#स्वातंत्र्यदिनी
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव इथं लखपती दिदींसोबत संवाद साधत आहेत. लखपती दीदींचा हा राज्यातला पहिला ऐतिहासिक मेळावा असून ३४ राज्यांमधल्या जवळजवळ ३० हजार ठिकाणांहून या कार्यक्रमात लखपती दीदी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाल्या आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित आहेत.
यावेळी देशभरातल्या ११ लाख लखपती दिदींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान राज्यातल्या स्वयंसहाय्यता गटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी, तसंच पाच हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज जारी करतील. दरम्यान, पंतप्रधानांचं आज सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झालं. यावेळी प्रशासनाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं.
**** अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे देशातील युवावर्गाला मोठा फायदा झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. हा या कार्यक्रम मालिकेचा एकशे तेरावा भाग होता.
चांद्रयान-३ मोहिमेद्वारे दक्षिण ध्रुवावर झेंडा रोवणारा भारत पहिला देश असल्याचं सांगत पंतप्रधानांनी या दिनाचं महत्व विशद केलं. चंद्रयान-तीन च्या यशानिमित्�� यंदा २३ ऑगस्टला देशवासीयांनी पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला. या दिनानिमित्त त्यांनी 'मन की बात' मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित नवोद्योग क्षेत्रातील तरुणांशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी मन की बातमध्ये राजकारणातील घराणेशाहीबद्दल तरुणांचं मत, हर घर तिरंगा अभियान, स्वातंत्र्यदिनी जम्मू काश्मीरमध्ये आयोजित तिरंगा रॅली, श्रीनगरच्या दल सरोवरातील तिरंगा यात्रा आणि भावा-बहिणींच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सणाचा देखील उल्लेख केला.
देशात अनेक स्टार्टअप पर्यावरणाला चालना देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगत सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर पर्यावरण रक्षणासह देशही पुढे जाईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. देशविदेशात संस्कृत भाषेविषयी विशेष रुची असल्याचं सांगत अनेक देशांमध्ये संस्कृत भाषेशी संबंधित संशोधन आणि प्रयोग होत असल्यांचही ते म्हणाले. मन कि बातद्वारे पंतप्रधान मोदी यांनी पोषण आहाराचं महत्व सांगितलं. गेल्या वर्षी पोषण अभियानाला नव्या शिक्षण धोरणाशी जोडलं गेलं. पोषण आणि शिक्षण सुद्धा या अभियानाअंतर्गत मुलांच्या संतुलित विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचं सांगत छोट्या प्रयत्नांनीही कुपोषणाच्या विरोधातील या लढाईला खूप मोठं बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पावसाळ्याच्या दिवसांत काळजी घेण्यारोबरच वर्षा जलसंचयन मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि एक पेड मा के नाम या अभियानाद्वारे जास्तीत जास्त झाडं लावावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
****
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ जुलै नंतर आलेल्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून पात्र महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. अर्जांची प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू असून प्रशासकीय मान्यतेनंतर पात्र महिलांची माहिती विभागाकडं येते. त्यानंतर ही यादी बँकेकडे पाठवली जाते असं त्या म्हणाल्या.
आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरू आहे. ' राज्यात योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असून बँक खात्याला आधारकार्ड क्रमांक लिंक करून घेत जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन तटकरे यांनी केलं आहे.
****
नागपूर- अमरावती महामार्गावर नांदगावपेठ जवळ राज्य परिवहन महाम��डळ एसटीच्या शिवशाही बसला झालेल्या अपघातात दोन प्रवासी ठार तर २४ जण जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. नागपूरहून अकोल्याला जाणाऱ्या बससमोर अचानक आडव्या आलेल्या गायीला वाचवताना नियंत्रण सुटल्यानं ही बस उलटून हा अपघात झाला.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची काल मुंबईत बैठक झाली. मात्र, या बैठकीत झालेल्या चर्चेनंतरही कोणत्या पक्षाला किती जागा यासंदर्भात निश्चित काहीही ठरलं नसल्याचं वृत्त आहे. ****
मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरसह जालना या दोन जिल्ह्यांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुण्यासह सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
****
भारताची बॅडमिंटनपटू तन्वी पत्री हिनं, चीनमध्ये सुरु असलेल्या अशियाई कनिष्ट गट विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेच्या १५ वर्षांखालील महिला एकेरी गटाचा किताब पटकावला आहे. चीनच्या चेंगडू इथं आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हएतनामच्या गुयेन थी थू ह्यूजेन या खेळाडूला पराभूत करत हे यश मिळवलं. तर, या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात ज्ञान दत्तू टीटी यानं कांस्य पदक प्राप्त केलं आहे.
