#सूर्याचा
Explore tagged Tumblr posts
Text
Sun Transit : सूर्याचा धनु राशीत प्रवेश, १६ डिसेंबरला 'या' सहा राशीच्या व्यक्तींवर ओढावणार संक्रांत
Sun Transit : सूर्याचा धनु राशीत प्रवेश, १६ डिसेंबरला ‘या’ सहा राशीच्या व्यक्तींवर ओढावणार संक्रांत
Sun Transit : सूर्याचा धनु राशीत प्रवेश, १६ डिसेंबरला ‘या’ सहा राशीच्या व्यक्तींवर ओढावणार संक्रांत Sun Transit To Sagittarius On 16 December : सूर्य धनु राशीत येणार असल्याने अनेक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात परिणाम होणार आहे. त्यातल्या त्यात सहा राशींवर १६ डिसेंबर रोजी विपरीत परिणाम होणार असल्याचे संकेत आहेत. Sun Transit To Sagittarius On 16 December : सूर्य धनु राशीत येणार असल्याने अनेक…
View On WordPress
#१६#sun#transit#ओढावणार#डिसेंबरला#धनु#धार्मिक#प्रवेश#या#राशीच्या#राशीत#विश्व#व्यक्तींवर#संक्रांत#सहा#सूर्याचा
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 September 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
भारताच्या ��ौर मोहिमेतल्या आदित्य एल वन या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण.
जालना लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जनतेला शांततेचं आवाहन तर खासदार शरद पवार यांच्याकडून घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी.
जालना बंदला आजही हिंसक वळण; घटनेचे अनेक ठिकाणी पडसाद.
आणि
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्याला प्रारंभ.
****
भारताच्या सौर मोहिमेतल्या आदित्य एल वन या उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी सत्तावन या प्रक्षेपकाद्वारे, आदित्य एल वन हा उपग्रह अवकाशात झेपावला.
पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये लँग्रेंज बिंदूवर हा उपग्रह स्थिर केला जाणार असून, या बिंदूपर्यंत पोहोचायला या उपग्रहाला सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आदित्य एल वन मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधले चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत, तर उर्वरित तीन पेलोड्स हे वातावरणाचा अभ्यास करतील.
आदित्य एल वन उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो चे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचं अभिनंदन केलं आहे. आदित्य एल वन चं यशस्वी प्रक्षेपण ही भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला एक नवी दिशा प्रदान करणारं ऐतिहासिक यश असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. अंतराळ आणि खगोलीय घटनांना विस्तृतपणे समजण्यात आदित्य एल वनची मदत होईल असं राष्ट्रपती म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात मानवाच्या कल्याणासाठी ब्रम्हांडाला जाणून घेण्याकरिता भारताचे प्रयत्न अथक सुरु राहतील असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा देताना, भारताने अवकाश संशोधनाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांत नोंद करून ठेवावी, अशी कामगिरी केली असल्याचं म्हटलं आहे. या मोहीमेमध्ये पुण्यातील 'आयुका' संस्थेचा उपग्रहावरील संशोधन उपकरण निर्मितीत सक्रिय सहभाग असणं, अभिमानास्पद असल्याचा उल्लेखही ��ुख्यमंत्र्यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आदित्य एल वन च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.
****
जालना इथं काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जाळपोळीच्या, हिंसाचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली असून ह्या घटना थांबवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन मराठा आंदोलक नेत्यांना तसंच कार्यकर्त्यांना केलं आहे. राज्यातील नागरिकांनीही शांतता पाळून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे. पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
****
मराठा समाजाच्या विषयावर कुणीही पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन भाजपचे विधान परिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. जालना इथं काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आमदार प्रविण दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे याचं कुणीही राजकारण करू नये, असं म्हटलं आहे.
****
जालन्यात काल झालेल्या लाठीमाराचं समर्थन कोणी करणार नाही, हा लाठीमार अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून झाला असेल तर त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आमदार नितेश राणे यांनी आज कणकवलीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठा समाजाचे आजवर ५८ मोर्चे शांतपणे निघाले आहेत. निर्दोष मराठा समाज आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका अशी मागणी आमदार राणे यांनी यावेळी केली.
****
या प्रकरणी फक्त उच्चस्तरीय चौकशी नव्हे तर न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. जालना इथं कालच्या घटनेत जखमी झालेल्यांची तसंच आंदोलकांची पवार यांनी आज भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. लाठीहल्ल्याचे आदेश पोलीसांना नेमके कुणी दिले याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी असं पवार यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, आदींनी देखील आज अंबड उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जालन्यातल्या लाठीमाराचा निषेध केला असून जखमींची भेट घेण्यासाठी आपण जालन्याला जात असल्याचं म्हटलं आहे.
