#विमानाची किंमत
Explore tagged Tumblr posts
marathinewslive · 2 years ago
Text
आजपासून हवाई सफर करणार? काय आहे तिकिटाचे नवे दर? जाणून घ्या सविस्तर | आजपासून देशांतर्गत हवाई तिकिटे अधिक महाग होतील, पीआरपी ९३
आजपासून हवाई सफर करणार? काय आहे तिकिटाचे नवे दर? जाणून घ्या सविस्तर | आजपासून देशांतर्गत हवाई तिकिटे अधिक महाग होतील, पीआरपी ९३
विमान भाडे बँड काढला: वाढत्या महागाई सामान्य जनता त्रस्त आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या आणि भाजीपालांच्या किमती देखील वाढल्या आहेत सर्वांच्या खिशावर तान आला आहे. आता आणखी भर पडली आहे. जर तुम्ही विमान प्रवास करत असाल तर आज तुम्हाला जास्त पैसे मोजावेत आहेत. कारण देशांतर्गत विमान प्रवास करणार आहे. विमानसेवेवर लाभत आलेले मर्यादांवरून 31 आॅगस्ट देशांतर्गत लाभार्थी आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
traitor11 · 2 years ago
Text
एसइओच्या किंमतीतील प्रभावशाली घटक
एसइओच्या किंमतीतील प्रभावशाली घटक
या लेखात, तुमच्या SEO साइटच्या किंमतीवर कोणते घटक परिणाम करतात या मुद्द्याला सामोरे जाण्याचा आमचा मानस आहे, त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना तुमची SEO साइट नियुक्त करण्याबद्दल अधिक जागरूक आणि अधिक माहिती देण्यासाठी हा लेख संपेपर्यंत आमच्यासोबत रहा. कारवाई. SEO म्हणजे काय?
SEO ही डिजिटल मार्केटिंगच्या उप-श्रेणींपैकी एक आहे आणि थोडक्यात, असे म्हणता येईल की एसइओ क्रियांचा एक संच आहे ज्यामुळे तुमची वेबसाइट वेगवेगळ्या कीवर्डमध्ये Google परिणामांमध्ये रँक करते. तुमच्या साइटवर एसइओ नसल्यास, लोकप्रिय आणि शोधण्यायोग्य कीवर्डमध्ये शोधणे जवळजवळ अशक्य आहे. दुसरीकडे, जर तुमच्याकडे तुमच्या साइटवर चांगला एसइओ असेल आणि तुम्ही एक चांगली साइट डिझाइन केली असेल, तर तुम्ही चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा करू शकता कारण Google मध्ये रँक मिळवणे हे खूप महत्त्वपूर्ण इंप्रेशन मिळवण्यासारखे आहे. म्हणूनच अनेक व्यवसाय एसइओ सेवा प्रदान करणार्‍या कंपन्यांचा शोध घेत आहेत जेणेकरून ते या अंतहीन जगात दिसू शकतील आणि चांगले ग्राहक मिळवू शकतील आणि त्यांचा व्यवसाय वाढवू शकतील. एसइओच्या किंमतीवर कोणते घटक परिणाम करतात?
चला या लेखाच्या मुख्य विषयाच्या प्रश्नाकडे जाऊया, म्हणजे तुमच्या एसइओवर परिणाम करणारे घटक. अडचण आणि कीवर्डची संख्या
साहजिकच तुमच्या एसइओच्या खर्चावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे तुम्ही ज्या कीवर्ड्समध्ये रँक करण्याची अपेक्षा करता त्या कीवर्डची संख्या आणि त्यामधील स्पर्धेचे प्रमाण. ते असे शब्द असू शकतात ज्यांना सहजपणे प्रथम क्रमांक मिळू शकतो, परंतु असे म्हणता येईल की बहुतेक व्यवसायांमध्ये स्पर्धा इतकी मोठी आहे की मोबाइल शॉपिंग, फ्रेट, विमानाची तिकिटे खरेदी करणे, साइट डिझाइन, लॉ फर्म, तेहरानमध्ये ट्रॅक्ट वितरण यासारखे कीवर्ड आणि…. हे इतके वाढले आहे की चमकदार परिणाम मिळविण्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पैसे आणि बराच वेळ खर्च करावा लागेल. तुमचे संकेतस्थळ
एसइओच्या किमतीवर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी एक म्हणजे तुमच्याकडे असलेली साइट. तुमच्या साइटमध्ये त्रुटी असू शकतात ज्या दुरुस्त केल्या पाहिजेत, अशा परिस्थितीत तुम्हाला ती सुधारण्यासाठी पैसे द्यावे ल���गतील. तुमच्या साइटवरील क्रियाकलापांचे प्रमाण
तुमच्या साइटवर जितके जास्त अॅक्टिव्हिटी, कंटेंट प्रोडक्शन, लिंक बिल्डिंग आणि यासारख्या गोष्टी केल्या जातील, तितकी तुमच्या एसइओची किंमत जास्त किंवा कमी होईल. तुमच्या साइटवर अधिक दर्जेदार आणि विशेष सामग्री तयार करण्यात जास्त वेळ घालवला जाईल. तुमच्याकडे देखील आहे. उच्च किंमत मोजण्यासाठी आणि चांगल्या अभिप्रायाची अपेक्षा करा.
साइटवरील अधिक क्रियाकलाप आपल्याला कमी वेळेत इच्छित परिणाम प्राप्त करण्यास अनुमती देईल आणि आपल्या साइटवरील नोंदींची संख्या खूप जास्त आहे. तुमच्या साइटवरील क्रियाकलापांचे प्रकार
तुमच्या साइटवर केल्या जाणार्‍या क्रियाकलापांवर अवलंबून, तुमच्या साइटची किंमत देखील बदलू शकते. उदाहरणार्थ, काही कंपन्या इतर साइटवरील जाहिरातींच्या खर्चाचा विचार करत नाहीत, जसे की एसइओच्या मासिक रकमेमध्ये अहवाल देणे किंवा जाहिरात अहवालापेक्षा कमी . ते ते करतात किंवा ते कमी करतात, ज्यामुळे काही कंपन्यांचे एसइओ दर कमी असतात आणि काही जास्त असतात, कारण तुम्ही द्यायच्या समान खर्चाच्या तुलनेत, तुमची वेबसाइट अधिक चांगल्या आणि अधिक प्रतिष्ठित साइटवर सादर केली जाऊ शकते. आणि अधिक चांगली झाली अभिप्राय पार्श्वभूमी आणि अनुभव
निश्चितपणे, तुम्‍हाला काम करण्‍याची तुम्‍हाला इच्‍छित असलेली व्‍यक्‍ती किंवा कंपनी जितकी अधिक विशेष आणि अनुभवी असेल, आणि त्‍यांचे जितके अधिक यशस्वी प्रकल्प असतील, विशेषत: तुमच्‍या कार्यक्षेत्रात, तितके जास्त दर असतील. लक्षात ठेवा की काही लोकांसाठी कमी एसइओ दर पहिल्या दृष्टीक्षेपात आकर्षक असू शकतात, परंतु ते आपल्या साइटला चांगले परिणाम आणि Google कड��न कमाई मिळवून देऊ शकते हे फारच दुर्मिळ आहे. त्यामुळे अनुभवी आणि विशेष लोक शोधण्यासाठी तुमच्या निवडीमध्ये सावधगिरी बाळगा जेणेकरून तुमच्या जाहिरातींच्या खर्चामुळे चांगले परिणाम मिळतील आणि तुम्हाला निकाल मिळण्यापूर्वी तुमचा वेळ आणि खर्च वाया जाणार नाही.
