#दरम्यान
Explore tagged Tumblr posts
kvksagroli · 7 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
हंगामी फळांवर प्रक्रिया केल्यास नासाडी थांबेल तसेच उद्योग व्यवसायास चालना मिळेल.. फळांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थांची निर्मिती करता येते. यामुळे फळांची नासाडी तर थांबतेच सोबतच प्रक्रियाउद्योग देखील सुरू होतात. यामुळे नवयुवक व महिलांना उद्योगाच्या संधी उपलब्ध होतील. सध्याच्या हंगामामध्ये लिंबू व लिंबूवर्गीय फळांचे दर कमी असतात व उत्पादन जास्त असते. यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करावे आणि विविध टिकाऊ पदार्थ तयार करावेत. याच उद्देशाने संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, उद्यामिता लार्निंग सेंटर येथे women first कार्यक्रमांतर्गत लिंबू प्रक्रिया या विषयावर दि. 29 ते 31 जुलै 2024 या कालावधीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणा दरम्यान लिंबापासून विविध प्रकारची लोणची , स्क्वॉश व इतर पदार्थ प्रात्यक्षिक स्वरूपात शिकवण्यात आले. तसेच प्रक्रिया उद्योग उभारणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, पदार्थाची पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग व कायदेशीर इतर बाबी या सर्वांची सविस्तर माहिती डॉ माधुरी रेवणवार यांनी दिली. या प्रशिक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महिला व युवक यांनी सहभाग नोंद��ला. #agriculture #skills #valueaddition #womensupportingwomen #womeninbusiness #KrishiVigyanKendra #sagroli #nanded #FoodProcessingIndustries
2 notes · View notes
airnews-arngbad · 10 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
राज्य सरकारच्या पाचशे सेवा व्हाटस्अपवर उपलब्ध करून देणार-मुख्यमंत्र्यांची घोषणा
लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
विभागीय आयुक्त कार्यालयाअंतर्गत 'एक दिवस गावकऱ्यांसोबत' उपक्रमाला प्रारंभ
आणि
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आजपासून बालकांची सर्वांगीण तपासणी
****
राज्य सरकारच्या विविध पाचशे सेवा व्हाटस्अपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल मुंबईत, मुंबई टेक विक २०२५ मध्ये गव्हर्निंग द फ्युचर : एआय अँड पब्लिक पॉलिसी या विषयावर ते बोलत होते. ग्रामीण भागातले नागरिक मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअपचा वापर करतात, त्यामुळे सरकारी सेवा उपलब्ध करुन देत सेवांचं एका अर्थाने लोकशाहीकरण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले,
‘‘व्हॉटस्‌ॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉटस्‌अपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील. मागच्या काळामध्ये मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉटस्‌ॲपवर आणलं, आमच्या असं लक्षात आलं की पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकं व्हॉटस्‌ॲप वर तिकीट खरेदी करतायत. आणि म्हणूनच व्हॉटस्‌ॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. पाचशे सर्विसेस यापुढे व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातनं अव्हेल करता येतील.’’
एनपीसीआय या जगातल्या सर्वात मोठ्या युपीआय पेमेंट गेटवे कंपनीचं जागतिक मुख्यालय मुंबईत सुरु करण्यासाठी आवश्यक जमीन कंपनीला हस्तांतरीत केली जाणार असून, यासंबंधीची कागदपत्रं कंपनीला सोपवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
गोरगरीब, कष्टकरी महिलांसाठी सुरु करण्यात आलेली लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही अशी ग्वाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. परभणी इथे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश आणि जाहीर सभेत काल ते बोलत होते. येत्या १० तारखेला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थ संकल्पात परभणीच्या विकासासाठी प्रश्न मांडणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. या जाहीर सभेत अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यात श्रीक्षेत्र उमरज इथल्या प्राचीन श्री संत नामदेव महाराज संस्थान मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त पवार यांनी काल या मंदिराला भेट दिली, संतांच्या शिकवणीतून सर्वधर्मसमभावाचा मंत्र बुलंद व्हावा, याठिकाणचा आध्यात्मिक सोहळा सामाजिक एकोप्याची नांदी ठरावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. संस्थानच्या प्रलंबित मागण्यां पूर्ण करण्याचं आश्वासन पवार यांनी यावेळी दिलं.
