#इम्रान
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 8 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 14 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या सत्तावन्न लोकसभा जागांसाठी येत्या एक जूनला मतदान होणार आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून अर्ज भरण्याची मोदी यांची ही सलग तिसरी वेळ आहे. अर्ज दाखल करण्याआधी पंतप्रधानांनी वाराणसीतल्या काल भैरव मंदिरात पूजा केली.
****
येत्या वीस तारखेला मतदान होणार असलेल्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचारानं वेग घेतला असून सगळ्या पक्षांचे दिग्गज नेते प्रचार सभा आणि प्रचार फे-या याद्वारे मतदारांशी संवाद साधत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत इथे जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे सुद्धा येत्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यात जाहीर सभा घेणार आहेत.
नाशिकमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे यांच्या सभांचं तर महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार इम्रान प्रताप गडी यांच्या सभांचं नियोजन केलं जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबा�� लोकसभा मतदारसंघात काल पार पडलेल्या मतदानात त्रेसष्ट पूर्णांक सात शतांश टक्के मतदान झालं असून,यात समाविष्ट असलेल्या कन्नड विधानभा मतदरसंघात ६६ पूर्णांक अठ्ठ्याहत्तर,औरंगाबाद मध्य साठ पूर्णांक चाळीस, औरंगाबाद पश्चिम साठ पूर्णांक अडोतीस, औरंगाबाद पूर्व पासष्ट पूर्णांक चव्वेचाळीस गंगापूर चौसष्ट पूर्णांक ऐंशी तर वैजापूर विधानसभा मतदार संघात त्रेसष्ट पूर्णांक सात शतांश टक्के मतदान झालं आहे.
****
दरम्यान,काल तेरा मे ला पार पडलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतदानानंतर मतदान यंत्रं स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्याची प्रक्रिया पोलीस बंदोबस्तात पूर्ण झाली आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातही काल मतदान पार पडलं. या मतदारसंघातली सगळी  मतदान यंत्रं जालना औद्योगिक वसाहतीमधल्या सरस्वती ऍटो कंपोनंट्स या ठिकाणी जमा करण्यात येत आहेत. येत्या चार जून रोजी या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या पैठण विधानसभा मतदार संघातली मतदान यंत्रं येणं बाकी असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली आहे.
****
मुंबईत घाटकोपर परिसरात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटना स्थळी सध्या बचाव कार्य सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल,पोलिस दल,केंद्रीय राखीव पोलिस दल आणि अग्नीशमन दलाचे जवान यात सहभागी झाले आहेत. कोसळलेल्या जाहिरात फलकाच्या खाली अजूनही अनेक गाड्या अडकलेल्या आहेत. त्यामुळे मृत आणि जखमींची  संख्या आणखी वाढण्याची शक्यता बचाव कार्य करणा-या जवानांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत घाटकोपर इथे काल  वादळी वा-यामुळे झालेल्या या अपघातातल्या मृतांचा आकडा चौदावर गेला आहे.या दुर्घटनेत पंचाहत्तर जण जखमी झाले असून त्यातला एक जण गंभीर आहे.या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देणार असल्याची, तसंच,जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.या दुर्घटनेतल्या दोषी व्यक्तिंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
****
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्यानं त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, महापराक्रमी धर्मवीर स्वराज्यरक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा, अशा शब्दात आदरांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका ट्विट संदेशातून छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली असून, मुघल साम्राज्याला हादरवून सोडणारे धुरंदर राजकारणी, प्रकांड ��ंडित, कुशल संघटक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, परमप्रतापी शंभूराजे यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा, अशा शब्दात त्यांना आदरांजली वाहिली आहे.
