#वाकड्या
Explore tagged Tumblr posts
Text
महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा; छगन भुजबळांचा इशारा
महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा; छगन भुजबळांचा इशारा
महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा; छगन भुजबळांचा इशारा आज बेळगावात कन्नडी गुंडांनी महाराष्ट्राच्या गाड्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेध नोंदवत महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा असा सज्जड दम माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.कर्नाटक सरकार महाराष्ट्राची गावे घेण्याची घोषणा करत आणि महाराष्ट्रातील सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. महाराष्ट्र सरकारने…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 09 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
अर्थव्यवस्थेवरची श्वेतपत्रिका संसदेत सादर;विरोधकांकडून काळीपत्रिका जाहीर
राज्यभरातल्या सर्व प्राथमिक शाळा सकाळी नऊ नंतर सुरू करण्याचे राज्य सरकारचे आदेश
छत्रपती संभाजीनगर इथं दोन वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू
आणि
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळण्याची आवश्यकता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडून व्यक्त
****
केंद्र सरकारनं काल संसदेत भारतीय अर्थव्यवस्थेवरची श्वेतपत्रिका सादर केली. योग्य धोरणं, खरे हेतू आणि योग्य निर्णय घेऊन सरकारने आर्थिक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या माध्यमातून, २०१४ पूर्वीच्या काळातल्या प्रत्येक आव्हानावर मात केली असल्याचं यात म्हटलं आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार स्थापन झालं, त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था नाजूक स्थितीत होती. आर्थिक गैर व्यवस्थापन, बेशिस्त आणि मोठ्या प्रमाणातल्या भ्रष्टाचारामुळे अर्थव्यवस्थेची ही दुरावस्था होती, असं यात म्हटलं आहे. विद्यमान सरकारने देशाला शाश्वत उच्च विकासाच्या दृढ मार्गावर नेल्याचं या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन्ही सभागृहात मांडलेल्या या श्वेतपत्रिकेवर, दोन्ही सभागृहात आज चर्चा होणार आहे.
****
दरम्यान, काँग्रेसनं काल नवी दिल्लीत सरकारच्या विरोधात काळी पत्रिका प्रसिद्ध केली. सध्याचं सरकार देशातल्या बेरोजगारीसारख्या मुख्य मुद्द्यांवर बोलत नसल्याचा आरोप, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला. केरळ, कर्नाटक, तेलंगणा या बिगर भाजप राज्यांशी भेदभाव केला जात असल्याचा आरोपही खरगे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसनं सरकार विरोधात काढलेल्या या काळ्या पत्रिकेविरोधात कठोर टीका केली. काल राज्यसभेत बोलताना त्यांनी, आपलं सरकार देशाच्या विकासासाठी काम करत असून, त्याकडे वाकड्या दृष्टीनं पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या ६८ सदस्यांना काल निरोप देण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. देशाला आणि सदनाला त्यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन चिरस्मरणीय असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल आर्थिक वर्ष २०२३-२४ मधला सहावा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. पतधोरण आढाव्यात रेपो दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मुख्य धोरण दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
****
इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं काल जारी केले. सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना हे आदेश लागू होतील. दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांच्या प्राथमिक विभागाचे वर्ग दुसऱ्या सत्रात भरतील, अशी सूचना यात केली आहे. ज्या शाळांच्या व्यवस्थापनांना वेळेत बदल शक्य नाही, त्या प्रकरणी शिक्षणाधिकारी किंवा प्राथमिक शिक्षण निरीक्षकांनी प्रत्येक शाळेनुसार निर्णय द्यावा, असे आदेश राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं दिले आहेत.
****
नाशिक इथं चौतिसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसंच सायबर सुरक्षीत राज्य तयार करण्यासाठी ८३७ कोटी रूपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या स्पर्धेत राज्यभरातून साडेतीन हजार पोलीस खेळाडू सहभागी झाले आहेत.
