#अटळ
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०१ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या ४० जागांसाठी आज मतदान होत आहे. ३९ लाखांहून अधिक मतदार ४१५ उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहेत. राज्यात तिन्ही टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी येत्या आठ तारखेला होणार आहे.
****
मरणासन्न रुग्णांची जीवन आधार प्रणाली काढून घेण्यासंदर्भात मार्गदर्शन सूचनांचा आराखडा आराखडा आरोग्य मंत्रालयानं तयार केला आहे. या मसुद्यावर नागरीकांची मतं मागवण्यात येत आहेत. जे रुग्ण उपचारांनी बरे होण्याची कोणतीही शक्यता नाही आणि नजिकच्या भविष्यात ज्यांचा मृत्यू अटळ आहे असे रुग्ण, तसंच ज्यांनी ७२ तास उपचारांना प्रतिसाद दिलेला नाही, अशा मेंदूला दुखापत झालेल्या रुग्णांचाही समावेश या यादीत केला आहे. डॉक्टरांनी यासंदर्भात अनेक बाबींचा विचार करुन निर्णय घ्यावा, असं यामध्ये नमूद आहे. या मसुद्यात वैद्यकीय, तात्विक आणि कायदेशीर अशा सर्व बाबींचा विचार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
भारतीय पोलीस दलातल्या वर्ष २०२३ च्या तुकडीच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असेल तरच आर्थिक आणि सामाजिक विकास शक्य आहे, नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण केल्यानेच प्रगतीला अर्थ प्राप्त होतो, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
****
क्रूझ भारत अभियानाद्वारे येत्या पाच वर्षांत क्रूझवरून पर्यटन करणाऱ्यांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय असल्याची माहिती, केंद्रीय नौकानयन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. मुंबई इथं या अभियानाची काल सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. आज पासूण ते ३१ मार्च २०२९ या कालावधीत तीन टप्प्यांमध्ये हे अभियान राबवलं जाईल.
****
झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी काल रांची इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशभरातल्या अकरा हजार अंगणवाडी केंद्रांचं उद्घाटन केलं. त्याचबरोबर पोषण माह उपक्रमाचा देखील यावेळी समारोप झाला. ॲनिमिया आजाराबद्दल जागरूकता, पोषण भी, पढाई भी, तसंच तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करणं, हा पोषण माह चा उद्देश असल्याचं, अन्नपूर्णा देवी यावेळी म्हणाल्या.
****
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काल गोंदिया इथं विविध क्षेत्रातल्या शिष्टमंडळांची भेट घेतली आणि त्यांची विविध विषयांवरील मतं जाणून घेतली. यामध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, क्रीडा, कला, सामाजिक, आदिवासी, कृषी, औद्योगिक आदी क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश होता. आदिवासी क्षेत्रामध्ये उद्योग वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचला पाहिजे यासाठी राज्यपालांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
****
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल मुंबईत समितीचे अध्यक्ष उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या दुसर्या आणि तिसर्या अहवालात कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भातले सोपे नियम सुचवण्यात आले असून, पुराव्यांची संख्या ४२ करण्यात आली आहे. मराठा समाजातल्या नागरिकांना यापैकी कुठल्याही एका पुराव्यांच्या आधारे आपली मराठा कुणबी नोंद मिळण्याबाबत पडताळणी करणं शक्य असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अंनुषंगाने छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जिल्हा आणि विधानसभास्तरीय मास्टर ट्रेंनर तसंच नोडल अधिकार्यांच्या एकदिवसीय प्रशिक्षण काल घेण्यात आलं. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन झालं. निवडणूक विषयक कामकाज सांभाळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम करण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना गावडे यांनी केली.
****
नांदेड जिल्ह्यात नेरली ग्रामपंचायतीत दूषित पाण्यामुळे झालेल्या घटनेसंदर्भात जिल्हा परिषदेनं हलगर्जीपणाचा ठपका ठेऊन, ग्रामपंचायत अधिकारी आर एस हटकर निलंबित केलं आहे. हटकर हे नेरली इथं कार्यरत असताना त्यांनी ग्रामपंचायतीत पाणी पुरवठा निर्जंतुकीकरण करण्यासाठी टीसीएल पावडरचा नियमितपणे वापर केल्याचे अभिलेखे आढळून आले नाही, तसंच नळ योजनेच्या पाण्याची टाकी वेळोवेळी स्वच्छ न कल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
****
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातल्या ८०० यात्रेकरुंची विशेष वातानुकुलीत 'भारत गौरव पर्यटन रेल्वे' अयोध्येकडे काल रवाना झाली. खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन केल्यानंतर यात्रेकरूंचा रेल्वे बोगीत प्रवेश झाला. ही रेल्वे जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी मार्गे अयोध्येकडे जाणार आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष गटातून मुंबईच्या संजय मांडले यानं विजेतेपद पटकावलं. त्याने ठाण्याच्या जाहिद एहमद फारुकी याचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला. तर महिला गटातून मुंबईच्या काजल कुमारी हिने ठाण्याच्या मधुरा देवळे हीचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत पुरुष गटात १४८ तर महिला गटातून ३२ स्पर्धक सहभागी झाले होते.