****
येत्या १७ ते १९ मे या कालावधीत छत्रपती संभाजीनगर इथे जिगिषा नाट्यसहवास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मिलिंद सफई स्मृती पुरास्काराचं वितरणही करण्यात येणार आहे. या पुरस्काराचं हे पहिलं वर्ष असून, लेखक-दिग्दर्शक-अभिनेता धनंजय सरदेशपांडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
0 notes
imranjalna · 9 months ago
Text
हेलिकॉप्टर पायलट इम्रान गौरी यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, हेलिकॉप्टर परत सुरु करून हेलिकॉप्टर छत्रपती संभाजीनगर कडे रवाना.. Due to the vigilance of helicopter pilot Imran Gowri, a major disaster was averted A helicopter has made an emergency landing at Tupewadi Shivara in Badnapur taluka of Jalna district. जालना: जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी शिवारात एका हेलिकॉप्टरची अचानक इमर्जन्सी लँडिंग करण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 year ago
Text
एक कोटी गुंतवून मोठा परतावा देण्याचे आमिष, पुण्यात हॉटेलचालकाची एक कोटींना फसवणूक
म. टा. प्रतिनिधी, पुणे: लष्कर भागातील एका प्रसिद्ध उपाहारगृहचालकाची गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटी रुपयांची फसवणूक क��ल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी ति���ांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अब्दुल हेसून नईमाबादी (रा. लष्कर), शोएब मैनुद्दीन अत्तार (रा. बोपोडी), इम्रान लतीफ खान (रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी मुख्तार हुसेन महंमद (वय ४४, रा. घोरपडी)…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
पाकिस्तान: इम्रान खानच्या अडचणीत वाढ, डिप्लोमॅटिक डॉक्युमेंट लीक प्रकरणात 14 दिवसांची कोठडी
https://bharatlive.news/?p=150124 पाकिस्तान: इम्रान खानच्या अडचणीत वाढ, डिप्लोमॅटिक डॉक्युमेंट लीक ...
0 notes
loksutra · 2 years ago
Text
'जवान'पूर्वी शाहरुख खानने 'टायगर 3'साठी काढला वेळ, तो आजपासून सुरू करणार सलमान खानच्या चित्रपटाच्या शूटिंगला
‘जवान’पूर्वी शाहरुख खानने ‘टायगर 3’साठी काढला वेळ, तो आजपासून सुरू करणार सलमान खानच्या चित्रपटाच्या शूटिंगला
‘जवान’पूर्वी शाहरुख खानने ‘टायगर 3’साठी काढला वेळ, तो आजपासून सलमान खानच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार खान चित्रपटाचे शूटिंग ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
इम्रान खान म्हणतात, पाकिस्तान "बनाना रिपब्लिक" मध्ये उतरत आहे
इम्रान खान म्हणतात, पाकिस्तान “बनाना रिपब्लिक” मध्ये उतरत आहे
इम्रान खानने शाहबाज गिलला पुन्हा पोलिस कोठडीत पाठवल्याबद्दल चिंता व्यक्त केली. इस्लामाबाद: पाकिस्तान “केळी प्रजासत्ताकात उतरत आहे”, माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते शाहबाज गिल यांच्या अटकेच्या वादात म्हटले आहे, जे पीटीआय प्रमुख दावा करतात की त्यांना लक्ष्य करण्याचा कट आहे. त्याचा पक्ष. देशाच्या माध्यम प्राधिकरणाने “अत्यंत द्वेषपूर्ण आणि देशद्रोही”…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
इम्रान भाईचा माझ्याशी संपर्क तुटला, आम्ही बरेच दिवस बोललो नाही: पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा
इम्रान भाईचा माझ्याशी संपर्क तुटला, आम्ही बरेच दिवस बोललो नाही: पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा
रमीझ राजा: पाकिस्तानचा माजी खेळाडू रमिझ राजाने इम्रान खानबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. रमीझ राजाने सांगितले की, पाकिस्तानच्या माजी कर्णधारासोबत बरेच दिवस चर्चा होत नाही. असे ते म्हणाले इम्रान खान बराच काळ त्यांच्याशी चर्चा न करण्याबरोबरच ते सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याही संपर्कात नाहीत. आता रमीज राजा यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानी मीडियामध्ये सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 07 November 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
हमाससोबतचे युद्ध संपल्यानंतर इस्रायल, गाझा पट्टीतील सुरक्षेची जबाबदारी अनिश्चित काळासाठी घेईल, असं इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. बंधकांची सुटका किंवा मदत वितरणास परवानगी देण्यासाठी आपण गाझामधील लढाईला थोडा विराम देऊ शकतो, मात्र पूर्णतः युद्धविरामाबद्दल त्यांनी नकार दर्शविल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यात काल पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप मापन तथा अनुसंधान केंद्र सुरखेत इथं या भूकंपाची तीव्रता ५ पूर्णांक ८ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. काल दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास हे धक्के जाणवले, त्याचा केंद्रबिंदू रामिदंडा इथं होता. दरम्यान, गेल्या शुक्रवारी नेपाळ इथं झालेल्या भूकंपात १६ हजार ५७० घरं जमीनदोस्त होऊन जीवीतहानी झाली होती. त्यानंतर अनेकदा नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
****
काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. वीर जवान नागरिकांचं रक्षण करुन देशाची सुरक्षा सांभाळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काश्मीरात जवानांना प्रेरणा देत राहतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.
