Tumgik
#अतिवृष्टीचा इशारा
bharatlivenewsmedia · 2 years
Text
देशातील ‘या’ राज्यात अतिवृष्टीचा इशारा; एनडीआरएफच्या सहा तुकड्या विविध भागात तैनात
देशातील ‘या’ राज्यात अतिवृष्टीचा इशारा; एनडीआरएफच्या सहा तुकड्या विविध भागात तैनात
देशातील ‘या’ राज्यात अतिवृष्टीचा इशारा; एनडीआरएफच्या सहा तुकड्या विविध भागात तैनात नवी दिल्ली : देशात सध्या काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय हवामान खात्याने तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार, येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पूरसदृश परिस्थिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mazhibatmi · 1 month
Text
Hawaman Andaj Today: IMD नुसार, आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, गंगा पश्चिम बंगाल, ओडिशासह किनारपट्टी कर्नाटक, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान मिझोराम, त्रिपुरा यासह गुजरात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे जारी केले आहे. IMD ने म्हटले आहे की, गुजरात आणि राजस्थानमध्ये 28 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहू शकतो. तर कोकण, गोवा आणि महाराष्ट्रातील अनेक भागांत 27 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Repeater Exam Result : दहावी-बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
एमपीसी न्यूज – दहावी बारावीचा पुरवणी परीक्षेचा (Repeater Exam Result) निकाल शुक्रवारी (दि. 23) जाहीर झाला. दहावीचा निकाल 36.78 टक्के तर बारावीचा 32.46 टक्के निकाल लागला आहे. दहावीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै 2024 या कालावधीत पार पडली. 26 जुलै रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे त्या दिवशीची पर���क्षा 31 जुलै रोजी घेण्यात आली. राज्यातील नऊ विभागीय…
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
मुंबई, पुण्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम, प्रशासनाला सतर्कतेच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
राज्य परिवहन महामंडळाचा ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा उपक्रम
अठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं दिल्लीत होणार आयोजन
बीड जिल्ह्यात दूध भेसळीविरोधात कारवाई, १३ हजार ३६८ किलो रासायनिक भुकटी जप्त
आणि
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची कांस्यपदकासाठी लढत, ऍथलेटीक्स स्पर्धांना आजपासून सुरुवात  
****
मुंबईसह राज्यभरात काल पावसाचा जोर कायम असल्यानं अनेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढवला आहे. पुणे जिल्ह्यात खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये ३५ हजार दोन घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात, तसंच मावळ, मुळशी, वेल्हे आणि जुन्नर या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्या परिसरातल्या धरणांमधूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. पुणे जिल्ह्यातून कोकणात जाणारे अनेक घाटरस्ते बंद केले आहेत. पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
दरम्यान, पुण्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, पूरग्रस्त भागातल्या लोकांना स्थलांतरित करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे तसंच त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या भागात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराचे १०५ सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. हवामान विभागानं पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
****
नाशिक जिल्हयात काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक धरणांमधला विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या गंगापूर धरणातून आठ हजार १००, दारणा धरणातून २२ हजार ३८३ तर नांदूरमध्यमेश्वर मधून ५४ हजार २३३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
दरम्यान, नाशिक शहरात गोदावरी नदीला आलेल्या पुरात एक जण वाहून गेला. महावितरणमध्ये अभियंता असलेला यग्नेश पवार हा रामकुंडाजवळ पुजाविधी करत असताना पाय घसरुन नदीत पडल्यानं वाहून गेला. कालपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. मालेगाव तालुक्यातल्या मालधे गिरणा नदीपात्रात मासेमारीसाठी गेलेले सुमारे १२ जण पुराचं पाणी वाढल्याने पात्रातल्या एका टेकडीवर अडकले असून, त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा आणि निळवंडे पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. भंडारदरा धरणातून २७ हजार, तर निळवंडे धरणातून सात हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडलं जात आहे. यंदा पहिल्यांदाच नगर जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडी धरणाकडे पाणी सोडलं जात आहे.
गेल्या तीन दिवसात जायकवाडी धरणात सहा टीएमसी पाणी दाखल झालं असून, धरणाचा पाणीसाठा सात टक्क्यांनी वाढला आहे.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं श्रावण महिन्यानिमित्त ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमात एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचं आयोजन करण्यात येत असून, यात सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जाणार आहेत. प्रवाशांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केलं. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मारलेश्वर, अष्टविनायक दर्शन, दर गुरुवारी नृसिंहवाडी, औदुंबर, दर शनिवारी मारुती दर्शन अशा धार्मिक सहलींचा यात समावेश आहे.