येत्या ८ सप्टेंबरला राज्य सरकारचा 'शासन आपल्या दारी'हा कार्यक्रम जालना जिल्ह्यात नियोजित ��हे. सराटी अंतरवाली इथल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आपल्या कार्यक्रमावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. मराठा आंदोलनावरील लाठीमार प्रकरणी प्रतिक्रिया देताना मुंबईत आज ते बोलत होते.
****
दरम्यान, जालना शहरातल्या अंबड चौफुलीवर सुरु असलेल्या आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागलं. मराठा आंदोलकांनी आक्रमक होत वाहनांवर दगडफेक केली. एक खाजगी ट्रक जाळण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत प्लास्टिकच्या गोळ्यांचाही वापर केला. जालना शहरात सर्वत्र बंदोबस्त वाढवण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे. दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. काही आंदोलक तरुणांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. जालना जिल्हा बंदला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं, कायदा हातात घेऊ नये असं आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केलं आहे.
****
मराठवाड्यात इतरत्रही या घटनेचे पडसाद उमटले. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारा यांना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आणि मराठा समाज बाधवांच्या वतीनं घोषणाबाजी करत घेराव घालण्यात आला. भाजपाच्या आढावा बैठकीनिमित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार औंढा इथे आले होते. लाठीमाराची घटना निंदनिय असून, त्याचा निषेध नोंदवत असल्याचं मंत्री मुनगंटीवार म्हणाले. या घटनेची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
औरंगाबाद इथं मराठा समाजाच्या वतीनं शहरात अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. शहरात काही भागात बंदही पाळण्यात आला. नागरीकांनी अफवांवर किंवा सामाजिक माध्यमांवरच्या चुकीच्या पोस्ट वर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन औरंगाबादचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी केलं आहे.
उस्मानाबाद इथं काही दुकानांवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आंदोलकांना कोणतीही हानी होऊ नये, अशी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. आंदोलकांनी शांतता राखण्याचं आवाहन पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलं आहे. राज्य परिवहन महामंडळाने उस्मानाबाद जिल्ह्यात संपूर्ण बस सेवा आज बंद ठेवली होती.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंकेत पल्लेकेले इथं भारत आणि पाकिस्तान संघात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली मात्र, कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे आघा��ीचे चारही फलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत. रोहित ११, शुभमन दहा, विराट चार तर श्रेयस १४ धावांवर तंबूत परतले. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ईशान किशन ५० तर हार्दिक पांड्या ३७ धावांवर खेळत होते.
****
सनद अर्थात डिग्री आणि अस्थायी प्रमाणपत्रांवर आधार क्रमांक छापण्याची परवानगी नसल्याचं विद्यापीठ अनुदान आयोग युजीसी ने स्पष्ट केलं आहे. विश्वविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना जारी करण्यात येणाऱ्या सनद आणि प्रमाणपत्रांवर संबंधित विद्यार्थ्यांचा संपूर्ण आधार क्रमांक छापण्यासंदर्भात युजीसी विचार करत असल्यासंदर्भात माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांसंदर्भात युजीसीने हे स्पष्टीकरण दिलं आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण च्या नियमांचं कठोर पालन करण्याच्या सूचनाही युजीसी ने विश्वविद्यालयांना दिल्या आहेत.
****
हिंगोलीतल्या सेनगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उभं असलेलं प्रशासकीय वाहन आग लागून खाक झालं. सेनगाव अग्निशामक दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने विझवण्यात आली. तहसील आवारात असलेल्या शासकीय धान्य गोदामालाही अचानक आग लागली, पोलीस आणि अग्निशमन दलाचं पथक आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
****
मराठवाडा मुक्तिसंग्रामात अठरा पगड जातीच्या लोकांसह स्त्रियांचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लक्षणीय योगदान होतं, असं डॉक्टर प्रभाकर देव यांनी म्हटलं आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्यातल्या उमरी इथं देव यांचं विशेष व्याख्यान झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुक्तीसंग्राम लढ्याचा हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता देव यांनी व्यक्त केली.
इतिहासाचा हा अनमोल ठेवा इतरांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कार्यक्रम आयोजित करत असल्याचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितलं.
