#येऊन
Explore tagged Tumblr posts
Text
गीतकार मंदार चोळकर म्हणतोय "लंडन मिसळ" खायला "एकदा येऊन तर बघा"
गेल्या 12-15 वर्षात मराठी चित्रपटसृष्टी ने पुन्हा एकदा दर्जा, प्रेक्षकांचं प्रेम आणि व्यावसायिक यश ह्या सर्व पातळ्यांवर सोन्याचे दिवस अनुभवायला सुरुवात केली आहे. आणि त्यातलं सातत्य कायम आहे. आणि त्यांची संख्या ही लक्षणीय आहे. अशा वेळी एका वर्षात 100 हून अधिक चित्रपट प्रदर्शित होणं हे नवीन नाही. त्यामुळे एका दिवशी दोन किंवा अधिक चित्रपट प्रदर्शित होणं यात काही नवीन नाही. जितकं जास्त काम वाढलंय…
View On WordPress
#Ekda Yeun Tar Bagha#EYTB Movie#London Misal#Mandar Cholkar#Manndar Cholkar#Manndar Cholkar London Misal and Ekda Yeun Tar Bagha#Namrata Sambherao#Onkar Bhojne#Prasad Khandekar#Ritika Shrotri#Rutuja Bagwe#एकदा येऊन तर बघा#गीतकार मंदार चोळकर म्हणतोय "लंडन मिसळ" खायला "एकदा येऊन तर बघा"#मंदार चोळकर#लंडन मिसळ
1 note
·
View note
Text
कशी ग तू अशी, केसात फुलं आणि डोळ्यात विश्व?
तुझ्यापासून दूर पाहता येत नाही, तुझ्याबद्दल विचार करायचा थांबता येत नाही. तुझे हे सौंदर्य असे की अप्सरा येऊन तुझ्या पाया पडतील आणि विचारतील: अशी कशी ग तू? एवढी भव्य कशी ग तू?
कशी ग तू अशी, केसात फुलं आणि डोळ्यात विश्व?
Translation:
How are you real, you with flowers in your hair and the universe in your eyes?
I cannot look away from you, I cannot stop thinking about you. Your beauty is such that even angels will sit at your feet and ask you: how are you real? How are you so magnificent?
How are you real, you with flowers in your hair and the universe in your eyes?
.
taglist: @musaafir-hun-yaaron @mad-who-ra @girlatreus @budugu @h0bg0blin-meat @yehsahihai @kanha-sakhi @orgasming-caterpillar @urmomw4ntsme
#marathi poetry#amrut's poetry#amrut writes#desiblr#desi aesthetic#desi tumblr#indian aesthetic#desi dark academia#desi academia#indian academia#desi tag#poems and quotes#original lyrics#original poetry#poetry#love poem#love poetry#poets on tumblr#original poem#poems and poetry#marathi#marathi poems#prose#love prose#prose writing#romance#romantic prose
110 notes
·
View notes
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले.
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.
हे सगळं ��घता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली.
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले.
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत नि��ाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती.
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत.
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
2 notes
·
View notes
Text
Pradip लाडात येऊन बायकोला विचारतो…)
Pradip : बेबी! कंजूस ला इंग्रजीत काय म्हणतात?
बायको : हसबंड!
😍😍😍🤣🤣🤣😅😅😅😀😀😀
0 notes
Text
(Bandya लाडात येऊन बायकोला विचारतो…)
Bandya : बेबी! कंजूस ला इंग्रजीत काय म्हणतात?
बायको : हसबंड!
