#आझाद समाज पक्ष
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं शपथग्रहण-एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ • विधानसभेचं उद्यापासून तीन दिवसीय विशेष अधिवेशन-९ डिसेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक • बीड इथं अकरा वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणात १४ जण दोषी, तर पैठण इथल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी मारेकऱ्यास तिहेरी जन्मठेप आणि • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबई महापालिका सज्ज
राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काल शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत आझाद मैदानावर झालेल्या या शपथग्रहण सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले इतर सदस्य, भाजप आणि मित्रपक्षांचे विविध राज्यांचे मुख्यमंत्री, विविध राजकीय पक्षांचे नेते, अंबानी कुटुंबीयांसह अनेक उद्योजक, अभिनेत्री माधुरी दीक्षितसह सिनेसृष्टीतले कलावंत, आणि क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक क्षेत्रातले मान्यवर या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित होते. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी यावेळी फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली… “भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची काल तिसऱ्यांदा शपथ घेतली. फडणवीस यांनी यापूर्वी २०१४-१९ अशी मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. २०१४ मध्ये वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे फडणवीस हे शरद पवार यांच्यानंतर दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते. कालच्या शपथग्रहण सोहळ्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार विक्रमी सहाव्यावेळी उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तर, मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतरचे दुसरे नेते ठरले आहेत. गेल्या महिन्यात झालेली विधानसभेची ही निवडणूक भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्रितपणे महायुती म्हणून लढवली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतच्या सर्वाधिक अशा १३२ जागा मिळाल्या. शिवसेनेला ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला. नव्या विधानसभेत सत्ताधारी महायुतीकडे जनसुराज्य पक्ष, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि काही अपक्ष यांचा पाठिंबा मिळून २३६ पेक्षाही अधिक जागांचं संख्याबळ आहे.’’ दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथग्रहणानंतर नागपूर, परभणी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि रत्नागिरीसह राज्यभरात महायुतीतल्या घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून तसंच मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या संचिकेवर केली. या माध्यमातून पुणे इथले रुग्ण चंद्रकांत कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी, लाडकी बहीण ही योजना आपलं सरकार सुरूच ठेवणार असून, या योजनेत महिलांना आता दरमहा २१०० रुपये देणार असल्याचं मूद केलं. दरम्यान, नवनिर्वाचित आमदारांच्या विधानसभा सदस्यत्वाचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी उद्यापासून विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे. सात, आठ आणि नऊ तारखेला आमदारांचा शपथविधी होणार असून, नऊ तारखेला अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत एकत्रित काम करणार असल्याचं सांगितलं. महायुतीत आलो तेव्हा शिवसेनेचे ४० आमदार होते, ते आता ६० झाले आहेत, ही आपल्या कामाची पोचपावती आहे, असं सांगत याचा अभिमान आणि समाधान असल्याचं ते म्हणाले. गेल्या अडीच वर्षात आम्ही जनतेसाठी काम केलं, त्यामुळेच या निवडणूकीत ऐतिहासिक बहुमत मिळालं असं शिंदे यांनी नमूद केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत अष्टलक्ष्मी महोत��सवाचं उद्घाटन करणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ईशान्येकडील आठही राज्यांची संस्कृती, वस्त्रोद्योग, हस्तकला, पर्यटन स्थळे आणि अद्वितीय उत्पादनं दाखवण्यात येणार आहेत.
रिझर्व्ह बँकेचं वित्त धोरण आज जाहीर होणार आहे. बँकेनं फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नसून, तो सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर स्थिर आहे.
बीड शहरातल्या बालेपीर भागात अकरा वर्षांपूर्वी खंडणीच्यावरून झालेल्या हत्या प्रकरणात तब्बल पाच वर्षानंतर काल विशेष मोक्का न्यायालयाने १४ जणांना दोषी ठरवलं. शिक्षेची सुनावणी सोमवारी होईल अशी शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दोषी अक्षय जाधव याला तिहेरी जन्मठेपेसह एकूण ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पाच वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबईत चैत्यभूमीवर महापालिकेने पायाभूत सुविधा केल्या आहेत. पालिकेकडून नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालये आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चैत्यभूमी परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वार परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला नागरिकांनी अभिवादन करण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
छाया-प्रकाश फाऊंडेशनचे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. अभिनेते भरत दाभोळकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अभिनेते किशोर कदम आणि युवा चित्रकार सिद्धार्थ शिंगाडे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या २१ डिसेंबरला हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. एक लाख रूपये रोख आणि मानपत्र असं पुरस्कारांचं स्वरूप आहे. याच कार्यक्रमात दोन शिक्षकांचा गौरव केला जाणार असून, २९ गुणवान विद्यार्थ्यांना ८ लाख रुपये रकमेची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती अजित शहा यांनी ही माहिती दिली.
सिंगापूर इथं सुरु असलेल्या, यंदाच्या फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत, भारताच्या डी. गुकेश आणि चीनच्या डिंग लेरेन य���ंच्यातली आठवी फेरीही अनिर्णित राहिली. दोघांनाही प्रत्येकी ४ गुण मिळाले असून त्यांच्यातील अनिर्णित राहिलेली ही सलग पाचवी फेरी आहे. या स्पर्धेचं अजिंक्यपद जिंकण्यासाठी दोघांनाही प्रत्येकी ३ पूर्णांक ५ दशांश गुणांची आवश्यकता आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आजपासून ॲडलेड इथं खेळला जाणार आहे. पहिला सामना जिंकून भारत मालिकेत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
महिला क्रिकेटमधे, ब्रिस्बेन इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा संघ ३५ व्या षटकातच १०० धावा करुन सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियानं सतराव्या षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पार केली. भारतातर्फे रेणुका सिंहनं तीन तर प्रिया मिश्रानं दोन गडी बाद केले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे चार विद्यार्थी युरोप खंडातील एस्टोनिया या शहरात होणाऱ्या जागतिक रोबोटिक स्पर्धेकरिता रवाना झाले. मनपा पदाधिकाऱ्यांनी या चमूला शुभेच्छा दिल्या.
जालना शहर महानगरपालिकेच्या अधिकृत परवानगीशिवाय शहरात बेकायदेशीररित्या होर्डिंग आणि फलक लावणाऱ्या २२ आस्थापनांवर महापालिका प्रशासनानं गुन्हे दाखल केले आहेत. तसेच महापालिकेच्या पथकानं अनेक ठिकाणचे अनधिकृत फलकही जप्त केले आहेत. बेकायदेशीर लावलेले होर्डिंग, बॅनर जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईलं, असं महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितलं.
परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं उद्घाटन काल अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या हस्ते झालं. या महोत्सवात काल विविध स्पर्धा घेण्यात आल्या, तसंच युवकांनी सोशल मीडियाचा वापर कसा करावा, त्याचे होणारे चांगले वाईट परिणाम, यासंदर्भात माहिती देण्यात आली.
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यातल्या एका पोलीस जमादाराला पाच हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल रंगेहात पकडलं. एका तक्रारदाराविरुद्ध आलेला तक्रार अर्ज कारवाई न करता निकाली काढण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
हवामान येत्या दोन दिवसात, राज्याच्या बहुतांश भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ��त्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात आज पहाटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे आभार मानले पण nodmk3 का - UP चुनाव : चंद्रशेखर म्हणाले
आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे आभार मानले पण nodmk3 का – UP चुनाव : चंद्रशेखर म्हणाले
लखनौ. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 च्या तारखा जाहीर झाल्यामुळे राज्यात राजकीय खळबळ माजली आहे. नेत्यांमध्येही वक्तव्यांचे बाण धावू लागले आहेत. याच क्रमाने आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष आ चंद्रशेखर आझाद समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव पण टोमणा मारला आहे. चंद्रशेखर आझाद यांनी अखिलेश यादव यांचे आभार मानले आणि त्यांनी त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास शिकवल्याचे सांगितले. आझाद…
View On WordPress
#२०२२ च्या निवड���ुका#अखिलेश यादव#आझाद समाज पक्ष#आझाद समाज पक्षाचे प्रमुख#��त्तर प्रदेश विधानसभा चुनव 2022#उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका#गोरखपूर मतदारसंघ#गोरखपूर विधानसभा जागा#गोरखपूर शहरी विधानसभा मतदारसंघ#चंद्रशेखर अखिलेश यादव#चंद्रशेखर आझाद#चंद्रशेखर आझाद यांचा सेमी योगींवर हल्ला#चंद्रशेखर आझाद रावण#चंद्रशेखर धन्यवाद अखिलेश यादव#चंद्रशेखर विरुद्ध अखिलेश यादव#चंद्रशेखर विरुद्ध योगी आदित्यनाथ#चुनाव 2022 पर्यंत#निवडणुकीच्या बातम्या#मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ#यूपी निवडणूक 2022#यूपी निवडणूक ताज्या अपडेट्स#वर सेमी योगी आदित्यनाथ#समाजवादी पक्ष#समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव#समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 12 October 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १२ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत दोन दसरा मेळावे होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादर इथल्या शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होत आहे. या दसरा मेळाव्यांसाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. 
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी प्रमाणे यंदाही नागपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा नेतृत्वात दीक्षाभूमी स्मारक समिती आणि समता सैनिक दलाच्या प्रमुख उपस्थितीत सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी शेकडो बौद्ध अनुयायी उपस्थित होते. उपस्थित अनुयायांना २२ प्रतिज्ञांचं वाचन करुन प्रतिज्ञा देण्यात आली, यासोबतच समता सैनिक दलाच्या सैनिकांनी मानवंदना देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. आज सायंकाळी सहा वाजता दीक्षाभूमीवर धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 
                                ****परभणी शहरातील श्री शिवप्रतिष्ठान आणि  विश्व हिंदू परिषदेच्या वतीनंविजयादशमीनिमित्त आज भव्य महादौड काढण्यात आली. शहरातील मुख्य भागातून शिवाजी महाराज पुतळा, नारायण चाळ, क्रांती चौक या मार्गे गेलेल्या या महादौडचा क्रीडा संकुलात सामूहिक महाआरतीनं समारोप झाला. परभणी शहरातली ही सुमारे ४५ वर्षांची परंपरा आहे. राष्ट्रीय स्वंसेवक संघाच्या वतीनंही आज शहरात पथसंचलन करण्यात आलं.
                                 ****विजयादशमी तसंच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रम होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं सकाळी पथसंचलन करण्यात आलं तर राजाबाजार इथल्या संस्थान गणपती मंदिरासमोरील बालाजी मंदिरातून रथयात्रा काढण्यात आली. कर्णपुरा इथंही संध्याकाळी रथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या परिसरामध्ये लाखो समाज बांधव सकाळपासूनच एकत्र जमत आहेत. इथं मुख्य कार्यक्रम संध्याकाळी पार पडणार आहे तसंच सिडको एन-सात परिसरातील रामलीला मैदानावर संध्याकाळी रावण दहन होणार आहे.
****
नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाखालील आघाडीनं जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी काल श्रीनगरमध्ये उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातलं पत्र दिलं. यावेळी अब्��ुल्ला यांनी काँग्रेस, आम आदमी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर अपक्ष सदस्यांसह आघाडीच्या भागीदारांचे समर्थन पत्र उपराज्यपालांना सुपूर्द केलं. जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभेच्या ९० जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका झाल्या, यामध्ये दहा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर विक्रमी मतदान झालं आहे.                                  ****दरम्यान, हरियानात भाजपच्या नव्या सरकारचा येत्या १७  तारखेला शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत, असं केंद्रीय मंत्री मनोहरलाल यांनी सांगितलं आहे.