****
राज्यात एक हजार ६६० पेट्रोल पंपांच्या रखडलेल्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात 'एक खिडकी' सुरू करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. हे पंप सुरू झाल्यानंतर सुमारे ३० हजारांवर तरुणांना रोजगार मिळेल, राज्यात साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयाअंतर्गत 'एक दिवस गावकऱ्यांसोबत' या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा काल, फुलंब्री तालुक्यातल्या किनगाव या आदर्श गावातून शुभारंभ करण्यात आला. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यावेळी उपस्थित होते. शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहोचवणं तसंच शासकीय योजनेबाबत माहिती देणं या उद्देशानं हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मराठवाड्यातल्या ७६ गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
****
मराठवाड्यातल्या विविध प्रकल्पामधून उन्हाळी हंगामासाठीची पाण्याची आवर्तनं देण्यासंदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत काल झाली. आवर्तनं सोडताना शेतकऱ्यांची अडचण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश विखे पाटील यांनी ��िले.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीदरम्यान, ते के. पी. बी. हिंदुजा महाविद्यालयाच्या वार्षिक दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
****
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आजपासून सुरु होत आहे. याअंतर्गत शून्य ते १८ वयोगटातल्या मुलांची सर्वागीण शारीरिक आरोग्य तपासणी, विनामूल्य शस्त्रक्रिया, करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर:
‘‘एक मार्चपासून आपल्या जवळपास सर्व शाळांमध्ये तसेच सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये आरोग्य विभागामार्फत शुन्य ते अठरा वर्षे वयोगटातील सर्व बालकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये बालकांची वाढ असेल, किंवा बालकांना होणारे सर्वसामान्य आजार असतील, किंवा काही दुर्धर आजार असतील, जसे हार्ट डिसीज्‌ असतील, अशा सर्व बालकांची तपासणी केली जाणार आहे. त्याच्यामध्ये त्यांना लागणारे उपचार आहेत, तात्काळ तिथे दिले जाणार आहेत. काही बालकांना संदर्भ सेवा देण्याची आवश्यकता असेल तशी संदर्भसेवा दिली जाणार आहे.’’
****
अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीला देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे. काल परभणी इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचं यावेळी गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
****
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात काल एकाच दिवशी ८० हजार घरकुलांचं भूमिपूजन करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्याने विक्रम प्रस्थापित केला आहे.
****
धाराशिव शहरालगत असलेलं हातलाई मंदिर परिसर, तलाव आणि धाराशिव लेणी यांचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील ���ांनी काल धाराशिव इथं बैठक घेतली. पर्यटन जनजागृती संस्था तसच धाराशिव शहरातील पर्यटन प्रेमी या बैठकीला उपस्थित होते.
****
जालना इथं महिला बचत गटांसाठीच्या जानकी महोत्सवाचं आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. महिला बचत गटांसाठी स्वतंत्र बँक असावी, अशी अपेक्षा खोतकर यांनी यावेळी व्यक्त केली.
****
वारकरी संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी, अशी अपेक्षा पंडित यादवराज फड यांनी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यात श्रीक्षेत्र चाकरवाडी इथं काल १७ वं अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन घेण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या संमेलनात राज्यातल्या संगीत क्षेत्रातले अनेक कलाकार सहभागी झाले होते.