😍😍😍🤣🤣🤣😅😅😅😀😀😀
0 notes
Text
धर्म प्रचारासमवेत शिक्षण व आरोग्य क्षेत्रात समाधा आश्रमाचे अमूल्य योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
नागपूर,दि.२१ : समाधा आश्रमाने सिंधी बांधवांना धर्माचे नैतिक अधिष्ठान दिले आहे. यासोबतच शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. आरोग्यासारख्या जनसेवेचा अनेक गोरगरिबांना लाभ होत आहे. भारताच्या फाळणीनंतर सिंधी समाजाने अनेक महानगरात येऊन आपल्या कर्तृत्त्वाच्या माध्यमातून भारताच्या समृध्दीसाठी दिलेले योगदान मोलाचे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. नागपूर…
View On WordPress
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ५०
अनंतच्या समजावण्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देतां शुभदा डबडबलेल्या डोळ्यांनी नुसतीच त्याच्याकडे बघत राहिली! तिची ती विकल अवस्था पाहून अनंतलाही भरून आलं. तिच्या शेजारी बसून तिचे हात हलकेच हातांत घेत तो म्हणाला, "इतकी वर्षं ठरवून निभावलेला निर्णय जयू-योगेशने सहज मनांत आलं म्हणून बदलला असेल असं खरंच तुला वाटतं कां? कुठल्या परिस्थितीत, कां त्यांनी असं केलं असेल ते जाणून घेऊन आपण त्यांच्यामागे उभं रहायला हवं ना? मग त्यासाठी मी योगेशने पाठवलेली मेल बघूं कां?" शुभदाने मूकपणे मान हलवली तशी अनंत चट्कन उठला आणि त्याने लॅप��ॉप चालूं केला. दोन मिनिटे लॅपटॉपशी झटापट केल्यावर त्याने शुभदाला विचारलं, " योगेशने भलीमोठी मेल पाठवली आहे;-- तूं पण येतेस कां ती वाचायला?" अपेक्षेप्रमाणे शुभदाने मानेनेच नकार दिल्यावर हायसं वाटून अनंत लॅपटॉपवर कांहीतरी लक्षपूर्वक वाचीत असल्याचा देखावा करीत असतांना त्याला मनोमन जयू आणि योगेशच्या मनकवडेपणाचं खुप कौतुक वाटत होतं! शुभदाची प्रतिक्रिया काय होईल याबद्दल त्या दोघांचा कयास किती अचूक ठरला होता! १०-१२ मिनिटांच्या अवधीनंतर खुंटा हलवून बळकट करण्यासाठी अनंतने पुन: विचारलं, " शुुभदा,तूं स्वत: वाचून बघणार आहेस कां मी सांगूं तुला योगेशने काय लिहिलं आहे?" "माझ्या अंगांत सगळं वाचून बघण्याचं त्राण नाहींये हो! तुम्हीच थोडक्यांत सांगा काय ते!" शुभदा थकलेल्या आवाजात म्हणाली. लॅपटॉप बंद करून अनंत शुभदापाशी येऊन बसला आणि म्हणाला, "योगेशने शेवटीं काय लिहिलं आहे ते आधी सांगतो! मगाशी बोलतांना जरी तो 'जयू स्वत: ही खुशखबर सांगायला लाजते आहे असं म्हणाला असला तरी प्रत्यक्षांत ती तुला सांगायला घाबरत होती' असं त्याचं म्हणणं आहे!" ते ऐकून त्याही परिस्थितीत शुभदाला हंसू आलं आणि ती उद्गारली, " जयू आणि योगेश, दोघंही बदमाष आहेत! असं घाबरण्याचं नाटक केलं की आई पाघळेल असं वाटलं होय दोघांना!" शुभदाचं अनपेक्षित हंसणं ऐकून अनंतला भरून आलेलं आभाळ, अचानक ढग पांगून उजळून निघावं तसं वाटलं! मोकळेपणाने श्वास घेत तो म्हणाला, "ती दोघं किती बदमाष आहेत ते मागाहून ठरवूं;-- पण त्यापूर्वी योगेशने काय लिहिलं आहे ते तर समजून घे!"
