#उद्घाटनाचं
Explore tagged Tumblr posts
Text
महामार्गाचं उद्घाटन, त्याच मंचावरून फडणवीसांनी पंतप्रधानांना पुढच्या विकासकामाच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं…
महामार्गाचं उद्घाटन, त्याच मंचावरून फडणवीसांनी पंतप्रधानांना पुढच्या विकासकामाच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं…
महामार्गाचं उद्घाटन, त्याच मंचावरून फडणवीसांनी पंतप्रधानांना पुढच्या विकासकामाच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं… नागपूर : आज राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण नागपूर ते मुंबई 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण (Samruddhi Mahamarg Inauguration) झालं. या महामार्गावरून आता सर्वसामान्यांना सुपरफास्ट प्रवास करता येणार आहे. या लोकार्पण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…
View On WordPress
#आजच्या प्रमुख घडामोड���#उद्घाटन#उद्घाटनाचं#त्याचं#दिलं&8217;#निमंत्रण#पंतप्रधानांना#पुढच्या#फडणवीसांनी#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मंचावरून#महामार्गाचं#राजकारण#राजकारण लेटेस्ट#विकासकामांच्या#शासन#सरकार
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ मे २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
संसदेची नवी वास्तू, ही आत्मनिर्भर भारताच्या भावनेचं प्रतिक असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना
नवीन संसद भवनाच्या अनावरणानिमित्त ७५ रुपयांच्या नाण्याचं तसंच टपाल तिकिटाचं अनावरण
लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पाश्वर्श्वभूमीवर उपजिल्हा निवडणूक कायार्यालयाकडे इतर कामं न सोपवण्याचे राज्य सरकारचे आदेश
मुंबईतल्या वांद्रे - वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’, नाव देण्याची तर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
उस्मानाबाद इथं आजपासून सहा दिवसीय नाट्य महोत्सव
भारताचा बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉयनं मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावत रचला इतिहास
आणि
पावसामुळे रद्द झालेला आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज होणार
सविस्तर बातम्या
विक्रमी वेळेत उच्च गुणवत्तेसह पूर्ण करण्यात आलेली संसदेची नवी वास्तू, ही आत्मनिर्भर भारताच्या भावनेचं प्रतिक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवनिर्मित संसद भवनाचं काल पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय मंत्री अमित शाह, डॉक्टर जितेन्द्र सिंह, राजनाथ सिंह, अश्विनी वैष्णव, अनुराग सिंह ठाकुर, डॉक्टर मनसुख मांडविया, प्रल्हाद जोशी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यावेळी उपस्थित होते. या संसद भवनात भारताची गौरवशाली लोकशाही परंपरा आणि घटनात्मक मूल्य अधिक समृद्ध होतील, या भवनाच्या सदनांमध्ये बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं, सदस्य आपलं काम अधिक उत्तमरीत्या करु शकतील, अशी आशा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले,
Byte…
यहां होनेवाला हर निर्णय आनेवाले सदीयों को सझाने संवारने वाला है। यहां होनेवाला हर निर्णय आनेवाले पिढीयों को सशक्त करनेवाला है। यहां होनेवाला हर निर्णय भारत के उज्वल भविष्य का आधार बनेगा। गरीब, दलित, पिछडा, आदिवासी, दिव्यांग समाज के हर वंचित परिवार के सशक्तीकरण का, वंचितों को वरियता का रास्ता यही से गुजर रहा है। इस नये संसद भवन की हर ईट, हर दिवार, इसका कण-कण गरीब के कल्याण के लिये समर्पित है।
यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संसद भवन बांधण्याच्या कार्यात सहभागी व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. ६५ हजार वर्ग मीटर क्षेत्रावर बांधण्यात आलेलं हे संसद भवन, त्रिकोणी आकारात आहे. यामध्ये लोकसभा सभागृहात ८८८ तर राज्यसभा सभागृहात ३८४ सदस्यांना बसण्याची व्यवस्था करण्��ात आली आहे. या संसद भवनाची कार्यालयं अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दृश्य -श्राव्य प्रणालीनं सुसज्ज आहेत.
त्यानंतर पंतप्रधानांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि अन्य मंत्र्यांसह नव्या संसद भवनच्या लोकसभा सभागृहात प्रवेश केला. या ऐतिहासिक क्षणी त्यांनी ७५ रुपयांच्या नाण्याचं तसंच टपाल तिकिटाचं अनावरण केलं. यावेळी राज्य सभा उपसभापती हरिवंश यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु और उप-राष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या संदेशाचं वाचन केलं.
