#रेल्वेमध्ये
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिम तसंच ठाणे दौऱ्यावर-विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी
राज्यात अकृषिक कर पूर्णपणे माफ-संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना लागू करण्याचा राज्यमंत्रिमंडळाचा निर्णय
रेल्वेच्या खाजगीकरणाच्या सर्व चर्चा निराधार-रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून स्पष्ट
आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांवर नेण्याची शरद पवार यांची मागणी
अहमदनगरचं अहिल्यानगर नामकरण करण्याला केंद्र सरकारची मंजुरी
आणि
छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून नवरात्रात प्रसवपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिम तसंच ठाणे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात वाशिम इथं २३ हजार ३०० कोटी रुपयांच्या तर ठाणे इथं ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता यावेळी जारी करण्यात येईल. प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे एक हजार ९२० कोटी रुपयांचे प्रकल्प ते राष्ट्राला समर्पित करतील. पोहरादेवी इथं "बंजारा विरासत संग्रहालयाचं" उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
मुंबई मेट्रोच्या नव्या टप्प्याचं उद्घाटन, ठाणे मेट्रो प्रकल्पांची पायाभरणी तसंच नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्राच्या विकासासाठी नैना प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
वाशिम दौऱ्यासाठी पंतप्रधानांचं आज सकाळी नांदेड इथं श्री गुरूगोविंदसिंगजी विमानतळावर आगमन होईल, तिथून ते पोहरादेवीकडे प्रयाण करतील. दुपारी २ वाजेच्या सुमारास पंतप्रधान नांदेड विमानतळावरून मुंबईकडे रवाना होणार आहेत.
****
राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाणिज्य आणि औद्योगिक वापराखालील जमिनीवरील अकृषिक करही रद्द करण्यात येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
राज्यात प्राचीन तसंच ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान केल्यास दोन वर्षांचा तुरूंगवास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील सर्व ऊसतोड, वाहतूक कामगार आणि मुकादमांना झोपडी तसंच बैल जोडीकरता विमा संरक्षण देण्यासाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. साखर कारखान्यांकडून ऊस गाळपावर प्रतिवर्षी प्रति मेट्रीक टन दहा रुपयांप्रमाणे मिळणाऱ्या निधीतून या विमा योजनेसाठी खर्च करण्यात येईल.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना राज्यमंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामुळे सिल्लोड तालुक्यातल्या १२ गावांमधल्या सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. यासाठी येणाऱ्या ५३४ कोटी ९२ लाख रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यात गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्यासही काल मान्यता देण्यात आली.
जैन, बारी, तेली, हिंदू-खाटीक, लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करणं, खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ करणं, राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करणं, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पात्र शिक्षकेतर अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत दोन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करणं, आदी निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.
****
रेल्वेच्या खाजगीकरणाच्या सर्व चर्चा निराधार असल्याचं, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे. काल नाशिक इथं केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाच्या चाळीसाव्या स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या प्रवासाचं साधन म्हणून रेल्वे कडे पाहिलं जातं, या दृष्टीनेच केंद्र सरकारने गेल्या दहा ��र्षात रेल्वेमध्ये आर्थिक, संशोधन, सुरक्षा आणि मनुष्य बळाच्या माध्यमातून गुंतवणूक केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
****
अनुसूचित जमातीच्या आरक्षणास धक्का लागू नये, यासह अन्य मागण्यांसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी काल मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. त्यामुळे मंत्रालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या सर्व लोकप्रतिनिधींना सुखरूपपणे जाळीबाहेर काढलं. त्यानंतर आपल्या मागण्यांसाठी झिरवळांसह सर्वांनी ठिय्या आंदोलन केलं.