****
0 notes
Text
0 notes
Text
नामदीक्षा घेतलेली नसती,तर आमचा मृत्यू अटळ होता | Yavatmal | Sant Rampal ...
youtube
0 notes
Text
संत रामपाल जी महाराज जी शिष्य ने कहा कि वह परमात्मा कोन है
0 notes
Text
नामदीक्षा घेतलेली नसती,तर आमचा मृत्यू अटळ होता | Yavatmal | Sant Rampal ...
youtube
अवश्य ऐका ही इंटरव्यू: नामदीक्षा घेतली नसती तर आमचा मृत्यु अटळ होता - डॉक्टर पुरुषोत्तम श्रावण चव्हाण |Yavatmal | Sant Rampal Ji Marathi Satsang Interview.
0 notes
Text
0 notes
Text
प्रिय मंटोच्या पुस्तकांबद्दल....!
मानवी इच्छांच्या उग्र, भग्न व नग्न स्वरुपाच वास्तव म्हणजे मंटोच्या कथा. ज्यांना इच्छा अनाहक वाटल्या नाहीत. ज्यांना त्या थोपवता आल्या नाहीत, त्यात ते वाहवत गेले. भग्नतेच आयुष्य जगले. ज्यांनी उधळून द्यायचा प्रयत्न केला स्वत:च बेचिराख झाले. निराशा, हताशांचे झोखांडे खात इच्छांचे तुकडे घेत भूतकाळात जगले. ज्यांनी दिशा देण्याचा प्रयत्न केला त्यांचीही तडफड सुरुच आहे. एकंदरीत काय आयुष्याशी झगडा अटळ…
#पुस्तक अभिप्राय#पुस्तक प्रेम#वाचन संस्कृती#साहित्य चर्चा#books#manto#Marathi#marathibooks#reading#reviews
0 notes
Text
अटळ धैर्य, अद्वितीय शौर्य
मनात निस्सिम देशभक्ती,
जीवाचीही तमा न बाळगता
मिळवली सुपुत्रांनी विजयश्री !!
#गाथा_विरत्वाची
#कारगिल_विजय_दिवस । त्रिवार सलाम !!
(CONTENT ©️ COPYRIGHT)
9049494938 | 8626020202
#Jagdamb
#Vyavsaywala
@highlights
@followers
#kargilvijaydiwas #army #kargil #vijay #indianarmy #armylove
0 notes
Text
नामदीक्षा घेतलेली नसती,तर आमचा मृत्यू अटळ होता | Yavatmal | Sant Rampal ...
0 notes
Text
नामदीक्षा घेतलेली नसती,तर आमचा मृत्यू अटळ होता | Yavatmal | Sant Rampal ...
0 notes
Text
लाख म्हणू देत जगाला, ही संगत अटळ आहे
तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेतमार्ग कुठेही नेत असो, विचार संगतीचे आहेततूझ्या माझ्या मनाचा निर्णय होता भेटण्याचाजसे बगीच्यात बहार असतां फुलांचा बहरण्याचा तुझे दू:ख आता माझे,माझे दू:ख झाले तुझेतुझे हे दोन नेत्र, चंद्र सूर्यासम झाले माझेलाख म्हणूदेत जगाला,ही संगत अटळ आहेहातात हात असल्याने, हे हात सुटणे अटळ आहे अरे, मला जीवनसाथ देणाऱ्या, प्रियतमातुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेतमार्ग…
View On WordPress
0 notes
Text
नामदीक्षा घेतलेली नसती,तर आमचा मृत्यू अटळ होता | Yavatmal | Sant Rampal ...
youtube
0 notes
Text
मुंग्यांसाठी 'हे' वर्तुळ म्हणजे मृत्यू अटळ
https://bharatlive.news/?p=174504 मुंग्यांसाठी 'हे' वर्तुळ म्हणजे मृत्यू अटळ
नवी दिल्ली : नेहमी सरळ ...
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 October 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
दिवाळीनिमित्त आनंदाच्या शिध्या��� पोहे आणि मैद्याचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाची मंजूरी
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन; दोषींवर कारवाईची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणण्याबाबत ब्रिटनच्या संग्रहालयासोबत सामंजस्य करार
आणि
आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताची काल दोन सुवर्णांसह एकूण नऊ पदकांची कमाई
****
दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या आनंदाच्या शिध्यामध्ये, मैदा आणि पोहे या दोन घटकांचा समावेश करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आता ��ा शिध्यामध्ये एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल तसंच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील. हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल.
कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणालीला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय काल घेण्यात आला. या योजनेतून विदर्भ, मराठवाड्यातल्या प्रलंबित कृषी पंप वीज जोडण्या पूर्ण करण्यात येतील.
अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाकरता शिष्यवृत्ती योजना राबवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, या योजनेसाठी १० कोटी ८० लाख रुपये खर्चास देखील मंजुरी देण्यात आली.
इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला वेग देण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यानुसार पुनर्विकासाला विरोध करणारे रहिवासी किंवा सभासदांविरुद्ध निष्कासनाची कार्यवाही करण्याकरता अधिनियमात तरतूद करण्यात येणार आहे.
****
राज्यात नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीत दिले. लातूर, नांदेडसह नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनवर पिवळा मोझॅक तसंच खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणं शक्य व्हावं, यासाठी कृषी विभाग तसंच मदत आणि पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे प्राधान्याने हे पंचनामे करावेत असे निर्देश देण्यात आले आहे.
****
नांदेड इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू ही बाब सरकारने गांभीर्याने घेतली असून, या घटनेची चौकशी केली जाईल तसंच दोषींवर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले...
‘‘नांदेड झालेली घटना, झालेले मृत्यू याची चौकशी होईल आणि चौकशीअंती कुणाचा दोष असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल. परंतू सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे.’’
****
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल या शासकीय रुग्णालयास भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती आपला अहवाल दोन दिवसात सादर करेल, या रुग्णालयातली वर्ग तीन तसंच चारची रिक्त पदं तत्काळ भरण्यात येतील, असं मुश्रीफ यांनी सांगितलं. ते म्हणाले...
‘‘हे जे मृत्यू झालेले आहेत त्याची सखोल चौकशी करून खरोखरच ह्याच्यामध्ये कोणाचा हलगर्जीपणा होता का, औषधाचा पुरवठा नव्हता का, याला कारणं काय ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही जी समिती नेमलेली आहे, त्याची उच्चस्तरीय समिती आम्ही पुन्हा नेमू. त्याचा अहवाल घेऊ आणि आजच्या आमच्या बैठकीमध्ये ज्या अडचणी आमच्या लक्षामध्ये आल्या, त्या आम्ही तात्काळ दूर करण्याच्या प्रयत्न करू. क्लास थ्री आणि क्लास फोर ची पदं ही आम्ही तात्काळ भरू.’’
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे आज नांदेड इथं रुग्णालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेणार आहेत.
दरम्यान, शासकीय रुग्णालयात येणारे बहुतांशी रुग्ण हे मरणासन्न अवस्थेत असतात, त्यामुळे डॉक्टरांनी प्रयत्न करूनही बरेचदा रुग्णाचा मृत्यू होत असल्याचं, छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय-घाटीचे अधिष्ठाता, डॉ संजय राठोड यांनी म्हटलं आहे. औषधांच्या अभावाने रुग्ण दगावत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले...
‘‘मृत्यू हा अटळ आहे. आणि आमचं दुर्दैवं की आमच्याकडे जो पेशंट येतो, हा टर्मिनस स्टेजेस्ला येतो. आणि त्यावेळेस आम्ही आमचे प्रयत्न करतो. तरी पण ह्या घटना घडतात. औषधाच्या बाबतीमध्ये कुठलीही तक्रार नाही. जिथे जिथे अशा सिरीयस पेशंटस्ची ट्रीटमेंट होते, तिथे आम्ही औषधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आमच्याकडून औषधी उपलब्ध करून दिल्या जातात. नाहीतर आम्ही लोकल पर्चेसमधून देतो. ते ही नाही झालं आम्ही नातेवाईकांना पण सांगतो की नाहीये हे. ते ही जरी नसेल आमच्याकडे दहा - पंधरा एन जी ओ अशा व्हॉलिंटरीली रेजिस्टर्ड केलेल्या आहेत, त्यांच्याकडून आम्ही उपलब्ध करून घेतो.’’
****
राज्यभरातल्या सुमारे दोन हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या पाच नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ग्रामपंचायतींमधल्या दोन हजार ९५० सदस्यपदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी याच दिवशी मतदान होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, ही आमची भूमिका कायम असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी ��्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत पक्षाच्या ओबीसी सेलच्या बैठकीत बोलत होते. बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणनेची मागणी सरकारकडे करणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं भारतात आणण्याबाबत, ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट संग्रहालयासोबत काल सामंजस्य करार करण्यात आला. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, राज्य पुरातत्व सर्वेक्षण आणि संग्रहालयाचे संचालक तेजस गर्गे हे यावेळी उपस्थित होते.
