#सलमान खान तुरुंगात
Explore tagged Tumblr posts
vaibhavvaidya5233 · 2 years ago
Text
एखादा गुन्हा करणं आणि तो करून पळून जाणं हे गुन्हा करण्यापेक्षा वाईट गोष्ट आहे. मुळात गुन्हा करणं हिच चुकीची बाब आहे. मात्र लोकशाही स्वीकारलेल्या आपल्या देशात कायद्यांच्या कचाट्यातून पळून बिनधास्तपणे समाजात वावरणारे अनेक ठग आपण बघत असतो.
गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान हे नाव चर्चेत आले आहे, त्याने केलेल्या पराक्रमुळे आता त्याच्या वडिलांना म्हणजे शाहरुख खानला तोंड लपवण्याची वेळ आली आहे. ज्या दिवशी आर्यनला पकडले त्याच रात्री आपला सल्लू भाई शाहरुखला भेटायला गेला बहुदा कोणता वकील कर हे सांगण्यासाठी गेला असावा. दोघांच्या भेटीवरून अनेक चर्चांना उधाण आले सोशल मीडियावर जोक्स फिरू लागले होते.
याच ऑक्टोबर महिन्यातील ४ तारखेला एका कॉन्स्टेबलचे निधन झाले होते. रवींद्र पाटील असं त्यांचं नाव, हेच रवींद्र पाटील सल्लू भाईच्या ‘त्या’ केसचे एकमेव साक्षीदार, ज्यांनी अखेरपर्यंत आपली साक्ष बदलली नाही. नेमकी काय घटना आहे चला जाणून घेऊयात…
ती घटना २००२ सालातली सलमान खानला अंडरवर्ल्डमधून धमक्या येत होत्या म्हणून संरक्षणासाठी एका हेड कॉन्स्टेबलची नेमणूक करण्यात आली. ते कॉन्स्टेबल दुसरे तिसरे कोण नसून रवींद्र पाटील होते. मूळचे धुळ्याचे असलेले रवींद्र १९९८ पासून पोलीस सेवेमध्ये दाखल झाले होते.
२८ सप्टेंबरची ती काळी रात्र, त्या रात्री सलमान आपल्या एका मित्रासोबत लँड क्रुझर गाडीने वांद्रे परिसरातील एका बारमध्ये गेला. त्यांच्यासोबत रवींद्र पाटील देखील होते मात्र त्यांना बारच्या बाहेर थांबायला सांगितले. तिथून बाहेर पडून ते तिघे दुसऱ्या बारमध्ये गेले, गाडी सलमानच चालवत होता. रात्री २च्या सुमारास ते दोघे बाहेर पडले.
सलमान मद्यधुंद होता तरीदेखील त्याने पुन्हा गाडी चालवली, रवींद्र पाटील यांनी त्याला गाडी न चालवण्याचा सल्ला दिला, मात्र नशेत असलेल्या सलमानने त्याला नकार दिला. सलमानने इतकी दारू प्यायली होती की त्याला रस्त्यावरचे वळण दिसले नाही आणि भरधाव वेगात असलेली गाडी थेट एका बेकरीत घुसली, त्याच बेकरीच्या फुटपाथवर ��सलेल्या काही मजुरांच्या अंगावरून ती गाडी गेली ज्यात एकाच मृत्यू झाला तर बाकीचे जखमी झाले.
सलमान आणि त्याच्या मित्राने शिताफीने तिथून पळ काढला, मात्र कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले रवींद्र मात्र तिथेच उपस्थित होते. त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सलमान विरोधात FIR दाखल केली आणि घडलेल्या प्रकाराची रितसर माहिती दिली.
कोर्टाने त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले तसेच नोकरीवर गैरहजर राहिल्याने त्यांना नोकरीवरून काढण्यात आले. पोलिसांचा ससेमिरा त्यांचा पाठी होताच त्यातच ते गायब झाले. त्याच्या कुटुंबावर देखील दबाव टाकण्यात आला होता, अखेर पोलिसांनी त्यांना महाबळेश्वर येथे पकडून तुरुंगात टाकले. तुरुंगात त्यांचे हाल केले गेले असं त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
तुरुंगातून बाहेर आल्यावर ते भीक मागताना देखील आढळून आले होते. एकाकी पडलेल्या रवींद्र पाटीलांनी शेवटी दारूचा आधार घेतला, नंतर ते दारूच्या इतक्या अधिन झाले की त्यांना टीबी झाला आणि ते शिवडीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि तिकडचे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एकूणच सलमानच्या या केसमध्ये अनेक तर्कवितर्क लावले गेले, एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात ही केस फिरत राहिली जी आजतगायत फिरते आहे. ‘सलमान आपल्या ट्रस्टमधून गरिबांची मदत करतो,ऑपरेशन करतो’, असे युक्तिवाद सलमानबद्दल सहानभूती मिळावी म्हणून वकिलाने केले.