व्हर्च्युअल मार्केट एसइओ अंतिम शब्द
नमूद केलेल्या बाबी एसइओच्या किंमतीवर परिणाम करणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी होत्या. अननुभवी लोकांना कोणत्याही प्रकारे सहकार्य करू नका असा आमचा सल्ला आहे आणि जर तुम्हाला चांगला परिणाम मिळवायचा असेल तर, रेझ्युमे आणि अनुभवी कंपन्यांशी खात्री करा. लाईक करा. Google शोध इंजिनमध्ये कमी वेळेत चांगली रँकिंग मिळवण्यासाठी आणि तुम्ही देय असलेल्या खर्चाचा विचार करून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी व्हर्च्युअल मार्केट टीम. या संग्रहाद्वारे एसईओ केलेल्या प्रमुख ब्रँड्समध्ये, आम्ही सर्वोत्कृष्ट, सामान्य मासिक, सर्वोत्तम अडथळा, टीझर निर्माता, इराण दस्तऐवज इत्यादीसह मोठ्या वेबसाइट्सचा उल्लेख करू शकतो.
शेवटी, जर तुमच्याकडे काही मुद्दे किंवा आयटम असतील जे हा लेख पूर्ण करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील, तर टिप्पण्या विभागात त्यांचा उल्लेख करण्याचे सुनिश्चित करा.
Source:Shopingserver.net
0 notes
nitinkandharkar · 3 years ago
Text
फॉरेन रिटर्न्ड...
मित्रांसोबत चाललेल्या गप्पांमध्ये कुठेतरी एखादी ट्रिप मारावी अशी चर्चा चालू होती. कश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सर्व पर्याय सुचवले जात होते. पण एकमत होत नव्हते. त्याचवेळी आमचे एक मित्र बबन सातपुते म्हणाले ‘चला साहेब, बाहेरच्या देशात जावू.’
याबरोबरच एक नवी ट्युब पेटली! नुकतेच पासपोर्ट काढले होते. पण त्याचा उपयोग फोटो आयडी सोडून काही होत नव्हता. अनेक पर्याय पाहून स्वस्त आणि मस्त परदेशवारी करायची तर ‘चलो श्रीलंका’ यावर आमचे मत ठाम झाले. बाकी कुणाकडे पासपोर्ट नव्हते, म्हणून मी आणि सातपुते पुढील कामाला लागलो. काही टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना भेटलो. बरीच आकडेमोड झाली आणि ठरवले की आपण दोघेच जायचे तर कशाला पाहिजे टूर अ‍ॅरेंजर? जावू जमेल तसे. मग त्याच दिवशी चेन्नईवरून कोलंबोला जाण्या येण्यासाठी एअर इंडीया एक्स्प्रेस या विमानाचे २६ जुलै २००७ चे तिकिट बुक केले.
सर्व तयारी झाली आणि २३ जुलै रोजी औरंगाबादहुन दुपारी तीनच्या पॅसेंजरने हैद्राबादला निघालो. डुगडुग करत पॅसेंजर दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजता हैद्राराबादला पोहोचली. एका छोट्या हॉटेलमध्ये फ्रेश झालो आणि तडक बसस्टँडवर आलो. चेन्नईला जाण्यासाठी बस उशीरा होती म्हणून विजयवाड्याच्या बसमध्ये बसून संध्याकाळी सहा वाजता विजयवाड्याला पोहोचलो. तिथून लगेच चेन्नई बस मिळाली आणि सकाळी सहा वाजता चेन्नईच्या मोफुसील बसस्टँडवर पोहोचलो. तिथून एअरपोर्ट खूप दूर होते. रु. २००/- मध्ये एक टॅक्सी ठरवून एअरपोर्टजवळच्या एका लॉजमध्ये रूम बुक केली. दिवस पूर्ण रिकामा होता म्हणून सिटी बसने फिरून मरीना बीचवर संध्याकाळपर्यंत टाईमपास करून परत आलो.
दुसर्‍या दिवशी सकाळी आठचे प्लेन होते. पहाटे चारलाच जाग आली. परदेशात जायची खूप एक्साईटमेंट होती त्यामुळे रात्री झोप अशी लागलीच नव्हती. स्नान वगैरे आटोपून साडेपाच वाजताच एअरपोर्टवर चेक इन केले. इमिग्रेशन चेक म्हणजे काय याचा पहिल्यांदाच अनुभव घेतला. आमच्या समोर एक माणूस सेक्युरिटीसोबत तामिळीत हुज्जत घालत होता. सेक्युरिटी पोलिस युपीचे होते. तो माणूस वॉलेट, बेल्ट काढत नव्हता. आमच्या समोर त्या पोलिसांनी त्याला संपूर्ण उघडे केले. अंडरवेअर शिल्लक ठेवली होती म्हणून बरे झाले! बिचारा रडवेला चेहरा करून आत गेला.
एवढी कडक सेक्युरिटी असते हे पाहून आम्ही हबकलोच. गुपचूप सर्व सामान, बेल्ट, वॉलेट, हँड पाऊच, घड्याळ, शूज, अगदी हातरुमाल, चष्मा (अंगावरचे कपडे सोडून) सगळं स्कॅनर मध्ये टाकले. चेकींग करून पुढे येवून सामान घेतले. हँड पाऊचमध्ये दाढीचे नवे करकरीत सामान सेक्युरिटींनी काढून घेतले! परदेश प्रवासासाठी म्हणून भारीचे सामान घेतले होते. ते सर्व डस्टबीनमध्ये माझ्याकडे पहात आरामात पहुडले. आत्ताच त्या माणसाचा प्रताप पाहिला होता, म्हणून काहीही न बोलता उरलेले सामान घेवून गुमान आत गेलो.
काही वेळातच विमानाची अनाऊंसमेंट झाली. पासपोर्ट, तिकीट दाखवून विमानात प्रवेश केला. एअरहोस्टेसने काही अघटीत घडले तर काय करायचे हे अ‍ॅक्शनसहीत करून दाखवले आणि विमानाने आम��ी पहिली परदेशवारी घडवण्यासाठी उड्डाण केले.
मनात खूप गुदगुल्या होत होत्या. या तंद्रीत असतांनाच एअरहोस्टेसने सँडवीच, टोस्ट, चहा आणून दिला. चांगली सर्वीस होती विमानात. काही ठीस ठीस नाही की फीस फीस नाही. हसत इंग्लिश हिंदीत त्या बोलत होत्या. त्यात एक मराठी मुलगी होती हे आमच्या लक्षात आले होते. मध्येच एखादी बस खडबडीत रस्त्यावर धावतांना जसे जाणवते तसेच जाणवले. सातपुते एक्स मिल्ट्रीमन असल्यामुळे त्यांना अनुभव होता, पण माझ्या पोटात मात्र गोळा उठला होता. खाली ढग आणि वर खडखड! जीव मुठीत घेवून बसलो.
बाहेर पहात, फोटो काढत खाणे चालू होते. अजून चहा घेतच होतो की अनाऊंसमेंट झाली ‘दहा मिनिटात आपण बंदारनायके कोलंबो एअरपोर्टवर पोहचत आहोत!’ अरे! आत्ताच बसलो आणि आलंही का श्रीलंका! आश्चर्याने बाहेर पाहिले तर समुद्र, छोटी घरे दिसायला लागली. हळुहळू विमान खाली आले आणि अतिशय सुंदर रित��ने लँड झाले. एअरहोस्टेस आणि पायलट नमस्कार करत सर्वांना निरोप देत दारात थांबले. त्या मराठी मुलीला सातपुते म्हणाले ‘पॅसेंजर कसेही असले तरी तुम्हाला सतत हसत राहणे कसे काय जमते हो?’ ती मुलगी मराठीतच म्हणाली ‘आमची हीच तर ड्युटी आहे सर’.