****
इसिसच्या दहशतवाद्यांनी पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता. त्यासाठी या दहशतवाद्यांना सिरीयामधून सूचना मिळत होत्या, असं राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या चौकशीतून स्पष्ट झालं आहे. एनआयएनं गेल्या आठवड्यात इसिसचा दहशतवादी मोहम्मद शाहनवाज याला ताब्यात घेतलं असून पुण्यात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात गेल्या १९ जुलै रोजी मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी आणि शाहनवाझ आलमला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र, शाहनवाझ कोंढवा परिसरातून पळून गेला होता. दहशतवादी पकडल्याबद्दल एनआयनं पुणे पोलिसांचं कौतुक करणारं पत्र पाठवलं असून या पत्रात तपासात उघड झालेल्या घातपातच्या कटाची माहिती देण्यात आली आहे.
****
येत्या १४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीमध्ये होत असलेल्या कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर शहरात महाराष्ट्रासह अन्य राज्यातून मोठ्या संख्येनं येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, त्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समिती तसंच सामाजिक दायित्व योजनेतून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
दर्शन रांगेत ठिकठिकाणी भाविकांना विसावा घेण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्या, अशा सूचना मंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या.
****
रायगड जिल्ह्यात कर्जत - नेरळ मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पत्रकार धर्मांनंद गायकवाड आपल्या सहकाऱ्यांसह कर्जतहून नेरळकडे जात होते. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं ती किरवली पुलाजवळ थेट पनवेल - कर्जत रेल्वे मार्गावर कोसळली. त्याच वेळी येणाऱ्या मालगाडीनं चारचाकीला जोराची धडक दिली. त्यात धर्मांनंद गायकवाड यांच्यासह चारचाकीमधील तिघे जागीच ठार झाले असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
दिवंगत साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीनं उद्या ८ तारखेपासून १४ नोव्हेंबरपर्यंत 'पु. ल. कला महोत्सव २०२३' चं आयोजन करण्यात आलं आहे. रसिकांना या महोत्सवात साहित्य, गायन, वादन, नृत्य, नाट्य अशा विविध कला प्रकारांवर आधारित विविध कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात कुष्ठरोग शोध आणि सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम २० नोव्हेंबर ते सहा डिसेबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी एक हजार २०३ पथकं तयार करण्यात आली असून, लक्षणं आढळल्यास संशयित कुष्ठ रुग्णांची त्वरीत वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.  
****
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या संघात मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Photo
Tumblr media
पाकिस्तानचे तोंड काळेच झाले, अजून किती धोंडे पाडून घेणार? – शिवसेना काश्मीरला विशेष अधिकार देणारे 370 कलम रद्द करण्यात आले पाकिस्तानचा तिळपापड झाला. यानंतर काश्मीर प्रश्नात लक्ष घालण्याचा अधिकारच नसल्याचं सांगितल्यानं संयुक्त राष्ट्रांनी चीन आणि पाकिस्तानला तोंडघशी पाडलं आहे.
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
इम्रान खान, शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानातील अंतहीन राजकीय थरार
https://bharatlive.news/?p=119144 इम्रान खान, शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानातील अंतहीन राजकीय थरार
मागील ...
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
पाकिस्तानातील राजकीय भूकंप...