****
0 notes
Text
हायड्रोजनवर चालणारी पहिली बस आता लडाखमधून धावणार
नवी दिल्ली : भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस सेवा केंद्रशासित प्रदेश लडाखच्या रस्त्यांवर लवकरच सुरु करण्यात येणार आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही बससेवा लेहमध्ये सार��वजनिक रस्त्यांवर व्यावसायिक चाचण्यांसह सुरू करण्यात येणार आहे. भारतातील ��र्वात मोठी वीज उत्पादक कंपनी एनटीपीसी या प्रकल्पाअंतर्गत शहरातील आंतर-शहर सेवेसाठी लेह प्रशासनाला ५ हायड्रोजन इंधन सेल बसेस पुरवणार आहे. सरकारी कंपनीने बसेसला इंधन देण्यासाठी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी इंधन केंद्र आणि १.७ मेगावॅटचा सोलर प्लांटदेखील बांधला आहे. यासाठी लेह प्रशासनाने पायाभूत सुविधांसाठी शहरातील ७.५ एकर जमीन भाड्याने दिली आहे. हा प्रकल्प पंतप्रधानांच्या २०२० च्या स्वातंत्र्यदिनी कार्बन-न्यूट्रल लडाखच्या घोषणेच्या दोन वर्षांच्या आत पूर्ण करण्यात आला आहे. हायड्रोजन फ्युएल सेल बसेस भारतातील सार्वजनिक रस्त्यांवर व्यावसायिकरित्या कार्यरत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकेच नाही तर पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाची चाचणी ११,५०० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या दुर्मिळ वातावरणात आणि हवेतील कमी ऑक्सिजनमध्ये होणार आहे. Read the full article
0 notes
Text
नागपूर : स्वातंत्र्यदिनी हिरोगिरी, धूम धडाम आवाज, ४८ बुलेट जप्त
https://bharatlive.news/?p=122034&wpwautoposter=1692176748 नागपूर : स्वातंत्र्यदिनी हिरोगिरी, धूम धडाम आवाज, ४८ बुलेट जप्त
नागपूर : ...
0 notes
Text
पंतप्रधान मोदी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात: "चला दुराचरण पुसण्याची शपथ घेऊया"
पंतप्रधान मोदी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात: “चला दुराचरण पुसण्याची शपथ घेऊया”
“हे महत्वाचे आहे की भाषण आणि आचरणात, आम्ही महिलांच्या प्रतिष्ठेला कमी करणारी कोणतीही गोष्ट करत नाही,” तो म्हणाला. नवी दिल्ली: भारताने स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत असताना लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “नारी शक्ती” (स्त्री शक्ती) च्या प्रतिष्ठेवर विशेष भर दिला. भारतासाठी स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या पाच प्रतिज्ञांची यादी करताना ते…
View On WordPress
#नारी शक्तीवर पंतप्रधान मोदी#पीएम मोदींचे भाषण#लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे भाषण#स्वातंत्र्य दिन २०२२#स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचे भाषण
0 notes
Text
भारत आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी २०२२ च्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा पोस्टर प्रतिमा
भारत आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी २०२२ च्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा पोस्टर प्रतिमा
२०२२ च्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा: देश स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. हा खास सोहळा ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा केला जात आहे. सध्या संपूर्ण देश देशभक्तीच्या रंगात रंगलेला दिसत आहे. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले होते, तेव्हा भारताला स्वातंत्र्यदिन मिळाला होता.…
View On WordPress
#२०२२ च्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा#स्वातंत्र्य दिन २०२२#स्वातंत्र्य दिनाचे पोस्टर#स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा प्रतिमा#स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा#स्वातंत्र्यदिनी संदेश
0 notes
Text
परिश्रमाने शासकीय सेवेत रुजू झालेल्या युवकांचा स्वातंत्र्यदिनी सत्कार
परिश्रमाने शासकीय सेवेत रुजू झालेल्या युवकांचा स्वातंत्र्यदिनी सत्कार
