#��ीव्ही मालिका
Explore tagged Tumblr posts
Text
टी व्ही बंद पडला
आमचा टी व्ही बंद पडलाबातम्याच हो दिसत नाही ।पिक्चर मालिका सारेच बंदम्हणून कोणीच हसत नाही । सगळ्यांचा डोक्यावर हातविचारही येतात काही बाही ।सारेच बसलेत चिडी चूपकोणीच कोणाशी बोलत नाही । मन झाले उदास कितीभूकही आताशा लागत नाही ।वाट बघतोय डायनिंग टेबलतासन् तास कोणी जेवत नाही । मेकॅनिक म्हणतो विकून टाकानवीन शिवाय जमत नाही ।खिसा थोडा खालीच आहेमहागाईत तोही भरत नाही । लाडकी बहिण लाडका भाऊत्यांच्याशी पण…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 03 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
जनतेनं धर्माच्या राजकारणाला झिडकारलं असून आमच्या सरकारच्या विश्वसनीय कामगिरीला पसंती दिल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केलं. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. संविधानाबाबत राष्ट्रव्यापी जनोत्सवाचं आयोजन करून जनतेला संविधानाच्या प्रत्येक ओळीची माहिती व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आपल्या सरकारनं देशाला जगातल्या दहाव्या क्रमांकावरच्या अर्थव्यवस्थेवरून पाचव्या क्रमांकावर नेलं, आता तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी जनतेनं आम्हाला पुन्हा संधी दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, विरोधकांनी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान सातत्यानं गोंधळ करत शेवटी सभात्याग केला. विरोधकांनी सभात्याग करून सभागृहाचा अवमान केल्याची तीव्र प्रतिक्रिया राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी दिली. देशाचं संविधान हे फक्त हातात ठेवण्यापुरतं नसून, जीवनात आत्मसात करण्याची गरज सभापतींनी व्यक्त केली. विरोधकांनी आत्मचिंतन करावं आणि आपल्या कर्तव्याचं पालन करावं, असा सल्लाही सभापतींनी दिला.
****
पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी आज विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीनं सरकारच्या विरोधात निदर्शनं केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या काल झालेल्या निलंबनाच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात आली.
****
दुपारी १२ वाजता विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पुकारण्यात आला, मात्र आमदार अनिल शिंदे यांनी यावेळातच, सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या निर्णयावर फेरविचार व्हावा, अशी विनंती केली आणि यावर निर्णय येईपर्यंत जमिनीवर बसून कामकाज ऐकू, अशी भूमिका घेतली. मात्र, हे दबावतंत्र न वापरता, विरोधी पक्षांनी संयम बाळगावा, अशी सूचना उपसभापतींनी केली. सध्या विधान परिषदेत मराठा आरक्षणावर चर्चा सुरू आहे.
****
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत तसंच राज्य शासनाच्या गणवेश योजनेअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. गणवेशाची गुणवत्ता आणि दर्जा उत्कृष्ट असेल याची काळजी घेण्यात आल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य रोहित पवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
****
भारताच्या पहिल्या सौर अभियानाच्या आदित्य एल वन या या अंतरिक्षयानानं सूर्य आणि पृथ्वी दरम्यानच्या एल वन या बिंदूभोवती आपली पहिली प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं ही माहिती दिली आहे. यासोबतच या यानाचं दुसऱ्या प्रभामंडळ कक्षेत स्थानांतर करण्याची तयारी पूर्ण झाल्याचंही इस्रोनं सांगितलं. आदित्य एल वन हे यान गेल्या वर्षीच्या दोन सप्टेंबरला प्रक्षेपित करण्यात आलं होतं.
****
उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यात सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या १२१ वर पोहोचली आहे. १८ जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर अलिगड इथं उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज या जखमींची भेट घेऊन चौकशी केली.
****
नीती आयोगाच्या आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथे आज नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संपूर्णता अभियानाची सुरुवात होणार आहे. नीती आयोगामार्फत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबवलं जाणार आहे.
****
पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ काल रात्री झिम्��ॉब्वे इथं दाखल झाला. शुभमन गिल याच्या नेतृत्वात आणि ज्य���ष्ठ क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनात सहा जुलै ते १४ जुलै दरम्यान भारतीय संघ ही मालिका खेळणार आहे.
****
0 notes
Text
भारत वि. इंग्लंड: डाव्यांचा पराभव करण्यासाठी पाहणारे पाहुणे | टीम इंडियाने हा शानदार विक्रम एका शानदार विजयासह तयार केला, आयसीसी कसोटी स्पर्धेत विराट सेनेचा सामना न्यूझीलंडशी होईल
भारत वि. इंग्लंड: डाव्यांचा पराभव करण्यासाठी पाहणारे पाहुणे | टीम इंडियाने हा शानदार विक्रम एका शानदार विजयासह तयार केला, आयसीसी कसोटी स्पर्धेत विराट सेनेचा सामना न्यूझीलंडशी होईल
डिजिटल डेस्क (भोपाळ). डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल (//4848) आणि ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (//47)) यांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसर्या दिवशी शनिवारी भारताने शानदार विजय नोंदविला. आहे. यासह, भारत आयसीसी कसोटी चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचला, तेथे त्यांचा सामना 18 जून रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर न्यूझीलंडशी होईल. 4 सामन्यांच्या…
View On WordPress
#4 था टेस्ट - इंडिया व्ही इंग्लंड 2021 मालिका पहा#dainikbhaskarhindiMedia#अहमदाबाद#आंतरराष्ट्रीय क्रिकेट#क्रिकेट#क्रिकेट बातमी#क्रीडा बातम्या#खेळ#चौथी कसोटी. सर्व संपले! भारताने डाव आणि 25 धावांनी वि��य मिळवला#ताजी बातमी#ताज्या हिंदी बातम्या#दैनिक भास्कर हिंदी#दैनिक भास्करकिंदी ब्रेकिंग न्यूज#दैनिक भास्करकिंदीची बातमी#दैनिकभास्कर हिंदी#दैनिकभास्करिंधि#भारत विरुद्ध इंग्लंड#भारत विरुद्ध इंग्लंड नरेंद्र मोदी स्टेडियम#भास्करकिंदी बातमी#हिंदी बातम्या#हिंदी बातम्या आज#हिंदी बातम्या थेट#हिंदी मध्ये बातमी
0 notes
Text
पीएके विरुद्ध एसए: पाकिस्तानने तिसरा टी -२० सामना 4 गडी राखून 2-1 ने मालिका जिंकला
पीएके विरुद्ध एसए: पाकिस्तानने तिसरा टी -२० सामना 4 गडी राखून 2-1 ने मालिका जिंकला
रविवारी तिसर्या आणि अंतिम टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला आठ चेंडूंत चार विकेट्सने पराभूत करून मालिका २-१ने जिंकली. . Source link
View On WordPress
0 notes
Text
क्रिकेट / भारत-विरुद्ध-इंग्लंड / इंड-वि-इंग्लिश -2-चाचणी -2-लाइव्ह-स्कोअर-स्ट्रीमिंग-अपडेट्स | चेन्नई कसोटी: भारतीय गोलंदाजांनी जोरदार कामगिरी केली, इंग्लंडचा पहिला डाव १44 धावांनी मर्यादित, अश्विनने wickets बळी घेतले, टीम इंडियाने १ 195 195 धावांनी आघाडी घेतली
क्रिकेट / भारत-विरुद्ध-इंग्लंड / इंड-वि-इंग्लिश -2-चाचणी -2-लाइव्ह-स्कोअर-स्ट्रीमिंग-अपडेट्स | चेन्नई कसोटी: भारतीय गोलंदाजांनी जोरदार कामगिरी केली, इंग्लंडचा पहिला डाव १44 धावांनी मर्यादित, अश्विनने wickets बळी घेतले, टीम इंडियाने १ 195 195 धावांनी आघाडी घेतली
चेन्नई. ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (/ 43/5) च्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत इंग्लंडचा पहिला डाव रविवारी इंग्लंडला १ 4 run धावांची आघाडी मिळवून दिला. . आज सकाळी पहिल्या सत्रात भारताचा पहिला डाव 9२ at धावांवर आटोपला पण त्यानंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीने लवकरच इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आणला. दुसर्या डावात भारताने बळी न गमावता 31 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून विकेटकीपर…
View On WordPress
#2 वी चाचणी - भारत व्ही इंग्लंड 2021 मालिका पहा#ओली पोप#क्रिकेट#क्रिकेट बातमी#खेळ#चिदंबरम स्टेडियम विरुद्ध भारत इंग्लंड#चेन्नई#ताज्या हिंदी बातम्या#बेन फॉक्स#भारत इंग्लंड चाचणी#भास्करकिंदी बातमी#मोहम्मद सिराज#हिंदी बातम्या#हिंदी बातम्या आज#हिंदी बातम्या थेट#हिंदी मध्ये बातमी
0 notes
Text
भारत विरुद्ध इंग्लंड एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई | INDvENG: कर्णधार जो रूटचे शतक 100 वे कसोटी खेळत, डॉम सिब्लीने 87 धावा, इंग्लंडचा स्कोर 263/3
भारत विरुद्ध इंग्लंड एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई | INDvENG: कर्णधार जो रूटचे शतक 100 वे कसोटी खेळत, डॉम सिब्लीने 87 धावा, इंग्लंडचा स्कोर 263/3
चेन्नई (आयएएनएस) आपल्या कारकिर्दीचा 100 वा कसोटी सामना खेळणार्या इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शुक्रवारी येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर यजमान भारतासह पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 3 गडी गमावून 263 धावा केल्या. डोम सिब्ली 87 धावा करुन बुमराहचा दुसरा बळी ठरला. त्याचवेळी कर्णधार जो रूट 128 धावा करुन क्रीजवर आहे.…
