#वसंत प्रक्षेपण
Explore tagged Tumblr posts
technofyworld · 3 years ago
Text
आगामी लॉन्च से पहले iPhone SE 3, नए iPad मॉडल भारत में आयात किए गए: रिपोर्ट
आगामी लॉन्च से पहले iPhone SE 3, नए iPad मॉडल भारत में आयात किए गए: रिपोर्ट
Apple का आगामी iPhone SE 3 स्मार्टफोन, जिसे कंपनी के iPhone SE (2020) हैंडसेट का उत्तराधिकारी माना जाता है, को इस साल के अंत में Apple के स्प्रिंग लॉन्च इवेंट में लॉन्च करने की अफवाह है। कंपनी ने कथित तौर पर एक आगामी कार्यक्रम में लॉन्च किए जाने वाले दो नए iPad मॉडल के साथ, परीक्षण के लिए भारत में तीन नए iPhone मॉडल आयात किए हैं। अगली पीढ़ी के 5G कनेक्टिविटी की पेशकश करते हुए iPhone SE 3 को अपने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lazypenguinearthquake · 3 years ago
Text
परीक्षण के लिए भारत में आयातित Apple iPhone SE 3 और 2 iPad मॉडल, वसंत में हो सकता है लॉन्च
परीक्षण के लिए भारत में आयातित Apple iPhone SE 3 और 2 iPad मॉडल, वसंत में हो सकता है लॉन्च
नई दिल्ली: ऐप्पल भारत में कथित तीसरी पीढ़ी के आईफोन एसई का परीक्षण कर रहा है और देश में परीक्षण के लिए दो टैबलेट, आने वाले आईपैड एयर और बजट आईपैड का भी आयात किया है, मीडिया ने बताया है। क्यूपर्टिनो, कैलिफ़ोर्निया स्थित टेक दिग्गज ने भारत में तीन iPhone SE मॉडल आयात किए हैं, मॉडल नंबर A2595, A2783, और A2784 और आयात डेटा के अनुसार, मॉडल की कीमत 23,000 रुपये है, 91Mobiles द्वारा प्रकाशित एक रिपोर्ट…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची संपूर्ण काळजी घेण्याचं, आणि सुरक्षित राहण्याचं श्रोत्या���ना आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड - १९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३९७८०४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६१२७३९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४८ वा राज्याभिषेक सोहळा - शिवस्वराज्य दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा
** मराठा आरक्षणासाठी १६ जूनला पहिला मोर्चा - खासदार संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा
** नांदेड जिल्ह्यात उद्यापासून ‘स्तर एक’नुसार निर्बंध शिथील; परभणीत बाजारपेठांना चार वाजेपर्यंत व्यवहारांना उद्यापासून परवानगी
आणि
** १२ ते १८ वयोगटावर कोविड लसीच्या परिणामांबाबत नागपुरात परीक्षणाला प्रारंभ
****
छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४८ वा राज्याभिषेक सोहळा - शिवस्वराज्य दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण आहे, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेच्या मनातलं, लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणलं, रयत आणि मातृभूमीच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं नमूद करत शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.  
छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना सोबत घेत रयतेचं राज्य-हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायानं राज्यकारभार केला, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं.
स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर राज्‍याभिषेक सोहळा परंपरागत पध्दतीनं, मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा झाला. खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी यावेळी बोलताना, शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याची सूचना केली. दरम्यान, आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क असून, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी येत्या १६ जून रोजी पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा संभाजी राजे यांनी केली. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असून सामान्य मराठा जनतेनं रस्त्यावर येऊ नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून हा पहिला मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद इथं जिल्हा परिषद कार्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मिना शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदवले यांच्या हस्ते शिवशक राजदंडाचं प्रतीक म्हणून गुढी उभारण्यात आली. यावेळी चंद्रशेखर ठाकूर आणि सरिता डाकूरकर यांच्या संचानं शिवगीतं तसंच पोवाडे सादर केले. पैठण इथं गागाभट्ट चौकात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला
****
नांदेड इथं शिवस्वराज्य दिनाचा मुख्य समारंभ आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात साजरा झाला. नांदेड इथं जिल्हा परिषद प्रांगणात नांदेड जिल्हा परिषदे अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन अभिवादन करण्यात आलं. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधून शुभेच्छा दिल्या. नांदेड इथं पंचायत समिती कार्यालयातही शिवस्वराज्य दिन साजरा झाला.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज कुलगुरू डॉक्��र उद्धव भोसले यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन क���लं.
