Tumgik
#विजयाला…”
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Gujarat Election Result 2022 : मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “भाजपाच्या विजयाला…”
Gujarat Election Result 2022 : मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “भाजपाच्या विजयाला…”
Gujarat Election Result 2022 : मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “भाजपाच्या विजयाला…” मुंबई – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली.  आतापर्यंत समोर आलेल्या कलावरुन जवळपास चित्र स्पष्ट झालं असून भाजपला गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळताना दिसत आहे.  यामध्ये भाजपने सर्वाधिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर-५२ हजार ३०० कोटीच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण 
खासदार नारायण राणे यांच्या लोकसभा विजयाला शिवसेनेचे विनायक राऊत यांचं न्यायालयात आव्हान
मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं शांतता रॅली
आणि
मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते ५२ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. गोरेगाव इथल्या नेस्को प्रदर्शन केंद्रात रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित २९ हजार ४०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून, गोरेगाव- मुलुंड रस्त्यावरचा जुळा बोगदा, ठाणे - बोरिवली दरम्यानचा बोगदा तसंच, नवी मुंबईत तुर्भे इथं कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. लोकमान्य टिळक टर्मिनसवरच्या नवीन फलाटाचं लोकार्पणही तसंच मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. इंडीयन न्यूजपेपर सोसायटीच्या नव्या इमारतीचं उद्घाटनही पंतप्रधान आज करणार आहेत.
****
प्राप्तिकर विभागानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ६ लाख ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक प्रत्यक्ष कर संकलन केलं आहे तसंच या महिन्याच्या ११ तारखेपर्यंत ७० हजार ९०२ कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. एकूण संकलनात २ लाख ६५ हजार ३३६ कोटी रुपये कॉर्पोरेट कर, ३ लाख ६१ हजार ८६२ कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकर आणि १ हजार ४२६ कोटी रुपये इतर करांचा समावेश असल्याचं प्राप्तिकर विभागानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग- रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या लोकसभेतील विजया विरोधात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. राणे यांनी कपटनीती, पैशांचा वापर आणि मतदारांना धमकावून हा विजय मिळवला आहे, असा आरोप राऊत यांनी याचिकेत आरोप केला आहे. नारायण राणे, त्यांचे पुत्र नीतेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्यामुळे ही याचिका केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कांदा, कापूस आणि सोयाबीन दरांच्या ���ढउताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी गोयल यांची या संदर्भात भेट घेतली, त्यावेळी गोयल यांनी हे आश्वासन दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रातल्या विविध नगरपंचायती तसंच एका नगरपरिषदेतल्या सदस्य पदांच्या ११ रिक्त जागांसाठी, येत्या ११ ऑगस्ट २०२४ रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली. कोल्हापूराच्या हातकणंगले नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेची पोटनिवडणुकीही त्याच दिवशी घेतली जाईल असं आयोगानं कळवलं आहे. मतमोजणी १२ ऑगस्ट ला होणार आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवारांना रविवार २१ जुलै वगळून दिनांक १८ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत, तर २५ जुलै ला अर्जांची छाननी होणार असल्याचं आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला भेट देवून प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी विमानतळ प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रकल्पाच्या वेगवान पूर्ततेसाठी त्यांनी सूचना केल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी विमानतळ प्रकल्पाच्या निर्माण कार्याचं सादरीकरण केलं. नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीकांत शिंदे,  सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
येत्या २६ जुलैला कारगिल विजयाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन साजरा होत आहे. या निमित्ताने कारगिल हेलिपॅडवर एक विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. ‘अपनी सेना को जाने’ नामक या प्रदर्शनात विविध शस्त्र तसंच उपकरणं दाखवण्यात येत आहेत. परिसरातल्या विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, तसंच अनेक नागरिक या प्रदर्शनाला भेट देत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर इथं शांतता रॅली काढण्यात येत आहे. शहरातल्या सिडको भागातल्या वसंतराव नाईक चौक ते क्रांतीचौक या मार्गावर ही रॅली काढण्यात येत आहे. मराठा बांधव मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जालना रस्त्यावर दाखल झाले आहेत. महिलांचा यात लक्षणीय सहभाग आहे. जरांगे यांच्या स्वागतासाठी जागोजागी स्वागत मंच उभारण्यात आले आहेत. दरम्यान, या रॅलीसाठी जरांगे यांचं शहरात आगमन होताच खासदार संदिपान भुमरे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत आतापर्यंत ७९ हजार २६६ महिलांची नोंदणी झाली आहे, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ७७८ महिलांची नोंदणी ऑनलाईन तर ६२ हजार ४८८ महिलांची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने झाली आहे. ग्रामीण भागात नारी शक्ती दूत या ॲपद्वारे अंगणवाडी सेविका तसंच मदतनीसांकडून ही नोंदणी करून घेतली जात आहे.
