#विजय येसुदास
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 January 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्यादिनांक :२८ जानेवारी  २०२३
ठळक बातम्या
विद्यार्थ्यांनी आपल्यातलं सामर्थ्य ओळखून असामान्य कर्तृत्व करून दाखवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन 
नवं महिला सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार - बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
सुकन्या कुलकर्णी, अलका कुबल यांच्यासह १५ जणांची चित्रपट परीक्षण समितीवर नियुक्ती
संत निरंकारी सत्संगाच्या छप्पनाव्या संत समागमला औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीनमध्ये प्रारंभ 
भगवान बुद्धांच्या अस्थिधातू कलशासह आलेल्या धम्मपदयात्रेचं औरंगाबादमध्ये उत्साहात स्वागत
एकोणीस वर्षांखालील मुलींच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा इंग्लंड सोबत उद्या अंतिम सामना
पुरुषाच्या पहिल्या टी - ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर २१ धावांनी विजय
आणि
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा जोडीला उपविजेतेपद
सविस्तर बातम्या
विद्यार्थ्यांनी भोवतालच्या दबावाला बळी पडू नये तसंच स्वतःला कमी न समजता आपल्यातलं सामर्थ्य ओळखून असामान्य कर्तृत्व करून दाखवावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचं सूक्ष्म नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला. कॉपी सारख्या अनुचित प्रकारांचं कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. गैरप्रकारांचा आधार घेऊन भविष्य घडवता येत नाही, त्यामुळे यश मिळवण्यासाठी कधीही शॉर्टकट वापरु नका, असं पंतप्रधान म्हणाले. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्र आणि गॅझेटस्‌च्या आहारी न जाता त्यांचा हुशारीनं वापर करण्याचा सल्ला मोदी यांनी दिला. घरात तंत्रज्ञानमुक्त जागा तयार करुन विशिष्ट जागेतच टीव्ही, मोबाईल संगणक वापरले जावेत, यामुळे घरातल्या इतर भागात शांतता नांदू शकेल, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
चातुर्यपूर्ण आणि कठोर मेहनत करण्याआधी कामाला व्यवस्थित समजून घेण्याचा सल्ला त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिला. ते म्हणाले –
हार्ड वर्क और स्मार्ट वर्क मे से कौनसा वर्क जरुरी हे । क्या अछे परीनामो के लिए दोने जरूरी हे।क्रिपया  अपना मार्गदर्शन दिजिऐ । धन्यवाद श्रीमान कुछ लोग होते है जो हार्ड वर्क ही करते रहते हैं कूछ लोग होते हैं जिनके जीवन मे हार्ड वर्क का नामोनिशान ही नही होता हे। कूछ लोग होते है जो हार्डली  स्मार्ट वर्क करते है और कुछ लोग होते है जो स्मार्टली हार्ड वर्क करते है। और इसलिए पहले काम को बारकाई से समझऐ ।
तणावापासून मुक्ती मिळेल, असा दृढनिश्चय केला, तर त्याचा फायदा होतो, असंही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या ज्ञानाची परीक्षा कधीही करु नये असं सांगून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन देण्याचं काम करत आपलेपणानं विद्यार्थ्यांशी वागावं असंही मोदी यांनी स्पष्ट केलं.
