#शिवसेनेचा
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 11 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणामध्ये आज बलिप्रतिपदा अर्थात विक्रम संवत्सराचा पाडवा साजरा होतो आहे. पती-पत्नीच्या नात्यात दिवाळीच्या पाडव्याचं विशेष महत्त्व असून व्यापारी वर्गाच्या नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातही आजपासून होते. कृषीवलांच्या संस्कृतीमध्येही बळीराजाची आगळी महती आहे. गावागावांमध्ये सुरू असणाऱ्या काकड आरतीमध्ये आज अन्नकुट अर्थात गोवर्धन पूजेची परंपरा जपली जाते.
दिवाळी आणि छटपूजा सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं आज आणि उद्या म्हणजे २ आणि ३ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत दोन्ही दिवस मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल या स्थानकांवरून गोरखपूर, दानापूर, छपरा, काझीपेठ या ठिकाणांसाठी प्रत्येकी ५ गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्याचबरोबर हडपसर-हिसार-हडपसर दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी सोडण्याचा निर्णयही मध्य रेल्वेनं घेतला आहे. ४ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान ही गाडी सोडण्यात येणार आहे.
प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय युवा पुरस्कार २०२२-२३ साठी अर्ज करण्याचं आवाहन केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी युवकांना केलं आहे. १५ ते २९ वर्ष वयोगटातल्या व्यक्ती तथा संस्था-संघटनांना विकास आणि समाज सेवेच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य तथा योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात. या क्षेत्रांमध्ये मानवाधिकाराला प्रोत्साहन देण्यासठी केलेलं कार्य तसंच सामुहिक सेवांचा समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या पोर्टलवर येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. वैयक्तिक समाजसेवेसाठी १ लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र तर संस्था संघटनांना ३ लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
भारत-अमेरिका संयुक्त विशेष सैन्य दलाच्या वज्र प्रहार सरावाच्या पंधराव्या आवृत्तीसाठी भारतीय सैन्य दल आज अमेरिकेला रवाना झालं. हा सराव २ ते २२ नोव्हेंबर दरम्यान अमेरिकेतील इदाहो मधील ऑर्चर्ड कॉम्बॅट ट्रेनिंग सेंटर इथे आयोजित केला जाणार आहे. भारतीय आणि अमेरिकेच्या सैन्यादरम्यानचा हा या वर्षातील दुसरा सराव असेल. परस्पर सहकार्याने केलं जाणारं कार्य, संयुक्तता आणि विशेष मोहिमांच्या रणनीतींची परस्पर देवाणघेवाण वाढवून भारत आणि अमेरिका यांच्यातील लष्करी सहकार्याला चालना देणं हे वज्र प्रहार या सरावाचं उद्दिष्ट आहे. या सरावामुळे वाळवंटी आणि अर्ध वाळवंटी वातावरणात संयुक्त विशेष दलाची मोहीम राबवण्याची एकत्रित क्षमता वाढेल. उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती, संयुक्त नियोजन आणि संयुक्त रणनीतिक अभ्यास यावर या सरावात भर दिला जाईल. संयुक्त सरावात भाग घेणाऱ्या दोन्ही देशांच्या तुकड्यांमध्ये प्रत्येकी ४५ जवान असतील.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे येत्या मंगळवारपासून म्हणजे ५ नोव्हेंबरपासून आपल्या प्रचार दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. पहिल्या दिवशी ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील. पहिल्या टप्प्यात ८ विधानसभा मतदारसंघांचा दौरा उद्धव ठाकरे करणार आहेत. ५ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता ते रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघांसाठी प्रचार करतील. दुसऱ्या दिवशी ६ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता भिवंडी ग्रामीण विधानसभा, सायंकाळी ७ वाजता वांद्रे-कुर्ला संकुल मैदानात महाविकास आघाडीची सभा, ७ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता दर्यापूर विधानसभा, सायंकाळी ५ वाजता बडनेरा विधानसभा, ८ नोव्हेंबर दुपारी ३ वाजता बुलढाणा विधानसभा, सायंकाळी ५ वाजता मेहकर विधानसभा, सायंकाळी ७ वाजता परतूर विधानसभा असा उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचाराचा प्रारंभ येत्या बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुंबईत बीकेसी मैदानावर ६ नोव्हेंबरला महाविकास आघाडीची सभा होणार असून या सभेला लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
विधानसभा निवडणूकमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढू लागले आहेत.मुंबईतील प्रतिष्ठेचा बनलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आम्हाला विश्वासात न घेता आपल्या मुलाला उमेदवारी दिली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचा आमदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी आपण माघार घेणार नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे.
0 notes
nagarchaufer · 1 month ago
Text
पाकिस्तानचे झेंडे तुम्ही तुमच्या मोर्चात नाचवले अन.. , काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?  