****
हमीभावापेक्षा कमी किंमतीत कापूस न विकण्याचं आवाहन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूर इथल्या काटोल दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारच्या वतीनं कापूस खरेदी केंद्र वाढवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात, किमान समान कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं काल आपले मुद्दे जाहीर केले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, बियाणे, खतं, कीटकनाशकं, पाणी, वीज आणि डिझेल यांची दरवाढ नियंत्रणात आणावी, एकाधिकार कापूस खरेदी योजना पुन्हा कार्यान्वित करावी, या प्रमुख मुद्द्यांचा त्यात समावेश आहे.
****
राज्यात अनेक ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला असून, ठिकठिकाणी नागरीकांचा या यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
नांदेड शहरात काल ही यात्रा गाडीपुरा आणि वजिराबाद भागात पहोचली. यावेळी महापालिकेच्या अधिकार्यांनी नागरीकांना विविध योजनांची माहिती दिली. आयुष्यमान कार्ड तसंच पंतप्रधान स्वनिधी अर्ज यावेळी भरून घेण्यात आले. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत श्वेता राठोड यांनी त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
यावेळी नांदेड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अब्दुल राफे यांनी या यात्रेदरम्यान आरोग्य विभागाकडून देत असलेल्या योजनांची माहिती दिली:
‘‘मैं डॉ. अब्दुल राफे, मेडीकल ऑफीसर नांदेड महानगरपालिका, हम अलग अलग एरियों मे जाकर आरोग्य कॅम्प रख रहे हैं. जिसमे बीपी, शुगर ��र हार्ट सभी टाईप के पेशंट की तपासनी करके उनको मेडीसिन दिया जा रहा है और इसमे हमें बहोत अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है, सभी टाईप के लाभार्थी यहां आकर ऊस चिज़ का फायदा उठा रहे हैं.’’
****
मुंबईतील दहिसर विभागातले शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाला. घोसाळकर यांचा मित्र मॉरिस नरोन्हा यानेच काल संध्याकाळच्या सुमारास घोसाळकर यांच्यासोबतची चर्चा सामाजिक संपर्क माध्यमांवर लाईव्ह प्रसारित केल्यानंतर त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या, त्यानंतर स्वतःवर ही गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. हा हल्ला पैशाच्या वादातून आणि वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात बीड वळण रस्त्यावर हायवाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन भावंडांचा जागीच मृत्यू झाला. प्रवीण, प्रदीप आणि प्रतिक्षा अंभोरे अशी त्यांची नावे असून, ते परभणी जिल्ह्यातले रहिवासी होते. अपघातानंतर हायवा चालक फरार झाला.
गंगापूर - वैजापूर रस्त्यावर मांजरी फाट्यावर झालेल्या अन्य एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. मध्यप्रदेशातले शेतमजुर दशरथ रंधावे हे आपली दोन मुलं आणि पत्नीला दुचाकीवरुन घेऊन जात असताता, त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात अनुक्रमे तीन आणि एक वर्षीय बालकांसह दशरथ रंधावे यांचा मृत्यू झाला.
****
बदलत्या हवामानामुळे शेतपिकांचं नुकसान होत असून, त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळणं आवश्यक असल्याचं, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे. लातूर इथं काल जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भविष्यात बांबूला चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी यावेळी केलं. उद्यापर्यंत चाल��ाऱ्या या कृषी महोत्सवात कृषी आणि गृहपयोगी वस्तूंचे १७७ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या बाभळगाव इथं रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पर्जन्य जलपुनर्भरण कार्यक्रमाचं उद्घाटन काल कळंब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.व्ही.चकोर यांच्या हस्ते झालं. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जलपुनर्भरण ही काळाची गरज असून, जल आत्मनिर्भरगाव करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्यावतीनं डॉ. रखमाबाई राऊत यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कार इचलकरंजी इथले डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेश पवार यांना जाहीर झाला आहे. मंडळाच्या संचालकांनी काल जालना इथं ही माहिती दिली. देवदासींच्या प्रथा उत्थानासाठी समर्पित सेवा केलेले डॉ.भीमराव गस्ती पुरस्कार मुंबईच्या पत्रकार योगिता श्रीराम साळवी यांना जाहीर झाला आहे. जालना इथं येत्या शनिवारी सेवा भारतीचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री विजय पुराणिक, यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. रोख २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि स्मृतीपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथल्या 'सम्राट अशोक अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेची काल सांगता झाली. या परिषदेत काल सकाळी भिक्खू प्राचार्य डॉ. खेमोधम्मो, भदंत पैय्याबोधी थेरो आणि भिक्खू संघाच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या सत्रात प्रा.डॉ संध्या रंगारी यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान झालं.