ज्या खात्यात रवींद्र पाटील होते तिकडच्या लोकांनी देखील रवींद्र पाटीलांना मदत केली नाही उलट त्यांनी साक्ष फिरवावी यासाठी दबाव टाकण्यात येत होता प्रसंगी लाच सुद्धा ऑफर केली होती, मात्र शेवटच्या श्वासापर्यंत रवींद्र पाटील ठाम होते.
0 notes
loksutra · 3 years ago
Text
सलमान खानवर पुन्हा कायदेशीर कारवाई करण्यात आली, ५ एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले
सलमान खानवर पुन्हा कायदेशीर कारवाई करण्यात आली, ५ एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले
सलमान खानला न्यायालयाकडून समन्स बॉलीवूड च्या ‘Bhaijaan’ म्हणजे सलमान खान पुन्हा एकदा कायदेशीर त्रास पकडले आहे. एक नवीन प्रकरणात अभिनेता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक, सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षक एक टीव्ही पत्रकार त्रास आरोप त्यांच्यावर आहे. अभिनेता वर्षी 2019 मध्ये एक टीव्ही पत्रकार एक मारामारी येत आरोप आहे. बातम्या एजन्सी नुसार NNI, अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने प्रकरणात सलमान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 5 April 2018 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ५ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि. ****
जास्तीत जास्त महिलांना रोजगार मिळाला तर कुटुंबाच्या उत्पन्नात तसंच सकल देशांतर्गत उत्पन्नात वाढ होईल, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज फिक्की महिला संघटनेच्या ३४ व्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते. सरकारनं महिलांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. **** भारतीय रिझर्व्ह बँकेनं २०१८-१९ या आर्थिक वर्षाचं पहिलं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं असून, यात प्रमुख व्याजदरात कोणताही बदल केला नाही. किरकोळ स्थायी सुविधा ��र आणि रेपो दर सहा पूर्णांक २५ टक्के इतका कायम ठ���वला आहे. याच संदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक धोरण विषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या समितीची पुढची बैठक येत्या पाच आणि सहा जून रोजी होणार आहे. **** काळवीट शिकार प्रकरणी जोधपूरच्या न्यायालयानं अभिनेता सलमान खान याला पाच वर्षे तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून, त्याला जोधपूरच्या तुरुंगात पाठवण्यात आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. याप्रकरणी अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांची न्यायालयानं निर्दोष सुटका केली आहे. १९९८ साली दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी सलमानला दोषी ठरवण्यात आलं आहे. **** राज्यातल्या आरोग्य केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण सुविधा पुरवण्याबाबत फिलिप्स कंपनीनं तयारी दर्शवली असून, या प्रस्तावावर अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. फिलिप्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॅनियल मेझॉन यांनी आज मुंबई इथं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. **** औरंगाबाद इथं अल्पसंख्याक कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्यास केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मुंबई इथं अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. **** पायाभूत सोयी सुविधांच्या उभारणीत महाराष्ट्र देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागानं ३१ मार्च २०१८ पर्यंतच्या देशभरातल्या पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पांची माहिती जाहीर केली, त्यात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचं म्हटलं आहे. गेल्या चार वर्षांमध्ये महाराष्ट्रात पायाभूत सोयी सुविधा क्षेत्रातल्या एक लाख ४३ हजार ७३६ कोटी रुपयांच्या २८४ प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याचं आर्थिक व्यवहार विभागानं म्हटलं आहे. **** परभणी जिल्ह्यातले हुतात्मा जवान शुभम मुस्तापुरे यांच्या पार्थिवावर आज पालम तालुक्यात कोनेरवाडी या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराच्या वतीनं बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. पा��ी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यावेळी उपस्थित होते. परवा जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात मुस्तापुरे यांना वीरमरण आलं. **** कोणत्याही राज्याला एखाद्या धर्माला मान्यता देण्याचा अधिकार नसून, कर्नाटक राज्यानं लिंगायत धर्माची शिफारस केंद्र सरकारला केली असल्याची माहिती शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. येत्या आठ एप्रिलला औरंगाबाद इथं होणाऱ्या लिंगायत धर्माच्या मोर्चाला शिवा संघटनेचा विरोध असून, वीरशैव आणि लिंगायत अशी समाजात फूट पाडण्याचा राजकीय हेतू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. **** जालना जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भोकरदन, जाफराबाद आणि परतूर तालुक्यातल्या ३५ गावांसह दोन वाड्यांमध्ये ४४ टँकरनं पाणीपुरवठा सुरू असून, ९७ विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. **** जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातल्या तळेगाव इथल्या सरस्वती विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या ४८ विद्यार्थिनींना आज मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकलींचं वाटप करण्यात आलं. सायकलींमुळे विद्यार्थींनींची पायपीट थांबेल, असं सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष कैलास गव्हाड यांनी यावेळी सांगितलं. **** राज्यात आज सर्वात जास्त ४३ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. परभणी आणि नांदेड इथं सरासरी ४१, उस्मानाबाद ४०, तर औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढचे दोन दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ****
0 notes