View On WordPress
#इंग्लंड#इंग्लंड 263/3 (जो रूट 128 *#ओली पोप#क्रिकेट#खेळ#चिदंबरम स्टेडियम विरुद्ध भारत इंग्लंड#चेन्नई#चेन्नई जो रूट सीपीटी#जसप्रीत बुमराह -2०-२) एमए चिदंबरम स्टेडियमवर भारताविरुद्ध पहिल्या दिवशी स्टम्पवर#जॅक लीच#जेम्स अँडरसन#जो रूट#जोफ्रा आर्चर#जोस बटलर डब्ल्यूकेटी#डॅन लॉरेन्स#डोम बेस#डोम सिब्ली#डोमिनिक सिब्ली 87#ताज्या हिंदी बातम्या#पहिला टेस्ट - इंडिया व्ही इंग्लंड 2021 मालिका पहा#बेन स्टोक्स#भारत#भास्करकिंदी बातमी#रोरी बर्न्स#विराट कोहली#हिंदी बातम्या#हिंदी बातम्या आज#हिंदी बातम्या थेट#हिंदी मध्ये बातमी
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 April 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ एप्रिल २०२२ दुपारी १.०० वा. ****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर आहेत. राज्यातल्या विविध शिक्षण योजनांचा शुभारंभ त्याचबरोबर आसाममध्ये २६०० हून अधिक अमृत सरोवर निर्माण करण्याच्या योजनेचा कोनशिला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला.
****
भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांनी आयातित मद्याऐवजी इंधनावरील कर कमी केला तर पेट्रोल स्वस्त होईल, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढलेल्या किमती कमी करण्याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी या��नी महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना काल सल्ला दिला होता, त्यानंतर अनेक राज्यांनी त्यास विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर पुरी यांनी आज ट्विटरवर केंद्र सरकारची बाजू स्पष्ट केली. महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर ३२ पूर्णांक १५ रुपये प्रति लिटर, काँग्रेस शासित राजस्थान २९ पूर्णांक दहा रुपये प्रतिलिटर कर आकारतात. तर भाजपशासित उत्तराखंड केवळ १४ पूर्णांक ५१ रुपये आणि उत्तरप्रदेश १६ पूर्णांक ५० रुपये कर आकारतात असं पुरी यांनी सांगितलं. आंदोलने वस्तुस्थितीला आव्हान देऊ शकत नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं.
****
केंद्रीय कार्मिक मंत्रालय या महिन्यापासून पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत सुशासन या विषयाशी संबधित वेबिनारची एक मालिका सुरु करत आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र मिश्रा आज या मालिकेचं उद्घाटन करतील. प्रत्येक महिन्यात एका विषयाचा आढावा या मालिके�� घेतला जाणार असून, सेवा क्षेत्राच्या सुधारणेबद्दल पहिला वेबिनार होणार आहे.
****
प्रशिक्षणाअभावी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे लाभ न मिळणाऱ्या शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय, शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद - एस सी ई आर टी आणि इन्फोसिस यांच्यामध्ये, काल सामंजस्य करार करण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि सचिव रणजित देओल या वेळी उपस्थित होते. निर्धारित कालावधीसाठी शिक्षक म्हणून काम केलं असून, प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण न केल्यामुळे लाभ मिळत नसलेल्या, राज्यातल्या सुमारे ९४ हजार शिक्षकांना, या प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.
राज्यातल्या सुमारे ४४ हजार शाळांमध्ये डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर वाढवून विद्यार्थी तंत्रस्नेही व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, इतरही निजोजित सुविधा पुरवण्यासाठी इन्फोसिसनं आम्हाला सहकार्य करावं, असं आवाहन गायकवाड यांनी यावेळी केलं.
****
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती सुरु केल्याची माहिती, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातल्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखापर्यंत मर्यादित आहे, तो विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असेल, असं त्यांनी सांगितलं. नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाडिबीटी प्रणालीवर मॅपींग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
****
महाआवास अभियानातर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजना यांचे पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा अव्वल ठरला असून, धुळे जिल्ह्याला दुसरा आणि ठाणे जिल्ह्याला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये, अहमदनगर जिल्हा अव्वल, रत्नागिरी द्वितीय, तर वर्धा जिल्ह्याला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यात राबवण्यात येत असलेल्या विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता आणि गुणवत्ता वाढीसाठी महाआवास अभियान- २०२०-२१ राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला होता.
****
मध्य रेल्वेनं एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे, नागपूर आणि साईनगर शिर्डी इथून विविध ठिकाणी ५७४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केल�� आहे. यात लातूर आणि बिदर दरम्यान दोन विशेष गाड्यांचा समावेश आहे.
****
बंगळुरू इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मल्लखांब खेळाडूंनी पुरुष आणि महिला दोन्ही गटात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकं जिंकले. मुंबई विद्यापीठानं महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली, तर पुणे विद्यापीठाच्या संघानं दुसरं स्थान पटकावलं.
****
आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू, सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत यांनी आपापले पहिले सामने जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. लक्ष्य सेन आणि बी साई प्रणित यांचं पहिल्या फेरीतच या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 December 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ११ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
· शासकीय रुग्णालयांमधल्या रुग्णांना मोफत रक्त देण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
· शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द.
· सुधारित कृषी कायद्यांमधल्या आक्षेप असणाऱ्या तरतुदींवर चर्चेला सरकार तयार - केंद्रीय कृषीमंत्री.
· प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं काल पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन.
· दिव्यांग आरक्षणाच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याची केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची सूचना.
· सामाजिक कार्यासाठीचा ‘नातू पुरस्कार’ डॉ. दिवाकर कुलकर्णी आणि सविता कुलकर्णी यांना जाहीर.
आणि
· राज्यात काल तीन हजार ८२४ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात १२ मृत्यू, तर नव्या १७९ रुग्णांची नोंद.
****
राज्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयांमधल्या रुग्णांना मोफत रक्त देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ही घोषणा केली. उद्या शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. राज्यातल्या रक्तपेढ्यांमध्ये रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, आरोग्यमंत्री टोपे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काल मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं, रक्तसंक्रमण परिषदेच्या शिबीरात रक्तदान केलं, त्यानंतर ते बोलत होते. मोफत रक्त देण्याचा हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्याचंही, आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगि���लं. राज्यात सुमारे ३४४ रक्त पेढ्या कार्यरत असून, त्यामध्ये काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. कोविड संसर्ग प्रादुर्भावामुळे रक्तदान शिबिरांच्या आयोजनावर मर्यादा येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, येत्या १३ ते २० डिसेंबर दरम्यान, स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाणार असून, त्यानिमित्त प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती, टोपे यांनी दिली. नागरिकांनी वर्षातून किमान दोन वेळा रक्तदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
कोयना विद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. काल कोयना विद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातल्या विद्युत गृहाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी धरणाची सविस्तर माहिती जाणून घेतली.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाचीही काल प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी त्यानंतर प्रकल्प कार्यालयात एका सादरीकरणाद्वारे सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली.