अर्जुनी-मोर��ाव, दि.17 : तालुक्यातील दाभना येथे परिश्रम घेवून शासकीय सेवेत रुजू झालेल्या दोन युवकांचा स्वातंत्र्यदिनी सत्कार करण्यात आला. दाभणाचे सरपंच डॉ.दीपक रहिले यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दरवर्षी गावातील होतकरू नागरिकांना सन्मान दिला जातो. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहणानंतर गावातील शासकीय सेवेत रुजू झालेल्या बिपिन…
View On WordPress
0 notes
Text
सैन्य दलाचे काम अनमोल; स्वातंत्र्यदिनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम - उद्योगमंत्री उदय सामंत
सैन्य दलाचे काम अनमोल; स्वातंत्र्यदिनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम – उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी दि. 15 :- स्वातंत्र्य दिनी हे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारे सैनिक व त्यांच्या वीर माता वीर पत्नी यांचा सन्मान सोहळा प्रतिवर्षी आवर्जून होण्याची गरज आहे. त्यांचे कार्य अनमोल आहे त्यासाठी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम हे समाजाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सैनिक कल्याण कार्यालयातर्फे आयोजित शौर्य पदक विजेते…
View On WordPress
0 notes
Text
जैवविविधता नोंदवहीचे 30 महिने मानधन नाही
जैवविविधता नोंदवहीचे 30 महिने मानधन नाही
पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्नेहसिंधूचे उपोषण तूर्तास मागे ब्युरो । सिंधुदुर्ग नगरी : “लोक जैविक विविधता नोंदवही ” तयार करून दिल्यानंतर तीस महिने उलटल्या नंतरही संबंधित ग्रामपंचायतीकडून मानधन अदा न झाल्याने स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाने आज स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्ग नगरीत छेडलेले उपोषण पालकमंत्री दीपक भाई केसरकर यांच्या आश्वासनानंतर तूर्तास मागे घेतले आहेपालकमंत्री दीपक भाई केसरकर यांनी.…
View On WordPress
0 notes
Text
पुणे जिल्ह्यात ८ लाख मालमत्तांवर महिलांचे नाव
पुणे जिल्ह्यात ८ लाख मालमत्तांवर महिलांचे नाव
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पुणे जिल्हा परिषदेने महिलांना मालमत्तेचा अधिकार देण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील ८ लाख १५ हजार अर्थात ८८ टक्के मालमत्तांवर महिलांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. मालमत्तेचा आणि त्याच्या मालकांचा तपशील ग्रामपंचायती ठेवतात. जागतिक स्तरावर, महिलांकडे २० टक्क्यापेक्षा कमी मालमत्तेची मालकी आहे. गतवर्षी स्वातंत्र्यदिनी जिल्हा…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 16.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
· देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायद्याची गरज - ७८ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन
· मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण - मराठवाड्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
· मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ८० लाखापेक्षा जास्त महिलांना लाभ प्राप्त, मुख्यमंत्र्यांची बहिण ही नवीन ओळख मिळाल्याची लाभार्थी महिलांची प्रतिक्रिया
आणि
· राज्यातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार
सविस्तर बातम्या
देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायद्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. काल ७८ व्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवर पंतप्रधानांच्या हस्ते सलग ११ व्या वेळेस ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर तेबोलत होते, ४० कोटी नागरिक जर जुलमी ब्रिटीश सत्ता उलथवून टाकत स्वातंत्र्यप्राप्तीचं उद्दीष्ट साध्य करू शकतात, तर १४० कोटी नागरिक २०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न नक्कीच साकार करू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. धर्माच्या आधारावर देशात दोन गट पाडणाऱ्या कायद्यांना आधुनिक युगात स्थान नसल्याचं, मोदी यांनी नमूद केलं. ते म्हणाले…
इस गंभीर विषय पर देश में चर्चा हो। जो कानून धर्म के आधार पर देश को बांटते ��ै, जो उंच नीच का कारण बन जाते है, ऐसे कानुनों को आधुनिक समाज मे कोई स्थान नही हो सकता। अब समय की मांग है, की देश मे एक सेक्युलर सिविल कोड हो। हमने कम्युनल सिविल कोड मे पचहत्तर साल बिताये है। अब हमें सेक्युलर सिविल कोड की तरफ जाना होगा। और तब जा कर के देश मे धर्म के आधार पर जो भेदभाव हो रहे है, सामान्य नागरिक को जो दुरी महसूस होती है, उससे हमें मुक्ती मिलेगी।
