Tumgik
#halflovestory
lazybookbug · 4 years
Photo
Tumblr media
#mohabat #loveshayari #ishq #akeli #lonelyness #queen #alone #palace #adhurikahaanihumari #halflovestory #wanttobewithyou #youandme #like #youarethere #lovestories #lazy_book_bug https://www.instagram.com/p/CBcNcaABbiR/?igshid=1jdh3q42qrai1
0 notes
dipthebond007 · 2 years
Text
मी तुझ्यावर प्रेम करते पण मित्र म्हणून
ती :  “हे तू काय चालवलंय आहेस चिराग?” काय ऐकतेय हे मी सगळं? काय सांगतो आहेस तू सगळ्यांना कि, आपल्यात प्रेम संबंध आहेत? हे सगळं अती होण्या अगोदर मला स्पष्ट करायचे आहे की, "मी तुला कधीही त्या नजरेने पाहिलेलेच नाही" चिराग!  तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि तो दुर होणे खूप गरजेचे आहे. मी तुला नेहमीच म्हणत आलेली आहे की, आपल्यामध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त आहे पण ते प्रेम आहे असे मी कधीही म्हटलेली नाही. आता मला समजतंय की तू मात्र त्याचा वेगळा अर्थ घेतलेला आहे. मी कधीही मैत्री आणि प्रेमाच्या मधली मर्यादा रेषा ओलांडलेली नाही. कारण माझा मनामध्ये तुझ्याबद्दल मैत्रीच्या व्यतिरीक्त दुसरी कुठलीच भावना कधीही आलेली नाही. त्याचा अर्थ असा नाही आहे कि, मला तुझ्या बद्दल काहीच वाटत नाही. 
मी मान्य करते की, माझ्याही मनात तुझ्या विषयी एक अनामिक ओढ आहे आणि आपला नातं निश्चितच मैत्री पलीकडचं आहे आणि त्या विषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. मैत्रीच्या खूप पुढे आपण आलेलो आहोत. तू खूप काही करतोस माझ्यासाठी जे कुणी मित्र पण नाही करू शकणार आणि मी पण तुझ्यासाठी करतेच कि मैत्रीच्याही पुढे जाऊन आणि ह्याची आपल्या दोघांना पण जाणीव आहे. मी कधीही विसरू शकणार नाही कि तुझं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे आणि हे तुला पण कळतंय कि आपण आपल्या पुढील आयुष्यात देखील एकमेकांना विसरणे निव्वळ अशक्यच आहे.
चिराग, माझं तुझ्यावर प्रेम आहे पण ते मित्र म्हणून, प्रियकर म्हणून मी तुझा कधीच विचार केलेला नाही आणि तुझ्याबद्दल प्रेमाची भावना माझ्या मनात इथून पुढे कधी निर्माण होईल असं मला तरी वाटतं नाही. तुझ्या मनात माझ्या विषयी ज्या भावना आहेत त्यांना वेळीच लगाम लावणे गरजेचे आहे नाहीतर आपल्या दोघांसाठीपण हा विषय खूप त्रासदायक होऊन बसेल. सध्या आपण आपल्या करियर वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तू तुझ्या चांगल्या भविष्याचा विचार कर, मला विश्वास आहे की, तुला माझ्या पेक्षाही सुंदर आणि तुझावर खूप प्रेम करणारी मुलगी मिळेल. मी तुझ्यासाठी खरच योग्य नाहीये.
मलाही माझे काही ध्येय आहेत आणि ते साध्य करायचे आहेत, प्रेम हे त्यापैकी एक नाहीये. मला फक्त माझे करियर सध्या महत्वाचे आहे. म्हणूनच म्हणतेय की, तू आत्ताच्या आत्ता या विषयाला पूर्णविराम दे म्हणजे आपल्यातील मैत्रीचे नाते तसेच आबादीत राहिल. मला तू मित्र म्हणून माझ्या आयुष्यात हवा आहेस. मी तुझा सारखा इतका छान मित्र गमवू इच्छित नाही. आपण खूप चांगले मित्र आहोत आणि आपण हि मैत्री कायम ठेवूयात एवढंच मला तुला सांगायचंय.
चिराग : (सगळं शांतपणे ऐकत होता, मधेच त्याला रडू आवरणे कठीण झालं आणि त्याच्या डोळ्यातील अश्रूंनी आपली वाट शोधात गालावरून घसरत जमीन गाठली, त्याच्या डोळ्यासमोरून भूतकाळातील एक एक चित्र सरकत होती ज्यामधील एक चित्र जरा जास्त स्पष्ट होतं गेलं त्यात ते दोघे पावसामध्ये एका छत्रीखाली एकमेकांचा हात धरून चालत आहेत आणि तिचे अस्पष्ट शब्द त्याच्या कानावर पडतात, आय लव्ह यु चिराग!) 
त्याक्षणी चिराग भानावर येतो आणि ताडकन उठून चालू लागतो, ती आवाज देते चिराग थांब पण तो तसाच चालत राहतो. आता त्याला फक्त जुबीन नौटियालच्या प्रसिद्ध गाण्यातील ओळी ऐकू येत राहतात...
कत्ल बाजार में हो चुका हू फिर भी तू मेरा कातिल नहीं है बेवफा तेरा मासूम चेहरा भूल जाने के काबिल नहीं है भूल जाने के काबिल नहीं है
Tumblr media
2 notes · View notes