शिवछत्रपतींची ही वाघनखं तमाम शिवप्रेमींसाठी एक प्रकारे शिवदर्शन ठरणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
****
थोर स्वातंत्र्यसेनानी तसंच मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातल्या त्यांच्या पुतळ्यास, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतही स्वामीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
****
आशियायी क्रीडा स्प���्धेत भारताने काल दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्य पदकांची कमाई केली. आतापर्यंत १५ सुवर्ण, २६ रौप्य आणि २८ कांस्यपदकांसह ६९ पदकं जिंकून भारत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर कायम आहे.
‘‘महिलांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत पारुल चौधरीने सुवर्णपदक जिंकलं. तर भालाफेक स्पर्धेत अनुराणीने सुवर्ण पदक पटकावलं. पुरूषांच्या आठशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत मोहमद अफजलनं तर पुरुषांच्या डेक्थलॉन स्पर्धेत तेजस्वी शंकर याने रौप्य पदक पटकावलं. महिलांच्या चारशे मीटर अडथळ्यांच्या स्पर्धेत विद्या रामराज हिने, पुरुषांच्या तिहेरी उडीत प्रवीण चित्रवेलने दुहेरी नौकानयनात अर्जुनसिंह आणि सुनीलसिंह यांनी, महिलांच्या मुष्टियुद्ध प्रकारात प्रिती पवारने, तर पुरुषांच्या मुष्टियुद्ध प्रकारात नरेंद्र बेरवाल याने कांस्यपदक जिंकलं. महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत लवलीना बोरगोहाईनने ७५ किलो वजन गटात अंतिम फेरीत धडक मारली आहे.’’
****
नाशिक जिल्ह्यात १४ दिवसांनंतर कांद्याचा लिलाव सुरु झाला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी दोन हजार रूपये भाव मिळाला. अन्य बाजार समित्यांमध्ये देखील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं क���वलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात स्��च्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी पहिल्या टप्प्यात आठ तालुक्यातल्या ८० गावांचं मूल्यांकन केलं जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्वच्छतेला गती मिळणार आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर ...
‘‘गावातल्या कचरा साठवण्याचे ठिकाण, कचरा संकलन आणि विलगीकरण, कचरा वर्गीकरण, उघड्यावर शौच बंद करून शौचालयांचा वापर वाढवण, शौचालयांना नळ जोडणी, उघड्यावर सोडलेल्या सांडपाण्याच व्यवस्थापन, शोष खड्डे निर्मिती, वृक्ष लागवड आणि गावकऱ्यांच्या श्रमदानातून सुशोभीकरण, प्लास्टिक कचरा संकलन आणि त्याचं व्यवस्थापन, कचऱ्यासाठी कंपोस्टिंग सुविधा यावर मूल्यांकन केलं जाणार आहे. याची गुणांकन प्रतवारी करून गावात स्वच्छतेसाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे.’’
देविदास पाठक,आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव
****
परभणी जिल्ह्यात विविध योजनांतर्गंत मंजूर विकास कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना, जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती-दिशा चे अध्यक्ष तथा खासदार संजय जाधव यांनी दिल्या आहेत. ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीच्या आढावा बैठकीत बोलत होते.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात कोंढुर, डिग्रस इथं कयाधू नदीवर पूल बांधण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी काल कयाधू नदीच्या पात्रात उतरून आंदोलन केलं. पोलीस प्रशासनाने आंदोलकांना नदी पात्रातून बाहेर काढल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
****
0 notes
Text
भावनाहिन आयुष्य
उरल्याच कुठे भावनाआयुष्याचा झाला खेळ ।मागे वळून बघणार नाहीसरली आता ती वेळ । आयुष्य गेले निघूनकुठे बसला कशाचा मेळ ।क्षण आता उरलेत कमीनको वाटतो सगळा छळ । अंतिम क्षणी एकच इच्छाहे मजला थोडे बळ ।पुसून टाकील आठवणीमृत्यू तर आहेच अटळ ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
मानवी इच्छांच्या उग्र, भग्न व नग्न स्वरुपाच वास्तव म्हणजे मंटोच्या कथा. ज्यांना इच्छा अनाहक वाटल्या नाहीत. ज्यांना त्या थोपवता आल्या नाहीत, त्यात ते वाहवत गेले. भग्नतेच आयुष्य जगले.
ज्यांनी उधळून द्यायचा प्रयत्न केला स्वत:च बेचिराख झाले. निराशा, हताशांचे झोखांडे खात इच्छांचे तुकडे घेत भूतकाळात जगले.
ज्यांनी दिशा देण्याचा प्रयत्न केला त्यांचीही तडफड सुरुच आहे.
एकंदरीत काय आयुष्याशी झगडा अटळ आहे, निवड तुमची असावी इतकच.
बाकी ‘बुद्ध’ ज्याला त्याला होता येत नाही. पण कधी कधी होता येत. तो क्षण आपला. त्या क्षणाचे आपण बुद्ध!
इतरवेळेस ‘हतबद्धच’!
0 notes