****
राज्य कृषी विभागानं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत ४८ कोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. यासंबंधी दोन हजार चारशे ५३ दावे निकाली काढण्यात आले होते. राज्यात सात एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीतल्या ७७ दाव्यांसांठी, एक कोटी ५१ लाख रुपयाचा विमा वितरित करण्यात येणार आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या कुणबी नोंदी धारकांच्या वारसांना जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतीने सुरु आहे. यासाठी वंशावळी जुळवण्याकरता तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.
****
0 notes
Text
रयतेकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या जुलुमी सत्तांना जमीनदोस्त करण्यास दख्खन स्वामींचा जन्म झाला !!
#शिवबाराजं
शिव जन्मोत्सव सोहळा लवकरचं...🚩🙇
#छत्रपती_श्रीशिवाजी_महाराज 🙏
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#chatrapatishivajimaharaj #chatrapatisambhajimaharaj #ShivajiMaharaj #shivray #rajyabhishek #sohala #shivajiraje #viral #pune #punecity #Jagdamb
0 notes
Text
महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा - छगन भुजबळ
महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा – छगन भुजबळ
मुंबई आज बेळगावात कन्नडी गुंडांनी महाराष्ट्राच्या गाड्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेध नोंदवत महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा असा सज्जड दम माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. कर्नाटक सरकार महाराष्ट्राची गावे घेण्याची घोषणा करत आणि महाराष्ट्रातील सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. महाराष्ट्र सरकारने आता भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी करतानाच केंद्राने देखील यात…
View On WordPress
0 notes
Text
उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर या ठिकाणी महिलांवर बलात्कार होण्याच्या ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार काय कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तरीही सहन होणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
0 notes
Photo
हे शिवछत्रपती , तुझ्यासारखा राजा पुन्हा कधी होणे नाही. तुझ्या छत्रछायेत सुखी रयत तुझी , पर स्त्री मातेसमान ही ओळख तुझी , दुश्मणाची स्त्री बहीण म्हणून , तूच साडी चोळी देऊन विदा करी , वाकड्या नजरेनी पाहणाऱ्याला , जबरी शिक्षा ही तूच करी , म्हणून हे कुलभूषण , तुझ्यासारखा राजा पुन्हा कधी होणेच नाही . . . #shivajimaharajhistory #shivajimaharaj #pune #puneartist #streetart #maharashtra #shivsena #maratha #chatrpatishivajimaharaj #paintpune #pune #shivneri #raygad #shivjaynti #artforall #art #artistsoninstagram #muralist #sopune #nileshartist #womensday #king #nileshartist (at Narayan Peth) https://www.instagram.com/p/B9eBKpfB1tz/?igshid=4s9135bkbkt2
#shivajimaharajhistory#shivajimaharaj#pune#puneartist#streetart#maharashtra#shivsena#maratha#chatrpatishivajimaharaj#paintpune#shivneri#raygad#shivjaynti#artforall#art#artistsoninstagram#muralist#sopune#nileshartist#womensday#king
0 notes
Text
मुक्त विचारसरणी आणि बंदिस्त वागणूक यांची कायम कास धरून भविष्यातील वाटचाल करावी.
