Tumgik
#विधानभवन
airnews-arngbad · 26 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, सर्जन, व्हॉईस ॲडमिरल, एम्सचे संचालक आणि न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक यांचा समावेश आहे. कोलकाता इथल्या आरजीकार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं, वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली होती.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ३० ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २४ मतदारसंघात येत्या आठ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
****
नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी केंद्र सरकरानं नव्या सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामुळे तक्रार निवारण व्यवस्था प्रणाली अधिक सुसूत्र होऊन नागरिकांच्या अधिकारातही वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी जी पोर्टल डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर नागरिक तक्रार दाखल करु शकतात. ही एकल खिडकी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मंत्रालय विभागांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, हे अधिकारी या तक्रारींचं वर्गीकरण करतील आणि प्रलंबित खटल्यांच्या निपटाऱ्यावर देखरेख ठेवतील. प्रत्येक मंत्रालयासाठी एक समर्पित तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून, २१ दिवसात प्रत्येक तक्रारींचं निवारण करणं आणि सर्व विभागांनी तक्रार निवारणाचा वेळोवेळी आढावा घेणं अनिवार्य आहे.
****
छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात २५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यापैकी तिघांवर प्रत्येकी आठ लाखाचं, एकावर तीन लाखांचं तर दोन नक्षलवाद्यांवर प्रत्येकी एक लाखांचं बक्षिस होतं. या नक्षलवाद्यांना छत्तीसगढ राज्यसरकारने प्रत्येकी २५ हजार रुपयांचा पुनर्वसन निधी दिला आहे.
****
राज्यात आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. गोविंदा पथकं आज सर्वाजनिक मंडळांद्वारे आयोजित दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत.
मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. ठीकठिकाणी मानाच्या दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे मुंबईत राजकीय पक्षही यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. त्यांनीही भरघोस बक्षीसं ठेवून दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकेही या उत्सवात सक्रिय आहेत. मागाठाणे इथं शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सूर्वे यांची दहिहंडी लक्षवेधी ठरणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत. मुंबई ठिकाणी दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटी उत्सव सहभागी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदीर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत या मर्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
****
महिला आणि मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विधानभवन इथं काल बैठक घेण्यात आली. शैक्षणिक संस्थांमधून महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष मोहिमेद्वारे उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचना गोऱ्हे यांनी यावेळी केली.
****
मुसळधार पावसामुळे गुजरातच्या अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या आप्तकालीन साहाय्य केंद्रात उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला.
राज्यातही अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
****
नेपाळमध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघानं आयोजित केलेल्या वीस वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल भारतीय संघाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. हा सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानं बांगलादेशानं पेनल्टी शूटआऊटच्या बळावर ४-३ अशी मात करून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
****
0 notes
mhlivenews · 10 months
Text
मुख्यमंत्री मागावर्ग आयोग अध्यक्षांना उठसुठ बोलवायचे, चंद्रलाल मेश्राम यांचा खळबळजनक खुलासा
नागपूर : मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी एकदा बैठकीत सांगितले होते की मुख्यमंत्री त्यांना उठसुठ बोलवितात असा खळबळजनक उल्लेख करत आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना खुलासा केला.मागासवर्ग आयोगावर राज्य सरकारचा दबाव होता, असा आरोप सातत्याने होत आहे. त्यातूनच अध्यक्षांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाचे सदस्य चंद्रलाल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 10 months
Text
0 notes
wnewsguru · 1 year
Text
0 notes
sureshsgupta · 1 year
Text
Tumblr media
| आज विधानसभा उपाध्यक्ष मा श्री नरहरी जिरवाल से विधानभवन में मिलकर फ़िल्म इंडस्ट्री के कई मुद्दों पर चर्चा की |
#SureshShyamlalGupta #NarhariZirwal
@narhari_zirwal @aicwaofficial
0 notes
marketingstrategy1 · 2 years
Text
Up Budget Session 2023:यूपी विधानसभा की कार्यमंत्रणा समिति और सर्वदलीय बैठक आज - All Party Meeting Today For Budget Session In Uttar Pradesh.