****
आज जागतिक संधिवात दिन आहे. हाडांमध्ये पोषक तत्वांच्या कमतरतेमुळं असह्य वेदना होतात, यालाच संधिवात म्हणतात. हा दिवस दरवर्षी १२ ऑक्टोबर रोजी हाडांच्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, एम्स इथल्या संधिवातशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर उमा कुमार यांनी संधिवात ओळखून त्यावर योग्य उपचार करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. समाजमाध्यमं आणि ऐकीव माहीतीवरुन रुग्णांनी स्वतःहून उपचार घेऊ नये, असं आकाशवाणीशी बोलताना ��्यांनी सांगितले. 
                               ****महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित-महाप्रितनं राज्यात परवडणारी घरं, सौरऊर्जा आणि कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचं नेतृत्व करावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 
महाप्रीत संचालक मंडळाची २५ वी बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली. त्यावेळी ते बोलत होते.  राज्यात होणाऱ्या विविध प्रकल्पांची कामं जलद आणि दर्जेदार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. सौर ऊर्जा क्षेत्रात महाप्रित राज्यात आणि परराज्यात चांगले काम करत आहे. मुख्यमंत्री लघु उ‌द्योग सौर छत योजना अंतर्गत प्रकल्पामुळे राज्यातील १० हजार लघु आणि मध्यम औ‌द्योगिक घटकांना अक्षय ऊर्जा उपलब्ध होणार आहे असं ते म्हणाले.
                              **** भारत आणि बांगलादेश यांच्यातला तिसरा आणि शेवटचा टी-२० क्रिकेट सामना आज हैदराबाद इथं सायंकाळी सात वाजेपासून खेळवला जाणार आहे.                               ****
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्राला संबोधित करणार
एक हजार १३२ जवानांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर
राज्यात मतदार दिवस विविध उपक्रमांनी साजरा
आणि
भारत आणि इंग्लंडदरम्यान पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याला सुरुवात, भारताच्या दिवसअखेर एक बाद ११९ धावा
****
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्राला संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रथम हिंदीत आणि त्यानंतर इंग्रजीत राष्ट्रपतींचं भाषण प्रसारित होईल. रात्री साडे नऊ वाजता राष्ट्रपतींच्या भाषणाचा मराठी अनुवाद प्रसारित केला जाणार आहे.
****
प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतल्या एक हजार १३२ जवानांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर झाली आहेत.
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक एकूण १०२ जणांना जाहीर झाले असून, त्यात महाराष्ट्रातल्या चार जणांचा समावेश आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक निकेत कौशिक, मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप सावंत आणि पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना हे पदक जाहीर झालं आहे.
महाराष्ट्रातल्या १८ पोलिस जवानांना शौर्य पदक जाहीर झालं आहे. यात नक्षलप्रभावीत जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांचा समावेश आहे.
राज्यातल्या ४० पोलीस जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी पदक जाहीर झालं आहे. यात कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, तसंच नांदेड इथले दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक बेदरे यांचा समावेश आहे.
जीवन रक्षा पदक राज्यातल्या तीन जणांना जाहीर झालं असून, यामध्ये आदीका पाटील, प्रियंका काळे, आणि सोनाली बालोडे यांचा समावेश आहे.
****
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा उद्या नवी दिल्लीत क��्तव्यपथावर होणार असून, देशाच्या विविधतेचं दर्शन याठिकाणी होणार आहे.
दरम्यान, या पथसंचलनात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले, मध्यम प्रकल्प सहकारी संस्थेद्वारे मासेमारी करणारे तुकाराम आणि सीताबाई वानखेडे तसंच राधिका आणि रामकिसन वानखेडे या दोन दांपत्यास आमंत्रित करण्यात आलं आहे.
या सोहळ्यासाठी जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या सोमठाना इथले मच्छिमार व्यव��ाय करणाऱ्या मेंढरे दाम्पत्य, तसंच मानेगावच्या सरपंच अश्विनी ढेंगळे यांना देखील विशेष निमंत्रण मिळालं आहे. याबद्दल त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
अश्विनी ढेंगळे, सरपंच, मानेगाव, जि.जालना
शासनाने आम्हाला आमंत्रित केलेलं आहे दिल्लीला. परेड या कार्यक्रमासाठी बोलावलेलं आहे. हागणदारीमुक्त केलं. आणि पाण्याची सुविधा, पिण्याचे पाणी फिल्टर, धनवन प्रकल्प, अंडरग्राऊंड नाले झालेले आहेत आमच्या गावामध्ये. मी आणि माझे मिस्टर दोघं चाललेलं आहे.
रत्नाकर मेंढरे, सरपंच, मानेगाव, जि.जालना
प्रत्येक संस्थेमध्ये कमीत कमी ५०-६० सदस्य असे सभासद आहेत. त्यांच्या कुटुंबाचा जर विचार केला तर एक हजार परिवार याच्यात उपजिविका जगतात. आणि सर्व पारंपारिक मच्छिमार करणारे भोई समाज आणि विशेष म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये एकूण ६७ मध्यम प्रकल्प आहेत. या ६७ मध्यम प्रकल्पात कमीत कमी दहा हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध होतो मत्स्य व्यवसायातून. आणि शासनाला मोठ्या प्रमाणात याचा महसूल जातो.
या पथसंचलनात जळगाव इथल्या मयूरी महाले या नववीच्या विद्यार्थीनीची सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य प्रकारात निवड झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं प्रजासत्ताक दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते होणार आहे.
****
इंडीया आघाडी ही मुळात आघाडी होऊ शकत नाही, अशी टीका भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या आघाडीमधले नेते कधीच एकत्र राहू शकत नाहीत, कारण जितके प्रादेशिक पक्ष आहेत त्या सर्वांचा त्यांच्या त्यांच्या राज्यात विरोध हा कॉंग्रेस पक्षाला असून, त्यांची स्पर्धा कॉंग्रेस पक्षासोबत असल्याचं फडणवीस म्हणाले.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आझाद मैदानावरील आंदोलनासाठीची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली आहे. आंदोलन करावं इतकी आझाद मैदानाची क्षमता नाही. त्याऐवजी जरांगे यांनी नवी मुंबईत खारघर इथल्या इंटरनॅशल कॉर्पोरे��न पार्क इथं आंदोलन करावं, असा पर्याय मुंबई पोलिसांनी नोटीसीद्वारे दिला आहे.
****
राज्यात आज मतदार दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. हिंगोली जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातल्या शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.
परभणी नोंदणी अधिकारी कार्यालयाच्यावतीनं राष्ट्रीय मतदार दिन परभणीतल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात साजरा करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत परभणीत ७० टक्के पेक्षा अधिक मतदान होईल असा संकल्प केला असून, नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी केलं.
धाराशिव इथं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यातल्या दिव्यांग, तृतीयपंथीय मतदार, तसचं भटके विमुक्त समाजातल्या नव मतदारांचा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. नव मतदारांनी मतदानाच्या हक्काप्रती जागरूक राहून भारताची लोकशाही मजबूत करण्यासाठी कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं.
लातूर इथं दयानंद महाविद्यालयात जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. लोकशाही प्रक्रियेत मतदान ही सर्वात महत्वाची प्रक्रिया असून, त्यात युवकांचा सहभाग असणं गरजेचं आहे, असं त्या म्हणाल्या. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, तांत्रिक अधिकार्यांचा गौरव करण्यात आला. तत्पूर्वी, मतदार दिनानिमित्त लातूर शहरात युवकांची मतदार जागृती रॅली काढण्यात आली.
धुळे इथं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत मतदार दिनाचा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावणं आवश्यक असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे.
****
भारत-इंग्लंड दरम्यानच्या पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्याला आज हैदराबाद इथं सुरुवात झाली. आजच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सर्वबाद २४६ धावा केल्या. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या पहिल्या दिवसअखेर एक बाद ११९ धावा झाल्या आहेत. भारत पहिल्या डावात अजूनही १२७ धावांनी पिछाडीवर आहे. यशस्वी जयस्वाल ७६ तर शुभमन गिल १४ धावांवर खेळत आहेत.
****
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत या जोडीनं चीन आणि चेक प्रजासत्ताकच्या जोडीचा, ६-३, ३-६, ७-६ असा पराभव केला.
****
येत्या दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं होणाऱ्या वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात सोनेरी महल परिसरात सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक वापरास आवाजाची विहित मर्यादा राखून परवानगी देण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी दिले आहेत.
दरम्यान, या महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहराचं वैभव जाणून घेण्यासाठी इंटॅक संस्थेच्या सहकार्याने तीन हेरिटेज वॉक होणार आहेत. यातला दुसरा वॉक आज सकाळी पार पडला. इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांनी उपस्थितांना शहराच्या विविध भागांची माहिती दिली.
****
मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासणी सर्वेक्षण मराठवाड्यात सर्वत्र सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आतापर्यंत चोवीस हजार २०८ कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आल्याचं, महानगरपालिकेनं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींनी पाणी पुरवठा योजनेची वीज देयकं बंधित निधीतून देण्याचे निर्देश, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 February 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१० मि.
****
** संसदेच्या दोन्ही सभागृहांत कृषी कायद्यांवरून विरोधकांचा गदारोळ कायम
** राज्यातली सर्व विद्यापीठं आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयाचे नियमित वर्ग येत्या १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीसह सुरु करण्याचा निर्णय
** ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक आणि सर्व सुविधायुक्त फिरतं रुग्णालय सुरू करणार - आरोग्य मंत्री राजेश टोपे
** भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात
** कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर माघ एकादशी यात्रेदरम्यान पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनाकरीता बंद ठेवण्याचा मंदिर समितीचा निर्णय
** राज्यात दोन हजार ९९२ नव्या कोविड रुग्णांची नोंद तर मराठवाड्यात बीड जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू
** आणि
** मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध विकास कामांची पाहणी करणार
****
संसदेच्या दोन्ही सभागृहांत काल विरोधकांनी कृषी कायद्यांवरून गदारोळ केला. लोकसभेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं, तर राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा झाली. चर्चेला सुरुवात करताना भारतीय जनता पक्षाचे सदस्य भुवनेश्वर कालिता यांनी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी यावेळी बोलताना, तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराचा त्यांनी निषेध नोंदवला. तसंच इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद व्यक्त करत, अनेक सूचना मांडल्या. राज्यसभेत शून्यकाळ संपताच आम आदमी पक्षाच्या तीन सदस्यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, मोब��इल फोनचा वापर करून सभागृहातलं कामकाज रेकॉर्ड करू नये, असं आवाहन सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सर्व सदस्यांना केलं.
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु करण्याबाबत, विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करून सहमती झाली असताना देखील, विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहात गदारोळ करत असल्याबद्दल संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नाराजी व्यक्त करत, हा राष्ट्रपतींचा अपमान असल्याचं मत व्यक्त केलं. लोकसभेचं कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आलं. मात्र तरीही प्रत्येक वेळी कामकाज सुरू होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू ठेवल्यानं, कामकाज तहकूब करण्यात आलं.
****
शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह हॅशटॅग चालवणारी खाती आणि ट्वीटस बंद करण्याचे आदेश देऊनही अशी खाती अनब्लॉक केल्याबद्दल केंद्र सरकारनं ट्विटरला कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयानं शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह संदेश आणि असे संदेश देणाऱ्या खात्यांवर बंदी आणणायचे आदेश ट्विटरला दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी ट्विटरनं केली नसल्याचं आढळल्यानं सरकारनं ट्विटरला नोटीस बजावली आहे. ट्विटरला सरकारी आदेशांचं पालन करणं अनिवार्य असून, ट्विटर न्यायालयाची भूमिका बजावू शकत नाही, असंही सरकारनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराची चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. या हिंसाचाराची केंद्र सरकार चौकशी करत असल्याची खात्री असल्यानं, सर्वोच्च न्यायालय मध्यस्थी करणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. २६ जानेवारीला शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढत दिल्लीत प्रवेश केला. यावेळी दिल्लीच्या सीमेवर तसंच दिल्लीत मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलकांकडून हिंसाचार करण्यात आला होता. याची चौकशी व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या.