****
महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात करवाई करण्यासाठी राज्य सरकार लवकरच कायद्यात बदल करणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली. ते काल लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. काही जण केवळ प्रसिद्धीसाठी महापुरुषांवर वक्तव्य करत असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
****
काँग्रेसचे तुळजापूर इथले ज्येष्ठ नेते अशोक मगर यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल तुळजापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली इथं आदिवासी युवक कल्याण संघाने काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. रखडलेली पदभरती तात्काळ सुरू करावी, या आणि इतर मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या मोरेवाडी इथं मृद आणि जलसंधारण विभागांतर्गत बांधण्यात आलल्या साठवण तलावाचं आमदार सुरेश धस यांच्या हस्ते काल भूमिपूजन झालं. या तलावामुळे परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याचं, धस यांनी म्हटलं आहे.
****
वृद्धापकाळाशी संबंधित व्याधींच्या उपचारासाठी धाराशिव इथल्या शासकीय आयुर्वेद रुग्णालयात विशेष जेरियाट्रिक ओपीडी सुरू आहे, २३६ हून अधिक वृद्ध रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहर विद्रूप करणाऱ्यांवर आजपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. विद्रुपीकरणाच्या ५२ प्रकारांत ५०० ते २५ हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या क्षेत्र मढी इथे काल सायंकाळी होलिका दहन करण्यात आलं. १५ दिवस अगोदरच होळीचा सण साजरा करणारं मढी हे देशातील एकमेव गाव असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड आकाशवाणी केंद्रात कार्यरत वरिष्ठ उद्‌घोषक गणेश धोबे काल सेवानिवृत्त झाले. आकाशवाणी नांदेड इथं त्यांना छोटेखानी समारांभात काल निरोप देव्यात आला.
****
आईसीसी चैंपियन्‍स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथला ऑस्ट्रेलिया आणि अफगानिस्तान दरम्यानचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. यासोबतच ऑस्ट्रेलिया ने ब गटातून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
****
0 notes
nagarchaufer · 7 days ago
Text
शिवजयंती मिरवणुकीत लॉरेन्स बिश्नोई याचे फोटो नाचवले ,  नगरमध्ये एकावर गुन्हा दाखल 
नगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी पोलिसांनी विविध मंडळाचे अध्यक्ष आणि डीजे चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून याच मिरवणुकीत महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याच्यासोबत लॉरेन्स बिश्नोई याचेही फोटो आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत नाचवण्यात आले होते.  भारतीय नागरिक संहिता कलम 323 अंतर्गत कोतवाली पोलिसात…
0 notes
news-34 · 13 days ago
Text
0 notes
krantinewsin · 29 days ago
Text
तेर येथील जिप उर्दू शाळेत उद्या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन, सहभागी होण्याचे मुख्याध्यापक शहा तय्यबअली महेबुब यांचे आहवान
तेर प्रतिनिधी :- विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा तसेच प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी तेर ता धाराशिव येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेत शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या मेळाव्याचे गट शिक्षणाधिकारी हाजी…
0 notes
khabar24 · 1 month ago
Text
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार येथे “स्वामित्व योजना” सनद वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न
केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार येथे “स्वामित्व योजना” सनद वितरण कार्यक्रम पार पडला. या विशेष प्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंचायतीराज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते ऑनलाइन स्वरूपात मालमत्ता कार्डाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वामित्व योजनेच्या लाभार्थी मनोहर मेवाडा (मध्य प्रदेश), रचना…
0 notes
mazhibatmi · 1 month ago
Text
Champions Trophy 2025 Indian Team: 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील महिन्यात म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाईल ज्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय ��्रिकेट संघ 20 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला मोहीम सुरू करेल. टीम इंडियाला बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसह ग्रुप अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. टीम इंडियाचा पहिला सामना दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध होईल. यानंतर टीम इंडियाचा सामना 23 फेब्रुवारी रोजी गतविजेत्या पाकिस्तानशी होईल. हा शानदार सामना दुबईमध्येही खेळला जाईल. भारतीय संघ 2 मार्च रोजी दुबई येथे न्यूझीलंडविरुद्ध गटातील तिसरा आणि शेवटचा सामना खेळेल.
