#अजित पवार देवेंद्र फडणवीस बातमी
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पराभूत • प्रसारमाध्यमांनी सर्जनशीलपणे काम करण्याची आवश्यकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त • लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही - मंत्री आदिती तटकरे यांची माहिती • मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांचा १५ फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचा इशारा आणि • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये २५ सुवर्णपदकांसह महाराष्ट्राकडे सर्वाधिक ११३ पदकं
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पाच तारखेला झालेल्या या निवडणुकीची काल मतमोजणी झाली, यात भाजपला ४८ जागांवर विजय मिळाला, तर सत्ताधारी आम आदमी पक्षाला २२ जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. नवी दिल्ली मतदार संघातून आम आदमी पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना चार हजार ८९ मतांनी पराभूत केलं. तर जंगपुरा मतदार संघातून आपचे मनीष सिसोदिया यांचा भाजपचे तरविंदरसिंह मारवाह यांनी अवघ्या ६७५ मतांनी पराभव केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी मतदार संघातून भाजपचे रमेश बिधुडी यांच्यावर तीन हजार ५२१ मतांनी विजय मिळवला. दरम्यान, २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा दिल्लीत सत्तेत येत असल्यामुळे भारतीय जनता पक्षात आनंदाचं वातावरण आहे. भाजपच्या दिल्ली कार्यालयासह अनेक ठिकाणच्या कार्यालयात काल कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून विजय साजरा केल��. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचं म्हटलं आहे. काल दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मतदारांचे आभार मानत, दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी करणार असल्याचं सांगितलं. दिल्लीवासियांच्या सेवेसाठी अधिक सक्षमपणे काम करण्यास कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली निकालावरून आम आदमी पक्षावर टीका केली आहे. केजरीवाल यांची भाषा प्रामाणिकपणाची असली, तरी प्रत्यक्ष कृती मात्र वेगळी होती. मतदारांनी हा फरक ओळखला आणि म्हणूनच केजरीवाल यांची मतं घसरली, असं हजारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशात मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे चंद्रभानु पासवान यांनी समाजवादी पार्टीचे अजित प्रसाद यांना ६१ हजाराहून अधिक मतांनी पराभूत केलं. तर तमिळनाडूत इरोड विधानसभा पोटनिवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कळघमचे चंधीरकुमार व्ही सी यांनी आपल्या विरोधकांवर ९१ हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला.
प्रसारमाध्यमांनी सर्जनशील राहून काम करणं आवश्यक असून, जलदगतीने बातमी देत असताना माहितीच्या मुळाशी जाण्याची आणि खात्री करून घेण्याची वृत्ती तसंच गांभीर्य माध्यमांनी जपले पाहिजे, असं आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल पुण्यात राज्यातल्या पहिल्या 'जयपूर डायलॉगच्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि जयपूर डायलॉगचे प्रमुख संजय दीक्षित यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जयपूर डायलॉगच्या चांगल्या कार्यासाठी शासन कायम पाठीशी राहिल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नसल्याचं, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. मात्र, अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या काळात वितरित झालेला निधी परत घेतला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, सरकारने लाभार्थी बहिणींना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी केलेली गद्दारी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार, पंढरीनाथ सावंत यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. प्रबोधनकार ठाकरे यांच्या समग्र वाङ्गमयाचं संपादन केलेले सावंत यांना, विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. सावंत यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
मरा��ा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी येत्या १५ फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी इथं पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. ते काल अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलत होते. दोन दिवसांमध्ये मराठा समाजबांधवांशी चर्चा करून मुंबईत मोर्चा काढण्याबाबत निर्णयही घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. यापूर्वीचं सातवं आमरण उपोषण स्थगित करताना आपल्या चार मागण्या तत्काळ मंजूर करण्यात येतील, असं आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सांगितलं होतं. मात्र, पंधरा दिवस उलटून गेल्यावरही काहीच निर्णय झाला नसल्याकडे जरांगे यांनी लक्ष वेधलं.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे आणि साधना आमटे यांच्या रुपाने आपण सर्वांनी देव पाहिला आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आनंदवन इथं दोन दिवसीय मित्रमेळाव्यात ते काल बोलत होते. काल सकाळी वृक्षदिंडीने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. या निमित्ताने अनेक कार्यक्रम, परिसंवाद तसंच चर्चा होणार आहेत.
