#अयोध्या भेट
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी सेमीकॉन इंडिया २०२४ या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, आजचे युग हे सिलिकॉन डिप्लोमसीचे युग आहे. हा कार्यक्रम योग्यवेळी ठेवण्यात आला आहे. आज भारत सर्वच क्षेत्रांमध्ये जगाला आत्मविश्वास निर्माण करून देत आहे. इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. सेमीकंडक्टर संबंधित पायाभूत सुविधांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. भारतात डेटा सेंटरची मागणी सातत्याने वाढत आहे. ती पूर्ण केली जाईल.
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी, राज्य शासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेडहून २० ते २२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी दिली. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ७०० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २०० अर्ज पात्र ठरले आहेत. यातील १०० ज्येष्ठांनी अयोध्या दर्शनाचा पर्याय निवडला आहे तर ७० हून अधिक ज्येष्ठ तिरुपती बालाजी दर्शनासाठी इच्छुक आहेत. अयोध्यासमवेत नांदेडहून अमृतसर इथल्या सुवर्णमंदिर दर्शनासाठीही तयारी केली जात आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. योजनेअंतर्गत ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
****
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रकाशयोजनेतील जागतिक आघाडीवर असलेल्या सिग्नीफायने देशातील सर्वात मोठ्या प्रदीप्त मोदकांचे अनावरण केले आहे. मुंबईत स्थापन झालेल्या या प्रदीप्त मोदकाचे नाव एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. १६ फूट उंच आणि ४ फूट पायथ्याशी असलेल्या या मोदकाला प्रकाश देण्यासाठी फिलिप्सचे दिवे लावण्यात आले आहेत. हा मोदक ७ सप्टेंबरपासून पुढील ११ दिवसांसाठी चिंतामणी गणपती मंडळ आणि मुंबईतील लाल बागचा राजा चौकात बसवण्यात आला आहे.
****
लातूर महानगरपालिकेने गेल्या ५ दिवसात शहरातून एक हजार ६४० मेट्रिक टन कचरा उचलला आहे. आगामी ८ दिवसात उर्वरित कचरा उचलण्याची ग्वाही मनपाच्या वतीने देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नियुक्त संस्थेच्या कंत्राटाचा कालावधी संपला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी संस्था नेमण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचं, महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
****
नवी मुंबई महापालिकेचे 'पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने परवानगी दिली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची १ जुलै रोजी दिल्ली येथे भेट घेऊन तात्काळ परवानगी मिळण्याची आग्रही मागणी केली होती.
****
भंडारा गोंदिया जिल्ह्यात काल ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखिल तुटला आहे. जिल्ह्यातील जीवनदायी असलेल्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे २७ दरवाजे दीड मीटर��े तर ६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. या पावसामुळे नदीकाठावर असलेल्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडल्यानं १७ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. विविध भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भात येत्या २४ तासात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
0 notes
Text
‘राज ठाकरेंना अयोध्येत पाऊलही ठेऊ देणार नाही’ म्हणणारे ब���जभूषण सिंह ‘महाराष्ट्रात येणार…’
‘राज ठाकरेंना अयोध्येत पाऊलही ठेऊ देणार नाही’ म्हणणारे बृजभूषण सिंह ‘महाराष्ट्रात येणार…’
‘राज ठाकरेंना अयोध्येत पाऊलही ठेऊ देणार नाही’ म्हणणारे बृजभूषण सिंह ‘महाराष्ट्रात येणार…’ नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येला भेट देणार होते, परंतु भाजप खासदार ब्रिजभुषण यांनी आम्ही राज ठाकरेंना अयोध्येत पाऊलही ठेऊ देणार नाही असे म्हटले होते. तसेच “राज ठाकरे दबंग नाही…
View On WordPress
#अयोध्येत#आहे#गंभीर#ठाकरेंना#ठेऊ#देणार#नाही#पाऊलही#बृजभूषण#महाराष्ट्रात#मुद्दा#म्हणणारे#येणार?#राज#सिंह
0 notes
Text
'पहिले मंदिर, फिर सरकारच्या घोषणांनी राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला', असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले.
