#वाळू मोफत
Explore tagged Tumblr posts
Text
PM आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार ५ ब्रास वाळू मोफत
गोंदिया/भंडारा : राज्याच्या शेवटच्या टोकावरील मागासलेल्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली असून, त्यामुळे बेघर गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळावीत, मात्र बांधकामासाठी लागणार्या वाळूच्या किमतीमुळे गोरगरिबांच्या खिशापेक्षा घरे महाग असल्याने बांधकामात अडथळे येत आहेत. या गंभीर प्रश्नावर अनेक शेतकरी, मजूर व आर्थिक अडचणीत असलेल्या…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date : 05 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
बिहार आणि आंध्र प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा ५८ टक्के खर्च होतो. भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं ते म्हणाले.
राज्याच्या राजकोषीय तुटीविषयी अर्थसंकल्पावरील चर्चेत विविध सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावर राज्यात ही तूट केंद्र सरकारने घालून दिलेल्या ३ टक्क्यांच्या मर्यादेत असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. २०२८ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरची करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या कर हिश्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. ‘राज्याचा सर्वांगीण विकास’ हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केल्याचं पवार यांनी नमूद केलं.
****
राज्यातल्या शाळांमध्ये मुख्या��्यापक पदासाठी किमान १५० पटसंख्येच्या मर्यादेचा निकष सरसक�� लागू करणं योग्य ठरणार नाही, असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. सदस्य जयंत आसगावकर यांनी आज विधान परिषदेत यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर केसरकर बोलत होते. दरम्यान, यासंबंधी प्राप्त झालेली सर्व निवेदनं आयुक्तांकडे पाठवण्यात आली आहेत आणि त्यांचा अहवाल आल्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन केसरकर यांनी दिलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसमृध्दी गाव अभियानाला आज पासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत गावातील जलस्त्रोतांच्या पुर्नभरणावर भर दिला जाणार असल्याचं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं, त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वन विभागाच्या वतीने शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयासाठी मोफत रोपटे वितरित करण्यात येत असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.
****
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी येत्या आठ तारखेपासून ठिकठिकाणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांच्या माध्यमातून पात्र महिलांना योजनेची माहिती आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या योजनेत सहभागासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. कुठल्याही प्रकारची धावपळ न करता, घाईगडबड न करता, अमिषाला बळी न पडता या योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४ साठी पीक विमा पोर्टल चालू झालं असून, १५ जुलैपर्यत यात सहभाग घेता आहे. शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न बघता लवकरात लवकर पिक विमा भरुन घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसाठी अध्यक्ष आणि सदस्य कोतवाल निवड समिती यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील रिक्त पदांसाठी उद्या शनिवारी दुपारी साडेतीन ते पाच या कालावधीत १४ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरळीत होण्यासाठी तसंच संभाव्य गैरप्रकार रोखण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत आहे.
****
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातल्या धोंडराईचे मंडळ अधिकारी पुरुषोत्तम आंधळे आणि राक्षसभुवन सज्जाच्या तलाठ्याला जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी निलंबित केलं आहे. अवैध वाळू उपसा प्रकरणी ठोस कारवाई केली नसल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार डॉ. प्रशांत बोकारे यांनी आज स्वीकारला. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचं राज्यपाल रमेश बैस यांनी निलंबन केल्यामुळे बोकारे यांच्याकडे हा कार्यभार देण्यात आला आहे.
****
0 notes
Text
परवडणाऱ्या दरात वाळू उपलब्ध करण्यावर पंजाब मंत्रिमंडळाचा विचार
परवडणाऱ्या दरात वाळू उपलब्ध करण्यावर पंजाब मंत्रिमंडळाचा विचार
चंदीगड, 20 सप्टेंबर: नव्याने शपथ घेतलेले मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नेतृत्वाखालील पंजाब मंत्रिमंडळाने सोमवारी वाळू परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे, एससी, बीसी आणि बीपीएल श्रेणींना आणखी 100 मोफत वीज युनिट देणे आणि मोफत प्रदान करण्यावर चर्चा केली. ग्रामीण भागात पाणी पुरवठा चन्नी यांच्या अध्यक्षतेखाली पहिली मंत्रिमंडळ बैठक संध्याकाळी येथे झाली. सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीला…
View On WordPress
0 notes
Text
सरकार कोणतेही असो ,उपायांची अंमलबजावणी करण्यातच महाराष्ट्राचे हित
सरकार कोणतेही असो ,उपायांची अंमलबजावणी करण्यातच महाराष्ट्राचे हित
महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून आजतागायत न सुटलेल्या प्रश्नांचे आव्हान सर्व पक्षांसमोर उभे आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असोत , पुढील गोष्टींची पूर्तता झाली तरच महाराष्ट्राचे भविष्य उजळणार आहे. महाराष्ट्राचा कायापालट घडवून आणणाऱ्या या गोष्टींची अंमलबजावणी करण्यातच महाराष्ट्राचे हीत आहे.
१ . सरकारी प्रशासकीय कार्यालये वेगवान करायला हवीत. प्रशासनामधील शिथिलता चीड आणणारी आहे , पैसे देऊनही जनतेची कामे होत नाहीत ही वास्तवता आहे.
२ . आरटीओ , चॅरिटी कमिशन , बंद पडलेली महामंडळे , न्यायालयीन गलथान प्रशासकीय व्यवस्था यांना नवे स्वरूप देऊन अधिक गतिमान करावे लागतील.
३ . खोट्या जाहिराती देऊन प्रसार माध्यमामार्फत करोडो रुपयाची लूटमार करणाऱ्या जाहिराती सरकारने तपासणीसाठी नवी व्यवस्था करावी लागेल व controller of advertisement यांची नेमणूक करावी लागणार आहे किंवा स्वतंत्र खाते काढावे लागणार आहे.
४ . शिक्षणसम्राटांच्या मनाला येईल तेवढ्या देणग्या घेण्याच्या प्रवृत्तीला आळा घालावा लागेल . शिक्षणसम्राटांना दिलेल्या सवलती व त्यांनी केलेल्या अफाट नाफाखोरीला लगाम घालून योग्य त्या विद्याथ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यायला हवे. शिक्षणसम्राटांच्या मक्तेदारी��ुळे शिक्षण सर्वसामान्य माणसांच्या कुवतीच्या पलीकडे गेले आहे. शिक्षणसम्राटांची मक्तेदारी संपवायला हवी.
५ . महाराष्ट्रातील अनेक देवालयांमध्ये प्रचंड दानधर्म होऊन संपत्ती निर्माण होते . ती संपत्ती त्या तीर्थक्षेत्र विकासासाठी वापरून उत्पन्न सत्कारणी कसे लागेल यावर खास उपाय शोधून काढावेत.
६ . वकील , डॉक्टर , आर्किटेक्ट , इंजिनिअर , आर्थिक व इतर सहकार , सी. एई. मंडळी महाराष्ट्रामध्ये करोडो रुपयांची फी वसूल करून टॅक्स भरत नाहीत व साध्या पावत्या ही देत नाहीत यावर नियंत्रण करता आले तर करोडो रुपयांचा निधी सरकारी तिजोरीत जमा होऊ शकतो.
७ . न्यायालयीन दिरंगाईबाबत ठोस निर्णय घ्यायला लागतील . समाजाचा फुकट वेळ खाणारा , करोडो रुपयांचा ( पेप - productive ) खर्च करायला लावणाऱ्या तारीख पे तारीख म्हणत सामान्य नागरिकांचा खिसा खाली करणारा जीवघेणा प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबित आहे . वर्षानुवर्ष कोर्टाचे हेलपाटे घालणाऱ्या जनतेला जराही दिलासा केंद्रसरकारला व राज्यसरकारलाही आजतागायत देता आला नाही . त्यामुळे वकील सामान्य जनतेची कायदेशीर लूट करीत आहेत व हे मुकाटपणे सोसण्याऐवजी कोणताही पर्याय सामान्य जनतेपुढे नाही.
८ . सरकारी कार्यालये , निमसरकारी कार्यालये , महामंडळे , न्यायालये येथील प्रशासनासाठी संगणकाचा वापर अद्याप सुरू झालेला नाही तो सुरु करायला हवा.
९ . ग्रामपंचायतीपासून ते मेट्रोसिटी पर्यंत बांधकामाच्या परवानग्या सुलभ करून मर्यादित कालावधीत मंजूर करण्याची सक्ती करणे आवश्यक म्हणजे अनधिकृत बांधकामे होणार नाही.
१० . क्रिकेटवर सर्रास चाललेले अब्जावधी रुपयांचे सट्टे कसे थांबवणार , त्याऐवजी सट्टे बाजारांना रीतसर मंजुरी देऊन उत्पादन का वाढवू नये. यावर विचार करावा.
११ . नको असलेली महामंडळे तात्काळ बंद करायला हवीत. व ज्या त्या खात्यातील मंत्र्यांना ही महामंडळे चालवावी लागतील अशी व्यवस्था करायला हवी.
१२ . कोणत्याही राज्यापेक्षा ज्यादा काळा पैसा हा महाराष्ट्रात विशेषतः पुणे , मुंबई , नागपूरमध्ये आहे , किंबहुना परदेशी पैसा एवढा काळा पैसा महाराष्ट्रात आहे . राजकीय , पुढारी सरकारी , नोकर व्यापारी , बिल्डर , डेव्हलपर , जमीन माफिया , वाळू माफिया , तेल माफिया , अंमलीपदार्थ विकणारे , चोरटी आयात करणारे , एक्ससाईज सेल्सटॅक्स , इनकमटॅक्स बुडवणारे लोक शोधून त्या��्याकडील काळा पैसा मूलभूत सुविधा सोडवण्याकरता कसा वळवता येईल यावर सखोल विचार करावा व निर्णय घ्यावेत. साखर सम्राट , शिक्षण सम्राट , बिल्डर्स , कंत्राटदार मोठे मोठे कारखानदार यांच्याकडे ही मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे , त्याचाही उपयोग सदर सामाजिक कार्याकरता कसा करता येईल याचा नावीन्यपूर्ण विचार जनतेसमोर मांडावा.
१३ . महाराष्ट्रीयन जनतेमध्ये सामाजिक बेशिस्तता मोठ्या प्रमाणात आहेत. त्यासाठी कडक कायदे व दंडात्मक कारवाई करावी. उदा. रस्त्यावर धुंकणे , लघवी करणे , शौचास बसणे , सिगारेट ओढणे , नाक शिंकरणे अशा गोष्टींसाठी जबर दंड वसूल करावा.
१४ . महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटंबांना तसेच दुष्काळी तालुक्यांना कार्पोरेट सेक्टरमधील कंपन्यांनी दत्तक घ्यावे. सरकारी योजनेंतर्गतचा पैसा कार्पोरेट सेक्टरमार्फत खर्च करावा , तो पैसा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वापरला जावा , म्हणजे भ्रष्ट्राचाराचा प्रश्न येणार नाही ,
१५ . पाण्याचा गैरवापर हा दखलपात्र गुन्हा करावा व त्यासाठी जलनीती कायदा करायला हवा.
१६ . कोणत्याही प्रगतिशील देशाची प्रगती झपाट्याने व्हावी अशी अपेक्षा असेल तर सिमेंट , वीजनिर्मिती , रस्ते या तिन्ही गोष्टींची सर्वात मोठी गरज असते . या तिन्ही गोष्टींचे नीट नियोजन झाल्यास महागाई थांबेल , उत्पादनात वाढ होईल.
१७ . वास्तविक भारतास फार मोठा समुद्रकिनारा आहे. त्यात तेलही मिळत आहे . अरब राष्ट्रांनी अडविण्यापूर्वी तेलासाठी खणणे चालू केले असते व नैसर्गिक संपत्तीचा शोध , व्यवस्थित वापर , जपवणूक केली असती तर आज पेट्रोलजन्य वस्तू , खते महागली नसती.
१८ . आज मोठ्या प्रमाणावर जंगले आणि झाडे तोडली जात आहेत , कोळसा भरपूर वापरला जात आहे. त्याचे नियोजन व्यवस्थित झाले नाही तर आजची औष्णिक केन्द्रे २५ वर्षांनी बंद पडली तर दोष कोणाला द्यायचा ? त्यासाठी नवीन कोळसा खाणीही पाहणे जरूरीचे आहे.
१९ . शिक्षणाच्या बाबतीतही केवळ पदवीधरांची बेरोजगार फौज वाढवण्याऐवजी वास्तविक ज्यायोगे नोकऱ्या मिळणे शक्य आहे अशा कोर्सेसची संख्या वाढवली तर सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न निकाली लागण्यास मदत होईल.
२० . शहर वाढीसाठी अत्यावश्यक अशा मूलभूत सुविधा उदा . पाणी , ड्रेनेज , कचरा निर्मुलन , विद्युत निर्मिती , वाहतूक असे अनेक प्रश्न विचारात न घेता दिल्या गेलेल्या बांधकाम परवानग्या याचा विचार होणे आवश्यक आहे.
२१ . अमेरिकेमध्ये वृध्द , अपंग यांना खास वागणूक ��िली जाते. आजारपणामध्ये , अपघातामध्ये तातडीची सेवा उपलब्ध असते तशी तातडीची सेवा आपल्याकडे उपलब्ध नाही. पैशाच्या मागे लागलेल्या तरुण पिढीने सर्वच अर्थाने वृद्धांना निराधार केले आहे. पुष्कळ वृद्धांच्याकडे पैसा असूनही सुख नाही , अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वृद्धांची समस्या अधिक गंभीर बनत चाललेली आहे. वृध्दांच्या शारिरीक व मानसिक सुरक्षिततेसाठी सेवा उपलब्ध करणे गरजेचे आहे .
२२ . आज दवाखाने हे कत्तलखाने झाले आहेत , तेथे पैशाची अक्षरशः लूटमार चालू आहे. सर्वांच्या फी ला कुठलाही मापदंड नाही. ऑपरेशनला हो कुठलाही मापदंड नाही , याशिवाय अमाप खोली भाडे घेऊनही उत्तम सेवा उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे . यावर कडक कायदे झाले पाहिजेत.
२३ . नियोजनबद्ध शहरवाढ न झाल्यामुळे रस्ते अरुंद राहिले , वाहतूक वाढली यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला . सार्वजनिक वाहतूक अतिशय चांगली असणे आवश्यक आहे.
२४ . शहारातील घरांचा प्रश्न सुटत नाही , घरांच्या किंमती जनतेच्या आवाक्यात येत नाही. बिल्डर्सने कुवतीपेक्षा अनेक पट जमिनी घेऊन ठेवल्या आहेत व त्या वर्षानुवर्ष पडून आहेत. त्यांना कालबद्ध कार्यक्रम देऊन गृह निर्माणाला वेग आणता येईल. मुदतीत काम करणाऱ्या बिल्डर्सला प्रोत्साहन द्यावे. किंवा त्या अतिरिक्त जमिनी परत घेऊन घराचा प्रश्न सोडवता येईल. समाविष्ट गावामध्ये संपूर्ण मूलभूत सुविधा असलेले विकसित भूखंड तयार करून कालबद्ध विकास साधणे शक्य आहे.