****
नवं महिला सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार असल्याचं बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं. मुंबईत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३०वा वर्धापन दिन सोहळ्यात काल ते बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला आणि बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला आणि अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक दीपक पांडे, इंटरनॅशनल जस्टिस मशीनचे संचालक येसुदास नायडू, फेसबुक  पॉलिसी लीड विभागाच्या प्रियांका जैन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी, राज्य महिला आयोगाच्या सदस्या विधिज्ञ गौरी छाब्रिया, उत्कर्षा रुपवते, दीपिका चव्हाण यावेळी उपस्थित होते. महिला आयोगानं केलेल्या सुचनांवर शासन नक्की कारवाई करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
****
राज्य सरकारनं चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना केली आहे. या समितीमध्ये अविनाश नारकर, सुकन्या कुलकर्णी, योगेश सोमण, संतोष पाठारे, अलका कुबल, तेजस देऊसकर, विद्या करंजीकर, दिग्पाल लांजेकर, महेश कोळी, अभिजीत साटम, समीर आठल्ये, सचिन परब, डॉ. जयश्री कापसे, शैलेंद्र पांडे, श्रीरंग देशमुख या १५ अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
****
आरे कारशेडमधील मर्यादेपेक्षा जास्त वृक्षतोड करण्याची मुंबई महापालिकेची नोटीस रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं ८४ झाडे कापण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं १७७ झाडं तोडण्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. या कार्पोरेशनच्या अर्जानंतर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं नोटीस जारी करुन जनतेकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. त्या नोटीसीला पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी जनहित याचिका दाखल करुन मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. पुढील आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
****
राज्यात महाविकास आघाडीची स्थापना, विधानसभा निवडणुकीनंतर झाली आहे तर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती ही निवडणुकीपूर्वी करण्यात आली असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. सोलापूरमध्ये काल पत्रकारांशी ते बोलत होते. युतीनंतर होत असलेल्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषावरुन ही युती यशस्वी होणार असल्याचं दिसून येतं असल्याचं ते म्हणाले. आमची युती, २०२४ ची विधानसभा आणि तोपर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.
****
सांगली  जिल्ह्यात भिलवडी इथं उभारण्यात आलेल्या दुग्धोत्पादन आणि दुभत्या जनावरांसंबंधी संशोधन केलं जाणाऱ्या जनुकीय विज्ञान प्रयोगशाळेचं उद्घाटन काल केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. चितळे डेअरी तर्फे उभारण्यात आलेल्या आणि आशिया खंडातील सर्वात मोठी ‘सेक्सेल सीमेन जेनेटिक’ प्रयोगशाळा म्हणून या प्रयोगशाळेनं लौकीक मिळवला आहे. दूध उत्पादन वाढीसह  सशक्त गाई आणि बैलांची उत्पत्तीसाठी या प्रयोगशाळेचं मोठं योगदान असणार आहे असं मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाचं काल मुंबईत दिमाखदार सोहळ्यात उदघाटन झालं. भारतीय चित्रपटसृष्टीतील तसंच शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांतील लोकप्रिय चित्रपट कलावंतासह, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अप्पाथा’ या ता��िळ चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरनं महोत्सव सुरु झाला.  शांघाय सहकार्य संघटनेसाठी भारताचं जी- २०चं अध्यक्षपद दर्शवण्यासाठी हा  चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आणि  संबंधित देशांमधल्या चित्रपटांचं वैविध्य आणि चित्रपट निर्मितीच्या विविध शैली यांचे दर्शन घडवणं, चित्रपट विषयक भागीदारी उभारणं, कार्यक्रमांची देवाण-घेवाण, चित्रपट निर्मितीमधल्या युवा प्रतिभेची जोपासना आणि या अनोख्या प्रांतामधल्या संस्कृतीना जोडण्यासाठी दुवा म्हणून काम करणं हा, या महोत्सवाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी ११ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा सत्त्याण्णववा भाग असणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रावरुन या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या १०० व्या भागासाठी संकल्प चित्र - प्रतीक चिन्ह - लोगो तयार करण्यासाठी येत्या मंगळवारपर्यंत माय जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जदारांना डिजीटल प्लॅटफॉर्मवर हे चिन्ह तयार करता यायला हवं तसंच हे चिन्ह विविध प्लॅटफॉर्मवर अपलोड करता यायला हवं. विजेत्या स्पर्धकाला एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे.
****
संत निरंकारी सत्संगाच्या छप्पनाव्या संत समागमला काल औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीनमध्ये प्रारंभ झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या तीन दिवसीय संत समागमसाठी लाखो निरंकारी भाविक उपस्थित आहेत. निरंकारी मंडळाच्या वतीनं विश्वबंधुता, एकता आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा महाराज या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत.
