#इंधनामुळे
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
गाडीचं इंजिन पाऊस किंवा भेसळयुक्त इंधनामुळे खराब झालं तरी मारुती सुझुकी करणार दुरुस्त, वाचा काय आहे योजना
गाडीचं इंजिन पाऊस किंवा भेसळयुक्त इंधनामुळे खराब झालं तरी मारुती सुझुकी करणार दुरुस्त, वाचा काय आहे योजना
गाडीचं इंजिन पाऊस किंवा भेसळयुक्त इंधनामुळे खराब झालं तरी मारुती सुझुकी करणार दुरुस्त, वाचा काय आहे योजना मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन इंजिन संरक्षण योजना आणली आहे. या योजनेंतर्गंत ग्राहकांच्या गाड्यांना अतिशय कमी किमतीत इंजिन संरक्षण दिले जाईल. भेसळयुक्त इंधनामुळे इंजिन बंद पडण्याची परिस्थिती लक्षात घेऊन ही योजना आणली आहे. मारुती सुझुकीने हे ग्राहक सुविधा पॅकेज म्हणजेच CCP…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 January 2020 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०७ जानेवारी २०२० दुपारी **** नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचं मतदान आज सुरू आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी नऊ टक्के मतदान झालं आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या छप्पन्न आणि सहा पंचायत समितीच्या एकशे बारा जागांसाठीही आज सकाळी मतदानाला सुरवात झाली आहे. मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचं चित्र पहायला मिळत आहे. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत सुमारे पंचवीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे. वाशीम इथं जिल्हा परिषदेच्या बावन्न गटात आणि सहा पंचायत समितींच्या एकशे चार जागांसाठी मतदान सुरू आहे. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत सरासरी सुमारे सोळा टक्के मतदान झालं आहे. पालघर जिल्ह्यात आज जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितींसाठी मतदान होत आहे. सकाळी सर्वत्र मतदानाला वेळत सुरूवात झाली. सकाळी साडे नऊ ते साडे अकरा वाजेदरम्यान सुमारे वीस टक्के मतदानाची इथं नोंद झाली आहे. अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानालाही आज सकाळी सुरूवात झाली. जिल्हा परिषदेच्या त्रेपन्न गटासाठी दोनशे सत्त्याहत्तर आणि पंचायत समितीच्या एकशे सहा जागांसाठी चारशे ब्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत. निकाल उद्या जाहीर होणार आहेत. **** लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्याच्या संसदेच्या निर्णयाला अनुमोदन देण्यासाठी राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन उद्या बोलावण्यात आलं आहे. अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काल कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. नव्या वर्षातलं हे पहिलंच अधिवेशन असल्यानं राज्यपालांचं अभिभाषण होणार असून, ते दोन्ही सभागृहामध्ये पटलावर ठेवलं जाईल. विधान परिषदेचे सदस्य धनंजय मुंडे यांची विधानसभेवर निवड झाल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १४ जानेवारी असून, १७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. आवश्यक ठरल्यास २४ जानेवारीला मतदान होणार आहे. **** कर्मचारी संघटनांच्या उद्याच्या प्रस्तावित संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा सरकारनं दिला असून त्याबाबतचं परिपत्रक काल जारी केलं आहे. सार्वजनिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावरच्या कामगार, कर्मचाऱ्यांनी उद्या आठ जानेवारी रोजी संपाचा इशारा दिला आहे. नागरी सेवा नियमातल्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना संप करायला प्रतिबंध असल्याचं या परिपत्रकात म्हटलं आहे. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा आणि योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असं आवाहनही सरकारनं केलं आहे. **** इथेनॉल पासून ५० हजार कोटी रुपयांचा अर्थव्यवहार निर्माण करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे, असं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. पर्यावरणपूरक इंधनामुळे पर्यावण आणि अर्थव्यवस्था दोघांना फायदा होतो, असं ते म्हणाले. गेली अनेक वर्षं इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यासंदर्भात विचार सुरु होता, पण आम्ही खऱ्या अर्थान��� त्याची अंमलबजावणी करायचं ठरवलं आहे, असं त्यांनी सांगितलं. सर्वच तेल कंपन्या पर्यावरणपूरक इंधनाचा विचार करू लागल्या आहेत, हे एक सकारात्मक पाऊल आहे, त्यामुळे कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी होईल, असंही गडकरी म्हणाले. **** पालघर जिल्ह्यातल्या मुंब्रा इथल्या शिलफाटा भागात आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत बारा गोदामं जळून खाक झाली. अग्नीशमन दलानं पाच तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. **** दक्षिण काश्मिरच्या अवंतीपोरा भागात आज सुरक्षा दलानं एका स्थानिक दहशतवाद्याला ठार केलं. शोध मोहीमेवर असलेल्या सुरक्षा दलावर त्यानं हल्ला केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलातील सुत्रांनी दिली. **** केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीनं गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या स्वच्छता दर्पण स्पर्धेत देशात कोल्हापूर जिल्ह्याचा पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये समावेश झाला आहे. कोल्हापूर जिल्हा या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे. येत्या बारा जानेवारी रोजी नवी दिल्ली इथं बक्षिस वितरण संमारंभ होणार आहे. **** भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज इंदौर इथल्या होळकर स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरु होईल. गुवाहाटी इथला मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दुखापतीमुळे काही काळ संघाबाहेर असलेले जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांचं संघात पुनरागमन झालं आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 8 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 April 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा. *****
जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर लोकसभा मतदारसंघ आणि राज्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मध्यरात्रीपासून या मतदासंघांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीनगरमध्ये मतदानावेळी दगडफेकीची घटना घडली असून, यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान, कर्नाटक आणि झारखंड या राज्यातही काही विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या सर्व जागांसाठी मतमोजणी १३ एप्रिलला होणार आहे. **** काश्मीरचा प्रश्न सोडवणं देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असून प्रत्येकानं त्यात आपलं योगदान देणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. मुंबई इथं हिंदी विवेकच्या काश्मीर विशेषांकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दगडफेकीच्या घटनांना पाकिस्तानची फूस असून, पाकिस्ताननं आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत, तर भारत चोख प्रत्युत्तर द्यायला समर्थ आहे, असं ते म्हणाले.   **** २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रमात खासगी बांधकाम व्यावसायिकांना सहभागी करुन घेण्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. या योजनेला गती देण्यासाठी खासगी बांधकाम व्यवसायिकांचा सहभाग आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. स्थावर मालमत्ता विकासकांच्या क्रेडाई आणि नार्डेको या संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला ��पस्थित होते. पंतप्रधान आवास योजनेखालील अटींमुळे लहान शहरांमध्ये गृहबांधणी प्रकल्प उभारण्यात अडचणी येत असल्याचं या संघटनांनी सांगितलं. **** ठाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांचे आज पहाटे नेरूळ इथं त्यांच्या राहत्या घरी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं, ते ४८ वर्षांचे होते. प्रशासकीय वर्तुळात लोकप्रिय अधिकारी अशी प्रतिमा असलेले शिंदे यांनी नाशिक येथून उप जिल्हाधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले, माजी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. औद्योगिक विकास महामंडळ, म्हाडा, आदी ठिकाणी महत्त्वाची पदं सांभाळल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच ठाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. **** जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज सर्वत्र भक्तीभावानं साजरी होत आहे. औरंगाबाद इथं राजाबाजार परिसरातून आज सकाळपासून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. भगवान महावीरांच्या जीवनातले विविध प्रसंग दाखवणाऱ्या सजीव देखाव्यांसह पाणी वाचवा, झाडे वाचवा, आदी संदेश देणाऱ्या चित्ररथांसह जैन समाज बांधव मोठ्या संख्येनं या शोभायात्रेत सहभागी झाले आहेत. **** आगामी काळात पर्यावरणपूरक इंधन निर्मितीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. पुणे इथं डी वाय पाटील विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. पर्यावरणपूरक इंधनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे दरही निम्म्यापर्यंत येतील,असं ते म्हणाले. **** वाहनांमध्ये बीएस सहा यंत्रणा बदलण्याची एक एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण करण्यासाठी ही प्रक्रिया २०१९ पासून सुरू करण्याच्या आदेशाचं पालन अशक्य असल्याचं वाहन निर्मिती कंपन्यांच्या मालकांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे. लोकांना डिझेल वाहनं घेण्यापासून केंद्र सरकारला परावृत्त करायचं असेल, तर त्यांनी पेट्रोल आणि डिझेल गाड्यांच्या किंमती एकसमान कराव्यात, असा युक्तीवाद वाहन कंपन्यांच्या वकिलांनी केला आहे. यावर न्यायालयानं केंद्र सरकारचे महान्यायअभिकर्ता रणजीत कुमार यांच्याकडे विचारणा केली आहे. यावरील पुढील सुनावणी एक मे ला होणार आहे. **** राज्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याबद्दल राज्य लोकलेखा समितीनं नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भातला अहवाल समितीनं नुकताच सादर केला. राज्यात शहरी भागात ४५ टक्क्यांच्या वर लोकसंख्या असून सुद्धा २०१४ पर्यंत बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या नेमणुकाच झाल्या नाहीत, असं या समितीनं म्हटलं आहे. राज्यात दहा वर्षांखालील ३७८ मुलींचे तर १४ वर्षांखालील ६२७ मुलींचे विवाह झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आली. **** औरंगाबाद इथं विदेशी मद्यासह नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली. मोसंब्याच्या खोक्यांमधून ही दारू ट्रकमध्ये भरून शहरात आणली जात होती. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे. ****
0 notes