****
जालना इथं जिल्हा परिषद प्रांगणात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत स्वराज्य गुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.
****
परभणी जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
****
हिंगोली इथं जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांनी शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन अभिवादन केलं.
****
उस्मानाबाद इथं जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते स्वराज्य गुढी उभारुन अभिवादन करण्यात आलं.
बीड इथं जिल्हा परिषद प्रांगणात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थांना त्यांच्या घराच्या किल्ल्या देण्यात आल्या.
****
देवगिरी विश्व संवाद केंद्राचे देवर्षी नारद पुरस्कार आज सायंकाळी ऑनलाईन सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहेत. यंदाचे पुरस्कार काल जाहीर झाले. प्रिंट मीडिया श्रेणीत जालन्याचे संजय प्रभाकर देशमुख, इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीत शहाद्याचे जगदीश एकनाथ जयस्वाल, न्यूज पोर्टल श्रेणीत जळगावचे शेखर पाटील तसंच सोशल मीडिया मुक्त लेखनासाठी भुसावळचे निलेश सुभाष वाणी यांना गौरवण्यात येणार आहे. देवगिरी विश्व संवाद केंद्राच्या यू-ट्यूब चॅनलवर आज संध्याकाळी ७ वाजता या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव्याच्या राज्य शासनानं केलेल्या स्तरनिहाय वर्गवारीअंतर्गत उद्यापासून ‘स्तर एक’नुसार निर्बंध शिथील करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉक्टर  विपीन इटनकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यात कोविड बाधितांचं प्रमाण,शासनासह नागरिकांनी घेतलेली काळजी यामुळे सद्यस्थिती नियंत्रणात असून कोविड उपचारात ऑक्सिजन खाटांवरील रुग्ण प्रमाणही कमी आहे. याबाबतची आकडेवारी लक्षात घेता जिल्ह्यात ‘स्तर एक’नुसार निर्बंध शिथील होत आहेत.
****
परभणी इथं जिल्हा प्रशासनानं उद्या सात जूनपासून पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांना सायंकाळी चार वाजेपर्यंत व्यवहारास आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत संचाराला मुभा दिली आहे. यावेळेनंतर संचारबंदी लागू असणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे  शनिवार- रविवार या दोन दिवस अत्यावश्यक सेवांचा अपवाद  वगळता  बाजारपेठ पूर्णतः बंद राहील असं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
****
१२ ते १८ वयोगटावर कोविड लसीच्या परिणामांबाबत नागपुरात परीक्षणाला आजपासून प्रारंभ झाला. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या चाचणीसाठी १२ ते १८ वयोगटातल्या निवड केलेल्या ५० मुलांना आज लसीची पहिली मात्रा देण्यात आली. २८ दिवसानंतर लसीची दुसरी मात्रा देण्यात येईल, यानंतर या लसीच्या परिणामांचा तसेच अँटिबॉडी प्रतिपिंड निर्मितीचा पुढच्या २०८ दिवसांमध्ये अभ्यास केला जाईल. या संशोधनाचे नागपुरातले मुख्य संयोजक आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले....
झिरो डोस दिल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसानंतर किंवा त्याच्यानंतर दोन दिवस जास्त चालतात. २८ ते ३० दिवसाच्या अंतराने दुसरा डोस देणार आणि त्यानंतर मग कोविड ॲन्टीबॉडीज ज्या आपल्याला कुठल्याही व्हॅक्सीन दिल्यानंतर डेव्हलप होतात, त्या डेव्हलप होण्यासाठी परत आम्ही तीनदा मुलांना बोलावणार आहे. असा हा कोर्स पूर्ण २०८ दिवसाचा म्हणजे अंदाजे सात ते आठ महिन्यांचा कोर्स आहे.
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीत बारा कोविडग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये लातूर, चंद्रपूर आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, घाटी रुग्णालयात आज सकाळी २१ नवे रुग्ण दाखल झाले, तर २३ रुग्ण कोविड संसर्गमुक्त झाल्यानं, त्यांना सुटी देण्यात आली.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार २९ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ५२ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार ५६० झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ८४ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५८ हजार ८४७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ६८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले नवे १८१ रुग्ण आढळले. यापैकी आष्टी तालुक्यात ३८ रुग्ण, बीड ३०, केज २९, गेवराई तसंच वडवणी तालुक्यात प्रत्येकी १६, माजलगाव १२, अंबाजोगाई ११, धारूर तसंच शिरुर प्रत्येकी १०, पाटोदा ८ तर परळी तालुक्यात आज कोविड संसर्ग झालेला एक रुग्ण आढळला आहे.