‘पहिले मंदिर, फिर सरकारच्या घोषणांनी राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला’, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे इमेज क्रेडिट स्रोत: Tv9 Twitter (@TV9UttarPradesh) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला पोहोचले आहेत. येथे ते म्हणाले की, आदित्य ठाकरे म्हणाले की, माझा हा प्रवास पूर्णपणे धार्मिक प्रवास आहे. आमची रामलल्ला यांच्यावर श्रद्धा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव…
View On WordPress
0 notes
Photo
#जय_श्रीराम ।। ....✨🙏🇮🇳🙏✨.... विश्व हिन्दू परिषद अमरेली द्वारा अयोध्या में राम मंदिर निर्माण के लिए इट भेट स्वरूप प्रदान करते हुए...✨🙏✨.... एवम आज के इस #ऐतिहासिक व पावन पर्व पर सभी देशवासियों को रामजन्मभूमि मंदिर के निर्माण के #शिलान्यास पर खूब खूब बधाई...✨🙏🇮🇳🙏✨.... https://www.instagram.com/p/CDghQ7CD_ig/?igshid=1eoi3y3achptv
1 note
·
View note
Photo
खुद किसी से 10 रुपये से ज्यादा का चढ़ावा स्वीकार नही करते पर जब अयोध्या राम मंदिर निर्माण की बारी आई तो दस दस रुपये के ढाई लाख रुपये दिए। निमाड़ नर्मदा मइया के किनारे रहने वाले पूज्य सियाराम बाबा ने अपने 10 10 रुपये की आई भेट को राम मंदिर निर्माण में समर्पित करदिया। साभार pic.twitter.com/NowGfPu1I3
— कालीचरण महाराज (@kaalicharan_ji) February 26, 2021
0 notes
Photo
रामनगर कॉलोनी स्थित शिवालय परिवार में भगवान शिव का दर्शन करते दोनों सांसद व शिवालय परिवार की ओर से शिव परिवार का चित्र भेंट करते सिंधी समाज के लोग अयोध्या। अपनी मेहनत के बल पर सिंधी समाज ने देश में तरक्की की शरणार्थी से पुरुषार्थी बनकर देश में एक नई पहचान बनाई यह बातें बीते बुधवार को अयोध्या आगमन पर रामनगर कॉलोनी स्थित शिवालय परिवार पहुंचकर फिल्म अभिनेता और गोरखपुर से सांसद रवि किशन ने कही उन्होंने कहा कि सिंधी समाज सेवा के क्षेत्र में आगे रहकर जरूरतमंदों की सेवा करता है भाजपा प्रदेश महामंत्री व कन्नौज से सांसद सुब्रत पाठक ने इस मौके पर कहा कि संसद में पारित नागरिकता संशोधन बिल का सबसे अधिक लाभ सिंध प्रदेश से आए सिंधी समाज के लोगों को मिल रहा है उन्हें भारत की नागरिकता दी जा रही है जो कि ऐतिहासिक कार्य है शिवालय के महंत गणेश राय व सिंधी समाज के मुखिया भीमन दास माखेजा ने दोनों सांसदों से यह मांग की कि सरकारी पाठ्य पुस्तकों में प्रभु झूलेलाल का जीवन परिचय शामिल व उत्तर प्रदेश सिंधी अकादमी का बजट बढ़ाया जाए दोनों सांसदों का ओम शिवालय परिवार की ओर से शिव परिवार की प्रतिमा भेट कर व माला पहनाकर स्वागत किया गया। इस अवसर पर समाज के मुखिया राजा हेमनानी, भक्त प्रहलाद सेवा समिति के अध्यक्ष राजकुमार मोटवानी, आसुदा राम बत्रा, महेश बत्रा, ओम प्रकाश केवलरामानी, जयराम दास केवलरामनी, टीकम दास केवलरामनी, जतिन राजपाल, बंटी माखेजा, कान्हा राय, पवन लधानी, गुंजन वलेशाह, सुरेश भारतीय, राजन संगतानी, ठाकुर दास आदि मौजूद रहे।
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०१ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
महाराष्ट्र दिन आज साजरा होत आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून, आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू या, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. देशात सध्या लोकसभेसाठी निवडणुका सुरू आहेत, लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
****
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्��ावा यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या १०५ हुतात्म्यांच्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, तर नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते, बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, लातूर इथं राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते, धाराशिव इथं पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते, हिंगोली पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते, तर नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अयोध्या दौर्यावर जाणार असून, संध्याकाळी त्या श्रीराम जन्मभूमी मंदीरात दर्शन घेणार आहेत. त्यानंतर हनुमागढी इथं भेट देऊन, त्या शरयू आरतीमध्ये सहभागी होणार आहेत.
****
तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत १९ रुपये कपात केली आहे. त्यानुसार मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत एक हजार ६९८ रुपये पाच पैसे इतकी झाली आहे. हे नवे दर तत्काळ प्रभावाने लागू झाले.
****
0 notes
Photo