****
0 notes
Text
Devavina Mansachi Zindagani Ekti ( Soundcheck ) चंद्राचा सूर्याचा खेळ Dj Song Download
Devavina Mansachi Zindagani Ekti ( Soundcheck ) चंद्राचा सूर्याचा खेळ Dj Song Download
DJSONGS DOWNLOAD Download Now Google Tags :Devavina Mansachi Zindagani Ekti ( Soundcheck ) चंद्राचा सूर्याचा खेळ Dj Song Download
View On WordPress
0 notes
Text
असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य : १० ऑक्टोंबर
असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य : १० ऑक्टोंबर
सोमवार, १० ऑक्टोबर २०२२. अश्विन कृष्ण प्रतिपदा. शरद ऋतू, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००”आज उत्तम दिवस आहे” सूर्याचा चित्रा नक्षत्रात प्रवेश. (शुक्र अस्त चालू आहे) चंद्र नक्षत्र – रेवती. मेष:- खर्चात वाढ करणारा पूर्वार्ध आहे. दगदग वाढेल. प्रवासात त्रास संभवतो. वृषभ:- आर्थिक उन्नती होईल. संव��द…
View On WordPress
0 notes
Text
योग 166 वर्षांनंतर गुरू ग्रह पृथ्वीच्या एवढा जवळ येईल शनीही कुठे आणि कसा पाहावा
योग 166 वर्षांनंतर गुरू ग्रह पृथ्वीच्या एवढा जवळ येईल शनीही कुठे आणि कसा पाहावा
पृथ्वीवरून दिसणारे गुरु आणि शनि: आपल्या आकाशातील सर्वात मोठा ग्रह गुरु’ पृथ्वीचा सर्वात मोठा कारण आहे. गुरु सूर्याचू प्रदक्षिणा घालण्यास १२ वर्षे ग्रहाला आणि यावेळेस समूह १६६ वर्षे पूर्त्व मुळात गुरु अस्तित्वात आहे. जेव्हा एकाच वेळी पश्चिमेला सूर्याला अस्त होतो तेव्हा सूर्याचा उदय पूर्वेकडे होतो. यावेळेस जेव्हा गुरु ग्रहाच्या शक्ती ही खगोलीय घटना घडेल तेव्हा गुरुचे दर्शन पृथ्वीपासून सर्वात मोठे…
View On WordPress
#गुरु ग्रहाचे प्रवर्तन#ज्योतिष#ज्योतिषशास्त्र#नऊ ग्रह राशी परिवर्तन#पृथ्वीवरून गुरू कसे पहावे#पृथ्वीवरून दिसणारा बृहस्पति#बृहस्पति विरोध#मराठीत शनि संक्रमण २०२२#शनि गोचर#शनि गोचर २०२२#शनि ग्रह राशी परिवर्तन#शनि राशी परिवर्तन#शनि राशी परिवर्तन २०२२#शनि राशी परिवर्तन २०२२ मराठीत#शनि राशी परिवर्तन न्यूज#शनि राशी परिवर्तन वाईट परिणाम#शनि राशी परिवर्तन शुभ परिणाम#शनि राशी प्रवेश बातम्या#शनि राशीपरिवर्तन#शनि संक्रमण#शनि संक्रमण २०२२#शनि संक्रमण उपे#शनि संक्रमण तारखा#शनि संक्रमण प्रभाव#शनि संक्रमण राशी प्रवेश 2022#शनिग्रह च प्रभव#शनी ज्योतिष बातम्या मराठीत
0 notes
Text
मोठ्या मनाचे देवेंद्र फडणवीस! तुम्ही किंग ते किंगमेकर कसा गेलात? राजकारणाचे पूर्ण चरित्र वाचा
मोठ्या मनाचे देवेंद्र फडणवीस! तुम्ही किंग ते किंगमेकर कसा गेलात? राजकारणाचे पूर्ण चरित्र वाचा
देवेंद्र फडणवीस (फाइल फोटो) देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मोठे मन दाखवले आहे असे नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकत्र लढूनही शिवसेना वेगळी झाली तेव्हा फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाटून घेण्याचे मान्य केले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ३० जून ही तारीख एका नव्या सूर्याचा उदय म्हणून नोंदली गेली आहे. शिवसेनेचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे न जुळलेले सरकार…
View On WordPress
0 notes
Text
बुडत्या मुंबई इंडियन्सला सूर्याचा आधार... सूर्यकुमारने अर्धशतकासह पुन्हा संघाला सावरले
बुडत्या मुंबई इंडियन्सला सूर्याचा आधार… सूर्यकुमारने अर्धशतकासह पुन्हा संघाला सावरले
पुणे : आरसीबीच्या संघाने आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची लक्तरं वेशीवरच टांगल्याचे पाहायला मिळाली होती. मुंबईने सुरुवात चांगली केली होती. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी ५० धावंची सलामी दिली. पण रोहित शर्मा बाद झाल्यावर मुंबई इंडियन्सचा डाव कोसळला. त्यामुळे एकेकाळी बिनबाद ५० असणाऱ्या मुंबई इंडियन्सची अवस्था ५ बाद ६२ झाली. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा मुंबईच्या संघाला सावरले.…
View On WordPress
0 notes
Text
सूर्यास्त
दिवसभर चालून थकलाझाला सूर्याचा अस्त ।आली फौज चांदण्यांचीचमचमण्यात त्या व्यस्त ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
गीता प्रवचने रोजचा विचार, १०.