सेमीकंडक्टर उत्पादनात जागतिक नेतृत्वाबद्दल आनंद व्यक्त करत, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. जातीयवाद तसंच परिवारवादापासून मुक्ततेसाठी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख नवतरुणांना राजकारणात सक्रीय करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण, शिक्षण, युवक कल्याण, आदी विषयांवरही पंतप्रधानांनी भाष्य केलं.
****
राज्यात ७८ वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात विधान भवन इथं ध्वजारोहण करण्यात आलं. मराठवाड्यातही ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी स्वातंत्रदिन साजरा झाला.
****
Byte…
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्याहस्ते, नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते तर परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मराठवाड्यात इतरत्र सर्व शैक्षणिक संस्था, सामाजित संघटना तसंच शासकीय कार्यालयांमधून ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहास साजरा झाला.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत.
****
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या योजनेतल्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांची बहिण, अशी नवी ओळख या योजनेमुळं मिळाल्याच्या ��ावना लाभार्थी महिलांनी यावेळी व्यक्त केल्या. राज्यभरातल्या भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही, तर ती कायम आहे, योजनेकरता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतुद करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत ८० लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ मिळाल्याची माहिती, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. उर्वरित पात्र महिलांना सुद्धा उद्या १७ ऑगस्ट पर्यत हा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यात गणेश उत्सवास येत्या सात सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्यातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. पहिल्या तीन विजेत्या मंडळांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपये पारितोषिक देण्यात येईल. अधिकाधिक मंडळांनी ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज करून, या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असं आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
****
परभणी इथं लायन्स क्लबच्या वतीनं एक हजार फुट लांबीच्या राष्ट्रध्वजाची फेरी आणि राष्ट्रध्वज सन्मान पथदर्शन काल करण्यात आलं. गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरून काढलेल्या या फेरीत शहरातील ५० शाळेतल्या सुमारे पाच हजारावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
****
जालना पोलिस मुख्यालयातल्या कवायत मैदानाचं नूतनीकरण तसंच विद्युत पथदिवे या कामाचं लोकार्पण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल करण्यात आलं.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी एम थोरात यांचा काल धाराशिव इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
****
देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्याचं काम ग्रंथालयानं करावं असं आवाहन कृषिमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. ते काल बीड इथं शासकीय ग्रंथालयाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. या ग्रंथालयात पुस्तकांसह डिजिटल पद्धतीनंही ग्रंथसंपदा उपलब्ध राहणार आहे आणि अशा स्वरूपाचं हे राज्यातलं चौथं डिजिटल ग्रंथालय असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
लातूर इथं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या १२ व्या स्मृतिदिनान��मित्त विलास सहकारी साखर कारखान्यात रक्तदान शिबीर घेण्यात आलं. यामध्ये ८१ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं.