हसत हसतच आम्ही बाहेर पडलो. परत इमिग्रेशन चेक सुरू झाले. फॉर्म भरून आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो. आमचा नंबर आला आणि फॉर्म वाचून तो ऑफिसर म्हणाला ‘व्हेर यु आर स्टेईंग इन कोलंबो?’
कुठे रहायचे ते आम्ही ठरवलेच नव्हते. मुंबई पुण्याला जातो तसेच आम्ही निघालो होतो. तिथे गेल्यावर एखादा लॉज पाहू असे ठरवले होते. मी त्या ऑफिसरला म्हणालो ‘वुई हॅव नॉट डिसायडेड येट. वुई विल फाईंड सम हॉटेल अँड स्टे देअर.’
मी प्रामाणिकपणाने एक्स्प्लेनेशन देत होतो, पण त्याने मात्र फॉर्म माझ्या तोंडावर फेकला आणि जोरात ओरडला ‘गेट आऊट! अँड गो बॅक टू इंडीया.’
आली का पंचाईत! काय काय ठरवले होते अन झाले काय! तिथून निघून बाजूला आलो तितक्यात अजून एकदा ‘गेट आऊट’ असा आवाज आला आणि माझ्या मागे सातपुतेही आले! हताश होवून आम्ही एका बेंचवर बसलो. बाजूला एका केबीनसमोर एक श्रीलंकन कबीर बेदी दाढी कुरवाळत उभा होता. कडक ड्रेस घातलेला गंभीर चेहर्‍याचा तो ऑफीसर माझ्याकडेच पाहत होता. मी उठून भीत भीत त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो ‘वुई आर टुरिस्ट सर. वुई वाँट टू सी श्रीलंका. फर्स्ट टाईम वुई केम अब्रोड. बट वुई हॅव नॉट डिसायडेड व्हेर टू स्टे. प्लीज हेल्प अस.’
दाढी कुरवाळतच तो मंद हसला आणि मला आत बोलावले. ‘राईट एअरपोर्ट गार्डन रिसॉर्ट रुम नंबर 208.’ मी त्याने सांगितले तसे डेस्टीनेशनच्या रकान्यात लिहिले आणि त्याला धन्यवाद देवून बाहेर पडलो. सातपुतेंच्या फॉर्ममध्येही तसेच लिहिले आणि वेगळ्या लाईनला लागलो. तिथल्या ऑफिसरने फॉर्म तपासला आणि पासपोर्टवर शिक्का मारून एकदाचे इमिग्रेशन अ‍ॅक्सेप्ट केले. खुश होवून आम्ही बाहेर पडलो. बाहेर जातांना डोळ्याच्या कोपर्‍यातून आम्हाला गेट आऊट म्हणणार्‍या ऑफिसरकडे पाहिले. तो कामात मग्न होता. त्याने आमच्याकडे पाहिलेच नाही म्हणून बरे झाले! सुटलो एकदाचे!
बाहेरच्या लाऊंजमध्ये श्रीलंकन टुर्सचे अनेक स्टॉल्स होते. तिथे चौकशी करून बाहेर अजून स्वस्त टॅक्सी मिळतील असा विचार करून एअरपोर्टच्या बाहेर आलो. एका टपरीवरून पाण्याची बाटली आणि चहा घेतला. त्याचे बील देतांना लक्षात आले की आपल्याकडे श्रीलंकन करंसी नाही! आम्ही निघतांना सोबत डॉलर्स घेतले होते. एअरपोर्टवर ते कन्व्हर्ट करून घ्या���ला पाहिजे हे माहितच नव्हते. परत ��ंचाईत झाली. त्या टपरीवाल्यानेच जवळच्या ज्वेलरकडून डॉलर कन्व्हर्ट करून घ्यायला सांगितले. लगेच तिथे जावून शंभर डॉलर देवून सात हजार श्रीलंकन रुपये घेतले आणि टपरीवाल्याचे बील दिले. तितक्यात ‘नेगोंबो नेगोंबो’ असे ओरडत एक मिनी बस तिथे थांबली. एका माणसाने मोडक्या तोडक्या इंग्रजीत कोलंबो पेक्षा नेगोंबो स्वस्त आहे आणि कोलंबोच्या बाहेरच्या भागात आहे असे सांगितले. लगेच निर्णय घेतला आणि नेगोंबोला निघालो.
अर्ध्या तासात आम्ही नेगोंबोला पोहोचलो. परत एका टपरीवर चहा घेत लॉज आणि टॅक्सीची चौकशी केली. तिथे एक मुंबईत शिकलेला विद्यार्थी भेटला. भारतीय भेटल्यामुळे त्याला आनंद झाला होता. त्याने त्याच्या ओळखीच्या टॅक्सीवाल्याला फोन केला आणि काही वेळातच इसरू नावाचा टॅक्सीवाला आला. ४०० डॉलरमध्ये सहा दिवस आमच्या सोबत रहायचे ठरवून त्या विद्यार्थ्याला धन्यवाद देवून आम्ही टॅक्सीत बसलो.
सगळ्यात आधी इसरूने आम्हाला एका मोबाईलच्या दुकानात नेले. तिथून टेंपररी सीम कार्डस मिळवून दिले. आता आम्हाला भारतात फोन करता येणे शक्य झाले होते. लगेच घरी फोन करून सर्व सुखरूप असल्याचा निरोप दिला. तिथून कोलंबो शहरात आलो. एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. संध्याकाळी स्ट्रिट मार्केटमध्ये फिरलो. अजून श्रीलंकन करंसीचा आम्हाला अंदाज येत नव्हता. एका दुकानातून शर्ट घेतला. त्याने किंमत १२०० एसएलआर (श्रीलंकर रुपीज) सांगितले. एवढे महाग असते का म्हणून त्याच्याशी हुज्जत घातली. ‘आर यू इंडियन?’ असे म्हणत त्याने भारतीय रुपयात त्या शर्टची किम्मत रु. ४८०/- होते हे पटवून दिले तेव्हा कुठे आमच्या डोकात प्रकाश पडला. चहासुद्धा तीस रूपयाला मिळायचा म्हणून आम्ही जास्त घेत नव्हतो. पण इंडियन करंसीमध्ये तो १० रुपयाला पडतो हे लक्षात आल्यावर मात्र प्यायला लागलो.
दुसर्‍या दिवशी दिवसभर प्रवास करून आम्ही अनुराधापुराकडे निघालो. टॅक्सी अनुराधापुराला रात्री आठ वाजता पोहोचली. इसरूच्या ओळखीने एक होम स्टे घेतला. अतिशय छान जेवण त्यांनी सर्व्ह केले आणि जेवण करून आम्ही झोपी गेलो. सकाळी उठल्यावर पाहिले तर ते होम स्टे एका सुंदर जंगलात होते. सर्वत्र झाडी होती. समोर एका झाडावर एक लाकडाची खोली होती. शिडी चढून त्या खोलीत बसूनच आम्ही नाष्टा केला आणि ‘आय बुवान’ म्हणजे नमस्कार करून त्या होम स्टेचा निरोप घेतला.
अनुराधापुरा हा अनेक बौद्ध स्तुपांचा प्रदेश होता. बरीच मोठी बौद्ध स्तुपे पाहून आम्ही कँडीकडे निघालो. वाटेत डंबुला गावातील क्रिकेट स्टेडियम पाहून जवळच असलेले सिग्रिया हे ठिकाण पाहिले. एका मोठ्या पुरातन शहराचे अवशेष आणि उंच दगडी डोंगरावर मंदिर व लेण्या होत्या तेथे. तेवढ्या उंच चढतांना वारा आणि लटकत्या पायर्‍यामुळे खूप भीती वाटत होती. ते सुंदर ठिकाण पाहून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
संध्याकाळी सहाच्या आसपास कँडी या अतिशय मनमोहक शहरात पोहोचलो. इंग्लिश पिक्चरमध्ये असते तसेच वातावरण होते तिथे. शहराच्या मध्यभागी तलाव होता. त्या तलावा भोवतीच हे थंड हवेचे शहर वसले होते. हॉटेलचा शोध सुरू केला पण काही केल्या हॉटेल मिळेना. शेवटी रात्री आठ वाजता एक होम स्टे टाईप हॉटेल मिळाले. क्रिकेटर कुमार संगकाराच्या वडलांचे ते हॉटेल होते. रूममध्ये फ्रेश होवून संगकाराच्या वडलांना भेटायला गेलो. पण ते त्या दिवशी येणार नव्हते असे कळले. एक साठ पासष्ट वर्षाची बाई केअर टेकर होती. तिने मस्तपैकी जेवण तयार केले. जेवण करून आम्ही लवकरच झोपी गेलो.