पुरोगामी आणि प्रयोगशील या मार्गाने वैयक्तिक व सामाजिक प्रगती साधून न घेता जो तो फक्त पैसा जमा करुन प्रगती साधत आहे .
सामान्य सकलजन हे सरणावरती जायची वेळ जवळ आली तरी सन्यासाचा रस्ता न पकडता ते आधीकच संसारात रमून जातात.
वडिलारकीची जमीन विकून मजा मारु नये कारण त्या मातीत पुर्वजांचे अश्रू आणि घाम दोन्ही त्यात जिरपलेले असतात तसेच मातेसमान काळ्या मातीची काळ���ी घेताना त्यांच्या रक्ताच पाणी झालेले असते.
आजच्या आधुनिक युगात लहान मुले ही आई-बाप असुन सुद्धा अनाथांच बेवारशी जीवन जगत आहेत. म्हणून पूर्वी आई ही चुल आणि मुल सांभाळत असे आणि बाप हा काम आणि दाम याची काळजी घेत असे.
आपण सामान्य लोक हे जीवंतपणी जन्मदिवस साजरे करतो तसेच असमान्य लोंकाची मरणोत्तर जयंती साजरे करतो.
काही लोक हे माणसाच्या वेशात जनावरेच असतात ज्याना आहार ,निद्रा ,भय आणि मैथुन या पलीकडे कसल्याही भाव-भावना नसतात. तसेच त्यांना कुठे बाहेर घेउन गेलो तर पुढे घालुन न्यावे लागते आणि पुढे हाकुन माघारी आणावे लागते.
आपल्या नशीबात लिहिलेले निसर्गपण बदलू शकत नाही पण तुमची दुसऱ्याबद्दलची नीती तुमचे नशीब ठरवू शकते.
वेड्या आणि वाकड्या लोंकाना समजावून सांगण्यापेक्षा त्यांना समजून घेणे फार सोपे आणि सरळ जाते.
संभोग हा वासनाप्रधान असतो तर स्पर्श हा भावनाप्रधान असतो.
0 notes
Text
आम्ही मैत्री निभावतो तसे वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देतो, मोदींचा चीनला इशारा
आम्ही मैत्री निभावतो तसे वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देतो, मोदींचा चीनला इशारा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत आहेत. भारतावर कोरोनाचं संकट असताना, भारत कोरोनाशी सामना करत असतानाच यादरम्यान भारत शेजारील देशाकडून येणाऱ्या आव्हानांचाही सामना करत आहे. परंतु भारत मैत्री निभावतो तसं वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देत असल्याचं सांगत मोदींनी चीनला इशारा दिला आहे. आपण भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.…
View On WordPress
0 notes
Text
कमलेश गोसावी यांच्या कथा संग्रहाचे मुंबईत प्रकाशन
कमलेश गोसावी यांच्या कथा संग्रहाचे मुंबईत प्रकाशन
कणकवली : मालवणी कवी, कथाकार, कातळशिल्प अभ्यासक आणि असरोंडी हायस्कुलचे उपक्रमशील शिक्षक कमलेश गोसावी यांच्या ‘वाकड्या चाळीच्या रीती’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत झाले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या कथासंग्रहातील सर्व कथा अस्सल अनुभूती देणाऱ्या असल्याचे प्रतिपादन आ. वैभव नाईक यांनी केले. तर असेच दर्जेदार लेखन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा…
View On WordPress
0 notes
Text
भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे डोळे फोडु :कंगना राणावत
भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे डोळे फोडु :कंगना राणावत
भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ला केला. या कारवाईनंतर समस्त बॉलिवूडकडून वायूदलाचं कौतुक होत आहे. अभिनेत्री कंगनानंही वायूदलाचं कौतुक केलं आहे.
काय म्हणाली नेमकं कंगना –
भारतीय वायूदलाला मी सलाम करते ते खरे हिरो आहेत.