लातूर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज भरून घेण्याची कार्यवाही गतीने सुरु आहे. या योजनेसाठी प्राप्त अर्जांच्या पहिल्या यादीचं चावडी वाचन आज जिल्ह्यातल्या सर्व शहरी आणि ग्रामीण भागात करण्यात आलं. अर्जदाराची नावं, त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची यावेळी माहिती देण्यात आली. जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी औसा तालुक्यातल्या आलमला इथल्या चावडी वाचनास उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. उदगीर नगरपरिषदेच्या चावडी वाचनास मुख्याधिकारी सुंदर बोंदर हे उपस्थित होते. जिल्ह्यात इतर ठिकाणीही तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी यावेळी चावडी वाचन उपक्रमाला भेट दिली.
अहमदनगर जिल्ह्यात या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांचा समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मदत केंद्र उभारण्यात आलं आहे. आज केडगाव परिसरातल्या मदत केंद्राचं जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं ‘चला जाणून घेऊ या मतदान केंद्राला’ हा दोन दिवसीय उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत मतदारांना मतदान केंद्राची माहिती देणं तसंच त्यासंदर्भातील अडीअडचणी जाणून घेण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सावंगी इथं मतदारांशी संवाद साधला. सरपंच अश्विनी जगदाळे परिसरातील मतदार, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
****
परभणी जिल्ह्यातल्या पर्यावरणाचा योग्य समतोल राखण्यासाठी तसच परभणी जिल्हा सुंदर आणि हरित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्षवल्ली वाढवूया गाव हरित बनवूया राबवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी कळवलं आहे. याबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं आहे. ��र्व वयोगटातील लोकांना या वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करण्यात येणार असून, गाव तिथे घनवन, स्मृति उद्या निर्मिती, नदीकाठी बांबू लागवड करणे, आदी उपक्रम राबवण्यात येणार आहे.
****
मुंबईत कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तीनही रेल्वे मार्गांवरील वाहतूक उशिराने सुरू असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातले नदी, नाले दुथडी भरून वहात आहेत. दरम्यान, अलिबागमध्ये असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे पाण्याची धार लागल्याने दुसऱ्या मजल्यावर पाणी झालं आहे. हवामान विभागाने रायगडला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
पालघर जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला. डहाणू, पालघर, बोईसर, जव्हारसह अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना मोठा पूर आला आहे.
हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अहमदनगर तसंच जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून, मराठवाड्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान: दासून शनाकाने आशिया चषक जिंकला संकटग्रस्त श्रीलंकेला समर्पित | क्रिकेट बातम्या
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान: दासून शनाकाने आशिया चषक जिंकला संकटग्रस्त श्रीलंकेला समर्पित | क्रिकेट बातम्या
कर्णधार दसुन शनाका रविवारी आशिया चषक विजयाला T20 विश्वचषकापूर्वी श्रीलंकन ​​क्रिकेटसाठी “खरी कलाटणी” म्हटले आणि हा विजय संकटग्रस्त राष्ट्राला समर्पित केला. भानुका राजपक्षे यांच्या नाबाद ७१ धावांच्या जोरावर श्रीलंकेने अंतिम फेरीत पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव केला. वानिंदू हसरंगा दुबईमध्ये बॅट आणि बॉलसह अभिनय. अफगाणिस्तानविरुद्ध लाजिरवाणा पराभव पत्करून ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या…
View On WordPress
0 notes
ambajogaimirror · 2 years
Text
देशाच्या स्वातंत्र्याबरोबर हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या विजयाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत.
