#सकाळपासून उपाशी आहे
Explore tagged Tumblr posts
nagarchaufer · 1 year ago
Text
सकाळपासून उपाशी आहे एक बासरी तरी कुणीतरी ?, व्हिडिओत अश्रू अनावर
ऑनलाइन शॉपिंगच्या नादात रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या व्यक्तींकडे अनेकदा दुर्लक्ष केले जात असून एकेकाळी स्वदेशी खेळणी म्हणून ओळख असलेल्या वस्तूंना आता तितकेसे मार्केट राहिलेले नाही . अशा वस्तू विकणाऱ्या व्यक्तींचे हाल भयावह झालेले असून असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. लिव्ह फॉर फूड नावाच्या एका इंस्टाग्राम अकाउंटवरून एका बासरी विक्रेत्याची व्यथा शेअर करण्यात आलेली असून या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
esprite-prash · 7 years ago
Text
ईवलीची डायरी...
१५ जून २०१७ ...
सकाळपासून माझी आणि आईची गडबड चालू होती. आजपासून शाळा चालू झाली ना!!!बाप रे! परत सगळं चालू.. शाळा, क्लास, स्पोर्ट्स, होमवर्क, दंगामस्ती पण ते सगळं Schedule मध्ये हा. कामवाल्या काकू पण आल्या त्यांच्या चिंगी ला घेऊन. तिचा नाव खर तर सावित्री.पण आम्ही तिली चिंगी म्हणतो. मी विचारलं “साऊ, येणार का आमच्या शाळेत ??” तशा काकू म्हणाल्या “ ताई, उगाच नका त्या शाळेचं नाव काढू. माझ्यामागं कटकट करेल ती पोर”. चार वर्षांची आमची चिंगी शाळेत कधी जाणारं?? आम्हाला शाळेत शिकवलं कि सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिकवायला चालू केलं. पण आमची साऊ नाही शिकणार ...बाकी सगळ ठीक आहे ...(बाबा म्हणतो असं सारखं)...
१२ ऑगस्ट २०१७ ...
saturday.. saturday... आज सकाळची शाळा आणि डब्यात surprise खाऊ!! माझा बेंच पार्टनर आहे ना राहुल, त्याने ना मस्त फोडणीचा भात आणला होता डब्यात. कित्ती छान होता तो...पण तो ना डबाच share करायचा नाही माझ्याशी. आधी तर पळूनच जायचा डब्याच्या सुट्टीत डबा घेऊन. मागच्या आठवड्यात तर डब्याची पिशवी पण नव्हती. तो दिवसभर उपाशी राहिला नसेल ना?? मला आईने संध्याकाळी नाश्ता उशिरा दिला तर मला कसतरी होते. मग तो कसा उपाशी राहिला असेल दिवसभर... मी सोमवार पासून माझा डबा देणार त्याला... आईला सांगणार थोडा जास्त डबा दे म्हणून... आता उद्या sunday funday .. आणि बाकी सगळ ठीक आहे....
१४ ऑक्टोबर २०१७
yeee... परीक्षा संपली!!! आणि आता दिवाळी ची सुट्टी आणि मी आजोळी... मला खूप आवडतं आजीकडे... आजी खूप लाड करते माझे आणि तिथे माझी एक मैत्रिण आहे, रुपाली ताई. ती आजीच्या शेजारी राहते, मला खूप गोष्टी सांगते, माहिती देते झाडांची,फुलांची, आणि तार्यांची पण...  तिला भेटायला गेलेले मी आज ,तिने सांगितलेलं मला पुढच्या वेळी मी आले की कोणाच्या  शाळेत teacher होणार?? दादाच्या कि माझ्या ??? पण तिथे गेले आणि ती एका बाळाबरोबर खेळत होती... मी गेले तर म्हणाली “ बघा, बाळाची छोटी छोटी मावशी आली” म्हणजे मागच्या दिवाळीत आले नव्हते तेव्हा तिचा लग्न झालं. आणि तिला बाळ पण झालं...मग आता ती teacher होऊन मला शिकवणार होती त्याचं की होणार??? बाकी ते बाळ cute आहे आणि ताई पण happy दिसत होती ... (may be)....