संत समागम या कार्यक्रमातून गीत आणि विचाररुपातून जो संदेश दिला जात आहे तोच भाव आणि तो च विचार वर्षानुवर्षे महाराष्ट्रातले सर्व संत देत आले आहेत असा संदेश ‘मेसेज टू मॅन काईंड’ या कार्यक्रमात बोलताना सुदीक्षा महाराज यांनी दिला. या समागमसाठी बिडकीन मधे ३०० एकर परिसरात लाखो भाविकांसाठी २४ तास महाप्रसाद व्यवस्था आणि अन्य आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या तीन दिवसात सत्संग, सेवादल रॅली, मोफत आरोग्य शिबीर तसंच सामुदायिक विवाह आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
भगवान बुद्धांच्या अस्थिधातू कलशासह आलेल्या धम्मपदयात्रेचं काल औरंगाबादमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी अस्थिधातू कलशाला अभिवादन केलं आणि या धम्मपदयात्रेत सहभाग घेतला. शहरातल्या जालना महामार्गावरुन मार्गक्रमण करत जात असलेल्या या धम्मयात्रेतल्या अस्थि कलशाला आणि भिक्खू संघाला अनुयायांनी मोठ्या संख्येनं ठिक ठिकाणी अभिवादन केलं. तसंच भिक्खू संघाद्वारे महापरित्राणपाठ आणि बोधि पुजा करण्यात आली. शहरानजिक तीसगाव इथल्या बोधीसत्व ध्यान ��ाधना केंद्रात ही धम्मयात्रा काल मुक्कामी होती. ११० बौद्ध भिक्खू संघ थायलंडची ही धम्मपद यात्रा परभणीहून निघाली असून मुंबईच्या चैत्यभूमीला जाणार आहे.
****
औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक परिसरात उभारण्यात येणाऱ्या मसिआ ऑटो कंपोनंट क्लस्टर इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते काल करण्यात आलं. या क्लस्टर मध्ये २० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून याचा फायदा जवळपास दीड हजार सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
प्रेमसंबंधाला असलेल्या विरोधामुळे आई वडील आणि भावांनी मिळून २२ वर्षीय तरुणीची हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडल्याचं काल उघडकीला आलं.  शुभांगी जनार्दन जोगदंड असं या मृत तरुणीचं नाव असून नांदेड तालुक्यातल्या महिपाल पिंपरी इथली ही तरुणी नांदेड शहरात आयुर्वेदिक महाविद्यालयात बी ए एम एसचं शिक्षण घेत होती. गावात राहणाऱ्या एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबाला ते मान्य नसल्यामुळे त्यांनी तिचा विवाह दुसरीकडे जुळवला, मात्र मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यानंतर त्या मुलाकडून विवाहासाठी नकार देण्यात आला. लग्न मोडल्यानंतर समाजात बदनामी झाल्याच्या भावनेतून शुभांगीचे आई -वडील आणि भाऊ आदींनी तिची चार दिवसांपूर्वी गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह शेतात नेऊन जाळल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
****
एकोणीस वर्षांखालील मुलींच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा इंग्लंडच्या संघासोबत उद्या अंतिम सामना होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंडच्या संघानं निर्धारीत २० षटकांत नऊ बाद १०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या संघांनं पंधराव्या षटकातच दोन गडी गमावत हे आव्हान पूर्ण  केलं.
उपांत्य फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला तीन धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
****
पुरुषाच्या क्रिकेट स्पर्धेत, रांचीत झालेल्या पहिल्या टी - ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात काल न्यूझीलंडनं भारताचा २१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघानं विजयासाठी भारतासमोर १७७ धावांचं उद्दिष्ट ठेवलं. मात्र भारतीय संघ निर्धारित २० षटकात ९ बाद १५५ धावाचं करु शकला.