दुसर्या दिवशी सकाळी ६ च्या सुमारास गॅसवर चहाचं आधण ठेवतांना अनंत मनाशी विचार करीत होता की रात्री शुभदाला शांत झोप लागली असेल की नाहीं? तेवढ्यांत पाठीमागे खुर्ची सरकवल्याचा आवाज आला, म्हणून त्याने वळून पाहिलं तर शुभदा रोजच्यासारखी मुखमार्जन आटपून, डायनिंग टेबलाजवळ खुर्ची ओढून घेऊन बसत होती. नजरानजर होतांच सस्मित चेहर्याने ती म्हणाली, " अहो, असे भूत बघितल्यासारखे काय बघताय्? मीच आहे,-- शुभदा!" " हो, --तुला बघूनच चकित झालो आहे! कारण तुला रात्रभर शांत झोंप लागली असेल की नाहीं याची काळजी वाटत होती! पण तुझा चेहरा चांगली शांत झोप लागल्याप्रमाणे दिसतो आहे!" "थोडा वेळ लागला झोप लागायला;-- पण लागली ती मात्र निवांत! एकदम आत्तां आपोआप जाग आली, रोजच्या वेळेला!" "मनांतलं विचारांचं वादळ शांत झालं असेल तर उत्तमच!" दोघांचे चहाचे कप डायनिंग टेबलावर ठेवीत अनंत म्हणाला. "बेडवर पडल्या-पडल्या मी योगेशने मेलमधे केलेल्या खुलाशावर खुप वेळ विचार करीत होते! शेवटी योगेशच्या तज्ञ डाॅक्टर मित्राने त्या दोघांना जे सांगीतलं ते मलाही पटलं आणि मन एकदम शांत झालं! इतकी वर्षं नियमित काळजी घेत असतांनाही नकळत गफलत होऊन जयूला दिवस गेले असतील आणि झालेली गफलत ध्यानांत येण्यासाठीही मधे दीर्घ काळ गेला असेल तर 'ही परमेश्वराचीच योजना आहे असं समजून तिचा आतां आनंदाने स्वीकार करा' हा डाॅक्टरमित्राचा सल्ला मलाही पटला! मनांत आलं की गेली एवढी वर्षं मी ज्याची वाट बघत होते, ते स्वप्न आतां ऊशीराने कां होईना, प्रत्यक्षांत येत आहे तर मीही आनंदाने त्याचं स्वागत केलं पाहिजे!" "कसं माझ्या मनातलं बोललीस बघ!" शुभदाच्या त्या प्रांजल कबुलीवर अनंत हरखून म्हणाला, "योगेशने मेलमधे खुलासा करण्यापूर्वी त्याच्या तोंडून ही खुशखबर ऐकतांक्षणीं माझ्या मनांत हाच विचार आला होता! त्यामुळे तुझ्या अनपेक्षित चिडचिडीचं मला आश्चर्यच वाटलं होतं!" "मला वाटतं ती चिडचिड म्हणजे 'इतकी वर्षं जयू आणि योगेशने कां वायां घालवली?' या वैफल्याचा उद्रेक होता!! पण परमेश्वराने ऊशीरा कां होईना, त्यांच्या झोळीत आपल्याला हव्या त्या सुखाचं माप टाकलं की!" शुभदा समाधानाने हंसत म्हणाली. "म्हणजे आतां योगेशचा फोन आला की त्याला दोन आठवड्यांनंतरची आपली तिकिटं बुक करायला सांगायची? तेवढा वेळ आपल्याला तयारीला सहज पुरेल! आपला व्हिसा आहेच आणि आपल्याला काय फक्त चार कपडे बरोबर न्यायचे आहेत!" "-- पण योगेशने कशाला तिकिटं बुक करायची?" शुभदाने घुटमळत विचारलं. "मलाही ते एरवी पटलं नसतं! पण मेलमधे योगेशने स्पष्ट बजावलं आहे की आजी-आजोबांचा या आनंदसोहळ्यासाठी जाण्या-येण्याचा खर्च तोच करणार! त्यामुळे यावेळी त्याच्या आनंदाला मला गालबोट लावायचं नाहींये!" "तसं असेल तर ठीक आहे! फक्त मनांत एक धाकधूक आहे: आतां साठीच्या उंबरठ्यावर जयूचं बाळंतपण निभावणं मला झेपेल ना?" "वेडीच आहेस तूं शुभदा!" अनंत मोकळेपणानं हंसत म्हणाला, "तुला थोडंच तिच�� बाळंतपण करायचं