****
केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांवर नेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे. ते काल सांगली इथं पत्रकारांशी बोलत होते. यासाठी संसदेत सरकारने विधेयक आणल्यास आपण पाठिंबा देऊ, असं पवार यांनी सांगितल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महायुती आणि महाविकास आघाडीने मिळून आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली आहे. ते काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलत होते. दसऱ्याला बीड जिल्ह्यातल्या नारायणगड इथं सामाजिक मेळाव्याचं आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली.
****
मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य सुभाष जावळे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात विविध मागण्यांसाठी परभणी इथं पुकारलेलं उपोषण काल दहाव्या दिवशी मागे घेतलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांनी काल जावळे यांची उपोषणस्थळी भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक घेण्याचं आश्वासन दिलं. येत्या मंगळवारी मुंबईत ही बैठक घेणार असल्याचं, पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले...
‘‘मंगळवारी दुपारी ३ वाजता सह्याद्रीवर आम्ही बैठक बोलावत आहोत, तीन रिटायर्ड जज ची कमिटी जी अपॉइंट झालेली आहे, टॉपचे जजेस आहेत. त्या बैठकीला मंगळवारी त्या तीन रिटायर्ड जजेसना आम्ही बोलावतो आहोत. एकदा एसीबीसीचं आरक्षण दिलं की म्हणजे जातीचं दिलं की पुन्हा आर्थिक मागासचं आरक्षण देता येत नाही.तरीही कायदेशीर मार्ग काय काढता येईल,याचा विचार आम्ही नक्की करू.’’
****
माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. काल इंदापूर इथं पत्रकार परिषदेत ��ाटील यांनी ही घोषणा केली.
****
तिरुपती तिरुमला इथल्या श्री व्यंकटेश्व�� स्वामी मंदिरात प्रसादाच्या लाडूमधल्या कथित भेसळ प्रकरणी स्वतंत्र विशेष तपास पथक - एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं, याप्रकरणी आरोप - प्रत्यारोपांच्या आधारे कोणतंही निरीक्षण नोंदवलेलं नसून, न्यायालयाच्या निर्णयाला राजकीय रंग देऊ नये, असं नमूद केलं आहे.
****
छत्तीसगड जिल्ह्यातल्या नारायणपूर इथे काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सुमारे २८ नक्षलवादी मारले गेले. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाची शोधमोहीम सुरू असतांना ही चकमक झाली. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र हस्तगत करण्यात आली आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्याचं अहिल्यानगर असं नामांतर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल ट्विट संदेशातून ही माहिती दिली. या निर्णयाबद्दल विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त केले आहेत.
****
गर्भधारणापूर्व तसंच प्रसवपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं नवरात्रोत्सवाच्या काळात जनजागृती केली जात आहे. शहरात कर्णपुरा परिसरात भरलेल्या यात्रेत बेटी बचाओ बेटी पढाओ ही ध्वनिफीत ऐकवली जात आहे. गर्भलिंगनिदान किंवा स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक, संकेतस्थळाचं बॅनर तसंच माझी मुलगी ही कविता प्रदर्शित करण्यात आली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. काल धाराशिव इथं आढावा बैठकीत ते बोलत होते. तुळजापूर इथे शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान दर्शनाला येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावं असे निर्देश सावंत यांनी दिले आहेत. दरम्यान, तुळजाभवानी देवीच्या परवा सोमवारपासून विविध अलंकार महापूजा बांधल्या जाणार आहेत.
****
बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा इथे २७५ जणांना काल भगरीतून विषबाधा झाली. या सर्वांवर साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आलं. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातही काही जणांना काल भगरीतून विषबाधा झाल्याचं वृत्त आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन खासदार अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. नांदेड इथं जिल्हा परिषदेच्या शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात काल ते बोलत होते. यावेळी शंभर शिक्षकांना मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.
****
दुबईतल्या शारजा इथे सुरु असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल न्यूझीलंडनं भारताचा ५८ धावांनी पराभव केला. तर दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा १० गडी राखून पराभव केला. आज या स्पर्धेत अ गटात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका तर ब गटात इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे.