२५ . मुंबई , ठाणे , मुंब्रा , कल्याण , पुणे व इतर ( नाशिक , नागपूर , कोल्हापूर , सोलापूर ) अशा महत्त्वाच्या शहरात अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत व ती बांधकामे कित्येक वर्ष वापरातही आहेत . अशा बांधकाम करणाऱ्या बिल्डर , आर्किटेक्ट , स्टक्चरल इंजिनिअर व परवानगी देणारे अधिकारी या सर्वांना जबरदस्त दंड बसवून ती रक्कम राज्यामध्ये विकासासाठी वापरता येईल किंवा झोपडपट्टी निर्मुलनासाठी वापरता येईल. बिगर परवाना सदनिकेत राहणाऱ्या रहिवाश्यां��ासुद्धा पाणीपट्टी व घरपट्टी दुप्पट किंवा तिप्पट लावून पाच वर्ष दंडात्मक कारवाई करावी म्हणजे यापुढे कोणीही अनधिकृत बांधकामात राहण्यास धजावणार नाहीत. अनधिकृत बांधकामाचे मुख्य कारण बेकायदेशीर बांधकाम परवानग्या हे आहे तेव्हा ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंत बांधकाम परवानग्या सोप्या कशा होतील व वेळेत बांधकाम परवाने कशी होतील यावर विचार करावा लागणार आहे.
२६ . ग्रामपंचायतीपासून ते कार्पोरेशन लेव्हलपर्यंत बांधकामाची क्लिष्ट परवाना पद्धत तसेच अर्बन सीलिंगमुळे गृहनिर्माण व्यवसाय सोपा होण्याऐवजी अधिक क्लिष्ट झाला , त्यामुळे बेकायदा बांधकामाचा ब्रम्हराक्षस आज उभा राहिला आहे.
२७ . ज्याप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातील न वापरलेल्या जमिनी परत घेण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे , त्याबरहुकूम बिल्डर्सकडे पडलेल्या अगणित जमिनी वेळेत बांधकाम केले नसल्यास सिलिंगमधून मुक्त केल्याची कारवाई रद्दबातल करावी व बिल्डर्सनी सुरू केलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची बंधने त्यांच्यावर घालावीत तसेच अनेक आमिषे दाखवून जाहिरात केलेल्या सुखसोयी या प्रकल्पाच्या अगोदर , किमान बरोबर सुरु करण्याचा आग्रह सरकारने धरला पाहिजे असे मला वाटते . बांधकाम परवानग्या गतिमान करायला हवेत.
२८ . अनधिकृत बांधकामाबाबत ठोस निर्णय घ्यायला हव्यात. मुंबईतील १५ , ००० पडायला आलेल्या चाळी तातडीने स्थलांतरित करायला हव्यात.
२९ . मोठी शहरे बकाल होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. मोठी शहरे विस्तारीत करण्यापेक्षा नव्या स्मार्ट सिटीज डेव्हलप करायला हव्यात. तसेच नवीन छोटी छोटी शहरे डेव्हलप करायला हवीत. अवाढव्य महानगरपालिका निर्माण करण्याऐवजी छोट्या छोट्या शहरपालिका तयार करून स्पर्धात्मकरित्या उत्तम शहरपालिका तयार केल्या असत्या , पण ते न करता केवळ कार्पोरेशन हद्दीचा पसारा वाढविणे म्हणजे विकास करणे असा चुकीचा समज करून घेऊन राजकर्त्यांनी स्वतःची व जनतेची प्रचंड फसवणूक केलेली आहे . याचे उत्तम उदाहरण पुणे महानगरपालिका , ठाणे , मुंबई , मुंबरा नगरपालिका व नुकतीच विकसित केलेली नवी मुंबई.
३० . महाराष्ट्रातील बेस्ट लेड कार्पोरेशनची जमीन , रेल्वेची जमिन , कॅनोल च्या बाजूची कमांड एरिया ची जमीन , बायोडीजेल करता दिलेली - जमीन , पवनऊर्जेसाठी दिलेली जमीन परत ताब्यात घ्या व तेथे जंगले निर्माण करा .
३१ . उद्योगाइतकेच किंवा त्यापेक्षा जास्त महत्व कृषिक्षेत्राला द्यायला हवी , पाण्याच्या समतोल वाटपासाठी व वापरासाठी अत्यंत मर्यादित ऊस शेती करायला हवी. जिरायत असो की बागायत असो , शेतीला १०० टक्के अनुदानाने ठिंबक सिंचन उपलब्ध करून घ्यायला हवेत .
३२ . आजारी व बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागी कुशल कामगार निर्मितीची विद्यापीठे , महाविद्यालये किंवा माध्यमिक शाळा सुरू कराव्या लागणार आहेत. तसेच उसाशिवाय इतर कृषी मालाचे इतर प्रक्रिया उद्याग सुरु करावे लागतील.
३३ . दुष्काळी ग्रामीण भागात उदयोग निर्मितीसाठी परदेशी कंपन्यांना १०० टक्के अनुदान देऊन निमंत्रित करायला हवेत.
३४ . कृषिमाल साठविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या क्षमतेएवढ्या खाजगी वा सामुदायिक शीतगृहाची व साध्या गोदामांची भरपूर अनुदान देवून निर्मिती करावी लागेल तसेच ही गोदामे व शीतगृहे झटपट व स्वस्त कशी होती यासाठी संशोधन केंद्र काढावी लागणार आहेत
३५ . कृषिमाल उत्पादनांप���की केवळ साठवण नसल्यामुळे ४० % कृषीमाल हा वाया जातो , त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतापासून ते थेट मेट्रो सिटीपर्यंत शीतगृहांची साखळी होणे अत्यंत आवश्यक आहे .
३६ . अपुऱ्या पाटबंधारे योजना ( कालव्यासह ) चे काम खाजगी पैशातून पूर्ण करावे लागणार आहेत.
३७ . नद्या , नाले , कालवे यांच्या वरून प्रवाहाला समांतर असे फ्लायओव्हर बांधून वाहतुकीचा प्रश्न सोडवायला हवा . जंगलांच्या वाढीसाठी टेकडी धरणाची कल्पना प्रत्यक्षात उतरवायला हवी.
३८ . पाण्याची उपलब्धता , पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी किमान समान पाणी वाटप , यासंबंधी ठोस आणि कडक पावले उचलायला हवीत .
३९ . अपूर्ण योजनांसाठी भांडवलाची तरतूद , शक्यतो नव्या पाटबंधारे योजनांचे खाजगीकरण करणे आवश्यक आहे ,
४० . हायड्रोपॉवर ही सर्वात स्वस्त असल्यामुळे महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या धरणावर व धबधब्यावर जेथे मिळतील तेथे नैसर्गिक अथवा कृत्रिम धबधबे निर्माण करून स्वस्त वीज निर्माण करणे शक्य आहे.
४१ . औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी योग्य ते इंधन निर्माण करण्यासाठी इंधन निर्मितीचे संशोधन करणे आवश्यक आहे .
४२ . पवन ऊर्जा व सौर ऊर्जेला चालना देताना निरनिराळ्या तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अभूतपूर्व सवलती द्यायला हव्यात.
४३ . अणुऊर्जा निर्मितीसाठी येणारे अडथळे तात्काळ दूर करावेत.
४४ . साखर कारखाने , बंद पडू शकणारे ( आजारी ) , बंद पडलेले साखर कारखाने व ऊस उत्पादन याबाबत निश्चित धोरण ठरविणे व त्याची अंमलबजावणी करणे , विशेषतः उसासाठी लागणाऱ्या पाण्याचे पुनर्नियोजन करणे आवश्यक आहे .
४५ . ग्रामीण दष्काळी भागात उदयोग निर्मितीसाठी परदेशी कंपन्यांना १०० % अनुदान देऊन निमंत्रित करायला हवे.
४६ . नद्या बारमाही वाहतील अशी व्यवस्था करायला हवी , त्यासाठी नदीपात्राशेजारी प्रत्येक २० किलोमीटर अंतरावर महाप्रचंड जलसाठे बॅलेंसिंग टॅकच्या स्वरुपात करायला हवेत .
४७ . जंगलेवाढीसाठी टेकडी धरणाची कल्पना प्रत्यक्षात उतरवायला हवी.
४८ . गारपीट , अतिवृष्टी , अवकाळी पाऊस यांपासून पीक संरक्षण करण्याकरिता स्वस्त पॉलीहाऊसची नितांत गरज आहे , म्हणजे १०० % पीक हाताशी येऊ शकेल.
५० . शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये म्हणून , शेतकऱ्यांना पेन्शन ऐवजी पगाराची व्यवस्था करायला हवी , तो पगार त्यांच्या उत्पादन मालाच्या विक्रीतून वसूल करा , म्हणजे शेतकऱ्यांना दरमाही १ तारखेला पगार हातात मिळेल , अशी व्यवस्था करायला हवी.
५० . परदेशी गुंतवणूक खेड्याकडे वळवायला हवी.
५१ . संपूर्ण शेतीला १०० % अनुदानाचे ड्रीप बसवा , पाणी प्रश्न आपोआपच सुटेल , आजारपण कमी होईल , स्वच्छता वाढेल , स्थलांतरे कमी होतील .
५२ . पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आजतागायत सुटला नाही , त्यामुळे ग्रामीण जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वेळ आणि पैसा प्रमाणाबा��ेर खर्च करावा लागतो . त्याची निश्चित योजना सरकारने मांडावी .
५३ . कोरडवाह जमिनींना एका पिकासाठी पाण्याची हमी नाही त्यामुळे जिराईत शेतकरी प्रगती करू शकला नाही. किमान एका पिकाच्या पाण्याची हमी हवीच , कोरडवाहू शेतकऱ्यांना किमान एका पिकासाठी पाणी दिले असते तर तेलबिया , डाळी यांचा प्रश्न पुष्कळसा मार्गी लागला असता . तेव्हा चारमाही , आठमाही , बारमाही अशा निरनिराळ्या पाणी देण्याच्या पाळ्या ठरवल्या असत्या तर आज खाद्यतेले व डाळी आयात करण्याची नामुष्की सरकारवर आली नसती.
५४ . ऊस पिकाला दिले गेलेले अनावश्यक महत्त्वामुळे उपलब्ध ९० % पाणी ३ % शेतकऱ्यांना हमखास दिले जाते व अनावश्यक साखर उत्पादित केली जाते. त्याचे दुष्परिणाम ९० % जनतेला सोसावे लागतात. ऊस शेती बंद करून मक्यापासून साखर तयार करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे.
जुन्या फॅक्टरीज , साखर कारखाने हे कुशल कामगार केंद्र न��र्मितीसाठी वापरायला हव्यात .ऊस उत्पादनास व साखर उद्योगाला दिलेले अधिक महत्त्व कमी करण्याचे साहस एकाही राजकीय पुढाऱ्याकडे आज नाही व तोच पाणी प्रश्नाचा मूळ मुद्दा आहे. हे कोणतेही राजकीय नेतृत्व लक्षात घेण्यास तयार नाही.
५५ . कृषी उत्पादन बाजार समित्यांऐवजी खाजगी व्यापाऱ्यांची स्पर्धा शेतकन्यांना अधिक फायद्याची ठरली असती.
५६ . शेतमाल , भाजीपाला , फळे यांच्या किमतीमधील चढ - उतारासाठी किमती संतुलित राखणारी गोदामे बांधली गेली असती तर हा शेतमालाच्या भावाचा चढ - उतार होणे टळले असते व हे आजतागायत कोणाही राजकीय पुढाऱ्याला समजलेले नाही.
५७ . ग्रामपंचायतीमध्ये सुनियोजित घरे बांधून दमदार खेडे वसाहत करण्याचा प्रयत्न केला जात नाही . खेड्यांचे आखीव रेखीव नियोजन करायला हवे.
५८ . शाळा , दवाखाने , सार्वजनिक वाहतूक , बँका यांचा विस्तार खेडेगावापर्यंत व्हायला हवा.
५९ . शेतमजुरांचा घरांचा प्रश्न , ऊस तोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यांना दवाखाने , शाळा यांचे वाचून वंचित राहावे लागते.
६० . नव्या जगामध्ये खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. तथापि त्याचा विस्तार फक्त शहरापुरता मर्यादित आहे. शहरी भागातच सर्व किंमती खेळाच्या , पैसे मिळवणाऱ्या खेळांच्या सुविधा व मूलभूत सोयी आहेत. उदा. क्रिकेट , टेनिस , स्कूनर , जलतरण इ . ग्रामीण भागातील सशक्त व निरोगी मुलांना या प्रवाहात सामील केले पाहिजे. खेडेगावातून सचिन तेंडूलकर , पेस , मिल्खा सिंग असे खेळाडू जेव्हा तयार होतील तेव्हा खऱ्या अर्थाने भारत खेळांमध्ये जगात सर्वश्रेष्ठ होईल. ह्या मुलांमध्ये शार���रिक चापल्य व कष्ट करण्याची तयारी शहरी मुलांपेक्षा अधिक असते. शहरातील मुलांसाठी खेळ म्हणजे करमणूक असते. ग्रामीण मुलांसाठी ते करिअर बनू शकते. या व अशा अनेक नावीन्यपूर्ण कल्पना घेऊन त्या राबवून महाराष्ट्राला प्रगतिपथावर आणणे शक्य आहे.
-भास्करराव म्हस्के
0 notes
Text
घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत
घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत.
जिल्हाधिकाºयांनी दिलेले आदेश निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांच्याकडे दिले आहेत. त्याप्रमाणे प्रधानमंत्री, रमाई,…
View On WordPress
0 notes
Text
घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत
घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत.
जिल्हाधिकाºयांनी दिलेले आदेश निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांच्याकडे दिले आहेत. त्याप्रमाणे प्रधानमंत्री, रमाई,…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati SambhajinagarDate: 01 February 2024Time 01.00 to 01.05 PMLanguage Marathiआकाशवाणी छत्रपती संभाजीनगरप्रादेशिक बातम्यादिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत वर्ष २०२४ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर रचनेत कोणताही बदल केला नसून आयकर प्राप्ती २६ लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. यासह आयकर परताव्याचं काम गतीनं केलं जाणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितलं.
पुढच्या वर्षीचा भांडवली खर्च अकरा पूर्णांक एक टक्क्यानं वाढून अकरा पूर्णांक एक लाख कोटी रुपये होणार आहे. हा एकूण जीडीपीच्या तीन पूर्णांक चार टक्के असेल. गेल्या दहा वर्षात २५ कोटी नागरिकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारनं मदत केली आहे. पीकविमा आणि पीएम विश्वकर्मा या योजना लाभदायी ठरत असल्याचं अर्थमंत्री सितारामन यांनी सांगितलं.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळं देशाच्या शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला आहे. भविष्यात ५० लाख रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असून गर्भाशय आणि मुखाच्या कर्करोग निर्मुलनासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. ९ ते १४ वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाईल, असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितलं. सरकार रेल्वेच्या विकासासाठी तीन प्रमुख आर्थिक रेल्वे कॉरीडॉर उभारणार असून सध्या सामान्य असलेले रेल्वेचे चाळीस हजार डबे वंदे भारत रेल्वेप्रमाणे अत्याधुनिक करण्यात येणार आहेत. तसंच महानगरांमध्ये मेट्रोचं जाळंही विस्तारलं जाईल.