यूपी विधानभवन। – फोटो : amar ujala विस्तार यूपी विधानसभा की कार्यमंत्रणा समिति और सर्वदलीय बैठक अब से कुछ ही देर में विधानभवन में होगी। इसके बाद विधानसभा अध्यक्ष सतीश महाना की ओर से भोज भी दिया जाएगा। बैठक में सदन को चलाए जाने के बाबत समिति के सदस्यों के साथ बैठक होगी। सतीश महाना 12:30 बजे सर्वदलीय बैठक करेंगे जिसमें सभी दलों के सदस्यों से सदन को सुचारू रूप से चलाने के लिए अनुरोध भी किया जाएगा।…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
‘लोकराज्य’मधील विषय समाज परिवर्तनशील - विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
‘लोकराज्य’मधील विषय समाज परिवर्तनशील – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नागपूर, दि.21 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकामधील विषय हे समाज परिवर्तनशील असल्याचे गौरवोद्गार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधानभवन परिसरात शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या दुर्मिळ अंकांचे प्रदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लावण्यात आले आहे. या प्रदर्शनास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज्यात चर्चा एका पाटीची… कोण आहेत बंगल्याचे मालक? हिवाळी अधिवेशनाआधी विषय तापला
राज्यात चर्चा एका पाटीची… कोण आहेत बंगल्याचे मालक? हिवाळी अधिवेशनाआधी विषय तापला
राज्यात चर्चा एका पाटीची… कोण आहेत बंगल्याचे मालक? हिवाळी अधिवेशनाआधी विषय तापला नागपूरः महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter session) येत्या 19 डिसेंबर रोजी नागपुरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर एका नव्याच गोष्टीची चर्चा सुरु आहे. ही चर्चा आहे एका पाटीची. स्थळ आहे. नागपूर विधानभवन परिसर. पाटीवर नाव आहे नरहरी झिरवळ, विधानसभा उपाध्यक्ष…. महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोडीनंतर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा शासननिर्णय जारी-विरोधकांकडून हक्कभंगाचा आरोप
बंदीजनांना पुनर्वसनाची संधी देण्यासाठी लातूर जिल्हा कारागृहाचा अभिनव उपक्रम
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान अंतिम सामना
****
राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत यासंदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती. यासंदर्भात तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी, लवकरच नियमावली तयार करून इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यासंदर्भात विधानभवन परिसरात बातमीदारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, या यात्रेबद्दल लवकरच धोरण ठरवण्यात येणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, राज्यात केवळ मुंबई, ठाणे, पुणेच नाही तर जिथे जिथे ड्रग्ज विकले जाते त्या सर्व ठिकाणी कारवाई सुरु असून, जोपर्यंत महाराष्ट्र ड्रग्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी गणेशमूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना महापालिकांकडून शाडूची माती मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.
अर्थसंकल्पात काल जाहीर झालेल्या लाडकी बहीण या योजनेचा शासननिर्णय काढून विरोधी पक्षनेत्यांना दिला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. परवा एक जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दरम्यान, अर्थसंकल्पात विविध निर्णय घेऊन महिलांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रात कार्यरत महिलांनी आज विधीमंडळ परिसरात मुख्यमंत्र्यांना ओवाळून राखी बांधत, त्यांचे आभार मानले.
****
विरोधकांनी मात्र मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय म्हणजे सार्वभौम सदनाचा हक्कभंग असल्याचा आरोप केला आहे. अर्थसंकल्पाला प्रथम विधीमंडळाची आणि त्यानंतर राज्यपालांची मंजुरी मिळते. त्यानंतर अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यास मान्यता मिळून, शासन निर्णय काढता येतो. परंतु ही प्रक्रिया डावलून मंत्रिमडळाची बैठक घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय काढून सरकारने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते विधानभवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते.
****
राज्यातल्या विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश देण्याच्या परंपरेला सरकारच्या अनागोंदी आणि गैरकारभारामुळे छेद गेल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आज विधान परिषदेत याविषयावर बोलतांना दानवे यांनी, शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेल्यावरही सुमारे ४५ लाख विद्यार्थी गणवेशाविना वंचित असल्याकडे लक्ष वेधलं. येत्या १५ ऑगस्टपर्यंत गणवेश मिळतील, अशी माहिती शासनाने दिल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपयात पिक विमा योजनेत सहभाग नोंदवणं सुरू आहे, मात्र राज्यात काही ठिकाणी सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाच्या वर अवैधरित्या काही आगाऊ रक्कम वसूल करत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आगाऊ पैसे वसूल करणाऱ्या केंद्र चालकांची पुराव्यासह तक्रार आल्यास, कठोर कारवाईचा इशारा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. याबाबत कृषी हेल्पलाइनचा व्हाट्सअप क्रमांक ९८-२२-४४-६६-५५ या क्रमांकावर थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक घेण्यासंदर्भात विधीमंडळ सचिवालयानं केलेली कार्यवाही उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज निवेदनाच्या माध्यमातून सभागृहासमोर मांडली. ८ जुलै २०२२ पासून हे पद रिक्त आहे, याबद्दल राज्यपालांना कळवावं, अशा आशयाचा पत्र व्यवहार संसदीय कार्य विभागासोबत केला होता. यासंदर्भात येत्या सोमवारी सर्वपक्षीय आमदारांसोबत बैठक घेतली जाईल, असं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विधान परिषदेत चर्चा झाली.