४ नोव्हेंबर २०१७
आज बा��ाच्या ऑफिस मध्ये award ceremony होते. बाबा Employee of the Year आहे ना... त्याने मग आम्हाला dinner ला नेलं. नाही नाही, आधी mall मध्ये गेलो.तिथे शोप्पिंग केलं. पण ते दोघेचं बोलत होते. मी आणि दादा आम्हाला दिसेल ते आणि आवडेल ते उचलत होतो..games,books,कपडे, खूप खूप काही आणि... आणि जेवताना पण दोघेचं बोलत होते..असच करतात ते नेहमी...आता बाहेर होतो ना जेवायला तिथे “भाज्या आहेत का? किराणा आहे का?” हे बोलत होते... आणि मग घरी आल्यावर कळलं कि बाबा परत tour वर निघाला होता. मला सोडून... तो parents meet ला येणार होता... त्याला त्याच्या कंपनीचा १० वर्षापूर्वीचा turn over लक्षात होता. पण माझी सोमवारची meet विसरला तो...बाबा घरी नाही मग त्या sundayच काय करायचं ???
१३ नोव्हेंबर २०१७...
आई तू का असा एकदम बाहेर जातेस अचानक आणि शेजारी का ठेवतेस चावी.??? तो दादा असतो एकटा त्या घरात आणि काकू दुकानात असतात ना...क्लास वरून मी घरी येते तेव्हा... मला नाही आवडत तो दादा. आधी छान वागायचा तो. मला chocolates द्यायचा. माझ्याशी आणि दादाशी छान खेळायचा. आता माझा दादा नाही खेळत त्याच्याशी  मग मी पण खेळत नाही त्याच्याशी... तो आज आलेला घरी आणि त्यांना मला त्याच्या जवळ पकडून ठेवलं घट्ट...पण ते तू पकडतेस, किंवा बाबा जवळ घेतो तसं नव्हतं...ते मला नाही आवडलं... माझा श्वास गुदमरत होता तेव्हा...मी सांगणारे त्या दादाच नाव आईला.. पण आई, तू विश्वास ठेवशील ना माझ्य���वर. तो दादा वाईट आहे.. मला भीती वाटतीये खूप....
(थोडं खरं, थोडं काल्पनिक... पण या प्रसंगांचे जुळतात न धागेदोरे खऱ्या आयुष्यात... मुलं निरागस,बोलकी, आणि संवेदनशील असतात खूप...त्यांना आपल्या वागण्यातला बदल, आपला दुटप्पी पणा कळतो आणि हे सगळं त्यांच्या विश्वाबाहेरच असतं...
चला तर मग, या बालदिनाच्या पूर्वसंध्येला एक गोष्ट ठरवूया... थोडा वेळ, थोडा मोकळेपणा हवाय.. त्यांना आणि तुम्हाला, दोघांनाही... मित्र व्हा एकमेकांचे.. मग खरच सगळं काही खूप भारी असेल.....)
#Team_PraSh.....
2 notes · View notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
आझाद मैदानावरील जगाचा पोशिंदा सकाळपासून उपाशी
आझाद मैदानावरील जगाचा पोशिंदा सकाळपासून उपाशी
विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी काढलेला ‘उलगुलान मोर्चा’ मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला आहे. आंदोलकांचा आझाद मैदानात ठिय्या सुरु आहे. मात्र आंदोलक सकाळपासून उपाशी आहेत. आंदोलनस्थळी जेवणाची व्यवस्था केलेली नाही. तर काहींनी मागण्या मान्य होईपर्यंत जेवण न करण्याचा निश्चय केला आहे.
दरम्यान आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या प्रतिभा शिंदे यांच्यासह 18 जणांचं शिष्टमंडळ दुपारी राज्याचे मुख्यमंत्री…
View On WordPress
0 notes