नवीन संसद भवनाचं उद्घाटन तसंच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब असून, या अभूतपूर्व सोहळ्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं असल्याची भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
****
दरम्यान, संसद भवनाच्या उद्घाटनाच्या समारंभावर प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वार्ताहरांनी बोलतांना, उद्घाटन कार्यक्रमावरून केंद्र सरकारवर टीका केली. संसदेच्या उद्घाटनाचं आमंत्रण माझ्या हातात आलेलं नाही, कदाचित माझ्या दिल्लीतल्या निवासस्थानी ते गेलेलं असू शकेल, असं ते म्हणाले. एवढा मोठा कार्यक्रम घेताना सरकारनं विरोधकांशी कुठलीही चर्चा केली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
****
भारताची ताकद त्याच्या विविधतेत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे एकाव्या भागात ते काल बोलत होते.
शिक्षण मंत्रालयानं सुरू केलेल्या युवासंगम, या उपक्रमाचा उल्लेख करत, त्यांनी यात सहभागी युवकांशी संवाद साधला. वेगवेगळ्या राज्यांत उच्चशिक्षण घेणाऱ्या संस्थांमधले विद्यार्थी दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन तिथली संस्कृती, राहणीमान यांचा अनुभव घेतात. युवा संगमच्या पहिल्या फेरीत बाराशे युवकांनी देशाच्या २२ राज्यांना भेटी दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
जल संरक्षण आणि संवर्धनाचं महत्व पंतप्रधानांनी मन की बात मध्ये आधोरेखित केलं –
Byte ..
हम सब ��े एक कहावत कइ बार सुनी होगी। बार बार सुनी होगी। बिन पानी सब सून। बिना पानी जीवन पर संकट तो रहता ही है। व्यक्ती और देश का विकास भी ठप्प पड जाता है। भविष्य की इसी चुनौती को देखते हुऐ आज देश के हर जिले में 75 अमृत सरोवरों का निर्माण किया जा रहा है। हमारे अमृत सरोवर इसलिऐ विशेष है, क्योंकि ये आजादी के अमृत काल में बन रेहे हैं। और इस में लोगों का अमृत प्रयास लगा हैं। आप को जान कर अच्छा लगेगा की अब तक 50 हजार से ज्यादा अमृत सरोवरोंका निर्माण भी हो चुका हैं। यह जल संरक्षण की दिशा में बहोत बडा कदम हैं।
जल संरक्षणाशी संबंधित स्टार्ट अप, अर्थात नवउद्योगाबाबत पंतप्रधानांनी माहिती दिली. नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करणाऱ्या, तसंच समाज जागृतीच्या मोहिमेत सहभागी असलेल्या युवक-युवतींचं त्यांनी कौतुक केलं. कृषी क्षेत्रात जास्तीत जास्त योगदान देण्यासाठी प्रयत्नशील असलेले नाशिक जिल्ह्यातले माजी सैनिक शिवाजी शामराव डोळे यांचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
****
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रमेश धानुका यांनी काल पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थित हा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती आर.डी धानुका यांची ४६ वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. धानुका यांचा मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यकाळ चार दिवसांचा असेल, ते ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.
****
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीनं, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांकडे इतर कामं सोपवू नयेत, असे आदेश काढण्यात आले आहेत. यासंदर्भातलं परिपत्रक राज्य सरकारनं जारी केलं आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील निवडणुकांबाबतची कामं जिल्हास्तरावर करण्यासाठी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय अत्यंत महत्वाचं असून, इथं अन्य कामं सोपवल्यास त्याचे विपरीत परिणाम निवडणूक विषयक कामांवर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कार्यालयानं सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना वेळेवेळी आदेश देऊनही या आदेशांचं पालन होत नसल्याचं आढळल्यानं, पुन्हा हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवीन संसद भवनात, सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. दिल्ली इथं महाराष्ट्र सदनातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली.
मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण काल ��ंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं. मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
राज्यात काल 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' साजरा करण्यात आला. मुंबईत यानिमित्त सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'शतजन्म शोधिताना' हा सांस्कृतिक कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतल्या वांद्रे - वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ , असं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्रीयांनी सांगितलं.
मुंबईत मंत्रालयात शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राज्य पर्यटन विभागामार्फत ‘वीरभूमी परिक्रमा’ उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी सावरकर विचार जागरण सप्ताह हे अभियान राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय स्मारक पदयात्रेसह दिपोत्सवाचं आयोजनही मुंबईच्या सावरकर स्मारक इथं करण्यात आलं.