****
राज्यातली सर्व अकृषी, अभिमत, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठं आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग येत्या १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीसह सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मुंबईत काल ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले......
येत्या १५ फेब्रुवारी पासून ५० टक्के उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील महाविद्यालय सुरु होतील. दुसऱ्या टप्यामध्ये वसतीगृह सुरु होतील. परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही मार्ग विद्यापीठाने खुले ठेवलेले आहे. यूजीसी ने जी सुरक्षीततेची गाईडलाईन दिलेली आहे. त्याचं तंतोतंत पालन करुन, संबधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करुन कॉलेज सुरु करावीत अशा पध्दतीचा जीआर आजच आम्ही निर्गमित केलेला आहे. परिक्षांच्या बाबत ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही पर्याय आहे. उपस्थितीच्या बाबतीमध्ये ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य नाही. पुढच्या आठ दहा दिवसामध्ये नक्की ऑफलाईन ची प्रेझेंटी किती असावी, ऑनलाईनची प्रेझेंटी किती असावी यासंदर्भातील निर्देश देखील आम्ही विद्यापीठाशी चर्चा करुन संबधित महाविद्यालयाला देऊ.
****
अनुसूचित जातीतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप, देशांतर्गत शिष्यवृत्ती, विद्यावेतन आणि तत्सम योजनांचा लाभ हा विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून देण्यात यावा असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत. कोविड प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालयं जरी बंद असली तरी ऑनलाईन, डिजिटल, ऑफलाईन आदी पद्धतींनी बहुतांश महाविद्यालयात शिक्षण सुरू असल्याचं ते म्हणाले. सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजना राबवल्या जातात त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा असंही मुंडे म्हणाले.
****
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक आणि सर्व सुविधा असणारं फिरतं रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. विशेषतः गरोदर महिलांना रुग्णालयातून  त्यांच्या घरी सुरक्षित सोडण्यासाठी ही सुविधा असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन रुग्णालयं सुरू केली जाणार आहेत. मुंबईतही अशा फिरत्या रुग्णालयात वाढ केली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.
****
औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार राजेश धोंडीराम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
****
पुण्यात काल संवाद, आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली. यावेळी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर ४० वर्षे साथसंगत करणारे ज्येष्ठ टाळ वादक माऊली टाकळकर यांचा विशेष सत्कार विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलतांना अभ्यंकर यांनी पंडित भीमसेन जोशी यांनी संतवाणीव्दारे संपूर्ण जगाला ब्रह्मानंद दिल्याचं सांगितलं. याचं कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास आणि विराज जोशी यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि संगीताच्या विविध पैलूंवर रचलेल्या रचनांचे सादरीकरण केलं.
दरम्यान, आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीनं येत्या सहा आणि सात फेब्रुवारीला अभिवादन या संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात संगीताच्या मैफली तसचं पंडीत भिमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार असल्याचं आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितलं.
दरम्यान, भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर वाढवण्यात आलेल्या टाळेबंदीचा विचार करता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं माघ या��्रेदरम्यान २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी भाविकांना मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांनी पंढरपूरला येऊ नये असं आवाहन मंदिर समितीनं केलं आहे. श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद असताना मंदिराच्या बाहेरच्या परिसरात भाविकांना येऊ द्यायचे किंवा नाही या विषया संदर्भात शासन निर्णय घेईल असं समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं
****
राज्यात काल दोन हजार ९९२ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ३३ हजार २६६ झाली आहे. काल ३० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार १६९ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५२ शतांश टक्के झाला आहे. तर काल सात हजार ३० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ४३ हजार ३३५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ३७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ३७ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल बीड जिल्ह्यात दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १३७ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात ३१ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात ३४, बीड २९, नांदेड १६, उस्मानाबाद आठ, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी सात, तर परभणी जिल्ह्यात पाच नवे रुग्ण आढळून आले.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या पाहणी दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त काल विभागीय आयुक्त सुनील केंद्रीकर यांनी गरवारे क्रीडा संकुल इथल्या जलकुंभाची, प्रोझोन मॉल ते कलाग्रामपर्यंत सुरू असलेल्या रस्ते कामांची, तसचं चिकलठाणा इथल्या क्रीडा संकुल कामांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय उपस्थित होते.
****
नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामीण रुग्णालय भोकर इथले आरोग्य सहायक तथा महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष सत्यजित टिप्रेसवार यांनी कोरोना लस घेतली आहे. कोविड-19 पासून सुरक्षीत होण्यासाठी सर्व आरोग्याधिकारी, कर्मचारी यांनी लस घेण्याचं आवाहन टिप्रेसवार यांनी केलं आहे.
मी दिनांक २८ जानेवारी २०२१ रोजी कोविड लस घेतली आहे. ती अत्यंत सुरक्षित आहे. साधारण लसीप्रमाणे मला थोडाफार त्रास झालेला आहे. तरी माझे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना नम्र विनंती आहे की आपण ही कोविड लस घ्यावी.
****
परभणी जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीनं काल रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १७५ जणांनी रक्तदान केलं. यावेळी परिवहन विभागाच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरातील नवीन मोंढा परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक टिप्पर पोलिसांनी जप्त केला. चालक सय्यद तौसिफ सय्यद लाल आणि जाफर पठाण यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करत पोलीसांनी टिप्परसह पाच लाख चार हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील माहूरगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता देऊन देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलावीत अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाबाबत मुंबईत विभागवार झालेल्या चर्चेत चव्हाण यांनी मराठवाड्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधलं.
****
कुविख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक आणि मोक्काच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. परमानंद हंसराज ठक्कर असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. मुंबईतील एकाच जागेची बनावट कागदपत्र तयार करून बांधकाम व्यावसायिकांकडे पंचवीस कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन सह परमानंद ठक्कर आणि इतर चार जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
****
आयुर्वेदिक शिक्षण घेतलेल्या स्नातकांना आधुनिक वैद्यकशास्त्रातील शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी काल परभणी आणि नांदेड इथं भारतीय वैद्यकीय मंड‍ळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कालपासून साखळी उपोषण सुरु केलं आहे. या मागण्यांचं निवेदन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका परिपत्रकानुसार आयुर्वेदिक शिक्षण घेतलेल्या स्नातकांना आधुनिक वैद्यक शास्त्रातील शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, बिलोली या तीन तालुक्यातील सरपंच पदाचं आरक्षण शुक्रवारी सकाळी ११ वाजता संबंधित तालुका मुख्यालयी काढलं जाणार आहे, असं प्रशासनानं कळवलं आहे.
****
केंद्र सरकारनं केलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्याबरोबरचं राज्य सरकारनं टाळेबंदीच्या काळातील तीन महिन्याचं घरगुती आणि शेती पंपाचं वीज बिल माफ करावं याकरिता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता वाढवावी असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे. उस्मानाबाद जिल्���्यात तुळजापूर इथं राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत ते बोलत होते. कार्यकर्त्यांनी राज्यात चळवळ मजबूत करण्यासाठी सभासद नोंदणी अभियान राबविण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या जुना मोंढा परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा शहरात दाखल होत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
****
सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील कंदर आणि परिसरातील केळीची निर्यात वाढावी यासाठी आराखडा तयार करुन नियोजनबध्द प्रयत्न करणार असल्याचं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल सांगितलं. कंदरच्या केळीचा ब्रँड विकसित झाला असून तो प्रसिध्द व्हावा तसच उत्पादकता वाढावी, उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी सर्व संबंधित विभागांना एकत्रित करुन आराखडा तयार केला जाणार असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले.
****////****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 January 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि. **** ** घुसखोरांना देशाबाहेर घालवण्यासाठी केंद्र सरकारला पाठिंबा देण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्णय; शिवसेनेनं हिंदुत्वाचा म���द्दा सोडला नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण ** मराठवाड्यातल्या सहा धरणांमधून शेतीसाठी पाणी पुरवठा करण्याच्या नियोजनाला मंजुरी ** नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात वंचित बहुजन आघाडीचा आज महाराष्ट्र बंद आणि ** भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात **** बांग्लादेश तसंच पाकिस्तानातून आलेल्या घुसखोरांना देशाबाहेर घालवण्यासाठी केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा असून, या कारवाईच्या मागणीसाठी येत्या नऊ फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पक्षाच्या अधिवेशनात बोलत होते. नागरिकत्वाच्या मुद्यावर देशानं कडक भूमिका घेणं गरजेचं असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. या अधिवेशनात ठाकरे यांनी पक्षाच्या नवीन झेंड्याचं अनावरण केलं. सकारात्मक गोष्टींसाठी बदल हा आवश्यक असल्यामुळेच झेंडा बदलला. शिवरायांची राजमुद्रा असलेला हा झेंडा निवडणूक काळात वापरायचा नाही, त्यावेळी पक्षाचं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजीन असलेला झेंडा वापरायचा, असे स्पष्ट निर्देश राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिले. मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर कधीही तडजोड नाही, याबाबत आपली भूमिका कायम असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं. सरकारच्या प्रत्येक खात्याच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी पक्षाच्या विशेष समित्या काम करतील, असं ते म्हणाले. **** मुख्यमंत्रीपदाचा मान शिवसैनिकांना समर्पित करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत काल शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा साजरा झाला. यावेळी शिवसैनिकांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत उघडपणे सत्ता स्थापन केली असून, शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नसल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. यावेळी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचाही सत्कार करण्यात आला. **** जलसंपदा, जलसंधारण आणि पाणीपुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. राज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले जलसंस्कृतीचे जनक शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा निर्णय घेण्यात आला. नांदेड शहरातल्या विष्णुपुरी प्रकल्पाजवळ चव्हाण यांचं स्मारक उभारण्याचा आणि नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णयही शासनानं घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** येत्या आर्थिक वर्षात अंगणवाड्यांच्या चार हजार नवीन खोल्या बांधण्याचं नियोजन करण्यात आल्याचं महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. मुंबईत काल ‘राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण अ��ियान’ आणि ‘युनिसेफ’च्या राज्यस्तरीय परिषदेत त्या बोलत होत्या. अंगणवाड्यांमध्ये पिण्याचं पाणी, शौचालय आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र -पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे निर्देशही ठाकूर यांनी यावेळी दिले. **** महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये दवाखान्यांची संख्या ४९२ वरून एक हजार करणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ग्रामीण भागातल्या हृदयविकारांच्या रूग्णांसाठी स्टेमी नावाची योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. ते म्हणाले…. स्टेमी नावाची 'STEMI' अशा स्वरूपाचे योजना की ज्याच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयांमध्ये ह्रदय विकाराचा झटका आल्यानंतर पटकन दवाखान्यात जाणतो Golden Hour आहे, त्या वेळेस योग्य उपचार होणे गरजेचे आहे. १० जिल्ह्यांमध्ये साधारणपणे राबवण्याचा निर्णय घेतो आहोत आणि हळूहळू मग ती दुसऱ्या टप्प्यात आणि पूर्ण ३६ जिल्हा पर्यंत आम्ही जाणार आहोत. दरम्यान, टोपे यांनी काल औरंगाबाद इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून बैठक घेतली. मराठवाड्यातल्या सहा धरणांमधून आगामी काळात पाणी पाळ्यांच्या नियोजनाला यावेळी मंजूरी देण्यात आली. मांजरा धरण मृतसाठ्यात असल्यामुळे धरणातलं संपूर्ण पाणी पिण्यासाठी तसंच औद्योगिक वापरासाठी राखीव ठेवण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं. पाटबंधारे विभागातल्या रिक्त जा���ा भरणं आणि कालव्यांची दुरुस्ती करणं आवश्यक असल्याचं टोपे म्हणाले. