#शुभप्रसंगी
Explore tagged Tumblr posts
Photo
#latepost जगदंब टीमने नवीन प्रवासाचा #शुभारंभ करत आणखी एक #कार्यालय आपणा सर्वांच्या सेवेसाठी सुसज्ज केले आहे. या #शुभप्रसंगी आम्हाला अनेक मार्गदर्शक मान्यवरांची, पाठीशी उभ्या राहणाऱ्या मित्रांची, सहकाऱ्यांची आणि शुभचिंतकांची साथ लाभली. तुमच्या आजवरच्या प्रेमामुळेच हे सारं शक्य झालं आहे. आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देत उपस्थिती दर्शवली तसेच सदिच्छांचा वर्षाव करत आम्हाला जोमाने सेवा करण्याची ऊर्जा दिलीत त्याबद्दल आपणा सर्वांचे शतश: आभार, या पुढे ही असच सहकार्य आणि प्रेम राहावे हीच जगदंबे चरणी प्रार्थना!! #jagdamb #teamjagdamb #newofficeofjagdamb #onemoreoffice #newbranch #vyasaywala (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/Cm9DUczKQ17/?igshid=NGJjMDIxMWI=
#latepost#शुभारंभ#कार्यालय#शुभप्रसंगी#jagdamb#teamjagdamb#newofficeofjagdamb#onemoreoffice#newbranch#vyasaywala
0 notes
Text
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे "राष्ट्रीय आयुर्वेद दिवस" उत्साहात
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे “राष्ट्रीय आयुर्वेद दिवस” उत्साहात
नाशिक : प्रतिनिधी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल , निमा न्यू नासिक आणि एफ पी ए नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी पूजन, तसेच राष्ट्रीय आयुर्वेद दिवस ,अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या शुभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख , न्यूरोसर्जन डॉ शेखर चिरमाडे ,सेंटर हेड समीर…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 September 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २६ सप्टेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभप्रसंगी सर्वांचं जीवन ऊर्जा आणि आनंदानं भरावं असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही, शारदीय नवरात्रोत्सवाकडून राज्याचा सर्वांगीण विकास, समृद्धीकरिता व्रतस्थ राहण्याची प्रेरणा घेऊ या अशा शब्दांत नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
***
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथंही कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. मध्यरात्री एक वाजता देवी तुळजाभवानी मंचकी ��िद्रा संपवून आपल्या गर्भ घरात दाखल झाल्या. यावेळी मूर्तीला पंचामृताचा महाभिषेक करण्यात आला. पहाटे चार वाजता मंदिर संस्थांचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यातील भाविक मोठ्या संख्येनं तुळजापुरात दाखल झाले आहोत.
***
शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आजपासून राज्याच्या आरोग्य विभागामार्फत माता सुरक्षित तर घर सुरक्षित विशेष अभियान राबवण्यात येत आहे. घरातील माता निरोगी राहावी, जागरूक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी या उद्देशानं हे अभियान राबवण्यात येत आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात राज्यातील सर्व माता, भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्य तपासणी करून घ्यावी अस आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. या अभियानातर्गंत प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत १८ वर्ष वयावरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या केल्या जाणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचं नवीन बँक खातं उघडणं, गरोदर मातांचं आधारकार्ड जोडणं यांचा यात समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे.
***
औरंगाबाद शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या वर्षी १५ ऑगस्टला विश्व विक्रमी एक लाख १८ हजार वृक्ष लावण्याचा संकल्प पूर्ण झाल्यानिमित्त औरंगाबाद शहरातील या उपक्रमात सहभागी विविध पर्यावरण प्रेमी संस्था, नागरिकांना केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्या हस्ते औरंगाबाद इथं वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक संस्थेचं प्रमाणपत्र आज प्रदान करण्यात आलं. एका शहराला वृक्ष लागवडीच्या विक्रमाबद्दल पहिल्यांदाच गौरवण्यात येत असल्याचं वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक संस्थेचे अध्यक्ष पवन सोळंकी यांनी यावेळी सांगितलं.