0 notes
loksutra · 2 years
Text
ऑरेंज आर्मी विजयाचा चौकार मारणार की पंजाब 'सुपर' विजय नोंदवणार, दोन्ही संघांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर केले मजेदार मीम्स
ऑरेंज आर्मी विजयाचा चौकार मारणार की पंजाब ‘सुपर’ विजय नोंदवणार, दोन्ही संघांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर केले मजेदार मीम्स
पंजाब आणि हैदराबाद यांच्यात सामना प्रतिमा क्रेडिट स्रोत: सोशल मीडिया IPL 2022 च्या 28 व्या सामन्यात, केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद (SRH), मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध लढेल. हा सामना जिंकून दोन्ही संघ विजयाला आश्चर्यचकित करण्याचा आणि गुणतालिकेत आपले स्थान सुधारण्याचा प्रयत्न करतील. आयपीएल 2022 चा 28 वा सामना आज पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Text
kargil vijay diwas: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वाहिली श्रद्धांजली
kargil vijay diwas: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वाहिली श्रद्धांजली
[ad_1]
नवी दिल्ली: आज कारगिल विजयाला (Kargil vijay diwas 2020) २१ वर्षे पूर्ण होत आहेत. कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (rajnath singh on kargil vijay diwas) शूर सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजील वाहण्यासाठी युद्ध स्मारकात पोहोचले. राजनाथ सिंह यांच्यासोबत तीन्ही सैन्यदलांचे प्रमुखही उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. ज्यांनी…
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years
Text
भाजपाने मिळवला धनशक्तीच्या जोरावर विजय
भाजपाने मिळवला धनशक्तीच्या जोरावर विजय
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपलिका निवडणूक मध्ये भाजपाचे उमेदवार संजू परब यांनी मिळवलेला विजय हा धनशक्तीच्या जोरावर मिळवला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे उमेदवार बाबू कुडतरकर यांना ३१३ मतांच्या फरकाने निसटत्या विजयाला सामोरे जावे लागले, असे मत माजी नगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केले.               यावेळी महाविकास आघाडी उमेदवार बाबू कुडतरकर यांनी सावंतवाडी…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
गिरीश महाजनांना गुंड सांभाळायची सवय; अनिल गोटेंचा पलटवार
गिरीश महाजनांना गुंड सांभाळायची सवय; अनिल गोटेंचा पलटवार
गिरीश महाजनांना गुंड सांभाळायची सवय आहे, त्यामुळे ���ी बोलण त्यांना विनोदच वाटणार हे सहाजिक आहे. लोकांना हाताशी धरुन इव्हीएम मशिन मॅनेज करुन त्यांनी हा विजय मिळवला. किती इव्हीएम मॅनेज करणार आहोत याच नियोजन त्यांनी आधीच केलं होतं. असा आरोप अनिल गोटे यांनी केला.
धुळ्यातल्या भाजपाच्या विजयाला काल पैशाचा केलेला वापर कारणीभूत ठरला. त्यामुळे ही निवडणूक नाही तर धुळेकरांची फसवणूक आहे, असाही आरोप अनिल गोटे…
View On WordPress
0 notes
healthandfitness146 · 6 years
Text
Asian Games 2018: नीरजच्या सुवर्ण कामगिरीची ‘अमूल’कडून दखल
Asian Games 2018: नीरजच्या सुवर्ण कामगिरीची ‘अमूल’कडून दखल
अमूलने नीरजच्या विजयाला त्यांच्याच अनोख्या आणि मोठ्या कलात्मकपणे साजरा केलं आहे.
from LoksattaLoksatta https://ift.tt/2LwrxF6
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 December 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १६ डिसेंबर २०२१ दुपारी १.०० वा. ****
विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांच्या कामकाजात आजही व्यत्यय आला.
लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेससह, तृणमूल काँग्रेस आणि द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली. विरोधकांच्या घोषणाबाजीतच अध्यक्ष अमि बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र गदारोळ वाढत गेल्यानं अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.
राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम २६७ अन्वये विविध मुद्दे उपस्थित करण्याची मागणी केली. सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी ही मागणी फेटाळून लावली, आणि सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.  
****
अन्न प्रक्रिया, नैसर्गिक शेती यामुळे कृषी क्षेत्राचा कायापालट होण्यास मदत होईल, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. गुजरातमधल्या आणंद इथं नैसर्गिक शेती या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला ते आज संबोधित करत होते. तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेती एकत्र येऊन पूर्ण देशाला दिशा दाखवत असल्याचं ते म्हणाले. रसायने आणि खतांनी हरित क्रांतीमध्ये महत्वाचा वाटा उचलला, मात्र तरीही आपल्याला इतर पर्यायांवरही काम करायला पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले.  