सकाळी त्या बाईने भरपूर नाष्टा खावू घातला. ‘पुढच्या वेळी येतांना बायकोला घेवून या आणि माझ्यासाठी साडी आणा’ असे हक्काने म्हणाली. ‘हो नक्की’ असे आश्वासन देवून तिचा निरोप घेवून आम्ही बाहेर पडलो. कँडीतले खूप मोठे आणि अतिशय स्वच्छ बौद्ध मंदिर पाहून हरखून गेलो. बराच वेळ तिथे व्यतीत केला आणि नुवारा इलिया या हत्तीचे अनाथ आश्रम असलेल्या ठिकाणाकडे जाण्यासाठी कूच केली. वाटेत चहाच्या बगिचात जावून एका फॅक्टरीत चहा कसा तयार करतात हे पाहिले आणि सर्वांना देण्यासाठी चहाची पाकिटे विकत घेतली.
नुवारा इलियात पोहोचल्यावर तिकिटे काढायला गेलो तर फॉरेनरसाठी दोन हजार रुपये लागतील असे त्याने सांगितले. हत्ती पहायला दोन हजार कशाला खर्चायचे? असा विचार करून एका ठिकाणी चहा घेतला. त्या चहावाल्याने सांगितले की एशियन टुरिस्ट साठी पाचशे रूपये तिकिट आहे. तो स्वत: सोबत आला आणि त्याने तिकिट काढून दिले. त्याच्यामुळे आम्हाला ते ठिकाण पाहता आले.
एका मोठ्या विस्तीर्ण आवारात हे आश्रम होते. आतमध्ये भरपूर बेवारस हत्ती होते. एका पायाने लंगडे, तुटलेल्या सोंडेचे असे जखमी हत्ती तिथे पोसले जातात हे कळले. श्रीलंकेत हत्ती खूप आहेत. बर्‍याच गावात गावाभोवती तारेचे कुंपन घालून रात्री त्यात करंट सोडतात. हत्तींच्या उपद्रवापासून बचाव होण्यासाठी असे अवैधरित्या गावकरी करतात असे समजले. यात जखमी झालेले हत्ती या आश्रमात आणले जातात.
नदीमध्ये हत्तींचा स्नान करण्याचा सोहळा पहायचा आनंद घेवून तिथून आम्ही कोलंबोकडे प्रयाण केले. वाटेत गॉल शहर पाहिले. सुनामीमुळे उध्वस्त झालेले समुद्र किनार्‍यावरचे गॉल फोर्ट अतिशय मोठे होते. फोर्टवर उभे राहून समोर क्रिकेट स्टेडियम स्पष्ट दिसत होते. लोकल कुठली तरी तिथे मॅच चालली होती. किल्ल्यावरूनच एका डोंगराकडे ��ात दाखवत इसरू म्हणाला ‘युवर हनुमान ब्रॉट धीस माऊंटेन द्रोणगीरी हियर’. खरे का खोटे माहित नाही, पण तिथूनच त्या डोंगराकडे पाहून आम्ही हात जोडले.
तिथून कोलंबोकडे निघालो. संपूर्ण समुद्रकिनार्‍याचा रस्ता होता. श्रीलंकेत एक पाहिले की रस्ते जरी छोटे असले तरी खूप चांगले होते. कुठेही खड्डे दिसले नाहीत. आणि रस्ता क्रॉस करतांना कुणी दिसला तर ड्रायव्हर दूरूनच कार थांबवून त्या क्रॉस करणार्‍याला जावू देत. तो पलिकडे गेल्यावराच कार चालू करत असत. ‘दिसत नाही का?’ ‘डोळे फुटले का?’ असे म्हणणारे कुणीच दिसले नाहीत.
रस्त्यात समुद्र किनारी बसून एका हॉटेलमध्ये चहा सांगितला. त्याने चहासोबत अनेक वेगवगळे स्नॅक्स आणून ठेवले. ‘टेस्ट इट’ असे म्हणून आम्हाला ते आग्रहाने खायला लावले. खूपच चांगले पदार्थ होते ते. सर्व फस्त करून दोन कप चहा पिऊन आम्ही कोलंबोकडे निघालो.
कोलंबोत पोहोचायला रात्र झाली होती. इसरू म्हणाला ‘इफ यू वाँट चीप स्टे, देन वन युथ हॉस्टेल इज देअर’ असे म्हणून त्याने एका हॉस्टेल टाईप टिपिकल सरकारी परिसरात नेले. एक रूम आम्ही पसंद केली. अगदी साधारण सरकारी डाकबंगल्यासारखी रूम होती. रात्री फक्त झोपायचे आहे तर कशाला भारी रूम करायची असा मध्यमवर्गीय विचार करून तिथे झोपलो.
दुसर्‍या दिवशी कोलंबो दर्शनास निघालो. ताज हॉटेल, बेंटॅटो बीच, झुऑलॉजिकल गार्डन हे सर्व पाहिले. इतके दिवस जेवण सप्पकच मिळत होते. म्हणून इसरूला सांगून एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो. पोळी, भाजी, दालफ्राय ऑर्डर केली. लालभडक लोणचे दिसले म्हणून सातपुतेंनी ते ऑर्डर केले. एवढे करूनही जेवण सप्पकच निघाले. ते लोणचे तर केवळ रंगानेच लाल होते, चव मात्र गुळचीट होती. कसेबसे जेवण उरकले आणि प्रेमदासा स्टेडियमकडे निघालो. योगायोगाने भारत श्रीलंका टेस्ट मॅचचा शेवटचा दिवस होता. तिकीट काढायला गेल्यावर तिकीटवाला म्हणाला ‘द्याट वे फ्री एंट्री, हिअर टू हंड्रेड एसएलआर.’ फ्री एंट्रीमध्ये चांगले नसेल म्हणून दोनशे रुपयाचे तिकीट काढून आत गेलो. फारच कमी प्रेक्षक होते. बँडवर ‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तू’ हे गाणे वाजवले जात होते. फ्री स्टँडमध्ये लॉनवर बरेच प्रेक्षक एंजॉय करत होते. तिथेच गेलो असतो तर बरे झाले असते असे वाटले. मॅच पाटा खेळपट्टीवर चालली होती. इशांत शर्मा सुद्धा आऊट होता होत नव्हता यावरूनच लक्षात येत होते. कंटाळून आम्ही बाहेर पडलो आणि मार्केटमध्ये फिरून एक लॉज बुक केले. दुसर्‍या दिवशी परतीचा प्रवास होता. इसरूला सकाळी पाच वाजता यायला सांगून सामानाची आवाराआवर करून झोपी गेलो.