****
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना, रद्द करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल ही माहिती दिली. शालेय शिक्षण तसंच क्रीडा विभागाने याच वर्षी १० जुलै रोजी, खासगी शाळा कर्मचारी नियमावली १९८१ मधल्या, सेवाशर्तीमध्ये बदल सुचवणारी अधिसूचना जारी केली होती, ही अधिसूचना रद्द केल्यानं सर्व शिक्षक आमदार तसंच प्रतिनिधींनी, राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
****
नवउद्योजक आणि स्टार्ट-अप्ससाठी जागतिक दर्जाची सुविधा असलेलं बिझनेस इनक्युबेटर सेंटर नवी मुंबईमध्ये स्थापन होत आहे. उद्योग विभाग आणि अमेरिकेत न्यूर्याक इथलं कॉर्नेल विद्यापीठ, यांच्यात काल याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमात निवड झालेल्या उद्योजकांना कोणतेही शुल्क न आकारता प्रशिक्षण तसंच मार्गदर्शन मिळणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.
“कॉर्नेल महा 60” या उपक्रमांतर्गत राज्यभरातून निवड झालेल्या ६० प्रशिक्षणार्थी उद्योजकांना, सुमारे वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर, कॉर्नेल विद्यापीठाकडून पदविका प्रमाणपत्र मिळेल. उद्योगासंबंधी मार्गदर्शन तसंच उद्यम भांडवल निधीसारखी साधनं देखील उद्योजकांना उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर तीन वर्षांसाठी राबवला जाणार आहे.
****
हज यात्रेसाठी अर्ज सादर करायला येत्या दहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही माहिती दिली. अर्ज सादर करण्याची मुदत काल संपणार होती, मात्र आता ती महिनाभरासाठी वाढवण्यात आली आहे. नक्वी यांनी हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत काल आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. हज यात्रेसाठीची अर्जप्रक्रिया शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीनं राबवल्याबद्दल, नक्वी यांनी हज समितीची प्रशंसा केली.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन पाणीपुरवठा राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी केलं आहे.
****
सुधारित कृषी कायद्यांमधल्या ज्या तरतुदींबद्दल शेतकऱ्यांना आक्षेप आहे, त्यावर खुल्या दिलानं चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते. शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या बंधनातून मुक्त करण्याची सरकारच�� इच्छा असल्यानं, शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊनच केंद्र सरकारनं कृषी सुधारणा केल्या आहेत, या कायद्यांमुळे बाजार समित्या आणि किमान आधारभूत दरावर कसलाही परिणाम होणार नाही, शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योजक बळकावणार नाहीत, याचा तोमर यांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्र, गुजरात, हरयाणा, पंजाब, कर्नाटक या राज्यांमधे बऱ्याच वर्षांपासून कंत्राटी शेती होते, मात्र तिथं कधीही असा प्रकार घडलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
या कायद्यासंदर्भात सरकारनं दिलेले प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावले असून, कायदे रद्द करण्याच्या मागणीवरच शेतकरी नेते अडून बसल्याचं, तोमर यांनी सांगितलं.
****
नक्षलग्रस्त भागातल्या हुतात्मा पोलिसांच्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय नोकरीच्या धर्तीवर, देशासाठी लढा देणाऱ्या हुतात्मा सैनिकांच्या पत्नी तसंच पाल्यांना, शासकीय नोकरीत थेट नियुक्त करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. माजीसैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. ते काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. माजी सैनिक आणि हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबांना नियमाप्रमाणे जमिनींचं वाटप करण्यासाठीच्या कार्यवाहीबाबतचा अहवाल पुढील तीन महिन्यात सादर करावा, अशा सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या.
****
प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं काल पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ४७ वर्षांचे होते. अभियंता असलेल्या भिडे यांनी अनेक नाटकं, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले. ‘मुळशी पॅटर्न’, ‘रानभूल’, ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘हिप हिप हुर्रे’, ‘पाऊलवाट’, ‘देऊळ बंद’, ‘कलम ३०२’, ‘साने गुरुजी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘हरिशचंद्राची फॅक्टरी’, हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. भिडे यांना दोन वेळा राज्य नाट्य पुरस्कार तसंच व्ही. शांताराम पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
****
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी पालघर जिल्ह्यातल्या वाडा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. विष्णू सावरा यांचं परवा संध्याकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं होतं. पालघर जिल्ह्यातून त्यांनी सहा वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलं होतं. विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसंच जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी, सावरा यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
****
केंद्र सरकारनं दिव्यांगांना शिक्षण तसंच नोकरीत दिलेल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याची सूचना, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि दिव्यांग सशक्तीकरण विभाग आणि लातूर जिल्हा परिषदेच्या वतीनं, काल लातूर जिल्ह्यातल्या ८ हजार ७९७ दिव्यांगांना, उपयोगी उपकरणं तसंच साहित्याचं मोफत वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री गहलोत बोलत होते. केंद्र सरकारने दिव्यांगाच्या कल्याणासाठी उच्च शिक्षणात पाच टक्के तर नोकऱ्यांमध्ये ३ ऐवजी ५ टक्के आरक्षण दिलं असल्याचं गहलोत यांनी नमूद केलं. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे, खासदार सुधाकर श्रृंगारे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा ‘नातू पुरस्कार’ यंदा औरंगाबादचे डॉ. दिवाकर कुलकर्णी आणि सविता कुलकर्णी या दाम्पत्याला जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्कारचं स्वरुप आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात यमगरवाडी इथं शैक्षणिक कार्यात भरीव योगदान देणारे उमाकांत मिटकर यांना ‘सेवाव्रती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या नऊ जानेवारीला हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्काराचं हे ३१ वं वर्ष आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातली सर्व पर्यटन स्थळं शासनाच्या नियमांचं पालन करत कालपासून उघडण्यात आली. काल पहिल्याच दिवशी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र ऑनलाईन नोंदणी न केलेल्या पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला. पर्यटकांनी पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकिटं घेऊनच पर्यटन स्थळांना भेट देण्याचं आवाहन, संबंधितांकडून करण्यात आलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात अनियंत्रितपणे मुद्रा कर्ज वाटपामुळे बँका अडचणीत आल्याचा आरोप, आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे. मुद्रा कर्ज वाटप प्रकरणी बँक अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करण्यात यावी, बँक अधिकारी, अग्रणी बँक अधिकारी यांच्यावर वसुलीची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणीही दुर्राणी यांनी, परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे केली आहे.
****
राज्यात काल तीन हजार ८२४ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ६८ हजार एकशे बहात्तर झाली आहे. काल ७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४७ हजार ९७२ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे. काल पाच हजार ८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ४७ हजार १९९ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ५२ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ७१ हजार ९१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल १२ ��ोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १७९ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात काल सहा, लातूर जिल्ह्यात तीन, बीड जिल्ह्यात दोन, तर जालना जिल्ह्यात एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ५६ नवे रुग्ण आढळले, नांदेड जिल्ह्यात ३९, लातूर ३२, बीड २७, परभणी ११, उस्मानाबाद सात, जालना सहा, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला नवीन एक रुग्ण आढळला.
औरंगाबाद रेल्वे स्थानकावर १९७ प्रवाशांची तर विमानतळावर ४० प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केलं आहे.
****
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, औरंगाबाद इथं उद्या शनिवारी लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं औरंगाबाद खंडपीठ, जिल्हा आणि सत्र न्यायालय तसंच जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावरच्या न्यायालयांमध्ये, सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. या लोकअदालतीमध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन, दाखलपूर्व तसंच प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड करण्याचं आवाहन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश, श्रीपाद टेकाळे यांनी केलं आहे. ज्येष्ठ नागरिक किंवा प्रत्यक्ष सहभाग घेणं शक्य नसलेल्या नागरिकांना, दूरदृश्य संवाद प्रणाली - व्हिडीओ कॉन्फरन्स किंवा वॉट्सॲप कॉलद्वारे यात सहभागी होता येईल, मात्र त्यांनी आजच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयाला संपर्क करून, आपल्या नावाची नोंद करणं आवश्यक आहे.
****
परभणी जिल्ह्यात काळ्या बाजारात विक्रीच्या हेतुने साठवून ठेवलेला १६४ पोती तांदुळ पोलिसांनी जप्त केला. जिंतूर तालुक्यात बोरी इथं बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या तांदळाची बाजारभावानुसार किंमत सुमारे सव्वा लाख रुपये असून, या प्रकरणी शेख जवरोद्दीन शेख बशीरोद्दीन याला ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, परभणी इथं काल एस टी बसनं आलेल्या एका प्रवाशाकडून पोलिसांनी सुमारे ५४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. अहमद अलीम असं या प्रवाशाचं नाव असून, तो तीन बॅगमधून हा गुटखा घेऊन आला होता.