हुनर ब��ल कल्याण एवं सेवा समिति की तरफ से आज गंगाजल लेकर श्री राम की नगरी अयोध्या में भेट किया जाएगा हाथ से किया हुआ दान और मुख से लिया श्री राम का नाम कभी व्यर्थ नहीं जाता बोलो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम https://www.instagram.com/p/CDgRhw8pvz_/?igshid=eqexjw4bmrfg
0 notes
Text
प्रेम र आदर्शका प्रतीक श्रीराम
वर्तमानमा कतिपय आफूलाई आधुनिक भन्नेहरू र आफूलाई शिक्षितमा गन्नेहरू रामको कुरा निस्क्यो भने नाक खुम्च्याउँदै पाण्डित्य प्रदर्शन गर्न थाल्छन् र भन्छन्( राम कुनै आदर्श पुरुष होइनन् । लुकेर वालीको हत्या गर्ने, पत्नीको विश्वास नगरेर अग्निपरीक्षा लिने र सामान्य धोबीका कुरा सुनेर गर्भवती अवस्थामा रहेकी पत्नीलाई परित्याग गरेर जङ्गल पठाउने रामलाई कसरी आदर्श पुरुष मान्ने रु फेरि कोही कोही त कहाँसम्म भन्न भ्याउँछन् भने राम कुनै ऐतिहासिक पात्र नै होइनन्।
यो सानो लेखमा हामी यिनै कुराका वरिपरि रहेर छलफल गर्नेछौं । आधुनिकताको आडम्बरले रङमगिँदा रङमगिँदै पनि कुनै मिलेको जोडी देख्नासाथ हाम्रा मुखबाट अनायास वाक्य फुत्कन्छ( आहा राम र सीताको जोडीजस्तो। हामी आफ्नो राज्यलाई जहिले पनि रामराज्य जस्तै बनोस् भन्ने कामना गर्छौं। जब दाजुभाइबीचको अगाध म��याको उदाहरण दिनुपर्छ तब फेरि उनै राम हाम्रा अगाडि आउँछन् । भन्छौं( दाजुभाइका बीचमा प्रेम होस् त रामलक्ष्मणको जस्तो होस् १ छोरालाई कर्तव्यको पाठ सिकाउन मन लाग्दा उनै रामको सम्झना आउँछ ।
वास्तवमा राममाथि धेरै अन्याय भएको छ । यो अन्याय महापण्डितहरूले रामकथा सुनाउँदा हाम्रा दिमागमा भरेका कुराहरूका कारण भएको हो । त्यसैले हामीले रामको पीडालाई आत्मसात गर्न सकिरहेका छैनौं । उनले आफूलाई पीडामा होमेर पनि आदर्श र प्रेमको रक्षा गरेको कुरा हाम्रा पूर्वाग्रह पीडित दिमागमा घुस्न सकिरहेको छैन।
हाम्रा पौराणिक ऋषिहरूका दृष्टिमा राम यत्तिकै आदरणीय र पूजनीय बनेका होइनन् । उनलाई यत्तिकै मर्यादा पुरुषोत्तम भनिएको पनि होइन । उनी वास्तवमै मर्यादा पुरुषोत्तम हुन् । प्रेम र आदर्शका प्रतीकका रूपमा कसैलाई रोज्नुपर्दा रामबाहेक अर्को पात्र फेला पार्नै सक्दैनौं।
जब पिता दशरथले कैकेयीलाई दिएको वचन पूरा गर्न रामलाई १४ वर्ष वनवास जानुपर्ने भयो, तब रामले आफ्ना पिताको बाध्यता बुझेर कत्ति पनि विचलित नभई आज्ञापालन गर्ने निश्चय गर्छन् । कैकेयीको षड्यन्त्र र पिताको लाचारीसँग लक्ष्मण रिसाउन खोज्दा पनि रामले भाइलाई सम्झाएको घटना कम्ती मार्मिक छैन। उनी हर ठाउँमा प्रेम र आदर्शका प्रतीक बनेर उभिएका देखिन्छन् ।
लोकमणि पौडेल
वनवासका १३ वर्ष पूरा हुनै लागेका बेला रामकी पत्नी सीताको अपहरण भयो । उनी र लक्ष्मण सीताको खोजीमा हिँडे । बाटामा जोजो भेट्थे सोध्थे, भेटेकामध्ये धेरैले दक्षिण दिशातिर सङ्केत गर्थे । हिँड्दै जाँदा पखेटा काटिएको जटायू भेट भयो। जटायूले रावणले अपहरण गरेर लगेको कुरा सुनायो । झण्डै ३००० किमी पर हिँड्दै गएर अनि समुद्र तरेर लङ्का पुगी महाबली रावणलाई परास्त गरी सीतालाई फिर्ता ल्याउनु दुई दाजुभाइका लागि सोच्दै असम्भव लाग्ने कुरा थियो। उनीहरू आफ्नो राज्यबाट निर्वासित जीवन गुजार्दै थिए। लानेले लगिसक्यो। त्यो पनि त्यति पर। भइहाल्यो अब फर्कौं । अरू वर्ष दिन गुजारेर १४ वर्ष पुगेपछि दरबार जाउँला । अर्कै बिहे गरेर घरजम गरौंला । यो असम्भवप्रायः काममा नलागौुं रामले एस्तो सोचेनन् । उनी आदर्श पति थिए, सीतालाई अगाध माया गर्थे । झण्डै साठी दिन लगाएर किष्किन्धा पुगे । अहिलेका हामी धेरै कठोर भइसकेका छौं । मायालाई नाफा घा��ाको तराजुमा जोख्न खोज्छौं, त्यसैले राम बुझ्दैनौं । रामको पीडा बुझ्दैनौं ।
रामले किष्किन्धा पुगेपछि धेरैका मुखबाट वालिको ज्यादति सुने । वाली निकै बलवान् भएको र आमनेसामने भएर लड्दा जित्नै नसकिने रहस्य पनि सुने । भाइ सुग्रीवको राज्य र सुग्रीव पत्नी दुवै बलजफ्ती कब्जा गरेको पनि थाहा पाए । सुग्रीव कमजोर र अन्यायबाट पीडित भएको पनि बुझे । बलियो वालीलाई साथ लिएको भए रावणलाई जित्न धेरै सजिलो पर्ने अवस्था हुँदाहुँदै पनि अन्यायमा परेका कमजोरका पक्षमा उभिए । वालीलाई लुकेरै भए पनि मार्नुमा न्याय देखे ।
८४ दिन रावणसँग युद्ध भयो । रावणलाई जितेपछि लक्ष्मणले रामलाई त्यही सुनैसुनको वैभवशाली लङ्कामा राजा भएर बस्न सुझाए तर रामले मानेनन् । रामले लक्ष्मणलाई भने-
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते ।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥
हे लक्ष्मण मलाई यो सुनैसुनले भरिएको वैभवले सम्पन्न लङ्का पनि प्रिय लाग्दैन । ९हाम्रा लागि० जन्मभूमिरूपी आमा स्वर्गभन्दा पनि महान् हुन् । रामका यी वाणीको प्रभाव अहिले संसारभरि परेको छ। जन्मभूमिलाई प्रेम गर्न हामीले रामबाटै सिकेका हौं ।