औरंगाबाद शहरात समर्थ नगर इथल्या सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. शहरात यानिमित्त दिपोत्सव, मिरवणूक, गायन, वाचनाचे कार्यक्रम पार पडले.
उस्मानाबाद शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं जयोस्तु प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. तसंच यानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी गौरवण्यात आलं. तुळजापूर इथं सावरकर विचार मंच आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं शहरातील सावरकर चौकात सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.
विभागात इतरत्रही सावरकर जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी झाली.
****
मराठवाड्यात मोसंबी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं वेळीच उपाय योजना करण्याचं आवाहन जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर संजय पाटील यांनी केलं आहे. जालना जिल्ह्याच्��ा घनसावंगी इथं या केंद्रातर्फे आयोजित जनजागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन करताना ते काल बोलत होते. सीट्रस ग्रिनिंग या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं या फळ पिकावर मंदऱ्हासाचं संकट निर्माण झाल्याचं ते म्हणाले. जिल्ह्यातल्या बदनापूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात या रोगाचं प्रमाण वाढलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज दाखल करता येतील. ज्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा द्यायची आहे किंवा श्रेणीसुधार योजनेचा लाभ घ��यावयाचा आहे, त्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरता येतील. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांना येत्या पाच जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवण्याकरता १४ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना पाच जून रोजी दुपारी तीन वाजता संबंधीत कनिष्ठ महाविद्यालयातून गुणपत्रिका वितरित होणार आहे. तर जुलै-ऑगस्ट मध्ये विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाईल.
****
उस्मानाबाद इथं आयोजित सहा दिवसीय नाट्य महोत्सवाचं उद्घाटन अभिनेते उमेश जगताप यांच्या हस्ते आज होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचा नाट्यशास्त्र आणि लोककला विभाग, तसंच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्यावतीनं, या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठ उपकेंद्रातल्या नाट्यगृहात संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत विविध १५ नाटकांचं सादरीकरण होणार आहे.
****
भारताचा बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉयनं मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. क्वालालांपूर इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या लढतीत प्रणॉयनं चीनच्या वेंग हॉंग याँग याचा २१ - १९ , १३ - २१ , २१- १८ असा पराभव केला. पुरूष एकेरीचं विजेतपद पटकवणारा प्रणॉय हा पहिला भारतीय ठरला आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना काल पावसामुळे रद्द झाला, हा सामना आज होणार आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी क्रिकेट संकुलावर काल गुजरात टायटन्स आणि चेन्नइ सुपर किंग्ज दरम्यान हा सामना होणार होता. अहमदाबादमध्ये काल संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाली. आधी सामना उशीरा होणार असल्याचं जाहीर केलं होतं, मात्र पाऊस न थांबल्यानं सामना रद्द केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. आज याच ठिकाणी अंतिम सामना होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
उस्मानाबाद इथं काल दुपारी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. रोहिणी नक्षत्राच्या या पावसानं प्रचंड उष्णता सहन करणाऱ्या नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिऊर परिसरातही वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
हिंगोली शहरासह परिसरातही काल दुपारी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. विद्युत वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडल्यानं अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. अर्धा तास पडलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज जोरदार वारा आणि वीजांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्या��ा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या भागात आगामी तीन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
****
नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेससह, नांदेड - हजरत निजामुद्दीन मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस, या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या मार्गात, आज आणि उद्या दोन दिवस तात्पुरता बदल झाला आहे. जळगाव-मनमाड दरम्यान नांदगांव रेल्वे स्थानकावर रेल्वे मार्ग दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यामुळे या गाड्या हिंगोली, अकोला, भुसावळ मार्गे धावणार असल्याचं रेल्वे विभागान कळवलं आहे.
****
औरंगाबादमध्ये चिकलठाणा परिसरातल्या हिना नगर इथं काल आयुर्वेदिक आरोग्य शिबिर घेण्यात आलं. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाअंतर्गत चालणाऱ्या आयुष विभागाविषयी माहिती आणि यासंदर्भातल्या तपासण्यांविषयीची माहिती यावेळी देण्यात आली, तसंच अनेक प्रकारच्या रुग्णांसाठी मार्गदर्शन आणि औषधी देण्यात आल्या.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
भारतासाठी लोकशाही ही संस्कार, कल्पना आणि परंपरा यांचा संगम, संसदेच्या नव्या वास्तूच्या उद्घघाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.
