Tumgik
#हॉटेलच्या
airnews-arngbad · 3 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२९ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
देशांतर्गत विमान वाहतुकीत भारत जगातला तिसरा देश ठरला आहे. अमेरिका आणि चीननंतर भारताने हा मान मिळवला आहे. ऑफिशिअल एअरलाइन गाईड म्हणजे ओएजी या विमान वाहतुकीबाबत विश्लेषण करणाऱ्या संस्थेनं ही माहिती दिली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, इंडिगो आणि एअर इंडियासारख्या कंपन्यांनी त्यांच्या ताफ्यात वाढ केल्यामुळे भारताचं स्थान पुढे गेल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
****
५२ दिवसांच्या अमरनाथ यात्रेला आज पहाटे पहलगाम आणि बालताल या दोन्ही ठिकाणाहून सुरुवात झाली. काश्मीर खोऱ्यातून प्रवासमार्ग असलेल्या या यात्रेसाठी चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, सुमारे चार हजार यात्रेकरुंचा दुसरा जत्था जम्मूतल्या भगवती नगर यात्री निवासातून आज पहाटे काश्मीरकडे रवाना झाला.
****
केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधी योजनेतल्या तरतुदींमध्ये बदल केला आहे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा सहा महिन्यांपेक्षा कमी राहीली आहे, त्यांनाही या योजनेतल्या रक्कम काढण्याची सुविधा त्यामुळे मिळणार असून, सात लाख कर्मचाऱ्यांना या बदलांचा फायदा होणार आहे.
****
योगाचा आशियाई क्रिडा स्पर्धेत समावेश करण्याच्या निर्णयाचं केंद्रीय युवक कल्याण आणि क्रिडा मंत्री मनसुख मांडविय यांनी स्वागत केलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष डॉ. पी टी उषा यांनी हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातलं पत्र त्यांनी आशियाई ऑलिम्पिक मंडळाचे अध्यक्ष राजा रणधीर सिंग यांना पाठवलं आहे.
****
पुण्यातल्या अंमली पदार्थ सेवन प्रकरणी पोलिसांनी तीन अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यातला एकजण नायजेरीन तर दोन पुण्यातले आहेत. यातल्या एका आरोपीने एल 3 हॉटेलच्या पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवले होते. याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
****
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यात कडवंची गावाजवळ दोन कारच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. अपघातातल्या जखमींना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये मुंबईतल्या मालाड इथल्या तीन जणांचा तर बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा इथल्या तीन जणांचा समावेश आहे.
****
0 notes
Text
हॉटेलच्या खोलीत असू शकतो Hidden कॅमेरा! तुम्ही या सोप्या पद्धतींनी तपासू शकता, गोपनीयता राखली जाईल.
https://bharatlive.news/?p=106328 हॉटेलच्या खोलीत असू शकतो Hidden कॅमेरा! तुम्ही या सोप्या पद्धतींनी तपासू ...
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
हॉटेल पॅसिफिकच्या कामगारांच्या चार दुचाकी जाळून आरोपी फरार
अज्ञात आरोपी सीसीटीव्ही कॅमे-यात टिपले गोंदिया : गोंदिया शहरातील रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या रेलटोली गुजराती नॅशनल शाळेसमोर असलेल्या पॅसिफिक हॉटेलच्या कामगारांच्या चार दुचाकी काही समाजकंटकांनी जाळपोळ केल्याची घटना सोमवारी १६ जानेवारी ला पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास घडली. दुचाकीला पेट्रोल टाकून जाळण्याचे दोन अज्ञात आरोपींचे हे कृत्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यात टिपलेले आहे. सोमवारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rvbhgwat-blog · 2 years
Photo
Tumblr media