शेतकऱ्यांना कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल स्वीकारावे लागणार असल्याचं, जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. राहाता तालुक्यातल्या राजुरी इथं 'डाळींब बहार मेळावा' आणि 'कृ‍षी प्रदर्शनाच्या' उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचं धोरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यात सर्व जिल्हा परिषद कार्यालयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिशील प्रशासन राबवून आवास योजना, लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामविकास पंचायत राज विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. उमेदमार्फत बचत गटातून उत्पादित झालेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं, ते म्हणाले… “महिला आता खाद्य पदार्थांच्या पलिकडे जाऊन बचतगटाच्या माध्यमातून खूप चांगले प्रॉडक्‍टस्‌ बनवतायत आणि खूप चांगलं मार्केटींग करतायत. त्याही संदर्भात आम्ही आढावा घेतला. आणि सरसच्या माध्यमातून जिल्ह्याला आम्ही एक्झिबिशेन घेतो आणि त्यातून महिलांच्या उत्पादनाला मार्केट तयार करून देतो. आणि चार दिवसाच्या त्या कार्यक्रमा��ध्ये किमान पन्नास, साठ, सत्तर लाखाचं महिलांच्या तयार केलेल्या उत्पन्ना��ं मार्केटींग होतं. आणि त्यातून महिलांना उत्पन्न मिळतं. आणि हा विषय आम्ही बघितल्यानंतर एक लक्षात आलं, त्या महिलांना जर कायम स्वरूपी मार्केट आपण तयार करून दिलं, सुरवातीला जिल्हा लेव्हलला. यातून खूप महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याला एक उमेद मॉल बांधण्याचा नव्यानं सकल्प केलेला आहे.’’
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पदकांची शंभरी पार केली. महाराष्ट्राकडे सर्वाधिक ११३ पदकं असून, त्यात २५ सुवर्ण, ४२ रौप्य आणि ४६ कांस्य पदकांचा समावेश आहे. महिला मुष्टियुद्धात दिव्या पवारनं ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या सांघिक टेनिसच्या अंतिम फेरीत, महाराष्ट्राने गुजरातवर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं, तर पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत, तामिळनाडूनं कर्नाटकला हरवून अव्वल स्थान पटकावलं. या स्पर्धेत परभणी जिल्हा ॲथलेटीक्स संघटनेचा खेळाडू किरण मात्रे याने १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. किरण हा परभणी तालुक्यातल्या त्रिधारावाडी इथला रहिवासी असून सध्या सेनादलात कार्यरत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज ओडिशात कटक इथं होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक - शून्यने आघाडीवर आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्वागत उपक्रमात काल ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक श्रीकांत सराफ तसंच लेखक माणिक पुरी यांचं व्याख्यान झालं, सराफ यांनी आपल्या तितरबितर या पुस्तकाबद्दल तर पुरी यांनी पक्षी येती अंगणी या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त केलं.
बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या टाकरवन जवळच्या फुलसिंगनगर तांड्यावर काल खिचडी खाल्ल्याने ११ बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या बालकांवर माजलगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. मधुकर घुबडे यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात गोदावरी काठावर होणारी वाळूची अवैध साठवणुक आणि वाळू उपशावर प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत तीनशे ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून, नदीकाठालगत विविध गावांमधला अवैध वाळू साठा गेल्या तीन दिवसांपासून जप्त करून कारवाई सुरू आहे.
आय डी बी आय ��ँकेच्या सी एस आर फंडातून छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या संगणक प्रयोगशाळेसाठी फर्निचर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. काल या कक्षाचं बँकेचे महाव्यवस्थापक रवी असवानी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं.
