#संदर्भासह
Explore tagged Tumblr posts
Text
संभाजी महाराजांची बदनामी करण्याची सुपारी नाटककार, चित्रपटकारांनी घेतली, इतिहासकारांनी संदर्भासह स्पष्टीकरण केलं…
संभाजी महाराजांची बदनामी करण्याची सुपारी नाटककार, चित्रपटकारांनी घेतली, इतिहासकारांनी संदर्भासह स्पष्टीकरण केलं…
संभाजी महाराजांची बदनामी करण्याची सुपारी नाटककार, चित्रपटकारांनी घेतली, इतिहासकारांनी संदर्भासह स्पष्टीकरण केलं… कोल्हापूरः मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले. आणि त्यामुळे आता त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य वरून राज्यात पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना त्यांनी…
View On WordPress
#आजच्या प्रमुख घडामोडी#इतिहासकारांनी#करण्याची#केलं#घेतली#चित्रपटकारांनी#नाटककार#बदनामी;#बात��ी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#महाराजांची#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शासन#संदर्भासह#संभाजी#सरकार#सुपारी#स्पष्टीकरण
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 March 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मार्च २०२३ दुपारी १.०० वा.
****
देशात परवडणारे उपचार उपलब्ध करुन देणं, हे सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन, या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला ते आज संबोधित करत होते. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या जास्तीत जास्त वापरावर भर दिला जात असल्याचं ते म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालयांजवळ १५७ नवीन नर्सिंग महाविद्यालयं सुरू करणं, हे वैद्यकीय मानव संसाधनासाठी एक मोठं पाऊल असून, भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात नर्सिंग क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. पुरवठा साखळी ही एक अतिशय महत्त्वाची बाब असल्याचं साथीच्या रोगाने शिकवलं असून, आरोग्य क्षेत्रात भारताचं परदेशावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्य क्षेत्रातल्या विशेषत: आयुर्वेदातल्या संशोधनाला बळकटी देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
***
नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पहिली ‘नौदल कमांडर्स परिषद २०२३’ आजपासून सुरु होत आहे. कमांडर्स परिषदेचा पहिला टप्पा प्रथमच प्रत्यक्ष समुद्रात म्हणजेच, विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर आयोजित करण्यात आला असून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
***
बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानावर केंद्रीय अन्वेषण ब्युरो - सीबीआयने आज छापे घातले. जमिनीच्या बदल्यात नोकरी या प्रकरणात सीबीआयने गेल्या महिन्याच्या २७ तारखेला माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव, राबडीदेवी तसंच त्यांच्या कन्या मिसाभारती यांच्यासह १३ जणांना समन्स बजावलं होतं, त्याच संदर्भात आज सीबीआय राबडीदेवींकडे चौकशी करत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
***
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि.वि.करमरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. क्रीडा जगताला वृत्तपत्रात हक्काचे स्थान देणारा, क्रीडा क्षेत्रातील इंग्रजी शब्दांना सोपे आणि लक्षवेधी असे मराठी प्रतिशब्द मिळवून देणारा क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
करमरकर यांचं आज मुंबईत निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते.
***
राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसंच धुलिवंदनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. परस्पर प्रेम, स्नेह आणि बंधुभावाचं प्रतिक असलेल�� रंगांचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो आणि देशबांधवांमध्ये असलेली नात्यांची वीण अधिक घट्ट करो, अशा शुभेच्छा राज्यपालांनी दिल्या आहेत. होळी आणि रंगोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचं आवाहन, त्यांनी आपल्या संदेशात केलं आहे.
***
डायलिसिस सेवा तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न करणार असल्याचं, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. काल जागतिक मूत्रपिंड दिनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनग��� इथं, मूत्रपिंड प्रत्यारोपित रुग्ण आणि दाते यांच्यासाठी आयोजित फिटनेस शिबीरात ते बोलत होते. मराठवाडा तसंच महाराष्ट्रातून आलेले रुग्ण आणि दात्यांनी या वार्षिकोत्सवात सहभागी होऊन अनुभवाच्या देवाण घेवाणीतून एकमेकांना दिलासा दिला. किडनी विकाराबरोबर जगताना आरोग्य कसं राखायचं यासंदर्भात विविध तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
***
पुण्यातल्या इंडियन लॉ सोसायटीचा एकशे एकावा वर्धापन दिन सोहळा काल पार पडला. या निमित्तानं आयोजित स्मृती व्याख्यानमालेत सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती अभय ओक यांनी ‘भारतातील न्यायिक सेवा, विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 आणि वैकल्पिक वाद निवारणाच्या विशेष संदर्भासह’ या विषयावर व्याख्यान दिलं. न्यायमूर्ती ओक यांनी विधी सेवा प्राधिकरण अधिनियमाचा इतिहास आणि महत्त्व, सर्वोच्च न्यायालयाची न्यायिक मदत समिती, उच्च न्यायालयांच्या न्यायिक मदत समित्या इत्यादी विषयी माहिती देत न्यायिक सेवा सामान्य नागरिकांसाठी कशा उपयुक्त ठरू शकतात याचे अनेक दाखले दिले.
***
छत्रपती संभाजीनगर आणि परिसरात आज सकाळी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात वाळूज, चापानेर परिसरातही आज पाऊस झाला. यामुळे गहू, कांदा, हरबरा पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे; काही ठिकाणी विजांसह गारपिटीचाही अंदाज आहे. याच काळात विदर्भ आणि कोकणातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
***
निकोबार बेटांवर आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता पाच नोंदवली गेली. भूकंपामुळे किती प्रमा��ात नुकसान झाले आहे, याची माहिती अद्याप मिळाली नाही.
//**********//
0 notes