****
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीत काल भारताच्या रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात ब्राझीलच्या राफेल मॅटोस आणि लुईसा स्टेफनी या जोडीनं सानिया - रोहन जोडीचा सात - सहा, सहा - दोन असा ��राभव केला.
सानिया मिर्झाची ही शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. ति��ं आपल्या कारकीर्दीची सुरूवात २००५ मध्ये याच स्पर्धेत मेलबर्नमधून केली होती.
****
परभणी जिल्ह्यात फुकटगाव ते कान्हेगाव या रस्त्यावर रेल्वे मार्गाच्या ठिकाणी भूमिगत रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पुढील पाच महिने बंद राहणार असल्याचं जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी कळवलं आहे. या मार्गावरची वाहतूक गणपूर फाट्यामार्गे वळवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नोकरभरतीच्या मुद्द्यावरुन बँक ऑफ महाराष्ट्रमधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी काल एक दिवसाचा संप पुकारला होता. या संपात सर्व संघटना सहभागी झाल्यामुळे २००० पेक्षा जास्त शाखांम���ून रोखीचे किंवा धनादेश वठणावळीचे कुठलेही व्यवहार काल होऊ शकले नाहीत. औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक शाखेसमोर महाबँकच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली.
****
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
सिंगर विजय येसुदास की कार का ऐक्सिडेंट, बाल-बाल बचे
सिंगर विजय येसुदास की कार का ऐक्सिडेंट, बाल-बाल बचे
[ad_1]
Tumblr media
लेंजडरी सिंगर के बेटे की का कार का ऐक्सिडेंट हो गया। अच्छी खबर ये है कि उनको कोई चोट नहीं आई। उनकी कार एक और कार में भिड़ने से यह हादसा हुआ। घटना सोमवार रात 11:30 बजे के आसपास की है।
विजय के साथ थे उनके दोस्त रिपोर्ट्स के मुताबिक, विजय का ऐक्सिडेंट नैशनल हाइवे पर हुआ। वह कोच्चि से तिरुवनंतपुरम जा रहे थे। उनके साथ उनका कोई दोस्त भी था। उनकी कार का आगे का हिस्सा बुरी तरह क्षतिग्रस्त हो…
View On WordPress
0 notes
everynewsnow · 4 years ago
Text
'आहा ’के लिए संगीत तैयार करने और उसके लिए इसका क्या अर्थ है, इस पर गायक सयोनोरा फिलिप
‘आहा ’के लिए संगीत तैयार करने और उसके लिए इसका क्या अर्थ है, इस पर गायक सयोनोरा फिलिप
युगल की रचना करते समय, ‘थंडोदिंजा थमारा…‘ के लिये आहा, अप्रैल में रिलीज़ होने के कारण, गायक, संगीतकार और गीतकार सयानोरा फिलिप ने डमी गीतों के साथ गीत गाया। बाद में, उसने इसे विजय येसुदास के पास भेजा क्योंकि वह चाहती थी कि विजय पुरुष की आवाज बने। महिला आवाज के लिए, उन्होंने सौम्या रामकृष्णन या सीथारा कृष्णकुमार के बारे में सोचा। “दास [Yesudas] अंकल ने गाना सुना और विजय से पूछा कि उनके साथ कौन गा…
View On WordPress
0 notes
mibreakingnews · 7 years ago
Text
येसुदास के बेटे विजय ने दी फिल्मों में दस्तक, दिल्ली में स्क्रीनिंग
ख्यात संगीतकार और गायब के. जे. येसुदास के बेटे विजय येसुदास ने फिल्मों में बतौर एक्टर दस्तक दी है. हाल ही रिलीज हुई उनकी फिल्म PADAIVEERAN की दिल्ली में स्क्रीनिंग आयोजित की गई. from आज तक | मूवी मसाला https://ift.tt/2vwJzo0 via IFTTT from Blogger https://ift.tt/2HvDUmZ via IFTTT
0 notes