साम्यसूत्र,
३. प्रयोजनवत्त्वात् ।
वृत्ति,
१२. परधर्मः श्रेष्ठ इति न ग्राह्य: ।
१३. सुकर इति न स्वीकार्यः ।
१२. दुसऱ्याचा धर्म श्रेष्ठ वाटला तरी तो स्वीकारण्यात माझे कल्याण नसते. सूर्याचा प्रकाश मला प्रिय आहे. त्या प्रकाशाने माझी वाढ होते. सूर्य मला वंदनीय आहे. पण म्हणून मी पृथ्वीवरचे वास्तव्य सोडून त्याच्याजवळ जाऊ पाहीन तर जळून जाईन. उलट पृथ्वीवर राहणे विगुण असेल, पृथ्वी सूर्यापुढे अगदीच तुच्छ असेल, ती स्वयंप्रकाशी नसेल, तथापि जोपर्यंत सूर्याचे तेज सहन करण्याचे सामर्थ्य माझ्यामधे नाही तोपर्यंत सूर्यापासून दूर पृथ्वीवर राहूनच मी माझा विकास करून घेतला पाहिजे. माशाला जर कोणी म्हणेल, पाण्यापेक्षा दूध मौल्यवान आहे, दुधात रहा, तर मासा ते कबूल करील का? मासा पाण्यातच वाचेल, दुधात मरेल.
१३. दुसऱ्याचा धर्म सोपा वाटला म्हणूनहि स्वीकारावयाचा नसतो. पुष्कळ वेळा सोपेपणाचा भासच असतो. संसारात बायकामुलांचे नीट रक्षण करता येत नाही म्हणून कंटाळून जर कोणी गृहस्थ संन्यास घेईल, तर ते ढोंग होईल व जडहि जाईल. संधि सापडताच त्याच्या वासना जोर करतील. संसाराचे ओझे झेपत नाही म्हणून वनात जाणारा आधी तेथे लहानशी झोपडी बांधील, मग तिच्या रक्षणासाठी तो कुंपण करील. असे करता करता त्याला तेथे सवाई संसार उभा करण्याची पाळी येईल. वैराग्यवृत्ति असेल तर संन्यासातहि कठिण काय आहे? संन्यास सोपा म्हणून सा��गणारीहि स्मृतिवचने तर आहेतच. पण मुख्य मुद्दा वृत्तीचा आहे. ज्याची जी खरी वृत्ति असेल तदनुसार त्याचा धर्म राहील. श्रेष्ठ-कनिष्ठ, सोपे-कठिण, हा प्रश्न नाही. खरा विकास हवा. खरी परिणति हवी.
0 notes
Photo
Today Pooja Mahalaxmi Temple kolhapur Maharashtra India #घटस्थापना आजची श्री महालक्ष्मी ची कुण्डलिनी स्वरुपात पूजा जगन्मात्रे नमः आज अश्र्विन शुद्ध प्रतिपदा श्रीशके १९४२ अर्थात १७/१०/२०२० आज घटस्थापनेच्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई श्री कुंडलिनी रूप पराम्बिकेच्या स्वरुपात नटली आहे. पराम्बा अर्थात वाणी शब्द याला अनाकलनीय असं भगवतीचं रूप . अशी ही जगदंबा जिने त्रिनेत्र आणि दोन हाताचं रूप धारण करून एका हातामध्ये रत्नजडित मधुपात्र आणि दुसऱ्या हातात लाल कमळ धारण करणाऱ्या या देवीचा वर्ण हा उगवत्या सूर्याचा प्रमाणे अर्थात सिंदूरी आहे. डोक्यावर माणकं जडवलेला किरीट आणि चंद्र धारण करणारी सुहास्य वदना अशी ही पराम्बिका रत्नघटावर चरण ठेवून विराजमान आहे. या कुंडलिनी स्वरूपी देवीचे ध्यान ललिता सहस्त्रनाम स्तोत्राचे पठणापूर्वी अवश्य केले जाते. योगी जनांच्या साधनेचा आधार म्हणजे कुंडलिनी जागृती जी सुप्तावस्थेत असते त्या मुळे आपण सर्व भवबंधनात असतो पण मूलाधार चक्रात साडेतीन वेटोळे घालून बसलेली ही पराशक्ती जागी होऊन षट्चक्रांचा भेद करत सहस्त्रार चक्रात पोहोचतो आणि उन्मनी अवस्था रूप अमृताची वृष्टी करते अशी ही कुंडलिनी भगवती आपल्यावर नवरात्र नावाच्या साधनापर्वात कृपा वृष्टी करो हीच जगदंबा चरणी प्रार्थना. सिन्दूरारूण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलि स्फुरत् तारा नायक शेखरां स्मितमुखी मापीन वक्षोरुहाम् | पाणिभ्यामलिपूर्ण ��त्न चषकं रक्तोत्फलं बिभ्रतीं सौम्यां रत्न घटस्थ रक्तचरणां ध्यायेत् पराम्बिकाम् श्रीमातृचरणारविंदस्य दासः प्रसन्न सशक्तीकः https://www.instagram.com/p/CGcUmZqlqNe/?igshid=1uju8rmgra8zs
0 notes
Text
धनु राशीत सूर्याचा प्रवेश, २०२३ नव्या वर्षात 'या' राशीच्या लोकांनी जरा सांभाळून
धनु राशीत सूर्याचा प्रवेश, २०२३ नव्या वर्षात ‘या’ राशीच्या लोकांनी जरा सांभाळून
धनु राशीत सूर्याचा प्रवेश, २०२३ नव्या वर्षात ‘या’ राशीच्या लोकांनी जरा सांभाळून शुक्रवार १६, डिसेंबर रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे, जिथे बुध आणि शुक्र आधीच उपस्थित असतील. अशा प्रकारे एका राशीत तीन ग्रह एकत्र येत��ल. सूर्य १६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी या राशीत प्रवेश करेल आणि १४ जानेवारीपर्यंत या राशीत राहील, त्यानंतर तो मकर राशीत प्रवेश करेल. सूर्य धनु राशीत प्रवेश करेल…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 02 September 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०२ सप्टेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