पाकिस्तानातील राजकीय भूकंप…
इम्रान खान हे कधी सरकारविरोधी आंदोलनांची हाक  देतात याकडे समस्त पाकिस्तानी जनता  डोळ्यात तेल घालून लक्ष देत असताना , इम्रान खान यांनी मी ऑक्टोबर महिन्यातच आंदोलन सुरु करेल असे जाहीर केले असताना शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी  एका नाट्यमय घडामोडीत पाकिस्तानी निवडणूक आयोगातर्फे , इम्रान खान याना ५  वर्षासाठी राजकीय पद  भूषवण्यास  मनाई करणारा निर्णय जाहीर करण्यात आला . पाकिस्तानी संविधानाच्या कलम ६३ च्या …
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
ईद अल अधा २०२२ संजय दत्तला माधुरी दीक्षित आणि इमरान हाश्मी यांनी ट्विटरवर चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या
ईद अल अधा २०२२ संजय दत्तला माधुरी दीक्षित आणि इमरान हाश्मी यांनी ट्विटरवर चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या
ईद-उल-अधा 2022: आज ‘ईद-उल-अधा (ईद-उल-अधा 2022)’ हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे, सामान्य भाषेत याला बकरीद म्हणतात. ईद-उल-अजहा हा इस्लाम धर्माचा दुसरा सर्वात मोठा सण मानला जातो. या सणानिमित्त लोक आपले कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा संदेश पाठवत आहेत. बॉलिवूड स्टार्सनीही त्यांच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय दत्त ते स्वरा भास्कर, इमरान हाश्मी आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
इम्रान ताहिरने क्रिस्टियानो रोनाल्डोच्या 'सियु' सेलिब्रेशनसह विकेटचे सेलिब्रेशन केले. पहा | क्रिकेट बातम्या
इम्रान ताहिरने क्रिस्टियानो रोनाल्डोच्या ‘सियु’ सेलिब्रेशनसह विकेटचे सेलिब्रेशन केले. पहा | क्रिकेट बातम्या
विकेट घेतल्यानंतर इम्रान ताहिरने ख्रिस्��ियानो रोनाल्डोचे ‘सियु’ सेलिब्रेशन केले.© ट्विटर दक्षिण आफ्रिकेचा 43 वर्षीय गोलंदाज इम्राम ताहिरसाठी वय हा महत्त्वाचा घटक वाटत नाही. लेग-स्पिनरने आतापर्यंतच्या त्याच्या शानदार क्रिकेट कारकिर्दीत बरेच काही साध्य केले असले तरी, प्रत्येक खेळात चांगली कामगिरी करण्याचा त्याचा आवेश अजूनही कायम आहे. ताहिरच्या अनेक प्रभावी गोष्टींपैकी एक विकेट घेतल्यानंतर त्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
उमर अकमल पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात, माजी प्रशिक्षक मिकी आर्थर आणि वकार युनूसवर केले गंभीर आरोप
उमर अकमल पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात, माजी प्रशिक्षक मिकी आर्थर आणि वकार युनूसवर केले गंभीर आरोप
वादग्रस्त पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उमर अकमलने पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक मिकी आर्थर आणि वकार युनूस यांच्यावर निशाणा साधला. उमर अकमल म्हणतो की, या दोघांमुळे त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द उद्ध्वस्त झाली. उमर अकमलला 2019 पासून पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. उमर अकमलने आपल्या कारकिर्दीची शानदार सुरुवात केली आणि…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Photo
Tumblr media
अभिनेता इम्रान खानला पाकिस्तानचे PM समजून केला होता मेल, मिळालं होतं भन्नाट उत्तर मुंबई- आमिर खानचा भाचा इम्रान खानने 'जाने तू या जाने ना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता त्याने अभिनेता म्हणून यापुढे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
श्रीरामपूर चर्चेतच..मुल्ला कटर प्रकरणात आणखी एक पोलीस कर्मचारी निलंबित
श्रीरामपूर चर्चेतच..मुल्ला कटर प्रकरणात आणखी एक पोलीस कर्मचारी निलंबित
नगर जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीचे धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला मुल्ला कटर उर्फ इम्रान कुरेशी याला गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी आणखी एका पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याआधी देखील याच प्रकरणात दोन व्यक्तींचे निलंबन करण्यात आल्यानंतर मुल्ला कट्टर याला मदत केल्याप्रकरणी आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले…
Tumblr media
View On WordPress
0 notes