#राजू कारेमोरे
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज पोहरादेवी इथल्या जगदंबा माता मंदिरात त्यांनी आरती करुन संत सेवालाल महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा वारसा संग्रहालयाचं पंतप्रधानांनी उद्घघाटन करुन पाहणी केली. वाशिम इथं २३ हजार ३०० कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचं उद्घघाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून हा कार्यक्रम सध्या सुरु आहे.
बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीला भेट देणारे नरेंद्र मोदी हे स्वतंत्र भारताचे पहिलेच पंतप्रधान असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. केंद्र शासनाच्या मदतीनं महाराष्ट्राची विकासाची गाडी वेगानं धावत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतल्याबद्दल १३ कोटी मराठी बांधवांच्या वतीनं पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
याप्रसंगी मंत्री संजय राठोड यांनी देशातील बंजारा समाजातल्या जातींना एका सूचित समाविष्ट करण्यात यावं, बंजारा भाषेचा संविधानाच्या आठव्या सुचित समावेश करावा अशी मागणी पंतप्रधानांकडे केली.
****
फसवे फोन कॉल्स करुन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागानं दूरसंचार सेवा पुरवठादारांच्या सहयोगासह एक प्रगत प्रणाली निर्माण केली आहे. फसवे आंतरराष्ट्रीय कॉल्स भारतीय दूरसंचार सेवेच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांना ओळखून रोखण्याच्या दृष्टीनं या प्रणालीची विशेष रचना करण्यात आली आहे. आतापर्यंत, देशातील सर्व चारही दूरसंचार सेवा पुरवठादारांनी ही यंत्रणा यशस्वीरित्या राबवली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देण्याच्या मागणीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. यासंदर्भातील अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देण्यात यावं, अशी मागणी सातत्यानं होत होती. चोंडी इथं झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा केली होती.
****
जम्मू-कश्मीरच्या कुपवाड़ा जिल्ह्याच्या गुगलधार परिसरात काल रात्री उशीरा दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीला निष्फळ ठरवत सुरक्षा दलांनी दोघांना ठार केलं. रात्री या परिसरात संशयित हालचाली लक्षात आल्यानंतर सुरक्षा दलानं तात्काळ ही कारवाई केली. या परिसरात अजूनही सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान, छत्तीसगड जिल्ह्यातल्या नारायणपूर इथं सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या ३१ वर गेली आहे. काल पोलिसांनी २८ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. यानंतर आज सकाळी तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले.
****
दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे आणि विघातक कृत्यातल्या सहभागाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं काल छापे टाकून छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातल्या तिघांना तर नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव मधल्या एकाला ताब्यात घेतलं. एनआयए आणि एटीएसनं काल रात्री राज्यात संयुक्त कारवाई केली. प्राथमिक माहितीनुसार, हे संशयीत जम्मू-कश्मीरमधल्या जिहादी दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत आणि ते देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते असा तपास यंत्रणांना संशय आहे.
****
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातून पहिल्या फेरीत ८०० भाविक रेल्वेने आज अयोध्येला रवाना झाले. आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, परीनय फुके यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत नांदेड इथून ज्येष्ठ नागरिकांना घेऊन पहिली रेल्वे येत्या १२ ऑक्टोबरला अयोध्येसाठी निघणार आहे. या प्रवाशांची यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. संबंधितांनी या यादीत आपल्या नावाची खात्री करुन घ्यावी, असं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केलं आहे.
****
0 notes
Text
राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक
राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक
तुमसर, दि.03 : शिवीगाळ करणे, तसेच मित्रांना पोलिसांकडून मारहाण व 50 लाखांची चोरी केल्याचा आरोप तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी पोलिसांवर लावला होता. या प्रकरणात त्यांना मोहाडी पोलिसांनी आज अटक झाली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलीस ठाण्यात कारेमोरे यांनी धिंगाणा घातला होता. पोलिसांना आ.कारोमोरे यांनी अश्लील शिवीगाळही केली होती. व्यापारी मित्रांना पोलिसांनी मारहाण करण्याचा अणि 50 लाखांची…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रवादीच्या आमदाराला राहत्या घरातून पोलिसांनी केली अटक, पोलिसांवर केला होता चोरीचा आरोप
राष्ट्रवादीच्या आमदाराला राहत्या घरातून पोलिसांनी केली अटक, पोलिसांवर केला होता चोरीचा आरोप
राष्ट्रवादीच्या आमदाराला राहत्या घरातून पोलिसांनी केली अटक, पोलिसांवर केला होता चोरीचा आरोप भंडारा : व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे भंडारा जिल्हाच्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यां वर ५० लाख चोरीचा आरोप लावीत, मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घातला होता. यानंतर आज राजू कारेमोरे यांनी पोलिसांनी अटक केली आहे.…
View On WordPress
0 notes
Text
न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आ.राजू कारेमोरे तुरंगाबाहेर
न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आ.राजू कारेमोरे तुरंगाबाहेर
भंडारा : मोहाडी पोलीस ठाण्यात घातलेल्या गोंधळाप्रकरणी अटक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर काल सकाळी त्यांची कारागृहातून सुटका झाली आहे. जामीन आधी मंजूर झाला असला तरी कागदोपत्री प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने आमदारांना रात्र तुरूंगात काढावी लागली होती. 21 डिसेंबर रोजी व्यापारी मित्रांची मदत करण्यासाठी गे��ेल्य��…
View On WordPress
0 notes
Text
पुलिस थाने में अश्लील गालीगलौच करने वाला विधायक जेल रवाना
पुलिस थाने में अश्लील गालीगलौच करने वाला विधायक जेल रवाना
भंडारा : भंडारा जिले के मोहाडी पुलिस थाने में हंगामा कर अश्लील गालीगलौच करने के प्रकरण में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक राजू कारेमोरे को 3 जनवरी की दोपहर 2 बजे भंडारा से गिरफ्तार कर लिया गया. विधायक के खिलाफ विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है. मोहाडी न्यायालय द्वारा 14 दिन की न्यायिक हिरासत में रखने के आदेश के बाद विधायक को भंडारा जिला कारागृह रवाना कर दिया गया है. 31 जनवरी को…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रवादीच्या आमदाराला राहत्या घरातून पोलिसांनी केली अटक, पोलिसांवर केला होता चोरीचा आरोप
राष्ट्रवादीच्या आमदाराला राहत्या घरातून पोलिसांनी केली अटक, पोलिसांवर केला होता चोरीचा आरोप
राष्ट्रवादीच्या आमदाराला राहत्या घरातून पोलिसांनी केली अटक, पोलिसांवर केला होता चोरीचा आरोप भंडारा : व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे भंडारा जिल्हाच्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यां वर ५० लाख चोरीचा आरोप लावीत, मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घातला होता. यानंतर आज राजू कारेमोरे यांनी पोलिसांनी अटक केली आहे.…
View On WordPress
0 notes