भारताच्या सौर मोहिमेतल्या आदित्य एल वन या उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी सत्तावन या प्रक्षेपकाद्वारे, आदित्य एल वन हा उपग्रह अवकाशात झेपावला.
पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये लँग्रेंज बिंदूवर हा उपग्रह स्थिर केला जाणार असून, या बिंदूपर्यंत पोहोचायला या उपग्रहाला सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आदित्य एल वन मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधले चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत, तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करतील.
****
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या आंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात काल पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज राज्यात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहेत.
मराठा क्रांती मोर्चानं आज जालना जिल्हा बंदची हाक दिली आहे. जालना शहरातल्या अंबड चौफुली आणि ��ंदनझिरा पोलीस टी पॉईंट इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून, या आंदोलनास पुन्हा हिंसक वळण लागलं आहे. मराठा आंदोलकांनी आक्रमक होत वाहनांवर दगडफेक सुरु केली असून, एका खाजगी ट्रकला जाळण्यात आलं आहे. पोलिस आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रू धाराच्या नळकांड्या फोडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद इथं निदर्शनं करण्यात आली. शहरात काही भागात बंदही पाळण्यात येत आहे. नागरीकांनी अफवांवर किंवा सामाजिक माध्यमांवरच्या चुकीच्या पोस्ट वर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन औरंगाबादचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी केलं आहे. जनतेनं शांतता राखावी, असं त्यांनी सांगितलं आहे.
उस्मानाबाद इथं या घटनेच्या निषेधार्थ शहर बंदच आवाहन करण्यात आलं आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठा तरुण एकत्र येऊन शहरवासीयांना दुचाकीवरून आवाहन करत असताना शहरातल्या नगरपालिका परिसरात काही दुकानांवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. यानंतर संपूर्ण शहरात कडेकोट बंद असून, जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आंदोलकांना कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये, अशी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाने उस्मानाबाद जिल्ह्यात संपूर्ण बस सेवा बंद केली आहे. आंदोलकांनी शांतता राखण्याचं आवाहन पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलं आहे.
नवी मुंबईत वाशी इथं देखील आज मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शनं करण्यात आली. वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चा आणि स्वराज्य पक्षाच्या वतीने एकत्र येऊन घोषणाबाजी करत लाठीहल्याचा निषेध केला.
सातारा जिल्ह्यातही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यात अनेक मार्गावरील बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
****
राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचं सावट आहे, त्यामुळे राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना निवेदन पाठवलं आहे. जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवायला लागली असून, पाऊस नसल्याने खरिपाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावे तसंच शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, असं भारती पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद इथं भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीनं जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्या��ी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांना निवेदन देण्यात आलं.