उस्मानाबाद पंचायत समिती सभागृहात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं.
****
भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धात भारतानं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाला, आज ५० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीद सैनिकांना अभिवादन केलं.  
****
ओमायक्रॉनला प्रतिबंध करण्यात सध्या उपलब्ध लस कमी प्रभावी ठरत असल्याचा प्राथमिक अंदाज पुराव्यांवर दिसून येत असल्याचं, जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. संघटनेनं जाहीर केलेल्या अहवालानुसार, लसीचा प्रभाव किंवा पूर्वीच्या संसर्गापासून मिळालेल्या प्रतिकार शक्तीला, नवा ओमायक्रॉन विषाणू किती मात देऊ शकतो हे समजून घेण्यासाठी अधिक आकडेवारीची गरज आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आरोग्य विभागानेही, ओमायक्रॉन विषाणूचा धोका अधिक असल्याचं म्हटलं आहे.
****
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना, राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना, सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातले प्रवेश पूर्णपणे संगणकीकृत करून ऑनलाईन पद्धतीनं राबवण्याची कार्यवाही तातडीनं करण्याचे निर्देश, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. ते काल मंत्रालयात संगणकीकृत ऑनलाईन प्रणालीबाबत आयेजित बैठकीत बोलत होते. यापुढे विद्यार्थी आणि निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या लोकप्रतिनिधींना, पासपोर्टच्या धर्तीवर जात प्रमाणपत्र पडताळणी करून मिळावी, यासाठी ही प्रक्रिया सुद्धा पूर्णपणे ऑनलाईन केली जावी, त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय स्तरावर ७५ लाख पोस्टकार्ड लेखन स्पर्धा घेण्यात आली. याअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातल्या २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या पोस्ट कार्डवरती २०४७ चा भारत देश कसा असेल? यावर आपले विचार पत्राच्या द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहेत.
****
एका अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला परभणी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं, वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अशोक बालटकर असं या आरोपीचं नाव असून, गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यानं, हरभऱ्याचं अमिष दाखवून आठ वर्षांच्या बालिकेला शेतात पळवून नेत अत्याचार केला होता. जिल्हा आणि सत्र न्यायाधिश ए. एम. पाटील यांनी आरोपी अशोक भगवान बालटकर याला २० वर्ष सश्रम कारावास आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातली प्रमुख बाजारपेठ असलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत काल उन्हाळ कांद्याच्या भावात क्विंटल मागे सरासरी ६५० रूपये, तर लाल कांद्याच्या भावात ५५० रूपयांची घसरण झाली. यंदा अवकाळी पावसानं कांद्याच्या पिकाचं नुकसान झालं. तसंच कांद्याच्या भावात क्विंटल मागे ५०० ते ६०० रूपयांची घसरण झाली.
****
स्पेनमध्ये होत असलेल्या बी डब्ल्यू एफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत एच.एस. प्रणॉयनं मलेशियाच्या डॅरेन ल्यू चा २१-सात, २१-१७ असा पराभव केला. तर महिला दुहेरीमध्ये भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डीच्या जोडीनं चीनच्या जोडीचा पराभव करून उप-उपांत्य पूर्वफेरीत प्रवेश केला.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"तेव्हाच कळले...": सचिन तेंडुलकरने विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहण्याचा क्षण उघड केला | क्रिकेट बातम्या
“तेव्हाच कळले…”: सचिन तेंडुलकरने विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहण्याचा क्षण उघड केला | क्रिकेट बातम्या
1983 च्या क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या विजयाची आठवण करून देणारा, महान फलंदाज सचिन तेंडुलकर म्हणाले की कपिल देव-नेतृत्वाखालील संघाच्या मार्की इव्हेंटमध्ये विजयामुळे त्याच्यामध्ये एक दिवस आपल्या देशासाठी ट्रॉफी जिंकण्याची इच्छा निर्माण झाली. आज, भारत कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या विश्वचषक विजयाला वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे. “आयुष्यातील काही क्षण तुम्हाला प्रेरणा देतात आणि…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १६ डिसेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता ****
भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धात भारतानं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाला, आज ५० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या युद्धानंतर बांगलादेश स्वतंत्र झाला; यानिमित्त बांग्लादेशमध्ये साजऱ्या होत असलेल्या ५०व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद कालपासून तीन दिवस बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकात स्वर्णिम विजय मशाल स्वागत आणि सन्मान सोहळ्यात सहभागी झाले. गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकातंच स्वर्णिम विजय मशाल आणि अन्य चार अन्य मशालीही प्रज्ज्वलित केल्या होत्या. या मशाली आज राष्ट्रीय युद्ध स्मारकावर प्रज्वलित केलेल्या मुख्य मशालीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या.