****
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करण्याची घाई करू नये असं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केलं आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीचं काम पूर्ण केलं आहे. मात्र, किमान ८० ते १०० मिलीमीटर हंगामी पाऊस पडल्यानंतरच शेताला वापसा मिळेल, त्यानंतरच खरीप हंगामातील पेरणीचा निर्णय घ्यावा असं सूचित करण्यात आलं आहे. तसंच पेरणीपूर्वी रायझोबियम, अझोटोबॅक्टर आणि पीएसबी या जीवाणूसंवर्धक औषधींची बीज प्रक्रिया करून आपल्या रासायनिक खतावरील खर्च क��ी करावा असं आवाहनही करण्यात आलं आहे.
//*********//
0 notes
technofyworld · 3 years ago
Text
आगामी लॉन्च से पहले iPhone SE 3, नए iPad मॉडल भारत में आयात किए गए: रिपोर्ट
आगामी लॉन्च से पहले iPhone SE 3, नए iPad मॉडल भारत में आयात किए गए: रिपोर्ट
Apple का आगामी iPhone SE 3 स्मार्टफोन, जिसे कंपनी के iPhone SE (2020) हैंडसेट का उत्तराधिकारी माना जाता है, को इस साल के अंत में Apple के स्प्रिंग लॉन्च इवेंट में लॉन्च करने की अफवाह है। कंपनी ने कथित तौर पर एक आगामी कार्यक्रम में लॉन्च किए जाने वाले दो नए iPad मॉडल के साथ, परीक्षण के लिए भारत में तीन नए iPhone मॉडल आयात किए हैं। अगली पीढ़ी के 5G कनेक्टिविटी की पेशकश करते हुए iPhone SE 3 को अपने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 July 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २२ जुलै २०१९ सकाळी ७.१० मि. ****  दे��� भ्रष्टाचारमुक्त करण्याचं भाजपाचं उद्दीष्ट - राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांचं प्रतिपादन  श्रीहरिकोटा इथल्या अंतराळ केंद्रावरून आज दुपारी चांद्रयानाचं प्रक्षेपण  शेतीमधल्या प्रयोगांसाठी तंत्रज्ञान स्वातंत्र्य आवश्यक - ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉक्टर चार���दत्त मायी यांचं मत आणि  मराठवाडा साहित्य परिषदेचे विविध वाङमय पुरस्कार प्रदान **** देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचं भाजपाचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं आहे. मुंबईत काल भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे नवी राजकीय संस्कृती विकसित झाली असून, त्यांच्या मार्गावर वाटचाल करण्याचं आवाहन नड्डा यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. आपण फक्त भाजपचे नव्हे तर शिवसेना, रासप, रिपाई या घटकपक्षांचेही मुख्यमंत्री असल्याचं, फडणवीस यांनी आपल्या भाषणात नमूद केलं. **** देशातल्या सात कोटी ३२ लाख शेतकरी कुटूंबांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत १४ हजार सहाशे सेहेचाळीस कोटी रूपयांच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची प्रत्येकी दोन हजार रूपये रक्कम अदा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या ५० लाख शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. या योजनेमध्ये देशभरातल्या सुमारे १४ कोटी ५० लाख लाभार्थींचा समावेश करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. **** भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेअंतर्गत आज दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. प्रक्षेपणासाठीची विपरित गणना काल सुरु झाली. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून जी.एस.एल.व्ही. मार्क -३ च्या माध्यमातून चांद्रयानाचं प्रक्षेपण होईल. प्रक्षेपणापासून तिसाव्या दिवशी चांद्रयान, चंद्राच्या कक्षेत दाखल होणार असून, ७ सप्टेंबर रोजी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. हे चांद्रयान गेल्या सोमवारी पहाटे अवकाशात झेपावणार होतं, मात्र तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं होतं. **** भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार, माजी तसंच विद्यमान मंत्री, आणि अनेक नेते कॉंग्रेसच्या संपर्कात असून, लवकरच ते काँग्रेस मध्ये प्रवेश करतील असं माजी खासदार तसंच कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे, नाना पटोले याची पक्षानं महाराष्ट्र प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे, त्यांनी काल गोंदिया जिल्ह्यातून प्रचाराला सुरवात केली, त्यावेळी ते बोलत होते. **** शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचं काल अहमदनगर जिल्ह्यात आगमन झालं. संगमनेर तालुक्यात ठिकठिकाणी यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत झालं. घारगाव इथं झालेल्या जाहीर सभेलाही ठाकरेंनी संबोधीत केलं.