सकाळी बरोबर पाच वाजता इसरू आला. त्याच्या सोबत विमानतळाकडे निघालो. काहीच रहदारी नव्हती तरी तो ८० च्या पुढे स्पीड वाढवत नव्हता. तो म्हणाला ‘पोलिस व्हेरी स्ट्रिक्ट. इफ स्पीड मोर, दे फाईन’ असे जमेल तसे त्याने इंग्रजीतून सांगितले. हाईट म्हणजे एका चौकात लाल लाईट लागली अन तो थांबला. चारी बाजूने मिळून फक्त आमचीच गाडी होती. एका कोपर्‍यात मागे हाताची घडी घालून एक किडमिडीत पोलिस उभा होता. ‘चल कुछ नही होता’ असे आपल्या स्टाईलमध्ये इंग्रजीतून त्याला आम्ही म्हणालो. तो म्हणाला ‘नो सर, पोलिस फाईन’.
आपल्याकडे असे असते तर दहा किलोमिटर पुढे निघून गेलो असतो. पण तिथले नियम कडक होते. शेवटी सहा वाजता विमानतळावर पोहोचलो. इसरूचे सर्व पैसे देवून वर भरघोस टीप दिली आणि आत येवून चेक इनचे सर्व सोपस्कार पार पाडले. एक माणूस सर्वांकडे दोन दोन ड्युटी फ्री लिकरच्या बाटल्या देतांना दिसला. आमच्याकडे येवून आम्हालाही म्हणाला ‘विल यू कॅरी दिज टू बॉटल्स? टू बॉटल्स आर अलाऊड. आवर मॅन विल कलेक्ट इट अ‍ॅट चेन्नई अँड विल पे यू टू फिफ्टी फॉर इच बॉटल.’
सातपुते लगेच तयार झाले, पण मी अडवले. ‘यात काही ड्रग्ज वगैरे भानगडी असतील तर आपण अडकून जाऊ. नको मोहात पडायला.’ असे म्हणून विनम्रपणे त्याला नकार दिला आणि विमानात बसलो. एक तास दहा मिनिटाचा प्रवास करून चेन्नई एअर पोर्टवर पोहोचलो. एअरपोर्टवरून बाहेर पडतांना सर्व पॅसेंजरच्या हातात दोन दोन बॉटल दिसत होत्या. बाहेर एक माणूस त्या घेत होता आणि प्रत्येकाला पाचशे रुपये देत होता.
‘बघा साहेब, पाचशे रुपये फुकट गेले’ असे सातपुते म्हणाले आणि कपाळाला हात मारून घेत हसत हसतच आम्ही बाहेर पडलो.
तो दिवस चेन्नईत थांबून दुसर्‍या दिवशी हैद्राबादमार्गे औरंगाबादला परत आलो. या दौर्‍यात औरंगाबाद ते श्रीलंका जाणे येणे धरून खरेदीसहित सव्वीस हजार रुपये प्रत्येकी खर्च आला. टुर कंपनीकडून गेलो असतो तर (खरेदी सोडून) चाळीस हजार लागले असते. पैसे खूप वाचले, पण एक लक्षात आले की एकतर अभ्यास करून जायला पाहिजे किंवा ट्रॅव्हल्स कंपनीसोबतच जायला पाहिजे, म्हणजे सर्व महत्वाची ठिकाणे पाह्यला मिळतात. आमची बरीच ठिकाणे मिस झाली.
असे असले तरी या पहिल्यावहिल्या विदेश दौर्‍यात खूप मजा आली, आणि मुख्य म्हणजे (श्रीलंकेला जाऊन का होईना) एकदाचे आम्ही ‘फॉरेन रिटर्न्ड’ झालो...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 January 2018 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि. ****  राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेसचे सर्व आरोप संरक्षण मंत्र्यांनी फेटाळले; येत्या सप्टेंबरपर्यंत पहिलं विमान दाखल होणार  देशात दोन हजार रुपयांच्या पुरेशा नोटा उपलब्ध - आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग  अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकासाठी एक लाख रुपये थेट कर्ज योजना आणि  औरंगाबाद इथं सहाव्या पक्षी महोत्सवाला सुरूवात ***** राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेस पक्षानं केलेले सर्व आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळून लावले आहेत. काल लोकसभेत राफेल विमान खरेदी मुद्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना सीतारामन यांनी, काँग्रेस खोटारडेपणाचा आधार घेऊन संसदेत आणि संसदेबाहेर गैरसमज पसरवत असल्याचं नमूद केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं केलेल्या व्यवहारात विमानाच्या किंमती, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या न झालेल्या कराराच्या तुलनेत ९ टक्क्यानं कमी असल्याचा दावा त्यांनी केला. विद्यमान सरकारनं सहा अब्ज ७० कोटी रूपये प्रति विमान या दरानं हा करार केला आहे. मात्र हाच सौदा पूर्वीचं सरकार प्रति विमान सात अब्ज ३७ कोटी रूपये दरानं करणार होतं, असं त्यांनी सांगितलं. गोपनीयतेच्या अटीचा भंग होऊ नये म्हणून शस्त्रसज्ज विमानाची किंमत जाहीर करता येणार नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. या करारानुसार युद्धसज्ज विमानांच्या प्रत्येकी अठरा विमानांच्या दोन तुकड्यांपैकी पहिलं विमान येत्या सप्टेंबरमध्ये तर अखेरचं ३६ वं विमान २०२२ साली दाखल होईल, असं त्या म्हणाल्या. या करारात वापरण्यास सज्ज विमानांची संख्या १२६ वरुन ३६ अशी कमी झालेली नसून, काँग्रेस सरकारच्या काळात प्रस्तावित असलेल्या १८ सुसज्ज विमान खरेदीच्या तुलनेत दुप्पट झाली असल्याचं, सीतारामन यांनी नमूद केलं. काँग्रेस पक्ष आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात राफेल विमान खरेदी करार पूर्ण का करू शकला नाही, असा प्रश्न सीतारामन यांनी विचारला. खासगी लाभासाठी काँग्रेस पक्षानं देशाच्या सुरक्षा सज्जतेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, या उत्तरावरुन समाधान झालं नसल्याचं सांगत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, या विमानाचं कंत्राट रिलायन्स कंपनीला का दिलं, असं विचारत याची चौकशी करण्याची मागणी केली. **** लोकसभेत काल आधार आणि अन्य कायदा तसंच कंपनी सुधारणा विधेयक मंजूर झालं. यानुसार आता नवीन मोबाईल घेण्यासाठी तसंच बँकेमध्ये बचत खातं उघडण्यासाठी आधार क्रमांक देणं बंधनकारक नसेल. सरकारनं आधार कार्डला कायदेशीर बळकटी दिली असल्याचं कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विधेयकावरील चर्चेच्यावेळी सांगितलं. कंपनी दुरुस्ती विधेयकामध्ये व्यापार अधिक सुलभ बनवणं, राष्ट्रीय कंपनी कायदा न्याधिकरणामध्ये सुधारणा तसंच नियमांचं पालन न करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कडक कारवाईच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. **** संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण द्यावं ही मागणी काल राज्यसभेत काही महिला सदस्यांनी लावून धरली. शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित झाला होता. यासंदर्भात सभागृहात चर्चेला अनुमती द्यावी यासाठी काही महिला सदस्यांनी आपली भेट घेतल्याचं राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी यापूर्वी सांगितलं. **** दोन हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. नोटांची छपाई ही नेहमीच आवश्यकतेनुसार केली जाते, असं स्पष्टीकरण आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून दिलं आहे. देशात सध्या दोन हजार रुपयांच्या पुरेशा नोटा उपलब्ध असून, त्यापैकी ३५ टक्के नोटा चलनात आहेत असं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केल्याचं प्रसारमाध्यामांच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर गर्ग यांनी ही माहिती दिली. **** मराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल जागतिक मराठी अकादमी तर्फे आयोजित 'शोध मराठी मनाचा' या १६ व्या जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषा जगवायची आणि टिकवायची असेल, तर तिने ज्ञानभाषा बनण्याची गरज असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं. तर गडकरी यांनी आपल्या भाषणात, भाषेची उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं नमूद केलं. **** गुंतवणुकदारांचे ७४ कोटी रुपये परत करण्याचे रोखे आणि विनिमय महामंडळ - सेबीचे आदेश न पाळल्यामुळे, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल सहकारी बँकेचे म्युच्युअल फंड आणि डीमॅट खाते सीलबंद करण्यात आले आहेत. ७४ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी देशमुख यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. गुंतवणुकदारांचे पैसे तीन महिन्यात परत करण्याचे आदेश सेबीनं गेल्या १६ मे रोजी दिले होते. मात्र मागील सहा महिन्यांपासून लोकमंगलने या आदेशाला उत्तरच दिले नाही. त्यामुळे सेबीकडून ही कारवाई करण्यात