0 notes
darshanpolicetime1 · 2 months ago
Text
सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई - महासंवाद
मुंबई, दि. 4: सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ आज दुपारी 4 च्या दरम्यान दोन युवक निष्काळजी व भरधाव वेगाने हुल्लडबाजी (कार रेसिंग) करत वाहने चालविताना आढळून आले आहे. यामधील वाहन क्रमांक एम. एच 12 एफ वाय 7263 या वाहनाचा सागरी किनारा रस्त्याचे भिंतीला धडकून अपघात झाला. या वाहन चालकावर मलबार हिल पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र मोटार वाहन विभागाकडून एम एच 12 एफ वाय 7263…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hindu-news · 2 years ago
Text
Fraud Case in Pune : दामदुपटीला पोलीसही पडले बळी; गुन्हे दाखल होऊनही अविनाश राठोड सापडेना
Pune Scam News : 'बार्शीच्या विशाल फटे'ची आठवण करून देणारे पुण्यात राठोड प्रकरण
Tumblr media
पुण्यात शेकडो लोकांना गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपायांचा गंडा घातल्याचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीनुसार चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तर आर्थिक गुन्हे शाखेकडे शंभरहून अधिक नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत. त्यात काही पोलिसांचाही समावेश असल्या��ी माहिती आहे. दरम्यान, दामदुप्पटीचे आमिष दाखवून पोलिसांनाही गंडा घालणारा बाणेर रस्त्यावरील एपीएस वेल्थ व्हेंचर एलएलपी या कंपनीचा संचालक पत्नीसह फरार आहे.
Tumblr media
या प्रकरणी बाणेर (Pune Crime) रस्त्यावरील एपीएस वेल्थ व्हेंचर एलएलपी या कंपनीचा संचालक अविनाश अर्जुन ��ाठोड आणि त्याची पत्नी विशाखा अविनाश राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राठोडकडे गुंतवणूक करणाऱ्या सुमारे वीस पोलिसांसह शंभरहून अधिक नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
आरोपी अविनाश राठोड (Avinash Rathod) याची एपीएस वेल्थ व्हेंचर एलएलपी कंपनी पुण्यात २०११ पासून काम करीत आहे. दरम्यान त्याने गुंतवणूकदारांना दर महिन्याला मूळ रक्कमेतील पाच टक्के व पाच टक्के व्याज असा मिळून दरमहा दहा टक्के परतावा, तसेच २० महिन्यात दामदुप्पट देण्याचे आमिष दाखविले. त्याने लोकांना काही प्रमाणात परतावेही दिले. त्यातून विश्वास संपादन झाल्याने गेल्या ११ महिन्यात या कंपनीच्या माध्यमातून पुण्यासह राज्यातील अनेकांनी गुंतवणूक केल्याची माहिती आहे. या काळात जमा झालेली कोट्यवधींची रक्कम घेऊन आता राठोड फरार झाला आहे. या फसवणुकीला काही पोलिसही बळी पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Pune Police या गुंतवणूकदारांमध्ये डॉक्टर, अभियंते, पोलिसांसह अनेक श्रीमंत नागरिकांनी लाखो रुपायंची गुंतवणूक केली आहे. गेल्या ११ महिन्याने राठोडकडे सुमारे ७०० कोटींची रक्कम जमा झाल्याची माहिती आहे. ती रक्कम घेऊन तो फरार झाला आहे.
दरम्यान, बंद कार्यालय पाहून गुंतवणूकदारंनी राठोड आणि त्याची पत्नीला वारंवार फोन केले. फोनला प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांसह आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली.