****
गुजरातमधल्या आणंद इथं नैसर्गिक शेती या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात दूरदृष्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत. शेतीशी संबंधित असलेल्यांनी तसंच कृषी आधारित स्टार्टअप्सनी या परिषदेत सहभागी व्हावं, असं आवाहन, पंतप्रधानांनी ट्विटद्वारे केलं आहे.
****
रूपे डेबिट कार्ड आणि कमी रकमेच्या भीम-युपीआय व्यवहारांना चालना देण्यासाठी प्रोत्साहन योजनेला, केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत बँकांना व्यवहारातील रकमेच्या टक्केवारीचा निधी देऊन कमी मूल्याच्या भीम-यूपीआय व्यवहारांना प्रोत्साहित केले जाणार आहे. यामुळे देशात डिजिटल व्यवहारांना चालना मिळेल, तसंच बँकिंग सुविधा नसलेल्यांना डिजिटल साधनांनी व्यवहार करणं यामुळे शक्य होईल.
****
इतर मागास प्रवर्ग-ओबीसींचं २७ टक्के आरक्षण रद्द करुन निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजबाबतचा इम्पिरिकल डेटा सादर करेपर्यंत राज्यातल्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी राज्य सरकारची मागणीही न्यायालयानं फेटाळून लावली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 September 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०४ सप्टेंबर २०२१ दुपारी १.०० वा. ****
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत पी फोर मिश्रित ५० मीटर पिस्तूल एस एच वन प्रकारात भारताच्या मनिष नरवाल आणि सिंहराज यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकलं आहे. सिंहराजचं या स्पर्धेतलं हे दुसरं पदक आहे. यासह भारताच्या पदकांची संख्या १५ झाली आहे. ज्यामध्ये तीन सुवर्ण, सात रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी या खेळाडुंचं अभिनंदन केलं आहे.
बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या एस एच सिक्स प्रकारात भारताच्या क्रिष्णा नागरनं, एस एल फोर प्रकारात सुहास यथीराजनं, तर एसएल थ्री प्रकारात प्रमोद भगत यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीच्या एसएलथ्री एसयूफाईव्ह प्रकारात प्रमोद भगत आणि पलक कोहली यांचा उपान्त्य फेरीत पराभव झाला. त्यांचा आता कांस्य पदकासाठी सामना होणार आहे.
****
देशभरात कोरोनाची दुसरी लाट पूर्णतः ओसरण्याआधीच रुग्णसंख्या वाढू लागली आहे. काल सलग दुसऱ्या दिवशी उपचाराधीन रुग्णसंख्येतली वाढ दहा हजारापेक्षा जास्त होती. देशभरातल्या निम्म्याहून अधिक राज्यांमधली रुग्ण संख्या वाढली असून सर्वाधिक वाढ केरळमध्ये आहे.
दरम्यान, देशात काल नव्या ४२ हजार ६१८ नव्या कोविड बाधितांची नोंद झाली, तर ३३० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशात काल ३६ हजार ३८५ रुग्ण बरे झाले. सध्या देशभरात चार लाख पाच हजार ६८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
कोर्बेव्हॅक्स या आणखी एका स्वदेशी लसीला दोन वैद्यकीय चाचण्यांसाठी भारतीय औषध महानियंत्रक संस्थेनं काल मंजुरी दिली. बायोलॉजिकल ई या निर्मात्या संस्थेला पाच ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांवरच्या चाचण्यांना, काही अटींवर परवानगी मिळाली आहे.
****
सणासुदीच्या तोंडावर राज्यात घाऊक बाजारातल्या साखरेच्या दरात चांगलीच तेजी पाहायला मिळत असून, आगामी काळात हे दर असेच वाढत राहतील, असा अंदाज साखर उद्योगाकडून व्यक्त होत आहे. घाऊक बाजारात साखरेला उच्चांकी तीन हजार ५०० रुपये दर मिळाला असून, काही कारखान्यांनी तर तीन हजार ६०० रुपये दराने साखर विक्री सुरु केली आहे. अवघ्या १५ दिवसांत साखरेच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाल्यानं कारखानदारांकडून मोठ्या प्रमाणावर साखर विक्री सुरु झाली आहे.