***
९६ वावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या फेब्रुवारी महिन्यात वर्धा इथं होणार आहे. आयोजनाबाबत काल झालेल्या बैठकीत संमेलनाची पूर्वतयारी आणि आगामी आयोजनाबाबत माहिती देण्यात आली. तसंच या सभेत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आयोजनाबाबत सूचनावजा प्रस्ताव मांडले. वर्धा इथं तब्बल ५३ वर्षांनंतर हे संमेलन होणार आहे
***
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१�� कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ११ लाख ६७ हजारांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१७ कोटी ६८ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.
देशात काल नव्या चार हजार कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर पाच हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४३ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
***
औरंगाबाद शहराचं ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा इथं तुळजा भवानी देवीच्या मंदिरात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते घटस्थापना आणि महापूजा करण्यात आली. कर्णपुरा मंदिर विद्युत रोषणाई, हार, फुलं पताक्यांनी सजवण्यात आलं आहे.मंदिर परिसरात नऊ दिवसात जागरण गोंधळ तसंच विविध कार्यक्रम होणार आहे.
***
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर इथल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सकाळी साडेआठ वाजता मानाच्या तोफेची सलामी झाल्यानंतर घटस्थापना करण्यात आली. आज पहाटेपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नवरात्रोत्सावाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथल्या श्री विट्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराला देखील फुलांची आरास करण्यात आली आहे.
***
नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या शंभर झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ८७० पशुधनाचं लसीकरण करण्यात आलं. लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड आदी कारणांमुळं होण्याचा संभव असून याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
***
0 notes
Photo
आषाढी एकादशीच्या तुम्हाला खुप शुभेच्छा..!! पांडुरंगाच्या कृपेने आणि आशिर्वांदाने तुमचं आयुष्य सुखाच, समाधानाच ,समृध्दीच जावो हिच आजच्या शुभप्रसंगी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना| (at Navi Mumbai (New Mumbai), India)
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २६ सप्टेंबर २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
संक्षिप्त बातमीपत्र
२६ सप्टेंबर २०२२ सकाळी ११.०० वाजता
****
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे.यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.या शुभप्रसंगी सर्वांचं जिवन ऊर्जा आणि आनंदानं भरावं असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
***
९६ वावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या फेब्रुवारी महिन्यात वर्धा इथं होणार आहे. आयोजनाबाबत झालेल्या बैठकीत संमेलनाची पूर्वतयारी आणि आगामी आयोजनाबाबत माहिती देण्यात आली.५३ वर्षांनंतर वर्धा इथं हे संमेलन होणार आहे.
***
औरंगाबाद शहरातील नऊ हजार फेरीवाल्यांना प्रत्येकी १० हजार रुपये स्वनिधी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली. ते काल औरंगाबाद इथं आढावा बैठकीत बोलत होते. ही योजना अनेक लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी यासंबंधी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले.
***
औरंगाबाद शहराचं ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा इथं तुळजा भवानी देवीच्या मंदिरात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते घटस्थापना आणि महापूजा करण्यात आली.मंदिर परिसरात नऊ दिवसात जागरण गोंधळ तसंच विविध कार्यक्रम होणार आहे.
***
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर इथल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सकाळी साडेआठ वाजता मानाच्या तोफेची सलामी झाल्यानंतर घटस्थापना करण्यात आली.आज पहाटेपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
घटस्थापनेनिमित्त सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शासकीय सुटी जाहीर केली आहे.
***
जनावरांमध्ये होत असलेल्या लंपी आजारामुळं नांदेड जिल्ह्यात ८७ पशुधन बाधित झाले आहेत. आता पर्यंत ८४ हजार ९६८ पशुधनाचं लम्पी लसीकरण पूर्ण झाले आहे.
***
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना जिंकत भारतानं २-१ च्या फरकानं मालिका जिंकली आहे.
***
0 notes