पतसंस्थेत ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीना संरक्षण देण्याबाबत सरकारने भूमिका घ्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेत दरेकर बोलत होते. पतसंस्थेतल्या एक लाख रुपयापर्यंतच्या ठेवीना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा फायदा ३ कोटी ठेवीदारांना होणार असल्याचं दरेकर यांनी सांगितलं.
****
सुधारित तीन नवीन फौजदारी कायदे परवा एक जुलैपासून देशभर लागू होत आहेत. या कायद्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने मुंबईत “फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग” या विषयावर परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेत विविध न्यायालयांमधले न्यायमूर्ती, तसंच विधी आणि न्याय मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
अमरनाथ यात्रेसाठी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्प इथून चार हजार २९ यात्रेकरूंची दुसरी तुकडी आज रवाना झाली. जम्मू बेस कॅम्प इथून आतापर्यंत आठ हजार ६३२ यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात कंधार इथून श्री संत साधू महाराज संस्थानच्या पायी दिंडीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं, या दिंडीला तीन शतकांची परंपरा आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर शहरात आज बंद पाळण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची वादग्रतस्त ध्वनीफित व्हायरल झाल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने या बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवून या बंदला प्रतिसाद दिला. दरम्यान, पक्षविरोधी कार्य केल्यामुळे शिवसेना बीड जिल्हाप्रमुख पदावरून कुंडलीक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
****
लातूर जिल्हा कारागृहातल्या बंदीजनांना पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपहारगृह आणि लाँड्री सुरू करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या या उपाहारगृह तसंच लाँड्रीचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –
जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून हे उपाहारगृह तसंच लाँड्री उभारण्यात आली आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था, बांबूपासून साकारलेले बैठक कक्ष हे वैशिष्ट्य असलेल्या या या उपहारगृहासोबतच इथल्या लाँड्रीची पूर्ण व्यवस्था शिक्षेचा कालावधीत पूर्ण होत आलेले खुल्या कारागृहातले कैदी पाहणार आहेत आहे. लाँड्रीची सुविधाही अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून इथं काम करणाऱ्या बंद्यांना वेतन दिलं जाणार आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी शशिकांत पाटील, लातूर
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या महागामी गुरुकुलात प्रातिज्ञ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पुण्याच्या ख्याल गायक पद्मा तळवलकर, ओडिशी नृत्यांगना पद्मश्री कुमकुम मोहंती, तसंच उत्तराखंडच्या लोककलाकार पद्मश्री बसंती बिष्ट यांनी आपापल्या सादरीकरणातून या कलाप्रकारांच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला.
****
चेन्नईच्या एम ए चिदंबरम्‌ मैदानावर सुरू असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण अफ्रिका महिला क्रिकेट संघादरम्यान एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकन महिला संघाच्या चार बाद २३६ धावा झाल्या आहेत. भारताच्या स्नेह राणानं सर्वाधिक तीन खेळाडू बाद केले. त्याआधी सकाळी भारतीय महिला संघानं सहा बाद ६०३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. कर्णधार हरमनप्रीत कौरनं ६९ आणि ऋचा घोषनं ८६ धावा केल्या.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्ध��चा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे. बार्बाडोस इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राम कृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेतील दोन हजार शेतकऱ्यांना कर्जापोटी दिलेली रक्कम राज्य सरकारने भरावी, अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचं, अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
मध्य रेल्वेत रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामामुळे घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉकमुळे काही गाड्यांमध्ये बदल करण्यात आला होता. मात्र, हा लाईन ब्लॉक काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याने या गाड्या नियमित मार्गाने धावणार आहेत.