अयोध्या फर्कने क्रममा रामका मनमा आफ्नी प्रिय सीतालाई लिएर एउटा प्रश्न उब्जियो(सीतालाई यत्तिकै लिएर जाने हो भने अबुझहरूले सीताको कुरा काट्ने छन् । कुरा काटेको सीताले सुनिन् भने कति पीडित होलिन् रु त्यसैले रामलाई अयोध्या फर्कनुभन्दा अगाडि सबैका सामुन्ने सीताको पवित्रता देखाउने रहर भयो । बडो सुझबुझपूर्वक ठूलो परीक्षा ९अग्निपरीक्षा० को आयोजन गरे । सीतालाई परीक्षाबाट सफल भएको सबैकासामु देखाए।
रावणलाई जितेर अयोध्या फर्किएपछि राम अयोध्याका राजा बनेर देशको सेवामा जुटे । केही वर्षपछिको एउटाशिशिर ऋतु सकिनै लाग्दा सीताको पेट बढेको देखेर रामले सीता गर्भवती भएको लख काटे र भने-
दृष्ट्वा तु राघवः पत्नीं कल्याणेन समन्विताम् ।
प्रहर्षमतुलं लेभे साधु साध्विति चाब्रवीत् ।। ७।४२।२९ ।।
किमिच्छसि वरारोहे कामः किं क्रियतां तव ।
स्मितं कृत्वा तु वैदेही रामं वाक्यमथाब्रवीत् ।। ७।४२।३१ ।।
तपोवनानि पुण्यानि द्रष्टुमिच्छामि राघव ।
गङ्गातीरोपविष्टानामृषीणामुग्रतेजसाम् ।। ७।४२।३२ ।।
हे सीता १ तिमीमा गर्भधारणका सबै लक्षण स्पष्ट देखेर मेरो मन खुसीले भरिएको छ, तिमीलाई हृदयदेखि नै बधाई छ । यो खुसियालीमा मनमा लागेको कुरा ��ाग, म जसरी पनि पुर्याउँछु । रामका यस्ता प्रेमले भरिएका वचन सुनेर सीताले गङ्गाका तीरमा अवस्थित आश्रमको अवलोकन गर्ने र ऋषिहरूलाई फलफूल खुवाउने इच्छा व्यक्त गरिन्।
तर त्यसको लगत्तै एउटा अकल्पनीय घटना घट्यो । राजा राम छद्मभेषमा जनताका समस्या बुझ्दै हिँड्दा एउटा धोबीका घर नजिकै पुगे । धोबीले आफ्नी पत्नीलाई गरेको गालीउनका कानमा पर्यो-म रामजस्तो होइन जसले रावणले हरण गरेर लगेकी सीतालाई पनि रानी बनाएर राख्छन् । तँ परपुरुषसँग हिँडेको थाहा पाउनासाथ तँ मेरा लागिमरी सकिस् । म तँलाई अब यो घरमा पत्नी बनाएर एक पल पनि राख्न सक्दिनँ । यो सुनेर राम व्यथित भए । चुपचाप दरबार फर्किए । भोलिपल्टै सल्लाहकारहरूको भेला डाके । सीताका बारे जनताको अभिमत जान्न खोजे । केही जनताले कुरा काट्ने गरेको थाहा पाए । जनताका दृष्टिमा दरबारले आस्था गुमाउनुलाई ठूलो समस्या ठाने । त्यसका लागि स्वयंको मुटु झिक्न तयार भए तर कुरा काट्ने जनतालाई सजायँ दिने बारेमा कत्ति पनि सोचेनन् । अहिलेका जस्तै शासक हुन्थे भने अथवा रामका ठाउँमा रावण हुन्थे भने केधोबी तथा कुरा काट्ने मुट्ठीभर जनतालाई बाँकी राख्थे रु त्यसैले त हामी रामराज्यको कामना गर्छौं ।
उनले दरबारलाई जनताका दृष्टिमा गिर्न नदिन सीतालाई परित्याग गरी सीतालाई उनैले मन पराएको तमसा र गङ्गाका किनारमा अवस्थित वाल्मीकि आश्रममा पठाउने निधो गरे । सीतासँग अलग भएका ती दिनहरूमा पत्नीलाई नसम्झेका उनका कुनै पल हुँदैनुथे ।
राम एकपत्नीव्रत थिए । यो पनि रामबाट हामीले सिकेको अर्को प्रमुख आदर्श हो । बहुविवाह गर्ने अनगिन्ती ऐतिहासिक पात्रहरू छन् तर हामीलाई तिनीहरूको आदर्श मनासिब लागेन।रामका समयमाराजा(महाराजाहरूले बहुविवाह गर्ने सर्वमान्य प्रचलन जस्तै थियो। आफ्नै पिता दशरथका तीनतीन श्रीमती थिए। तर रामले सीतासँग अलग भएर बस्दा पनि बिहे गर्ने बारेमा सपनामा पनि सोचेनन् ।
सीताप्रति को मायालाई कहिल्यै घट्न दिएनन्।सीतालाई परित्याग गरेर वाल्मीकि आश्रम पठाएपछि पनि रामले बिहे गरेनन् । रानी नभएको दरबार दरबार होइन । विनापत्नी यज्ञ हुँदैन । जस्ता कुरा सुन्दासुन्दै आजित भएका रामलेअर्को बिहे गर्नुभन्दा सीताको प्रतिमूर्ति बनाउनु उपयुक्त ठाने । जब कुनै पूजा यज्ञादि गर्नुपर्ने हुन्थ्यो र वामाङ्गी (पत्नी)को आवश्यकता पर्थ्यो तब त्यो प्रतिमा ल्याएर आफ्नो देब्रेतिर राख्थे। वाल्मीकि रामायणको यो श्लोकले यो कुराको पुष्टि गर्छ-
न सीतायाः परां भार्यां वव्रे स रघुनन्दनः
यज्ञे यज्ञे च पत्न्य��्थं जानकी काञ्चनी भवत् ।।७।९९।७।।
त्यति मात्र होइन, वाल्मीकि आश्रममा हुन सक्ने सीताको दैनन्दिनी सम्झेर रामले आफू पनि भुइँमा कुशासनमा सुत्न मन पराए । राजा भएर पनि, दरबारमा रहेर पनि पर्णकुटीकै जस्तो जीवन बिताउने हरसम्भव प्रयास गरे । लोकापवादका कारण रामले आफूलाई परित्याग गरेका हुन् भन्ने कुरा उता सीताले पनि बुझ्थिन् । दुवै अलग अलग भएर पनि सँगै थिए। प्रेमले गाँसिएका थिए, हृदयले जोडिएका थिए। हामीले यसलाई ऐतिहासिक सत्यका रूपमा आत्मसात गर्न सकिरहेका छैनौं । किनभने हाम्रो विचार र रहनसहनमा कोरा भौतिकवादको कालो छाया पर्दै गएको छ ।
रामको जीवनीले हामीलाईप्रेम र कर्तव्यका अनेक आदर्श पाठ अवलम्बन गर्न प्रेरणा दिन्छ । हामीले थाहै नपाईकन राम हाम्रा नसा(नसामा समाहित भएका छन् । राम हाम्रो समाजका अभिन्न अङ्ग बनिसकेका छन् । भगवान्का नाम लेखिएका पहेँला पछ्यौराहरूलाई हामी ूरामनामीू भन्छौं चाहे तिनमा शिव या कृष्णकै नाम लेखिएको किन नहोस् । हामीलाई जीवनका अन्तिम घडीमा पनि राम नाम सत्य होू भन्ने बानी परिसकेको छ ।
0 notes
Text
राज ठाकरे भडकले; जगू द्याल की नाही ...!