*जरा हटके...* कारभारनीच्या हातभाराशिवाय कुठल्याही कारभाऱ्याला खाद्य पदार्थांशी निगडीत व्यवसाय करताच येणारच नाही. असे असेल तर मग व्यवसायाची मालकीनच कारभारीन का असू नये. असाच काहीसा विचार करून मुळचा कोल्हारचा व पुणे येथे स्थाईक झालेल्या *प्रकाश मानव या तरूणाने ‘वहिनीज् वडापाव’ नावाने व्यवसाय सुरू केला.* महिलांच्या सन्मानाच्या केवळ गप्पा मारणाऱ्यांच्या भाऊगर्दीत आपल्या अर्धांगिनीच्या नावाने तीला व्यवसाय सुरू करून देतानाच देशातील इतर महनिय महिलांचा देखील सन्मान प्रकाशने यानिमित्ताने केला. हॉटेलच्या फलकावर जिजामाता, सावित्रीबाई, अहिल्यादेवी, कल्पना चावला यांच्यासह अनेक रणरागिनींची रेखाचित्रे काढून घेत पुरूषसत्ताक संस्कृतीत महिलांचे वर्चस्व अधोरेखित केले. प्रकाशने केलेल्या *या ‘हटके’ प्रयोगात कुंचल्याच्य माध्यमातून मलाही योगदान देता आले* याचा आनंद वाटतो. मानव दाम्पत्यास या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा!💐🌺🌸🪷 (at Shrirampur Ahmadnagar Maharastra) https://www.instagram.com/p/CnE_2KGNUvO/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nashikfast · 2 years
Text
नाशकात चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस पेटली: दहा ठार
नाशकात चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस पेटली: दहा ठार
नाशिक : शनीवरी पहाटे नाशिक- औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेलच्या सिग्नलजवळ एका खासगी बसला मोठा अपघात झाला असून यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे….या बसमध्ये सुमारे ४० ते ५० प्रवासी होते. चितांमणी ट्रॅव्हल्सची बस यवतमाळ ते मुंबई जात होती. नाशिकमध्ये मिरची हॉटेल जवळ एका आयशर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rvbhgwat-blog · 2 years
Photo
Tumblr media
*जरा हटके...* कारभारनीच्या हातभाराशिवाय कुठल्याही कारभाऱ्याला खाद्य पदार्थांशी निगडीत व्यवसाय करताच येणारच नाही. असे असेल तर मग व्यवसायाची मालकीनच कारभारीन का असू नये. असाच काहीसा विचार करून मुळचा कोल्हारचा व पुणे येथे स्थाईक झालेल्या *प्रकाश मानव या तरूणाने ‘वहिनीज् वडापाव’ नावाने व्यवसाय सुरू केला.* महिलांच्या सन्मानाच्या केवळ गप्पा मारणाऱ्यांच्या भाऊगर्दीत आपल्या अर्धांगिनीच्या नावाने तीला व्यवसाय सुरू करून देतानाच देशातील इतर महनिय महिलांचा देखील सन्मान प्रकाशने यानिमित्ताने केला. हॉटेलच्या फलकावर जिजामाता, सावित्रीबाई, अहिल्यादेवी, कल्पना चावला यांच्यासह अनेक रणरागिनींची रेखाचित्रे काढून घेत पुरूषसत्ताक संस्कृतीत महिलांचे वर्चस्व अधोरेखित केले. प्रकाशने केलेल्या *या ‘हटके’ प्रयोगात कुंचल्याच्य माध्यमातून मलाही योगदान देता आले* याचा आनंद वाटतो. मानव दाम्पत्यास या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा!💐🌺🌸🪷 (at Shrirampur Ahmadnagar Maharastra) https://www.instagram.com/p/CnE_kvINdvg/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
महिलेनं हॉटेलच्या बाथरुमध्ये दिला बाळाला जन्म; कर्मचाऱ्यांसह ग्राहकांना बसला आश्चर्याचा धक्का
महिलेनं हॉटेलच्या बाथरुमध्ये दिला बाळाला जन्म; कर्मचाऱ्यांसह ग्राहकांना बसला आश्चर्याचा धक्का
महिलेनं हॉटेलच्या बाथरुमध्ये दिला बाळाला जन्म; कर्मचाऱ्यांसह ग्राहकांना बसला आश्चर्याचा धक्का Baby Delivery In McDonald’s Bathroom : गर्भवती महिलेला प्रसूतीकळा व्हायला लागल्यावर ती हॉटेलच्या बाथरुममध्ये गेली. परंतु तिथंच तिनं बाळाला जन्म दिल्याची घटना समजताच हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहकांना आश्चर्याचा धक्का बसला. Baby Delivery In McDonald’s Bathroom : गर्भवती महिलेला प्रसूतीकळा व्हायला…
View On WordPress
0 notes