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
अजित पवार यांनी वेदांत प्रकल्प ssa 97 वर शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला
अजित पवार यांनी वेदांत प्रकल्प ssa 97 वर शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला
वेदान्त समूह आणि फॉक्सकॉनच्या भागीदारीतून महाराष्ट्रात १ लाख ६६ हजार रुपयांची गुंतवणूक होणार होती. पण, आता या गुंतवणूकीसाठी गुजरातची निवड केल्याचं वेदान्त समूहाने जाहीर केलं आहे. त्यामुळे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार आणि कोट्यावधी रुपयांच्या महसूलाला महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडवणीस सरकारवर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
भाजप नेते आशिष शेलार यांचा वेदांत प्रकल्प ssa 97 वरून नाना पटोले आदित्य ठाकरे आणि अजित पवारांवर हल्लाबोल
भाजप नेते आशिष शेलार यांचा वेदांत प्रकल्प ssa 97 वरून नाना पटोले आदित्य ठाकरे आणि अजित पवारांवर हल्लाबोल
वेदान्त प्रकल्प गुजरातला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक आर्थिक व्यवस्था गुजरातला हलवण्यात आल्या होते. आगामी काळात मुंबई गुजरातला गेल्यास आश्चर्य वाटालया नको, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यावर आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तर, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही शेलार यांनी टीका…
Tumblr media
View On WordPress
#aaditya thackeray vedant project#ashish shelar marathi news#eknath shinde#MVA सरकार#आदित्य ��ाकरे#आदित्य ठाकरे मराठी बातमी#आदित्य ठाकरे वेदांत प्रकल्प#आशिष शेलार अजित पवार#आशिष शेलार आदित्य ठाकरे#आशिष शेलार नाना पटोले#आशिष शेलार मराठी बातमी#आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल#आशिष शेलार यांचा नाना पटोले यांच्यावर हल्ला#आशिषने अजित पवारांवर हल्लाबोल घोषणा केली#एकनाथ शिंदे#गुजरात सरकार#गुजरात सरकार मुख्यमंत्री#देवेंद्र फडणवीस#नरेंद्र मोदी#पंतप्रधान#पंतप्रधान नरेंद्र मोदी#महाराष्ट्र राज्य संकट#महाराष्ट्र वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प#महाराष्ट्र सरकार#महाराष्ट्राचे मुख्यमंत्री#महाराष्ट्राचे राजकारण#महाराष्ट्रातील राजकीय संकट जिवंत#वेदांत गुजरातला का शिफ्ट झाला#वेदांत फॉक्सकॉन#वेदांत फॉक्सकॉन गुजरातला शिफ्ट
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 May 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ मे २०२१ सकाळी ७.१० मि. ****
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणानं धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
·      अरबी समुद्रातलं तौक्ते चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याचा हवामान खात्याचा अंदाज.
·      सिं��ुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात वादळामुळे मोठे नुकसान; मुंबईत खबरदारीच्या उपाययोजना.
·      गृहविलगीकरणातल्या रुग्णांचं उत्तम व्यवस्थापन झाल्यास मृत्यू दर कमी होऊ शकतो - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वास.
·      राज्यात ३४ हजार ३८९ नवीन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १०८ जणांचा मृत्यू तर तीन हजार ३२६ बाधित.
·      काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीत अंत्यसंस्कार करण्यात येणार.
आणि
·      मराठा आरक्षणाबाबत भारतीय जनता पक्ष कायदे तज्ज्ञांची समिती नेमणार.
****
अरबी समुद्रात उठलेलं तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं पुढे सरकत असून, आज संध्याकाळपर्यंत ते गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हे वादळ १२० ते १५० किलोमीटर प्रतीतास या वेगानं द्वारका, जामनगर आणि भावनगरच्या दिशेनं सरकत आहे. गुजरात सरकारनं किनारपट्टीलगत राहणाऱ्या दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
दरम्यान, या चक्रीवादळामुळे, काल कर्नाटक, गोव्यासह राज्यात कोकण किनारपट्टीत, तसंच अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे कर्नाटकात चौघांचा, तर गोव्यात दोन जणांचा मृत्यू झाला. वादळाचा परिणाम म्हणून जळगाव जिल्ह्यातही अंमळनेर इथं सोसाट्याच्या सुटलेल्या वाऱ्यात झाड पडून दोन बहिणींचा मृत्यू झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत ४० घरांचं नुकसान झालं. वादळाचा सर्वाधिक फटका आतापर्यंत वैभववाडी तालुक्याला बसला. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली असून, तीन शाळांचंही नुकसान झालं आहे.  