****
अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातल्या एकनाथवाडी शिवारात ६ लाख रुपयांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. विष्णू अनिल डोंगरे, बाळासाहेब भानुदास खेडकर, शहादेव रावसाहेब खेडकर, या तिघांच्या शेतात ही झाडं लावलेली होती.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 December 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १० डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा. ****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतल्या संसद मार्ग परिसरातल्या संसद भवनाच्या नवीन इमारतीचं भूमीपूजन करणार आहेत. ही नवीन इमारत आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल. २०२२ साली स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनी नवीन संसद भवन नवभारताच्या अपेक्षांना पूर्ण करेल. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह केंद्रीय मंत्री भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला सहभागी होणार आहेत.
****
देशातला कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असून तो आता ९४ पूर्णांक ६६ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. काल दिवसभरात देशात ३७ हजार ७३५ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत ९२ लाख ५३ हजार ३०६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल ३१ हजार ५२२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४१२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९७ लाख ६७ हजार ३७२ झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ४१ हजार ७७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या तीन लाख ७२ हजार २९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल नऊ लाख २२ हजार ९५९ कोविड चाचण्या करण्यात आल्या. देश��रात आतापर्यंत जवळपास १५ कोटी सात लाख ५९ हजार ७२६ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.
****
पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादची भारत बायोटेक यांनी कोरोना विषाणूवरील लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मागितलेली परवानगी भारतीय औषध नियंत्रण प्राधिकरणानं फेटाळली असल्याचं वृत्त काही माध्यमांमधून प्रसिद्ध झालं आहे; हे वृत्त खोट असून, आरोग्य मंत्रालयानं हे वृत्त फेटाळलं आहे. पत्र सूचना कार्यालयानं आज याबाबत खुलासा केला आहे. सीरम इन्स्टिट्यूटनं कोविशील्डच्या आपत्कालीन वापरासाठी गेल्या रविवारी; तर भारत बायोटेक नं कोवक्सीनच्या आपत्कालीन वापरासाठी गेल्या सोमवारी परवानगी मागितली होती.
****
भारतातल्या आघाडीच्या औषध कंपन्या बनवत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीचा आढावा घेण्यासाठी जगभरातील ६० हून अधिक देशांचे प्रतिनिधी काल भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पहिल्यांदा ते हैदराबाद इथल्या भारत बायोटेक कंपनीला भेट देणार आहेत. त्यानंतर इतर शहरांमधल्या लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ते भेट देतील. अशा प्रकारच्या परदेशी प्रतिनिधींचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
****
मानवाधिकार दिवस आज पाळण्यात येत आहे. मानव अधिकाराच्या सार्वभौमिक घोषणा केल्याच्या निमित्तानं हा दिवस पाळण्यात येतो. १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघानं या घोषणेचा जगात मानवाधिकाराच्या रक्षणासाठी उपाययोजना म्हणून स्वीकार केला आहे. यंदाचा मानवाधिकार दिनाचा विषय कोविड १९ महामारीशी संबंधित आहे.
****
प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं आज पुणे इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ४७ वर्षांचे होते. पेशाने इंजिनिअर असलेल्या भिडे यांनी अनेक नाटकं, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले. ‘मुळशी पॅटर्न’, ‘रानभूल’, ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘हिप हिप हुर्रे’, ‘पाऊलवाट’, ‘देऊळ बंद’, ‘कलम ३०२’, ‘साने गुरुजी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘हरिशचंद्राची फॅक्टरी’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. भिडे यांना दोन वेळा राज्य नाट्य पुरस्कार तसंच व्ही. शांताराम पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
****
नवउद्योजकांना आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना आवश्यक पायाभूत सुविधा आणि पूरक वातावरण मिळावं यासाठी राज्य शासन जागतिक दर्जाचं इन्क्युबेशन केंद्र स्थापन करणार आहे. यासाठी न्युयॉर्क इथल्या कॉर्नेल विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्यात येणार असून, अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय विद्यापीठासोबत करार करून इन्क्युबेशन केंद्र स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे.
****
औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नव्या जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ शनिवारी १२ डिसेंबरला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल ऑनलाईन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पाणीपुरवठा योजनेसह शहरातल्या मिटमिटा परिसरात प्राणी संग्रहालयासाठी सफारी पार्क, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक तथा स्मृतीवन आणि शहरात सुरू असलेल्या तसंच प्रलंबित १५२ कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा शुभारंभही मुख्यमंत्री करणार आहेत.
****
उस्मानबाद जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीच्या एकूण ६२२ सरपंच आणि उपसरपंच पदांचं आरक्षण सोडत काल काढण्यात आली. अनुसूचित जातीसाठी १०१ ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या असून, त्यातली ५३ पदं महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी १४, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १६८, तर खुल्या प्रवर्गासाठी ३३९ पदं आरक्षित असतील.
****
किमान आधारभूत खरेदी अंतर्गत कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे परभणी इथं कालपासून कापूस खरेदी सुरू करण्यात आली. काल पहिल्या दिवशी कापसाला ५ हजार ७२५ रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी ��ेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** देशात लाभार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी २५ कोटींहून अधिक मात्रा
** कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबादमध्ये नऊ तर जालन्यात सहा रुग्णांचा मृत्यू
** गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना पाठवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन
आणि
** औरंगाबाद इथून २६ जून पासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात- आमदार विनायक मेटे
****
देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीच्या २५ कोटींहून अधिक मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. काल देशभरात ३१ लाख, ६७ हजारांपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या गेल्या आहेत. त्यापैकी ४ कोटी ८२ लाख नागरिकांना लसीच्या दोन्हीही मात्रा दिल्यानं त्यांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून १४८ दिवसात देशानं हा टप्पा ओलांडला आहे. यात ४ कोटीपेक्षा जास्त मात्रा १८ ते ४५ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना दिल्या असल्याचंही केंद्��ीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
****
कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालय-घाटीत गेल्या चोवीस तासांत नऊ कोविड बाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यात आठ रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातले तर एक रुग्ण अकोला जिल्ह्यातला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. घाटी रुग्णालयात आतापर्यंत दोन हजार ८५७ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, घाटीत आज या संसर्गाचे आठ नवे रुग्ण दाखल झाले असून सध्या एकूण २५४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज सोळा जणांना ते या संसर्गातून बरे झाल्यानं सुटी देण्यात आली आहे. घाटी रुग्णालयात आतापर्यंत दहा हजार दोनशे ४९ रुग्णांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात सहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्यांची एकूण संख्या एक हजार ५६ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात २२ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार, ७९७ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या २२ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५९ हजार, २३८ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ४३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले नवे १०८ रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक २७ रुग्ण आष्टी तालुक्यात, त्याखालोखाल केज तालुक्यात २४, बीड तालुक्यात १३, अंबाजोगाई ९, शिरुर आणि वडवणी ८, माजलगाव ६, परळी-पाटोदा-धारुर प्रत्येकी चार आणि गेवराई तालुक्यातील एक याप्रमाणे बाधित आढळले.
****
राज्यातल्या गड-किल्ल्यांचं पावित्र्य टिकवत त्यांचं संवर्धन करण्याचं काम सुरू असून दूर्ग प्रेमी, दूर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी याबबत आपल्या सूचना-प्रस्ताव आपल्या सचिवालयातल्या संकल्प कक्षाकडे पाठवाव्यात असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील अडीचशे दुर्गप्रेमींशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत त्यांच्या सुचना जाणून घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते. किल्ल्यांच्या संवर्धनातल्या अडचणी दूर करण्यासाठी पुढं येत कामाला सुरुवात करावी असंही ते यावेळी म्हणाले. या संवर्धनाच्या कामासाठी दुर्गप्रेमी-अभ्यासकांचा सहभाग असलेली एक मध्यवर्ती समिती स्थापन करून सर्वांच्या सूचना विचारात घेत नियोजनबध्द आराखडा तयार करायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. दूर्ग संवर्धनासाठीच्या सुचना ‘सीएम’ ‘संकल्प कक्ष’ @ महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलवरही पाठवता येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
****
संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूर दृष्य संवाद प्रणालीद्वारे प्रास्ताविक भाषण करणार आहेत. भविष्याच्या परिप्रेक्ष्यात जमिनीचा ऱ्हास, वाळवंटीकरण आणि दुष्काळ या विषयावर हे चर्चासत्र असणार आहे. जगातलं जमिनीचं वाळवंटीकरण रोखण्याच्या हेतूनं संयुक्त राष्ट्रांनी तयार केलेल्या परिषदेच्या १४ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष या नात्यानं मोदी संबोधित करतील. संयुक्त राष्ट्रांनी चालू दशक हे "वाळवंटीकरणाला आवर आणि परिसंस्थांचं पुनर्वसन" याकरता समर्पित असल्याचं जाहीर केलं आहे. हवामान आणि जैवविविधतेच्या रक्षणाकरता विविध उपाययोजनांवर या चर्चासत्रात विचारविनिमय होणार आहे.