या प्रकरणी चतुःश्रृगी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडे पोलिसांसह अनेक नागारिकांनी तक्रारी दिल्या आहे. मात्र पोलिसांना आठवड्यापासून फारर राठोड व त्याच्या पत्नीचा शोध घेता आला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 notes
imdnews1 · 2 months ago
Text
Weekly Weather: महाराष्ट्रात थंडीसह राज्यात पावसाची शक्यता
रविवारी (२९ डिसेंबर) ते बुधवार (१ जानेवारी) दरम्यान मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव राहील.
1 note · View note
svagrosolutions · 3 months ago
Text
वनस्पतींच्या आरोग्यासाठी मातीचे महत्त्व
मातीकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते, तरीही ती वनस्पतींच्या आरोग्य आणि वाढीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मातीचे महत्त्व समजून घेतल्याने त्याची महत्त्वाची कार्ये आणि त्याचा कृषी आणि परिसंस्थेवर होणारा परिणाम समजून घेण्यात मदत होऊ शकते.
वाढीसाठी पाया
एखाद्या इमारतीला जसा मजबूत पाया आ��श्यक असतो, त्याचप्रमाणे वनस्पतींना वाढण्यासाठी निरोगी मातीची गरज असते. माती वनस्पतींच्या मुळांना भौतिक आधार प्रदान करते, त्यांना सुरक्षितपणे अँकरिंग करते आणि त्यांना आवश्यक पोषक आणि पाण्याचा वापर करण्यास अनुमती देते. चांगली वायुवीजन असलेली सुव्यवस्थित माती मुळांच्या विकासास सुलभ करते, ज्यामुळे झाडे मजबूत वाढतात आणि पर्यावरणीय ताणांना प्रतिकार करतात.
पोषक जलाशय
नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारख्या महत्त्वाच्या पोषक घटकांची साठवण आणि सायकल चालवणारी माती वनस्पतींसाठी पॅन्ट्री म्हणून काम करते. हे पोषक घटक वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक आहेत, पानांच्या विकासापासून ते फळांच्या उत्पादनापर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम करतात. निरोगी माती सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असतात, ज्यामुळे पोषक तत्वांची उपलब्धता वाढते आणि विविध सूक्ष्मजीव समुदायाला प्रोत्साहन मिळते जे पोषक सायकलिंगमध्ये मदत करतात.
पाणी धारणा आणि निचरा
ओलावा टिकवून ठेवण्याची मातीची क्षमता वनस्पतींच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. USDA च्या मते, सेंद्रिय पदार्थात वाढ केल्याने पाणी धारणा क्षमता लक्षणीयरीत्या वाढू शकते. जेव्हा झाडे साठवलेल्या ओलाव्यावर अवलंबून असतात तेव्हा कोरड्या काळात हे विशेषतः महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त, निरोगी माती धूप रोखण्यास आणि अतिवृष्टी दरम्यान अतिरिक्त पाण्याचे व्यवस्थापन करण्यास मदत करते, ज्यामुळे पुराचा धोका कमी होतो.
जैविक क्रियाकलाप
मातीचे जैविक गुणधर्मही तितकेच महत्त्वाचे आहेत. एक निरोगी माती परिसंस्थेमध्ये सूक्ष्मजीव, बुरशी आणि कीटक असतात जे पोषक सायकलिंग आणि सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यास योगदान देतात. हे जीव वनस्पतींचे रोग आणि कीटकांना दडपण्यासाठी, वनस्पतींच्या आरोग्यास समर्थन देणारे संतुलित वातावरण तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
अन्न सुरक्षेवर परिणाम
अन्न उत्पादनासाठी निरोगी माती मूलभूत आहे. आपले सुमारे 95% अन्न वरच्या मातीतून येते, जे मानवी जीवन टिकवून ठेवण्यासाठी त्याचे महत्त्व अधोरेखित करते. जसजसे कृषी पद्धती विकसित होत जातात, तसतसे भविष्यातील पिढ्यांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मातीचे आरोग्य राखणे अधिकाधिक गंभीर बनते. शेवटी, आपल्या वनस्पतींचे आरोग्य मातीच्या गुणवत्तेशी गुंतागुंतीचे आहे. पीक रोटेशन, कमी कीटकनाशकांचा वापर आणि सेंद्रिय सुधारणा यांसारख्या शाश्वत पद्धतींद्वारे मातीच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, आम्ही लवचिक परिसंस्था वाढवू शकतो जी वनस्पतींच्या वाढीस आणि मानवी कल्याणास समर्थन देतात. मातीच्या आरोग्यासाठी गुंतवणूक करणे केवळ फायदेशीर नाही; शाश्वत भविष्यासाठी ते आवश्यक आहे.