****
0 notes
Text
महाराष्ट्राचे स्वप्न भंगले, सेमी हायस्पीड रेल्वेमध्ये उत्तरप्रदेशची बाजी
https://bharatlive.news/?p=175354 महाराष्ट्राचे स्वप्न भंगले, सेमी हायस्पीड रेल्वेमध्ये उत्तरप्रदेशची ...
0 notes
Text
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ' मला पकडून ठेवा '
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ‘ मला पकडून ठेवा ‘
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बिहार येथील या व्हिडिओमध्ये एका चोरट्याला रेल्वेमध्ये चोरी करताना पकडले होते त्यानंतर त्याला शिक्षा म्हणून रेल्वेच्या बाहेर खिडकीच्या बाजूला लटकवण्यात आले त्यावेळी तो चक्क ‘ मला धरून ठेवा नाहीतर माझा जीव जाईल ‘ अशी जीवाची भीक मागत होता. रेल्वेमध्ये मोबाईल चोरी, पाकीट चोरी असे प्रकार वाढले असून सुमारे 15 किलोमीटरपर्यंत अशाच पद्धतीने…

View On WordPress
0 notes
Text
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ' मला पकडून ठेवा '
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ‘ मला पकडून ठेवा ‘
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बिहार येथील या व्हिडिओमध्ये एका चोरट्याला रेल्वेमध्ये चोरी करताना पकडले होते त्यानंतर त्याला शिक्षा म्हणून रेल्वेच्या बाहेर खिडकीच्या बाजूला लटकवण्यात आले त्यावेळी तो चक्क ‘ मला धरून ठेवा नाहीतर माझा जीव जाईल ‘ अशी जीवाची भीक मागत होता. रेल्वेमध्ये मोबाईल चोरी, पाकीट चोरी असे प्रकार वाढले असून सुमारे 15 किलोमीटरपर्यंत अशाच पद्धतीने…

View On WordPress
0 notes
Text
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ' मला पकडून ठेवा '
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ‘ मला पकडून ठेवा ‘
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बिहार येथील या व्हिडिओमध्ये एका चोरट्याला रेल्वेमध्ये चोरी करताना पकडले होते त्यानंतर त्याला शिक्षा म्हणून रेल्वेच्या बाहेर खिडकीच्य��� बाजूला लटकवण्यात आले त्यावेळी तो चक्क ‘ मला धरून ठेवा नाहीतर माझा जीव जाईल ‘ अशी जीवाची भीक मागत होता. रेल्वेमध्ये मोबाईल चोरी, पाकीट चोरी असे प्रकार वाढले असून सुमारे 15 किलोमीटरपर्यंत अशाच पद्धतीने…

View On WordPress
0 notes
Text
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ' मला पकडून ठेवा '
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ‘ मला पकडून ठेवा ‘
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बिहार येथील या व्हिडिओमध्ये एका चोरट्याला रेल्वेमध्ये चोरी करताना पकडले होते त्यानंतर त्याला शिक्षा म्हणून रेल्वेच्या बाहेर खिडकीच्या बाजूला लटकवण्यात आले त्यावेळी तो चक्क ‘ मला धरून ठेवा नाहीतर माझा जीव जाईल ‘ अशी जीवाची भीक मागत होता. रेल्वेमध्ये मोबाईल चोरी, पाकीट चोरी असे प्रकार वाढले असून सुमारे 15 किलोमीटरपर्यंत अशाच पद्धतीने…

View On WordPress
0 notes
Text
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ' मला पकडून ठेवा '
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ‘ मला पकडून ठेवा ‘
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बिहार येथील या व्हिडिओमध्ये एका चोरट्याला रेल्वेमध्ये चोरी करताना पकडले होते त्यानंतर त्याला शिक्षा म्हणून रेल्वेच्या बाहेर खिडकीच्या बाजूला लटकवण्यात आले त्यावेळी तो चक्क ‘ मला धरून ठेवा नाहीतर माझा जीव जाईल ‘ अशी जीवाची भीक मागत होता. रेल्वेमध्ये मोबाईल चोरी, पाकीट चोरी असे प्रकार वाढले असून सुमारे 15 किलोमीटरपर्यंत अशाच पद्धतीने…