****
हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आज रोजगार मेळावा घेण्यात येत आहे. जिल्ह्यातले अनेक तरुण या मेळाव्यात सहभागी झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून स्किल इंडिया कार्यक्रमांतर्गत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
महानगरपालिकेच्या वतीनं दिव्यांगांना भाडेत���्वावर देण्यात आलेल्या औरंगाबाद शहरातल्या सिद्धार्थ उद्यानाजवळच्या गाळ्यांचं कोविड काळातलं भाडं माफ करण्यात आलं आहे. याबाबत या दिव्यांगांनी केलेल्या विनंतीवर मनपा प्रशासक तथा आयुक्त जी.श्रीकांत यांनी निर्णय घेऊन हे भाडं माफ केल्याची माहिती उप आयुक्त अर्पणा थेटे यांनी दिली.
****
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं आजपासून तीन दिवस नांदेड जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरीकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. श्रीलंकेत कँडी इथल्या पल्लेकेले क्रिकेट मैदानावर दुपारी तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
Photo
स्कॉटलंडमध्ये हुमा खुरेशी आणि लारा दत्ताचा पोस्ट कोरंटाईन सूर्याचा आनंद घेत दिसले अभिनेत्री हुमा खुरेशीने आणि अभिनेत्री लारा दत्ताचा पोस्ट कोरंटाईन सूर्याचा आनंद घेताना दिसले. #laradutta #humaqureshi #bellbottom http://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/huma-qureshi-and-lara-dutta-enjoy-post-quarantine-sun-in-scotland/?feed_id=8015&_unique_id=5f451ccc1f9a0
0 notes
Text
असा असेल तुमचा आजचा दिवस; राशिभविष्य १७ ऑगस्ट
असा असेल तुमचा आजचा दिवस; राशिभविष्य १७ ऑगस्ट
बुधवार, १७ ऑगस्ट २०२२. श्रावण कृष्ण षष्ठी. दक्षिणायन, वर्षा ऋतू. शुभकृतनाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०आज उत्तम दिवस आहे. सूर्याचा सिंह या स्वतःच्या राशीत प्रवेश. ‘गंड’ योग.चंद्र नक्षत्र – अश्विनी मेष:- व्यसने प्रलोभने टाळा. चुकीचे निर्णय होऊ शकतात. योग्य सल्ला घ्या. वृषभ:- विंचू काट्याचे भय आहे. आरोग्य…
View On WordPress
0 notes
Photo
विजयी अरुण - अचल स्वामी
लेखक : गणेश फुके
चित्रपटांसाठी साऊंड रेकॉर्डिंगचं काम करताना शूटिंगच्या निमित्तानं अनेकवेळा देशात परदेशात बरीच भटकंती होत असते. तरीही काही ठिकाणं राहून जातात. त्यातलंच एक ‘अरुणाचल प्रदेश’. नोव्हेंबर २०१९ मध्ये दिग्दर्शिका विनीता अनगळ यांचा फोन आला, ‘अरुणाचलमध्ये एक डॉक्युमेंट्री करायची आहे. साऊंडचं काम आहे.’ नेहमी जशा ध्वनिमुद्रणाच्या सुपार्या असतात तशीच हीही होती. वाटलं, असून असून काय असणार, एखादं गाव, गरीबी, आदिवासी. काही क्रिएटिव्हिटी नाही.. एखादी समस्या, प्रश्न आहे तसा रेकॉर्ड करायचा, असंच काहीसं वाटत होतं, फरक इतकाच कि, स्थळ ‘अरुणाचल प्रदेश’.
१ डिसेंबर २०१९ ला टीमसोबत निघालो. पुण्याहून आसाममधल्या दिब्रूगडला आम्ही विमानाने पोहोचलो. दिब्रूगड ते अरुणाचलमधलं रोइंग हा प्रवास रस्त्याने जीपमधून करायचा होता. साधारण पाच सहा तासांचा हा प्रवास अतिशय आल्हाददायक होता. स्वच्छ सूर्यप्रकाश, थंड हवा, रस्ताच्या दोन्हीबाजूला चहाचे मळे, डोंगररांगा बघूनच अरुणाचलच्या सौंदर्याची चाहूल लागत होती. रोइंगच्या जरा अलिकडेच आमची गाडी बंद पडली. अंधारून आलं होतं. थोड्याच वेळात दुसरी गाडी आम्हाला नेण्यासाठी आली. गाडीतून उतरून पंचावन्न - साठीचं एक व्यक्तिमत्व आमच्याकडे आलं आणि “नमस्कार, मी विजय स्वामी” म्हणत आपली ओळख करून दिली. त्यांच्याबरोबरच आम्ही रोइंगमध्ये रिवॉच (RIWATCH) ला पोहोचलो. खूप छान स्वागत, आदरातिथ्य झालं. ‘आठ दहा दिवस र��हायचं, ज्या कामासाठी आलोय तेव्हढं करायचं आणि निघायचं’ असा साधारण व्यावसायिक विचार होता. पण जसजसं शूटिंग होऊ लागलं तसं काहीतरी वेगळं असं जाणवू लागलं. हळू हळू रिवॉच आणि विजय स्वामींचा प्रवास उलगडू लागला.
कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रातून ‘जीवनव्रती’ म्हणजे ‘संपूर्ण जीवन स्वामी विवेकानंदांच्या विचाराने जगणे’ स्वीकारल्यानंतर विजयजींची पोस्टिंग १९८६ साली अरुणाचल प्रदेशला झाली. दळणवळणाची साधनं, दैनंदिन सुख-सुविधा यांचा प्रचंड अभाव अशी परिस्थिती असतानाही विजयजींनी अरुणाचलमध्ये राहायचं ठरवलं. पण तिथं काम करणं सोप नव्हतं. तिथलं राहणीमान, खानपान विजयजींना अजिबात मानवणारं नव्हतं. मुळात तिथला मुख्य आहार म्हणजे विविध प्रकारचा मांसाहार व भात, आणि विजयजी पूर्णतः शाकाहारी. संघर्षाला इथूनच सुरुवात झाली. कित्येक वेळा उकडलेले बटाटे खाऊन किंवा कधी उपाशीपोटी फक्त पाणी पिऊन त्यांनी दिवस काढले. त्याचबरोबर तिथली भाषा वेगळी, वातावरण वेगळं. आदिवासींचे पाडे बर्यापैकी अंतरावर होते. ऊन वारा पाऊस ह्यांच्याशी सामना करत पायी त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागायचं.
सुरूवातीला विवेकानंद केंद्राच्या शाळांमध्ये विजयजींनी शिक्षक म्हणून साक्षरतेसाठी काम केलं. नंतर एका स्कॉलरशिपवर ते अमेरिकेला ICCS (International Centre for Cultural Studies) संस्थेत अभ्यासासाठी गेले. परतल्यावर त्यांनी RIWATCH (Research Institute of World Ancient Traditions Cultures and Heritage) ही संस्था २००९ मध्ये रोइंग येथे स्थापन केली. अरुणाचलमध्ये आदिवासींच्या २५ ते ३० मुख्य आणि ७० ते ८० उपजमाती आहेत. सुरूवातीला रोइंगमधल्या प्रमुख ‘इदूमिश्मी’ या आदिवासींसाठी त्यांनी काम करायचं ठरवलं. आदिवासींच्या विकासासाठी उभारलेल्या रिवॉचला स्थानिक लोकांनी भरभरून साथ दिली. कोणी जमीन दिली, कोणी बांधकाम करून दिलं. कोणी गाडी दिली, कोणी गॅस शेगडी, सोलर उपकरणं दिली.
रिवॉचमधल्या कामात, संशोधनात स्थानिकांना सामील केलं जातं. इथल्या हुशार, लायक लोकांना परदेशातल्या मोठमोठ्या संस्थेत पाठवून तिथल्या लोकांशी ताळमेळ घालून इथं त्याचा उपयोग कसा होईल याचा नियोजनबद्ध विचार असतो. अशा प्रकारे तिथले पंधरा विद्यार्थी जगभरातल्या विविध ठिकाणी जावून आलेत. स्थानिक प्रशासनातल्या लोकांनाही ��िवॉचच्या संशोधनांत, कामांमध्ये बरोबर घेवून, त्यांनाही बाहेरच्या देशात नेवून ‘तिथले उपक्रम इथं कसे अंमलात आणता येतील’ या विचारांना चालना देण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून सरकारी स्तरावर राज्यात काही सुधारणा, पॉलिसी आणायच्या असतील तर त्याचा उपयोग होतो. शेतीची प्रगती, स��ंद्रिय शेती प्रशिक्षण वगैरे विकासात्मक शिबिरं रिवॉचमध्ये आयोजित केली जातात. आदिवासी तरुण डॉक्टर, इंजीनियर, आय.ए.एस. ऑफिसर असे उच्चशिक्षित व्हावेत, त्यांची प्रगती व्हावी, ते देशाच्या मुख्य प्रवाहात यावेत यासाठी विजयजी झटत असतात. रिवॉच आपल्यासाठी काम करतंय हा विश्वास निर्माण झाल्याने लोकही कामात रस घेतात. रिवॉचमधले ९० टक्क्यांपेक्षा जास्त कार्यकर्ते स्थानिकच आहेत.