0 notes
airnews-arngbad · 24 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
राज्य सरकारच्या ५०० सेवा व्हाटसअपच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांना मिळणार ५० टक्के सवलत
स्वारगेट बस स्थानकातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक
राष्ट्रीय विज्ञान दिन विविध कार्य��्रमांनी साजरा
आणि
रणजी करंडक स्पर्धेत विदर्भाची केरळवर आघाडी, तर-चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलियादरम्यान लढत
****
राज्य सरकारच्या पाचशे सेवा व्हाटसअपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही माहिती दिली. व्हाटसअप सेवांसाठी मेटा कंपनीसोबत करार करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई टेक वीक २०२५ मध्ये गव्हर्निंग द फ्युचर : एआय अँड पब्लिक पॉलिसी या विषयावर मुख्यमंत्र्यांनी आपले विचार मांडले. ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या प्रमाणावर व्हाटस अपचा वापर करतात. त्यामुळे सरकारी सेवा उपलब्ध करुन देत सेवांचे एका अर्थाने लोकशाहीकरण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
व्हॉटस्‌ॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉटस्‌अपच्या माध्यमातनं आपल्याला मिळू शकतील. मागच्या काळामध्ये मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉटस्‌ॲपवर आणलं, आमच्या लक्षात आलं की पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकं व्हॉटस्‌ॲप वर तिकीट खरेदी करतायत. आणि म्हणूनच व्हॉटस्‌ॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. पाचशे सर्विसेस यापुढे लोकांना व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातनं अव्हेल करता येतील.
एनपीसीआय या जगातील सर्वात मोठ्या युपीआय पेमेंट गेटवे कंपनीचं जागतिक मुख्यालय मुंबईत सुरु केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक जमीन कंपनीला हस्तांतरीत केले जाणार असून, यासंबंधीच��� कागदपत्रं आज कंपनीला सोपविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
एन पी सी आय ज्यांनी यु पी आय तयार केलेलं आहे, जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजीकल गेट वे, हा जो भारतामध्ये तयार झाला, ऐंशी देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे, अशा एन पी सी आय चं ग्लोबल हेड क्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्रं हँडओव्‍हर केलेले आहेत. मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाउंसमेंट आहे की एन पी सी आयचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत आहे.
****
आगामी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. १ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत एमटीडीसीकडून विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज ही माहिती दिली. एमटीडीसीनं महिलांसाठी समर्पित ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण अंमलात आणलं आहे.
****
पुणे लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला रात्री उशीरा पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा खटला जलद गती न्यायालयात चालवला जाईल, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. शिरुर तालुक्यातील गुणाट गावात आरोपी दत्ता गाडे याला पकडण्यास मदत करणाऱ्या गावकऱ्यांचे आयुक्तांनी आभार मानले.
यामध्ये स्पेशल काऊंसिलरची नियुक्ती होणार आहे. आणि फास्ट ट्रॅकमध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होईल यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. ड्रोनच्या सहाय्याने दिशा जी दिसून आली, त्याच्या अनुषंगाने त्याला अटक करण्यात आली. फाय��ल ज्यांचे ट्रीगर इन्फॉर्मेशन होती, त्यांना एक लाखाचे बक्षीस देणार आहे.