राज ठाकरे भडकले; जगू द्याल की नाही …!
राज ठाकरे भडकले; जगू द्याल की नाही …! मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.ते आता अयोध्या दौरेमुळे चर्चेत आहेत. ते जिथे जातील त्यांच्या मागे माध्यमांचे कॅमेरे मागावरच असतात. काल ते पुण्यात अभिनव चौकात अक्षरधारा बुक गॅलरीत एका दुकानात भेट देण्यासाठी आले असता प्रसार…
View On WordPress
0 notes
Text
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या यात्रा पुढे ढकलली, रामलल्लाच्या दर्शनाचा कार्यक्रम ५ जूनला होणार आहे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या यात्रा पुढे ढकलली, रामलल्लाच्या दर्शनाचा कार्यक्रम ५ जूनला होणार आहे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या यात्रा पुढे ढकलली आहे प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या यात्रेची घोषणा केली होती. मात्र आता त्यांनी हा प्रवास पुढे ढकलला आहे. 22 मे रोजी होणाऱ्या पुण्यातील सभेत ठाकरे याबाबत अधिक माहिती देणार आहेत, अशी माहिती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर) 5 जून…
View On WordPress
0 notes
Photo
अयोध्या : हनुमानगढ़ी में पीएम मोदी ने बजरंवाली की उतारी आरती
अयोध्या : भारत वर्ष के इतिहास में आज का दिन अयोध्या के लिए बहुत नया अध्याय है, 492 वर्ष तक चली संघर्ष-कथा का अपना ‘उत्तरकांड’ है। अपनी माटी, अपने ही आंगन में ठीहा पाने को रामलला पांच सदी तक प्रतीक्षा करते रहे तो रामभ��्तों की ‘अग्निपरीक्षा’ भी अब पूरी हो रही है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बुधवार यानी आज दिन में अभिजीत मुहूर्त में श्रीराम जन्मभूमि में भव्य राम मंदिर के निर्माण के लिए भूमि पूजन करने के साथ ही आधार शिला भी रखेंगे। अयोध्या में श्रीराम मंदिर भूमि पूजन को लेकर अयोध्या में सारी तैयारियां पूरी की जा चुकी हैं।
ये भी पढें – अरविन्द केजरीवाल ने राम भूमिपूजन पर ट्वीट कर दिया बधाई
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहले दिल्ली से लखनऊ के अमौसी एयरपोर्ट पहुंचे और फिर वहां से हेलिकॉप्टर से अयोध्या रवाना हुए। पीएम मोदी रामनगरी के साकेत महाविद्यालय के हेलीपैड पर पहुंचे। वहां उनका स्वागत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने किया। इसके बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अयोध्या हनुमानगढ़ी मंदिर में प्रभु राम के भक्त हनुमान के पूजन और दर्शन किया और भूमि पूजन स्थल के लिए रवाना हो गए हैं। बस, अब प्रतीक्षा उस क्षण की है, जब बुधवार की दोपहर को अभिजित मुहूर्त में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भव्य राम मंदिर निर्माण के लिए भूमि पूजन करेंगे।
ये भी पढें – रथ यात्रा के 29 साल बाद अयोध्या पहुंचे पीएम मोदी
श्रीमंहत प्रेमदास जी ने पीएम मोदी को भेंट किया चांदी का मुकुट
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अयोध्या हनुमानगढ़ी मंदिर में प्रभु राम के भक्त हनुमान के पूजन और दर्शन किया। उन्होंने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के ��ाथ मंदिर की परिक्रमा भी की। हनुमानगढ़ी के गद्दीनशीन श्रीमंहत प्रेमदास जी ने पीएम मोदी को चांदी का मुकुट व रामनामी भेट कर स्वागत किया।
https://kisansatta.com/ayodhya-pm-modi-worships-bajranwali-in-hanumangarhi/ #AyodhyaPMModiWorshipsBajranwaliInHanumangarhi Ayodhya: PM Modi worships Bajranwali in Hanumangarhi National, Top, Trending #National, #Top, #Trending KISAN SATTA - सच का संकल्प
0 notes
Text
UddhavThackeray will visit Ayodhya dmp 82| मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार
UddhavThackeray will visit Ayodhya dmp 82| मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार
[ad_1]
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज्य सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येचा दौरा करतील. ते ��योध्येला भेट देतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी टि्वट करुन हे सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकसभा…
View On WordPress
0 notes
Quote