View On WordPress
0 notes
Text
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ' मला पकडून ठेवा '
रेल्वेच्या खिडकीतून मोबाईल ओढणारा चोरच म्हणून लागला ‘ मला पकडून ठेवा ‘
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बिहार येथील या व्हिडिओमध्ये एका चोरट्याला रेल्वेमध्ये चोरी करताना पकडले होते त्यानंतर त्याला शिक्षा म्हणून रेल्वेच्या बाहेर खिडकीच्या बाजूला लटकवण्यात आले त्यावेळी तो चक्क ‘ मला धरून ठेवा नाहीतर माझा जीव जाईल ‘ अशी जीवाची भीक मागत होता. रेल्वेमध्ये मोबाईल चोरी, पाकीट चोरी असे प्रकार वाढले असून सुमारे 15 किलोमीटरपर्यंत अशाच पद्धतीने…

View On WordPress
0 notes
Text
ऑटोरिक्षा चालकाचा मुलगा झाला यूपीएससी
ऑटोरिक्षा चालकाचा मुलगा झाला यूपीएससी
नाशिकमध्ये जगन्नाथ पवार या ऑटोरिक्षा चालकाचा मुलगा स्वप्नील पवार याने यूपीएससीच्या अंतिम यादीत स्थान मिळविले. त्याने केमिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि यूपीएससीमध्ये हा त्याचा दुसरा प्रयत्न होता. त्याच्या पहिल्याच प्रयत्नात, त्याने AIR 632 सह परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय रेल्वेमध्ये नियुक्ती मिळवली. पण यूपीएससीमध्ये चांगली पोस्टिंग मिळवण्यासाठी त्याने पुन्हा परीक्षेची तयारी…

View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसाळेची कांस्यपदकाला गवसणी
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात राज्यांना उपप्रवर्ग पाडता येणार-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान-डॉ. नीलम गोऱ्हे यांचं प्रतिपादन
आणि
लोकमान्य टिळक तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सर्वत्र अभिवादन
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली. या ऑलिम्पिक स्पर्धेतलं भारताचं हे तिसरं पदक ठरलं आहे. स्वप्नीलने ४५१ पूर्णांक ४ दशांश गुण घेऊन तिसरं स्थान मिळवत कांस्यपदक पटकावलं. कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातला रहिवासी असलेला स्वप्नील, सध्या रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करतो, नेमबाजी स्पर्धेसाठी त्याने प्रथम पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुलात आणि ऑलिम्पिक पात्रता गाठल्यानंतर दिल्ली इथं सराव केला.
स्वप्नीलच्या या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान न��ेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा गौरव केला आहे. कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक पहिलं पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या नंतर तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने ही कामगिरी केली, असा गौरवपूर्ण उल्लेख शिंदे यांनी केला. त्यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचं अभिनंदन केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्वप्निलचं अभिनंदन करतांना कोल्हापूरच्या मातीतल्या या सुपुत्राने महाराष्ट्राचा गौरव वाढवत, क्रीडाक्षेत्राला नवं चैतन्य, नवीन ऊर्जा दिली, अशी भावना व्यक्त केली, तर स्वप्नीलच्या अभेद्य यशाला सलाम, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सामाजिक संपर्क माध्यमावरच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनीही स्वप्निल कुसाळेचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे.