आगामी निवडणुकीत राज्यात पुन्��ा भगवाच फडकणार, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. **** राज्यातल्या नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी सरकारनं ईशा फाऊंडेशनच्या सहकार्यानं नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेतला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल ही माहिती दिली. यात नदीच्या दोन्ही किनाऱ्यांपासून एक किलोमीटर अंतरावर वन, शासकीय आणि खाजगी जमिनीवर वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नदीकाठच्या सुमारे १४० किलोमीटर अंतरावर हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. **** कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामांसाठी शासनानं अतिरिक्त निधी द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे, ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. २०१९-२० या वर्षासाठी जलसंपदा विभागानं ५०० कोटी रुपये निधीची मागणी केली, मात्र शासनानं या प्रकल्पासाठी केवळ ४०० कोटी रुपये निधी दिला. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी विलंब होण्याची शक्यता पाटील यांनी वर्तवली. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** समाजातल्या अपेक्षा तसंच नव्यानं निमार्ण होणाऱ्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी बदलते कायदे महत्त्वाचे असल्याचं, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर इथल्या दिवाणी तसंच फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन न्यायमूर्ती वराळे यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. **** शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी तंत्रज्ञान स्वातंत्र्य आवश्यक असल्याचं मत, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर चारूदत्त मायी यांनी केलं. औरंगाबाद इथं शेतकरी संघटना आणि देवगिरी महाविद्याच्या वतीनं आयोजित 'शेती - झिरो बजेटची, की बी.टी.ची' या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन डॉ मायी यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. जीएम अर्थात जनुक सुधार तंत्रज्ञान शेतीसाठी फायदेशीर असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर यामध्ये मोठ्याप्रमाणावर संशोधन होत असल्याचं त्यांनी सांगितलं. एचटीबीटी तंत्रज्ञानाच्या कापसाला चाचणी पध्दतीनं लागवडी करिता शासनानं मान्यता द्यावी, अशी मागणीही डॉक्टर मायी यांनी यावेळी केली. **** मराठवाडा साहित्य परिषदेचे विविध वाङमय पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. औरंगाबाद इथं परिषदेच्या सभागृहात काल सायंकाळी, प्रसिद्ध कवी समीक्षक डॉ वसंत पाटणकर यांच्या हस्ते मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सुपडा वराडे यांना नरहर कुरुंदकर वाङमय पुरस्कार, दत्ता घोलप यांना म भि चिटणीस पुरस्कार, किरण गुरव यांना बी रघुनाथ ��ुरस्कार, सुचिता खल्लाळ यांना कुसुमावती देशमुख पुरस्कार तर अनिल कुलकर्णी यांना रा ज देशमुख स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. **** काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने वंचित बहुजन आघाडीला भाजपाची बी टीम असं म्हटल्यामुळे चार टक्के मतं कमी झाली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अण्णाराव पाटील यांनी केला आहे, ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आघाडीने याबद्दल माफी मागावी मगच आघाडीबरोबर विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा करू, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकांसाठी मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या इच्छुकांच्या मुलाखती आजपासून घेतल्या जाणार आहेत. **** औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात पिशोर नजिक भारंबा तांडा इथं ओढ्याला आलेल्या पुरात दोन वनरक्षक दुचाकीसह वाहून गेले. काल सकाळी ही घटना निदर्शनास आली. यापैकी एका वनरक्षकाचा मृतदेह सापडला आहे. राहुल दामोदर जाधव असं त्याचं नाव असून, तो बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजाचा रहिवासी आहे. अजय संतोष भोई या दुसऱ्या वनरक्षकाचा शोध अद्याप सुरू आहे **** जालना-औरंगाबाद मार्गावर खासगी प्रवासी बस आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू झाला. काल दुपारी बदनापूर कृषी संशोधन केंद्रासमोर ही दुर्घटना घडली. अहमदनगर जिल्ह्यात पुणे नाशिक महामार्गावर काल दुपारी झालेल्या अन्य एका अपघातात, एक जण जागीच ठार झाला तर ३ जण जखमी झाले. **** परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्याच्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०१८ मधील दुष्काळ अनुदानाचं शंभर टक्के वाटप करण्यात आलं आहे. तहसीलदार डॉक्टर आशिष बिरादार यांनी ही माहित�� दिली. १९ जुलै, २०१९ च्या आदेशानुसार या तालुक्याच्या शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान मदतीपोटी ५४ लाख, ५७ हजार, ९४४ एवढा निधी मिळाला. यापैकी ४७ लाख, ८५ हजार, ४२१ रुपयांचा निधी २० जुलै पर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याचं, बिरादार यांनी सांगितलं. **** लातूर जिल्ह्यात सामाजिक समरसता मंच आणि दारिद्र्य विरोधी अभियानातर्फे काल युवा उद्योजक परिषद घेण्यात आली. निलंगा तालुक्याच्या अंबुलगा इथं झालेल्या या परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण डॉक्टर अशोक कुकडे यांनी केलं. ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीतील तरुणांना उद्योग, व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक अभंग सूर्यवंशी यांनी दिली. **** हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या ताकतोडा इथल्या शेतकऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केलं आहे. गाव विक्रीला का��ून संपूर्ण इच्छा मरणाची परवानगी मागणाऱ्या या गावानं, शासनाच्या विरोधात ग्रामपंचायत कार्यालयासमोर आपल्या पशूधनासह आंदोलन केलं. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 January 2018 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २८ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि. ****  पात्र तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदवून मतदान करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन  राज्यातल्या पर्यटन वृध्दीसाठी उडान उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात पाचशे कोटी रुपयांची तरतूद  मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. व्यंकटेश काब्दे यांची बहुमतानं निवड आणि  सायना नेहवाल इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची विजेती घोषीत **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पात्र तरूणांना मतदार म्हणून मतदार यादीत नाव नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्य��्रमाच्या माध्यमातून काल देशवासियांशी संवाद साधतांना त्यांनी मताधिकार प्राप्त करणं, हा नागरिकाच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं सांगितलं. २१व्या शतकात जन्मलेल्या युवकांसाठी मतदानाची ही पहिलीच संधी असून, त्यांनी देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची वेळ आली असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, युवकांना येत्या निवडणुकीत मतदानाचं आवाहन केलं. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘कलामसॅट’ या उपग्रहाचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं यशस्वी प्रक्षेपण केल्याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. पुण्यात नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतल्या विजेत्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. देशात सर्वत्र ‘स्वच्छ शौचालय’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं ते म्हणाले. सर्व सरपंच आणि गाव प्रमुखांनी आपल्या पंचायतीत या मोहिमेचं नेतृत्व करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. आगामी परीक्षांसाठी पंतप्रधानांनी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस, संत रविदास यांचं पंतप्रधानांनी स्मरण केलं. कर्नाटकातल्या तुमकुर जिल्ह्यातले श्री सिद्धगंगा मठाचे श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या आठवणींना उजाळा देत पंतप्रधानांनी, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. येत्या ३० जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. यानिमित्त नागरिकांनी दोन मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचं आवाहन त्यांनी केलं. **** उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना करण्याचं आवाहन केलं आहे. ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. स्वातंत्र्य सैनिक तसंच इतर नेत्यांचा त्याग, शौर्य आणि योगदान यांचा शिक्षणात महत्त्वाचा घटक म्हणून समावेश करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. शिक्षणबाह्य कार्यक्रम घेऊन विद्यापीठ परिसरातलं वातावरण विकृत करु नये यावर जोर देत चारित्र्यसंपन्न माणूस घडवणं हा शिक्षणाचा धर्म असल्याचं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. **** अयोध्येतल्या राम जन्मभूमी- बाबरी मस्जिद मालकी वादाच्या प्रकरणावर उद्या २९ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सुनावणीची नवीन तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. **** केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज सरकारी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली सध्या उपचारांसाठी अमेरिकेला गेले असल्यानं अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी गोयल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बँकांची बुडीत कर्जं आणि लघु तसंच ��ध्यम उद्योगांना वित्तपुरवठा या विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. **** संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार करण्यात येणाऱ्या आणि सर्वाधिक वेगानं धावणाऱ्या दिल्ली वाराणसी रेल्वे गाडीला ‘वंदे -भारत’ अस