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** साईबाबा जन्मस्थळावरुन सुरु असलेल्या वादावर पाथरीचे ग्रामस्थ न्यायालयात दाद मागणार आहेत. पाथरीच्या साई जन्मभूमी संस्थानचे सदस्य मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पुराव्यासकट याचिका दाखल करणार असल्याचं आमदार आणि संस्थान समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी पीटीआयला सांगितलं. यासंदर्भात आपण आता मुख्यमंत्र्यांची भेट न घेता, पुढच्या आठवड्यात थेट न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं दुर्राणी यांनी सांगितलं, असं या वृत्तात म्हटलं आहे. **** नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या कायद्याविरोधात देशभर आंदोलनं होत असून, त्याचा काहीच परिणाम सरकारवर होताना दिसत नाही, त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीनं आंदोलनाच्या पुढे जाऊन महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं पक्षाचे अध्यक्ष प्र��ाश आंबेडकर यांनी सांगितलं. **** दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी भाजपनं माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात औरंगाबाद इथं सोमवारी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर होणाऱ्या या उपोषणात पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याचंही ठाकूर यांनी सांगितलं. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातील मूळज इथले शिवाजीराव प्रतापराव चालुक्य यांचं काल दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. ते एकोणसत्तर वर्षांचे होते. उमरगा इथल्या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे तसंच शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते. शिवाजीराव चालुक्य यांचा राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. **** हैदराबाद मुक्ती संग्रामातले स्वातंत्र्य सेनानी आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दिनकर बोरीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'सान्निध्य एका शिस्तीचे' या ग्रंथाचं काल औरंगाबाद इथं प्रकाशन झालं. सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी संपादित केलेल्या या ग्रंथात विविध क्षेत्रात कार्यरत अनेकांनी बोरीकरांवर लिहिलेल्या बावन्न लेखांचा समावेश आहे. या प्रकाशनावेळी अनेक मान्यवरांनी बोरीकरांच्या आठवणींना उजाळा दिला. **** आझाद हिंद सेनेचे प्रमुख स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्तानं काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. मंत्रालयासह सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातून सुभाषबाबूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नांदेड शहरातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात नेताजींच्या जयंतीनिमित्त विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. शहरात वजीराबाद भागातून मिरवणूकही काढण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं काल विविध कार्यक्रम घेण्यात आले. नांदेड इथं रक्तदान शिबीर घेण्यात आलं, अनेकांनी उत्स्फुर्तपणे याशिबीरात रक्तदान केलं. शिवसेनेच्या लातूर जिल्हा शाखेच्या वतीनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयास पाच चाकाच्या खुर्च्या, पाच स्ट्रेचर भेट देण्यात आले. **** परभणी जिल्ह्याच्या जिंतूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक म्हणून शासनानं मनोज थिटे यांची नियुक्ती केली आहे. थिटे यांनी काल पदभार स्वीकारला. कृषी उत्त्पन्न बाजार समितीवर पहिल्यांदाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचं वर्चस्व आलं असून, संपूर्ण समितीवरही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य आहेत. **** लातूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदावर भारतीय जनता पक्षाचे चारही सदस्यांची बि��विरोध निवड झाली आहे. समाज कल्याण सभापतीपदी रोहिदास वाघमारे तर महिला आणि बालकल्याण सभापती पदी ज्योती राठोड यांची निवड झाली असून, गोविंद चिलकूरे आणि संगिता घुले यांचं खातेवाटप लवकरच जाहीर होईल, असं जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितलं. **** भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना आज ऑकलंड इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. **** परभणी इथल्या हजरत तुरबुल हक यात्रेनिमित्त प्रभारी जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, आणि आयुक्त रमेश पवार यांनी काल यात्रेच्या परिसराची पाहणी केली. विद्युत पुरवठा, वीज जोडणी, अग्निशामक व्यवस्था, स्वच्छता, पाणी व्यवस्था आदीं सोयीसुविधांचा त्यांनी आढावा घेतला. **** राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त काल औरंगाबादमध्ये दिव्यांग मतदारांची रॅली काढली. जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात झालेल्या या रॅलीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी हिरवा झेंडा दाखवला. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 December 2019 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ डिसेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. ****
·      जागतिक मंदीतून बाहेर येणारी भारत ही जगातली पहिली अर्थव्यवस्था ठरेल: केंद्रीय गृहमंत्र्यांचा विश्वास
·      नागरिकता कायद्याच्या समर्थनात भाजपची मुंबईत सभा; औरंगाबाद-परभणी इथं निषेध मोर्चा
·      त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर
आणि
·      परभणी जिल्ह्यातल्या नऊ पंचायत समित्यांपैकी पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, दोन शिवसेना तर, राष्ट्रीय समाज पक्ष आणि घनदाट मित्रमंडळाचा प्रत्येकी एका जागेवर विजय
 ****
जागतिक मंदीतून बाहेर येणारी भारत ही जगातली पहिली अर्थव्यवस्था ठरेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला इथं काल गुंतवणुकदारांच्या परिषदेमध्ये ते बोलत होते. जागतिक मंदीचा तात्पुरता परिणाम भारतावर दिसत असून, अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवीन योजना आणून, जागतिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करत असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं.
****
नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात तसंच विरोधात कालही अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले.
मुंबईत भारतीय जनता पक्षानं आझाद मैदानावर जाहीर सभा घेतली. विधीमंडळाच्या दोन्ही सदनातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना फडणवीस यांनी नागरिकत्त्व सुधारणा कायद्याच्या विरोधात भूमिका घेऊन विरोधी पक्ष संकुचित राजकारण करत असल्याचा आरोप केला.
 औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयावर नागरिकांनी या कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला. एनआरसी आणि सीएए विरोधी कृती समितीच्या नेतृत्वात जामा मशीदीपासून निघालेल्या या मोर्चात या कायद्याच्या निषेधाचे फलक घेऊन नागरिक सहभागी झाले होते. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक राजकीय नेते यावेळी उपस्थित होते.
 परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथंही या कायद्याच्या विरोधात काल मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्ठमंडळाच्या वतीनं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं.
 अहमदनगर इथं अनेक मुस्लिम संघटनांनी एकत्र येऊन या कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला, कोठला मैदानावरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला.
 नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर इथं काल नागरिकत्व ��ुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
काँग्रेस पक्ष आज आपला स्थापना दिवस साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर आज पक्षाकडून देशभरात संविधान बचाओ मोर्चा काढला जाणार आहे. पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. नागरिकता सुधारणा कायद्याला देशाच्या अनेक भागातून होणारा विरोध पाहता, सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात हे मोर्चे काढले जाणार असल्याचं वेणुगोपाल यांनी सांगितलं. यावेळी होणाऱ्या जाहीर सभांमधून संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जाणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावरून सकाळी दहा वाजता हा मोर्चा निघेल, गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ हा मोर्चा विसर्जित होईल.
****
महिला अत्याचार प्रकरणातले खटले वेगानं निकाली निघावेत आणि आरोपीला कठोर शिक्षा होऊन गुन्हेगारांवर जरब बसावी, यासाठी कठोर कायदा करण्याचे संकेत गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईत काल विधी आणि न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. संबंधित कायद्यात या दृष्टीने काय सुधारणा करता येतील, याबाबतचं प्रारूप तयार करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
कारगील युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेली मिग २७ श्रेणीची सात विमानं काल वायूसेनेच्या सेवेतून निवृत्त झाली. वायू दलाच्या जोधपूर विमानतळावरून ही विमानं काल आकाशात अखेरची झेपावली. विमानांच्या या तुकडीने तीस वर्ष वायूसेनेत सेवा बजावताना, अनेक महत्त्वाच्या कारवाया यशस्वीपणे पूर्ण केल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा साठावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
उस्मानाबाद इथं येत्या दहा जानेवारी पासून आयोजित त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका काल औरंगाबाद इथं जारी करण्यात आली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही पत्रिका जारी केली. ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली येत्या १० जानेवारीपासून होत असलेल्या या साहित्य संमेलनात वाङमयीन आणि सामाजिक प्रश्नांवर पाच परिसंवाद, साहित्यिक प्रतिभा रानडे यांची प्रकट मुलाखत, कविसंमेलनं तसंच कथाकथन आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या नऊ पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत पाच जा��ांवर राष्ट्रवादी काँग्रेस, दोन जागांवर शिवसेना, तर राष्ट्रीय समाज पक्ष आणि घनदाट मित्रमंडळानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. पाथरी पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कल्पना थोरात, सोनपेठ इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीरा जाधव, पूर्णा राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक बोकारे, जिंतूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वंदना इलग, सेलू पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन गाडेकर यांची निवड झाली.
     परभणी पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या गोकर्णा डुबे, तर मानवत पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या प्रमिला उकलकर यांची निवड झाली आहे.
     गंगाखेड पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रीय समाज पक्षाच्या छाया मुंडे, तर पालम पंचायत समिती सभापतीपदी घनदाट मित्रमंडळाच्या अलका शिंदे यांची निवड झाली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या विजयमाला राम मुळे या निवडून आल्या. नगराध्यक्ष पदासाठी काल नगरपालिकेच्या सभागृहामध्ये हात उंचावून मतदान घेण्यात आलं. त्यामध्ये विजयमाला मुळे यांना नऊ मतं तर भाजपाच्या सीता नागरे यांना सहा मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक तटस्थ राहिले.
नंदुरबार नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भारती राजपूत यांची निवड झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या नऊ पंचायत समित्यांच्या सभापती तसंच उपसभापती पदांसाठी येत्या मंगळवारी ३१ डिसेंबरला निवडणूक होणार आहे.
****
नागरिकत्त्व सुधारणा कायद्यातल्या तरतुदींबाबत मोठ्या प्रमाणावर समज -गैरसमज आहेत, या पार्श्वभूमीवर ऐकू या कायद्यातल्या तरतुदींविषयीची माहिती.
नागरिकता सुधारणा कायद्यानंतर आता एन आर सी आणलं जाईल का? आणि मुस्लिमांना डिटेंशन कँप म्हणजे बंधकगृहात पाठवलं जाईल का?
मुळीच नाही. नागरिकता सुधारणा कायदा आणि एनआरसीचा काहीही संबंध नाही. एनआरसी ही भारतीय नागरिकांची नोंदणी आणि त्यांना राष्ट्रीय ओळखपत्र जारी करण्याची प्रक्रिया आहे. गेल्या सुमारे पंधरा सोळा वर्षांपासून हा नियम अस्तित्वात आहे आणि त्यात काहीही बदल करण्यात आलेला नाही.
****
आपल्याला दिलेली सुरक्षा काढून घेण्याची मागणी करणार पत्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. गरीब जनतेचा पैसा आपल्या सुरक्षेवर खर्च होऊ नये. समाज, राज्य आणि देशाची सेवा करता करता मरण आलं, तर ते आपलं भाग्य असेल, असं हजारे यांनी या पत्रात नमूद केलं आहे. यापूर्वी चार वेळा सुरक्षा काढून घेण्याच्या मागणीचं पत्र आपण सरकारला लिहिलं, पण त्यावर कार्यवाही करण��यात आलेली नाही, असंही हजारे यांनी या पत्रात म्हटलं आहे.  