ग्रामीण, सामाजिक आणि आर्थिक परिक्षेप बदलण्यासाठी बचत गटाद्वारे नऊ कोटी लखपती दीदी यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण केलं जाणार आहे. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत आणखी दोन कोटी घरं बांधली जाणार असून मध्यम वर्गासाठीही आवास योजना सुरू करण्यात येणार आहे, तसंच एक कोटी कुटुंबांना छतावर सौरऊर्जा आणि दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार असल्याचंही सितारामन यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज सकाळी जालना रोडवरील सिडको उड्डाणपुलाजवळ गॅस टँकर दुभाजकाला धडकल्यानं गॅस गळती सुरू झाली. सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. त्यामुळं सेव्हन हिल उड्डाणपुलाकडून सिडको बसस्थानकाकडं जाणारी वाहतूक वळवण्यात आली. गॅस गळती झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या सहा बंबांमार्फत अपघातस्थळी पाण्याचा मारा केला जात असून सिडको एन-तीन, एन-चार, एन -पाच परिसरातील सर्व शाळा आणि आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. तसंच परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून गॅस टँकर अपघाताच्या ठिकाणापासून पाचशे ते सहाशे मीटर परिसरातील नागरिकांना घराबाहेर सुरक्षितस्थळी पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास, आणि स्वस्त धान्याचीइतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बंदी घातली आहे. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला, असून पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या सेवली पोलिस स्थानकातला कर्मचारी गजानन नागरे याच्यासह दोघांना पंधरा हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. वाळू वाहतुकीचा पकडलेला टिप्पर सोडवण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
****
पाच लाख रुपयांची लाच मागितल��याप्रकरणी नाशिक इथल्या सहकार विभागातले अधिकारी भीमराव जाधव आणि वरिष्ठ लिपिक अनिल घरडे यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. सोसायटीच्या नियमानुसार, एका सभासदानं कर्ज भरलं नसल्यानं त्या सभासदाचं घर लिलावाद्वारे विक्री करण्याचा आदेश देण्यात आला होता, त्यासंदर्भात संबंधित तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
****
रामायणातील प्रत्येक पात्रातून जीवन प्रणालीची ओळख होते, असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं महाकाव्य रामायण हा कार्यक्रम काल मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात तीनशेहून अधिक कलाकारांनी अप्रतिम सादरीकरण केलं.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जारी केलेल्या ताज्या क्रमवारीत तीन भारतीय गोलंदाजांना स्थान मिळालं आहे. रविचंद्र अश्विन अव्वलस्थानी कायम असून जसप्रित बुमरा चौथ्या तर रविंद्र जडेजा सहाव्या स्थानी आहे. पहिल्या दहा फलंदाजामध्ये एकमात्र खेळाडू विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 May 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मे २०२३ सकाळी ७.१० मि.****
राज्यात ६३ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन, एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेच्या समर्थनार्थ देशभरातल्या सर्व राजभवनांमध्ये सर्व राज्यांचे स्थापना दिन साजरे करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश
राज्यात आजपासून आपला दवाखाना सुरु होणार
राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांना संमिश्र यश
आकाशवाणीवरील शंभराव्या मन की बातच्या भागाचं श्रवण करणाऱ्या देश- विदेशातील जनतेचेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आभार
राज्य शासनाच्या वतीनं आजपासून सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध
मराठवाड्यात कालही अनेक भागात अवकाळी पाऊस
महाविकास आघाडीची आज मुंबईत वज्रमूठ सभा
आशिया बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीला अजिंक्यपद
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्ज तसंच मुंबई इंडियन्स संघांचा प्रतिस्पर्ध्यांवर विजय
****
राज्याचा ६३ वा स्थापना दिवस ‘महाराष्ट्र दिन’ आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुंबईत हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्मायांना आदरांजली वाहिली. ‘महाराष्ट्र दिना निमित्तानं राज्यभर ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा सोहळा देशभरातल्या राजभवनांमधेही साजरा केला जाणार आहे. देशातल्या सर्व राज्यांचे स्थापना दिन सर्व राज्यांमधे साजरे करावे, असं केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेच्या समर्थनार्थ हा निर्णय घेण्यात आला असून, २० राज्यं आणि आठ केंद्रशासित प्रदेशांनी तो स्व���कारला आहे.
या अंतर्गत महाराष्ट्र ��णि गुजरातचा स्थापना दिन आज सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजभवनांमधे साजरा करण्यात येईल. उभय राज्यातल्या सोहळ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, आज ऑनलाईन पद्धतीनं राज्यभरात आपला दवाखाना तसंच, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचं उद्घाटन होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या, पाच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, तसंच १२ आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातही आज आपला दवाखाना योजनेचा शुभारंभ होणार आहे. या दवाखान्या मध्ये सर्व उपचार मोफत मिळणार असून, गर्भवती माता संदर्भातही सर्व आरोग्य सुविधा मिळणार आहेत. आरोग्य मंत्री. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक आपला दवाखाना सुरु होणार आहे.
****
हैद्राबाद मुक्तीसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचं स्मरण करून, नव्या पिढीला मुक्तीसंग्रामाच्या लढ्याची माहिती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीनं, आज मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सर्व जिल्ह्यात ध्वजारोहणानंतर प्रभात फेरी काढून, मुक्तीसंग्राम लढ्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात येणार आहे.
****
महाराष्ट्र दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून राज्य पर्यटन विकास महामंडळानं, राज्यात ७५ स्थळांच्या यात्रेची विशेष योजना जाहीर केली आहे. या यात्रेला आजपासून सुरुवात होत असून, राज्यातले सहा जागतिक वारसा स्थळं, गड किल्ले, व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री तसंच सातपुडा पर्वत रांगा, लोणार सरोवर, कळसूबाई शिखर, सांदण दरी, अजिंठा आणि वेरुळ लेण्या आदी स्थळांची सफारी करता येणार आहे. या योजनेत पर्यटकांना निवास, भोजन आणि मूलभूत सुविधा प्राप्त होणार आहेत.
****
राज्यातल्या निवडणूक झालेल्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला, तर काही ठिकाणी मतदान झालं. निकाल लागलेल्या बाजार समित्यांमध्ये सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी संमिश्र यश संपादन केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री, लासूर, गंगापूर बाजार समितीवर भारतीय जनता पक्ष - शिवसेना युतीचा विजय झाला. फुलंब्री बाजार समितीत भाजप शिंदे गटानं १८ पैकी १४ जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीला एक जागा जिंकता आली. लासूर स्टेशन बाजार समितीत आमदार प्रशांत बंब आणि रमेश बोरनारे यांच्या शेतकरी बळीराजा विकास पॅनलचे १४, तर शिवसेना ठाकरे गटाचे दोन उमेदवार विजयी झाले. गंगापूर बाजार समितीतही शेतकरी बळीराजा विकास पॅनलनं १८ पैकी १३ जागांवर विजय मिळवला.
जिल्ह्यात पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल ९४ पूर्णांक ८९ शतांश टक्के, तर पाचोड बाजार समितीसाठी सुमारे ९४ टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली आहे. याठिकाणी आज मतमोजणी होणार आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंबड, आष्टी बाजार समितीवर भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला आहे. अंबडमध्ये आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्त्वात भाजपाचे १८ पैकी १५ उमेदवार विजयी झाले. आष्टी बाजार समितीवर भाजपाचे १८ पैकी १६ उमेवार विजयी झाले. परतूर बाजार समितीवर भाजपानं आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सोबत महाविकास आघाडी करत विजय मिळवला आहे. घनसावंगी बाजार समितीत आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीचे सर्व १८ उमेदवार विजयी झाले. मंठा बाजार समितीवर महाविकास आघाडीचे १२ तर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे सहा उमेदवार विजयी झाले.
हिंगोली जिल्ह्यातल्या जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलनं १६, तर शेतकरी विकास पॅनलनं दोन जागा जिंकल्या. कळमनुरी बाजार समितीत महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलनं १२ जागा जिंकल्या.
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी आणि सोनपेठ बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा विजय झाला.
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव बाजार समितीत आमदार प्रकाश सोळंके यांच्या गटाने विजय मिळवला. पाटोदा बाजार समितीनं सुरेश धस गटानं १७ पैकी १२ जागांवर, तर आमदार बाळासाहेब आजबे गटानं पाच जागांवर विजय मिळवला.
लातूर जिल्ह्यातल्या दहा पैकी पाच बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं, तर पाच बाजार समित्यांवर भाजपनं विजय मिळवला. निलंगा बाजार समितीत भाजप - शिवसेना युतीनं सर्व १८ जागा जिंकल्या. देवणी इथं १८ पैकी १६ जागांवर भाजप शिवसेना युतीनं, तर दोन जागांवर महाविकास आघाडीनं विजय मिळवला. औराद शहाजनी बाजार समिती भाजप महायुतीनं १८ पैकी १६ जागा जिंकल्या. रेणापूर बाजार समितीत महाविकास आघाडीनं सर्व १७ जागा जिंकल्या. जळकोट बाजार समितीत महाविकास आघाडीनं १८ पैकी १५ जागांवर, तर अहमदपूर बाजार समितीत १८ पैकी १३ जागांवर विजय मिळवला.
नांदेड जिल्ह्यात ना���देड कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीनं १७ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली.
****
आकाशवाणीवरील मन की बात च्या शंभराव्या भागाचं श्रवण करणाऱ्या देश- विदेशातील जनतेचेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. जनतेनं दाखवलेल्या उत्साहामुळे आपण भारावून गेल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. कार्यक्रम ऐकतांनाची आपली छायाचित्र नमो ॲप किंवा एमकेबी हंड्रेड डॉट नरेंद्र मोदी डॉट इन या लिंकवर पाठवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
दरम्यान, काल मोदी यांनी आपल्या मन की बात या जनतेसोबतच्या विशेष संवाद कार्यक्रमाच्या १०० भागात देशवासियांनी केलेल्या सेवेचा आणि त्यांच्या सामर्थ्याबाबत माहिती दिली. मन की बातच्या, आतापर्यंतच्या भागात संवाद साधलेल्या काही नागरिकांशी, पंतप्रधानांनी या भागातही संवाद साधत, सेल्फी विथ डॉटर, स्वच्छ भारत अभियान, हर घर तिरंगा, आदी विषयांवर चर्चा केली.
देशभरात ठिकठिकाणी सार्वजनिक स्वरुपात लोकांनी मोठ्या संख्येनं, मन की बातचा कालचा शंभरावा भाग ऐकला. मुंबईत विलेपार्ले इथं केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मन की बातचा शंभरावा भाग ऐकला.
स्वामी विवेकानंद यांनी ��मेरिकेत शिकागो इथल्या विश्वधर्म संमेलनातल्या भाषणातून, जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता; त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, असे गौरवोद्गार, राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. मुंबईत राजभवनात झालेल्या मन की बात सार्वजनिक श्रवण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, 'डिक्की'चे संस्थापक मिलिंद कांबळे, राज्यातले पद्म पुरस्कार विजेते, मन की बात कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी उल्लेख केलेले राज्यभरातले युवक, विद्यार्थी तसंच नागरिक हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
पंतप्रधानांनी मन की बातच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या प्रयोगशील लोकांना समोर आणून इतरांना प्रेरणा देण्याचं काम केलं, अशी प्रतिक्रिया डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी दिली. ते म्हणाले…
‘‘आज राजभवनमध्ये प्रधानमंत्री यांच्या मन की बात चा जो शंभरावा कार्यक्रम आहे, तो ऐकण्याचा योग आला. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी शंभराव्या एपिसोडचा प्रवास सगळा सांगितला. या कार्यक्रमामधून प्रधानमंत्री यांनी ग्रामीण भागातील जे अतिशय चांगले प्रयोग करणारे जे लोक आहेत, इनोव्हेटर्स आहेत, किंवा ज्यांना अनसंग हिरोज् असं म्हटलं जातं, अशा सगळ्यांना जनतेच्या समोर त्यांच्या कार्याला आणणं, त्यातून लोकांना प्रेरणा देणं, हे खूप मोठं काम या मन की बात मधून सुरू आहे.’’
मन की बातमध्ये हिवरे बाजारच्या पाणी व्यवस्थापनाची गाथा पंतप्रधानांनी सांगितली, याबद्दल या गावचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या….
१६ एप्रिल २०१६ ला हिवरे बाजारच्या पाणी व्यवस्थापनावर लोकसहभाची चर्चा त्यांनी मन की बात मध्ये केली होती. खरं म्हणजे आज राष्ट्र उभारणीमध्ये छोटी छोटी माणसं जे गावामध्ये, शहरांमध्ये आपापल्या क्षेत्रात काम करतात, त्यांच्या कामावर जर चर्चा झाली, तर एक मोठी चळवळ निर्माण होऊ शकते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तीनशे एक्कावन्न ठिकाणी, मन की बातचा शंभरावा भाग सार्वजनिकरित्या ऐकवण्यात आला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सहकारमंत्री अतुल सावे यांनी, पूर्वांचल वसतीगृह इथं हा भाग ऐकला. गरवारे कम्युनिटी सेंटर इथं, अनेक नागरिकांनी मन की बातचा शंभरावा भाग सामुहिकपणे ऐकला.
जालना शहरात गोपीकिशननगर आणि मुक्तेश्वरद्वार सभागृहात, मन की बातचं थेट प्रसारण करण्यात आलं. रेल्वेराज्यमंत्री ��ावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान मनमोकळेपणाने आपल्याशी संवाद साधतात, ही भावना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याचं, दानवे म्हणाले. या निमित्ताने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतल्या विजेत्यांना, दानवे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं.
आकाशवाणी औरंगाबाद केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे माजी राज्य अध्यक्ष भाई ज्ञानोबा मुंडे यांनी, तर आकाशवाणी उस्मानाबाद केंद्रात आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी, मन की बातचा शंभरावा भाग ऐकला. या भागानिमित्त धाराशिव जिल्ह्यात येडशी इथं १०० गायींचं पूजन तसंच मन बात कार्यक्रमाच्या सार्वजनिक श्रवण कार्यक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
नांदेड जिल्ह्यात मन की बात कार्यक्रमाचं एक हजार ठिकाणी सार्वजनिक प्रसारण करण्यात आलं. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पावडेवाडीत जनसमुदायासमवेत हा भाग ऐकला.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं खोलेश्वर माध्यमिक शाळेत, आमदार नमिता मुंदडा, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या उपस्थितीत, मन की बातचा शंभरावा भाग ऐकण्यात आला.
****
राज्य शासनाच्या वतीने आजपासून सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्याच्या नायगाव इथं, राज्यातल्या पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचं उद्घाटन, महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज होणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने वाळू विक्री ऑनलाइन प्रणालीचं लोकार्पण होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.
****
मराठवाड्यात कालही अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात सिल्लोड, गंगापूर, सोयगाव परिसरात जोरदार पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथं काल मेघगर्जनेसह पाऊस पडला. हिंगोली शहरासह जिल्ह्यात काल पाऊस झाला. कनेरगाव नाका परिसरात गारपीट झाली.
दरम्यान, मराठवाड्यात चार मे पर्यंत अवकाळी पाऊस कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत वज्रमूठ सभा होणार आहे. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुल मैदानाबर सायंकाळी साडेपाच वाजता ही सभा होणार आहे.
****
भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या बॅडमिंटन पटूंच्या जोडीने आशिया बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. काल झालेल्या सामन्यात त्यांनी मलेशियाच्या जोडीचा १६-२१, २१-१७, आणि २१-१९ असा पराभव केला.
****
इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई इथं झालेल्या चुरशीच्या सामन्यात पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्जचा चार गडी राखून पराभव केला. चेन्नई संघानं प्रथम फलंदाजी करत चार गडी गमावत दोनशे धावा केल्या, पंजाब संघानं सहा गडी गमावत अखेरच्या चेंडूवर हे लक्ष्य साध्य केलं.