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केलेला असून ,’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी शिवसेनेचा भगवा रंग यांनी पार बदलला आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एमआयएम मध्ये काहीच फरक राहिला नाही ,’ असे म्हटलेले आहे.  एकनाथ शिंदे म्हणाले की ,’ पाकिस्तानचे झेंडे तुम्ही तुमच्या मोर्चात नाचवले. बॉम्बस्फोटातील आरोपी…
0 notes
automaticthinghoagiezine · 9 months ago
Video
मोदींच्या नावाने निवडून आल्यावर शिवसेनेचा शिमगा..
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
ड्रग्जविराेधात नाशिकमध्ये शिवसेनेचा 'आक्राेश'
https://bharatlive.news/?p=173447 ड्रग्जविराेधात नाशिकमध्ये शिवसेनेचा 'आक्राेश'
नाशिक : पुढारी ...
0 notes
nbi22news · 2 years ago
Video
youtube
#nbinewsmarathi: प्रवास आपल्या शिवसेनेचा । भाग १
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
संजय राऊत माघारी फिरताच शिवसेनेला नाशिकमध्ये खिंडार
संजय राऊत माघारी फिरताच शिवसेनेला नाशिकमध्ये खिंडार
ठाकरे गटाचं डॅमेज कंट्रोल करण्यात संजय राऊत अपयशी नाशिक : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. तब्बल 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, नाशिक दौऱ्यावर आलेले संजय राऊत मुंबईला माघारी फिरताच ठाकरे गटातील मा��ी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
हळवल फाट्यावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा!
हळवल फाट्यावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा!
८ दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलन करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा प्रांताधिकार्‍यांना इशारा कणकवली : कणकवली तालुक्यातील हळवल फाटयानजिक अपघातांची मालिका सुरु असून कित्येकांना प्राण गमवावे लागले. सदरचे वळण धोकादायक असून बहुतांश अपघात रात्रीच्या वेळी झालेले आहेत. त्यासाठी खालील उपाय होणे आवश्यक आहे. अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली प्रांताधिकाऱ्यांकडे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' त्या ' विकृत प्राध्यापकावर कारवाई कधी ? , शिवसेनेचा ठाकरे गट झाला आक्रमक
‘ त्या ‘ विकृत प्राध्यापकावर कारवाई कधी ? , शिवसेनेचा ठाकरे गट झाला आक्रमक
काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एका नामांकित कॉलेजच्या प्रोफेसरने एका युवतीची छेड काढल्याप्रकरणी जमावाने कॉलेजमध्ये दाखल होऊन त्याला जाब विचारला मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या प्राध्यापकाला ��ोरदार चोप दिला होता त्यानंतर कॉलेज मॅनेजमेंटने देखील चौकशी अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेज हे संस्थाचालकांना पाठवलेले असून या प्रोफेसरवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे . सदर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
' त्या ' विकृत प्राध्यापकावर कारवाई कधी ? , शिवसेनेचा ठाकरे गट झाला आक्रमक
‘ त्या ‘ विकृत प्राध्यापकावर कारवाई कधी ? , शिवसेनेचा ठाकरे गट झाला आक्रमक
काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एका नामांकित कॉलेजच्या प्रोफेसरने एका युवतीची छेड काढल्याप्रकरणी जमावाने कॉलेजमध्ये दाखल होऊन त्याला जाब विचारला मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या प्राध्यापकाला जोरदार चोप दिला होता त्यानंतर कॉलेज मॅनेजमेंटने देखील चौकशी अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेज हे संस्थाचालकांना पाठवलेले असून या प्रोफेसरवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे . सदर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 18 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.10.2024 रोजीचे सकाळी:11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम शृंखलेचा हा एकशे पंधरावा भाग असेल.
या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणी तसंच दूरदर्शनवर करण्यात येईल. आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्युज ऑन ए आय आर या ॲपवर देखील हा कार्यक्रम उपलब्ध असेल. पंतप्रधान कार्यालय तसंच सूचना प्रसारण मंत्रालयाच्या यु ट्युब चॅनलवर मन की बात चं थेट प्रसारण केलं जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही याचं प्रसारण केलं जाणार आहे.