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. समुद्रात तीन मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. राजापूर तालुक्यात विजेच्या तारा तुटून पडल्यानं, वीजपुरवठा तसंच दूरध्वनी सेवाही विस्कळित झाली होती.
नाशिक जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहरासह जिल्हाभरात काल सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे उन्हाचा तडाखा काही अंशी कमी झाला.  
परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात उमरी शहरात काल दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, जालना जिल्ह्यात जालना तसंच बदनापूर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात काल मुसळधार पावसानं हजेरी लावली.
दरम्यान, चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्यानं, वादळीवारे आणि मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्ह���ून आज मुंबईत कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या वादळाच्या पार्श्वभूमीवर ओखा-पुरी, ओखा-रामेश्वरम्, राजकोट-सिकंदराबाद, पोरबंदर-सिकंदराबाद, या रेल्वे गाड्यांच्या पुढच्या दोन दिवसांतल्या फेऱ्या, रद्द करण्यात आल्या आहेत.
****
या चक्रीवादळा संबंधीत तयारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काल माहिती दिली. चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, किनारपट्टी प्रदेशात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानंही पूर्ण तयारीनिशी त्यांची ४२ पथकं तैनात केली आहेत, तर २६ पथकं सज्ज ठेवली आहेत. हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीच्या दूरवरून जाणार आहे, त्यामुळे किनारपट्टी प्रदेशावर त्याचा थेट परिणाम होणार नसला, तरी त्यामुळे पुढचे दोन दिवस समुद्र खवळलेला राहील, तसंच मुसळधार पाऊस पडेल अशी माहिती, हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
****
गृहविलगीकरणातल्या रुग्णांचं उत्तम व्यवस्थापन झाल्यास मृत्यू दर कमी करू शकतो, असा विश्वास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. राज्यभरातल्या फॅमिली डॉक्टरांसाठी घेतलेल्या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेत, मुख्यमंत्री काल बोलत होते. राज्यभरातले गाव पातळीपर्यंतचे सुमारे १७ हजार ५०० फॅमिली फिजीशियन्स, वैद्यकीय चिकित्सक या परिषदेत सहभागी झाले होते. राज्याच्या कृती दलातल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी या सर्व डॉक्टरांना, कोविडवरील वैद्यकीय उपचाराबाबत मार्गदर्शन करत, त्यांच्या शंकांचं निरसन केलं. मुख्यमंत्र्यांनी या परिषदेत मार्गदर्शन करताना, चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या फॅमिली डॉक्टरांनी कोविड विरुद्धच्या या लढाईत उतरावं, असं आवाहन केलं. शक्य असेल तिथे जवळच्या कोविड सुश्रुषा केंद्रात किंवा रुग्णालयात, दिवसाला एकदा तरी जाऊन सेवा द्यावी, त्यामुळे शासनाला सहकार्य तर मिळेलच, परंतू आपल्या भागातले डॉक्टर आपल्याला येऊन पाहून गेल्याचा रुग्णांना आनंदही होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यात काल ३४ हजार ३८९ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५३ लाख ७८ हजार ४५२ झाली आहे. काल ९७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ८१ हजार ४८६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५२ शतांश टक्के झाला आहे. काल ५९ हजार ३१८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४८ लाख २६ हजार ३७१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८९ पूर्णांक ७४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात चार लाख ६८ हजार १०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल तीन हजार ३२६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०८ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर ��िल्ह्यातल्या ३७, औरंगाबाद १८, परभणी १४, नांदेड १०, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी नऊ, जालना सहा, तर हिंगोली जिल्ह्यातल्या पाच रुग्णांचा समावेश आहे.  
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ८९७ रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात ६६९, उस्मानाबाद ४९२, लातूर ३९५, जालना २७६, नांदेड २७३, परभणी २५३, तर हिंगोली जिल्ह्यात ७१ नवे रुग्ण आढळून  आले.