या स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात, मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्स संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत राजस्था��� रॉयल्स संघानं निर्धारित २० षटकात सात बाद २१२ ��ावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करत मुंबई इंडियन्स संघानं २० षटकात तिसऱ्या चेंडूवर २१४ धावा करुन विजय मिळवला.
****
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी शासन स्तरावरून सर्वोतोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. औसा तालुक्यात टेंबी इथं वीज कोसळून मरण पावलेले शौकत इस्माईल यांच्या कुटुंबाची महाजन यांनी काल भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या कोल्हापूर इथं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 March 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ मार्च २०२१ सायंकाळी ६.१०
****
$758308E6-2202-4518-8A5** विरोधी पक्षांकडून सरकारच्या कामकाजावरची टीका माहितीच्या आधारावर तसंच विश्वासार्ह असावी- उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन
** कोविड नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांना विमानातून उतरवून देण्याचे निर्देश
** औरंगाबाद इथं नऊ तर जालन्यात दोन कोविडबाधितांचा मृत्यू
आणि
** अहमदनगर इथल्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अटक
****
विरोधी पक्षांना सरकारच्या कामकाजावर टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र ही टीका माहितीच्या आधारावर तसंच विश्वासार्ह पद्धतीनं करावी, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना सदनाच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी आयोजित दोन दिवसीय कार्यक्रमाचं उद्घाटन राज्यसभा सभापती नायडूंच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सदनात मुद्दे उपस्थित करण्यापूर्वी त्याबाबत सखोल माहिती घेण्याच्या आवश्यकतेवर नायडूंनी भर दिला. मात्र सरकारच्या प्रत्येक कृतीचा विरोध करणं योग्य नसल्याचं, त्यांनी नमूद केलं.
****
जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात पोलिसांनी आज सात जणांना अटक केली. या सर्वांचे हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या सर्वांकडून आक्षेपार्ह साहित्य पोलिसांनी जप्त केलं असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
****
विमान प्रवासादरम्यान कोविड नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांना विमानातून उतरवून दिलं जाणार आहे. नागरी हवाई वाहतुक संचालनालयानं याबाबतचे निर्देश जारी केले आहेत. विमान प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांनी मास्क लावणं तसंच सुरक्षित अंतर राखणं आवश्यक आहे. मात्र काही प्रवासी हे नियम पाळत नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर महासंचालनालयाने हे निर्देश जारी केले आहेत.
****
मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून, ही कायदेशीर लढाई शांतपणे, एकत्र येऊन एकजुटीने लढूयात आणि जिंकूयात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसंदर्भात मराठा समाजातल्या विविध संघटनांच्या समन्वयकांशी मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आरक्षणासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ भक्कमपणे शासनाची बाजू मांडत आहेत, ज्या खासगी याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे म���ंडायचे आहे, त्यांनी शासनाबरोबर एकत्रीत पद्धतीनं एकेक मुद्दा मांडून समर्थनार्थ आवश्यक पुरावे सादर करावेत, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा यंदाचा हा चौथा भाग ऑनलाईन असणार आहे. एक्झाम वॉरियर अभियानात विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण करणारा कार्यक्रम अशी या कार्यक्रमाची ओळख निर्माण झाली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यास इच्छुकांनी इनोव्हेटीव्ह इंडिया डॉट माय गोव्ह डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा आज मुंबईत झाली, त्यात ही निवड करण्यात आली. राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची उपाध्यक्षपदी, तर सचिवपदी भाई गिरकर यांची निवड करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज नऊ कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये सहा महिला तर तीन पुरुष रुग्णांचा समावेश असून, यापैकी दोन रुग्ण जालना जिल्ह्यातले आहेत. दरम्यान घाटी रुग्णालयात आज सकाळच्या सत्रात २९ नवे कोविडग्रस्त दाखल झाले. तर २६ रुग्णांना सुटी देण्यात आली. सध्या या रुग्णालयात ४०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
जालना जिल्ह्यातही आज दोन कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१० झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ४०० नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात एका दिवसात आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आता १८ हजार ६९ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ३६८ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले १६ हजार ३२९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. बाधित असलेल्या १ हजार ३३० रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज १८१ रुग्ण आढळले. यामध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ८२, अंबाजोगाई ३३, आष्टी १८, गेवराई आणि केज तालुक्यात प्रत्येकी १२, परळी ७, शिरुर, वडवणी तसंच माजलगाव तालुक्यात प्रत्येकी ५, तर पाटोदा तालुक्यातल्या २रुग्णांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. या टाळ��बंदीत नागरिक स्वयंस्फूतीनं सहभागी झाले. नागरिकांचं असंच सहकार्य राहिलं तर, कोविड संसर्ग कमी होण्यास आणि त्यावर मात करण्यात आपण सशस्वी होवू, असा विश्वास पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी व्यक्त केला. गुप्ता यांच्यासह, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका प्रशासक आस्तिककु��ार पांडेय यांनी, शहरातल्या विविध भागात फिरुन टाळेबंदीचा आढावा घेतला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रस्त्यावर नागरीकांची वर्दळ नसून, प्रतिबंधात्मक नियमांचं नागरिक पालन करत असल्यानं, पोलिस आयुक्तांनी नागरिकांचे आभार मानले. जिल्ह्यात उद्याही टाळेबंदी पाळली जाणार आहे
****
परभणी जिल्ह्यातही सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी लागू आहे. परभणी शहरात सकाळपासूनच बाजारपेठा कडकडीत बंद असल्याने रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. महानगरपालिका हद्द आणि लगतचा पाच किलोमीटरचा परिसर, सर्व नगरपालिका, नगर पंचायती आणि त्यालगतच्या तीन किलोमीटर परिसरात ही संचारबंदी लागू आहे. दवाखाने, औषधी दुकाने, तसंच परीक्षार्थ्यांना या संचारबंदी दरम्यान सूट राहणार आहे. जिल्ह्यातील सेलू, गंगाखेड, पूर्णा, मानवत शहरासह इतर तालुक्यातही संचारबंदीची कडक अंमलबजावणी होत असल्याचं दिसून आलं.
****
नांदेड जिल्ह्यात २१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत, विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हा तसंच शहरातील सर्व शिकवणी वर्ग या काळात बंद राहतील. अभ्यासिकांसना मात्र सुरू राहण्याची मुभा देण्यात आली आहे. औषधी दुकानं वगळता इतर सर्व दुकानं सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेदरम्यान सुरू ठेवण्यात येतील.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात पोहनेर, मंगरुळ इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आज ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोविड लस देण्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. आज पोहनेर इथं ८० वर्षावरील दोन महिलांनी लसीकरण करुन घेतलं, त्याबद्दल अध्यक्ष कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक आरोग्य केंद्रावर आठवडयातून दोन वेळेस लस देण्याच्या सूचना कांबळे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. इतरही लसीकरण केंद्रांच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला.
****
नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज श्री गुरू गोविंदसिंघगजी स्मारक शासकीय रुग्णालयात कोरोना लस घेतली. राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नीतीन राऊत यांनीही आज कोविड लस घेतली.
****
अहमदनगर इथल्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर अहमदनगर पोलिसांनी आज पहाटे हैदराबाद इथून अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे फरार होता. रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा इथं हत्या झाली होती.
****
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत, विधीज्ञ एकनाथराव साळवे यांचं आज चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इथं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. १९६७ पासून १९७८ पर्यंत सलग ११ वर्ष त्यांनी चंद्रपूर विधानसभा ��्षेत्राचे प्रतिनिधित्व केलं होतं. साळवे यांच्या निधनाबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. फुले-शाहू-आंबेकर यांच्या विचारांवर नितांत श्रद्धा असलेला पुरोगामी विचारांचा अग्रणी योद्धा गमावला, अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री नीतीन राऊत यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
****
नांदेड इथले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांनी लिहिलेल्या 'गांधी समजून घेताना' या पुस्तकाला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा सह्याद्री साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं वाळुची चोरटी वाहतुक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी वाळू आणि टिप्परसह सहा लाख १२ हजार रुपयांचा मुद्देूमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
//********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 March 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.
****
** विधीमंडळात निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी खंडीत न करण्याची सरकारची घोषणा.
** शेतकऱ्यांना दिवसा आणि पुरेशी वीज देण्याला शासनाचं प्राधान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
** औरंगाबाद-अहमदनगर या १२० किलोमीटर अंतराच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात
** राज्यात सात हजार ८६३ नव्या कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात ७६५ बाधित तर आठ जणांचा मृत्यू
** लातूर जिल्ह्यात महानगरपालिकेसह, नगर परिषद क्षेत्रात रात्री ११ ते दुसऱ्या दिवशीच्या पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू
** औरंगाबाद शहरात रुग्ण संख्या आणि गर्दीच्या ठिकाणी टाळेबंदी लावण्याचा महापालिका प्रशासकाचा इशारा; परभणी जिल्ह्यात मात्र टाळेबंदी लावण्यास व्यापाऱ्यांसह उद्योजकांचा विरोध
आणि
** औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एप्रिल अखेरपर्यंत पदव्युत्तर परीक्षा
****
कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी खंडीत करु नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते काल विधानसभेत बोलत होते. विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काल विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून विजेच्या मुद्यावर चर्चा घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावर वीज थकबाकी संदर्भात विशेष बैठक घेत चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं पवार यांनी सांगितलं. वीज जोडणी खंडीत करण्याच्या मोहिमेला स्थगिती दिल्याबद्दल फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
****
शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देण्याला शासनाचं प्राधान्य असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल विधानभवनात करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. संपूर्ण देश टाळेबंदीत असताना, शेतकरी बांधव मात्र कर्तव्यावर होते, इतरांसाठी मळे फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काटे येऊ नयेत, यासाठी त्यांच्या मागे सरकार ठामपणे उभं राहील, असं आश्वासन त्यांनी दिलं. महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले.
****
राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाच्या चर्चेला काल विधानसभेत सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेत सहभागी होत, सरकार फेसबुक लाईव्हमध्ये मग्न असल्याची टीका केली. राज्य सरकारचा 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ते 'मी जबाबदार' हा प्रवास आरोग्य व्यवस्थेची थट्टा असून, शिक्षणक्षेत्रात सरकारचा वाढता हस्तक्षेप, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण, यावर भाष्य करत, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ��ोलमडली असल्याचं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात कोविडचा प्रभाव एवढा का वाढतो आहे, असा सवालही त्यांनी केला. कोविड प्रतिबंधक टूल किट आणि धानखरेदीत घोटाळा झाल्याचा आरोपही फडणवीस यांनी ��ेला.
पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी चर्चेत सहभागी होत, कोविड प्रतिबंधासाठी राज्य सरकारनं कृती दल स्थापन करुन अनेक महत्वाची कामं केल्याचं नमूद केलं.
शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी, कोविड पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अभिमानास्पद कामगिरी केल्याचं मत व्यक्त केलं. सीमावासीयांवर सातत्यानं अन्याय होत असल्यामुळे हा भाग केंद्रशासित करावा, अशी मागणी त्यांनी केली.
****
राज्यात ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल, तिथल्या संबंधित पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. विधान परिषदेत सदस्य रवींद्र फाटक तसंच महादेव जानकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला, ते उत्तर देत होते.
****
राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही कृषी मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत, २१७ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी १०३ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती भुसे यांनी दिली.
कृषी विभागातली रिक्त पदं लवकरात लवकर भरण्यात येतील, असं कृषीमंत्र्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्यात कृषी विभागासाठी गट-अ ते गट-ड संवर्गात, एकूण २७ हजार ५०२ पदांचा आकृतिबंध मंजूर असून, त्यापैकी १८ हजार ६२२ पदं भरलेली आहेत तर आठ हजार ८८० पदं रिक्त आहेत.
****
राज्यात अवैध रेती उत्खननाला प्रतिबंध करण्यासाठी, तहसील तसंच उपविभागीय स्तरावर भरारी पथकांमार्फत मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं असून, त्याबाबत महसूल मंत्री, गृहमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांची आपल्या दालनात बैठक घेणार असल्याचं सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी सांगितलं.
****
लातूर तालुक्यातील रायवाडी इथं गावकऱ्यांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा प्रशासनाने हटवला आहे. महाराजांचा पुतळा पूर्ववत उभारावा, अशी मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल विधान सभेत केली. अवैध बांधकामे आणि बेसुमार वाळू उपशावर कारवाई होत नाही, मात्र महाराजांचा पुतळा काढण्यात तत्परता दाखवली जा��े, अशी टीका निलंगेकर यांनी केली.
****
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून पैसे आकारण्याच्या सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरचे सहव्याधी असलेले रुग्ण तसंच ६० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळणार असून, खासगी रुग्णालयात लसीची किंमत २५० रुपये प्रति डोस द्यावी लागणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणानुसार लसीकरण मोहिमेसाठी ३५ हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत. एवढ्या रकमेमध्ये दीड अब्जाहून अधिक डोस विकत घेता येतील, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधलं. या निधीतून ७५ कोटी लोकसंख्येचं म्हणजेच भारतातील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करता येणं शक्य आहे. असं असताना केंद्र सरकार सर्वसामान्यांकडून शुल्क का घेत आहे?, असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला आहे.
****
औरंगाबाद-अहमदनगर या १२० किलोमीटर अंतराच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. या अंतरात पर्यटन स्थळं, व्यापारी पेठा तसंच महत्त्वाच्या बाजारपेठा किती आहेत, औरंगाबाद पुणे-नगर साठी बसवाहतुकीतून किती उत्पन्न मिळतं, या मार्गावर मालवाहतुक किती आहे, या बाबी तपासल्या जाणार आहेत. या रेल्वे मार्गामुळे औरंगाबाद रेल्वेने थेट पुण्याशी जोडलं जाणार असून, हा मार्ग अधिक सोयीचा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन मार्च १९३० साली नाशिक इथं काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला होता. दरवर्षी दोन मार्च रोजी या सत्याग्रहाचं स्मरण करून बाबासाहेबांना अभिवादन केलं जातं. कालही या मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रम झाले. कोविड प्रादुर्भावामुळे छोट्या स्वरूपात आणि आरोग्य नियमांचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमांना विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी हजेरी लावली.
****
राज्यात काल सात हजार ८६३ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २१ लाख ६९ हजार ३३० झाली आहे. काल ५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५२ हजार २३८ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४१ शतांश टक्के झाला आहे. तर काल सहा हजार ३३२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २० लाख ३६ हजार ७९० रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ८९ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ७९ हजार ९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत
****
मराठवाड्यात काल नव्या ७६५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर, जालना तसंच नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ३२५ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात १२२, नांदेड ९३, हिंगोली ५६, बीड आणि लातूर प्रत्येकी ४९, उस्म��नाबाद ४०, तर परभणी जिल्ह्यात ३१ नवे रुग्ण आढळून आले.