****
१९७१ च्या युद्धात भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्वर्णिम विजय वर्षाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, विजय ज्योत काल मुंबईत कलिना इथल्या हवाई दलाच्या केंद्रात दाखल झाली. भारताच्या विजयाचं प्रतीक असलेली विजय ज्योत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ डिसेंबर २०२० रोजी दिल्ली इथं प्रज्वलित केली, आता या ज्योतीचा देशभरात चारही दिशांना प्रवास सुरु आहे. हवाई अधिकारी कमांडिंग एअर व्हाईस मार्शल एस.आर.सिंह यांनी, या युद्धात सहभागी झालेल्या ज्येष्ठ सैनिकांना सन्मानित केलं.
****
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुष आपके द्वार उपक्रमात मोफत औषधी वनस्पती वाटपाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते आज झालं. विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या वतीनं पुढील आठ दिवस शतावरी, अडुळसा, गुळवेल आदी औषधी वनस्पतीचं सर्वांना मोफत वाटप केलं जाणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या बँक ऑफ बडोदामध्ये पीक कर्जाच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी काल ठिय्या आंदोलन केलं. यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसांत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करू, असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यात राज्य सरकारनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावं या मागणीचा महत्वपूर्ण ठराव, महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काल मंजूर करण्यात आला. दूरदृश्यप्रणालीनं ही सभा घेण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या मैदानावर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातल्या खेळाडू तसंच लोककलावंतांनी या आंदोलनात हजेरी लावली.
****
वाशिम जिल्ह्यात सद्यपरिस्थितीत सोयाबीनवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानं धोक्यात आलेलं सोयाबीन पीक वाचवण्यासाठी महागड्या कीटकनाशकाची फवारणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. ही फवारणी करताना मागील एका महिन्याभरात १४ जणांना विषबाधा झाल्याची घटना वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातल्या कामरगाव परिसरात घडली. त्यामुळे विषबाधेच्या या घटना टाळण्यासाठी फवारणी करतांना मास्क, चष्मा आणि हात मोजे घालून काळजीपूर्वक औषध फवारणी करावी असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केलं आहे.
****
0 notes
digimakacademy · 4 years
Text
'त्या' दिवशी वाटले, मी अमिताभ बच्चन आहे; भारतीय क्रिकेटपटू!
‘त्या’ दिवशी वाटले, मी अमिताभ बच्चन आहे; भारतीय क्रिकेटपटू!
[ad_1]
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने परदेशात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयांमध्ये २००२ सालच्या नेटवेस्ट मालिकेचा समावेश होतो. ३२६ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था ५ बाद १४६ अशी झाली होती. तेव्हा मैदानात उतरले मोहम्मद कैफ आणि युवराज सिंगही जोडी. या विजयात कैफने त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम अशी खेळी केली होती. भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासात या विजयाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. संघातील…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 December 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ डिसेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** हिंसाचारापासून दूर राहण्याचं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान न करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जनतेला आवाहन ** नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ** राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज दिल्लीत वितरण आणि ** अंतिम सामन्यात विजय मिळवत भारतानं वेस्ट इंडिजविरूद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका दोन-एक फरकानं जिंकली **** जनतेनं हिंसाचारापासून दूर राहावं, तसंच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नये, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यांचा विशिष्ट धर्माच्या लोकांशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी संदर्भात सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून ही बाब, आसामशी संबंधित असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. शेजारच्या देशांमध्ये धार्मिक छळ झाल्यानं भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. सरकारच्या विविध विकास कामांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, विरोधी पक्षांना, सरकारच्या प्रयत्नांमध्ये भेदभाव शोधून दाखवण्याचं आव्हान दिलं. **** नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल या कायद्याच्या समर्थनार्थ भाजप, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि लोकाधिकार मंचाच्या मेळाव्यात ते बोलत होते. हा कायदा अल्पसंख्याकांच्या