****
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गात राज्य सरकारांना उपप्रवर्ग पाडता येऊ शकतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठानं २००४ साली ईव्ही चिनैया प्रकरणात पाच न्यायाधीशांच्या पीठानं दिलेला निर्णय रद्दबातल ठरवत, आज हा निर्णय दिला. अनुसूचित जाती आणि जमातींमधेही आर्थिक आणि सामाजिक स्तरांमधे प्रचंड विविधता असून त्यामुळे सर्व प्रकारच्या मागास वर्गांना एकाच गटात आरक्षण देणं योग्य नाही असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी या निकालात म्हटलं आहे. त्याचं प्रमाण ठरवण्याचा अधिकार राज्यसरकारांना असून शिक्षण आणि नोकरीत अशा प्रकारचं आरक्षण राज्यसरकारांना देता येईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
****
देशात झालेल्या रेल्वे अपघातांच्या घटनांबद्दल आत्मपरीक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात दरवर्षी १७१ रेल्वे अपघात होत असत, हे प्रमाण ६८ पर्यंत कमी झाल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं. २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वेच्या सुरक्षेसाठी ८७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला, हा खर्च मागच्या वर्षी ९७ हजार कोटींपर्यंत गेला. यंदाच्या अर्थसंकल्पात सुरक्षेवरच्या खर्चासाठी एक लाख आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद करण्यात आल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
****
रस्ते अपघातातल्या जखमींवर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत असणाऱ्या रु��्णालयात विनाखर्च उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत, रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ही योजना सध्या चंदीगड आणि आसाम मधे प्रायोगिक तत्वावर सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटीव बँकेतील खातेदारांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांनी आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीताराम यांची दिल्लीत भेट घेतली. या बँकेतील आर्थिक घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिझर्व बँकेने आर्थिक निर्बंध घातले होते, यामुळे या बँकेतील खातेदार, सहकारी पतसंस्था आणि सोसायट्या, नागरी सहकारी बँका यांना स्वतःचाच पैसा बँकेतून काढताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याकडे वायकर यांनी लक्ष वेधलं. या प्रकरणी लक्ष घालण्याचं आश्वासन सीतारामन यांनी दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे उद्भवत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासंदर्भात मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. येत्या १० दिवसांत या महामार्गावरील वाहतूक सुरळित न झाल्यास संबंधितांच्या निलंबनाच्या कारवाईचा इशाराही पवार यांनी दिला आहे.
****
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण ही योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान असल्याचं, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान यात्रेत त्या आज बोलत होत्या. या योजनेअंतर्गत रक्षाबंधनापर्यंत पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्री भावाकडून रक्कम जमा होईल, असं त्यांनी सांगितलं. पैठण ता���ुक्यात महिला अस्मिता भवन उभारण्याचं नियोजन करावं, या भवनात महिलांसाठी क्रीडा, मनोरंजन, वाचनालय आणि बचत गट बैठका यासाठी सुविधा निर्माण करण्याचा मानस गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
****
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून राज्यभरात महिला मेळाव्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सध्या या योजनेतून दररोज लाखो अर्ज सादर केले जात आहेत. जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी सन्मान यात्रेतील मेळाव्यांतून या योजनेची माहिती दिली जाणार असल्याचं कायंदे यांनी सांगितलं.
****
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करणार, असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य��ंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे. आज पुणे इथं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाज समन्वय समितीतर्फे घेतलेल्या अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आठवले यांच्या हस्ते पहिला ‘स्वर्गीय हनुमंतराव साठे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ बाळासाहेब जानराव यांना प्रदान करण्यात आला.
थोर स्वातंत्र्यसेनानी, लेखक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथी निमित्त आणि मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या शतकोत्तर चौथ्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवनात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी अण्णा भाऊच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केलं. शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास आज सकाळपासून सामाजिक, शैक्षणिक संघटनेच्या वतीने पृष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे. अण्णाभाऊंच्या कार्याची महती विशद करणाऱ्या गीतांचं सादरीकरण स्थानिक कलामंचावरून करण्यात आलं.
