्मचाऱ्याचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
****
रत्नागिरीतले प्रख्यात वैद्य प्रमोद ऊर्फ रघुवीर पांडुरंग भिडे यांचं आज पहाटे कोरोना विषाणू संसर्गामुळे निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. रत्नागिरी पालिकेच्या आयुर्वेदीय दवाखान्यात त्यांनी अनेक वर्षं सेवा दिली. ब्रिज या खेळाच्या प्रसारासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.
****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर मंदिरांसह जिल्ह्यातली अनेक शिवमंदिरं आज श्रावणी सोमवारीही बंद आहेत. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर इथं दरवर्षी होणारी ब्रह्मगिरीची महाप्रदक्षिणा यंदा रद्द करण्यात आली आहे.
****
जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दाचू गावांतला दहशतवाद्यांचा अड्डा सुरक्षा दलांनी शोधून काढला आहे. या ठिकाणाहून हातगोळे, काडतुसं, १ एके ४७ रायफल, १ रेडियो तसंच काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.
****
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्���ी अमित शाह यांनी कलाम यांना अभिवादन करताना, कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचा विज्ञानापासून राजकारणापर्यंत सर्वच क्षेत्रावर प्रभाव पडला असल्याचं, म्हटलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०९ सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता ****
देशाचा कोविड मृत्यूदर सातत्याने कमी करण्यात यश मिळत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. सध्या हा मृत्यूदर एक पूर्णांक सात दशांश टक्के एवढा आहे. हा दर एक टक्क्याच्या खाली नेण्याचं उद्दीष्ट असल्याचं, मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. कोविडचा जागतिक मृत्यू दर तीन पूर्णांक २८ शतांश टक्के एवढा आहे.
****
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेशासाठी आता संपर्क रहित प्रणाली सुरू झाली आहे. या प्रणालीत क्यू आर कोडचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा मानवीय संपर्क खूपच कमी होणार असल्याचं विमानतळाच्या सूत्रांनी सांगितलं
****
जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातून सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी जम्मू श्रीनगर महामार्गावर एका ट्रकमधून प्रवास करत होते. त्यांच्या ताब्यातून एके ४७ प्रकारच्या दोन रायफल आणि स्फोटकांचा खोका हस्तगत करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या नाथसागर धरणाचे आठ दरवाजे आज सकाळी अर्ध्या फुटावरून एक फूट उघडण्यात आले. यातून चार हजार १९२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सध्यास्थितीत धरणाच्या सांडव्यामधून तेरा हजार ६२४ घनफूट प्रतिसेकंद आणि जलविद्युतकेंद्रामधून एक हजार ५८९ घनफूट प्रतिसेकंद असा एकूण पंधरा हजार २१३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. सध्या धरणाचा पाणीसाठा ९९ टक्के झाला आहे.
****
कोरोना विषाणू टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. पथविक्रेत्यांची खेळत्या भांडवलाची आवश्यकता पाहता, मुंबईत पथविक्रेत्यांसाठी ‘प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेत पथविक्रेत्यांना १० हजार रुपये खेळते भांडवल, कर्ज स���वरूपात देण्यात येणार आहे, त्या��ी परतफेड प्रतिमहिना नियमित दरानं करण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ४६५ झाली आहे. आजपर्यंत एकूण ७५९ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला असून, सध्या ५५३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 July 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ जुलै २०२० दुपारी १.०० वा. ****
बहुचर्चित राफेल लढाऊ विमानं परवा बुधवारी २९ जुलै रोजी भारतात दाखल होणार आहेत. पाच राफेल विमानांची पहिली खेप परवा हरयाणातल्या अंबाला इथं पोहोचेल. भारतानं फ्रान्सकडून खरेदी केलेली ही विमानं भेदक मारक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत.
****
केंद्रातील भाजप सरका�� सत्ता आणि पैशाचा गैरवापर करत विविध राज्यातली विरोधी पक्षांची सरकारं पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, काँग्रेस पक्षानं आज देशव्यापी आंदोलन छेडलं आहे. मुंबईत राजभवनाच्या प्रवेशद्वाराबाहेर निदर्शनांसह केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. राजस्थानातल्या सत्ता संघर्षाच्या पाठीमागे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
****
देशभरात कोविड संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या ९ लाखावर पोहोचली आहे. त्यामुळे या संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ६३ पूर्णांक ९२ शतांश टक्के एवढं झालं असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत या आजाराने बाधितांची संख्या १४ लाख ३५ हजार ८५३ झाली असून सध्या देशात ४ लाख ८५ हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३२ हजार ७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचं हे प्रमाण दोन पूर्णांक २८ शतांश टक्के असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, देशात सध्या एक हजार ३१० प्रयोगशाळांमधून कोविड संसर्ग चाचण्या केल्या जात आहेत. यापैकी ९०६ सरकारी प्रयोगशाळा तर ३७८ खासगी प्रयोगशाळा आहेत. आतापर्यत देशभरात एक कोटी ६८ लाख ६ हजार ८०३ कोविड नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद- आय सी एम आरनं दिली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सका��ी ६६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातली बाधितांची एकूण संख्या १३ हजार १०४ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतले २३ तर ग्रामीण भागातल्या ४३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ५३६ रुग्ण बरे झाले असून, ४४३ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना विषाणू बाधित ३४० रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २८५ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर मंदिरांसह जिल्ह्यातली अनेक शिवमंदिरं आज श्रावणी सोमवारीही बंद आहेत. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर इथं दरवर्षी होणारी ब्रह्मगिरीची महाप्रदक्षिणा यंदा रद्द करण्यात आली आहे.
****
जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दाचू गावांतला दहशतवाद्यांचा अड्डा सुरक्षा दलांनी शोधून काढला आहे. या ठिकाणाहून हातगोळे, काडतुसं, १ एके ४७ रायफल, १ रेडियो तसंच काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.
****
केंद्रीय राखीव पोलिस दल - सीआरपीएफच्या ८२व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सीआरपीएफचे पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सैनिकांचं शौर्य आणि कामातील अचूकतेचं कौतुक असून, हे पोलीस पुढेही अधिक चांगली कामगिरी करतील असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. हे सैनिक म्हणजे शौर्य, धैर्य आणि बलिदानाची प्रेरणा असून त्यांनी नेहमीच अभिमानास्पद कार्य केलं, कोविड प्रार्दूभावाच्या काळातही या सैनिकांनी देशाची अतुलनीय सेवा केली असल्याचं शाह यांनी म्हटलं आहे.
****
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी कलाम यांना एका ट्विट संदेशातून अभिवादन केलं आहे. कलाम यांनी आपल्या भाषणातून ��संच कार्यातून सर्व देशवासियांना विशेषत: तरुणांना प्रेरित केलं, राष्ट्र उभारणीच्या कार्यात दिलेल्या योगदानासाठी कलाम यांचं नेहमी स्मरण केलं जाईल, असं नायडू यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलाम यांना अभिवादन करताना, कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचा विज्ञानापासून राजकारणापर्यंत सर्वच क्षेत्रावर प्रभाव पडला असल्याचं, म्हटलं आहे.
माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही कलाम यांना आदरांजली अर्पण केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल, असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटल्याचं, मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
****
0 notes