बाबतीत कसलाही भेदभाव करत नाही, विरोधी पक्ष मतपेढीचं राजकारण आणि अल्पसंख्याकांच्या मनात भिती निर्माण करत असल्याची टीकाही गडकरी यांनी केली. जालना शहरातही काल नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात राष्ट्रप्रेमी नागरिक कृती समितीनं फेरी काढली. विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या फेरीत सहभाग घेतला. **** नाशिक इथं राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काल मुस्लिम संघटनांनी निषेध सभा घेतली. हे कायदे रद्द करण्याची, तसंच बेरोजगारांना रोजगार देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. रझा अकादमी, नुरी अकादमीच्या या निषेध सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. **** भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचं स्वागत केलं, मात्र ही कर्जमाफी शेतकऱ्यांना संपूर्ण दिलासा देत नसल्याचं म्हटलं आहे. ते काल जळगाव इथं वार्ताहरांशी बोलत होते. योजनेची व्याप्ती, लाभार्थ्यांची संख्या याची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय योजनेबद्दल काहीही बोलणं योग्य नसल्याचं ते म्हणाले. आपण भाजप सोडून जाणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. **** ६६वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्ली इथं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना चित्रपट सृष्टीतल्या योगदानासाठी दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गुजराती चित्रपट हेल्लारोला तर हिंदी चित्रपट अभिनेते आयुष्यमान खुराना आणि विक्की कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांचा पुरस्कार दिला जाईल. त्याचप्रमाणे ���र्यावरण संवर्धनाशी संबंधित सर्वोत्कृष्ट चित्रपट गटात पाणी या मराठी चित्रपटाचा गौरव यावेळी केला जाईल. **** ‘हुनर हाट’ हे भारताचं प्रतिकात्मक स्वरुप आहे असे गौरवोद्वार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. मुंबईत बांद्रा- कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीएच्या मैदानावर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयानं भरवलेल्या ‘हुनर हाट’ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय अल्पसंख्यांक विभागाचे सचिव पी. के. दास उपस्थित होते. ‘हुनर हाट’ या उपक्रमामुळे छोट्या कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. **** झारखंड विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानांची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरु होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी विनयकुमार चौबे यांनी दिली. राज्यातल्या विधानसभेच्या ८१ जागांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान झालं होतं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २९ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा साठावा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जीओव्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. **** औरंगाबाद इथं `औरंगाबाद फर्स्ट` या संस्थेच्या वतीनं ‘झाडांना वेदनामुक्त करु या’ अभियानाचा प्रारंभ काल उद्योजक मानसिंग पवार यांच्या हस्ते झाला. झाडावर ठोकलेले खिळे काढून त्यांनी या अभियानाची सुरूवात केली. शहरातल्या दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉईंट दरम्यान ही मोहीम राबवण्यात आली. औरंगाबाद महानगरपालिकेचे कर्मचारी, मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, प्रयास ग्रुपचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले होते. **** नागरिकत्त्व सुधारणा कायद्यातल्या तरतुदींबाबत मोठ्या प्रमाणावर समज -गैरसमज आहेत, या पार्श्वभूमीवर ऐकू या कायद्यातल्या तरतुदींविषयीची माहिती. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातले या तीन देशातल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि खिश्चन समुदायांना या नागरिकत्व सुधारणा कायद्याचा लाभ कसा होईल? या शरणार्थ्यांकडे पासपोर्ट किंवा व्हिसा आदी कागदपत्रांचा अभाव असेल, आणि संबंधित देशात त्यांचा छळ झालेला असेल, तर हे शरणार्थी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतील. या लोकांना नागरिकत्वाच्या किचकट प्रक्रियेतून सूट देत, भारतीय नागरिकत्व देण्याचा अधिकार हा नागरिकत्व सुधारणा कायदा देतो. **** कटक इथं झालेल्या तिसऱ्या अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात चार गडी राखून वेस्टइंडिजवर विजय मिळवत भारतानं तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका दोन-एक अशा फरकानं जिकंली. वेस्टइंडिजनं प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ३१६ धावा करण्याचं आव्हानं भारताला दिलं. भारतानं ४९व्या षटकात ६ गड्याच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केलं. भारताचा कर्णधार विरोटी कोहली यानं ८५, लोकेश राहुल ७७, आणि रोहित शर्मानं ६३ धावा करत विजयाला हातभार लावला. सामनावीर म्हणून विरोट कोहली, तर मालिकावीर म्हणून रोहित शर्माला सन्मानित करण्यात