आली. **** महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीनं अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकातल्या व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी एक लाख रुपये थेट कर्ज योजना सुरु करण्यात आली असून या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक हजार लाभार्थ्यांना फायदा होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर सरवदे यांनी काल मुंबईत दिली. कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी महामंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या लाभार्थ्यांना मार्चपर्यंत कर्ज मंजूर केली जाईल असं सरवदे यांनी ��ांगितलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. ***** राज्यातल्या पाच अंगणवाडी सेविकांची २०१७- १८ वर्षासाठीच्या राष्ट्रीय अंगणवाडी सेविका पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या कुरलीच्या अर्चना सालोदे आणि टेंभुलखेडाच्या वनिता कोसे, चंद्रपूर जिल्ह्यातल्या येनसाच्या अंजली बोरेकर, कोल्हापूर जिल्ह्यातल्या हनबरवाडीच्या अक्काताई ढेरे आणि ठाणे जिल्ह्यातल्या रेतीबंदरच्या स्नेहा क्षीरसागर, यांचा यामध्ये समावेश आहे. येत्या सोमवारी या पुरस्कारांचं नवी दिल्लीत वितरण होणार आहे. **** औरंगाबाद इथं कालपासून सहाव्या पक्षी महोत्सवाला सुरूवात झाली. शहरातल्या एमआयटी महाविद्यालयात आयोजित महोत्सवाचं उद्घाटन वसुंधरेचं पूजन करून करण्यात आलं. उद्यापर्यंत चालणाऱ्या या महोत्सव विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दुपारी तीन वाजता सरस्वती भुवन महाविद्यालयात विविध कार्यक्रम होणार असून, उद्या पैठण इथं पक्षी निरीक्षण होणार आहे. या महोत्सवानिमित्त काल दुर्मिळ पक्ष्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. **** औरंगाबाद इथं येत्या १६ ते १८ जानेवारी दरम्यान नवव्या आंतरराष्ट्रीय लघु सिंचन परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आधुनिक शेतीसाठी लघु सिंचन ही या परिषदेची संकल्प��ा आहे. जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी परिसरात होणाऱ्या या परिषदेच्या अनुषंगाने १५जानेवारीला शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. **** बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. प्रितम मुंडे याच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असतील असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. ते काल बीड इथं वार्ताहरांशी बोलत होते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात पक्ष कार्यकर्ते, तसंच पदाधिकारी आणि नेत्यांच्या आढावा बैठका सुरु असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. **** नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माळेगाव इथल्या खंडोबा यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. श्री खंडोबा देवस्थानापासून परंपरेनुसार देवांची पालखी काढण्यात आली. ८ तारखेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत कृषी प्रदर्शन, विविध स्पर्धा तसंच लोक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. **** संस्कृत पंडित आणि मीमांसा तज्ज्ञ डॉ. दामोदर विष्णू उर्फ दा. वि. गर्गे यांचं काल पहाटे औरंगाबाद इथं निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. महाराष्ट्र शासनाच्या संस्कृत पंडित पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यां��्या पार्थिव देहावर काल सायंकाळी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. **** अहमदनगर इथं दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. पोलिसांनी शहरातल्या वंजारगल्ली परिसरात छापा टाकून जवळपास ४१ हजार रुपये दर्शनी मूल्याच्या नोटा जप्त केल्या. **** भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सिडनी इथं सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या एक बाद ११७ धावा झाल्या आहेत. काल भारतानं आपला पहिला डाव सात बाद ६२२ धावांवर घोषीत केला. **** बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं आजपासून झेप राज्यस्तरीय पाचव्या मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. साहित्य, वृत्तपत्र आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठीचे मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येतील. ***** ***
0 notes
healthandfitness146 · 6 years ago
Text
Rafale deal : संरक्षण खरेदी प्रक्रियेकडे दुर्लक्ष का केले?, सरकारने उत्तर द्यावे : चिदंबरम
Rafale deal : संरक्षण खरेदी प्रक्रियेकडे दुर्लक्ष का केले?, सरकारने उत्तर द्यावे : चिदंबरम
चिंदबरम यांनी हा देखील दावा केला की, युपीए सरकारद्वारे निश्चित करण्यात आलेल्या प्रत्येक विमानाची किंमत आणि एनडीए सरकार ज्या किंमतीसाठी तयार झाले आहे, यामध्ये मोठी तफावत आहे.
from LoksattaLoksatta https://ift.tt/2MJaPqP
View On WordPress
0 notes
aryauniversal · 7 years ago
Photo
Tumblr media
कृतज्ञतेचा निर्देशांक एकट्याने प्रवास करताना एअरपोर्टवर विमानाची वाट पाहत थांबायची वेळ आली की त्यावेळचा माझा सर्वात आवडता छंद म्हणजे एअरपोर्टवरचं पुस्तकांचं दुकान शोधून काढायचं आणि पुस्तकं, मासिकं चाळायची. एक तर नवीन पुस्तकांना एक प्रकारचा विशिष्ट सुगंध येतो तो मला खूप आवडतो. आणि दुसरं म्हणजे पुस्तकं, मासिकं चाळल्यामुळे नवीन विचार कळतात, नवीन ट्रेंड समजतात, जग कुठे चाललंय याची दिशा कळते. माझ्या आयुष्याला वळण देणारी खूपशी पुस्तक मला अशीच चाळता चाळता एअरपोर्टवरच मिळाली आहेत आणि त्यातली बरीचशी विमानातच वाचून फस्तही झाली आहेत. असंच एकदा एक मासिक चाळताना त्यातील एका लेखामधील एका वाक्याने मला विचारमग्न केलं. आयुष्यातली सकारात्मकता याविषयावरचा तो लेख होता. मूळच्या इंग्रजीमधील लेखामधील ते वाक्य असं होतं; " Sometimes, try calculating your gratitude index in life,  you will realize how lucky you are!". (कधीतरी तुमच्या आयुष्यातील कृतज्ञता निर्देशांक मोजण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती नशीबवान आहेत ते!). मला 'कृतज्ञतेचा निर्देशांक' ही कल्पनाच भन्नाट आवडली. जसं स्टॉक मार्के�� मध्ये स्टॉक इंडेक्स कि��वा ट्रेडिंग इंडेक्स असतात आणि त्यांच्या मूल्यावरून बाजाराची तब्येत ठरवली जाते, तसाच कृतज्ञताभावनेचे चढउतार मोजणारा हा कृतज्ञता निर्देशांक आपल्या मानसिकतेची तब्येत ठरवू शकेल असं मनात आलं.  लगेच माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं की माझ्या आयुष्यातल्या कृतज्ञता कशा मोजायच्या? कृतज्ञता निर्देशांक कसा ठरवायचा? आणि तो दैनंदिन जीवनात कसा आणायचा?. अधिक विचार केल्यावर मला काही कल्पना सुचल्या त्या अशा;  १. माझ्या निसर्गदत्त संपदांबद्दल कृतज्ञता मोजणे: म्हणजे धडधाकट शरीर मिळालं, धडधाकट अवयव मिळाले, विचारी संवेदनशील मन मिळालं,  या बद्दल कृतज्ञता बाळगणे. मला लक्षात आलं की धडधाकट शरीर असणं, कार्यक्षम अवयव असणं हे आपण गृहीत धरतो, पण कार्यक्षम डोळ्यांची किंमत नेत्रविहीन व्यक्तींना विचारात घेतलं तर कळेल, धडधाकट हातपायांची किंमत अपंगांना विचारात घेतलं तर कळेल. संवेदनशील विचारी मनाची किंमत मनोरुग्णांची परिस्थिती पाहून कळेल. आणि एकदा हा मुद्दा लक्षात आला की निरोगी, सुदृढ शरीराबद्दल आपोआप कृतज्ञता मनात दाटून येईल.  २. मला मिळालेल्या नात्यांच्या बाबतीत कृतज्ञता मोजणे: आपल्याला लाभलेले माता, पिता, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या, मावशी आपलं विस्तारित कुटुंब यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे. ही नाती जन्म झाल्यावर आपल्याला सहज मिळतात म्हणून खूप वेळा किंमत नसते आपल्याला. छोट्या छोट्य