****
मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात, कर्करोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईक-काळजीवाहू व्यक्तींच्या निवासासाठी, राज्य शासनातर्फे शंभर सदनिका, या रुग्णालयाला काल हस्तांतरित करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते, या सदनिकांच्या चाव्या रुग्णालय व्यवस्थापनाकडे सूपूर्द करण्यात आल्या. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण - म्हाडातर्फे या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
****
काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं, अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांचा पार्थिवदेह अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे. सकाळी साडे दहा वाजता त्यांच्या निवास��्थानासमोरच्या मोकळ्या जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  
दरम्यान, सातव यांचा पार्थिव देह काल रात्री पुण्याहून कळमनुरी इथं आणण्यात आला. हिंगोली शहरात नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून सातव यांचं पार्थिव देह कळमनुरीकडे नेणाऱ्या वाहनावर, फुलं अर्पण करून, लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.
राजीव सातव यांचं काल पहाटे पुण्यात उपचारादरम्यान निधन झालं. २२ एप्रिल रोजी कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचा अहवाल आल्यानंतर, त्यांच्यावर पुण्यात जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. अलिकडेच ते या आजारातून मुक्त झाले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी फुफ्फुसात संसर्ग झाल्यानंतर, त्यांची प्रकृती बिघडली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये समावेश असलेले खासदार सातव, यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं होतं. पंचायत समितीच्या सदस्यापासून राजकारण सुरु केलेले सातव, २००९ साली कळमनुरी विधानसभा मतदार संघातून, पहिल्यांदा आमदार झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २०१९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही, मात्र त्यानंतर गेल्या वर्षी, त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महासचिव असलेले सातव, सध्या काँग्रेस पक्षाचे गुजरात प्रभारी म्हणून काम पाहत होते. राजीव सातव हे काँग्रेस पक्षातले धडाडीचे आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जात. त्यांना चार वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला होता.
****
सातव यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. उपराष्ट्र��ती एम व्यंकय्या नायडू यांनी सातव यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. राजीव सातव हे अफाट गुणवत्ता असलेलं उगवतं नेतृत्व होतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातव यांना श्रद्धांजली वाहताना, राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचं अकाली जाणं क्लेशदायक असल्याची भावना व्यक्त केली. एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावलं, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, आपल्या भावना व्यक्त केल्या, तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, मोठी क्षमता असलेला नेता आपल्यातून गेला असल्याचं, आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. पक्षीय राजकारणापलिकडे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणाऱ्या नेत्याचा मृत्यू, हे राज्याचं मोठं नुकसान असल्याचं, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी-वड्रा, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही, आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.  
 औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, माजी खासदार चंद्रकांत खैरे, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सातव यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी या शब्दांत सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली –
माननीय खासदार राजीव सातव यांचं अत्यंत कमी वयामधे दुःखद निधन झालेलंय. ही गोष्ट अतिशय धक्कादायक असून ही बातमी ऐकून आम्हाला धक्का बसलेला आहे. खरं म्हणजे आजचे कमी वयामधे त्यांनी राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणामधे आपला ठसा उमटवलेला होता. आणि मी शिवसेनेच्या वतीनं त्यांना श्रध्दांजली अर्पण करतो.
 उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काल राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
परभणी जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी सातव यांना श्रध्दांजली अर्पण केली
****
मराठा आरक्षणाबाबत भाजप कायदे तज्ज्ञांची समिती नेमणार असल्याची माहिती, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी भाजपनं प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, उच्च समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या पहिल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी, ही माहिती दिली. केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च नायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे, राज्य सरकारनंही फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी त्यांनी केली. आरक्षणासाठी मराठा समाजाच्या आंदोलनाची स्वायत्तता कायम राखून भाजप या आंदोलनात सहभागी होईल, असंही पाटील म्हणाले.