दरम्यान, याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत असल्याचं अध्यक्ष रुपाली पाटील चाकणकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राज्य महिला आयोगाची आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन, पोलीस, शहर वाहतूक संचालक आणि आगार प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
****
राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा करण्यात आला. प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी ‘रामन इफेक्ट’ चा शोध लावल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विज्ञान आणि ज्ञान मिळून प्रत्येक समस्येचं निराकरण शक्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. मुंबई इथं आज TIFR, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात यानिमित्त विविध प्रयोग, प्रदर्शनं, प्रयोगांची प्रात्यक्षिकं, खेळ, कोडी, प्रश्नमंजूषा, अशा विविध सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगर इथं अनंत भालेराव विद्यामंदिरात माध्यमिक आणि प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची प्रात्यक्षिकं केली होती.
****
महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात करवाई करण्यासाठी राज्य सरकार लवकरच कायद्यात बदल करणार आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली आहे. ते आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. काही जण केवळ प्रसिद्धीसाठी महापुरुषांवर वक्तव्य करत असल्याचं, भोसले म्हणाले.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीदरम्यान, ते के. पी. बी. हिंदुजा महाविद्यालयाच्या वार्षिक दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या शेतकऱ्यांना धरणातील गाळ घेवून जाण्यासाठी अवनी अॅपच्या माध्यमातून प्रतीहेक्टरी १७ हजार रुपये अनुदान मिळणार आहे, त्यामुळे गाळमुक्त धरण योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असं आवाहन आमदार विजयसिंह पंडित यांनी केलं आहे. गेवराई इथं गाळमुक्त धरण योजनेच्या माहीतीसाठी आज चर्चा सत्र घेण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. गाळमुक्त धरण योजना अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी कृती आराखडा तयार करून अंतिम मान्यतेसाठी तातडीने पाठवण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केल्या.
****
धाराशिव शहरालगत असलेलं हातलाई मंदिर परिसर, तलाव आणि धाराशिव लेणी यांचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची आज धाराशिव इथं बैठक झाली. हातलाई परिसरातल्या तलावात लेझर शो तसच रंगीत कारंजे, नागरिकांसाठी वाकिंग ट्रॅक, बालकांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसासाठी आरोग्य विषयक सुविधांसह पर्यटन दृष्ट्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध सोयी सुविधा देण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी पर्यटन जनजागृती संस्था तसच धाराशिव शहरातील पर्यटन प्रेमींची उपस्थिती होती.
****
अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील प���रत्येक पात्र व्यक्तीला देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केल्या. आज परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी गांधी यांच्या हस्ते आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं.
****
बीड जिल्हा रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रात ‘बालरोग तज्ञ परिचारिका’ अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज ही माहिती दिली. सध्या राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत २० विध्यार्थी क्षमता असलेला ‘पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक नर्सिंग’ हा अभ्यासक्रम केवळ मुंबई इथं जे.जे.रुग्णालय परिचर्या प्रक्षिशण केंद्रात उपलब्ध होता.
****
वारकरी संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी, अशी अपेक्षा पंडित यादवराज फड यांनी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यात श्रीक्षेत्र चाकरवाडी इथं १७ वं अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन घेण्यात आलं, यावेळी ते बोलत होते. दोन दिवसीय संमेलनात राज्यातील संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली.
****
नागपूर इथं सुरु असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, आज तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा केरळच्या पहिल्या डावात सर्वबाद ३४२ धावा झाल्या. विदर्भानं पहिल्या डावात ३७९ धावा केल्या आहेत, त्यामुळे विदर्भाला ३७ धावांची आघाडी मिळाली आहे.