पंतप्रधान मोदींचे आभार मानले
दहशतवाद्यांविरोधात आपला लढा आता सुरू झाला आहे.
भारताकडे वाकड्या नजरेनं…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
यूपीए सरकारच्या काळात देशाच्या बिकट आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकणारी श्वेतपत्रिका लोकसभेत सादर
भारतीय रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर, सलग सहाव्यांदा रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम
शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी किंमतीत कापूस न विकण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन
आणि
लातूर इथं जिल्हा कृषी महोत्सवाला सुरुवात
****
यूपीए सरकारच्या काळात देशाच्या बिकट आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकणारी श्वेतपत्रिका सरकारने आज लोकसभेत सादर केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही श्वेतपत्रिका सादर केली. उद्या या श्वेतपत्रिकेवर चर्चा होणार आहे.
दरम्यान, काँग्रेसनं नवी दिल्लीत सरकारच्या विरोधात काळी पत्रिका प्रसिद्ध केली असून, सध्याचं सरकार देशातल्या बेरोजगारीसारख्या मुख्य मुद्द्यांवर बोलत नसल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला. तसंच केरळ, कर्नाटक, तेलंगणा या बिगर भाजपशासित राज्यांशी केंद्राकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसनं सरकार विरोधात काढलेल्या ब्लॅक पेपर विरोधात कठोर टीका केली. आपलं सरकार देशाच्या विकासासाठी काम करत असून, त्याकडे वाकड्या दृष्टीनं पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी निषेध नोंदवला.
राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या ६८ सदस्यांचा निरोप समारंभ आज झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा गौरव केला. देशाला आणि सदनाला त्यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन चिरस्मरणीय आहे, असं ते म्हणाले.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वर्ष २०२३-२४ मधला सहावा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. पतधोरण आढाव्यात रेपो दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मुख्य धोरण दरात कोणताही बदल केलेला नाही, असं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. बँकेनं आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन वाढ सात टक्के राहाण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर किरकोळ महागाईचा दर पाच पूर्णांक चार दशांश टक्के राहील, असा अंदाज आहे. जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर असूनही भारतीय अर्थव्यवस्थेनं उत्तम कामगिरी केल्याचं दास यांनी सांगितलं.
****
एआय फॉर महाराष्ट्र या योजनेअंतर्गत, रा��्य सरकार आणि गुगलमध्ये आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामजंस्य करार करण्यात आला. यात कृषी, आरोग्य, कौशल्य, स्टार्ट अप, शाश्वतता यासंह विविध क्षेत्रांचा समावेश आहे.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीनं कापूस खरेदी केंद्र वाढवण्यात येणार असून, हमीभावापेक्षा कमी किंमतीत कापूस न विकण्याचं आवाहन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केलं आहे. नागपूर इथल्या काटोल दौऱ्यादरम्यान ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. व्यापारी हमीभावापेक्षा कमी किंमतीनं कापूस खरेदी करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी घाई न करता हमीभावापेक्षा कमी किंमतीला कापूस विकू नये, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांना १२ तास वीज उपलब्ध होण्यासाठी सोलार फिडर योजना सुरु करणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. पुरस्कारांची संख्या आणि पुरस्कार विजेत्यांचा भत्ता सुद्धा वाढवण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराची रक्कम ७५ हजार वरुन तीन लाख करण्यात आली आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, उद्यान पंडित या पुरस्कारांची रक्कम प्रत्येकी ५० हजार वरून दोन लाख रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.
****
राज्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा कारभार गतिमान करण्यासाठी १६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदांची निर्मिती करण्यात आली असल्याचं, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. या पदभरतीसाठी एक कोटी २७ लाख ५८ हजार इतक्या खर्चास देखील मंत्रीमंडळाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या मनुष्यबळाच्या परिपूर्ततेनंतर लवकरच आयोगाचं प्रशासकीय कामकाज गतिमान पद्धतीने पूर्ण होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
****
विधानसभा सदस्य बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याची माहिती समाजमाध्यमावर दिली आहे. ४८ वर्षांपूर्वी तरुण वयात त्यांनी काँग्रेस पक्षात सहभाग घेतला होता, हा प्रवास महत्त्वाचा असल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं आहे.