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03  January 2018 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि. ****  विजया आणि देना बँकेचं, बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी  राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारप्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची विरोधी पक्षाची मागणी सरकारनं फेटाळली  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध विकासकामांचं उद्घाटन  निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं निधन आणि  ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या डावात उपाहारापर्यंत एक बाद ६९ धावा ***** विजया बँक आणि देना बँक, या दोन बँकांचं बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या विलीनीकरणानंतर बँक ऑफ बडोदा ही देशातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक ठरेलं. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, राष्ट्रीय आरोग्य संस्थेची पुनर्रचना करण्यास मंत्रिमडळानं काल मंजुरी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील हे प्राधिकरण या योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी जलदगतीनं निर्णय घेईल. **** राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारप्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची विरोधी पक्षाची मागणी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी फेटाळून लावली आहे. काल लोकसभेत या मुद्यावर झालेल्या चर्चेदरम्यान, जेटली यांनी, राफेल खरेदी प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतरांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. राहूल गांधी यांचे आरोप काल्पनिक स्वरूपाचे असून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं केलेल्या व्यवहाराच्या तुलनेत, या करारात विमानाची किंमत नऊ टक्के तर शस्त्रसज्ज विमानाची किंमत २० टक्क्यांनी कमी असल्याचा दावा जेटली यांनी केला. खरेदी व्यवहार नियमानुसार झाला असून सर्वोच्च न्यायालयानंही यावर शिक्कामोर्तब केलं आहे. यामुळे संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नसल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी या चर्चेला प्रारंभ करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारविरूद्ध विविध आरोप केले. एक��े सव्वीस विमानांच्या खरेदीचा पूर्वीचा करार बदलून तो फक्त छत्तीस विमानांचा का करण्यात आला, यासह अन्य मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केले. या खरेदीच्या व्यवहारात अनेक त्रुटी असल्याचं सांगत गांधी यांनी, माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे आरोग्यमंत्री यांच्यात राफेल व्यवहारासंदर्भातल्या संभाषणाची ध्वनिफीत, सभागृहात वाजवण्याची परवानगी मागितली. मात्र या ध्वनिफीतीचं प्रमाणीकरण झालेलं नसल्यामुळे अध्यक्षांनी ध्वनिफीत सभागृहात वाजवण्याची परवानगी नाकारली. या प्रकरणाबाबत संयुक्त संसदीय समिती नेमावी, अशी मागणी गांधी यांनी केली. दरम्यान, सभागृहात सातत्यानं गदारोळ केल्यामुळे अण्णा द्रमुकच्या २६ सदस्यांना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काल पाच बैठकींसाठी निलंबित केलं. दुसरीकडे राज्यसभेचं कामकाज अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी वारंवार व्यत्यय आणल्यामुळे उपसभापती हरिवंश सिंह यांनी दिवसभरासाठी तहकूब केलं. **** प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी ‘लोकसंवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते. योजनांसाठीचं अनुदान थेट बँकेतून मिळत असल्यामुळे राज्य शासनाच्या योजना जलदगतीनं सर्वसामान्यांपर्यंत पोचल्या असल्याच्या तसंच त्या पारदर्शकपणे राबवल्या जात असल्याच्या भावना लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. **** तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारासाठी यावर्षी बशीर कमरोद्दिन मोमीन कवठेकर, यांची निवड करण्यात आली आहे. ��ांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल ही घोषणा केली. पाच लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. **** राज्यातल्या ३५९ नगरपरिषदा आणि नगर पचायतीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरु केलेलं कामबंद आंदोलन, काल स्थागित केलं. राज्य नगरपरिषद संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी काल मुंबईत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसेकर, यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आपल्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा केली या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचं तसंच २७ मार्च २००० पर्यंतच्या रोजदारी कर्मचाऱ्यांना ३१ जानेवारी २०१९ पर्यंत कायम करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर संघटनेनं काम बंद आंदोलन मागे ��ेण्याची घोषणा केली. कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांविषयी सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन, प्रशासनाकडून देण्यात आल्याचं संघटनेच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांचं फुलंब्री इथं हेलिकॉप्टरने आगमन होईल. फुलंब्री इथं विविध प्रशासकीय इमारती, तसंच विकासकामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री हेलीकॉप्टरने सातारा परिसरातल्या श्रीयश अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाकडे प्रस्थान करतील. त्यानंतर उच्चतम कृषी बाजार समितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल इथल्या सभेनंतर, सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यशाळेला संबोधित करतील. सायंकाळी सहा वाजता टी.व्ही. सेंटर चौकात रस्त्यांच्या व्हाईट टॅपिंग कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. **** मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं आज पहाटे नागपूर इथं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग घेतलेले धर्माधिकारी यांनी, १९५६ साली उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून वकिली सुरू केली. १९८९ मध्ये निवृत्त झाल्यानंतर धर्माधिकारी यांनी विविध न्यायाधिकरणं तसंचं समित्यांचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. २००३ साली शासनानं त्यांचा पद्मभुषण सन्मानानं गौरव केला होता. **** प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. १९४३ पासून ते क्रिकेट विश्वात नावाजलेले प्रशिक्षक म्हणून प्रसिध्द होते. भारतरत्न सचिन तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंची कारकीर्द त्यांनी घडवली. पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आचरेकर यांच्या निधनानं भारतीय क्रिकेट क्षेत्राला उत्तोमत्तम खेळाडूंची देणगी देणारा प्रशिक्षक हरपला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रध्दांजली वाहिली आहे. **** क्रिकेट - भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिकेत सिडनी इथं, चौथ्या कसोटीला आजपासून प्रारंभ झाला. भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. उपाहारापर्यंत भारताच्या एक बाद ६९ धावा झाल्या होत्या. लोकेश राहुल अवघ्या नऊ धावांवर बाद झाला. मयंक अग्रवाल ४२ तर चेतेश्वर पुजारा १६ धावांवर खेळत आहेत. **** बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियानांतर्गत, लातूरच्या क्रीडा संकुलावर काल एक भव्य मानवी साखळीच्या माध्यमातून ��नजागृती करण्यात आली. लातूरमधल्या स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. **** स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्यावतीनं दर वर्षी दिला जाणारा स्वातंत्र्य सैनिक वि. वा. देसाई पुरस्कार या वर्षी बीडच्या शांतिवन या संस्थेला दिला जाणार आहे. आज संध्याकाळी औरंगाबादमध्ये होणार आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31  October 2018 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ दुपारी १.