****
परभणी जिल्ह्यात टाळेबंदीची मुदत एक जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. या काळात किराणा, भाजीपाला तसंच फळ विक्रीस, सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत परवानगी आहे. मात्र इतर सर���व दुकानं पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील, असं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे. बँकांच्या सेवा नेहमीच्या वेळेप्रमाणे सुरू राहतील, शेतीसंबंधी सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार, सकाळी सात ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील, औद्योगिक कारखाने, ई कॉमर्स सेवा, स्वस्त धान्य दुकानं, घरपोच पिण्याचं पाणी, अन्य अत्यावश्यक सेवा तसंच लसीकरण मात्र सुरू राहणार आहे.
****
औरंगाबाद महापालिका क्षेत्रात, सध्या फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी, कोव्हीशिल्ड लसीची पहिली आणि दुसरी मात्रा देण्यात येत आहे. त्यामुळे लसीची पहिली मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये, असं आवाहन, आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी केलं आहे. याचबरोबर, कोरोना प्रतिबंधात्मक कोव्हीशिल्ड या लसीची एकदा पहिली मात्रा घेतल्यावर, दुसऱ्यांदा घेण्याची मात्रा कमीत कमी ८४ दिवसांनी घेण्याबाबत, नव्यानं सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे अशा पात्र नागरिकांनीच लसीकरण केंद्रावर जावं, असंही कळवण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या ज्या नागरिकांची, कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीची फक्त दुसरी मात्रा घेणं बाकी आहे, त्यांच्यासाठीच एकूण ९२ केंद्रांवर लसीकरण केलं जात आहे. लसीच्या उपलब्धतेप्रमाणे जिल्ह्यातल्या लसीकरण केंद्रावर लस घेऊन सहकार्य करण्याचं आवाहन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी रेमडीसीविर इंजेक्शनच्या एक हजार मात्रा, जिल्हा सामान्य रुग्णालयाला मिळाल्या आहेत. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या आमदार निधीतून याची खरेदी करण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळीत औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेचा दुष्परिणाम परिसरातल्या काही गावांवर दिसून येत असल्यामुळे दादाहरी वडगांवच्या ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाला समर्थन देत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित अधिकारी, औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी आणि जिल्हा प्रशासनास यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. राखेच्या ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेची विल्हेवाट निर्जन ठिकाणी करावी, असं मुंडे यांनी म्हटलं आहे.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सेवेकरी शिवराम-मामा जाधव यांचं, काल औरंगाबाद इथं दीर्घ आजारानं निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. शहरातल्या मिलिंद महाविद्यालयाचं बांधकाम सुरु असतांना शिवराम मामांना बाबासाहेब आणि माई आंबेडकरांची सेवा करण्याची संधी लाभली होती.
****
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
LIVE : संजय राठोडांच्या खात्याची जबाबदारी अन्य मंत्र्याकडे देण्याची शक्यता | National
LIVE : संजय राठोडांच्या खात्याची जबाबदारी अन्य मंत्र्याकडे देण्याची शक्यता | National
4:59 pm (IST) वनखात्याचा तात्पुरता चार्ज अन्य कॅबिनेट मंत्र्यांकडे? याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता नव्या कॅबिनेट मंत्रिपदी ��ियुक्तीची शक्यता कमी 4:30 pm (IST) मराठा आरक्षण प्रकरणी मोठी बातमी मराठा आरक्षण प्रकरणी ‘सह्याद्री’वर बैठक उद्धव ठाकरे, अजित पवार बैठकीला उपस्थित अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित वळसे पाटील, विजय वडेट्टीवार उपस्थित रविशंकर प्रसाद, देवेंद्र फडणवीस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 December 2017 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १४डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि. **** ** बँक खात्याला आधार आणि पॅन क्रमांक जोडण्याची मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ** विधीमंडळात तिसऱ्या दिवशीही कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात विरोधी पक्ष आक्रमक ** औरंगाबादमधल्या गॅस्ट्रो प्रकरणी जाणीवपूर्वक हलगर्जी झाल्याचं निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि ** दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा श्रीलंकेवर १४१ धावांनी दणदणीत विजय; रोहित शर्माचं द्विशतक **** केंद्र सरकारने बँक खात्याला आधार आणि पॅन क्रमांक जोडण्याची मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आधार क्रमांक, पॅन किंवा फॉर्म ६० जमा करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१८ अशी करण्यात आली आहे. यासाठी नियमात आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी बँक खात्याला आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१७ अशी होती. मात्र १ ऑक्टोबरनंतर नवीन खाते सुरू केलेल्या खातेदारांसाठी ही मुदत सहा महिन्यांची असणार आहे. सरकानं अधिसूचित केलेल्या तारखेपर्यंत जर आधार आणि पॅन क्रमांक बँकेला सादर केला नाही तर संबंधित ग्राहकांचे बँक खात्यावरचे व्यवहार बंद करण्यात येतील, असं सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. **** विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काल तिसऱ्या दिवशीही कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांसंदर्भात विरोधक आक्रमक राहिले. विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी हौद्यात उतरून एकमेकांविरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहात अभूतपूर्व गदारोळ झाला. त्यामुळे कालही कामकाज दुपारीच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधानसभेतही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या आकडेवारीला आक्षेप घेत सत्य माहिती सभागृहात मांडण्याची मागणी केली. **** विधानसभेत विरोधी पक्षांनी ४० लाख हेक्टरवरच्या कपाशीवर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीबद्दल लक्षवेधी सूचना मांडली. याबाबत माहिती संकलित केली जात असल्याचं, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितलं. मात्र त्यानंतरही विरोधकांनी हौद्यात उतरून गदारोळ केल्यानं, अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केलं. **** औरंगाबाद इथल्या छावणी परिसरात गेल्या नोव्हेंबर महिन्यात उद्भवलेल्या गॅस्ट्रो प्रकरणी जाणीवपूर्वक हलगर्जी झाल्याचं निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे. ते काल विधानसभेत आमदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते. या भागातली जुनी जलवाहिनी बदलून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. **** राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान योजनेतल्या एकशे अकरा प्रस्तावांना पूर्व संमती देण्यात आली असून त्यापैकी ६४ प्रस्तावांना पूर्ण अनुदान देण्यात आलं असल्याचं, कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी काल विधानसभेत सांगितलं. ही योजना बंद केल्याने िद्यापीठाच्या ा उद्योजकांचं नुकसान झाल्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना, फुंडकर यांनी, या निर्णयामुळे िद्यापीठाच्या ा उद्योगाला चालना मिळणार असल्याचं सांगितलं. योजनेतल्या उर्वरित ४७ प्रस्तावांचं अंशत अनुदान प्रलंबित असून त्यांना नवीन योजनेनुसार अनुदान देण्यात येत असल्याची माहितीही फुंडकर यांनी दिली. **** दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर मिळणं आवश्यक आहे मात्र त्याच वेळेस सहकारी दूध उत्पादक संघही अडचणीत येणार नाहीत यादृष्टीनं हिवाळी अधिवेशन काळातच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान सभेत या विषयावरच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं. सहकारी दूध संस्थांनी त्यांच्या प्रशासकीय आणि इतर खर्चावर नियंत्रण न आणता शेतकऱ्याला दुधासाठी मिळणाऱ्या दुधावर नियंत्रण आणणं हे अन्यायकारक असल्याचं ते म्हणाले. ****** औरंगाबाद शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागेची अडचण असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत एका तारांकित प्रशाला उत्तर देताना दिली. आमदार धनंजय मुंडे, सतीश चव्हाण आणि अमरसिंह पंडीत यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. **** डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा िद्यापीठाच्या अधिसभेवर विधीमंडळाचे प्रतिनिधी म्हणून आमदार अमरसिंह पंडीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** नौदलाची ‘आयएनएस कलवरी’ ही पाणबुडी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत राष्ट्राला अर्पण केली जाणार आहे. डिझेल-इलेक्ट्रिकवर चालणारी ही पाणबुडी आहे. अशा प्रकारच्या आणखी काही पाणबुड्या नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार असून, त्यातली ही पहिली पाणबुडी आहे. ‘ **** राज्यात काल १० नगरपरिषदा आणि नगरपंचायंतीच्या निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री नगरपंचायतीसाठी ७५ टक्के मतदान तर नांदेड जिल्ह्यातल्या किनवट नगरपालिकेसाठी ६२ टक्के मतदान झालं. या दोन्ही ठिकाणची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून केली जाणार आहे. ***** आणि आता ऐकू या पॉझिटीव्ह इंडिया मोहिमे अंतर्गत एक सकारात्मक बातमी….. वाशिम शहरातील तरुण इंजिनिअर अजिंक्य धनंजय गोरे यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजने अंतर्गत २५ लाख रुपये कर्ज घेऊन कोणार्क ट्रान्सफार्मर ही कंपनी उभी करून स्वतः सोबत नऊ लोकांनाही रोजगार दिला आहे. ऐकूया त्यांची ही यशोगाथा. माझ नाव अजिंक्य धंनजय गोरे, मि वाशिमचा राहणारा आहे महाराष्टृ. मि माझी इंजिनिरिंग ईलेक्टिृकल मुंबईवरणं कंमप्लीट केलेली आहे. इंजेनिरिंग झाल्या नंतर दोन वर्ष मुंबईला ऐका कंपनीमध्ये जॉब केला. जॉब केल्या नंतर मि प्राय मिनिस्टर जनरेट प्रोग्राम अंतरर्गत 25 लाखाच्या लोन साठी डि.आय.सी. मध्ये अप्लाय केल. लोन अप्लाय केल्या नंतर मला 25 लाखाचं लोन शांगसंग झालं. एस.बि.आय. ने मला फंनडिंग केल. लोन मिळाल्या नंतर मि माझे कोनारक् टृांन्सफारमर नावाची कंपनी 5 जानेवारी 2017 रोजी वाशिमला जालू केली. कंपनी चालू केल्या नंतर सद्या तिथे 9 लोकांनां रोजगार मिळतो आहे. अधिक माझ निमिर्तीचं लायसंन जे मला प्राप्त झालेल आहे. त्याचं काम चालू आहे. दुसरी गोष्ट रिंपेरिंगचं महाराष्टृचं इलेक्टीसिटी बोर्डचे आतापरीयंत 50 लाखाचे कामं जे मि पुर्ण केलेलं आहे. आणि माझा जो व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालू आहे. **** मोहाली इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेवर १४१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. काल श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत, भारतीय संघाला फलंदाजीला बोलावलं. कर्णधार रोहित शर्माची झंझावाती द्विशतकी खेळी आणि श्रेयस अय्यरच्या ८३ धावांच्या बळावर भारतीय संघानं, निर्धारीत ५० षटकात ३९२ धावा करत, श्रीलंकेसमोर विजयासाठी ३९३ धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेल्या श्रीलंकेच्या संघानं आठ गडी बाद २५१ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतलं तिसरं द्विशतक झळकावणारा रोहित शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तीन सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघ एक – एक अशा बरोबरीत असून, मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना येत्या रविवारी विशाखापट्टणम् इथं खेळवला जाणार आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या निम्नतेरणा उपसा सिंचन योजनेसाठी ७ कोटी ��४ लाख रूपयांचा निधी देण्याची मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी जलसंपदा मंत्र्याकडे केली आहे. निम्न तेरणा योजनेचे पाच पंपगृह गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत, यामुळे लातूर आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यातल्या सिंचन व्यवस्थेवर परिणाम होत आहे. या निधिमुळे हे पंपगृह चालू होऊन ६ हजार ८९० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल, असं ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीत म्हटलं आहे. **** परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं अन्न आणि औषध विभागानं टाकलेल्या छाप्यात तिघा जणांच्या घरातून गुटखा, पानमसाला असा एकूण सात लाख ८५ हजार २१० रूपयांचा साठा काल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन जणांविरूद्ध कारवाई करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ढोकी परिसरातल्या तेरणा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी आवसायकाची नियुक्ती रद्द करून प्रशासकाची नियुक्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे आमदार राणा जगजतसिंह पाटील यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे. *****
0 notes