#लिव्हरशी
Explore tagged Tumblr posts
Text
१-४ दरम्यान जाग येते? ही झोपेची नाही तर फॅटी लिव्हरशी संबंधित मोठी समस्या, आताच उपचार करा नाहीतर
१-४ दरम्यान जाग येते? ही झोपेची नाही तर फॅटी लिव्हरशी संबंधित मोठी समस्या, आताच उपचार करा नाहीतर
१-४ दरम्यान जाग येते? ही झोपेची नाही तर फॅटी लिव्हरशी संबंधित मोठी समस्या, आताच उपचार करा नाहीतर नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) हे यकृतामध्ये फॅटी पेशींशी संबंधित आहे. ज्यामुळे लोकांवर वेगवेगळ्या प्रमाणात परिणाम होतो. जेव्हा या पेशी शरीरात विषारी पदार्थ तयार करतात आणि अवयव योग्यरित्या कार्य करण्यास प्रतिबंध करतात तेव्हा अनेक समस्या उद्भवतात. त्याकडे दुर्लक्ष केल्याने, हे नुकसान…
View On WordPress
#“..तर#१-४#आताच#उपचार#करा#जाग#झोपेची#दरम्यान#नाही#नाहीतर#फॅटी#महिला#मोठी#येते?#लिव्हरशी#विशेष#संबंधित#समस्या#ही
0 notes
Text
किडनीफेल्युअरची कारणे आणि आयुर्वेद उपचार : भाग १
मार्च महिन्यात जागतिक किडनीदिन साजरा केला जातो, उद्देश किडनीविकारांबाबत जनजागृती असा आहे. एकेकाळी तुरळक आढळणारे किडनी फेल्युअरचे रुग्ण आता सर्रास आढळतात, इतके की, अश्या रुग्णांसाठी शासकीय योजनासुद्धा अस्तित्वात येऊन काळ लोटला. आज जे या आजाराने त्रस्त आहेत त्यांना हा आजार अल्पावधीत निर्माण झालेला नाही, या लोकांची गेल्या १५ ते २० वर्षांची जीवनशैली लक्षात घेतली तर आपल्याला या आजाराची लहान मोठ्या सर्व कारणांची यादी करता येईल, ही यादी म्हणजे मारुतीची शेपटी ठरावी इतक्या चुका आपण नियमित करीत आहोत मात्र पुढीलप्रमाणे काही ठळक चुका रुग्णांना या आजाराकडे नेत असल्याचे दिसते आहे.
आपल्या पचनशक्तीचा विचार न करता खाणे, भूक नसताना चवीचे म्हणून जड पदार्थ खाणे, दिवसा कामात होतो आणि जेवायला वेळ नव्हता आणि शरीराला पोषण हवे म्हणून रात्री उशिरा पोट तुडुंब भरेस्तोवर जेवणे, प्रोसेस्ड मांसाहारी पदार्थांचा नियमित उपयोग करणे (मॅकडोनाल्ड सोयीचे म्हणून घरी केलेले ताजे अन्न न खाता बाहेरचे कृत्रिमरीत्या टिकवलेल्या पदार्थांचा नियमित उपयोग करणे.
हेल्थ फंडे या मथळ्याखाली प्रसिद्ध होणाऱ्या उपायांचा उदा. सकाळी लिंबू-पाणी-मध पिणे, रोज ग्लासभर ताक पिणे, रोज बाऊल भरून कोशिंबीर खाणे, डिटॉक्सच्या नावाखाली दिवसच्या दिवस फक्त लिंबूपाणी अथवा फळांवर राहणे यासारख्या उपायांचा आपल्या वैद्यांशी सल्लामसलत न करता अवलंब करणे.