****
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यानं शंभर मेगावॅटचा टप्पा पार केला आहे. या योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत २५ हजार ८६ ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आहेत. यात १०१ पूर्णांक १८ मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसवण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे.
****
अठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथं घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या काल मुंबईत झालेला बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिल्ली इथल्या सरहद संस्थेत हे संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. येत्या पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी पुण्यात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलन मार्गदर्शन समितीच्या बैठकीत संमेलन अध्यक्षांची निवड करण्यात येणार ��हे.
****
बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या कडा इथं काल अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईत भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी ११ लाख ८५ हजार ६८ रूपये किंमतीची १३ हजार ३६८ किलो रासायनिक भुकटी जप्त केली. तसंच बीड, अहमदनगर आणि धाराशिव इथं काल विभागातर्फे विविध ठिकाणी धाड टाकण्यात आली. या कारवाईत ६ लाख ८७ हजार ६७२ रुपयांची ६ हजार ९४२ किलो भेसळ जप्त करण्यात आली.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने उपान्त्य फेरी गाठली आहे. उपान्त्यपूर्व सामन्यात भारताने इंग्लंडचा पेनल्टी शूट आऊटमध्ये चार - दोन असा पराभव केला. सामन्याची वेळ संपेपर्यंत दोन्ही संघ एक - एक अशा बरोबरीत होते. पेनल्टी शुट आऊटमध्ये भारताचा गोलकीपर पी आर श्रीजेश यानं इंग्लंडचे दोन गोल रोखले. भारताकडून हरमनप्रीत सिंह, सुखजीत सिंह, ललित उपाध्याय आणि राजकुमार पालनं गोल करत संघाला विजय मिळवून दिला.
बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आज कांस्यपदकासाठी खेळणार आहे. काल उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या विक्टर अक्सेलसेनकडून त्याला पराभव पत्कारावा लागला. महिला टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत यांचा चमू उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी खेळेल. ऍथलेटीक्स स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बीड इथला अविनाश साबळे तीनशे मीटर स्टीपलचेस प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे.
****
कोलंबो इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला श्रीलंकेकडून ३२ धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघानं ५० षटकात २४० धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला भारताचा संघ ४३व्या षटकात २०८ धावांवर सर्वबाद झाला. तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेनं एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. मालिकेला पहिला सामना बरोबरीत सुटला होता.
****
श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात होत आहे. आज श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणच्या महादेव मंदीरांमध्ये भाविक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथल्या श्री घृष्णेश्वर मंदीरात भाविकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं तसंच बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैजनाथ मंदीरातही भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, वेरुळच्या घृष्णेश्वर महादेव मंदीरासह खुलताबादच्या भद्रा मारोती मंदीर या देवस्थानांना, श्रावण मासानिमित्त होणारी भाविकांची गर्दी आणि कावड यात्रेमुळे धुळे-सोलापूर महामार्ग वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. येत्या दोन सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत हा बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत.
****
लातूर इथं काल सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्या वतीनं ‘चला सावली पेरुया’ या वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. वृक्ष लागवड आणि संवर्धनाची प्रेरणा शालेय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
****
दरम्यान, लातूर जिल्ह्यात ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियानाअंतर्गत येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी ‘एक कुटुंब, एक झाड’ उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमात श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी बेल वृक्षाची लागवड करून बेल वनांची निर्मिती करावी, यासाठी जिल्ह्यातल्या वृक्षप्रेमी संघटनांनी पुढाकार घ्यावा, तसंच नारळी पौर्णिमेला प्रत्येक भावानं आपल्या बहिणीला एक रोप भेट द्यावं, अशा पद्धतीने सण साजरे करून नागरिकांनी आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी योगदान देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी नुकतीच भोकर तालुक्यातल्या मातुळ प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्राच्या कार्याची पाहणी केली.
****
0 notes
marmikmaharashtra · 2 months
Link
https://marmikmaharashtra.com/heavy-rain-alert-partial-change-in-class-x-xii-supplementary-examination/
0 notes
cinenama · 1 year
Text
राज्यात आगामी 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा...