लोकशाहीच्या नव्या मंदिरात सुवर्ण राजदंडाची पंतप्रधानांच्या हस्ते स्थापना, विविध धर्मगुरुंनी केली प्रार्थना.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त संसदेमध्ये पंतप्रधानांनी केलं अभिवादन, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली.
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचा किताब भारताच्या प्रणॉयनं पटकवला, अंतिम फेरीत चीनच्या वेंग हाँग यांग वर केली मात.
आणि
आयपीएलच्या विजेपदासाठी थोड्याच वेळात चेन्नई सुपर किंग्जची गुजरात टायटन्ससोबत लढत.
****
संसदेची नवी वास्तू केवळ इमारत नसून १४० कोटी भारतीयांच्या स्वप्न आणि आकांक्षांचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसदेच्या नवनिर्मित इमारतीचं आज पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या विकासात काही क्षण अमर झाले असून त्यात आजचा दिवस सामील झाला आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे आजचा दिवस देशाच्या इतिहासात शुभ दिवस आहे. कारण देशातील लोकांनी लोकशाहीला एक इमारत भेट दिली आहे. नव्या संसद भवनात सर्वधर्मीय प्रार्थनाही झाली. पंतप्रधान म्हणाले –
साथियों नये रास्तों पर चलकर ही नये प्रतिमान गडे जाते हैं। आज नया भारत नये लक्ष तय कर रहा है। नये रास्ते गड रहा हैं। नया जोश है। नया उमंग है। नया सफर है। नई सोच है। दिशा नई है। दृष्टी नई है। संकल्प नया है। विश्वास नया है।
****
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी जुन्या संसद भवनात फलकाचं अनावरण करून देशाच्या नवीन संसदेचं उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते त्यानंतर सुवर्ण राजदंड - सेंगोलची लोकसभा अध्यक्षांच्या आसनाशेजारी स्थापना करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे देखील उपस्थित होते. नवीन संसद भवनाच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या कामगारांचा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संसद भवनाची माहिती देणारी चित्रफित आणि संसद भवनात स्थापन करण्यात आलेल्या सेंगोलची माहिती असलेली चित्रफितही दाखवण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शुभेच्छा संदेशाचं यावेळी वाचन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ रुपयांचं नाणं आणि टपाल तिकिटही ��ारी केलं.
****
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अतिशय थाटामाटात आज पार पडला. मात्र, समारंभावर प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत उद्घाटन कार्यक्रमावरून केंद्र सरकारवर टीका केली. संसदेच्या उद्घाटनाचं आमंत्रण माझ्या हातात आलेलं नाही. कदाचित माझ्या दिल्लीतल्या निवासस्थानी ते गेलेलं असू शकेल, असं ते म्हणाले. एवढा मोठा कार्यक्रम घेताना सरकारनं विरोधकांशी कुठलीही चर्चा केली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनात सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. दिल्ली इथं महाराष्ट्र सदनातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली.
मुंबईत राजभवन इथही सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली.
मुंबई इथं मंत्रालयात राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राज्य पर्यटन विभागामार्फत ‘वीरभूमी परिक्रमा’ उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी सावरकर विचार जागरण सप्ताह हे अभियान राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय स्मारक पदयात्रेसह दिपोत्सवाचं आयोजनही मुंबईच्या सावरकर स्मारक इथं करण्यात आलं आहे. मुंबईत बोरीवली इथं राज्यपाल रमेश बैस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी केंद्रीय मंत्री आणि उतर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चित्र प्रदर्शनाचं उद्धघाटन करण्यात आलं. औरंगाबाद शहरात योगासन वर्ग, सावरकरांचा पोवाडा, माझी माझी जन्मठेप देशभक्तीर गीतं यांसह १४० दिव्यांचा दिपोत्सव आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.
****
धाराशिव शहरातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली. जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं जयोस्तु प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. तसंच यानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी गौरवण्यात आलं.
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात शिक्षण मंत्रालयानं सुरू केलेल्या युवासंगम या उपक्रमाचा उल्लेख करत यात सहभागी युवकांशी संवाद साधला.
आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाचा हा १०१वा भाग होता.