व्यायाम न करणे, नित्य कार्यमग्न राहून व्यायामासारख्या अत्यंत आवश्यक आरोग्यरक्षक सवयीपासून दूर राहणे, वेळ असताना देखील त्या वेळेचा योगासने, ध्यान-धारणा इ. आरोग्यपूर्ण कृतींसाठी वेळ न देता कमी महत्वाच्या आणि पर्यायाने नुकसान करणाऱ्या सोशल मिडिया, ऑनलाईन गेम्ससारख्या निरर्थक बाबीत वेळ दवडणे.
अनियंत्रित किंवा औषधी घेऊन आणि विशेषतः पथ्य न पाळता केवळ तपासण्यांच्या पातळीवर नियंत्रित केलेले मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लिव्हरशी संबंधित आजार, संधिवात इ. आजार.
दिवसा झोपणे ( सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणत्याही वेळेत झोपणे हे दिवसा झोपणे या प्रकारात मोडते)
किरकोळ अथवा नियमि�� दुखण्यासाठी पूर्वी कधीतरी डॉक्टरांनी लिहून दिलेली आणि फरक पडला होता म्हणून पाठ केलेली औषधे, अथवा स्वतःच्या मनाने तात्काळ अँटॅसीड (अॅसीडीटी कमी करणारी औषधे), अँटिबायोटिक्स, वेदनाशामक औषधी यांचा नियमित वापर करणे.
आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम मग तो परिणाम सकारात्मक असो की नकारात्मक, करण्याची मोठी शक्ती काही छोट्या छोट्या कृतींमध्ये असते. वारंवार घडणारी ही कृती च तर पुढे सवयींमध्ये रुपांतरीत होत जाते. आज तुम्ही आरोग्याच्या अथवा अनारोग्याच्या वळणावर असाल त्याचे सर्वात मोठे श्रेय या जीर्ण कृतीरुपी सवयींनाच तर जाते. उदाहरणार्थ मांसाहारी किंवा तत्सम पचायला जड आहार शरीर पचवू शकत नसल्याच्या अवस्थेतही अश्या आहाराचे सेवन करत राहण्याचा परिणाम म्हणून झालेला गुदार्श म्हणजे पाईल्स सारखा आजार ! वरील उदाहरणाच्या धर्तीवर आज मृत्युचे सर्वात मोठे कारण असणारे विविध आजार जसे की, मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर, फुफ्फुसांचे विकार इत्यादी आजारांचे महत्वाचे कारण आपल्या सवयींमध्येच तर दडले आहे.
ग्रहण केलेल्या आहाराचे शरीर धातूंमध्ये परिवर्तन करणाऱ्या बाबींमध्ये ज्याप्रमाणे अग्नी ( पाचक अग्नी आणि धात्वाग्नी ), वायु, क्लेद, स्नेह आवश्यक असते त्याप्रमाणे आहाराचे परिणमन करण्यास आवश्यक असलेला काल हा अतिशय महत्वाचा घटक दुर्लक्षित आहे. खाल्लेल्या आहाराचे योग्य ते पचन पूर्ण होण्यास लागणारा काळ पाळल्याने अनेक विकार रोखण्यात मद��� होते, पचनावर विनाकारण येणारा ताण एवढ्या साध्या पथ्यानेसुद्धा सहज टाळता येण्यासारखा आहे.
आयुर्वेद मुत्रवह संस्था ( किडनी व संबंधित इतर अवयव समूह ), मस्तिष्क आणि हृदय या तीन अवयवांना अत्यंत महत्वाचे म्हणून विषद करतो. या तीन अवयावांना उद्भवलेला व्याधी हा प्राणाचे हरण करू शकतो असेही स्पष्ट विवेचन आहे. आज या विषयावर मुद्दाम लेखन करण्याचे कारण हे की, या तीन अवयवांच्या बिघाडामुळे जीवन धोक्यात येण्याचे प्रमाण अतिशय प्रचंड आहे. शिवाय मधुमेहासारख्या आजाराच्या उपद्रव स्वरूपातही मोठा धोका ह्या तीन अवयव व त्यांच्या कार्यक्षेत्रास आहे. त्यामुळेच आज या अवयवांच्या आजाराचे प्रमाण मोठे आहे.