जूनच्या सुरवातीच्या दिवसात ओढ दिलेल्या पावसाने शुक्रवार-शनिवार पासून गोव्यात गती पकडली आहे. गोव्यात आगामी पाच दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. शनिवार 24 जून ते 28 जून या काळात उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गोवा वेधशाळेने राज्यात तीन दिवस ऑरेंज तर दोन दिवस यलो अलर्टचा इशारा दिला आहे भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात काही ठिकाणी वादळी वारे आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
मुसळधार पावसाच्या अलर्टमुळे भोपाळच्या शाळा बंद, आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्ह्यांची तयारी
मुसळधार पावसाच्या अलर्टमुळे भोपाळच्या शाळा बंद, आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्ह्यांची तयारी
मुसळधार पावसामुळे भोपाळ आणि नर्मदापुरममधील शाळांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (प्रतिनिधित्वात्मक) भोपाळ: मध्य प्रदेशातील जबलपूर, भोपाळ आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे भोपाळ आणि नर्मदापुरममधील शाळांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जबलपूरमध्ये बरगी धरणाचे 21 पैकी 13 दरवाजे आणि बारणा धरणाचे आठ पैकी सहा दरवाजे अतिरिक्त पाणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
राज्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक भागांत रेड अलर्ट
Tumblr media
मुंबई : राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणा-या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ‘एनडीआरएफ’च्या १३ आणि ‘एसडीआरएफ’ची दोन पथके तैनात आहेत. तसेच गेल्या १२ दिवसांत अतिवृष्टीमुळे राज्यात ८४ नागरिकांचा तर १८० जनावरांचा मृत्यू झाला आहे. मध्ये रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिराने सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या मध्य उपनगरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई लोकलचा वेग मंदावला आहे. चंद्रपूर येथील रहमतनगर भागात इरई नदीचे पाणी शिरायला सुरुवात चंद्रपूर शहरातल्या रहमत नगर भागात इरई नदीचे पाणी शिरायला सुरुवात झालीय. जवळपास ६० ते ७० घरात नदीचे पाणी शिरले असून लोकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतलाय. इरई धरणाचे सर्व म्हणजे ७ दारे १ मीटरने उघडल्याने इरई नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. नदीचे पाणी सातत्याने वाढत राहिल्यास चंद्रपूर शहरातल्या आणखी काही भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसायला लागला आहे. तर अनेक ठिकाणचे रस्ते बंद होण्याची शक्यता निर्माण झालीय. वसईमध्ये घरावर दरड कोसळली वसईमध्ये घरावर दरड कोसळली असून या मध्ये एकाच कुटुंबातील चौघेजण फसले. त्यातील दोघा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून दोन जण आत फसले असल्याची माहिती मिळालीय. पुणे शहरासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट मागील तीन ते चार दिवसांपासून पुणे शहर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे खडकवासला धरणात क्षमतेच्या १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. आणखी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सुरुवातीला सुमारे १००० क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. पालघरमध्ये दोन दिवस अतिवृष्टी, रेड अलर्ट जारी भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार दिनांक १२ आणि १४ जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईला ‘ऑरेंज अलर्ट’ मुंबईसह उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईत मुसधळार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच, अनेक सखल भागांत पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे. पाणी साचत असलेल्या भागात वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. माहीम, दादर, परळ, भायखळा भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईला पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. आज दुपारी १ वाजेपर्यंत मुंबई, कल्याण, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागने म्हटले आहे. Read the full article
0 notes
nashikfast · 2 years
Text
नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा
नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार ११ जुलै ते १४ जुलै या कालावधीत नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे. आपत्ती व्यस्थापन विभागाच्यावतीने खालील हेल्पलाइन नंबर चालू करण्यात आले आहेत. मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष : ०२५३ – २५७१८७२/ २३१७५०५पंचवटी विभागिय कार्यालय : ०२५३ –…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, दि. ८ : हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आले आहे. कोकण विभागात पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६ मिमी. पाऊस झाला असून सद्यस्थिती मध्ये जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यातील तीन मुख्य नद्या इशारा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
येत्या दोन दिवसांत राज्यातील 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा
https://bharatlive.news/?p=124074 येत्या दोन दिवसांत राज्यातील 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा
पुढारी ...