****
बदलत्या हवामानामुळे शेतपिकांचं नुकसान होत असून, त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळणं आवश्यक असल्याचं, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे. लातूर इथं आज जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भविष्यात बांबूला चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी यावेळी केलं. १० तारखेपर्यंत सुर राहणाऱ्या या कृषी महोत्सवात कृषी आणि गृहपयोगी वस्तूंचे १७७ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
****
राज्यात अनेक ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला असून, ठिकठिकाणी नागरीकांचा या यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
नांदेड शहरात आज ही यात्रा गाडीपुरा आणि वजिराबाद भागात पोहोचली. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली. आयुष्यमान कार्ड तसंच पंतप्रधान स्वनिधी अर्ज यावेळी भरून घेण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा नगर परिषद क��षेत्रात आज विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी विविध योजनांची माहिती देण्यात आली.
मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत सोलापूर इथले अंबादास बल्ला आणि इमरान शेख यांनी या यात्रेच्या माध्यमातून त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
बाईट - अंबादास बल्ला आणि इमरान शेख, जि.सोलापूर
****
राज्य कृषी विभागानं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत ४८ कोटी ६३ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. यासंबंधी दोन हजार चारशे ५३ दावे निकाली काढण्यात आले होते. राज्यात सात एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीतल्या ७७ दाव्यांसांठी, एक कोटी ५१ लाख रुपयाचा विमा वितरित करण्यात येणार आहे.
****
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीनं डॉ. रखमाबाई राऊत यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कार इचलकरंजी इथले डॉ.हेडगेवार रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेश पवार यांना जाहीर झाला आहे. मंडळाच्या संचालकांनी आज जालना इथं ही माहिती दिली. देवदासींच्या प्रथा उत्थानासाठी समर्पित सेवा केलेले डॉ.भीमराव गस्ती पुरस्कार मुंबईच्या पत्रकार योगिता श्रीराम साळवी यांना जाहीर झाला आहे. जालना इथं येत्या शनिवारी सेवा भारतीचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री विजय पुराणिक, यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि स्मृतीपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
नाशिक ते पुणे औद्योगिक महामार्ग जलदगतीने पूर्ण करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने मान्यता दिली आहे. नाशिक ते पुणे औद्योगिक द्रुतगती मार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं जून २०२३ मध्ये घेतला होता, त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, सल्लागार संस्थेने हा अहवाल नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला.
****
0 notes
Photo
@priyaagamre Jivashiva marathi movie Promo launched https://youtu.be/-5N4IiJC0WQ *अन्याया विरूध्द लढण्याची ऐक नवीन सुरवात* *छ्त्रपती शिवाजी महाराजांनी निर्मान केलेल्या महाराष्टावर आणि राजमाता जिजाऊ्च्या लेकीवर वाकड्या नजरे ने पाहनार्यांच्या छातीवर वार कराय साठी मुलींना आणि जनतेला विचार करून अन्यायाविरूध्द लढण्याची ताकद देनारा मराठी चित्रपट* *जिवा शिवा* आँफिशीयल प्रोमो.. *Officiale promo* *Watch, like share, and subscribe* (at Nagpur) https://www.instagram.com/p/BolXTLThMVu/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1m73fmjnb8lsv
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date –17 October 2019 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ६.