वेगवेगळ्या राज्यांत उच्चशिक्षण घेणाऱ्या संस्थांमधील विद्यार्थी दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन तिथली संस्कृती, राहणीमान यांचा अनुभव घेतात. युवा संगमच्या पहिल्या फेरीत बाराशे युवकांनी देशाच्या २२ राज्यांना भेटी दिल्या असल्याचं मोदी यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातल्या शिवाजी डोले यांनी सैन्यातून निवृत्त झाल्यावर कृषी पदविका घेऊन २० जणांचं पथक तयार करून वेंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या निष्क्रीय अशा सहकारी संस्थेचं पुनरूज्जीवन केलं. जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान या चारही सुत्रांचं शिवाजी डोले हे प्रतिबिंब असल्याचं मोदी म्हणाले. नाशिकच्या मालेगावमध्ये पथकाचे सदस्य ५०० एकर जमिनीत कृषी शेती करत असून त्यांनी लागवड केलेली द्राक्षं युरोपातही निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
न्यायमूर्ती रमेश धनुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी न्यायमूर्ती रमेश धनुका यांना पद आणि गोपनीयतेची शपध दिली. धनुका हे मुंबई उच्च न्यायालयाचे ४६ वे मुख्य न्यायाधीश आहेत. २६ मे रोजी केंद्र सरकारनं धनुका यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली होती. दरम्यान, धनुका हे ३० मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे केवळ तीन दिवसांचा कालावधी त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणून मिळणार आहे.
****
नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेससह, नांदेड - हजरत निजामुद्दीन मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या मार्गात उद्या आणि परवा असे दोन दिवस तात्पुरता बदल झाला आहे. जळगाव-मनमाड दरम्यान नांदगांव रेल्वे स्थानकावर घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे या गाड्या हिंगोली, अकोला, भुसावळ मार्गे धावणार असल्याचं विभागामार्फत कळवण्यात आलं आहे.
****
औरंगाबादच्या चिकलठाणा इथं आज आयुर्वेदिक आरोग्य शिबिर घेण्यात आलं. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत चालणाऱ्या आयुष विभागाविषयी माहिती आणि यासंदर्भातील तपासण्यांविषयीची माहिती देण्यात आली. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण परिसरातील महिला, पुरुष यांच्यासा��ी संपूर्ण शरीराची तपासणी स्कॅनिंग पद्धतीनं आरोग्य शिबिराच्या माध्यमातून यावेळी करण्यात आली. या आयुष आरोग्य शिबिरात विविध आजारांबाबत रुग्णांना मार्गदर्शन आणि औषधोपचारही करण्यात आले.
****
पालघर जिल्हा पोलिसांना चाइल्ड हेल्पलाइन या संस्थेच्या माध्यमातून एक बाल विवाह रोखण्यात यश आलं आहे. या शहरात बालविवाह होणार असल्याच्या गुप्त माहितीची खात्री करुन, होणारा बाल विवाह पोलिसांनी थांबवला. विवाह होत असलेल्या मुलाचं वय १९ तर मुलीचं अठरा वर्षापेक्षा कमी वय होतं. दरम्यान, महिला बालकल्याण समितीच्या आदेशानंतर अल्पवयीन मुलीला सामाजिक संस्थेत पाठविण्यात आलं असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत.
****
‘एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र’ ही राजमाता अहिल्यादेवींची प्रतिमा कायम राहावी, यासाठी सोलापूर विद्यापीठ परिसरात त्यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल. शासनानं ही मागणी मान्य केल्याची माहिती विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी आज सोलापूर इथं दिली. अहमदनगर शहराचं नाव बदलून लवकरच ‘अहिल्यानगर’ होईल, असंही ते म्हणाले. भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्ती वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते.
****
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा किताब भारताच्या एच.एस.प्रणॉय यानं जिंकला आहे. क्वालालंपूर इथं आज झालेल्या अंतिम लढतीत प्रणॉय यानं चीनच्या वेंग हाँग यांग याला २१-१९,१३-२१ आणि २१-१८ अशा फरकानं ९३ मिनिटं चाललेल्या या सामन्यात पराभूत केलं.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना सुरू होईल.