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, दि. ८ : हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आले आहे. कोकण विभागात पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६ मिमी. पाऊस झाला असून सद्यस्थिती मध्ये जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यातील तीन मुख्य नद्या इशारा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
Mumbai Rain: मुंबईत अतिवृष्टीचा रेड अलर्ट, हवामान खात्याचा इशारा, म्हणाले- पुढील 24 तास काळजी घ्या
Mumbai Rain: मुंबईत अतिवृष्टीचा रेड अलर्ट, हवामान खात्याचा इशारा, म्हणाले- पुढील 24 तास काळजी घ्या
फाइल फोटो. प्रतिमा क्रेडिट स्रोत: tv9 bharatvarsh महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आज दुपारी 1 वाजल्यापासून भारतीय हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, आम्ही मुंबईतील लोकांना त्यांच्या प्रवासाची आणि प्रवासाची योजना अशा प्रकारे तयार करण्याची विनंती करतो की त्यांना कोणतीही अडचण येऊ नये. महाराष्ट्र (महाराष्ट्र) भारतीय हवामान खात्याने राजधानी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०४ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेचा समारोप काल राष्ट्रपती भवनात झाला. राज्यपाल कार्यालयाचं कामकाज सुधारण्यासह लोककल्याणासाठी प्राप्त मौल्यवान विचार-सूचनांची अंमलबजावणी व्हावी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात सांगितलं. आदर्श राज्याचं उदाहरण प्रस्थापित करणं राज्यपालांची जबाबदारी असून प्रभावी कामकाजासाठी संबंधित राज्य सरकारांशी सतत संवाद साधावा असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांना राजभवनात शासनाचं आदर्श मॉडेल विकसित करण्याचं आवाहन केलं .
****
राज्यात येत्या बहात्तर तासांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मराठवाड्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, नाशिक  जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून नांदूर- मधमेश्वर, दारणा, कडवामधून आणि भाम धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी विसर्ग सकाळी नऊ वाजेपासून होत आहे. तर, गंगापूर धरणातूनही दुपारी बारा वाजता पाणी विसर्ग केला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर गोदावरी नदीला पुर आला असून रामकुंड परिसरात लहान मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. यामुळं जयकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असून धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणातूनही मोठा  विसर्ग सुरु असल्यानं कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत आणि सखल भागातील नागरिकांना काळजी घेण्यासह सुरक्षितस्थळी स्थलांतराचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत. पुण्यासह सातारा जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा ‘लाल बावटा’ जारी झाला आहे.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या, २०२४-२५ वर्षासाठी  विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेशाची मुदत वाढवून येत्या १५ ऑगस्टपर्यंत झाली आहे. याद्वारे विना विलंबशुल्क प्रवेश घेता येईल असं विद्यापीठानं कळवलं आहे.
****
आगामी काही वर्षात भारत वीस टक्के क्षेत्र, सेंद्रिय शेतीखाली आणू शकतो असं नीती आयोगाचे सदस्य तथा कृषी अर्थशास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय परिषद अध्यक्ष प्राध्यापक रमेश चंद यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी  नैसर्गिक-सेंद्रिय शेतीत विज्ञानाच्या वापरानं  शेती उत्पादकता वाढीस निश्चित मदत होईल असं नमूद केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इंथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्‍थापन परिषदेच्या काल झालेल्या बैठकीत चार विद्याशाखांमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचं बक्षीस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनानं कळवली आहे. 
****
0 notes
amhikastkar · 3 years
Text
विदर्भात मुसळधारेचा इशारा 
पुणे : राज्यात जवळपास सतरा दिवसांच्या विश्रांतीनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. राज्यातील अनेक भागांत ढगांची दाटी होऊन पावसाला सुरुवात झाली आहे. आजपासून (ता. ९) राज्यात पाऊस जोर धरणार असून, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  गेले तीन आठवडे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Photo
Tumblr media
जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा ​सिंधुदुर्ग : प्रादेशिक हवामान विभाग मुबई यांचेकडून प्राप्‍त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १३ व १४ जुलै २०२० रोजी काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची, दिनांक १५ जुलै २०२० रोजी काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची  तर दिनांक १६ व १७ जुलै २०२० रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.​​​
0 notes