०० **** भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सातारा इथं भाजपच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत बोलत होते. भारतानं गेल्या पाच वर्षांत देशातील सैन्य दलाला जगातील सर्वाधिक सशक्त सैन्यांच्या रांगेत नेऊऩ उभं केलं असल्याचं ते यावेळी म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सैन्याच्या शौर्याबद्दल प्रश्र्न उपस्थित करतात, त्यांना गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी याची शिक्षा मिळाली होती यावेळीही त्यांना राज्य तसंच हरयाणातील जनता कठीणात कठीण शिक्षा देईल, ��सं पंतप्रधान यावेळी म्हणाले. पेट्रोल, डिझेलमध्ये येणाऱ्या काळात किमान दहा टक्के इथेनॉलचा उपयोग व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असून त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल, असं त्यांनी यावेळी नमुद केलं. एक भारत, श्रेष्ठ भारत निर्माण करण्याची शक्ती भाजपला शिवाजी महाराजांच्या संस्कारातून मिळाली असून भाजपकडे आजवर केवळ शिवाजी महाराजांचे संस्कार होते आता पक्षाकडे त्यांचा संपूर्ण परिवारही आला असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमुद केलं. **** काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशातील आर्थिक स्थिती आणि राज्यातील मुद्दांवरून भाजपचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी त्यांनी राज्यातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर टीका केली आहे. राज्याला आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका बसणार असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी आज मुंबईत प्रमुख व्यावसायिक तसंच पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात अऩेक अशा समस्या आहेत की ज्या कृत्रिम आहेत, असंही डॉ. मनमोहनसिंग यावेळी म्हणाले. **** शेतकऱ्यांना सुवर्णकाळ आणण्यासाठी राज्यात सत्तापरिवर्तन करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. त्यांनी आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि पिंपळगाव इथं प्रचार सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. भाजप- शिवसेनायुतीचं सरकार शेतकरी विरोधी सरकार असून कांद्याची निर्यात बंद केल्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याची टीका पवार यांनी यावेळी केली. **** भाजप सरकारनं कृषी कर्ज माफी चुकीच्या पध्दतीनं केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा इथं पक्षाचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचार सभेत ते आज बोलत होते. गेल्या पाच वर्षांत राज्यातील सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळं शेती उत्पादन घटल्याचं अजित पवार यांनी यावेळी नमुद केलं. **** केंद्रातलं आणि राज्यातलं भाजप सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन मोहात पाडत आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जोतिरादित्य शिंदे यानी केली आहे. ते आज नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील बारड इथं भोकर विधानसभा मतदार संघातले काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचार सभेत बोलत होते. कैलासवासी शंकरराव चव्हाण यांनी धरणं बांधून जमीनी सिंचनाखाली आणल्या तर अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात कारखाने सुरू केले यामुळे नांदेड जिल्ह्याचा कायापालट झाल्याचं ते यावेळी म्हणाले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी लातूरमध्ये बार्षी रस्त्यावरही आज प्रचार सभा घेतली. राज्याच्या विविध भागात उद्योग बंद पडत असल्यानं राज्य बेरोजगाराचं केंद्र झालं असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. **** भाजप सरकारच्या कार्यकाळातील महागाई, मंदीच्या लाटेमुळे बेरोजगारीचं संकट आलं असून हे सरकार सर्वसामान्य जनतेचे पैसे लुटत असल्याची खरमरित टीका काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी केली आहे. ते बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्र्वर पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते. **** काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तेत असताना पंधरा वर्ष राज्याचं मोठं नुकसान केलं असून ते भरून काढण्यासाठी पुन्हा शिवसेना, भाजपच्या महायुतीला विजयी करा, असं आवाहन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते आज धुळे इथं महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारसभेत बोलत होते. **** कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या पत्नीनं स्वाक्षऱ्या केलेल्या दस्तावेजावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या स्वाक्षऱ्या आढळल्यानं अंमलबजावणी संचालनालयानं त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. अंमलबजावणी संचालनालयानं पटेल यांना उद्या मिर्चीच्या अवैध मालमत्तेच्या तपास प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. मिर्ची हा फरार गुंड दाऊत इब्राहीमचा साथीदार आहे. ***** ***
0 notes