जीवन मंत्र डेस्क. भगवान हनुमान को शक्ति का प्रतीक माना जाता है। हनुमान एक ऐसे देवता हैं, जिनका मंदिर हर स्थान पर आसानी से मिल जाता है। कलियुग में सबसे ज्यादा भगवान शंकर के ग्यारहवें रुद्र अवतार श्रीहनुमानजी को ही पूजा जाता है। इसीलि��, हनुमानजी को कलियुग का जीवंत देवता भी माना जाता है। आज हम हम आपको कु�� विशेष मंदिरों के बारे में बता रहे हैं। 1. हनुमान मंदिर, इलाहबाद (उत्तर प्रदेश) इलाहबाद किले से सटा यह मंदिर लेटे हुए भगवान हनुमान की प्रतिमा वाला प्राचीन मंदिर है। इसमें हनुमान जी लेटी हुई मुद्रा में हैं। मूर्ति 20 फीट लम्बी है। जब बारीश में बाढ़ आती है तो मंदिर जलमग्न हो जाता है, तब मूर्ति को कहीं ओर ले जाकर सुरक्षित रखा जाता है। 2. हनुमानगढ़ी, अयोध्या अयोध्या भगवान श्रीराम की जन्मस्थली है। हनुमानगढ़ी मंदिर प्रसिद्ध है। यह मंदिर राजद्वार के सामने ऊंचे टीले पर बना है। मंदिर के चारों ओर निवास साधु-संत रहते हैं। हनुमानगढ़ी के दक्षिण में सुग्रीव टीला व अंगद टीला नामक जगह हैं। मंदिर की स्थापना 300 साल पहले स्वामी अभयारामदासजी ने की थी। 3. सालासर हनुमान मंदिर, सालासर(राजस्थान) यह मंदिर राजस्थान के चूरू जिले में है। गांव का नाम सालासर है, इसलिए सालासर बालाजी के नाम यह प्रसिद्ध है। यह प्रतिमा दाड़ी व मूंछ वाली है। यह एक किसान को खेत में मिली थी, जिसे सालासर में सोने के सिंहासन पर स्थापित किया गया है। 4. हनुमान धारा, चित्रकूट उत्तर प्रदेश में सीतापुर के पास यह हनुमान मंदिर है। यह पर्वतमाला के मध्य में है। हनुमान की म���र्ति के ठीक ऊपर दो कुंड हैं, जो हमेशा भरे रहते हैं। उनमें से पानी बहता रहता है। इस धारा का जल मूर्ति के ऊपर से बहता है। इसीलिए, इसे हनुमान धारा कहते हैं। 5. श्री संकटमोचन मंदिर, वाराणसी (उत्तर प्रदेश) यह मंदिर उत्तर प्रदेश के वाराणसी शहर में है। इस मंदिर के चारों ओर एक छोटा सा वन है। मंदिर के प्रांगण में भगवान हनुमान की दिव्य प्रतिमा है। ऐसी मान्यता है कि हनुमानजी की यह मूर्ति गोस्वामी तुलसीदासजी के तप एवं पुण्य से प्रकट हुई स्वयंभू मूर्ति है। 6. भेट-द्वारका, गुजरात भेज-द्वारका से चार मील की दूरी पर मकरध्वज के साथ में भगवान हनुमान की मूर्ति स्थापित है। कहते हैं कि पहले मकरध्वज की मूर्ति छोटी थी परंतु अब दोनों मूर्तियां एक सी ऊंची हो गई हैं। मकरध्वज को हनुमानजी का पुत्र बताया गया है, जिसका जन्म हनुमानजी के पसीने द्वारा एक मछली से हुआ था। 7. बालाजी हनुमान मंदिर, मेहंदीपुर (राजस्थान) राजस्थान के दौसा जिले के पास दो पहाडिय़ों के बीच बसा हुआ मेहंदीपुर है। यह मंदिर जयपुर-बांदीकुई-बस मार्ग पर जयपुर से लगभग 65 किलोमीटर दूर है। यह मंदिर करीब 1 हजार साल पुराना है। यहां चट्टान में हनुमान की आकृति स्वयं उभर आई थी। इसे ही श्री हनुमान जी का स्वरूप माना जाता है। 8. डुल्या मारुति, पूना (महाराष्ट्र) पूना के गणेशपेठ में बना यह मंदिर काफी प्रसिद्ध है। श्रीडुल्या मारुति का मंदिर संभवत: 350 वर्ष पुराना है। मूल रूप से डुल्या मारुति की मूर्ति एक काले पत्थर पर अंकित की गई है। इस मूर्ति की स्थापना श्रीसमर्थ रामदास स्वामी ने की थी। 9. श्री कष्टभंजन हनुमान मंदिर, सारंगपुर (गुजरात) अहमदाबाद-भावनगर के पास स्थित बोटाद जंक्शन से सारंगपुर 12 मील दूर है। महायोगिराज गोपालानंद स्वामी ने इस मूर्ति की प्रतिष्ठा की थी। जनश्रुति है कि प्रतिष्ठा के समय मूर्ति में भगवान हनुमान का आवेश हुआ और यह हिलने लगी। यह मंदिर स्वामीनारायण सम्प्रदाय का एकमात्र हनुमान मंदिर है। 10. हंपी, कर्नाटक बेल्लारी जिले के हंपी शहर में एक हनुमान मंदिर है। इन्हें यंत्रोद्धारक हनुमान कहा जाता है। यही क्षेत्र प्राचीन किष्किंधा नगरी है। संभवतः यहीं किसी समय वानरों का विशाल साम्राज्य स्थापित था। आज भी यहां अनेक गुफाएं हैं। Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Lord Hanuman10 special temples of Lord Hanuman, where devotees have the most faith
http://poojakamahatva.blogspot.com/2020/01/10_6.html
0 notes
Text
१८ खासदारांसह उद्धव ठाकरेंचा १६ जूनला अयोध्या दौरा
१८ खासदारांसह उद्धव ठाकरेंचा १६ जूनला अयोध्या दौरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. अयोध्येला उद्धव ठाकरे 16 जून रोजी भेट देणार असल्याची माहिती समोर येते. उद्धव ठाकरेंबरोबर शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदारही राहणार आहेत.