****
राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ प्राद्यापिका डॉक्टर रोहिणी गोडबोले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. रोहिणी गोडबोले यांनी विज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं, त्यांचं हे महत्वपूर्ण योगदान प्रशंसनीय असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर रोहिणी गोडबोले यांचं काल निधन झालं, त्या ७२ वर्षांच्या होत्या. मुळच्या पुण्याच्या रहिवासी असलेल्या डॉक्टर गोडबोले बंगळुरू इथल्या भारतीय विज्ञान संस्थेत स��शोधन विभागात कार्यरत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विज्ञानजगतात महिलांचं स्थान सक्षम  करण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं, त्यांचं कार्य पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील, असं पंतप्रधान मोदी यांनी आपले शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
इस्रायलने इराणच्या लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी तेहरानमध्ये अनेक मोठे स्फोट झाले आहेत. इस्त्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, इराणने एक ऑक्टोबर रोजी केलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर इराण आणि इराकने सर्व उड्डाणे स्थगित केल्याचे स्थानिक ��हवालात म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणवरील हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 
****
नाशिक शहर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला असला, तरी यंदा पक्षाची मदार अन्य पक्षातील नाराज आणि बंडखोरांवर आहे. यंदा नाशिक पश्चिममधून मनसेने भाजपचे बंडखोर दिनकर पाटील यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे पक्षाचे माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  दिलीप दातीर यांनी २०१९ मध्ये  शिवसेनेचा राजीनामा देऊनमनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, नाशिक शहरात काँग्रेस पक्षाला एकही विधानसभा मतदार संघ सुटला नसल्याने मित्र पक्षांच्या विरोधात मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्यास संधी द्यावी, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित मेळाव्यात काल करण्यात आली.
****
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत सात इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्रासाठी आतापर्यंत चार दिवसात ४४ इच्छुकांचे एकूण ५५ अर्ज दाखल झाले आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी काल १८ इच्छुकांनी ३२ नामनिर्देशनपत्रं प्राप्त केली. आतापर्यंत ७४ इच्छुकांनी १३१ नामनिर्देशनपत्रांची उचल केली आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरात नाकाबंदी दरम्यान अमित ओमप्रकाश हेडा यांच्या वाहनात १ कोटी २६ लाख ८८ हजार ५२० रुपये तर कळमनुरी इथल्या गजानन माणिक काळे यांच्या वाहनात १३ लाख ५० हजार रुपये आढळले. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली असून यासंदर्भात तपास सुरु आहे.
****
नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्यात कालही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड जिल्ह्यात काल दुपारी भूकंपसदृश्य दोन सौम्य हादरे जाणवले, मुखेड तालुक्यात अंबुलगा इथं जाणवलेल्या या हादऱ्यांची तीव्रता रिक्टर स्केलवर अनुक्रमे एक पूर्णांक पाच आणि शुन्य पूर्णांक सात अशी नोंदवण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात पांगरा शिंदेसह काही गावात काल रात्री भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही.
****
कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती दिवाळी निमित्त सोमवारी २८ ऑक्टोबर ते शनिवारी दोन नोव्हेंबरपर्यंत सलग सहा दिवस बंद राहणार आहे, बाजार समितीच्या प्रशासनानं यासंदर्भात कळवलं आहे. दरम्यान काल या बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल २ हजार २०२ रुपये सरासरी भाव मिळाला.
****
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
' त्या ' विकृत प्राध्यापकावर कारवाई कधी ? , शिवसेनेचा ठाकरे गट झाला आक्रमक
‘ त्या ‘ विकृत प्राध्यापकावर कारवाई कधी ? , शिवसेनेचा ठाकरे गट झाला आक्रमक
काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एका नामांकित कॉलेजच्या प्रोफेसरने एका युवतीची छेड काढल्याप्रकरणी जमावाने कॉलेजमध्ये दाखल होऊन त्याला जाब विचारला मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या प्राध्यापकाला जोरदार चोप दिला होता त्यानंतर कॉलेज मॅनेजमेंटने देखील चौकशी अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेज हे संस्थाचालकांना पाठवलेले असून या प्रोफेसरवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे . सदर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
automaticthinghoagiezine · 1 year ago
Video
youtube
शिवसेनेचा भगवा झेंडा व चिन्ह चोरून नेल.. #shivsena #dhanush #mumbai
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
शिवसेनेचा वाद आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला
https://bharatlive.news/?p=110737&wpwautoposter=1688962014 शिवसेनेचा वाद आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला
शिवसेनेचा ...
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
' त्या ' विकृत प्राध्यापकावर कारवाई कधी ? , शिवसेनेचा ठाकरे गट झाला आक्रमक
‘ त्या ‘ विकृत प्राध्यापकावर कारवाई कधी ? , शिवसेनेचा ठाकरे गट झाला आक्रमक
काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एका नामांकित कॉलेजच्या प्रोफेसरने एका युवतीची छेड काढल्याप्रकरणी जमावाने कॉलेजमध्ये दाखल होऊन त्याला जाब विचारला मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या प्राध्यापकाला जोरदार चोप दिला होता त्यानंतर कॉलेज मॅनेजमेंटने देखील चौकशी अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेज हे संस्थाचालकांना पाठवलेले असून या प्रोफेसरवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे . सदर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago

nagarchaufer · 2 years ago