****
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या मौजे सुरवाडी इथल्या चार औद्योगिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी दिले आहेत. या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडून मिळालेलं भागभांडवल आणि कर्जाचा वापर योग्यरित्या न करता अपहार क���ल्याचं तपासणीत उघड झाल्यानं ही कारवाई करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत कुस्त्यांच्या दंगलीत लोहा तालुक्‍यातल्या किवळा इथले कुस्तीपटू अच्युत टरके यांनी माळेगाव केसरीचा बहुमान पटकावला. एकवीस हजार रुपये रोख, गदा आणि मानाचा फेटा असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या स्पर्धेत पुण्यातल्या गणेश जाधव या मल्लाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
या यात्रेत काल लावणी महोत्सवालाही कालपासून प्रारंभ झाला. पशू प्रदर्शनातही उत्कृष्ट पशूंना काल पारितोषिकं प्रदान करण्यात आली.
****
लातूर महानगरपालिकेनं मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी शिबिरं सुरू केली आहेत. शहरातल्या जवळपास ९२ हजार मालमत्ताधारकांकडे शंभर कोटी रुपयांची थकबाकी आहे. या शिबिरात कराचा भरणा करणाऱ्यांना व्याजात सवलत दिली जात असून, उद्यापर्यंत ही शिबिरं सुरु राहणार आहेत.  
****
औरंगाबाद-नांदेड या एक्सप्रेस रेल्वेगाडीच्या इंजिनात काल जालना-परतूर दरम्यान सारवाडी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर तांत्रिक बिघाड झाला, यामुळे या गाडीसह नंदीग्राम एक्सप्रेस आणि मराठवाडा एक्सप्रेस या रेल्वे गाड्याही सुमारे दोन तास खोळंबून होत्या. औरंगाबाद-नांदेड गाडीला दुसरं इंजिन बसवल्यानंतर ही गाडी आणि त्यानंतर अन्य दोन्ही रेल्वे गाड्या मार्गस्थ झाल्या.
****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 December 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ डिसेंबर २०१९ दुपारी १.०० वा. **** राज्यातल्या शेतक-यांना दिलासा देत राज्य सरकारनं महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतक-यांचं ३०सप्टेंबर २०१९ पर्यंतचं दोन लाख रुपयांपर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधीमंडळात केली. ही योजना एक मार्चपासून लागू होईल तर एक जूनपासून कर्जाचं पुनर्गठन केलं जाईल. सिंचनाचे बळीराजा जलसंजीवनी योजनेतील बावन्न रखडलेले प्रकल्प जून २०२३ पर्यंत टप्प्याटप्प्यानं प्राधान्यक्रम ठरवून पूर्ण करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात सांगितलं. गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा विदर्भातील चार जिल्ह्यांत भातशेती वाढविण्यासाठी आणि ब्राऊन राईस उद्योगाला विकसित करण्यासाठी भातशेती मिशन राबवण्यात येईल. यामुळे कृषी प्रक्रिया उद्योगसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यापूर्वी शासनातर्फे प्रति क्विंटल पाचशे रुपयांचं अनुदान दिलं जात होते आता त्यात दोनशे रुपयांची वाढ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण राज्यात रस्त्यांच्या मजबुतीकरण आणि सुधारणांसाठी चालू असलेल्या विशेष योजनेसाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून निधीचे नवीन स्त्रोत निर्माण करून रस्त्यांच्या सुधारणेला गतीशील चालना दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जुनं, पारंपरिक तंत्रज्ञान वापरण्याऐवजी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर रस्त्यांचा दर्जा उंचावेल आणि रस्ते अधिक काळापर्यंत टिकतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात व्यक्त केला. **** नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील निदर्शन शांततेत व्हावीत, असं आवाहन एआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी कार्यकर्त्यांना क���लं आहे. हैदराबाद इथं पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीवेळी त्यांनी हे आवाहन केलं. इतर देशांमधून विस्थापित झालेल्यांना नागरिकत्व देण्याला नव्हे तर धर्माच्या आधारे भारताचं नागरिकत्व देण्याला आपला विरोध असल्याचं ओवैसी यांनी यावेळी नमुद केलं. **** नागरीकत्व सुधारणा विधेयकाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय व्यवस्थापन संस्था आणि विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांकडून समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आलेल्या मजकुराची तपासणी करायला सांगण्यात आलं नसल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशाप्रकारचे कुठल्याही प्रकारचे निर्देश दिले गेले नसल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. **** भाजप तसंच विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, लोकाधिकार मंच या संस्थांतर्फे आज नागपूर इथं नागरिकत्व सुधारणा कायदा -सीएएच्या समर्थनार्थ फेरी काढण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात सहभाग घेतला. काही राजकीय पक्ष जाणूनबुजून लोकांमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल अफवा पसरवत आहेत आणि देशात अशांतता निर्माण करत आहेत, असं फडणवीस यावेळी म्हणाले. **** औरंगाबाद इथं `औरंगाबाद फर्स्ट` या संस्थेच्या वतीनं ‘झाडांना वेदनामुक्त करुया’ अभियानाचा प्रारंभ आज उद्योजक मानसिंग पवार यांच्या हस्ते झाला. झाडावर ठोकलेले खिळे काढून त्यांनी या अभियानाची सुरूवात केली. शहरातल्या दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉईंट दरम्यान ही मोहीम राबवण्यात आली. औरंगाबाद महानगरपालिकेचे कर्मचारी, मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, प्रयास ग्रुपचे प्रतिनिधी या मोहीमेत सहभागी झाले. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 August 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक -०६ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि. ****  जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आणणारं आणि राज्याचं दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करणारं ऐतिहासिक विधेयक राज्यसभेत मंजूर  केंद्र सरकारच्या निर्णयाचं अनेकांकडून स्वागत; काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा विरोध  राज्यातला पावसाचा जोर ओसरला, मात्र पूरपरिस्थिती कायम आणि  औरंगाबाद -जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तिरंगी लढत **** जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याची तरतूद असलेलं आणि जम्मू-काश्मीर राज्याचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करणारं ऐतिहासिक जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक काल राज्यसभेत मंजूर झालं. १२५ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने तर ६१ जणांनी विरोधात मतदान केलं. सर्व राज्यसभा सदस्यांनी चिठ्ठीद्वारे मतदानाचा हक्क बजावला. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनवण्यात येणार आहेत. काश्मीर कायमस्वरुपी केंद्रशासित प्रदेश राहणार नाही. काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य झाली. योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु असं गृहमंत्री अमित शाह यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. देशभरात लागू असलेले सर्व कायदे, जम्मू काश्मीरमध्येही लागू असतील. या राज्यातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दहा टक्के आरक्षणही लागू असेल, असं शाह यांनी सांगितलं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान, अनेक पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनं तसंच विरोधात आपापली मत मांडली. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या विधेयकाला पूर्ण विरोध करत असल्याचं सांगितलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी, जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेत केंद्रशासित प्रदेश करण्याला विरोध दर्शवला. कलम ३७० हटवण्याच्या या निर्णयातून उद्भवणाऱ्या भ��ंकर परिणामांना भाजपप्रणीत केंद्र सरकार जबाबदार असेल, असं नमूद केलं. तृणमूल काँग्रेस पक्षानंही या विधेयकाला विरोध दर्शवला. संयुक्त जनता दलाच्या सदस्यांनी या विधेयकाचा विरोध करत, सभात्याग केला. पीपल्स डेमोक्रेटीक पक्षाच्या दोन खासदारांनी, या विधेयकाचा विरोध करत, भारतीय संविधानाची प्रत फाडण्याचा प्रयत्न केला. सभापतींनी सदनात मार्शल बोलावून या दोन्ही खासदारांना सदनातून बाहेर काढलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या विधेयकावरच्या मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमध्ये राज्य सरकार अस्तित्वात असताना, स्थानिक नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घ्यायला हवा होता, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांनी या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान व्यक्त केलं. बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष, अण्णद्रमुक, तेलगु देशम पक्ष, बिजू जनता दल, आसाम गण परिषद, शिरोमणी अकाली दल, भारतीय रिपब्लीकन पक्ष, तसंच शिवसेनेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हे विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होईल. गृहमंत्री शाह यांनी, याबाबतचा प्रस्ताव काल लोकसभेत मांडला, सदनानं तो स्वीकृत केला. काँग्रेसच्या सदस्यांनी याचा विरोध करत सभात्याग केला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं, महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, या निर्णयाचं स्वागत केलं. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. **** देशाच्या राज्यघटनेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून सुरू आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. काल जालना इथं झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते. पक्षावर निष्ठा नसलेले लोक बाहेर पडत असल्यामुळे पक्षाचं शुध्दीकरणच होत असल्याचं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं. मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येवून संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असं आवाहन चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे. **** राज्यात काल पावसाचा जोर ओसरला, मात्र पूरपरिस्थिती कायम होती. मुंबई-ठाणे, कोकण, कोल्हापूर, सांगली, पुणे, पिंपरी चिंचवड तसंच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात नद्या नाल्यांना आलेला पूर कायम होता. खान्देशला पूराचा सर्वाधिक फटका बसला असून या ठिकाणची अनेक गाव पाण्याखाली आहेत. कोकणात सिंधुदुर्ग मधल्या राजापूर इथं काल एकाचा बुडून मृत्यु झाला, नाशिक जिल्ह्यातही ��ोन जण पुरात वाहून गेले. कोल्हापूर जिल्ह्यात पाचहजार पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. सांगली आणि साताऱ्यातही पूरपरिस्थिती असून, जिल्ह्यातल्या १०७ गावांचा संपर्क तुटला आहे. पुणे जिल्ह्यातल्या मुळा आणि मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं पुणे शहर, पिंपरी चिंचवड, बारामती आणि दौंड तालुक्यातल्या नदीकाठच्या कुटुंबातल्या सुमारे १३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यातलं कोपरगाव पुराच्या वेढ्यात आहे. नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातल्या उंबरमाळ गावालगत असलेल्या डोंगराला मोठ्या प्रमाणात काल सायंकाळी तडे पडलेले आहेत. नाशिक शहरातले पाच वाडे काल रात्री साडे ११ वाजेच्या सुमारास कोसळले. नाशिक जिल्ह्यात पावसानं वार्षिक सरासरी ओलांडली असून, सर्व धरणं ६७ टक्क्यांपेक्षा जास्त भरली त्यामुळे जायकवाडीच्या दिशेनं पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी आता २७ टक्के इतकी झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर मधली बाबतारा, भालगाव, डोणगाव आणि लाखगंगा इथल्या अनेक घरात पाणी शिरलं. गंगापूर तालुक्यात हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळं वैजापूर आणि गंगापूर या तालुक्यात सुरक्षेच्या कारणास्तव महावितरण कंपनीनं बंद केलेला २३ गावातला वीजपुरवठा अजुनही बंदच आहे. कंपनीनं या दोन्ही गावांसह एकूण ५२ गावांचा वीज पुरवठा बंद केला होता, त्यापैकी २९ गावांचा वीज पुरवठा काल सुरू करण्यात आला. दरम्यान संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी गोदावरी नदीकाठावरचे वीज संच, रोहित्र आणि विद्युत वाहिनी हाताळू नये, असं आवाहन कंपनीनं केलं आहे. **** पोलिसांनी माओवाद्यांविरुद्ध प्रभावी पावलं उचलली असून, माओवादाला बऱ्याच अंशी आळा बसला आहे, असं मुख्���मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गडचिरोली इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. भरकटलेल्या माओवाद्यांना मुख्य प्रवाहात यावं लागेल, नाहीतर त्यांना कायद्याला सामोरं जावं लागेल, असं ते म्हणाले. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी पक्षाचे प्रवक्ते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल याबाबतची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. **** श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार आणि त्यासोबतच आलेला नागपंचमीचा सण काल सर्वत्र मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला. श्रावणी सोमवारनिमित आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ, औरंगाबाद जिल्ह्यातल्या घृष्णेश्वर तसंच परळीच्या वैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. **** औरंगाबाद -जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान पर��षद निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळं आता शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीचे अंबादास दानवे, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीचे बाबूराव कुलकर्णी आणि अपक्ष उमेदवार शहानवाज अब्दुल रहेमान खान असे तिघेजण निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. १९ ऑगस्टला ही निवडणूक होणार आहे. दरम्यान, या मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ कमी असलं तरी अनेक अदृष्य हात आम्हाला मदत करतील अशी आशा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातले उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातल्या मतदारांची बैठक काल औरंगाबाद शहरात झाली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चा सुरु असून या आठवड्यात निर्णयाचे अंतिम स्वरूप ठरेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. **** औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी प्र कुलगुरुपदी रसायन तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रविण वक्ते यांची नियुक्ती कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी केली आहे. याशिवाय डॉ. सतिश दांडगे, डॉ. मुरलीधर लोखंडे, डॉ. भालचंद वायकर, डॉ. संजिवनी मुळे यांची वेगवेगळ्या विभागाचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. **** यंदाचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सेवा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं स्वरुप असलेला हा पुरस्कार, येत्या १४ ऑगस्टला प्रवरानगर इथं समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहीर केले. इतर पुरस्कारांमध्ये राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार किरण गुरव यांना, गो.तु.पाटील विशेष साहित्य पुरस्कार नीलिमा क्षत्रिय यांना, समाज प्रबोधन पुरस्कार शमसुद्दीन तांबोळी यांना, तर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार राजकुमार तांगडे यांना जाहीर झाला आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 April 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ११ एप्रिल २०१९ सकाळी ७.१० मि. ****  लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या ९१ मतदार संघात मतदानाला प्रारंभ; राज्यातल्या सात मतदारसंघांचा समावेश  राफेल विमान खरेदी प्रकरणातल्या फेरविचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची तयारी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाची मनाई आणि  राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला वेग; प्रचार फेऱ्या आणि प्रत्यक्ष जनसंपर्काच्या माध्यमातून लोकांशी उमेदवारांचा संपर्क **** लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १८ राज्यं आणि दोन केंद्रशासीत प्रदेशांतल्या ९१ मतदार संघात काही वेळापूर्वी सुरूवात झाली आहे. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, नागालँड, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप, तेलंगणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये हे मतदान होत आहे. राज्यातल्या नागपूर, रामटेक, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात लोकसभा मतदार संघात मतदानास प्रारंभ झाला आहे. या सात जागांसाठी एकशे सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी केलं आहे. **** गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भू-सुरुंगाचा स्फोट होऊन, केंद्रीय राखीव ��ोलिस दलाचा एक जवान जखमी झाला. निवडणूक बंदोबस्तावर जात असलेल्या या पथकाच्या वाहनावर, काल सायंकाळच्या सुमारास, एटापल्ली तालुक्यात गट्टा जांबिया गावाजवळ नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचं पोलिसांनी सांगितलं. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात आज मतदान होत आहे. **** निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या अर्जांची काल छाननी करण्यात आली. ठाणे, भिवंडी तसंच कल्याण मतदारसंघांमधून प्रत्येकी चार अर्ज अवैध ठरल्यामुळे ठाणे मतदार संघात एकवीस, भिवंडी मतदारसंघात अठरा, तर कल्याण मतदार संघात ३२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. पालघर मतदारसंघात एक अर्ज बाद झाला, तर ३१ अर्ज वैध ठरले. मावळ मतदारसंघातही चार अर्ज तर शिरूर मतदार संघात एक अर्ज बाद झाला, या दोन्ही मतदार संघात अनुक्रमे २८ आणि २६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. धुळे मतदारसंघात दाखल छत्तीस अर्जांपैकी चार अर्ज बाद ठरले आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एक अर्ज अवैध तर तेरा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. नाशिक मतदार संघातून सात तर दिंडोरी मतदार संघातून सहा अर्ज बाद झाले. आता नाशिक मध्ये २३ तर दिंडोरी मतदार संघात नऊ अर्ज वैध ठरले आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात दोन अपक्षांचे अर्ज अवैध ठरले आहेत. आता या मतदारसंघात २८ उमेदवारांचे वैध अर्ज आहेत. या चौथ्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या १२ एप्रिलला संपते आहे. **** केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची अधिसूचना काल जारी केली. या टप्प्यात सात राज्यात एक्कावन्न मतदारसंघांमध्ये सहा मे रोजी मतदान होईल. **** राफेल विमान खरेदी प्रकरणा संदर्भातल्या निकालाच्या फेरविचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल तयारी दर्शवली. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयातून फुटलेल्या कागदपत्रांचा आधार घेण्यात आल्यानं ही याचिका विचारात घेऊ नये ही केंद्र सरकारची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली. यापूर्वी न्यायालयानं १४ डिसेंबर रोजी राफेल व्यवहाराशी संबंधित सर्व याचिका फेटाळून लावल्या होत्या. या याचिकांचा फेरविचार करण्याची मागणी नव्यानं काही कागदपत्र दाखल करत याचिकाकर्त्यानं केली आहे. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करण्याला निवडणूक आयोगानं मनाई केली आहे. कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीला लाभ होईल, असा कोणताही चित्रपट इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये या कालावधीत प्रदर्शित करता येणार नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या संदर्भातली, एका काँग्रेस कार्यकर्त्यानं दाखल केलेली याचिका, सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली होती आणि याबाबतीतला निर्णय निवडणूक आयोगानं घेणं योग्य ठरेल अशी टिपणी केली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाचा हा निर्णय नमो टीव्हीलाही लागू असेल, आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात या वाहिनीचं प्रसारण करता येणार नाही, असं पीटीआय या वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठीच्या प्रचारानं वेग घेतला असून, विविध राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचार फेऱ्या आणि प्रत्यक्ष जनसंपर्काच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत. औरंगाबाद मतदार संघाचे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांन�� काल औरंगाबाद नजिक पंढरपूर तसंच गिरनेर तांडा इथं प्रचार फेऱ्यांतून मतदारांशी संपर्क साधला. नांदेड लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस - महाआघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ काल पिरबुऱ्हाणनगर आणि देगलूर नाका भागात वरिष्ठ नेते खासदार गुलाब नबी आझाद यांच्या प्रचार सभा झाल्या. यावेळी बोलतांना त्यांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. देशात कोणत्याही प्रकारची शांतता आणि समता नाही असं ते यावेळी म्हणाले. परभणी लोकसभा मतदार संघांत काल बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डॉक्टर वैजनाथ फड यांच्या प्रचारासाठी सिनेअभिनेत्री मोनिका बेदी हिने काल जिंतूर. मंठा आणि परतूरमध्ये प्रचार फेरी काढली. लातूर इथल्या विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारानं वेग घेतला आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर – अवघ्या सात दिवसावर मतदान येऊन ठेपल्यामुळे लातुर मतदार प्रमुख तिन्ही पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. कॉंग्रेस पक्षासाठी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची लातूरात सभा झाली. तालूका ठिकाणी आमदारांनी देशमुखाना सपोट सभा घेत आहेत. भाजपा उमेदवारांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, रमेश कराड यांनी तर गाव पातळीवर सभाचा धडाका लावला आहे. वंचित बहुजन विकास आघाडीने पथनाट्याच्या माध्यमातून आणि घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. अरूण समुद्रे - लातूर. **** हिंगोली लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार आमदार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ काल युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माहूर इथं सभा घेतली. यावेळी त्यांनी कॉंगेस, राष्ट्रवादी, आणि महाआघाडीवर ताशेरे ओढले आणि मोदी सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांचा लेखाजोगा मांडला. परभणी लोकसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत, यातून मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा आहे. अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून समुपदेशन कार्यशाळा कलापथकाच्या माध्यमातून मतदारराजा जागा हो, महागायक यज्ञेश्वर निबेकर यांचे करा तुम्ही मतदान जन हो करा तुम्ही मतदान हे गीत तसेच सुनो सुनो देश के मतदातावो या कवालीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पटनाट्य कलानाटकाचे सादरीकरण मतदारा जनजागृतीसाठी तयार केलेला चित्ररथ सर्वत्र फिरत आहे. परभणी- विनोद कापसीकर **** नोटबंदी आणि वस्तू सेवा कर प्रणालीच्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून, वंचित बहुजन आघाडीचा विजय झाल्यास, व्यापाऱ्यांना जुन्या नोटा बदलण्याची आणखी एक संधी देऊ, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी म्ह��लं आहे. काल उस्मानाबाद इथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. देशाला चौकीदार नाही, तर पंतप्रधान हवा आहे, असंही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. **** परभणी लोकसभा मतदार संघातले भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांच्याबाबत पाच दैनिकातून प्रसिद्ध झालेल्या समसमान मजकुराच्या पाच बातम्या, पेडन्यूज असल्याचं, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीनं नमूद केलं आहे. यासंदर्भात जाधव यांना नोटीस बजावून ४८ तासांत खुलासा करण्यास सांगितलं होतं, मात्र त्यांनी विहित वेळेत काहीही खुलासा केला नाही. त्यामुळे या पाचही बातम्या पेड न्यूज मानून, त्यांचा खर्च, संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात येणार आहे. **** जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेर इथं काल भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीच्या काल झालेल्या मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. लोकसभेचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ हा मेळावा आयोजित करण्यात आला होता, ऐन वेळी जळगाव मतदारसंघातून स्मिता वाघ यांची लोकसभेची उमेदवारी रद्द केल्यामुळं संतापलेल्या वाघ समर्थक आणि अन्य कार्यकर्त्यांमध्ये ही धक्काबुक्की झाली. **** नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर शेतकरी कार्यकर्ते तीन दिवसांपासून निदर्शनं आणि धरणं आंदोलन करत आहेत. जिल्ह्यात यावर्षी हळदीचं उत्पादन चांगलं होत असून शेतकरी हळद विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मात्र अडत व्यापारी हळद खरेदीसाठी पुढाकार घेत नसल्यामुळं हे आंदोलन पुकारल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** दरम्यान, हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत काल एकाच दिवशी हळदीच्या साडेचार हजार पोत्यांची आवक झाली. हिंगोलीच्या बाजारपेठेत पुसद, यवतमाळ, उमरखेड, हिंगोली, परभणी आदी भागातल्या शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी गर्दी केली आहे. हळदीला चांगला दर मिळाल्यामुळे ही आवक वाढली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** दुष्काळासह विविध प्रश्नांवर काल शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा, प्रत्येक गावात रोजगार हमीची कामे त्वरीत सुरू करा, जनावरांना चारा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. सीटूचे नेते, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी एल कराड, उद्धव भवलकर, किसान सभेचे राज्य सहसचिव विलास बाबर, शेतमजुर युनियनचे नेते मारूती खंदारे मोर्चात सहभागी झाले होते. या मागण्यांबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 AUG. 