आलं. *** महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदाकरता यावर्षी घेतलेल्या परीक्षेत परभणी जिल्हा न्यायालयातल्या तीन विधिज्ञांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे. गणेश खुपसे, प्रतिभा कांबळे आणि विवेक राजूरकर अशी त्यांची नावं आहेत. **** परभणी शहरात पोलिसांनी काल छापा मारुन लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला. शहरातल्या नानलपेठ परिसरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून हा गुटखा पकडला. **** हिंगोली जिल्हा कलाध्यापक संघानं औंढा नागनाथ इथं काल निसर्ग दृश्य चित्रकला स्पर्धा घेतली. पुणे, औरंगाबाद, माहूर, यवतमाळ, नांदेड, पुसद, परभणी, हिंगोली इथले विद्यार्थी, कलाशिक्षक, चित्रकार, प्राध्यापकांनी यात सहभाग घेतला. **** औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम काल घोषित झाला. पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक ३१ जानेवारीला, तर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक तीन जानेवारीला होणार आहे. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिलेसाठी आरक्षित आहे. दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमही घोषित झाला असून ३१ डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे. २६ डिसेंबरला अर्जांचं वितरण आणि २७ डिसेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असल्याचं नगर सचिव कार्यालयानं म्हटलं आहे. **** बीड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक चार जानेवारीला होणार आहे. तर जिल्ह्यातल्या ११ पंचायत समित्यांमधल्या पदाधिकाऱ्यांची निवड ३० डिसेंबरला करण्यात येणार असल्याचं प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितलं. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्रीच्या तलाठ्याला काल पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. दिलीप बावस्कर असं त्याचं नाव असून, हॉटेलची कर आकारणी कमी करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. कर आकारणीचे साडे तीन हजार रुपये आणि लाचेचे पाच हजार रुपये असे साडेआठ हजार रुपये स्विकारताना ही कारवाई करण्यात आली. **** ढाका इथं झालेली आंतरराष्ट्रीय कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धा भारताच्या मीराबा लुवांग यानं जिंकली आहे. पुरुष एकेरीच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात मीराबानं मलेशियाच्या केन योंग ओंग याचा २१ - १४, २१ - १८ असा पराभव केला. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मात्र भारताच्या ट्रीसा जॉलीला पराभवाचा सामना करावा लागला. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र १६  डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिझोराम राज्यातल्या ऐझवाल इथं ६० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल��पाचं राष्ट्रार्पण केलं. पंतप्रधान मिझोराम आणि मेघायलच्या दौऱ्यावर असून, ते याठिकाणी विविध विकासकामांचं उद्घाटन करणार आहेत. **** १९७१ च्या युद्धात भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचं स्मरण करण्यासाठी आज देशभर विजय दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्तानं देशभर होणाऱ्या कार्यक्रमांत या युद्धात सहभागी झालेले अनेक माजी लष्करी अधिकारी आणि जवान सहभागी होणार आहेत. या ऐतिहासिक विजयाला यावर्षी ४६ वर्षे पूर्ण होत आहेत. १९७१ मध्ये आजच्या दिवशीच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल ए.ए.ए. के नियाझी यांनी ९३ हजार सैनिकांसह लेफ्टनंट जनरल जगजित सिंह अरोरा यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय लष्कर आणि मुक्ती वाहिनीच्या संयुक्त सैन्यदलासमोर शरणागती पत्करली होती. **** राहुल गांधी आज काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. राहुल गांधी यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. ते पक्षाचे एकोणिसावे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. पक्षाची केंद्रीय निवडणूक समिती त्यांना अध्यक्षपदाचं औपचारिक प्रमाणपत्र देणार आहे. **** देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं काही इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर सीमा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यात दूरदर्शन संच, भ्रमणध्वनी, प्रोजेक्टर, हीटर आदी वस्तुंचा समावेश आहे. सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली. दूरदर्शन संचावर आकारलं जाणारं सीमा शुल्क १० टक्क्यांवरुन १५ टक्के, प्रोजेक्टरवरचं सीमा शुल्क १० टक्क्यांवरुन २० टक्के, भ्रमणध्वनीवरचं सीमा शुल्क १५ टक्के वाढवण्यात आलं आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं काल ग्राहक जागरण पंधरवाड्यानिमित्त विद्यार्थी ग्राहक रॅली काढण्यात आली. तहसिलदार महेश सावंत यांनी या रॅलीचा शुभार��भ केला. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना ग्राहक कायद्याचं ज्ञान मिळणं आवश्यक असल्याचं सावंत यांनी यावेळी सांगितलं. *****
0 notes