आहे? योगेशने काय लिहिलंय् ते विसरलीस कां? डाॅक्टरांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या करून गर्भाची वाढ उत्तम होत असल्याची हमी दिल्यावरही आपली जयू थोडी हबकली आहे, अस्वस्थही आहे;-- या विचाराने की वया���्या चाळिशीमधे, ऊशीरा आलेलं हे बाळंतपण नीट पार पडेल ना? त्यामुळे फक्त तिला मानसिक आधार वा बळ देण्यासाठी आपण जाणार आहोंत! शिवाय डिलिव्हरी झाल्यावर नवजात बाळाची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी आजी-आजोबांपेक्षा अधिक योग्य कोण असणार?" "आतां योगेशचा फोन येऊन गेल्यावर मी रजनीला केव्हां एकदा ही गोड बातमी सांगते असं झालंय मला! तसंच पमाताई आणि सप्रेमॅडमनासुद्धां ही गोड बातमी कळवायला हवी ना!" "रजनीला लगेच सांगायला हरकत नाहीं;-- पण पमाताई वा सप्रेमॅडमना फोनवर सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भेटूनच त्यांचं तोंड गोड करूयां!"
३ ऑगस्ट २०२३
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १६ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ-कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी • राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार-३३ कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री-मराठवाड्यातल्या सहा जणांचा समावेश • एक राष्ट्र एक निवडणूक या विषयी दोन विधेयकं आज लोकसभेत सादर करण्यात येणार • परभणी हिंसाचार प्रकरणातला आरोपी सोमनाथ सूर्यवंशी याचा उपचारादरम्यान मृत्यू आणि • बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात ४४५ धावांवर सर्वबाद
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर इथं सुरु होत आहे. या अधिवेशनात २० विधेयकांवर सदनात चर्चा होईल, यापैकी १४ अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्यांचं विधेयकात रुपांतर करण्यात येणार आहे. तर सहा नवीन विधेयकं मांडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून, राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असं फडणवीस यांनी सांगितलं. मंत्र्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळाबद्दल विचारलं असता, सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचं मूल्यांकन करणार असून, जे मंत्री योग्य काम करत नसल्याचं लक्षात येईल, त्यांच्याबद्दल पुनर्विचार केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले… “हम पर्फोमंस ऑडिट ये निश्चित रूप से हर मंत्री का करेंगे और पर्फोमंस ऑडिट मे जहां ये ध्यान मे आएगा की मंत्री उचित काम नही कर रहे हैं, उस समय उस मंत्री का पुनर्विचार किया जाएगा.’’ बीड जिल्ह्यातल्या घटनेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना, सर्वसामान्य जनता आणि राज्याच्या ��िकासासाठी काम करणार असल्याचं सांगितलं तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, विरोधकांचा योग्य सन्मान ठेवला जाईल, अशी ग्वाही दिली.