****
लातूर जिल्ह्यात लातूर शह�� महानगरपालिकेसह, औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर नगर परिषद क्षेत्रात, कालपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी याबाबत आदेश जारी केले. या आदेशातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. सार्वजनिक वाहतुक, औषधी दुकानं, रुग्णालयं यांना आदेश लागू राहणार नाही, असं या आदेशात म्हटलं आहे
दरम्यान, यंदा कोविड प्रादुर्भावामुळे लातूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानची महाशिवरात्री यात्रा, पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. देवस्थानच्या प्रशासक तथा धर्मादाय उपायुक्त यू.एस.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त ठराविक मंडळींच्या उपस्थितीत विधिवत पूजाअर्चा मात्र होणार आहेत. शिवरात्रीच्या दिवशी रात्री गवळी समाजाच्या वतीने केला जाणारा दुग्धाभिषेक तसंच माळी समाजाचा पुष्पाभिषेक फक्त पाच जणांच्या उपस्थितीत होईल.
दरवर्षी गौरीशंकर मंदिरापासून काढण्यात येणारी मानाच्या काठ्यांची मिरवणूक यावर्षी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी दोन मानकऱ्यांच्या हस्ते या काठ्यांचे गाभाऱ्यातच पूजन होईल. यात्रा कालावधीत केले जाणारे भजन-कीर्तन तसंच काकडा फक्त ११ लोकांच्या उपस्थितीत केला जाईल. शिवरात्री निमित्त भाविकांसाठी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
****
औरंगाबाद शहारत कोरोना विषाणू बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या भागात रुग्ण वाढले आहेत, जिथे गर्दी होत असेल, अशा भागात टाळेबंदी लावण्याचा इशारा महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिला आहे. नागरीकांकडून नियमांचं पालन होत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
****
परभणी जिल्ह्यात टाळेबंदी लावण्यास व्यापाऱ्यांसह उद्योजकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल झालेल्या बैठकीत, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोविडचा वाढता प्रादूर्भाव पाहता किमान सात दिवसांची टाळेबंदी करावी लागेल, असं नमूद केलं, मात्र व्यापाऱ्यांनी पूर्ण टाळेबंदीला विरोध दर्शवत रात्रीच्या संचारबंदीला सहमती दर्शविली आहे.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत यशस्वीपणे पार पाडाव्यात, असं कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद तसंच उस्मानाबाद इथल्या विभागप्रमुखांची काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत ऑनलाईन, ऑफलाईन तासिका घेऊन अभ्यासक्रम संपवावा लागेल. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन परीक्षा यशस्वीपणे पार पाडाव्यात, असं कुलगुरु म्हणाले.
दरम्यान, कुलगुरु डॉ. येवले यांनी काल औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन सपत्निक कोविड लस घेतली. उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले तसंच निवृत्त शिक्षक, कर्मचारी, प्राचार्य आणि ज्येष्ठ नागरिकांनी कोविड लस घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. विद्यापीठातल्या समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. स्मिता अवचार यांनीही छावणीतील आरोग्य केंद्रात जाऊन काल कोविड लस घेतली.
****
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या शिवणी जामगा इथं जातीय तणावातून हल्ला झालेल्या कुटुंबीयांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल भेट घेतली. जातीय तणावातून निर्माण होणाऱ्या हल्ल्याचं कोणीही समर्थन करणार नाही, असे हल्ले हे मानवतेच्या दृष्टिनेही लज्जास्पद असून, यात कोणाचा तरी जीव जाणं ही प्रवृत्ती गंभीर असल्याचं मत, आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
कॅन किड्स किड्स कॅन या स्वयंसेवी संस्थेच्या बाल कर्करोगविरोधी जनजागृती अभियानात, राज्य परिवहन महामंडळ सहभागी झालं आहे. कॅनकिड्स किड्सकॅन ही संस्था संपूर्ण देशभरात बाल कर्करोगविरोधी जनजागृतीचे कार्य करते. या संस्थेचे बाल कर्करोगविरोधी जनजागृतीचे फलक एसटी बसेसवर निःशुल्क लावण्यात आले आहेत. सकारात्मक सामाजिक बदलांमध्ये एसटी महामंडळ कृतिशील सहभाग नोंदवत आहे.
****
परभणी जिल्ह्यातलं जांभूळ बेट हे पर्यटन स्थळ व्हावं म्हणून विशेष प्रयत्न करणार असल्याचं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी म्हटलं आहे. पालम तालुक्यात जांभूळबेटाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. जांभूळ बेटाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्व यंत्रणांची मदत घेणार असल्याचंही टाकसाळे यांनी सांगितलं. या भागातल्या काटेरी बाभळी काढून त्या ठिकाणी फळझाडांची लागवड करणार असल्याचं टाकसाळे यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पिशोर पोलिस ठाण्याचा उपनिरीक्षक रणजीत कासले याला, वीस हजार रुपायांच्या लाचेची मागणी केल्याचं सिद्ध झाल्यानं, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. पोस्को कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी कासले यांनं ही लाच मागितली होती.
तर दुसऱ्या एका घटनेत देवगाव रंगारी पोलिस ठाण्याचे उप निरीक्षक शैलेश जोगदंड यांनी बळजबरीने २५ हजार रुपये लाच देणाऱ्या वाळू माफियाला पकडून दिलं. बळेगावात बेकायदा वाळू उपसा आणि वाहतूक करण्याचं काम गोकुळ सुर्यवंशी हा करत होता. देवगाव रंगारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाळूची वाहतूक करु द्यावी, यासाठी त्यानं पोलिस उपनिरीक्षक जोगदंड यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. जोदगंड यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर, सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यातल्या बाभळगाव ग्रामीण रुग्णालयातला कनिष्ट लिपिक प्रमोद सीतापे याला तीन हजार रुपये लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. सातव्या वेतन आयोगाच्या सुधारीत सेवा अंतर्गत आश्वासीत प्रगती योजनेच्या मंजुर झालेल्या लाभाची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
नाशिक जिल्ह्यातल्या बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव गेल्या काही दिवसात क्विंटलमागे दीड हजार रुपयांनी घसरले आहेत.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. काल लाल कांद्याला किमान एक हजार रुपये ते कमाल सरासरी २५०० रूपये क्विंटल भाव मिळाला. पांढऱ्या कांद्याला किमान ८६० रुपये तर कमाल सरासरी बाराशे ५० रूपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.
//********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 March 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०१ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि. ****
· राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ.
· पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांचा वनमंत्री मंत्रीपदाचा राजीनामा.
· राज्याची आर्थिक घडी वि��्कटली, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही बिकट झाल्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका.
· ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणाला आजपासून सुरूवात.
· मराठा आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्प्यात- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
· नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांवरच्या प्रशासक नियुक्तीस, मुदतवाढ देण्याचा तसंच नांदेडला डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात शासकीय परिचर्या महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता.
· राज्यात आठ हजार २९३ तर मराठवाड्यात ६३९ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद.
आणि
· कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभू्मीवर हिंगोली जिल्ह्यात आजपासून सात दिवस संचारबंदी.
****
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ होत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनास प्रारंभ होईल. राज्याचे अर्थमंत्री- उपमुख्यमंत्री अजित पवार, हे येत्या आठ मार्चला महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचा कालावधी दहा दिवसांचा ठेवण्यात आला आहे. सभागृहात आमदारांसाठी विशिष्ट अंतर राखत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप खोडून काढले. कोरोना विषाणू संसर्ग काळात भ्रष्टाचार करण्यात आला, असा त्यांनी आरोप केला, या आरोपातून ते कोरोना योद्ध्यांची चेष्टा करत असून, आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांची कीव करावीशी वाटते, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून, दुसरी लाट वाढू नये, यासाठी आपण प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यात रूग्ण संख्या वाढत आहेत तिथं सुविधा उपलब्ध केल्या जात असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.
बीड जिल्ह्यातल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा स्वीकारला असल्याची माहितीही, मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पूजा चव्हाण हिचा मृत्यू दुर्दैवी असून, या प्रकरणाचा स्वतंत्र आणि निष्पक्षरित्या तपास केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पूजा चव्हाणचे आई-वडील आज आपल्याला भेटले, त्यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, मात्र नैतिकतेच्या आधारावर राठोड यांनी राजीनामा दिला असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, मंत्रीपदापासून दूर राहून या संदर्भातल्या चौकशीला सहकार्य करणार असल्याचं, राजीनामा दिल्यानंतर राठोड यांनी सांगितलं. चौकशीपूर्वीच विरोधी पक्षातर्फे आपली बदनामी करण्यात आली, पोलिस तपास करत आहेत, त्यातून सत्य बाहेर यावं ही आपली भूमिका असल्याचंही, राठोड म्हणाले. पूजा चव्हाण सोबतची त्यांची छायाचित्रं तसंच या प्रकरणासंबंधी ध्वनिफीत सामाजिक संपर्क माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यापासून, भारतीय जनता पक्षानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली ��ोती.
****
राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही बिकट झाला असल्याची टीका, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, काल मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीनंतर, ते वार्ताहरांशी बोलत होते. वाळू चोरी, पोलिसांच्या बदल्या, कोरोना विषाणू संसर्गाच्या परीस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असून, हे विषय अधिवेशनात मांडणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणाचा पुढचा टप्पा आजपासून राज्यात सुरू होणार आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत उपलब्ध असेल, तर खासगी रुग्णालयात प्रत्येक डोसकरता, २५० रुपये शुल्क द्यावं लागेल, अशी माहिती राज्याचे लसीकरण अधिकारी डी. एन. पाटील यांनी दिली. विविध आजार असलेल्या ४५ वर्षांवरच्या व्यक्ती, आणि ६० वर्षांवरचे ज्येष्ठ नागरिक, उद्यापासून ‘कोविन अॅप’वर लसीकरणासाठी नोंदणी करू शकतील, याशिवाय रुग्णालयांमध्ये थेट जाऊन सुद्धा वेळ घेता येईल, असं त्यांनी सांगितलं. लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देणार असलेल्या रुग्णालयांची यादी लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचंही, लसीकरण अधिकाऱ्यांनी सांगितलं.
औरंगाबाद शहरात तीन आरोग्य केंद्रार ज्येंष्ठांकरता लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्या बन्सीलाल नगर, एक-११ आणि एन-आठ या तीन आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण होणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत लस दिली जाणार असल्याचं, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी सांगितलं.
****
मराठा आरक्षणाचा लढा हा आता अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आरक्षणाच्या कायद्यासाठी ज्या प्रमाणे विधीमंडळात सर्व सदस्य एकत्र आले, त्याप्रमाणेच यापुढेही हा न्याय हक्काचा लढा सामुहिकपणे लढू, यासाठी राज्य शासन म्हणून जे काही करण्याची आवश्यकता आहे, ते सर्व केलं जाईल, त्यात कमी पडणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, मुदत संपलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांवरच्या प्रशासक नियुक्तीस, मुदतवाढ देण्याचा निर्णय, राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. यापूर्वी ३० एप्रिलपर्यंत प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे, त्यामुळे प्रशासक नियुक्त काळात निवडणुका घेणं शक्य नसल्याचं, राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारला कळवलं असून, प्रशासकांना मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार राज्य मंत्रीमंडळानं काल हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुकही लांबली आहे.
बाल संगोपन योजनेअंतर्गत, अनाथ आणि तत्सम बालकांचं संगोपन करणाऱ्या पालक तसंच संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानात, वाढ करण्यासही, राज्य मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली. आता पालकांना प्रति बालक दरमहा देण्यात येणारं सहायक अनुदान, ४२५ वरून ११०० रुपये इतकं, तर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना, प्रती बालक ७५ वरून १२५ रुपये इतकं करण्यात आलं आह��. यामुळे प्र��ि बालकाला देण्यात येणारं अनुदान एक हजार २२५ रुपये इतकं होणार आहे.
नांदेड इथल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं, शासकीय परिचर्या महाविद्यालय स्थापन करण्यासही, मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. या महाविद्यालयाची विद्यार्थी प्रवेश क्षमता ५० निश्चित करण्यात आली असून, यासाठी आवश्यक पदनिर्मितीला, तसंच १६ कोटी नऊ लाख १४ हजार ४८० रुपये खर्चास, मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र पशु विज्ञान आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, आणि घटक महाविद्यालयातल्या शिक्षण आणि शिक्षक समकक्ष पदांना, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतन लागू करण्याचा, तसंच मुंबईत महापौर निवासस्थान परिसरातल्या, बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या ४०० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्याचा निर्णयही मंत्रीमंडळानं घेतला आहे.
****
राज्याचे मुख्य सचिव म्हणून सीताराम कुंटे यांनी काल पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
****
परीक्षांचा काळ येत असून लवकरच ‘परीक्षा पे चर्चा करु’ त्यासाठी सूचना पाठवा, चर्चेत सहभागी व्हा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या मालिकेचा हा चौऱ्याहत्तरावा भाग होता. डॉ.सी.व्ही रमण यांच्या संशोधन कार्याच्या गौरवार्थ काल साजऱ्या झालेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त, नाशिकच्या स्नेहिल यांच्या `रमण इफेक्ट` संदर्भातील संदेशाचा उल्लेख करुन, देशाचा वैज्ञानिक इतिहास जाणून घेण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. जून मध्ये पावसाळ्याच्या अनुषंगानं जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनं, जल शक्ती अभियान सुरू करण्यात येणार आहे. ‘जेव्हा अणि जिथं पावसाचं पाणी पडेल, ते साठवा’, हा या मोहिमेचा मूलमंत्र आहे असं सांगून, पाणी बचत आणि नियोजनाची माहितीही पंतप्रधांनांनी यावेळी दिली.
****
राज्यात काल आठ हजार २९३ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २१ लाख ५५ हजार ७० झाली आहे. तर काल तीन हजार ७५३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २० लाख २४ हजार ७०४ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल ६२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार १५४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ७७ हजार ८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत
****
मराठवाड्यात काल नव्या ६३९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या दोन, बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात २५६ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ९०, लातूर ८६, जालना ७९, बीड ४३, परभणी ३३, हिंगोली ५१, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २० नवे रुग्ण आढळून आले.
****
हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात आजपासून सात दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल हे आदेश जारी केले. दरम्यान, संचारबंदीच्या पा��्श्वभूमीवर काल हिंगोलीत बाजारपेठेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
****
लातूर शहरात शनिवार आणि रविवारी संचारबंदी पाळण्यात आली. काल जिल्ह्यात संचारबंदीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काल दुपारनंतर अनेक दुकानं सुरु झाली, तर नागरीकांची वर्दळही मोठ्या प्रमाणात पहायला मिळाली.
****
बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. प्रशासनानं सर्व दुकानं उघडण्याची मुभा दिली असून, सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत सर्व दुकानं उघडी राहणार आहे. इतरही २५ प्रकारच्या सेवा खुल्या करण्यात आल्या आहेत. शहर आणी ग्रामीण भागातले आठवडी बाजार मात्र पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात सायंकाळी सहा ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
****
कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करुन परभणी इथं व्यापारी, व्यावसायिक नागरिकांची तपासणी तात्काळ आणि सुलभ व्हावी यासाठी, विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोहिमेंतर्गत परभणी शहरातल्या वैष्णवी मंगल कार्यालय, मनपा रुग्णालय आणि जुना पेडगाव रोडवरील आरोग्य केंद्रावर आरटीपीसआर आणि रॅपिड अँटिजन चाचणी शिबिर आयोजित केलं आहे. शहरातले व्यापारी, व्यावसायिक, नागरिकांनी त्यांच्या सोईनुसार सदर केंद्रावर जाऊन तात्काळ कोरोना तपासणी करुन घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे.