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १४ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
**** ** फोडा आणि राज्य करा ही इंग्रज निती वापरून भारतीय जनता पक्ष राज्य करत असल्याची राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांची टीका ** देशातल्या पहिल्या मेडिसिटीच्या कोनशिलेचं नागपूर इथं अनावरण ** पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती, राज्यात टंचाईसदृष्य परिस्थिती जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी आणि ** क्रिकेटमध्ये श्रीलंका संघाला फॉलो ऑन, भारताला तिसऱ्या कसोटी सामन्यातही विजयाची संधी **** फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची निती वापरून भारतीय जनता पक्ष राज्य करत असल्याची टीका राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याच्या उद्घाटनासाठी ते काल औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी वार्ताहरांशी बोलतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने विसरले असून केवळ स्वत:चा का��्यक्रम राबवण्यात मश्गुल असल्याचं ते म्हणाले. निवडणुकीत दहा कोटी युवकांना नो��ऱ्या देण्याचं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्च आणि ५० टक्के नफा देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं, हे आश्वासन ते आता विसरले आहेत. आज शेतकरी रोज आत्महत्त्या करत आहेत. त्याकडे त्यांचं लक्ष नाही. पण पाच वेळा अमेरिकेला भेट देण्याचं आणि एकूण ६५ देशांना भेटी देण्याचं ते विसरले नसल्याची उपहासात्मक टीका आझाद यांनी यावेळी केली. देशात प्रसार माध्यमं, महिला, अल्पसंख्याक, दलित, युवक, शेतकरी कुणीही सुरक्षित नसल्याचं सांगत केवळ संघ परिवार तेवढा सुरक्षित दिसतो, असं ते म्हणाले. **** नागपूर इथं उभारण्यात येणाऱ्या देशातल्या पहिल्या मेडिसिटीच्या कोनशिलेचं अनावरण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. भारत - ब्रिटनचा हा संयुक्त प्रकल्प आहे. देशात अशा प्रकारच्या ११ मेडिसीटी उभारण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोव्हेंबर २०१५ मधल्या ब्रिटन दौऱ्यात अशा प्रकारच्या मेडिसीटी उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. या मेडीसिटीमध्ये हजार खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार असून वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज तसंच विविध क्रीडा प्रकार, प्राणायम, योगा यांच्या माध्यमातून सुविधा पुरविण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलतांना सांगितलं. येत्या तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. **** पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता सरकारने राज्यात टंचाईसदृष्य परिस्थिती जाहीर करावी आणि त्वरित उपाययोजना सुरु कराव्यात अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ते काल औरंगाबादला आले होते, त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. तीन महिन्यांपासून पावसाने ओढच दिली असून यामुळे पिकं उद्ध्वस्त होत आहेत. सरकारने वेळीच उपाययोजना सुरु करण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलतांना केला. **** स्वातंत्र्यदिनी गावांमध्ये होणाऱ्या ग्रामसभांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-मनरेगा अंतर्गत आपल्या गावात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जास्तीत जास्त कामं मंजूर करुन घ्यावीत असं आवाहन रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी केलं आहे. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून चालू वर्षासाठी तीन हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होत असल्याचं ते म्हणाले. **** जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवानांना वीरमरण आलं. शोपिया जिल्ह्यात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच जवानांनी शोधमोहीम सुरु केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जवान हुतात्मा झाले. हुतात्मा जवानांमध्ये महा��ाष्ट्राच्या सुमेध गवई यांचा समावेश आहे. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. **** स्वातंत्र्या दिनाच्या पूर्व संध्येला सायंकाळी ७ वाजता आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशवासियांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर कोविंद प्रथमच राष्ट्राला संबोधित करत असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून त्यांचं हे भाषण प्रसारित केलं जाणार आहे **** इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला कालपासून औरंगाबादमधून प्रारंभ झाला. काँग्रेसचे नेते राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन काल झालं. या कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्यासाठी तयार करण्यात चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी बोलतांना आझाद यांनी इंदिरा गांधी यांचं जीवन संघर्षपूर्ण होतं, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या या संघर्षातून प्रेरणा घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. **** अंबाजोगाई इथं येत्या २३ आणि २४ डिसेंबरला होणाऱ्या ३९व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेच्या कार्यकारिणीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मराठवाडा साहित्य परिषदेचा जीनवगौरव पुरस्कार यंदा, परिषदेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष मधुकर अण्णा मुळे यांना जाहीर झाला आहे. २९ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद इथं, परिषदेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात मुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. **** भारत - श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत कॅन्डी इथं सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाला फॉलो ऑन देत, भारतानं सामन्यावर पकड मजबुत केली आहे. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात अवघ्या १३५ धावांवर सर्वबाद झाला. त्यापूर्वी काल सकाळी भारताचा पहिला डाव संपुष्टात आला. हार्दिक पंड्याचं ९६ चेंडूत सात षटकार आणि आठ चौकारांनी साकारलेल्या एकशे आठ धावा तसंच शिखर धवनच्या ११९ धावांच्या बळावर भारतानं पहिल्या डावात ४८७ धावा केल्या. कालचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंका संघाच्या दुसऱ्या डावात, एक बाद १९ धावा झाल्या होत्या. **** औरंगाबाद - पुणे मार्गावर गंगापूर फाट्याजवळ खासगी बस आणि जीप यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात जीपमधील काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय चौपाने यांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले. काल संध्याकाळी सहा वाजता ही घटना घडली. चालकाचं जीपवरील नियंत्रण सुटून ती प्रथम दुभाजकाला धडकून बाजूच्या रस्त्यावरुन औरंगबादकडे येणाऱ्या बसला धडकली. जीपमधील सर्वजण औरंगाबाद इथं आयोजित दिवंगत इंदिरा गांधी जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होऊन मुंबईला परत जात होते. जखमींवर औरंगाबाद इथं उपचार सुरु आहेत. **** शेतकरी कर्जमाफी तसंच हमीभाव यावरून शेतकरी संघटंनाना दिलेली आश्वासन पूर्ण न केल्याच्या पार्श्वभूमीवर सुकाणू समिती आज राज्यभर चक्काजाम आंदोलनं करणार आहे. या आंदोलनाची संपूर्ण तयारी झाली असल्याचं आयोजकांच्या वतीन सांगण्यात आलं आहे. **** जमिएत ए उल्मा हिंदच्या वतीनं काल जालना इथं शांती मार्च काढण्यात आला. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू झालेल्या या शांतता फेरीची सांगता सरस्वती भुवन शाळेजवळ झाली. परभणी जिल्ह्यात सोनपेठ, आणि औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथंही अशाच प्रकारची शांतता फेरी काढण्यात आली. **** महिला लोकप्रतिनिधींनी मौनी न राहता त्यांच्या कामाच्या वेळेचं योग्य नियोजन करुन, जनतेचे प्रश्न मांडून विकास प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन, भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या राष्ट्रीय सचिव कुमुदिनी भार्गव यांनी केलं. महिला लोकप्रतिनिधींसाठी ‘चला संधीचं सोनं करु या’ या कार्यशाळेचं आयोजन भारतीय स्त्री संघटनेच्या लातूर शाखेनं केलं होतं, त्यात त्या बोलत होत्या. लातूरचे महापौर सुरेश पवार यांनी या कार्यशाळेचं उद्घाटन केलं. त्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक शाखेच्या अध्यक्ष लीला कारवा या होत्या. **** औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या ठाकरवाडी इथं काल आदिवासी ठाकर आणि भिल्ल समाज जनजागृती मेळावा घेण्यात आला. दारिद्र्य असलेला, डोंगर वस्तीवर राहणारा आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या या समाजाच्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी पूर्ण करण्याचा विचार या मेळाव्याच्या निमित्तानं मांडण्यात आला. संशोधक डॉक्टर रमेश सुर्यवंशी यांनी सह्याद्रीचे खोरे, नाशिक, इगतपुरी, पुणे, खान्देश, कन्नड आदी ठिकाणी जाऊन आदिवासी समाजाची माहिती संकलित करण्यात आल्याची माहिती दिली. **** ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पंडीत नाथराव नेरळकर यांना लोकनेते विलासराव देशमुख स्मृती संगीत कलारत्न पुरस्कार जाहिर झाला आहे. मराठवाडा संगीत कला अकादमीतर्फे हा पुरस्कार दिला जातो. विशेष कार्यक्रमाचं आयोजन करुन नेरळकरांना पुरस्कार प्रदान होईल अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष तालमणी डॉक्टर राम बोरगावकर यांनी काल दिली. **** हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बहुतांश भागात रिमझीम पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 AUG. 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १० ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
**** ** गरीबातल्या गरीबाचं जीवनमान सुधारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचं पंतप्रधानांचं आवाहन ** गरिबी, कुपोषण, आणि भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्यासाठी, प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प करणं आवश्यक - नरेंद्र मोदी ** मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारची भूमिका सकारात्मक; मंत्रीमंडळाची उपससमिती मराठा समाजातल्या प्रतिनिधींशी नियमित चर्चा करणार आणि ** मुंबईत भव्य मराठा क्रांती मोर्चा **** गरीबातल्या गरीबाचं जीवनमान सुधारण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याचं भावनात्मक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केलं आहे. ‘नव भारत मंथन’ या कार्यक्रमाअंतर्गत देशभरातले सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि मुख्य सचिवांशी काल पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या १५ ऑगस्टपर्यंत १० ते १५ उद्दिष्टांचा समावेश असलेला आपल्या जिल्ह्याचा संकल्प आराखडा तयार करावा आणि येत्या पाच वर्षात म्हणजे २०२२ या आराखड्यातले सर्व संकल्प पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱ्यांशी साधलेल्या संवादाविषयी माहिती देतांना औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पाच वर्ष कालावधी म्हणजे २०१७ पासून २०२२ पर्यंत आपल्याला संकल्पापासून सिध्दी हा एक मुव्हमेन्ट आपल्याला घ्यायची आहे. जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम कर�� असताना याठिकाणची भौगोलीक परिस्थिती, सामाजीक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती किंवा आपला जो जिल्हा आहे, याठिकाणी कमी काय आहे. विकासाच्या दृष्टीने उणीवा काय आहे आणि ते भरून काढण्यासाठी किंवा प्रत्येक माणसाला समाजामध्ये शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याच्या दृष्टीने आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. आपल्या ज्या योजना आहेत, आपले जे कार्यक्रम आहेत खुप चांगल्या प्रकारे सक्सेसफुल कसं आपण करु शकतो यासाठी स्वतः पंतप्रधान महोदयांनी चांगलं आणि ईफेक्टीव असं मार्गदर्शन केलेलं आहे. **** औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनानं प्रशासन यंत्रणेला प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं. मराठवाड्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ संकल्प आराखडे तयार करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पंतप्रधानांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन यंत्रणा कटिबद्ध झाली असल्याचं सांगतांना ते म्हणाले, लोकांना ज्यांच्यासाठी काम करायचं आहे त्यांना सहभागी करुन घेणं, नवनविन टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन घेऊन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत कसं पोहोचेल, पारदर्शिपणा कसा आणता येईल, गरीबी निर्मुलनासाठी, जातीयवाद निर्मुलनासाठी, भ्रष्टाचार निर्मुलनासाठी सौख्यपरी प्रयत्न करणं, गरीबी, भ्रष्टाचार आणि जातियवाद मुक्त समाज निर्मितीसाठी जे स्वप्न पंतप्रधान महोदयांचं आहे, ते साकार करण्यासाठी त्याचप्रमाणे स्वछ ���ारत आणि गुणवान शिक्षण, आरोग्यपूर्ण सुविधा या संपूर्ण देण्यासाठी सर्वशासन यंत्रणा, जिल्हाधिकारी कटिबद्ध झालेले आहेत. **** गरिबी, कुपोषण, आणि भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्यासाठी, प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारत छोडो आंदोलनाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, संसदेत काल स्वातंत्र्य चळवळीतल्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्यासाठी विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. भ्रष्टाचारानं देशाच्या विकासाला पोखरलं असून यामुळे आमची व्यवस्था खिळखिळी झाली असल्याचं ते म्हणाले. २०१७ ते २०२२ ही पाच वर्ष १९४२ ते १९४७ सारखी असून १९४२ मध्ये ‘करेंगे या मरेंगे’ चा संकल्प करण्यात आला होता, आता आम्ही ‘करेंगे और कर के रहेंगे’ असा संकल्प करण्याची वेळ आली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. यावेळी बोलतांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर इंग्रजांनी अनेक अत्याचार केले, परंतु कोणीही ध्येयापासून मागे हटले नसल्याचं सांगितलं. मात्र आज देशाच्या धर्मनिरपेक्ष, उदार आणि स्वतंत्र विचारांना धोका निर्माण झाल्यासारख वाटतं असल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांची भाषणे झाली. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारची भूमिका सकारात्मक असून, मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाला लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगण्यात येईल, त्याचबरोबर मराठा समाजातल्या प्रतिनिधींशी नियमित चर्चा करण्यासाठी मंत्रीमंडळाची उपससमिती स्थापन करण्यात आली असून दर तीन महिन्याला ही समिती मराठा समाज संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत निवेदन करतांना सांगितलं. मुंबईत मराठा आरक्षणासाठी काल निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी विधानसभेत हे निवेदन केलं. मराठा आरक्षणासंदर्भातलं प्रकरण सध्या मागसवर्गीय आयोगाकडे असल्याचं ते म्हणाले. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात, मुख्यमंत्र्यांनी काल काही महत्वपूर्ण घोषणा केल्या. यामध्ये ‘राजश्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना ६०५ अभ्यासक्रमांमध्ये सवलती दिल्या जातील, शिष्यवृत्तीसाठी ६० टक्क्यांची अट शिथील केली जाईल, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व सवलती मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना मिळतील या घोषणांचा समावेश आहे. याशिवाय, मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह बांधण्यात येत असून त्यासाठी पाच कोटी रुपये दिले जाणार आहेत. ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा’ला निधी देण्यात आला असून शेतकरी कुटुंबातल्या तीन लाख तरुण-तरुणींना कौशल्य प्रशिक्षण तसंच व्याजात सवलतीसह दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. कोपर्डी प्रकरणातल्या साक्षीदारांच्या तपासणीचं काम संपलं असून खटल्याचं काम गतीनं सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानं समाधान न झाल्यामुळे दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ केला. मुस्लिम समाजाला आरक्षण न दिल्याच्या मुद्यावरुन विधानसभेत विरोधकांनी सभात्याग केला. विधान परिषदेतही विरोधकांनी सभात्याग करुन आपला निषेध नोंदवला. आजच्या निवेदनामुळे मोर्चेकरांचं समाधान झालेलं नाही, असं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नारायण राणे आणि शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचं स्वागत केलं. **** नोकरी आणि शिक्षणासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यां आणि इतर मागण्यांसाठी काल मराठा समाजानं मुंबईत ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’ काढला. भायखळ्याच्या जिजामाता उद्यानापासून सुरु झालेल्या या मोर्चाचं आझाद मैदानात सभेत रुपांतर झालं. लाखोंच्या संख्येनं राज्यभरातून आलेले कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये महिला आणि युवतींचं प्रमाण लक्षणीय होतं. यामुळे मुंबईतले रस्त्यांवर लोकांची प्रचंड गर्दी होती, त्याचप्रमाणे लोकल रेल्वेमध्येही गर्दीचा अनुभव पाहायला मिळाला. याचबरोबर संपूर्ण मोर्चा दरम्यान शिस्तीचं दर्शनही मोचेकऱ्यांनी घडवलं. **** औरंगाबाद इथं गेल्या बारा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ऑईल डेपोची स्थापना लवकरात लवकर करण्यात यावी असे आदेश पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. काल नवी दिल्ली इथं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाच्या सल्लागार समितीची बैठक झाली त्यावेळी हे आदेश देण्यात आल्याचं औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं. हा ऑईल डेपो उभारण्याची जबाबदारी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे अध्यक्ष एम. के. सुराणा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. *** औरंगाबाद महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आणि बाल कल्याण सभापती, चंद्रभागाबाई दाणे यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं. त्या ७२ वर्षांच्या होत्या. भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाच्या त्या ज्येष्ठ कार्यकर्त्या होत्या. आज अकरा वाजता पुष्प नगरी इथल्या स्मशान भूमीत त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. **** राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्तानं काल नाशिकच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयातर्फे येवला इथं विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विणकरांना सरकारी योजनांची आणि विणकाम क्षेत्रातल्या संधी याबाबत या कार्यक्रमातून माहिती देण्यात आली. इचलकरंजी इथंही काल राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात आला. **** औरंगाबादच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा -‘आत्मा’ कार्यालयातला लेखापाल सुनील जाधव याला ६६ लाख रूपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून काल पोलिसांनी अटक केली. शेतकऱ्यांना विविध अनुदानापोटी देण्यात येणाऱ्या रकमा त्यांने स्वत:च हडप केल्याचं उघडकीस आल्यानं प्रकल्प संचालक विलास रेणापूरकर यांनी त्याच्याविरूद्ध तक्रार नोंदवली होता. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 AUG. 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ ऑगस्ट २०१७ दुपारी १.००वा.
**** गरीबी, निरक्षरता आणि कुपोषण हे देशासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असून, या आव्हानांचा सामना करण्यासाठी सकारात्मक विचारांची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत छोडो आंदोलनाला आज ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, संसदेत आज स्वातंत्र्य आंदोलनातल्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्यासाठी विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. भारत छोडो आंदोलनातल्या घटनांच्या स्मरणानं देशवासियांना या आव्हानांचा सामना करण्यासाठी शक्ती मिळत असल्याचं ते म्हणाले. 'करेंगे या मरेंगे' या महात्मा गांधीजींच्या घोषणेवरुन आता 'करेंगे और करके रहेंगे' हा संकल्प घेऊन पुढे जाण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. तत्पूर्वी, कामकाज सुरु होताच अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतल्या क्रांतिकारकांचं, त्यांच्या बलिदानाचं स्मरण केलं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही छोडो भारत आंदोलनाची माहिती देत, स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण केलं. राज्यसभेतही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यासंदर्भात सरकारकडून निवेदन दिलं. देशाला स्वातंत्र्य प्राप्त करुन देण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी समाज परिवर्तनाची गरज ओळखून अनेक बदल घडवून आणले, त्याप्रमाणे आजही देशात सामाजिक परिवर्तनाची गरज असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही छोडो भारत आंदोलन, स्वातंत्र्य चळवळीतल्या आठवणींना उजाळा दिला. **** आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मुंबई इथं आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाचा मोर्चाला भायखळा इथल्या राणीबागेतून सुरुवात झाली आहे. आझाद मैदानात हा मोर्चा विसर्जित होणार असून, यावेळी विविध मागण्यांचं निवेदन सरकारला देण्यात येणार आहे. अनेक राजकीय नेत्यांसह लाखो नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. यामुळे मुंबईतल्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्यात आली आहेत. दरम्यान, राज्य विधिमंडळात आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ केला. विधानसभा आणि विधान परिषदेत कामकाज सुरु होताच विरोधी पक्ष सदस्यांनी मराठा आरक्षणाची मागणी लाऊन धरत, सभापतींच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी केली. यामुळे दोन्ही सभागृहांच कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकुब झालं. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी सात वाजता देशातल्या सर्व जिल्हाधिकार्यांसोबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. न्यू इंडिया अभियान आणि वर्ष २०२२ पर्यंतच्या विकास आराखड्यासंदर्भात ते यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** देशात पावसाळ्याच्या हंगामात उरलेल्या दोन महिन्यांमध्ये पाऊस सरासरी गाठेल, असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे. दीर्घ मुदत सरासरीच्या १०० टक्के पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हिंदी महासागराच्या उष्णतेशी निगडीत स्थिती सध्या स्थिर आहे, ही बाब येत्या दोन महिन्यांमध्ये सरासरीएवढा पाऊस होण्यासाठी उत्तम निदर्शक आहे, असंही विभागानं स्पष्ट केलं आहे. **** वस्तु आणि सेवा कर कायद्याअंतर्गत व्यावसायिक पहिला आयकर परतावा आणि करभरणा येत्या २० ऑगस्ट पर्यंत जीएसटीएन पोर्टलवर दाखल करू शकतील, असं राज्य कर सहाय्यक आयुक्तांनी कळवलं आहे. सुरवातीच्या काळात व्यावसायिकांना कायदापालन सुलभ व्हावं म्हणून जुलैपासून दोन महिन्याचे परतावे स्वयंनिर्धारणेच्या आधारे दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. **** अयोध्येच्या वादग्रस्त जागेपासून जवळच मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागात मशिदीची उभारणी करायला हरकत नसल्याचं प्रतिज्ञापत्र, उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे. बाबरी मशिदीची जागा शिया वक्फ मंडळाची मालमत्ता आहे. त्यामुळे याबाबत कुठल्याही पक्षकाराबरोबर चर्चा करण्याचा अधिकार फक्त मंडळाचाच असल्याचं त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे. अयोध्या प्रकरणात अलाहबाद उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर दाखल याचिकांवरच्या सुनावणीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती ११ ऑगस्टपासून या याचिकांवर सुनावणीला सुरुवात करणार आहे. **** आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीनं जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताच्या रवींद्र जडेजानं अव्वल स्थान पटकावलं आहे. फलंदाजांच्या यादीतही नऊ स्थानांची झेप घेत जडेजा ५१व्या स्थानावर पोहोचला आहे. **** औरंगाबादचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात सकाळी नऊ वाजेपासून रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मेळाव्यामध्ये औरंगाबाद, पुणे इथल्या विविध क्षेत्रातल्या २० कंपन्या ७१० पदासाठी मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवाराची निवड करणार आहेत. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र ०९ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.०० वाजता
**** भारत छोडो आंदोलनाला यंदा पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत असून, यानिमित्त आज देशभरात विविध संघटनांतर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीत भारतीय राष्ट्रीय संग्रहालयात भारत छोडो आंदोलन आणि आझाद हिंद फौजेशी संबंधित प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. दरम्यान, यंदाच्या सत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त २०१७ ते २०२२ हे पाच वर्ष जनआंदोलनाचे वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहेत. ‘संकल्पातून समृद्धी’ हा या आंदोलनाचा विषय आहे. **** मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं आज मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा��्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतल्या सगळ्या शाळांना आज ��ुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, या मोर्चाला **रिपब्लिकन पक्ष आठवले गटानं पाठिंबा जाहीर केला आहे. मराठासह देशातल्या गुर्जर, जाट, लिंगायत ब्राम्हण आदी उच्चवर्णीयांमधल्या आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण मिळायला हवं, असं पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. **** जालना जिल्ह्यातल्या बाबुवाडी सिंचन तलावाच्या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना तातडीने देण्याचे निर्देश जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत. या प्रकल्पाच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्पासाठी जमिनी दिलेले शेतकरी मोबदल्यावाचून प्रलंबित आहेत. **** श्रीक्षेत्र माहूरगड पर्यटन विकासाच्या सुधारीत आराखड्यानुसार विकास कामांना वेळापत्रकानुसार गती दयावी असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी संबंधितांना दिले आहेत. नांदेड इथं जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करुन त्यांच्यावर हद्दपारीचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही भापकर यांनी यावेळी दिले. **** परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यात गोदावरी नदीतून वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या आठवड्यात १२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, अनेक वाहनं जप्त करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे वाहन-चालक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही मोहिम अजून काही दिवस सुरुच राहणार असल्याचं तहसिलदार जिवराज डापकर यांनी सांगितलं. ****
0 notes