नांदेड इथं माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, शहरात जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
बीड इथं अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी निघालेल्या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने आबालवृद्ध सहभागी झाले होते. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी त्यांच्या अनुयायांनी केली. शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. आमदार संदीप क्षीरसागर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते
****
पंढरपूरहून शेगावकडे परतीच्या प्रवासावर निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज जालना इथं महापालिका आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांनी स्वागत केलं. यावेळी उपायुक्त नंदा गायकवाड यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या आंतरभारती वतीने दिला जाणारा स्नेहसंवर्धन पुरस्कार २०२४ केरळच्या कन्या सिंधू किणिकर-नवगिरे यांना दिला जाणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी या पुरस्काराचं वितरण होणार आहे. परंपरेनुसार गतवर्षीचे पुरस्कार प्राप्त नरपती कुंजेडा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आंतरभारतीचे राष्ट्रीय ��ार्याध्यक्ष अमर हबीब आणि आंतरभारती लातूरचे अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. अन्य राज्यातून येऊन अंबाजोगाईत स्थायिक झालेल्या आणि अंबाजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.
****
छत्रपती संभाजीनगरच्या सातारा देवळाई परिसरात निर्माण केलेल्या संकल्प वनराईला जगातील पातळीवरील इन्व्ह्यारोकेअर ग्रीन अवार्ड २०२४ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
पाच महिन्यांचे बाळ अचानक रेल्वेमध्ये दगावले
https://bharatlive.news/?p=101450 पाच महिन्यांचे बाळ अचानक रेल्वेमध्ये दगावले
मनमाड : पोटाची खळगी ...
0 notes
Text
East Central Railway : 2206 Posts

पूर्व मध्य रेल्वेमध्ये ‘अप्रेंटिस’ 2206 पदांची भरती, सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचा. पूर्व मध्य रेल्वे ‘अप्रेंटिस’ Recruitment 2021 #MyCareer #governmentjob #privatejob #freshersvacancy #Freshersjob #currentaffair #dailyquiz #career #jobin2021 Read the full article
0 notes
Text
10 उत्तीर्ण उमेदवारांना नौकरीची मोठी संधी........!
10 उत्तीर्ण उमेदवारांना नौकरीची मोठी संधी……..!
मुंबई दि.19 – सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास युवकांसाठी मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे ,मुंबई विभागाने अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती जाहीर केलीय. पश्चिम रेल्वे विभाग एकूण 3591 पदांवर भरती करणार आहे. रेल्वेमध्ये अपरेंटिसची करण्याची ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही दहावी ��त्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी…

View On WordPress
0 notes
Photo
सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु होणार?; हे असणार सर्वात मोठे आव्हान सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल पुन्हा रुळांवर आणण्यासाठी राज्य सरकार व रेल्वेमध्ये चर्चासत्रांना जोर आला आहे. राज्य सरकारने तीन टप्प्यांमध्ये लोकल सुरू करण्याची मागणी केली होती.