अरुणाचलची ७५ टक्के सीमा चीन, तिबेट, भुतान, म्यानमार या देशांना आणि २५ टक्के आसामला चिकटून असूनही अरुणाचल आपलं अस्तित्व, वैशिष्ट्य आणि वारसा टिकवून आहे. तिथले लोक वनस्पती आणि प्राण्यांना आपले नातेवाईक मानतात. त्यांची प्राचीन संस्कृती, परंपरा, वारसा जपला जावा म्हणून विजयजींनी संग्रहालयाची कल्पना मांडली. ही कल्पना तिथल्या लोकांनीही उचलून धरली. आदिवासींनी पुरातन, पारंपारीक ठेवा, वारसा, चित्रं, दागिने, माळा, तलवारी, हत्यारं, इतर वस्तू असा लाखोंच्या किमतीचा खजिना विनामोबदला विजयजींच्या स्वाधीन केला. एक ऑडिओ विजुवल विभागही बनवला. ज्यात तिथल्या प्राचीन संस्कृतीविषयी, परंपरांविषयी माहिती जतन केली जाते. हिमालयन औषधी वनस्पतींचं ज्ञान सर्वांना व्हावं, ते टिकावं म्हणून विजयजींनी एक मोठ्ठं वनस्पती गार्डनही बनवलंय. इथं अॅंथ्रोपोलोजी, आर्किओलोजी इत्यादि अनेक कोर्सेस घेतले जातात. देशभरातून, जगभरातून लोक, विद्यार्थी इथं अभ्यासासाठी, संशोधनासाठी येतात. आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना एम.फील. आणि पी.एच.डी.साठी इथं मार्गदर्शन केलं जातं. विद्यार्थ्यांसाठी कॉटेजेस्, क्लासरूम्स, स्टुडिओजची सोयही रिवॉचमध्ये आहे.
‘जीवनव्रती’ असल्यानं रिवॉचचे डायरेक्टर असूनही विजयजींची स्वतःसाठीची अशी वेगळी खोली वगैरे नाहीये. ते कधी कधी ऑफिसमध्येही झोपतात. रिवॉचला एक रीसर्च इंस्टीट्यूट ते विद्यापीठ बनवण्याचं दायित्व विजयजींकडे आहे. संस्कृती आणि जीवनपद्धती यांची सांगड घालून २१ व्या शतकात आपल्याला कसं सुखकर जगता येईल यादृष्टीने विजयजींचं काम चालू आहे.
रिवॉच आणि विजय स्वा��ींचं आभाळाएव्हढं काम छोट्याशा कॅमेर्यात थोडंफार कोंबून आम्ही निघालो. पण परतीचा प्रवास फार सुखकर नव्हता. देशात CAA, CAB आणि NRC चा मुद्दा नुकताच सुरू झाला होता. अरुणाचलचा तसा संबंध नसला तरी आसाममध्ये जोरदार प्रतिक्रिया उमटली. आंदोलनाने हिंस्त्र वळण घेतलं होतं. आमचा विमानप्रवास अरुणाचलमधून व्हाया आसाम असा होता, पण आसामच्या दिब्रूगड विमानतळावर पोहोचणं अशक्य होतं. रस्तोरस्ती आंदोलनं चालू होती. विजयजींनी दिब्रूगडमधले त्यांचे एक सहकारी आणि शुभचिंतक श्री. संजय शर्माजी यांच्या सहाय्याने पुढचे ३ दिवस आमची सोय केली. तीन दिवसांनंतर कर्फ्यू जरा शिथिल झाला. तेंव्हा कसंबसं मुंबईचं विमान मिळालं आणि आम्ही पुण्याला सुखरूप पोहोचलो. प्रवासात राहून राहून वाटत होतं कि, आपणही समाजाचं काही देणं लागतो, निदान रिवॉचसारख्या संस्थांसाठी काहीतरी करायला हवं. माझ्या परीने रिवॉचच्या दृक-श्राव्य स्टुडिओसाठी सहकार्य करायचं मी ठरवलं आहे. अजूनही अरुणाचलच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ मनावरून उतरलेली नाही. ती कालांतराने उतरेलही कदाचित, पण उच्चशिक्षणानंतर सुखासुखी जीवन सोडून समाजकार्याचा विडा उचललेले विजय स्वामी, त्यांची तळमळ, त्यांचं काम, त्यांचे सहकारी, तिथले गरीब पण दिलदार आदिवासी यांचा कमी वेळात आयुष्यावर कोरला गेलेला प्रभाव कधीही कमी होणार नाही.
‘अरुणाचल’ म्हणजे अरुण – अचल अर्थात ‘उगवत्या सूर्याचा पर्वत’. विजयजींचा ‘जीवनव्रती’ कार्याचा अचल निश्चय असाच सूर्यासारखा कार्यरत राहो.
0 notes
Photo
सूर्याचा सुंदर क्लिक ❤️ #PopularKonkan https://www.instagram.com/p/B5cfmcLFt0S/?igshid=jp2rnvr7hrfq
0 notes