****
चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजचा सामना होत आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या अफगाणिस्तान संघानं निर्धारीत ५० षटकांत सर्वबाद २७३ धावा केल्या आहेत. अफगाणिस्ताननं इंग्लंडचा पराभव केल्यानंतर ब गटात उपांत्यफेरीसाठी चूरस निर्माण झाली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूरचे ज्येष्ठ विधिज्ञ, स्वातंत्र्यसैनिक जयकृष्ण काशिनाथ भालेराव यांचं २६ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळानं निधन झालं. ��े ९६ वर्षांचे होते. नांदुर-मधमेश्वर प्रकल्पाच्या उभारणीसाठी त्यांनी पाटपाणी संघर्ष कृती समिती स्थापन करून मोठं जनआंदोलन उभारलं होतं. विनोबा भावेंची भूदान चळवळ आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वैजापूर नगर परिषदेचं उपाध्यक्षपद आणि वकील संघाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. दैनिक मराठवाडाचे संपादक, स्वातंत्र्यसेनानी दिवगंत अनंत भालेराव यांचे ते धाकटे बंधू होत.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या मोरेवाडी इथं मृद आणि जलसंधारण विभागांतर्गत बांधण्यात आलेल्या साठवण तलावाचं आज आमदार सुरेश धस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. मोरेवाडी ग्रामस्थांचा अनेक दिवसांचा प्रश्न मार्गी लागला असून, या तलावामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहीती यावेळी आमदार धस यांनी दिली.
****
महिला बचत गटांसाठी स्वतंत्र बँक असावी, अशी अपेक्षा जालना तालुक्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली. जालना शहरातल्या कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलात महिला बचत गटांसाठीच्या ��ानकी महोत्सवाच्या उद्‌घाटन प्रसंगी आज ते बोलत होते.
****
0 notes
nagarchaufer · 8 days ago
Text
नगरकरांसाठी खासदार निलेश लंके यांच्याकडून मोठी गुड न्यूज ,  शिरूरच्या पुढे गेल्यावर आता.. 
पुण्याला जाताना शिरूरच्या पुढे गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना गेल्या काही वर्षांपासून करावा लागत आहे. खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खराडी बायपास ते शिरूर असा 60 किलोमीटर अंतराचे तीन मजली उड्डाणपुलाचे काम एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे , अशी माहिती दिलेली आहे.  शिरूर ते पुणे दरम्यान वारंवार वाहतूक…
0 notes
news-34 · 2 months ago
Text
0 notes
sharpbharat · 3 months ago
Text
jamshedpur rural accident-बहरागोड़ा में बालू लदे ट्रैक्टर से टकराई कार, कार में सवार दो व्यक्ति सुरक्षित
बहरागोड़ा: बडशोल थाना क्षेत्र के गोहलामुड़ा चौक के समीप एनएच-49 पर रविवार को जमशेदपुर से खड़गपुर की ओर जा रही एक्सयूवी कार असंतुलित होकर बालू लदे ट्रैक्टर में टकरा गई. घटना के बारे में मिली जानकारी के अनुसार महिंद्रा एक्सयुवी कार संख्या डब्ल्यूबी 58 बीके 2546 तेज गति से जमशेदपुर से खड़���पुर की ओर जा रही थी. (नीचे भी पढे) उसी दरम्यान अचानक से पीछे का टायर ब्लास्ट हो गया. इससे कार असंतुलित होकर आगे…
0 notes
khabar24 · 2 months ago
Text
बलसाड ते दानापुर आणि वापी ते गया दरम्यान कुंभमेळा साठी रेल्वे विशेष गाड्या चालवणार
प्रयागराज येथे दि. १३ जानेवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणाऱ्या कुंभमेळा २०२५ दरम्यान प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीची सोय करण्यासाठी रेल्वे बलसाड ते दानापुर आणि वापी ते गया दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे. या विशेष गाड्यांचे तपशील पुढीलप्रमाणे :-१) बलसाड ते दानापुर कुंभमेळा विशेष (१४ सेवा)गाडी क्रमांक ०९०१९ (बलसाड – दानापुर) –बलसाड ��ेथून दि. १७.०१.२५, २१.०१.२५, २५.०१.२५, ०८.०२.२५,…
0 notes