0 notes
Photo

भारतीय रेल्वेने रचला इतिहास; १ जुलै रोजी देशातील सर्व गाड्या वेळेवर पोहोचल्या Indian Railway : सध्या भारतीय रेल्वेमध्ये अनेक बदल होत आहेत. मात्र रेल्वे सुरु होऊन आज इतक्या वर्षांनतरही ती वेळेवर येण्याबद्दलच्या तक्रारी | #IndianRailway #NewRecord #FirstTimeOnTime http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/indian-railways-claims-100-per-cent-punctuality-record-for-first-time-in-history/?feed_id=282&_unique_id=5efdc8d362274
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 13 March 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
भारतीय रेल्वेमध्ये गेल्या दहा वर्षांत सर्वसमावेशक परिवर्तन-पंतप्रधानांचं प्रतिपादन
लातूरचा मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना तसंच जालन्याच्या गतीशक्ती टर्मिनलचं लोकार्पण
सामाजिक न्याय विभागाचे राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान
छत्रपती संभाजीनगर इथं आज स्वनिधी से समृद्धी मेळाव्याचं आयोजन
आणि
खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर संघाला सर्वसाधारण विजेतेपद
****
भारतीय रेल्वेमध्ये गेल्या दहा वर्षांत सर्वसमावेशक परिवर्तन झालं असून, रेल्वेचा विकास हा सरकारच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक असल्याचं प्रतिपादन, पंतप्र��ान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशभरातल्या सुमारे ८५ हजार कोटी रुपयांच्या विविध रेल्वे उपक्रमांची पायाभरणी आणि लोकार्पण काल पंतप्रधानांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पांमध्ये लातूर इथल्या मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना तसंच जालन्यातल्या 'गती शक्ती कार्गो टर्मिनल'सह, १५० एक स्थानक एक उत्पादन दुकानं, १८ नवीन रेल्वेमार्ग, बडनेरा इथली वॅगन दुरूस्ती कार्यशाळा, पुणे इथली वंदे भारत बोगी देखभाल दुरुस्ती कार्यशाळा, पाच जनऔषधी केंद्रं, आणि चार रेल कोच रेस्टॉरंट आदी ५०६ प्रकल्पांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून दूरदृश्यप्रणालीद्वारे तर जालना इथं केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि लातूर इथं खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लातूर इथल्या मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्यात रेल्वे आणि मेट्रो कोचसह वंदेभारत रेल्वे कोचसुद्धा तयार होणार आहेत. जालन्यातल्या 'गती शक्ती कार्गो टर्मिनल'मुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विदेशात जाईल, तसंच जालन्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जालना रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आलेल्या कोच देखभाल सुविधा -पिटलाईनचं आज सकाळी लोकार्पण होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, पीएम सूरज या राष्ट्रीय पोर्टलचा शुभारंभ करणार आहेत. वंचित समाजघटकांच्या विकासासाठी विविध सुविधा पुरवणारी ही योजना, देशभरातल्या ५२५ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या मुंबई, नागपूर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, सोलापूर, अहमदनगर, हिंगोली आणि चंद्रपूर या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
भारतीय स्टेट बँकेनं निवडणूक रोख्यांसंबंधीची सगळी माहिती काल निवडणूक आयोगाकडे सोपवली. ही माहिती आपल्या संकेतस्थळावर १५ मार्च च्या संध्याकाळपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश न्यायालयानं निवडणूक आयोगालाही दिले आहेत.
****
औषधी उत्पादक कंपन्यांनी औषध वितरणासाठी आचार समिती तसंच एकसमान संहिता निश्चित करावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. या कंपन्यांनी आरोग्य सेवा क्षेत्रातल्या कोणालाही कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू देऊ नये, औषधांचे मोफत नमुने फक्त डॉक्टरांनाच दिले जावेत, असे निर्देशही सरकारनं दिले आहेत.
****
सामाजिक न्याय विभागाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण झालं. मागच्या चार वर्षातले ३९४ पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आल���. यामध्ये जालन्याचे शिवाजी गवई, छत्रपती संभाजीनगरचे धोंडिरामसिंह राजपूत, छत्रपती संभाजीनगर इथलं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण विकास मंडळ, लातूर जिल्ह्यातली क्रांतिसूर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि लातूर इथल्याच शिवकृपा समाज सेवा मंडळ या व्यक्ती तसंच संस्थांचा समावेश आहे.
****
आदिवासी हे देशाचे खरे मालक असून, या देशातल्या जल, जंगल आणि जमिनीवर पहिला हक्क आदिवासींचा असल्याचं, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते काल नंदुरबार इथं भारत जोडो न्याय यात्रेत बोलत होते.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं ४३ उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. यातले १२ उमेदवार आसाममधले, मध्यप्रदेश आणि राजस्थानातले प्रत्येकी १०, गुजरात सात, उत्तराखंडमधले तीन, तर एक उमेदवार दमण आणि दीवमधला आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल यवतमाळच्या राळेगाव इथं पक्षाच्या जनसंवाद मेळाव्याला संबोधित केलं, या वेळी त्यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १४ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांनी नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज स्वनिधी से समृद्धी मेळावा होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर होणाऱ्या या मेळाव्यात ३३ हजार पथ विक्रेत्यांना दहा हजार रुपयांचं कर्ज आणि परिचय पत्र वितरीत करण्यात येणार आहे.