नांव दिलं जाणार आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. १६ यान असलेली ही रेल्वे गाडी चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत तयार करण्यात आली असून, भारतीय अभियंत्यांनी दीड वर्षांत या रेल्वेची निर्मिती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या नव्या रेल्वे गाडीचा शुभारंभ करणार आहेत. **** भारतीय रेल्वेतर्फे येत्या चौदा एप्रिलपासून ‘समानता एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी नागपूर इथून सुरु केली जाणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तथागत गौतम बुद्धांशी संबंधित स्थळांना भेटी देणारी ही विशेष पर्यटन रेल्वे असणार आहे. दहा रात्री- अकरा दिवसांचा हा प्रवास असेल. **** राज्यातल्या पर्यटन वृध्दीसाठी उडान उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. कोकणातल्या सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आयोजित विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी काल ते बोलत होते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इथल्या विमानतळांचा या योजनेत समावेश केल्याचं त्यांनी जाहीर केलं. कोकणात किनाऱ्यांवर लवकरच समुद्रावर विमान उड्डाण आणि उतरवण्याची सुविधा सुरु होणार असल्याचं प्रभू यांनी सांगितलं. रेल्वे आणि विमान सेवेद्वारे कोकणात पर्यटनाला चालना मिळेल, आणि तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असं ते म्हणाले. **** केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांच्या माध्यमातून प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभं आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाला सुरक्षा कवच मिळाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल अटल आरोग्य शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतूनही गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांवर सुमारे तेवीसशे आजारांवर उपचार होत असल्याचं त्यांनी सांगितलं. **** भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची आज जालना इथं बैठक होणार आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य मंत्रिमंडळातले भाजपचे मंत्री, पक्षाचे पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कृषी आणि राज्यकीय ठरावांसह बारा विषयांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** इसीस या दहशतवादी संघटनेशी संबं��ीत आणखी एका आरोपीला दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं काल औरंगाबाद इथं न्यायालयासमोर हजर केलं, न्यायालयानं त्याला पाच फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या आरोपीला एटीएसनं परवा शनिवारी मुंब्रा इथून ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडून संगणकीय साहित्य जप्त करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यातच एटीएसनं, राज्यात एका अल्पवयीन आरोपीसह दहा जणांना अटक केली होती. **** मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अध्यक्षपदी नांदेड इथले सामाजिक कार्यकर्ते, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांची बहुमतानं निवड झाली. काल झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत परिषदेचे मावळते अध्यक्ष विधीज्ञ प्रदीप देशमुख यांनी अध्यक्षपदासाठीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार शरद अदवंत यांच्यासह अनेक उमेदवारांनी माघार घेतली, मात्र, औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष गोपीनाथ वाघ यांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे दुपारनंतर मतदान घेण्यात आले. मराठवाडाभरातून आलेल्या ८७ सदस्यांनी अध्यक्षपदासाठी मतदान केलं. त्यात डॉ. काब्दे यांना ६० मतं मिळाल्यानं, ते विजयी झाले. डॉ. काब्दे यांनी यापूर्वीही परिषदेचं अध्यक्षपद सांभाळलं आहे. **** लातूर महानगरपालिकेनं अतिक्रमणात हटवलेल्या फेरीवाल्यांना जागा देण्याबाबतचं धोरण तत्काळ जाहीर करावं, असं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. लातूर शहरातल्या १२ शौचालयांचं लोकार्पण, रस्ते कामाचं भूमिपूजन, सामाजिक सभागृह उद्घाटन तसंच गंजगोलाई सुशोभीकरण आदी कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते काल बोलत होते. महानगरपालिकेनं त्वरित सर्वसाधारण सभा घेऊन, वर्षानुवर्षे लातूर शहरात राहणाऱ्या, मात्र आजपर्यंत जागा नावावर न झालेल्या सुमारे तीन हजार कुटुंबांना पुढच्या दहा दिवसांत कबाले वाटप करावेत, असं निलंगेकर म्हणाले. **** प्राचार्य ना.य.