सहा महिन्यांपूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी राम मंदिराच्या बांधकामाचा मुद्दा उचलत उद्धव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 January 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जानेवारी २०२३ सकाळी ७.१० मि.****
ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोमुळे स्थानिक उद्योगांना जागतिक पातळीवर ओळख मिळेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेतंर्गत ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, महाराष्ट्राला ५०० कोटी रुपये मंजूर
अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यास जागा देण्याची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तयारी
राज्याच्या मतदार यादीत साडे चार लाखानं वाढ
झारखंडमधलं सम्मेद शिखर जी हे तीर्थस्थळच असेल, केंद्र सरकारची अधिसूचना जारी
आणि
दुसऱ्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांत श्रीलंकेचा भारतावर १६ धावांनी विजय
****
ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोमुळे कोट्यवधी रुपया���ची उलाढाल होईल, शिवाय स्थानिक उद्योगांना जागतिक पातळीवर ओळख मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद इथं ऑरिक या औद्योगिक नगरीत काल या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारोहात मुख्यमंत्री दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. ते म्हणाले..
‘‘वस्तूंची मागणी, रोजगार निर्मिती, आणि उत्पादन या तिन्ही बाबत राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. याला सरकारचं उद्योग��ूरक धोरणदेखील कारणीभूत आहे. या प्रदर्शनामुळे केवळ करोडो रुपयांची उलाढाल होणार नाही, तर स्थानिक उद्योगांना देशात आणि देशाबाहेरही ओळख मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मला वाटतो.’’
केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी यावेळी बोलताना, देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचं लक्ष्य गाठण्यात, एम एस एम ई ची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
‘‘मी एम एस एम ई बद्दल थोडं बोलणार आहे. कारण उद्योग हा अत्यंत महत्वाचा आहे. उद्योगांमुळे उत्पन्न वाढतं. देशाच्या तीस टक्के जीडीपी हा एम एस एम ई मुळे आहे. त्याचबरोबर जॉब क्रियेशनमध्ये एम एस एम ई महत्वाची आहे. सहा करोड जॉब एम एस इम ई मुळे मिळतात. आणि आपल्या देशाची फाईव्ह ट्रिलियन जर बनवायची असेल तर एम एस एम ई चा अत्यंत महत्वाचा रोल असणार आहे.’’
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केलेल्या भाषणात, लघु उद्योजकांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या जातील, असं आश्वासन देत, विकासाच्या बाबतीत मराठवाडा मागे राहणार नाही, असं नमूद केलं. हे प्रदर्शन राज्यातल्या इतर शहरातूनही भरवलं जावं, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
‘‘तुमच्या शक्य असलेल्या सगळ्या मागण्या या शिंदे-फडणवीस सरकारकडनं मान्य केल्या जातील. या मराठवाड्याच्या भूमीतनं, या एक्स्पोमधनं अनेक उद्योजक निर्माण होऊ शकतात एवढी ताकत या एक्स्पोमध्ये आहे. आणि म्हणून हे मुंबईला झालं पाहिजे, पुण्याला झालं पाहिजे, नागपुरला देखील झालं पाहिजे, आमच्या कोकणामध्ये झालं पाहिजे. आणि नक्की उद्योग विभाग काय आहे, कशा पद्धतीनं इंडस्ट्री चालते, हे ग्रामीण भागातल्या उद्योजकांना देखील कळलं पाहिजे.’’
तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात देशभरातल्या विविध शहरांमधून साडे सहाशेपेक्षा अधिक उद्योजकांनी आपापले स्टॉल्स उभारले आहेत.
****
केंद्र सरकारनं राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेतंर्गत ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार, महाराष्ट्राला ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून पहिल्या टप्प्यात वीज महानिर्मिती तसंच महापारेषणला २५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
****
उत्तरप्रदेशात अयोध्या इथं महाराष्ट्र भवन उभारण्यास जागा देण्याची तयारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दर्शवली आहे. आदित्यनाथ यांनी काल मुंबईत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. आदित्यनाथ यांनी राजभवनात असलेल्या क्रांतिगाथा, या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली तसंच संग्रहालयात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या स��मारकाला अभिवादन केलं.
****
महाराष्ट्रातली गुंतवणूक भाजपशासित उत्तर प्रदेशात पाठवण्याचा सध्याच्या सरकारचा कुटील डाव असल्याचा आरोप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या भाजपाशासित राज्यातली गुंतवणूक वाढावी, आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी व्हावं, यासाठीच महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं, असा आरोपही तयांनी केला. मुंबईत चित्रपट सृष्टीशी संबंधित उद्योग उत्तर प्रदेशात नेण्याच्या प्रयत्नांना राज्य सरकार मदत करत असल्याचं पटोले यावेळी म्हणाले.
****
लव्ह जिहाद विरुद्ध भारतीय जनता पक्ष शासित राज्यात करण्यात येत असलेले कायदे, हे घटनेतल्या हक्काचं उल्लंघन करणारे असल्यानं बेकायदेशीर आहेत, असा दावा, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन - एम आय एम चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. सध्या देशपातळीवर लव्ह जिहाद विरुद्ध कायदा करण्यासाठी काढण्यात येणारे मोर्चे कायदेशीर नसल्याचं ते यावेळी म्हणाले. तसंच देशात लव्ह जिहाद पेक्षाही बेरोजगारी- महागाई असे अनेक प्रश्न असून, सत्ताधाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्याचा साक्षीदार असलेल्या नळदूर्ग इथल्या ऐतिहासिक अलियाबाद पुलाला राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता मिळावी, तसंच या पुलाच्या रक्षणासाठी हुतात्मा झालेले आणि पहिला अशोकचक्र पुरस्कार मिळालेले सैनिक बचिंतरसिंग यांचं याठिकाणी भव्य स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं, केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी म्हटलं आहे. ते काल उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग इथल्या अलियाबाद पुलाला भेट दिल्यानंतर बोलत होते. याचबरोबर त्यांनी हुतात्मा सैनिक बचिंतरसिंग यांच्या प्रतिमेच पूजन करुन अभिवादन केलं.