०० वा. **** सरदार पटेल यांच्या व्यक्तिमत्त्वात कौटिल्याची कूटनीति आणि शिवाजी महाराजांच्या शौऱ्याचा संगम असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात, देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वोच्च ��ुतळ्याचं, स्टॅच्यू ऑफ युनिटीचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सरदार पटेल यांनी देश स्वतंत्र झाल्यावर, विविध संस्थानं भारतात विलीन करून घेतली. आज आपण कच्छपासून कोहिमापर्यंत आणि कारगीलपासून कन्याकुमारी पर्यंत विनाअडथळा भ्रमण करू शकतो, त्याचं संपूर्ण श्रेय सरदार पटेलांना असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला, मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सरदार पटेल यांचा हा १८२ मीटर उंच भव्य पुतळा साकारणारे शिल्पकार राम सुतार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या पुतळ्याच्या परिसरात साकारण्यात आलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - पुष्पवाटिका तसंच वॉल ऑफ युनिटी - एकता भिंतीचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. देशभरातल्या विविध ठिकाणाहून आणलेल्या मातीपासून तयार केलेल्या या भिंतीवर एक भारत श्रेष्ठ भारत हे वाक्य सतरा भारतीय भाषांमधून लिहिलेलं आहे. देशभरातून आलेल्या कलापथकांनी यावेळी देशाचं सांस्कृतिक वैविध्य दर्शवणारी नृत्यं सादर केली. सरदार पटेल यांच्या या भव्य पुतळ्याला, देशभरातल्या विविध नद्यांचं जल तसंच पुष्प अर्पण करून, पंतप्रधानांनी या त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. वायुदलाच्या हेलिकॉप्टर्समधून या सर्वोच्च पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. **** सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी देशभरात 'एकता दौड'चं आयोजन केलं जातं. मुंबईत राज्यपाल सी विद्यासागर राव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला. राज्यपाल तसंच मुख्यमंत्र्यांनी सरदार पटेल तसंच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबाद इथं, महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौड 'रन फॉर युनिटी' ला सुरुवात झाली. क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंत आयोजित या एकता दौडमध्ये, लहान मुलांसह युवक-युवती तसंच अनेक नागरिक सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. महावीर चौक इथं एकता दौडचा समारोप झाला, विजेत्या स्पर्धकांचा यावेळी पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. **** भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरणानं देशभरात ५३ शहरांमध्ये आधार सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांवर आधार नोंदणी आणि सु��ारणा करण्यात येईल, असं प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भुषण ��ांडेय यांनी सांगितलं. पारपत्र सेवा केंद्रांच्या संकल्पनेवर आधारीत आधार सेवा केंद्रांमध्ये नागरिकांना सहजरित्या आधारसंबंधी सेवा देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. **** भारत आणि फ्रान्स यांच्यादरम्यान झालेल्या राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात विमानाची किंमत उघड करता येणार नाही, असं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं दहा दिवसात सादर करावं, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या कराराविषयीची धोरणात्मक तसंच गोपनीय माहिती उघड करता येणार नाही, मात्र सार्वजनिक करता येईल, अशी माहिती याचिकाकर्त्यांना द्यावी, असे निर्देशही सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती यु यु ललित आणि के एम जोसेफ यांच्या पीठानं दिले आहेत. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या १४ नोव्हेंबरला होणार आहे. **** नवी दिल्लीत काल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक स्थैर्य आणि विकास परिषदेची १९ वी बैठक झाली. जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक सद्य परिस्थिती आणि आर्थिक क्षेत्राच्या कामगिरिचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. चालू व्याजदर, सद्य स्थितीतली आर्थिक तरलता, म्युच्युअल फंड आणि नॉन बँकिंग आर्थिक कंपन्यांमधल्या वित्तीय तरलतेसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. या सर्व आर्थिक परिस्थितीवर नियंत्रक आणि केंद्र सरकार जातीने लक्ष ठेवून असेल तसंच आवश्यक ती पावलं उचलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल, तसंच प्रतिभूती आणि नियामक महामंडळ - सेबीसह अन्य नियामक मंडळांचे अध्यक्ष तसंच वित्त मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. *****
0 notes
aryauniversal · 7 years ago
Photo
Tumblr media
कृतज्ञतेचा निर्देशांक एकट्याने प्रवास करताना एअरपोर्टवर विमानाची वाट पाहत थांबायची वेळ आली की त्यावेळचा माझा सर्वात आवडता छंद म्हणजे एअरपोर्टवरचं पुस्तकांचं दुकान शोधून काढायचं आणि पुस्तकं, मासिकं चाळायची. एक तर नवीन पुस्तकांना एक प्रकारचा विशिष्ट सुगंध येतो तो मला खूप आवडतो. आणि दुसरं म्हणजे पुस्तकं, मासिकं चाळल्यामुळे नवीन विचार कळतात, नवीन ट्रेंड समजतात, जग कुठे चाललंय याची दिशा कळते. माझ्या आयुष्याला वळण देणारी खूपशी पुस्तक मला अशीच चाळता चाळता एअरपोर्टवरच मिळाली आहेत आणि त्यातली बरीचशी विमानातच वाचून फस्तही झाली आहेत. असंच एकदा एक मासिक चाळताना त्यातील एका लेखामधील एका वाक्याने मला विचारमग्न केलं. आयुष्यातली सकारात्मकता याविषयावरचा तो लेख होता. मूळच्या इंग्रजीमधील लेखामधील ते वाक्य असं होतं; " Sometimes, try calculating your gratitude index in life,  you will realize how lucky you are!". (कधीतरी तुमच्या आयुष्यातील कृतज्ञता निर्देशांक मोजण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती नशीबवान आहेत ते!). मला 'कृतज्ञतेचा निर्देशांक' ही कल्पनाच भन्नाट आवडली. जसं स्टॉक मार्केट मध्ये स्टॉक इंडेक्स किंवा ट्रेडिंग इंडेक्स असतात आणि त्यांच्या मूल्यावरून बाजाराची तब्येत ठरवली जाते, तसाच कृतज्ञताभावनेचे चढउतार मोजणारा हा कृतज्ञता निर्देशांक आपल्या मानसिकतेची तब्येत ठरवू शकेल असं मनात आलं.  लगेच माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं की माझ्या आयुष्यातल्या कृतज्ञता कशा मोजायच्या? कृतज्ञता निर्देशांक कसा ठरवायचा? आणि तो दैनंदिन जीवनात कसा आणायचा?. अधिक विचार केल्यावर मला काही कल्पना सुचल्या त्या अशा;  १. माझ्या निसर्गदत्त संपदांबद्दल कृतज्ञता मोजणे: म्हणजे धडधाकट शरीर मिळालं, धडधाकट अवयव मिळाले, विचारी संवेदनशील मन मिळालं,  या बद्दल कृतज्ञता बाळगणे. मला लक्षात आलं की धडधाकट शरीर असणं, कार्यक्षम अवयव असणं हे आपण गृहीत धरतो, पण कार्यक्षम डोळ्यांची किंमत नेत्रविहीन व्यक्तींना विचारात घेतलं तर कळेल, धडधाकट हातपायांची किंमत अपंगांना विचारात घेतलं तर कळेल. संवेदनशील विचारी मनाची किंमत मनोरुग्णांची परिस्थिती पाहून कळेल. आणि एकदा हा मुद्दा लक्षात आला की निरोगी, सुदृढ शरीराबद्दल आपोआप कृतज्ञता मनात दाटून येईल.  २. मला मिळालेल्या नात्यांच्या बाबतीत कृतज्ञता मोजणे: आपल्याला लाभलेले माता, पिता, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या, मावशी आपलं विस्तारित कुटुंब यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे. ही नाती जन्म झाल्यावर आपल्याला सहज मिळतात म्हणून खूप वेळा किंमत नसते आ��ल्याला. छोट्या छोट्य
0 notes