डोळे स्मृती पुरस्कार अभिनेते-सामाजिक कार्यकर्ते अतुल कुलकर्णी यांना काल प्रदान करण्यात आला. लातूर जिल्ह्याच्या उदगीर इथं आयोजित कार्यक्रमात शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिरुध्द जाधव यांच्या हस्ते कुलकर्णी यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. **** भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची विजेती म्हणून घोषित करण्यात आलं. काल झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सायनाची प्रतिस्पर्धी स्पेनच्या कॅरोलिना मरिनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तिनं स्पर्धेतून माघार घेतली. मरिन ही उत्तम प्रतिस्पर्धी असून, दुखापतीमुळे तिनं माघार घेणं दुर्देवी असल्याचं सायनानं म्हटलं आहे. **** भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज माऊंट मौंगा��ुई इथं थोड्याच वेळात सुरू होणार आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे. **** नाटकाच्या माध्यमातून बदलणारा काळ आणि या बदलत्या काळात मुलांच्या मनात सुरु असलेली घुसमट, तसंच त्यांचा ताण रंगमंचावर व्यक्त व्हायला हवा, असं मत ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. गिरीश सहदेव यांनी व्यक्त केलं. लातूर इथं काल सोळाव्या राज्य बाल नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. लहान मुलांच्या विषयांकडे दिग्दर्शक, नाट्य लेखकांनी गांभीर्यानं पहायला हवं, असं सांगतानाच त्यांनी मुलांना आनंदासाठी नाटकांकडे वळा, असा सल्लाही दिला. **** औरंगाबाद इथं एक ते चार फेब्रुवारी दरम्यान पाचवं राज्यस्तरीय महा अॅग्रो कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचे समन्वयक वसंत देशमुख यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहीती दिली. पैठण रसत्यावर हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 January 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १३ जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि. ****  कार्टोसॅट द्वितीय मालिकेतल्या सातव्या उपग्रहासह एकूण ३१ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण  सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकरणात हस्तक्षेप करणार नसल्याचं, केंद्र सरकारकडून स्पष्ट  कन्या माझी ‘भाग्यश्री’ योजना घराघरात पोहोचवणार - महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि  राजमाता जिजाऊ तसंच स्वामी विवेकानंद यांना काल सर्वत्र अभिवादन **** भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्त्रोनं काल आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून कार्टोसॅट द्वितीय मालिकेतल्या उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. पी एस एल व्ही सी ४० या अग्निबाणाच्या साहाय्यानं एकूण ३१ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. यामध्ये तीन भारतीय आणि २८ परदेशी उपग्रहांचा समावेश आहे. यात कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. पाच वर्षांच्या मोहिमेवर पाठवण्यात आलेला कार्टोसॅट-दोन हा भारताचा सातवा रिमोट सेन्सिंग उपग्रह असून, भारताचं हे शंभरावं उपग्रह प्रक्षेपण ठरलं आहे. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. **** सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी उपस्थित केलेल्या प्रकर��ात हस्तक्षेप करणार नसल्याचं, केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय कायदे राज्यमंत्री पी पी चौधरी यांनी काल यासंदर्भात बोलताना, जगभरात नावाजलेली भारतीय न्यायव्यवस्था स्वतंत्र असून, आपले अंतर्गत प्रश्न सोडवण्यास सक्षम असल्याचं, स्पष्ट केलं. या मुद्यावरून राजकारण केलं जाऊ नये, असंही सरकारनं म्हटलं आहे. न्यायमूर्ती जे चेलमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन लोकूर, न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषद घेऊन न्यायालयातल्या प्रशासकीय कामकाजावर नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींनी अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं पक्षाच्या ट्विटर अकाऊंटवरुन, लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी, याबद्दल चिंता व्यक्त करत, न्यायमूर्तींनी मांडलेल्या मुद्यांची नि:पक्ष आणि तातडीनं चौकशी व्हावी, असं मत व्यक्त केलं. ***** सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्यायमूर्ती बी एच लोया यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला १५ जानेवारी पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई वकील संघानं मात्र हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरू असल्यानं, सर्वोच्च न्यायालयानं या याचिकेवर सुनावणी घेऊ नये, अशी विनंती केली, मात्र हा आक्षेप विचारात घेऊन, येत्या सोमवारी १५ तारखेला या प्रकरणी सुनावणी घेणार असल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती लोया यांचा उत्तरीय तपासणी अहवालही न्यायालयानं मागवला आहे. **** ई-नाम पोर्टलच्या माध्यमातून शेतमालासाठी राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय कृषी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. राज्यातल्या सर्व बाजार समित्यांनी