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर निश्चित तोडगा निघेल, असा विश्वास मिश्रा यांनी व्यक्त आहे. सोलापूर इथं ते पत्रकारांशी बोलत होते. आगामी काळात देशात समान नागरी कायदा येणार असल्याचं सूतोवाचही त्यांनी यावेळी केलं.
****
राज्य निवडणूक आयोगानं मतदार पुनरीक्षण कार्यक्रमानंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. राज्यात सध्या नऊ कोटी तीन लाख मतदार आहेत, यापैकी चार कोटी ७१ लाख पुरुष तर चार कोटी ३१ लाख महिला आहेत. सात लाखावर मतदार दिव्यांग असून, तृतीयपंथी मतदारांची संख्या सुमारे पाच हजार एवढी आहे. एकूण मतदारांच्या संख्येत ��ेल्यावेळच्या तुलनेत सुमारे साडे चार लाखाने वाढ झाली आहे.
****
झारखंडमधलं सम्मेद शिखर जी हे तीर्थस्थळच असेल, असा निर्वाळा केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी दिला आहे. यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली असल्याचं त्यांनी काल दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या तीर्थ स्थळाचं पावित्र्य कायम राहावं, यासाठी केंद्र सरकारनं ठोस पावलं उचलली आहेत. या भागात कोणतंही बांधकाम केलं जाणार नाही, तसंच परिसरात हॉटेल्स, ट्रेकिंग आणि मांसाहारावर बंदी घालण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात औरंगाबाद विभागातल्या पैठण, लातूर विभागातल्या औंढा नागनाथ यासह मोहाडी, धामणगाव, अमळनेर, जत, महाड, पुरंदर हे तालुका पत्रकार संघ मानकरी ठरले आहेत. स्मृतिचिन्ह, आणि मानपत्र, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा लातूर जिल्ह्यात चाकूर इथं लवकरच होणार असल्याचं, परिषदेकडून सांगण्यात आलं.
****
विधान परिषदे��्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. यासाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे. शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्याची माहिती, औरंगाबाद विभागाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दिली आहे.
****
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन काल पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना मुख्य क्रीडा ज्योत सुपुर्द केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालेवाडीतल्या क्रीडा संकुलातली क्रीडा ज्योत प्रज्वलित करुन स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन केलं. यावेळी राज्याच्या विविध भागातून आलेल्या खेळाडूंनी मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. राज्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या ३९ क्रीडाप्रकारांच्या स्पर्धांमध्ये १० हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तीन टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या काल पुणे इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेनं १६ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघाने निर्धारित षटकार २०६ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल भारतीय संघ २० षटकात १९० धावाच करु शकला. सूर्यकुमार यादवनं ५१, अक्षर पटेलनं ६५ धावा केल्या. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं ब��ोबरीत आहेत.
****
औरंगाबाद इथं आज भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ.बाबासाहे�� आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या प्रशिक्षण आणि रोजगार निर्मिती केंद्र, तसंच फर्स्ट फ्लाय कॉर्पोरेट यांच्या संयुक्त विद्यमानं, विद्यापीठातल्या नाट्यगृहात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी नऊ वाजेपासून मुलाखती सुरु होणार आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्याचं आवाहन विद्यापीठाचे प्रशिक्षण आणि रोजगार निर्मिती केंद्राचे अधिकारी डॉ.गिरीश काळे यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद तालुक्यातल्या कसबे तडवळे इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा परिषद शाळेतल्या मुक्काम केलेल्या ठिकाणी त्यांचं भव्य स्मारक बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही माहिती दिली. कसबे तडवळे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची जागा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामासाठी उपलब्ध करुन देण्यास सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागानं काल पूर्वमान्यता दिल्यानं, गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्मारकाचं बांधकाम आता होणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा इथला ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सय्यद परवेज सलीम याला आठ हजार रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणी काल रंगेहात अटक करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या मंजूर अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याचे बिल काढण्यासाठी आष्टा कासार ग्रामपंचायतीच्या शिपायामार्फत त्याने ही लाच मागितली होती.
****
कामगार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आज दुपारी तीन वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, खाजगी कंपन्या आणि आस्थापनेत कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांची होत असलेली आर्थिक पिळवणुक थांबविण्यासाठी, कामगार कायद्याप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ आणि हक्क मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
****
अहमदनगर इथल्या शब्दगंध साहित्यिक परिषदेचे २०२१ यावर्षीचे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. औरंगाबादच्या हबीब भंडारे यांना 'जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता', या काव्यसंग्रहासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वादग्रस्त शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बिरगे यांनी एका शाळेला नैसर्गिक वर्ग वाढ देण्याची संचिका गहाळ करून शासनाची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिक्षण संचालक कार्यालयातले अ��ीक्षक दीपक पाटील यांच्या तक्रारीवरून शिक्षण संचालक सूरज मांढरे यांच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
****
हिंगोली इथला पुढच्या आठवड्यातला नियोजित राज्यस्तरीय हळद महोत्सव शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाल्याने पुढे ढकलण्यात आला आहे. आचारसंहिता संपताच या महोत्सवाचं नियोजन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा कृषि महोत्सव समितीकडून देण्यात आली आहे.
****
परभणी इथं येत्या १३ ते १५ जानेवारी दरम्यानं ११ वं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल महाराज पाटील यांनी ही माहिती दिली. खासदार संजय जाधव हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असतील.
****
हिंगोली जिल्ह्यात शालेय पोषण आहारात अळ्या निघाल्याचा प्रकार समोर आला आहे. सेनगाव तालुक्यात कडोळी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. इथल्या तीस विद्यार्थ्यांना पोटदुखी तसंच मळमळीचा त्रास सुरू झाल्यानं, त्यांना तातडीने गोरेगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. या सर्वांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
****
0 notes