****
राज्यात पाचही वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री कायम राहील हे अगोदरच ठरलं असल्याचं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगणं गैर नाही, अनेकांना तसं वाटत असतं असं ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या संदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरात बोलतांना म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आता दिल्लीत मोर्चा काढून केंद्र सरकारला मराठा समाजाची ताकद दाखवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहे�� ठाकरे यांचंच नाव देणं योग्य असल्याचं राऊत यांनी नमूद केलं.
****
औरंगाबाद ��थून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी येत्या २६ जून पासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची माहिती शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण राज्याचा दौरा करत असल्याचंही त्यांनी आज औरंगाबादमध्ये समाज बांधवांशी संवाद साधल्यानंतर एका पत्रकार परिषदेत सांगितलं. येत्या पाच जुलै पर्यंत आरक्षणाचा तिढा सुटला नाही तर येत्या सात जुलैपासून सुरु होणारं राज्य विधीमंडाळाचं पावसाळी आधिवेशन होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं हे आरक्षण घालवलं असून यासंदर्भात समाजात चीड असल्याची टीका मेटे यांनी यावेळी केली.
****
जालना शहरातल्या अंबड चौफुलीवर आज सकाळी खासगी बस आणि जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जीपमधील एक महिला ठार झाली तर आठजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमधील तीन लहान मुलांसह दोन महिलांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर जालन्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त प्रवासी सोलापूर जिल्ह्यातल्या म्हाडा तालुक्यातल्या चांदर इथले रहिवासी असून, ते जालन्यातल्या रामनगर इथं विवाहसोहळ्यासाठी येत असताना ही दुर्घटना घडली. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत असून जिल्ह्यातल्या कंधार, लोहा, अर्धापूर या तालुक्यांत शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरणी सुरू केली आहे. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सोयाबीनंचं वाढीव उत्पादन देणारं `वंरबा सरी` तंत्रज्ञान या भागात उपयोगात आणलं जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उस्मानाबाद इथं कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडील गमावलेल्या अठरा वर्षाखालील मुलांना शिवसेना जिल्हा कार्यकारिणीतर्फे आज प्रत्येकी एक लाख रुपयांचं अर्थसहाय्य म्हणून मुदतठेव प्रमाणपत्र देण्यात आलं. राज्याचे पर्यटन मंत्री - शिवसेना युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास घाडगे-पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
****
जागतिक कसोटी विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेटसंघ दोन दिवसांचा अंतर्गत सराव सामना खेळून तयारी करत आहे. सौदम्पटनमध्ये दहा दिवसांच्या विलगीकरणादरम्यान हॅम्पशायर इथं हा सा��ना खेळला जात आहे. तीन महिन्यांच्या या दौऱ्यात भारतीय संघ अठरा जूनपासून न्यूझीलंडबरोबर जागतिक कसोटी विश्वचषक विजेतेपदाचा सामना खेळणार आहे. त्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक क्लब अथवा काउंटी संघाशी सराव सामना खेळायची भारतीय ��ंघाला परवानगी नसल्यानं अंतर्गत सराव सामन्याद्वारे त्याची उणीव भरुन काढली जात आहे.
****
महाराणा प्रतापसिंह यांची आज जयंती. या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या महाराणा प्रतापसिंह यांच्याकडून पराक्रमाचा महान वारसा मिळाला आहे. उत्कृष्ट सेनानायक, मूर्तीमंत त्याग, शौर्याचे प्रतिक असलेल्या अशा या महान योद्ध्याला जयंतीनिमित्त शतशः नमन करत असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त आज नांदेड इथं त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पुष्षहार अर्पण करून अभिवादन केलं.
//********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 October 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** राज्यात परतीच्या पावसाचा जोर कायम; मराठवाड्यात जलसाठ्यात वाढ ** विधानसभा मतदान मोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ** ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवण्याची काँग्रेसची मागणी ** विलिनीकरणाविरोधात कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदमुळे बँकांचं कामकाज विस्कळीत आणि ** दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी क्रिकेट सामनाही भारतानं एक डाव आणि दोनशे दोन धावांनी जिंकला, रोहित शर्माला मालिकावीर पुरस्कार **** राज्यात कालही परतीच्या पावसाचा जोर कायम होता. मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. खरीपातलं सोयाबीन, कपाशीला मात्र या परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. औरंगाबाद तसंच जालना जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्या काल रात्री उशिरापर्यंत चांगला पाऊस झाला. जालना जिल्ह्यात बहुतांश भागात काल रात्री तीन ते चार तास जोरदार पाऊस झाला, त्यामुळे नदी नाल्याना पूर आला आहे. अंबड तालुक्यात वडीगोद्री मंडळात ८१ मिलीमीटर तर जाफ्राबाद तालुक्यात टेंभुर्णी मंडळात ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे मांजरा धरणाचा पाणीसाठा १५ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. नागझरीसह दहा बंधाऱ्यांमध्ये जलसाठा वाढला आहे. बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यात सलग दोन दिवस अतिवृष्टीची नोंद झाली. सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा, वारणा, माणगंगा आणि अग्रणी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या दुष्काळी तालुक्यातल्या नद्यांना पूर आला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात अग्रणी नदीला पूर आल्यानं या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे. जत तालुक्यातही बोर नदीला पूर आला, शिराळा आणि वाळवा तालुक्यात वारणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे, भात, ऊस, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वाळवा तालुक्यात वारणा गावाकडं जाणारा मार्ग दहा फुटानं खचला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धुळे जिल्ह्यात बहुतांश भागात पाऊस झाल्यानं अनेक गावांमध्ये पिकांचं नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातून भिमा नदीत वीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या लघु आणि मध्यम प्रकल्पात मुबलक पाणी साठा झाला आहे. स���तारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात पुणे - पंढरपूर रस्त्यावर वीडणीजवळ पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे सहा तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यभरात दिवाळीतही पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. **** राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी २१ तारखेला झालेल्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. एक लाख १२ हजार ३२८ ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट यंत्रांची त्रिस्तरीय सुरक्षा प्रणालीअंतर्गत, सी सी टी व्हींच्या माध्यमातून २४ तास निगराणी केली जात आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी मतमोजणीचं चित्रीकरण केलं जाणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागांसाठी सरासरी ६० पूर्णांक ४६ शतांश टक्के मतदान झालं. **** सातारा तालुक्यातल्या नवलेवाडी इथे मतदान यंत्राबाबत कोणताही आक्षेपार्ह प्रकार घडला नसल्याचं, निवडणूक विभागानं स्पष्ट केलं आहे. या मतदान केंद्रावरच्या मतदान यंत्राबाबत आक्षेप घेणाऱ्या दोन उमेदवार प्रतिनिधींनी, सकाळी प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वीच्या अभिरुप मतदानावेळी कोणताही आक्षेप नोंदवला नाही, दुपारी चार वाजता या दोघांनी आक्षेप नोंदवल्यावर त्यांना पुन्हा चाचणी मतदानासाठी संबंधित अर्ज भरून देण्यास सांगितलं असता, दोघांनीही अर्ज भरून आक्षेपाची कार्यवाही पूर्ण करण्यास नकार दिला. त्यामुळे या तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचं, संबंधित निवडणूक अधिकारी तसंच तालुक्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. **** ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. मतदान यंत्रात हेराफेरी होऊ शकते अशी जनभावना असल्याचा दावा त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना लिहीलेल्या पत्रात केला आहे. प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी आणि त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी. व्हीहीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी. तसंच कोणत्याही मतदान यंत्राबाबात शंका निर्माण झाल्यास त्या मतदान यंत्रातल्या मतांची मोजणी सलग चारवेळा करण्यात यावी, आणि ५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशा मागण्या त्यांनी पत्रात केल्या आहेत. **** आय एन एक्स मीडीया भ्रष्टाचार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयानं काल जामीन मंजूर केला. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं दोन महिन्यांपूर्वी २१ ऑगस्ट रोजी चिदंबरम यांना अटक केली होती. न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती हरी हृषिकेश रॉय यांच्या पीठानं, चिदंबरम यांना एक लाख रुपयांच�� जातमुचलका आणि तितक्याच रकमेच्या सुरक्षा हमीवर काल जामीन मंजूर केला. मात्र आय एन एक्स मीडीया भ्रष्टाचार प्रकरणाच्या तपासावर या जामीनामुळे काहीही परिणाम होणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं. न्यायालयाच्या परवानगीशिवाय चिदंबरम देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत, असं न्यायालयानं सांगितलं. दरम्यान, काळा पैसा वैध करण्याच्या एका अन्य प्रकरणात, चिदंबरम सध्या सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या अटकेत आहेत. **** सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विलिनीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी काल पुकारलेल्या देशव्यापी बंदमुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊन ग्राहकांची गैरसोय झाली. या विलिनीकरणामुळे बँकांच्या व्यवसायाला काही फायदा होणार नाही, उलट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, असं निदर्शनं करणाऱ्या संघटनांनी सांगितलं. औरंगाबाद शहरात क्रांती चौक इथल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर संघटनांनी काल निदर्शनं केली. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या महिनाभरात ‘फाईल ट्रॅकींग सिस्टीम‘ सह विविध शैक्षणिक, प्रशासकीय आणि आर्थिक सुधारणा राबवण्यात येणार असल्याचं कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी सांगितलं. कुलगुरुपदाची सुत्रे हाती घेऊन १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त ते काल विद्यापीठात वार्ताहरांशी बोलत होते. महिन्याभरात विद्यापीठातल्या सर्व विभागात ‘कॅशलेस’ आणि ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा सुरू केली जाईल, विदेशी विद्यार्थी प्रवेशासाठी एक खिडकी योजना, विविध विभागात ‘स्वयंम’ चे ५० अभ्यासक्रमही सुरु करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थी, समाजमाध्यमं आणि विद्यापीठ प्रशासन यामध्ये योग्य तो समन्वय ठेऊन कार्यक्षमता, गतीमानता आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येणार असल्याचं कुलगुरू म्हणाले. **** परभणी जिल्ह्यात कापसाच्या खरेदीस काल सुरूवात करण्यात आली. औद्योगिक परिसरात, यावेळी कापसाच्या तराजूचं पूजन करण्यात आलं, तसंच विक्रीसाठी कापूस आणलेल्या शेतकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. **** हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांचे वडील सखाराम महिपती मुटकुळे यांचं काल निधन झालं. हिंगोलीतल्या आडगाव इथं काल त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. **** भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नवनिर्वाचित प्रतिनिधी मंडळानं कार्यभार स्वीकारल्यावर, माजी लेखा आणि महानियंत्रक विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या प्रशासकीय समितीनं पद सोडावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. नियामक मंडळाच्या निवडणुकीनंतर नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासह नवीन ��दाधिकारी आज कार्यभार स्वीकारतील. तोपर्यंतचे हिशेब आणि ताळेबंद प्रशासकीय समितीनं संबंधित निबंधकांकडे सादर करावेत, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. **** दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतानं एक डाव आणि दोनशे दोन धावांनी विजय मिळवत, कसोटी मालिका तीन - शून्य अशी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिका संघानं काल सकाळी आठ बाद १३२ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली, मात्र अवघ्या एका धावेत म्हणजेच, १३३ धावांवर पाहुण्या संघाचे अखेरचे दोन फलंदाज बाद झाले. तिसऱ्या कसोटीत द्विशतक, आणि पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावत, मालिकेत पाचशे एकोणतीस धावा करणारा रोहित शर्मा, सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. **** लातूर इथं स्वयंसहायता गटातल्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन, हिरकणी महोत्सवाचं काल दिव्यांग असलेल्या दिपमाला तुपकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यांत्रणा यांनी हे प्रदर्शन भरवलं आहे. **** येत्या २७ ऑक्टोबरला रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 March 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ मार्च २०१९ दुपारी १.०० वा. **** लोकपाल नियुक्तीसंदर्भात निवड समितीच्या बैठकीची संभाव्य तारीख येत्या दहा दिवसांत कळवावी, असं सर्वोच्च न्यायालयानं देशाचे महाधिवक्ता के के वेणूगोपाल यांना सांगितलं आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्य अध्यक्षतेखालच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीत वेणूगोपाल यांनी, यासंदर्भात शोध समितीच्या अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांनी, या समितीच्या तीन सदस्यांच्या तीन पॅनलची शिफारस केली असल्याचं सांगितलं. या पॅनलची नावं प्रसिद्ध करण्याची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. **** जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट प्रमुख यासीन मलिक याला लोकसुरक्षा कायद्यांतर्गत आज अटक करण्यात आली. यासिन मलिक याला गेल्या २२ तारखेला ताब्यात घेऊन श्रीनगरच्या कोठीबाग पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं. आता त्याला जम्मूच्या कोट बलावल कारागृहात हलवण्यात येत आहे. सरकारी सूत्रांच्या माहिती नुसार काश्मीर मधल्या हुर्रियत कौन्फ्रन्स, आणि इतर फुटीरतावादी संघटनांवरही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. जमात ए इस्लामी जम्मू काश्मीर या संघटनेवर नुकतीच बंदी घालण्यात आली आहे. **** जम्मू काश्मीरमध्ये हंदवाडा इथं सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. या दरम्यान, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला उत्तर देताना, एक दहशतवादी मारला गेला. या भागात अजूनही चकमक सुरू असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, जम्मू बसस्थानकावर आज एका हातगोळ्याचा स्फोट झाला. या स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे. **** आपल्या कार्यकाळात जैश ए मोहम्मद या दहशवादी संघटनेच्या मदतीनं भारतात बॉम्बस्फोट केले जात होते, असं पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी म्हटलं आहे. भारतानं जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचं मुशर्रफ यांनी स्वागत केलं आहे. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणाली द्वारे नागपूर मेट्रोचं लोकार्पण करतील. खापरी ते सीताबर्��ी मार्गाचं आज उद्घाटन होईल. १९ किलोमीटर अंतराच्या या मेट्रो प्रकल्पांतर्गत पाण्याच्या १०० टक्के पुनर्वापराची सुविधा असणार आहे. देशात मेट्रो रेल्वे सेवा असलेलं नागपूर हे दहावं शहर ठरणार आहे. दरम्यान दृष्टीबाधितांना सुलभ असलेल्या चलनी नाण्यांची एक मालिका पंतप्रधानांनी आज जारी केली. **** येत्या रविवारी १० मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत एक कोटी २२ लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यासाठी राज्यभरात ८२ हजार ७१९ पोलिओ बुथ उभारण्यात येणार आहेत. पालकांनी, शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या आपल्या सर्व बालकांना पोलिओचा डोस द्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. **** ठाणे जिल्यातील कल्याण इथून आठ महिन्यापूर्वी अपहरण झालेल्या वर्षभराच्या बालकाची कराड इथून सुटका करण्यात ठाणे पोलिसांना यश आलं आहे. जून २०१८ मध्ये कल्याण जवळच्या म्हरळ इथून या बालकाचं अपहरण झालं होतं. सोमनाथ पवार या आरोपीने या बालकाची २५ हजार रुपयात विक्री केल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. **** चालू आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची दुसऱ्यांदा बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं, त्यापूर्वी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारी ही बैठक होणार असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. **** नांदेड -अमृतसर- नांदेड सचखंड एक्सप्रेस या रेल्वेला आजपासून सहा महिन्यांकरता प्रायोगिक तत्वावर सेलू या स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतला आहे. अमृतसर हून येणारी रेल्वे दुपारी एक वाजून आठ मिनिटांनी सेलू स्थानकावर येईल, दरम्यान, अमृतसूरहून नांदेडला येणारी सचखंड एक्सप्रेस आज १३ तास उशीरानं धावत आहे. त्यामुळे आज नांदेडहून अमृतसरला जाणारी सचखंड एक्सप्रेस नियोजित वेळेपेक्षा उशीरा धावत आहे. **** लंडन इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांत, बी साई प्रणित आणि सायना नेहवालनं उप उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पी व्ही सिंधू आणि समीर वर्माला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. **** भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान दुसरा टी ट्वेंटी सामना आज गुवाहाटी इथं सुरू आहे. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत, आठ बाद १११ धावा केल्या, अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या बिन बाद तीन धावा झाल्या होत्या. ***** ***