मध्यस्थांची भूमिका बजावून देशात उत्तम बाजारपेठ तयार करण्यास मदत करावी, असं आवाहनही त्यांनी केलं. **** कन्या माझी ‘भाग्यश्री’ ही योजना घराघरात पोहोचवणार असल्याचं, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. काल बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कन्या माझी भाग्यश्री योजनेच्या जाणीव जागृती रथयात्रेचा प्रारंभ केल्यानंतर त्या बोलत होत्या. बुलडाण्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यावेळी उपस्थित होते. सिंदखेडराजा इथून प्रारंभ झालेल्या या रथयात्रेचा सातारा जिल्ह्यात नायगाव इथं समारोप होणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या वाढीव मानधनाची रक्कम एक एप्रिल २०१८ पासून त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार, महिला सक्षमीकरणासाठी बचतगटांना शून्य टक्के दरानं कर्जपुरवठा करणार, तसंच योजनेच्या माध्यमातून एका मुलीवर कुटुंब नियोजन करणाऱ्या कुटूंबाला ५० हजार रूपये दीर्घ मुदत ठेव दिली जाणार असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं. **** मुंबईतल्या कमला मिल अग्निकांडप्रकरणी आरोपी असलेला मोजोस बिस्तो पबचा मालक युग तुली याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबईच्या न्यायालयानं फेटाळला आहे. अग्निकांड झाल्यानंतर फरार झालेला युग तुली परवा हैदराबादमध्येही पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना काल सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. जिजाऊ यांच्या जन्मस्थानी, बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याच्या महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी जिजाऊंना अभिवादन केलं. यावेळी केलेल्या भाषणात केजरीवाल यांनी, महाराष्ट्रात उद्भवणाऱ्या जातीय ताणतणावांना भाजप तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी जिजाऊ आणि विवेकानंदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. बी�� जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी बी एम कांबळे यांनी जिजाऊ आणि विवेकानंदांना आदरांजली वाहिली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा इथं काल स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नेहरु युवा केंद्राच्या वतीनं आयोजित युवा सप्ताहाचं उद्घाटन झालं. उद्घाटन कार्यक्रमात कौशल्य विकास, अवयवदान, रोजगार आणि स्वयंरोजगार याबद्दल युवकांना मार्गदर्शन करण्यात आलं. लातूर शहरात विविध संस्था, संघटनांच्यावतीनं रक्तदान शिबिर, फळ वाटप अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जिजाऊ तसंच विवेकानंदांना आदरांजली वाहण्यात आली. मराठवाड्यात सर्वत्र विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जिजाऊ तसंच विवेकानंदांना अभिवादन करण्यात आलं ***** अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष तथा योगेश्वरी देवल समितीचे विश्वस्त बालासाहेब लोमटे यांचं काल सकाळी लातूर इथं निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना गुरुवारी लातूर इथं खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं होतं, काल सकाळी उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर काल अंबाजोगाई इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. **** ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. श्रीराम गुंदेकर यांचं काल पहाटे लातूर इथं ह्रदयविकाराच्या तीव्र धक्यानं निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. गुंदेकर हे सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. लातूरच्या राजर्षि शाहू महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. **** हिंगोली जिल्ह्यात वसमत नांदेड रस्त्यावर उसाच्या ट्रक वर कार आदळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री हा अपघात झाला. हे तिघे जिंतूर तालुक्यातल्या आसेगाव इथले रहिवासी होते. **** अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपी वसंत कराड याला सात वर्ष सक्त मजुरी तसंच पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये ही घटना घडली होती. **** हिंगोली पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक श्रीरंग मार्कंड याला अडीच हजार रूपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहाथ पकडलं. रमाई घरकुल योजनेतील अनुदानाचा हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी मार्कंड याने ही लाच मागितली होती. **** लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्थानिक संस्था कर - एलबीटीचे दर पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. शासनानं १ नोव्हेंबर २०१२ पासून लागू झालेले कराचे दर कमी करावेत अशी विनंती व्यापारी महासंघाच्यावतीनं करण्यात आली होती. महानगरपालिकेनं त्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. *****
0 notes