****
केंद्र सरकारनं केलेल्या गॅस, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीबाबत काल राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीनं पेट्रोलपंपावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकांखाली ‘चूल मांडा’ आंदोलन केलं. प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा झालेल्या गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. एका महिन्यात करण्यात आलेली १०० रूपयांची गॅस दरवाढ, सर्वसामान्य नागरिकांचं जीवन उध्वस्त करणारी असल्याची टीका, चाकणकर यांनी केली. केंद्र सरकारच्या विविध करांना महागाईसाठी जबाबदार ठरवत याचा निषेध म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि आमदार सायकलवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानभवनात येणार आहेत.
****
औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या, महात्मा गांधी अध्यासन केंद्राच्या संचालकपदी, हिंदी विभागातले प्राध्यापक डॉ.संजय नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अध्यासन केंद्राचे संचालक तथा मराठी विभागप्रमुख डॉ.दासू वैद्य यांच्याकडे, मुकुंदराज अध्यासन केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
****
औरंगाबाद शहरात विना मास्क फिरणाऱ्या लोकांकडून महापालिकेचं पथक दंड वसूल करत आहे. काल ९१ व्य��्तींकडून ५०० रुपयेप्रमाणे, ४५ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला.
****
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट- क सरळसेवा भरतीसाठी, काल राज्यभर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेची प्रश्र्न पत्रिका एक तास उशिरा आल्यानं औरंगाबाद शहरातल्या काही परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींनी गोंधळ घातला.
दरम्यान, या परीक्षेतल्या विद्यार्थ्यांना मोबाईलवरुन उत्तरे पुरवणारी कंट्रोल रुम चिकलठाणा पोलिसांनी उद्ध्वस्त केली. खोकडपुरा परिसरातल्या एका अभ्यासिकेतून उत्तरे पुरवणाऱ्या या रॅकेटमधल्या तिघांना, तर गेवराई तांडा इथल्या एका परीक्षा केंद्रातून दोघांना पोलिसांनी अटक केली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 June 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १४ जून २०२१ सकाळी ७.१० मि. ****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी ��ंपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· राज्यातल्या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी दुर्ग प्रेमी-अभ्यासकांचा सहभाग असलेली मध्यवर्ती समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा.
· येत्या २६ जूनपासून, मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात - शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे.
· मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढून काहीही निष्पन्न होणार नाही; संसदेत आवाज उठवण्याची गरज - अशोक चव्हाण.
· राज्यात पाचही वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री - खासदार संजय राऊत.
· निवडणुका स्वबळावर लढवण्याची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका योग्य - काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान.
· मराठी माध्यमाच्या शाळा उद्यापासून सुरु, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीच शाळेत तर विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेणार.
· राज्यात १० हजार ४४२ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात २९ जणांचा मृत्यू तर ३९७ बाधित.
आणि
· औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात सहाजण ठार तर १२ जण जखमी.
****
राज्यातल्या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी दुर्ग प्रेमी-अभ्यासकांचा सहभाग असलेली एक मध्यवर्ती समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातल्या अडीचशे दुर्ग प्रेमींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत त्यांच्या सूचना काल जाणून घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या गड-किल्ल्यांचं पावित्र्य टिकवत त्यांचं संवर्धन करण्याचं काम सुरू असून, दुर्ग प्रेमी, दुर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी याबाबत आपल्या सूचना आणि प्रस्ताव, आपल्या सचिवालयातल्या संकल्प कक्षाकडे पाठवाव्यात असं आवाहन, त्यांनी यावेळी केलं. या सूचना, ‘सीएम’ ‘संकल्प कक्ष’ ॲट द रेट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन, या मेलवरही पाठवता येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
****
औरंगाबाद इथून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी येत्या २६ जूनपासून, मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची माहिती, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपण राज्याचा दौरा करत असल्याचंही, त्यांनी काल औरंगाबादमध्ये समाज बांधवांशी संवाद साधल्यानंतर, एका पत्रकार परिषदेत सांगितलं. येत्या पाच जुलै पर्यंत आरक्षणाचा तिढा सुटला नाही, तर येत्या सात जुलैपासून सुरु होणारं ��ाज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन होऊ देणार नसल्याचा इशारा, त्यांनी यावेळी दिला.
****
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढून काहीही निष्पन्न होणार नाही, असं मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यात विविध विकास कामांचं उद्घाटन केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ज्या ज्या पक्षाचे खासदार संसदेत आहेत, त्यांनी तिथेच आवाज उठवला तर फायदा होईल, सर्वांनी कायदेशीर लढाई लढली पाहिजे, असं ते म्हणाले. बिलोली इथं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं लोकार्पण चव्हाण यांच्या हस्ते झालं.
****
राज्यात पाचही वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री कायम राहील हे अगोदरच ठरलं असल्याचं, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगणं गैर नाही, अनेकांना तसं वाटत असतं, असं ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या संदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरात बोलतांना म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आता दिल्लीत मोर्चा काढून, केंद्र सरकारला मराठा समाजाची ताकद दाखवावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव देणं योग्य असल्याचं राऊत यांनी नमूद केलं.
****
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेसनं स्वबळावर लढवण्याची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका योग्य असून, पक्षाचीही भूमिका हीच असल्यानं आपलं त्याला समर्थन असल्याचं, माजी मंत्री- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. काँग्रेस सर्वात जुना पक्ष असून याआधी तो राज्यातही नंबर एकचा पक्ष राहिला आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेसनं एकहाती सत्ता आणलेली आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात आजही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार असून, स्वबळावर निवडणुका लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होण्यास मदत होईल, असं खान म्हणाले.
****
राज्यात मराठी माध्यमाच्या शाळा उद्यापासून सुरु होत आहेत. कोविड प्रादुर्भावामुळे यंदाही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीच शाळेत येतील, विद्यार्थ्यांना मात्र घरी बसून, ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागणार आहे.
दरम्यान, विद्या परिषदेच्या शैक्षणिक कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवरुन सोमवार ते शुक्रवार इयत्तानिहाय तासिकांचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. हे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलं आहे.
****
राज्यात काल १० हजार ४४२ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५९ लाख ०८ हजार ९९२ झाली आहे. काल ४८३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ११ हजार १०४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८८ शतांश ट���्के झाला आहे. काल ७ हजार ५०४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५६ लाख ३९ हजार २७१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ४४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ५५ हजार ५८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३९७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २९ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ११, जालना सहा, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी चार, बीड तीन, तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ११३ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात १०८, उस्मानाबाद ६३, लातूर ४४, परभणी २५, जालना २२, नांदेड २०, तर हिंगोली जिल्ह्यसत दोन नवे रुग्ण आढळून आले.
****
मराठवाड्यातील जालन्यासह राज्यातल्या अमरावती, पुणे तसंच छत्तीसगडमधील बिलासपूर या ठिकाणी, शंभर खाटांनी युक्त-सुसज्ज फिरते मेडिकॅब रुग्णालय, लवकरच सुरु होणार आहे. मद्रासच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था- आय.आय.टी.तर्फे मॉड्यूलस हाउसिंग या स्टार्ट अप उपक्रमाद्वारे, हे रुग्णालय विकसित करण्यात आलं आहे. या मेडीकॅब रुग्णालयांचं वैशिष्ट्य म्हणजे, यात अतिदक्षता विभाग, जीवरक्षक उपकरणं आणि वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था असून, रुग्णालयांची २५ वर्षे टिकाऊ क्षमता असल्याचं, पत्र सूचना कार्यालयानं सांगितलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आष्टामोड ते तिवटग्याळ रस्त्याचं काम शासनानं ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करावं, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. हे काम अत्यंत संथ गतीनं सुरू असून या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत असल्यानं राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि संबंधित गुत्तेदार यांनी हे काम गुणवत्तापूर्ण तसंच अधिक गतीनं होण्यासाठी यंत्र सामुग्रीची संख्या वाढवावी अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग आष्टामोड ते तिवटग्याळ या रस्त्याच्या कामाची पाहणी राज्यमंत्री बनसोडे यांनी केली तसंच उदगीर इथं बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एका महिन्याच्या काळात जर संबंधित गुत्तेदार यांनी रस्त्याच्या कामाची गती वाढवली नसल्याचं दिसून आलं तर त्यांच्या विरोधात निवेदनातल्या तरतुदीप्रमाणे राज्य रस्ते विकास मंडळानं कारवाई प्रस्तावित करावी, असे निर्देशही राज्यमंत्री बनसोडे यांनी यावेळी दिले.
****
लातूर जिल्ह्यात पंचेचाळीस वर्ष आणि त्यावरील वयोगटासाठीचं लसीकरण आज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू रहाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. महापालिकेतर्फे शहरातल्या पाच ठिकाणी पंचेचाळीस वर्षे वयोगटावरचं लसीकरण सुरू रहणार आहे. जिल्ह्यातल्या नागरिकांनी या लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास ०२३८२-२२३००२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असं अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केलं आहे.
****
उस्मानाबाद इथं कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडील गमावलेल्या अठरा वर्षाखालील मुलांना शिवसेना जिल्हा कार्यकारिणीतर्फे काल प्रत्येकी एक लाख रुपयांचं अर्थसहाय्य म्हणून मुदतठेव प्रमाणपत्र देण्यात आलं. राज्याचे पर्यटन मंत्री - शिवसेना युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास घाडगे-पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात हिरडपुरीच्या नदी पात्रात अवैधरित्या जमा वाळू साठा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल जप्त केला. पैठण येथील मोक्षघाट, नवगाव आणि हिरडपुरी इथं नदीपात्रात वाळू चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी थेट या भागाला भेट देऊन ही कारवाई केली. पैठणच्या नाथ मंदिर परिसरातल्या मोक्ष घाट इथं वाळू उपशाची पाहणी करतांना काल तिथल्या तीन दुकानं कोरोना प्रतिबंधात्मक शासकीय नियमावलीचा भंग करत असल्याचं आढळल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरही कारवाई करत त्यांना टाळं ठोकलं.
****
परभणी इथं ३१ हजार झाडं लावण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते काल झाला. जिल्ह्यातील ज्या इच्छुक सामाजिक संस्थांना वृक्षारोपण करायचं आहे, त्यांच्यासाठी विविध झाडांची रोपं शिवाजीनगर इथल्या आमदार संपर्क कार्यालयात मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या खुल्ताबाद तालुक्यात खांडी पिंपळगाव इथं भेंडाळा मारोती वन परीसरात सातारा जिल्ह्यातील कास पठार या बहुरंगी फुलांसाठी प्रसिद्ध ठिकाणासारखंच पठार विकसित केलं जाणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग केला जात आहे. या उपक्रमाची सुरुवात काल बिजारोपण करुन करण्यात आली. याप्रसंगी गोंदवले यांच्यासह, अन्य प्रशासकीय अधिकारी तसंच भेंडाळा मारोती संस्थानचे अध्यक्ष महेश उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
****
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात सहाजण ठार झाले तर १२ जण जखमी झाले. औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद घाटात दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. २३ वर्षीय मोनिका रेनवाला, तिचे वडील ज्ञानेश्वर परदेशी आणि मामा बद्री जाधव हे फुगे विकून घराकडे परतत असताना हा अपघात झाला.
सिल्लोडजवळ झालेल्या अन्य एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद पेटल्यानंतर काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, हा वाद सुरु असतानाच भराडीकडे जाणाऱ्या भरधाव जीपनं या सगळ्यांना धडक दिली.
****
जालना शहरातल्या अंबड चौफुलीवर काल सकाळी खासगी बस आणि जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ��ीपमधील एक महिला ठार झाली तर आठजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमधील तीन लहान मुलांसह दोन महिलांची प्रकृती चिंताजनक अस���न, त्यांच्यावर जालन्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त प्रवासी सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या चांदर इथले रहिवासी असून, ते जालन्यातल्या रामनगर इथं विवाहसोहळ्यासाठी येत असताना ही दुर्घटना घडली. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे.
****
आषाढी वारीसाठी पालख्यांसमवेत येणाऱ्या भाविकांची कोरोना विषाणू संसर्ग चाचणी केल्यावरच त्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी नगराध्यक्षा साधना भोसले यांची केली आहे. भाविक लसीकरण करून आले तर स्थानिक नागरिकांना धोका कमी वाटेल अशी अपेक्षा भोसले यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातल्या आळंदी इथल्या संत ज्ञानेश्वर महाराज- माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यावरून आळंदीचे गावकरी आणि वारकरी यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. पालखी सोहळा यावर्षीही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा व्हावा, अशी आळंदीच्या ग्रामस्थांची मागणी आहे. तर पाल��ी सोहळा पायी व्हावा यावर वारकरी ठाम आहेत.
****
रामकृष्ण मठ नागपूरहून निघणाऱ्या जीवन-विकास मासिकाचे संपादक, आणि आकाशवाणी नागपूरचे निवृत्त केंद्र संचालक अनंत अडावदकर यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. आचार्य विनोबा भावे यांच्या वाङमयावर त्यांना पीएचडी मिळाली होती. त्यांची अनेक साहित्य विषयक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी पुणे, पणजी आणि यवतमाळ आकाशवाणी केंद्रातही काम केले होते.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू नगर परिषदेनं शहरातील सर्व माजी सैनिकांची घरपट्टी-पाणीपट्टी माफ केली आहे. काल एका कार्यक्रमात संबंधितांना बेबाकीचं प्रमाण पत्र उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी आणि नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.