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०२ मार्च २०१९ सकाळी ११.०० वाजता.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या राज्यभरात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मतदारांच्या सोयीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट आय एन या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे. **** वाळू वाहतुकीसाठी एक लाख वीस हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला औरंगाबाद इथल्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं काल अटक केली. विजय गायकवाड असं या पोलिस अधिकाऱ्याचं नाव असून तो जालना जिल्ह्यातल्या गोंदी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. गायकवाडसह त्याच्या एका साथीदाराला काल लाचेची रक्कम घेताना, रंगेहात अटक करण्यात आली. **** हिंगोली ��थल्या पत्रकार शांताबाई मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आज हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल. हिंगोली इथून प्रसिद्ध होणाऱ्या 'साप्ताहिक हिंगोली समाचार' या वर्तमान पत्राच्या त्या संपादक आहेत. **** भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज हैद्राबाद इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजेपासून सामन्याला सुरूवात होईल. या आधी या दोन्ही संघादरम्यान झालेली, दोन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियानं, दोन शून्यनं जिंकली आहे. **** धनगर समाजाच्या मागण्यांवर निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या या उपसमितीमध्ये चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, राम शिंदे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, विष्णू सवरा, एकनाथ शिंदे, राजकुमार बडोले आणि संभाजी पाटील निलंगेकर या मंत्र्यांचा समावेश आहे. या उपसमितीची पहिली बैठक आज होणार आहे. ***** ***
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 February 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि. **** प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन बेरोजगारीच्या मुद्यावरून राहुल गांधी यांची सरकारवर टीका; तर दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचा शरद पवार यांचा आरोप विमान वाहतुक सेवा कंपन्यांना सुरक्षा नियमांच्या चोख पालनाचे निर्देश राज्य सरकारकडून तृतीयपंथीय विकास मंडळाची स्थापना आणि विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अपूर्वी चंदेलाचा सुवर्णवेध **** प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. उत्तरप्रदेशात गोरखपूर इथं, पंतप्रधान या योजनेचा प्रारंभ करतील. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यात सहा हजार रुपये मिळणार आहेत. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातल्या जिल्हा नियोजन भवनात तर तालुकास्तरावर तालुका मुख्यालयात आज सकाळी साडे दहा ते अकरा या वेळेत, शेतकऱ्यांना या योजनेची माहिती दिली जाणार आहे. आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या ५३ व्या भागातून पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधतील, त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते या किसान सन्मान निधी योजनेच्या उद्घाटन समारंभाचं, थेट प्रसारण होणार आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी काल देशाची अर्थव्यवस्था, तीन लाख कोटी डॉलर एवढी म्हणजेच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठीची रुपरेषा मांडली. नवी दिल्लीत आयोजित जगातिक व्यापार शिखर परिषदेत ते बोलत होते. यासाठी देशामध्ये अनेक स्टार्ट-अप सुरू करण्याचा मानस असून त्याद्वारे देशाला सर्वात आघाडीवर घेऊन जाणं शक्य असल्याचं पंतप्रधान म्हणाले. **** देशात बेरोजगारी ही गंभीर समस्या असल्याचं मान्य करण्यास, मोदी सरकार तयार नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. ते काल नवी दिल्लीत, विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी 'शिक्षण - दशा आणि दिशा' या विषयावर बोलत होते. पंतप्रधानांनी रोजगाराच्या संधींबाबत तरुणांशी बोलायला हवं, असं गांधी यांनी यावेळी नमूद केलं. देशातली संपत्ती मूठभर लोकांच्या हातात बंद असल्याचं ते म्हणाले. राफेल, भ्रष्टाचार, रोजगार आणि इतर विषयांवर पंतप्रधानांना चर्चेचं आव्हान दिलं असल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. **** दुष्काळात होरपळत असलेले शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला सरकारनं वाऱ्यावर सोडलं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अ��्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेची काल बीड जिल्ह्यात परळी इथं सांगता झाली, यावेळी झालेल्या महाआघाडीच्या संयुक्त सभेत पवार बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जनतेच्या व्यथा ऐकायलाही तयार नसलेल्या या सरकारने, अद्यापही कर्ज माफी केली नसल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला. **** लोकसभेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचा विजय निश्चित करा, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. काल मुंबईत पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. भारतीय जनता पक्षासोबत युतीचा निर्णय झाल्यानंतर ठाकरे यांची पक्षकार्यकर्त्यांसोबतची ही पहिलीच बैठक होती. युतीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा एक गट नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. **** नागरी उड्डयन सुरक्षा संस्थेनं देशातल्या सर्व विमान वाहतुक सेवा कंपन्यांना सतर्कतेचे आणि सुरक्षा नियमांच्या चोख पालनाचे निर्देश दिले आहेत. एअर इंडिया या प्रमुख विमान वाहतुक कंपनीच्या मुंबई नियंत्रण कक्षाला, दूरध्वनीवरून विमान अपहरणाची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. प्रवाशांची तसंच सामानाची तपासणी, वाहनतळांची सुरक्षा, तसंच विमानतळावरच्या सर्व हालचालींवर, सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे लक्ष ठेवण्याची सूचना विमानतळ व्यवस्थापनांना देण्यात आली आहे. **** राज्य सरकारनं तृतीयपंथीय विकास मंडळाची स्थापना केली आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी नुकतीच या संदर्भात एक बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिले होते. तृतीयपंथीयांना शिक्षण, रोजगाराच्या संधी, आरोग्य सुविधा आणि कायदेविषयक सहाय्य मिळावं, समाजात सन्मानानं जगता यावं, हा या मंडळाच्या स्थापनेमागचा उद्देश असल्याचं, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. मंडळामार्फत तृतीयपंथीयांना ओळखपत्र तसंच दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. पात्र विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत वसतीगृहाची सुविधा तसंच वार्षिक ४८ हजार ते साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे **** दिल्ली इथं सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर रायफल प्रकारात भारताच्या अपूर्वी चंदेलानं जागतिक विक्रमासह काल सुवर्णपदक पटकावलं. आठ नेमबाजांसह झालेल्या अंतिम फेरीत अपूर्वीनं अपूर्वीने २५२ पूर्णांक ९ दशांश असे सर्वोच्च गुण मिळवले. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलंच पदक आहे. स्पर्धेतली रौप्य आणि कांस्य पदकं चीनच्या नेमबाजांनी जिंकली आहेत. **** भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान होणाऱ्या दोन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतल�� पहिला सामना आज विशाखापट्टणम् इथं होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल, तर दुसरा सामना बेंगलुरु इथं २७ तारखेला होणार आहे. टी-ट्वेंटी मालिकेनंतर, या दोन्ही संघांत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे, या मालिकेतला पहिला सामना दोन मार्चला हैदराबाद इथं होणार आहे. **** येत्या लोकसभा निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदानाची सवलत नसल्याचं, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. अनिवासी भारतीय नागरिक, ऑनलाईन मतदान करु शकतील, अशा आशयाचा संदेश, सामाजिक संपर्क माध्यमांवरून फिरतो आहे. हा संदेश चुकीचा असल्याचं, निवडणूक विभागानं म्हटलं आहे. दरम्यान, मतदारांसाठी विशेष नोंदणी अभियान आजही सुरू आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट आय एन या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा तसंच चौकशीसाठी १-९-५-० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मतदान केंद्रांवरही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. **** हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द करावा, असं सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे. काल सोलापूर इथं, कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजना आणि ई-नाम योजनेच्या पुरस्कारांचं वितरण देशमुख यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ई-नाम योजनेमुळे शेतकऱ्यांना देशभरातली बाजारपेठ खुली झाली आहे. त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याचं देशमुख म्हणाले. ***** ***
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 December 2017 Time 17.25 to 17.30