****
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी काल ‘खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन' अर्थात कीर्ती योजनेची घोषणा केली. विविध क्रीडा प्रकारातल्या प्रतिभावंत तरुण खेळाडूंचा देशाच्या सगळ्या भागांतून शोध घेणं, हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं ठाकूर सांगितलं. शास्त्रीय चाचण्या आणि ��िकषांच्या आधारावर या खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
****
राज्य शासनाच्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं, उदगीरच्या तालुका क्रीडा संकुलात पार पडलेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत, कोल्हापूर जिल्हा संघानं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं आहे. पुणे आणि सातारा संघ उपविजेतेपदाचे मानकरी ठरले. स्पर्धेतल्या सुवर्ण, रौप्य तसंच कांस्य पदकविजेत्यांना अनुक्रमे ६० हजार, ५० हजार आणि ३० हजार रुपयांची बक्षीसं देऊन गौरवण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यात मानवत इथं ॲग्रीपीव्ही संशोधन प्रकल्पाचं काल उद्घाटन करण्यात आलं. जी आय झेड ही जर्मन संस्था, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आणि परभणीचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे संयुक्तपणे हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ॲग्रीपीव्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतजमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती आणि पीक लागवड या दोन्ही बाबी शक्य होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी यावेळी दिली.
****
बीड जिल्हा उद्योग परिषदेच्यावतीनं काल घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ३५ उद्योग घटकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या कराराची एकूण किंमत ६५८ कोटी रुपये असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर शहरातल्या मालमत्ताधारकांसाठी कर थकबाकीवरचं व्याज माफ करणारी योजना महापालिकेनं जाहीर केली आहे. नागरिकांनी येत्या ३१ तारखेपूर्वी थकित कर एकरकमी भरून ही सवलत घ्यावी, असं आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे.
****
धाराशिव इथं काल चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल मूळ मालकास परत करण्यात आला. १३ गुन्ह्यातला ३१ लाखाहून अधिक रुपयांचा हा मुद्देमाल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या एकूण ८६ महसूल मंडळात सोयाबीन पिकासाठी अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात २४१ कोटी रुपयांपैकी २३७ कोटी रुपयांचं वाटप लाभार्थीच्या खात्यात करण्यात आलं. पात्र शेतकऱ्यांनी आपलं आधारपत्र बँक खात्याशी संलग्न करुन घ्यावं, असं आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या, नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचं भूमिपूजन, काल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झालं. या रस्त्याच्या सुधारणेचं काम काही शेतक-यांनी मोबदल्याच्या कारणावरून विरोध केल्या��ं प्रलंबित होतं, आमदार पाटील यांनी त्यातून मार्ग काढत, हा प्रश्न मार्गी लावला.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातला कृषी पर्यवेक्षक मोहन देशमुख याला तीन हजार रुपये लाच स्वीकारताना काल अटक करण्यात आली. अनुदानावर मंजूर झालेल्या रोटावेटर आणि ट्रॅक्टरच्या केलेल्या कामासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात काल दोन जणांचा अपघाती मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाले. रस्त्यावर उभ्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकी धडकून हा अपघात झाला.
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात काल अशाच एका अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मंगल कार्यालयाच्या मालक तसंच चालकांनी लग्नकार्य आणि शुभ प्रसंगांमध्ये मतदारांना मतदान करण्याची शपथ द्यावी, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात मतदानाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे, त्याचा एक भाग म्हणून जिल्हाधिका-यांनी हे आवाहन केलं.
****
0 notes