****
हवामान
धाराशिव इथं आज दुपारी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. रोहिणी नक्षत्राच्या या पावसानं प्रचंड उष्णता सहन करणाऱ्या नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊर परिसरातही वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
नवीन संसद भवन म्हणजे भारताच्या लोकशाहीचे मंदिर, आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाचा साक्षी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं. या संसद भवनातून देशाच्या नव्या संकल्पाचे दर्शन जगाला होणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
नवीन संसद भवनाचा दुसऱ्या टप्प्यातील उद्घाटन सोहळा सर्व राज्यातील खासदार आणि आमदार तसंच केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत संसद भवनात पार पडला. या सोहळ्याची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली, त्यानंतर संसद भवनाची माहिती देणारी चित्रफित आणि संसद भवनात स्थापन करण्यात आलेल्या सेंगोलची माहिती असलेली चित्रफितही यावेळी दाखवण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शुभेच्छा संदेशांचं यावेळी वाचन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ रुपयांचे नाणे आणि टपाल तिकिट यावेळी जारी केलं. तसंच सर्व उपस्थित मान्यवरांना संबोधित केले.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवीन संसद भवनात फलकाचे अनावरण करून देशाच्या नवीन संसदेचं उद्घाटन केलं. पंतप्रधानांनी संसद भवनात प्रवेश करून सर्वप्रथम महात्मा गांधींजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत सेंगोलची स्थापना केली. नवीन संसद भवनाच्या बांधकामात सहभागी झालेल्या कामगारांचा मोदी यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात आयोजित सर्व धर्म प्रार्थना सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय कॅबिनेट मंत्री अमित शहा, डॉ जितेंद्र सिंह, राजनाथ सिंह, अश्विनी वैष्णव, अनुराग सिंह ठाकूर, डॉ. मनसुख मांडविया, प्रल्हाद जोशी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा सहभागी झाले होते.
***
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त ��ंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनात सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. दिल्ली इथं महाराष्ट्र सदनातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली.
***
आजच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण मंत्रालयानं सुरू केलेल्या युवासंगम या उपक्रमाचा उल्लेख करत यात सहभागी युवकांशी संवाद साधला. वेगवेगळ्या राज्यात उच्चशिक्षण घेणाऱ्या संस्थांमधील विद्यार्थी दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन तेथील संस्कृती, राहणीमान यांचा अनुभव घेतात. युवा संगमच्या पहिल्या फेरीत १२०० युवकांनी देशाच्या २२ राज्यांना भेटी दिल्या असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारतीय स्मृती प्रकल्प या ऑनलाईन संग्रहालयाला भेट देऊन जगभरातून पाठवण्यात आलेली छायाचित्रं आणि कथांच्या माध्यमातून भारताचा गौरवशाली इतिहास पहावा. तसंच या संग्रहालयांना प्रत्यक्ष भेट देण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी नागरिकांना केलं. जलकुंभी या जलस्त्रोतांसाठी समस्या असलेल्या वनस्पतीपासून कागद तयार करणाऱ्या कुंभी कागज या स्टार्टअपचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातल्या शिवाजी डोले यांनी सैन्यातून निवृत्त झाल्यावर कृषी पदविका घेऊन २० जणांचे पथक तयार करून वेंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या निष्क्रीय सहकारी संस्थेचं पुनरूज्जीवन केलं. जय जवान जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान या चारहींचे शिवाजी डोले हे प्रतिबिंब असल्याचं मोदी म्हणाले. नाशिकच्या मालेगावमध्ये पथकाचे सदस्य ५०० एकर जमिनीत कृषी शेती करत असून त्यांनी लागवड केलेली द्राक्षं युरोपातही निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी अभिवादन केलं. तसंच चार जूनला संत कबीरदास यांच्या जयंतीनिमित्त संत कबीरदास यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजाला मजबूत करण्याचे प्रयत्न वाढवले पाहिजे असं मत व्यक्त केलं.
***
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत उद्घाटन कार्यक्रमावरून केंद्र सरकारवर टिका केली. संसदेच्या उद्घाटनाचं आमंत्रण माझ्या हातात आलेलं नाही. कदाचित माझ्या दिल्लीतल्या निवासस्थानी ते गेलेलं असू शकेल. एवढा मोठा कार्यक्रम घेताना सरकारनं विरोधकांशी कुठलीही चर्चा केली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. हा कार्यक्रम मर्यादित घटकांसाठीच होता असे दिसत होते, असेही ते यावेळी म्हणाले.
***
न्यायमूर्ती रमेश धनुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी न्यायमूर्ती रमेश धनुका यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. धनुका हे मुंबई उच्च न्यायालयाचे ४६ वे मुख्य न्यायाधीश आहेत. २६ मे रोजी केंद्र सरकारने धनुका यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली होती. दरम्यान, धनुका हे ३० मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे केवळ तीन दिवसांचा कालावधी त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणून मिळणार आहे.
***
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल.
//***********//
0 notes