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ९ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि. **** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद इथं राष्ट्रीय विधी विद्यापीठाचं उद्घाटन केलं. या विद्यापीठासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितलं. – औरंगाबादला नॅशनल लॉ युनिर्व्हसिटी व्हावी याचा निर्णय बऱ्याच आधी झाला होता.पण काही कारणांनी ती अस्तिवात येऊ शकली नाही.पण मी विशेष आभार मानेन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे आणि मुंबई हाय कोर्टाच्या न्यायमूर्तींचे.या युनिर्व्हसिटीजला आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाईड करणं,या युनिर्व्हसिटीजला जागा देणं, या सर्व गोष्टी अत्यंत वेगानं या ठिकाणी आम्ही करतो आहोत. मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती व्ही के ताहिलरमाणी, औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर एम बोर्डे, राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरु एस सुर्यप्रकाश, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे यावेळी उपस्थित होते. बागडे यांनी यावेळी मराठवाड्यामध्ये कायद्याचं उच्च शिक्षण देणारं राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू होणं ही समाधानाची बाब असून, या ठिकाणातून न्यायव्यवस्थेला अधिक मजबूत करणारे, गरीब, वंचितांना न्याय मिळवून देणारे चांगले वकील, न्यायधीश निर्माण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. **** त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लासूर इथं मोफत महाआरोग्य शिबीराला भेट दिली. राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्यदायी जीवन देण्यासाठी शासन कटीबद्ध असून, एकही व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नसल्याचं ते यावेळी म्हणाले. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयाणी डोणगांवकर, महापौर नंदकुमार घोडेले यावेळी उपस्थित त होते. या महाआरोग्य शिबीराचा आज समारोप झाला. **** गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज ८९ मतदारसंघांसाठी मतदान पार पडलं. यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह ९७७ उमेदवार रिंगणात आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत ४५ ��ूर्णांक ६१ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. येत्या १४ तारखेला दुसऱ्या टप्प्यात ९३ मतदारसंघांसाठी मतदान होणार असून, गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे. **** केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयानं कोईंबतूर, भुवनेश्वर आणि कोचीमधे वाहतूक सेवा प्रकल्प राबवण्यासाठी गीझ या जर्मन कंपनीसोबत करार केला आहे. मंत्रालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मुकूंद कुमार सिन्हा आणि गीझ कंपनीचे संचालक वोल्फगन हॅनींग यांनी गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रकल्पासाठी गीझ कंपनीच्या माध्यमातून तीन वर्षांमध्ये २९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, शहरी वाहतूकीबाबत नियोजन आणि अंमलबजावणीबाबत या कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. **** नेपाळमध्ये संसदीय आणि प्रांतीय निवडणुकीत डावी आघाडी विजयाकडे वाटचाल करत आहे. प्रातिनिधीक सभागृहाच्या १६५ जागांपैकी ३५ जागांचे निकाल हाती आले असून, त्यापैकी डाव्या आघाडीनं २९ जागा जिंकल्या आहेत. तर नेपाळ काँग्रेसला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. **** औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीच्या बालरोग विभागाच्या वॉर्ड क्रमांक २४ मध्ये ऑक्सिजन सिंलिंडर बदलताना आवाज झाल्यानं स्फोट झाल्याची अफवा पसरली, यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांचा काही काळ गोंधळ उडाला. आज दुपारी ही घटना घडली. डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांनी नातेवाईकांची समजुत काढून त्यांना परत वॉर्डमध्ये आणल्याचं वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितलं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. **** जालना जिल्ह्यातल्या अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करण्यासाठी नागरिकांनी ‘स्वच्छता अॅाप’ डाऊलोड करावं, असं आवाहन जालन्याच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केलं आहे. ऑनलाइन प्राप्त तक्रारी २४ तासांत सोडवण्यासाठी नगरपालिकेनं स्वतंत्र पथक स्थापन केलं असून, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात सात हजार वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम पूर्ण झालं आहे. तसंच संपूर्ण शहर उघड्यावर शौचापासून मुक्त झाल्याचं त्यांनी सांगितलं. **** भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना उद्या हिमाचल प्रदेशात धरमशाला इथं होणार आहे. सकाळी साडे अकरा वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून, रोहीत शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. यापूर्वी झालेली तीन कसोटी सामन्याची ��ालिका भारतानं एक शून्यनं जिंकली आहे. *****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 April 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १५ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा. ***** राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अहमदनगर इथल्या आर्मड् कोअर सेंटर अँड स्कुलला आज मानाचा ध्वज प्रदान केला. आर्मड् कोअर सेंटर अँड स्कुल ही लष्करी प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या कार्यक्रमासाठी अहमदनगर इथं कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. **** पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नाविक अधिकारी कुलभुषण जाधव यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. भारत पाकिस्तानसोबत सर्व प्रकारचं वैर संपवण्याच्या मताचा आहे; मात्र समोरच��या बाजूने हल्ला झाल्यास भारत त्यास तोडीचे उत्तर देण्यास समर्थ असल्याचं सिंह यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, लाहोर वकील संघानं कोणत्याही वकिलानं कुलभूषण जाधवची बाजू मांडल्यास त्याच्या वकिलीचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी धमकी तिथल्या वकिलांना दिली आहे. **** खाद्यपदार्थ आणि पेयांवर लादण्यात येत असलेल्या सेवा कराबाबत केंद्र सरकार राज्य सरकारांना कारवाई करण्याबाबत सूचित करणार असल्याचं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. याबाबत मंत्रालयानं एक मार्गदर्शिका तयार केली असून मंजूरीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहकांच्या परवानगीशिवाय सेवा कर लादणे हे अयोग्य व्यापार पद्धतीमध्ये येत असल्याचं मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. **** बिहारमधल्या सीतामढी जिल्ह्यामध्ये कैदी वाहून नेणारी मोटारगाडी ट्रकवर आदळून झालेल्या अपघातामध्ये सात पोलिस आणि एक नक्षलवादी ठार तर पाच पोलिस आणि एक नक्षलवादी गंभीर जखमी झाले आहेत. भागलपूरहून दोन नक्षलवाद्यांना सीतामढीला घेऊन जात असताना हा अपघात झाला. **** दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार आढळून आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव वंदना वाहूळ यांनी ही माहिती दिली. परिक्षेत नक्कल करताना आढळून आलेल्या विद्यार्थ्यांची देखील चौकशी सुरू असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. **** औरंगाबाद इथं आज दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्या हस्ते फळ्यावर शुभेच्छा संदेश लिहून करण्यात आलं. मराठवाड्यातले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. वीरा राठोड, रवी कोरडे आणि आसाराम लोमटे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षक चुकला तर एका पिढीचं नुकसान होतं त्यामुळे शिक्षकांनी नेहमी दक्ष राहणं गरजेचं असल्याचं, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी यावेळी म्हटलं. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात प्रकट मुलाखत, कथाकथन, मुक्त कवी संमेलन, परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. **** देशातील विविध सरकारी विभागांमधल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींमध्ये २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असं केंद्रीय दक्षता आयोगानं म्हटले आहे. या यादीत रेल्वे विभाग आघाडीवर आहे. रेल्वेशी संबंधित अकरा हजारहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दक्षता आयोगानं संसदेत नुकताच वार्षिक अहवाल सादर केला. त्यात २०१६ मध्ये एकूण ४९ हजार ८४७, तर २०१५ मध्ये २९ हजार ८३८ तक्रारी प्राप्त झाल्या. **** मलेशियात होणाऱ्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ या वर्षीही सहभागी होणार नाही. २०१४ मध्ये या स्पर्धेदरम्यान झालेल्या वादाबद्दल पाकिस्तान संघ माफी मागणार नाही, तोपर्यंत पाकिस्तान विरोधात एकही मालिका खेळणार नाही, या भूमिकेवर ठाम असल्याचं, हॉकी संघानं स्पष्ट केलं आहे. गेल्या वर्षीही भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी झाला नव्हता, २१ वर्षाखालील गटात होणाऱ्या या स्पर्धेत भारतानं २०१५ चं विजेतेपद पटकावलं आहे. **** सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारतीय बॅडमिंटनपटू के श्रीकांत आणि बी साई प्रणित आज उपान्त्य फेरीतले सामने खेळणार आहेत. श्रीकांतचा सामना इंडोनेशियाच्या अँथनी गिंटींग विरुद्ध आणि प्रणितचा सामना दक्षिण कोरियाच्या ली डोंग क्यून विरुद्ध होणार आहे. महिला एकेरीत काल झालेल्या उपउपान्त्य सामन्यात पी व्ही सिंधूला स्पेनच्या कॅरोलिना मरिन कडून पराभव पत्करावा लागला. तर मिश्र दुहेरीतही भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. //*******//
0 notes