अश्यातच अमेरिकेने काही विशिष्ट प्रोसेस्ड खाद्यपदार्थ आणि प्रिझर्व्हेटीव्ह यांच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घोषित केला आहे कारण, या पदार्थांमुळे किडनी फेल्युअर आणि कर्करोग होतो हे सत्य त्यांनी मान्य केले आहे. आपल्याकडे मात्र पाश्चात्य जीवनशैलीचा स्वीकार उत्तरोत्तर अधिकाधिक वाढत आहे. विचारांनी पुढारलेले असणे म्हणजे आपल्या नैसर्गिक सवयींशी फारकत घेणे असे नाही हे आपल्याला समजून घ्यावे लागेल अन्यथा जीवनशैलीशी संबंधित आजारांची त्सुनामी फार दूर नाही. आज आम्ही वैद्य मंडळी उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि किडनी फेल्युअर असे सर्व आजार एकाच रुग्णामध्ये पाहतो आहोत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
आपल्या स्वास्थ्याचे रक्षण आणि आजारांचे नियोजन वेळेत केलेले कधीही चांगले, आपली गाडी खटारा करून नंतर मेंटेन करण्याची धडपड करण्यासारखे केविलवाणे प्रयत्न कृपया करायला जाऊ नका ! आयुर्वेदाला अनेकदा पर्यायी उपचारपद्धती म्हणून उल्लेखले जाते. मात्र ही उपचारपद्धती पर्यायी नसून मुख्य उपचारपद्धती आहे. जे आधुनिक वैद्यक शास्त्र पदोपदी अडखळत, दररोज आधीच्या दिवसापेक्षा ३६० अंश वेगळे संशोधन पुढे आणत आहे त्या वैद्यक शास्त्राच्या तुलनेत हजारो वर्षांपूर्वी मांडलेले आयुर्वेदीय सिद्धांत आजही काळाच्या कसोटीवर आपले सोने बावनकशी असल्याचे सिद्ध करत आहे. आयुर्वेदीय चिकित्सा आपल्या आरोग्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला नक्की मदत करु शकतात, कसे ते पुढील भागात समजून घेऊया, तोपर्यंत मात्र आपल्या वैद्यांचा सल्ला घेऊन आरोग्य परत मिळविण्याच्या दिशेने अग्रेसर होऊया !
वैद्य ज्योती प्रल्हाद कस्तुरे
एम. डी. आयुर्वेद
छत्रपती संभाजीनगर
मो. 9049603419
1 note
·
View note
Text
या वनस्पतीच्या फक्त दोन काड्या कुठे भेटल्या तर घेऊन आणी अश्या वापरा जे चमत्कारिक फायदे होतील ते वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरखेल असे फायदे !
या वनस्पतीच्या फक्त दोन काड्या कुठे भेटल्या तर घेऊन आणी अश्या वापरा जे चमत्कारिक फायदे होतील ते वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरखेल असे फायदे !
मित्रांनो आपल्याकडे गणपती पूजनाच्या साहित्यामध्ये दुर्वांचा समावेश अतिशय महत्वाचा आहे. दुर्वांना आयुर्वेदामध्ये महाऔषधीचे स्थान दिले गेले आहे. अनेक पौष्टिक आणि औषधी गुणांनी युक्त दुर्वांचा उपयोग हिंदू धर्मामध्ये पूजा पाठासाठी तर होतोच, पण त्याशिवाय या दिव्य औषधीमध्ये यौनरोग, लिव्हरशी निगडीत आजार, बद्धकोष्ठ या व्याधी बऱ्या करण्याची क्षमता आहे. आयुर्वेदाप्रमाणे दुर्वांची मुळे, देठ आणि पाने या…
View On WordPress
0 notes