****
मराठवाड्यात या दोन दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 June 2020 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ८ जून २०२० सायंकाळी ६.०० **** औरंगाबाद इथं कोरोना विषाणूग्रस्त दोन कैदी कोविड सुश्रुषा केंद्रातून पसार औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या २ हजार ६९ वर अंबाजोगाई इथं कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेचं पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि अंबडचे माजी आमदार अण्णासाहेब उढाण यांचं निधन **** औरंगाबाद इथं कोरोना विषाणूग्रस्त असलेले दोन कैदी कोविड सुश्रुषा केंद्रातून पसार झाले आहेत. सय्यद सैफ सय्यद असद आणि अक्रमखान अयाजखान अशी या दोघांची नावं आहेत. दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीत असलेल्या या दोघा कैद्यांनी रविवरी रात्री खिडकीचे गज वाकवून, चादरीच्या सहाय्याने खाली उतरून पलायन केलं, सुरक्षा व्यवस्थेवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेऊन हे दोघे पसार झाल्याचं, मध्यवर्ती कारागृहाकडून सांगण्यात आलं आहे. या दोन्ही कैद्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं असून, नियंत्रण अधिकाऱ्याविरोधात विभागीय चौकशीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. किले अर्क परिसरात उभारण्यात आलेल्या या कोविड सुश्रुषा केंद्रात, १९ कैद्यांवर उपचार सुरू आहेत. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत आज दुपारनंतर आणखी चार रुग्णांची वाढ झाली. यामध्ये पंढरपूर इथले तीन तर मिलकॉर्नर परिसरातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. आज दिवसभरात ४९ रुग्ण आढळल्यानं, जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या २ हजार ६९ झाली आहे. यापैकी १०४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, १ हजार २२४ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ७४१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. **** नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे साडे चार हजारावर संशयितांचे नमुने तपासण्यास आले असून, त्यापैकी आतापर्यंत १९२ जण कोरोना विषाणूने बाधित आढळले होते, यापैकी ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १३१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. **** सातारा जिल्ह्यातील कोरोनाविषाणू बाधितांची संख्या १० ने वाढली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील बाधितांची एकूणसंख्या ६३१ झाली आहे. आतापर्यंत २६ जणांचा या संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. **** सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५ व्यक्तिंना कोरोनाविषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाविषाणू बाधितांची एकूण संख्या १२६ झाली आहे. यापैकी २२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेला आहे . **** सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर शहरातले पाच रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गामुक्त होऊन घरी परतले आहेत. आता शहरात एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २ जणांना कोरोनाविषाणूची लागण झाली. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ८२ झाली असून ३१ रुग्णांना प्रकृती सुधारल्यानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. आतापर्यंत ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. **** गडचिरोली जिल्ह्यात आणखी एकाला कोरोनाविषाणूचा संसर्ग झाला आहे. हा रुग्ण मुंबईहून आलेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून २७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून १६ जणांवर उपचार सुरु आहे. **** धुळे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात ५६ रुग्ण कोरोना विषाणू बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २४८ झाली आहे. आतापर्यंत ११२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण नियंत्रण क्षेत्रांची संख्या ७१ झाली आहे. दरम्यान, शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयाला आजपासून कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात आलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** सर्व घटकांना मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, परिस्थिती सुरळीत होईल, असा विश्वास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज सांगली इथं पत्रकारांशी बोलत होते. जनतेकडून गोळा झालेल्या करातून सरकारचं कामकाज चालत असत, मात्र टाळेबंदीच्या काळात कर संकलन झालेलं नाही, विविध मार्गाने पैसा उभा करण्याचं प्रयत्न सरकार करत आहे, प्रसंगी कर्ज काढून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार केले जातील, असंही पाटील यांनी सांगितलं. **** औरंगाबाद इथलं कोविड सुश्रुषा केंद्र येत्या आठवडाभरात तयार होईल, असं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितलं आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या या रुग्णालयात अडीचशे खाटांची व्यवस्था असेल. या रुग्णालयासाठी साठ आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, इथल्या आरोग्य सुविधांबाबत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाला प्रस्ताव पाठवल्याचं, औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितलं. सहा कोटी रुपये खर्चून ��भारण्यात आलेल्या या रुग्णालयात सर्व गरजेची उपकरणं परवा दहा जूनपर्यंत दाखल होतील, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. **** बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातल्या पहिल्या कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेचं जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. या प्रयोगशाळेत बीड सह आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या कोरोना संशयित रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करता येईल. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी याची मदत होईल असा विश्वास मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. बीड जिल्ह्यातल्या संशयितांचे नमुने आतापर्यंत लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आ. संजय दौंड, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. **** अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयातल्या परिचारिकांनी कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केलं. राज्याच्या मुख्य सचिवांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये यासंदर्भात दिलेल्या आदेशाची आरोग्य विभाग पायमल्ली करत असल्यानं याच्या निषेधार्थ कास्ट्राईब संघटनेच्या वतीनं संघटनेचे महासचिव एस टी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. पगार कपातीचा निर्णय मागे घ्यावा अशीही मागणी या परिचारिकांनी केली आहे. गोंदिया इथंही बंधपत्रित ४९ परिचारिकांनी याच मागणीसाठी आज एक दिवसीय काम बंद आंदोलन केलं. **** बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं शेगाव मार्गावर असलेल्या एका हॉटेलमधल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून १८ जणांना अटक केली आहे. या कारवाईत मोबाईल, चारचाकी, दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण १३ लाख ४७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींमध्ये हॉटेलचा संचालक योगेश जाधव याच्यासह आणखी १८ जणांचा समावेश असून या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात केलसुला गावातल्या महिलांनी अवैध दारू विक्रीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. यापूर्वी सेनगाव तहसील कार्यालयात निवेदन देऊनही प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही. आज या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून, उपोषणाचा इशारा दिला आहे. **** परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात कावलगाव शिवारात गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूची चोरी करणाऱ्या तस्करांविरूध्द पोलिसांनी आज धडक कारवाई केली. यामध्ये एक टेम्पो, दोन ट्रॅक्टर, वाळू उपसा करणारी बोट, असा एकूण २१ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. **** जालना जिल्ह्यातल्या अंबडचे माजी आमदार अण्णासाहेब उढाण यांचं आज निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. १९६७ ते ७२ या काळात त्यांनी अंबड मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. घनसावंगी तालुक्यात कंडारी या गावी राहत्या घरीच त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी कंडारी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातलं पहिलं वर्ष यशस्वी ठरलं असून, कोरोना विषाणू संसर्गाविरूध्द लढतांना अनेक योजनांच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना मदत केली असल्याचं, नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. ते आज नांदेड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यात रोजगार गेलेल्या गोरगरीब दिड लाख लोकांना अन्नधान्याची पाकिटं, तसंच कम्युनिटी किचन या उपक्रमातून एक लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती चिखलीकर यांनी दिली. **** परभणी जिल्ह्यात ५ लाख नागरिकांना आर्सेनिक अल्बम-30 या औषधीचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचं, आमदार डॉ.राहुल पाटील यांनी सांगितलं आहे. परभणी शहरात प्रभाग क्रमांक ४ च्या भारतीय बाल विद्या मंदिर इथं शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात ते बोलत होते. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 February 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २१ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि. **** ** मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार ** नोकर भरतीसाठी असलेलं महापोर्टल संकेतस्थळ बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ** मराठवाड्यातला पाण्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी निधी मिळणं आवश्यक - सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि ** महाशिवरात्रीच्या उत्सवाला पहाटेपासून प्रारंभ **** **** मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली. या दौऱ्यात मुख्यमंत्री काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही सदिच्छा भेट घेणार आहेत. **** नोकर भरतीसाठी असलेलं महापोर्टल हे संकेतस्थळ बंद करण्यात आलं आहे. महापोर्टलद्वारे पदभरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सरकारकडून यात बदल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एकत्र परिक्षा घेण्यास महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञानकडे पुरेसं मनुष्यबळ नसल्यानं सरकारनं हे पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला. सरकारी पदभरती परिक्षा घेण्यासाठी आता वेगवेगळ्या कंपन्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. **** श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन ग्राम शहरीकरण अभियान दिवस आज साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ फेब्रुवारी २०१६ला या अभियानाचा शुभारंभ केला होता. विकासाच्या दिशेनं पुढे जाणाऱ्या ग्रमीण भागांना शहरांसारखी सुविधा उपलब्ध करुन देणं, हे या अभियानाचं उद्दीष्ट आहे. या अभियानाचं यश पाहता, पुढच्या तीन वर्षात ते एक हजार गावांमध्ये राबवण्यात येणार असल्याचं निती आयोगानं म्हटलं आहे. **** मराठवाड्यातला पाण्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी निधी मिळणं आवश्यक असून, पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाहीत, असं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नासंदर्भात काल औरंगाबाद इथं पीक पाणी परिषदेचं उद्घाटन टोपे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. समन्यायी पाणी वाटप होऊन, आपल्याला हक्काचं पाणी मिळावं, प���णी साठवणुकीसह पाण्याचं वितरणही योग्य पद्धतीनं व्हावं, असं ते म्हणाले. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत या पीक पाणी परिषदेचा समारोप झाला. माजी मंत्री अर्जुन खोतकर, यांच्यासह जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, प्रदीप देशमुख, उदय देवळाणकर, शंकरराव नागरे आणि विजय अण्णा बोराडे यांनी यावेळी मार्गदर्शन क���लं. मराठवाडा गोदावरी पाटबंधारे मंडळानं ऊर्ध्व वैतरणा धरणातून प्रवाही पद्धतीने ११ दशलक्ष घनमीटर पाणी मुकणे धरणामार्गे गोदावरी धरणात वळवावं, कृष्णा भीमा खोऱ्यातील ४० दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध करून द्यावं यासह अन्य मागण्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला. **** निव��णूक शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दाखल प्रकरणात नागपूर न्यायालयानं काल त्यांना १५ हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देतांना फडणवीस यांनी, हे दोन्ही खटले नागपुरातली एक झोपडपट्टी हटवण्यासंदर्भातल्या आंदोलनाशी निगडित असल्याचं सांगितलं. आपल्यावर कोणताही वैयक्तिक खटला नाही असं ते म्हणाले. या प्रकरणी पुढची सुनावणी तीस मार्च रोजी होणार आहे. **** विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मराठा युवकांची भेट घेतली. गेल्या चोवीस दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत उदासीन असून, मागच्या सरकारनं घेतलेल्या अनेक लोकहिताच्या निर्णयांना हे सरकार स्थगिती देत असल्याची टीका दरेकर यांनी केली. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या “मन की बात” या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ६२वा भाग असेल. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** महाशिवरात्रीच्या उत्सवाला आज पहाटेपासूनच प्रारंभ झाला आहे. राज्यात ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ, औरंगाबाद जिल्ह्यात घृष्णेश्वर तसंच हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथल्या ज्योर्तिलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत. **** परभणी इथं शेतकऱ्यांचा पिकविमा, कर्जमाफी, दुष्काळी अनुदान यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. शासनानं घोषित केल्याप्रमाणे हेक्टरी २५ हजार रुपये मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. **** उस्मानाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनस्तरावर गती आली असून, यासाठी आवश्यक ते प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी, आयुष विभागाच्या संचालकांना दिले आहेत. यासंदर्भात काल लातूर इथं झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. **** हिंगोली जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी, तसंच कर्मचाऱ्यांच्या क्रिडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं काल पोलिस अधिक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते उद्धाटन झालं. २२ तारखेपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. **** परभणी शहरात ज्या भागात ६० टक्के नळजोडणी पूर्ण झाली, त्या भागाला पाणी देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिली आहे. ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते. पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असून, नागरिकांनी स्वतः नळजोडणी करावी, असं ते म्हणाले. अनाधिकृत नळ घेतलेल्या नागरिकांनी येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत हे नळ कनेक्शन नियमानुसार करून घ्यावे, असंही आयुक्त पवार यावेळी म्हणाले. **** शहिद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल औरंगाबाद इथं डाव्या विचारांच्या संघटनांच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं. शहरातल्या सिडको एन सात इथल्या कॉम्रेड व्ही.डी देशपांडे सभागृहात प्राध्यापक उमेश बगाडे यांचं ‘समाजक्रांतीचे समकालीन संदर्भ’ या विषयावर व्याख्यान झालं. *** परभणी इथं ग्रेडर कृष्णकुमार सातपुते आणि सहाय्यक उद्धव शिंदे यांना काल दोन हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. शेतमालाची प्रतवारी करून माल खरेदी करून घेण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. **** हिंगोली जिल्ह्याच्या वसमत इथल्या सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं दिला जाणारा " राजा शिवछत्रपती राष्ट्रीय आरोग्यरत्न पुरस्कार २०२० हा डॉ. ऋतुराज जाधव यांना जाहीर झाला आहे. समितीच्या वतीनं काल ही घोषणा करण्यात आली. आज हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. **** परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं प्रधानमंत्री रमाई घरकूल योजनेच्या बांधकामासाठी मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन काल उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. **** बुलडाणा जिल्ह्यात मृदा आरोग्य पत्रिका कार्यक्रमास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात दोन लाख माती नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामुळे जमिनींचा पोत सुधारण्यास मदत झाल्याचं खामगाव तालुक्यातले शेतकरी प्रवीण देशमुख यांनी सांगितलं. ते म्हणाले……. कृषी विभागातील मृदू आरोग्य पत्रिका अभियान जे आहे त्या अंतर्गत माझ्या शेतात मातीचे परीक्षण करण्यात आलं. आणि त्यातून माझ्या शेतीमध्ये नेमके काय घटक कमी आहेत, कोणती पिके घ्यायची आहेत आणि कोणत्या पिकासाठी कोणत्या खतांची आणि कोणत्या घटकांची आवश्यकता आहे, याची मला माहिती मिळाली. आणि यातून माझं उत्पन्न वाढवण्यासाठी भरपूर मदत झाली. **** एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत नवी मुंबईतल्या वाशी इथल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात काल एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्य आणि ओडिशा राज्यामधल्या सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशानं विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी ओडिशा भाषेतल्या पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यात असणारी एकत्र कुटुंब पद्धती, परंपरा यांच्याविषयी माहिती यावेळी देण्यात आली. **** पंडित नाथ नेरळकर फाउंडेशन ट्रस्टच्या वतीनं औरंगाबादमधल्या कलश मंगल कार्यालयात आज आणि उद्या गानमहर्षी डॉ. अण्णासाहेब गुंजकर संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात स्नेहल ठोसर, कोलकात्याचे पंडित सम्राट पंडित, हेमा उपासनी, रवींद्र खोमणे, मुनव्वर अली यांचं गायन होणार आहे. नाट्यक्षेत्रातल्या योगदानासाठी प्राध्यापक त्र्यंबक महाजन तर संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी श्रीपाद कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात येणार आहे. **** भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना वेलिंग्टन इथं सुरु आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ३३ षटकांत ३ बाद ८६ धावा झाल्या होत्या. मयंक अग्रवाल ३४ तर अजिंक्य रहाणे २३ धावांवर खेळत आहे. **** महिलांचा टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून ऑस्ट्रेलियात सिडनी इथं सुरूवात होत आहे. भारतीय महिला संघाचा सामना विद्यमान जगज्जेता यजमान ���स्ट्रेलिया संघाशी आज होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना सुरू होईल. **** नांदेड इथं झालेल्या सातवी राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२०’ क्रिकेट स्पर्धेत मुंबई विद्यापीठ संघ विजेता ठरला आहे. तर यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठम नांदेडचा संघ द्वितीय, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे संघानं तृतीय क्रमांक मिळवला. कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आलं. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 November 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** राज्य विधानसभेचं आजपासून दोन दिवसाचं अधिवेशन; महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर आज विश्वासदर्शक ठराव विकास कामं करतांना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे लक्ष देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना मुंबईतल्या आरे मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती पथकर भरणीसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या फास्टटॅग संलग्नीकरणाला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ आणि कामात कसून केल्याच्या कारणावरून अंबडच्या तहसीलदार मनिषा मेने निलंबित **** राज्य विधानसभेचं दोन दिवसाचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आज विश्वासदर्शक ठरावाला सामोर जाईल. आज दुपारच्या सत्रात विधानसभेत हा विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांनी काल आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. अधिवेशन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री नव्या मंत्रीमंडळाचा परिचय करून देतील, त्यानंतर विश्वसादर्शक ठराव मांडला जाईल. हा ठराव मंजूर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम घोषित केला जाईल. उद्या अध्यक्षाची निवडणूक होईल. सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. दरम्यान, विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये १६ ते २१ डिसेंबर दरम्यान घेण्यात येणार असल्याचं विधीमंडळ सूत्रानं सांगितलं. **** विकास कामं करतांना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात काल पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह विविध विभागाचे सचिव यावेळी उपस्थित होते. सेवाभावनेनं कामं केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येईल. ‘सरकार माझं आहे’ अशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचं, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा, जनसेवेसाठी पारदर्शक आणि स्वच्छ कारभारावर लक्ष द्यावं, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. प्रगतीचे उद्दिष्ट गाठण्यास शासन यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. **** विधीमंडळ वार्ताहर संघटनेकडून मुख्यमंत्र्यांचा काल सत्कार करण्यात आला, या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, राज्याचं मुख्यमंत्रिपद हे आपल्यासमोर एक आव्हान असून, पत्रकारांनी प्रश्र्न मांडताना ते सोडवण्यासंदर्भातही मार्गदर्शन करावं, असं आवाहन केलं. आपलं सरकार जनतेशी नम्रपणे वागेल तसंच जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही, यावर आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. महागाई, टंचाई आणि भ्रष्टाचार ही राज्यासमोरची आव्हानं असून त्यांचा सामना करायचा ते म्हणाले. दरम्यान, मुंबईत आरे इथल्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पूर्ण कामाचं परीक्षण केल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी जाहीर केलं **** राष्ट्रीय महामार्गांवर पथकर भरणीसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांना फास्टटॅग संलग्नीकरणाला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उद्या एक डिसेंबरपासून महामार्गांवर फक्त फास्टटॅग द्वारे पथकर वसुलीची घोषणा परिवहन मंत्रालयानं केली होती. मात्र नागरिकांच्या सोयीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली. पंधरा डिसेंबरपर्यंत फास्टटॅग मोफत मिळणार असून, त्यानंतर मात्र दुप्पट शुल्क आकारलं जाणार आहे. माय फास्टटॅग ॲपवर याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. **** शासनाकडून धोरणात्मक पाठबळ मिळालं तर शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढता येईल, असा आशावाद परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक ढवण यांनी व्यक्त केला आहे. महाॲग्रो या सहाव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला कालपासून औरंगाबाद इथं प्रारंभ झाला. या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. शेती आणि शेतकरी सध्या मान्सून आणि मार्केट या दुष्टचक्रात अडकला असल्याची खंत डॉ ढवण यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या जातील, तो सोन्याचा दिवस ठरेल, असं मत महापौर महापौर नंदकुमार घोडेले, यांनी व्यक्त केलं, तर मराठवाड्यातल्या तीस अविकसित तालुक्यात कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग उभारण्यावर प्राधान्य असल्याचं डॉ कराड यांनी सांगितलं. या उद्घाटन समारंभात, मराठवाड्यातल्या आठ प्रगतीशील शेतकऱ्यांना बॅरिस्टर जवाहर गांधी कृषी पुरस्कार प्रदान करण्यात आले. दोन डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात पीक प्रात्यक्षिक तसंच आधुनिक शेती औजारं पाहता येणार आहेत, शेती संबंधीत विविध विषयांवर चर्चासत्रं ही या प्रदर्शनात होणार आहेत. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** कामात कसून केल्याच्या कारणावरून अंबडच्या तहसीलदार मनिषा मेने यांना निलंबित करण्यात आलं आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काल निलंबन आदेश जारी केले. मेने यांनी, अवैध वाळू वाहतुक रोखणे, दुष्काळी अनुदान वाटप तसंच प्रधानमंत्री किसान सन्मान नि���ी वाटप या कामात कसूर केल्याचा अहवाल जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. **** तरुण साहित्यिकांनी भयमुक्त साहित्य निर्माण करणं आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ नाटककार तथा ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केलं आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा काल समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात कृषी, साहित्य, संगीत आणि युवा या क्षेत्रातल्या चार गुणवंतांचा यावेळी यशवंतराव चव्हाण पुरस्कार देवून गौरवण्यात आलं. यामध्ये प्रसिद्ध पखवाजवादक उद्धवबापू आपेगावकर, देगलूरचे ज्येष्ठ साहित्यिक बाबू बिरादार, हिंगोलीचे कृषी उद्योजक रामेश्वर मांडगे, नांदेडचे पत्रकार संदीप काळे यांचा समावेश आहे. **** लातूर इथं जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय पाणी परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. पाणी बचत आणि पाण्याचा अपव्यय याबाबत जाणीव-जागृती, आणि नागरिक जलसाक्षर व्हावेत, या उद्देशानं ही पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे. शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये आयोजित या परिषदेसाठी लातूर शहरातल्या गंजगोलाई भागातून मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. **** जालना जिल्ह्यातले दोन लाख नव्वद हजार नऊशे बत्तीस शेतकरी `प्रधानमंत्री किसान सन्मान निधी` योजनेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मिळवून एकशे सहा कोटी एकोणसत्तर लाख शेहचाळीस हजार रुपयांचं अनुदान जमा करण्यात आलं आहे. लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या `पीएम किसान पोर्टलवर` अद्ययावत करण्यात येत असून, अनुदान रक्कम लवकरच त्यांच्या खात्यांवर जमा केली जाईल, असं जालना जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. **** परभणी जिल्यातल्या तहसील कार्यालयात केंद्र सरकारच्या भारतनेट या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्याला जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. राज्य माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाद्वारे परभणी जिल्हातली चार तहसील कार्यालयं आणि त्याअंतर्गत येणाऱ्या चारशे अठ्ठावीस ग्रामपंचायती, ऑप्टीकल फायबर नेटवर्कनं जोडण्यात येणार आहेत. **** मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं जालना जिल्ह्यातलं तीस टक्के काम पूर्ण झालं आहे. या टप्प्यात या मार्गावरच्या नियोजित १०६ पुलांपैकी ५२ पुलांची उभारणी झाली असून, उर्वरित काम सुरू असल्याचं, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. या कामांवर आतापर्यंत साडे तीनशे कोटी रुपये खर्च झाल्याची माहितीही या कार्यालयाकडून देण्यात आली. **** कापूस पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात पाथरी तसंच गंगाखेड इथं सोमवारपासून केंद्र ��ासनाच्या आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदी सुरू होणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कापूस शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असं आवाहन कापूस पणन महासंघाचे परभणी विभागाचे संचालक पंडितराव चोखट तसंच विभागीय व्यवस्थापक ए.डी.रेणके यांनी केलं आहे. **** परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं काल एका रस्ता अपघातात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख भाऊसाहेब जामगे यांचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. परळीहून गंगाखेड कडे येणाऱ्या जामगे यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाला असावा, असं पोलिसांकडून सांगण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं शहरात दोन डिसेंबर ते मार्च २०२० पर्यंत केंद्र शासनाची विशेष इंद्रधनुष्य मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. महानगरपालिकेल्या २९ आरोग्य केंद्र आणि पाच रूग्णालयत आणि छावणी नगरपरिषदेचा एक असे एकूण ३५ आरोग्य केंद्रात ही मोहिम चार टप्प्यात राबवण्यात आहे. नागरिकांनी या मोहिमे दरम्यान नजीकच्या लसीकरण सत्राच्या ठिकाणी लसीकरण करून घेण्याचं आवाहन महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केलं आहे. ***** ***
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 August 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक -२० ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि. **** पूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंतचं कर्ज माफ तसंच प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं बांधून देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अवीट संगीताच्या गोडीचे ख्यातनाम संगीतकार खय्याम यांचं निधन कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाची नोटीस आणि विधान परिषदेच्या औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ९८ पूर्णांक ४८ टक्के मतदान; गुरूवारी मतमोजणी **** सांगली आणि कोल्हापूरसह राज्यातल्या पूरग्रस्त भागात एक हेक्टर शेतीच्या नुकसानीवर पूर्ण कर्ज माफ करण्यात येणार असून, कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना तीन पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केला. मुंबईत काल वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, पडलेली किंवा धोकादायक झालेली घरं, प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्णपणे बांधून दिली जाणार असून, केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीव्यतिरिक्त राज्य सरकारकडूनही एक लाख रुपये मदत दिली जाणार आहे. घर बांधून होईपर्यंत सुमारे वर्षभराच्या कालावधीसाठी संबंधित कुटुंबांना घरभाडे दिले जाणार असून, ग्रामीण भागात २४ हजार रुपये तर शहरी भागात ३६ हजार रुपये घरभाड्यापोटी मिळतील, असं ते म्हणाले. घर बांधणीसाठी पाच ब्रास वाळू आणि पाच ब्रास मुरुम मोफत दिला जाणार असून, बाधित कुटुंबांना पुढचे तीन महिने सरकारकडून धान्य पुरवठा केला जाईल. या मदतीसाठी बाधित कुटुंबांकडून सध्या कागदपत्रांची अपेक्षा केली जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले.... आता लोकांजवळ समजा पाऊस नसल्यामुळे त्यांना जवळ फार कागदपत्रे मागीतली तर ती देऊ शकणार नाही. म्हूणन आम्ही यासंदर्भात एक आयोग, अपेक्षा अशी आहे की, कोणी बोगसपणा करू नये आणि कोणी जर केला तर त��याच्यावर जी कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल. छोट्या व्यापाऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दुधाळ जनावरांच्या नुकसानाची भरपाई सरपंच तलाठी किंवा दूध संघांच्या शिफारशीवरून केली जाईल, जनावरांच्या गोठ्यांसाठीही सरकारकडून अर्थसहाय्य केलं जाणार आहे. पूरग्रस्त भागात सगळ्या विद्यार्थ्यांना बालभारती वह्या आणि पुस्तकं पुरवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. **** अवीट गोडीच्या संगीतानं रसिकांना रिझवणारे ख्यातनाम संगीतकार खय्याम यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळं गेल्या काही दिवसांपासून एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. महंमद जहूर हाश्मी असं मूळ नाव असलेल्या खय्याम यांनी पंजाबमधल्या लुधियाना इथं वयाच्या १७ व्या वर्षी संगीत क्षेत्रातल्या कारकीर्दीला सुरूवात केली. कभी कभी, पाकिजा, उमराव जान, थोडी सी बेवफाई, रझिया सुलतान, नूरी यांसारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी अजरामर संगीत दिलं. पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी, फिल्मफेअर अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जाणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चित्रपट सृष्टीतल्या मान्यवरांनी खय्याम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. **** राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथून प्रारंभ झाला. पक्षाचे नेते अजित पवार, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे यांनी, संत एकनाथ महाराज यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन या 'शिवस्वराज्य यात्रेची' सुरुवात केली. पुरात माणसांचे प्राण गेले आणि यांचे मंत्री फोटो काढत फिरले, हे सरकार प्रचंड असंवेदनशील असल्याची टीका अजित पवार यांनी केली. सरकार विरोधातल्या रागाचं मतांमध्ये परिवर्तन करून समाजपरिवर्तन करावं, असं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं. **** महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालय- ईडीनं कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी नोटीस बजावली आहे. या प्रकरणी येत्या गुरुवारी २२ तारखेला ठाकरे यांना ईडीसमोर हजर होण्यास सांगण्यात आलं आहे. ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार उन्मेश जोशी यांनाही ईडीनं नोटीस बजावली असून, जोशी काल ईडीसमोर हजर झाले. जोशी आणि ठाकरे यांनी भागीदारीत सुरू केलेल्या या व्यवसायातून ठाकरे बाहेर पडलेले आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांना राजकीय आकसापोटी ही नोटीस बजावण्यात आल्याचं, मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणूक काळात ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती, विधानसभा निवडणुकांच्या काळात हे टाळण्यासाठी ही नोटीस बजावली गेल्याची टीका, देशपांडे यांनी केली. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे. **** विधान परिषदेच्या औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काल ९८ पूर्णांक ४८ टक्के मतदान झालं. एकूण ६५७ मतदारांपैकी ६४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, जालन्यात काँग्रेसच्या सहा तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्यानं मतदान केलं नसल्याचं निवडणूक विभागानं कळवलं आहे. शिवसेना भाजप युतीकडून अंबादास दानवे तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबुराव कुलकर्ण��� या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्य लढत आहे. मतमोजणी येत्या गुरुवारी २२ तारखेला होणार आहे. **** २०२२पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून बीड शहरातल्या प्रत्येक बेघर व्यक्तीचं स्वतःच्या हक्काचं घरकुलाचं स्वप्न पूर्ण होईल, असं राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. बीड नगरपरिषदेच्या सभागृहात काल प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करताना ते बोलत होते. अधिक घरकुलं तयार करण्यासाठी विविध शासकीय जमिनी तसंच गायरान जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. **** राज्यातल्या पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथल्या रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागानं काल शहरातून मदत फेरी काढून दहा हजार ३९६ रुपये निधी संकलित केला. **** आकाशवाणीच्या क्षेत्रीय कार्यक्रम समन्वय समितीच्या औरंगाबाद इथं कालपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय बैठकीचं उदघाटन आकाशवाणीच्या पश्चिम विभागाचे अतिरीक्त महानिदेशक नीरज अग्रवाल यांच्या हस्ते झालं. या दोन दिवसाच्या बैठकीसाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातल्या आकाशवाणीचे अधिकारी उपस्थित आहेत. बैठकीत विविध कार्यक्रमाच्या नियोजन आणि निर्मिती संदर्भात चर्चा केली जाते. **** विधानसभेच्या सर्व २८८ जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय राष्ट्रीय मराठा पक्षानं घेतला असल्याचं पक्षाचे अध्यक्ष अंकुशराव पाटील यांनी सांगितलं. उमेदवारांची निवड करण्यासाठी पक्षाचा जनसंपर्क दौरा लवकरच सुरू होणार असल्याचंही ते म्हणाले. येत्या १ सप्टेंबर पर्यंत इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज पक्षाच्या पुणे इथल्या कार्यालयात पाठवावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे. **** भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल काही संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये उपाध्यक्षपदी खा. डॉ. सुभाष भामरे, प्रवीण पोटे पाटील, किरीट सोमय्या, योगेश गोगावले आणि अशोक कांडलकर यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय जालना जिल्हाध्यक्षपदी आमदार. संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्षपदी गिरीश पालवे आणि यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नितीन भुतडा यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आर. सी. पाटील आणि रमेश कुथे, प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय चौधरी, कामगार आघाडी संयोजक संजय केणेकर आणि व्यापारी आघाडी दिलीप कंदकुर्ते यांना पदमुक्त केलं आहे. **** तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथाचं काल अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतलं. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ, औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळच्या घृष्णेश्वर आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी देखील काल भाविकांनी मोठी गर्दी केली होती. **** भटक्या विमुक्त चळवळीचे नेते प्रा.मोतीराज राठोड यांच काल औरंगाबाद इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राठोड यांना त्यांच्या कार्यासाठी दलित अस्मिता पुरस्कार, ग्रंथतुला पुरस्कार, बिरसा मुंडा सामाजिक सेवा सन्मान पुरस्कार, आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक पुरस्कार, तसंच भाषा सन्मान या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. **** लातूर इथले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि युवा उद्योजक शिवकुमार अंबादास गवळी यांचं काल पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. ते ३८ वर्षांचे होते. राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देत त्यांनी प्रभागात सक्रियपणे विविध कामं केली होती. काल दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. **** लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या भूमीअभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले उप अधीक्षक आनंद कुलकर्णी यांना काल लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एक हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक केली. शेतीच्या मोजणीसाठी फी भरलेली असतांनाही मोजणीची तारीख लवकर मिळवून देण्यासाठी कुलकर्णी यांनी एक हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. **** औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन इथं अवैध कीटकनाशकाच्या कारखान्यावर छापा मारून एक गोदाम बंद करण्यात आलं आहे. कृषी विभागानं काल ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली. **** औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या लोककवी वामन कर्डक अध्यासन केंद्रातर्फे कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रख्यात कवी डॉ रविचंद्र हडसणकर हे 'वामनदादा कर्डक : व्यक्ती आणि कार्य' या विषयावर आज व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात सकाळी ११ वाजता हे व्याख्यान होईल. ***** ***
0 notes