****
0 notes
Text
मुघलांनी भारताला आकार दिला, मला त्यांचा अभिमान : अब्दूल खालिफ
बारपेटा : मुगलांनी छोट्या छोट्या राज्यांची निर्मिती करून भारताला हिंदुस्तानचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे मला मुघलांचा अभिमान आहे, असे वादग्रस्त विधान आसाममधील बारपेटा मतदारसंघाचे लोकसभा खासदार अब्दुल खालिक यांनी केले आहे. तथापि, मी मुघल नाही किंवा मी त्याचा वंशज नाही. त्यांनी हिंदुस्थानला एक आकार दिला आहे. मुघलांशिवाय देशाचा स्वातंत्र्यलढा अपूर्ण राहिला असता असेही खालिफ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. भारतात लाल किल्ला, ताजमहाल यांसारखी स्मारके बांधली त्यामुळे मुघलांचे देशासाठीचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. देशाचा प्रत्येक पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावतो यावरून मुघलांचे महत्त्व लक्षात येते. मुघलांचा एवढा द्वेष असेल तर, लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणे योग्य होणार नाही, असेही खालिफ यांनी म्हटले आहे. Read the full article
0 notes
Text
नागपूर : स्वातंत्र्यदिनी हिरोगिरी, धूम धडाम आवाज, ४८ बुलेट जप्त
https://bharatlive.news/?p=122034 नागपूर : स्वातंत्र्यदिनी हिरोगिरी, धूम धडाम आवाज, ४८ बुलेट जप्त
नागपूर : ...
0 notes
Text
बिल्किस बानो प्रकरण: 11 दोषींच्या सुटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
बिल्किस बानो प्रकरण: 11 दोषींच्या सुटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
बिल्किस बानो म्हणाल्या की 11 पुरुषांच्या सुटकेने ती “सुन्न” झाली आहे. नवी दिल्ली: 2002 च्या गुजरात दंगलीत बिल्किस बानोच्या सामूहिक बलात्कारप्रकरणी दोषी ठरलेल्या 11 जणांच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या तीन याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गुजरात सरकारने कालबाह्य माफी धोरणांतर्गत स्वातंत्र्यदिनी दोषींना सोडले होते, ज्याचे मोठ्या राजकीय वादात रूपांतर झाले. 2019 मध्ये, सर्वोच्च…
View On WordPress
0 notes
Text
editorial page NDA Permission for entrance examination Women are mighty Prime Minister Narendra Modi Admission to military school for girls akp 94 | करड्याला गुलाबी किनार
editorial page NDA Permission for entrance examination Women are mighty Prime Minister Narendra Modi Admission to military school for girls akp 94 | करड्याला गुलाबी किनार
‘एनडीए’ च्या प्रवेश परीक्षेची परवानगी मिळाल्याने सैनिकी शिक्षणाची दारे महिलांसाठी खुली होणार, याचे स्वागत दोन कारणांसाठी… अशा निर्णयांमुळे स्त्रिया पराक्रमी असू शकतात हे हळुहळू गळी उतरते आहे आणि संरक्षण दलांचा चेहरामोहराही बदलू शकणार आहे… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात मुलींसाठी सैनिकी शाळेत प्रवेश खुला केल्याची घोषणा ताजी असतानाच…
View On WordPress
0 notes
Text
15 ऑगस्ट रोजी कोणता मंत्री कुठे ध्वजारोहण करणार, याची यादी अखेर जाहीर
15 ऑगस्ट रोजी कोणता मंत्री कुठे ध्वजारोहण करणार, याची यादी अखेर जाहीर
मुंबई : एकनाथ शिंदे सरकारने अद्याप पालकमंत्री नेमले नसल्याने जिल्हास्तरावरील यंत्रणांना पालक नाही. स्वातंत्र्यदिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण केले जाते. मात्र मंत्र्यांना अद्याप जिल्ह्यांचे वाटप झाले नसल्याने कोणता मंत्री 15 ऑगस्टच्या दिवशी कोठे जाणार, याची उत्सुकता होती. मुख्यमंत्र्यांसह 20 मंत्री असल्याने इतर सोळा जिल्ह्यांत विभागीय आयुक्त…
View On WordPress
0 notes
Text
कोरोना काळात कुटुंबातील कर्ता पुरुष गमावलेल्या निराधार महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 21 महिलांना मोफत अत्याधुनिक शिलाई मशीनचे वाटप रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने करण्यात आले. हा उपक्रम स्वातंत्र्यदिनी वंजारी वसतिगृहाच्या प्रांगणात झाला.
0 notes