****
0 notes
mhlivenews · 2 years
Text
कुकडी व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
कुकडी व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
पुणे, दि. १५ : कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. कुकडी डाव्या कालव्याचे रब्बीमधील आवर्तन १ जानेवारी २०२३ रोजी तर घोड डावा व उजव्या कालव्याचे पहिले आवर्तन १० जानेवारी २०२३ रोजी सोडण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, आमदार सर्वश्री दिलीप वळसे पाटील, अशोक…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
अर्थसंकल्प ट्विटची सायबर सेलमार्फत चौकशी करा- विरोधकांची मागणी
अर्थसंकल्प ट्विटची सायबर सेलमार्फत चौकशी करा- विरोधकांची मागणी
मंगळवारी दुपारी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. तर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला होता.
अर्थसंकल्प सादर करत असताना त्यातील मुद्दे हे सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विट अकाऊंटवर टाकण्यात येत होते. त्यावेळी विरोधकांनी गोंधळ घालत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच फोडला असल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर आज (बुधवारी) विरोधकांनी…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील रूग्णालयातील रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडविण्यासाठी रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करण्यात येईल. विधानभवन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सुभाष देशमुख या शेतकऱ्याच्या उपचारात कसूर होणार नाही, त्यांचे प्राण वाचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mumbai-live-news · 2 years
Link
दही हांडी (Dahi handi) खेलते समय घायल हुए गोविंदा की इलाज के दौरान मौत हो जाने के बाद विपक्ष ने शिंदे-फडणवीस (Shinde fadanavis) सरकार को घेर लिया। विपक्ष ने इस मुद्दे को विधानभवन में भी उठाया। इसके बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दहीहांडी में मारे गए गोविंदा को आर्थिक मदद देने का ऐलान किया है। एकनाथ READ MORE
0 notes
marketingstrategy1 · 2 years
Text
Up Vidhan Mandal Session:g-20 समिट के बाद होगा विधानमंडल का बजट सत्र, छह से सात दिन तक चलने की संभावना - Up Vidhan Mandal Session After G20 Summit.
यूपी विधानभवन। – फोटो : amar ujala विस्तार राजधानी लखनऊ में 13 से 15 फरवरी तक होने वाली जी-20 समिट के बाद 16-17 फरवरी से विधानमंडल बजट सत्र शुरू हो सकता है। फरवरी के पहले सप्ताह में कैबिनेट की बैठक में इस प्रस्ताव को मंजूरी दी जा सकती है। पहले दिन राज्यपाल आनंदीबेन पटेल का अभिभाषण होगा। अगले दिन वित्त मंत्री सुरेश खन्ना योगी-2 सरकार का दूसरा और वित्तीय वर्ष 2023-24 का बजट प्रस्ताव पेश करेंगे।…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
संसदीय अभ्यासवर्गात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात यांचे उद्या मार्गदर्शन
संसदीय अभ्यासवर्गात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात यांचे उद्या मार्गदर्शन
नागपूर, दि. 20 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8.30 वा. विधानपरिषद सभागृह, विधानभवन, नागपूर येथे ‘विधिमंडळात विधेयकांचे महत्त्व व कार्यपद्धती तसेच विधिमंडळाचे विशेषाधिकार’ या विषयावर…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
विधानभवन परिसरात दारुच्या बाटल्यांसाठी शोधमोहीम; जिल्हाधिकाऱ्यांचे अजब आदेश, पोलिसांनाही दिली तंबी!
विधानभवन परिसरात दारुच्या बाटल्यांसाठी शोधमोहीम; जिल्हाधिकाऱ्यांचे अजब आदेश, पोलिसांनाही दिली तंबी!
विधानभवन परिसरात दारुच्या बाटल्यांसाठी शोधमोहीम; जिल्हाधिकाऱ्यांचे अजब आदेश, पोलिसांनाही दिली तंबी! दारू अर्थव्यवस्थेला शक्ती देते की नाही, दारूविक्री फक्त काही दुकानांमध्येच व्हायला हवी की सुपर मार्केटमध्येही व्हावी, दारूबंदी असावी की नाही या मुद्द्यांवर नेहमीच चर्चा होत असते. दारूला वरवर बराच विरोध असला, तरी पुन्हा दुसऱ्या वाटेनं दारूचं समर्थन देखील होताना दिसत असतं. पण तरी देखील काही ठिकाणं…
View On WordPress
0 notes