दरम्यान, अधिवेशनाच्या पूवर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली. बीडमध्ये सरपंचासह वर्षभरात ३२ हत्या प्रकरणं, परभणीतली अप्रिय घटना, या सगळ्या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींची समिती नेमून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी, या नेत्यांनी यावेळी केली. महायुती सरकारमधल्या घटक पक्षांनी निवडणुकीच्या काळामध्ये जी आश्वासनं शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना दिली, ती त्यांनी तातडीने पूर्ण करावी, अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी दानवे यांनी केली. ते म्हणाले: “तीन-तीन आठवड्यांचं एकेक महिन्यांचं होणारं अधिवेशन आता पाच दिवसांवर आणि सहा दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. आणि त्याच्यातच कोणत्याही प्रकारे लक्षवेधी नाही, प्रश्न उत्तरे नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि या स्थितीमध्ये भलेही छोटं अधिवेशन असेल पण एक विरोधी पक्ष म्हणून ताकदीने या सरकारच्या सगळ्या कारभाराला, स्थितीला विरोध करण्याचा निर्णय आम्ही सगळ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे.’’ विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदाबाबत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, याउलट अध्यक्षांनी परंपरा लक्षात घेता आघाडीच्या नेत्याला विरोधी पक्षनेते पद द्यावं, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल करण्यात आला. नागपूर इथं झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ३३ जणांना कॅबिनेट मंत्रिपदाची, तर सहा जणांना राज्यमंत्रिपदाची शपथ दिली. नव्या मंत्रिमंडळात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, अशोक उईके, आशिष शेलार, जयकुमार गोरे, संजय सावकारे, आकाश फुंडकर, यांच्यासह सर्वाधिक १९ मंत्री, शिवसेनेचे गुलाबराव पाटील, संजय राठोड, उदय सामंत, शंभुराज देसाई, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, यांच्यासह ११ मंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हसन मुश्रीफ, दत्ता भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद जाधव पाटील यांच्यासह नऊ मंत्र्यांचा समा��ेश आहे. भाजपच्या माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक, शिवसेनेचे योगेश कदम, तर अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांच्यासह सहा जणांना राज्य मंत्रिपदाची शपथ दिली. “नागपुरात सुमारे साडे तीन दशकांनंतर झालेल्या या शपथविधी सोहळ्यात काही माजी मंत्र्यांचं राजकीय पुनर्वसन आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले, पंकज भोयर, नितेश राणे अशा नवीन चेहऱ्यांचा समावेश, ही या मंत्रिमंडळ विस्ताराची वैशिष्ट्ये ठरली. मराठवाड्यातल्या सहा जणांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालं. गेल्या विधानसभा तसंच लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर विधान परिषदेवर गेलेल्या भाजपच्या पंकजा मुंडे, गेल्या सलग दोन मंत्रिमंडळात स्थान मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे आमदार धनंजय मुंडे छत्रपती संभाजीनगरमधल्या औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे या अनुभवी मंत्र्यांसह औरंगाबाद पश्चिमचं सलग चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणारे शिवसेन���चे आमदार संजय शिरसाट, जिंतूर विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झालेल्या मेघना बोर्डीकर साकोरे, आणि लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रिमंडळात प्रथमच स्थान मिळालं आहे.’’
एकूण चार महिला मंत्र्यांचा समावेश असलेल्या या या मंत्रिमंडळात गेल्या वेळी मंत्रिमंडळात असलेले भाजपचे रविंद्र चव्हाण, शिवसेनेचे तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना स्थान मिळालेलं नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा आश्वासनं दिली, तरीही मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला स्थान दिलं नसल्याने रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
एक राष्ट्र एक निवडणूक या विषयी दोन विधेयकं आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहेत. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक सादर करतील. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उच्च स्तरीय समितीनं लोकसभा आणि राज्यसभेसाठी देशात एक राष्ट्र एक निवडणूक हा प्रस्ताव मांडला होता. दरम्यान, राज्यसभेत आज आणि उद्या संविधानावर विशेष चर्चा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमातून नागरीकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११७वा भाग असेल.
परभणी हिंसाचार प्रकरणातला आरोपी सोमनाथ सूर्यवंशी याचा काल जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड परिक्षेत्राचे उप पोलीस महासंचालक शहाजी उमाप यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात जमाव झाला होता, परभणी शहरासह पूर्णा शहरात तसंच जिल्हाभरात तणाव नि��्माण झाला असून, बाजारपेठ, बस सेवा बंद करण्यात आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी याचं शव विच्छेदन छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात करण्यात यावं, तसंच मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची मदत देऊन कुटुंबातल्या सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी, आमदार राहुल पाटील यांनी केली. जिल्हा रुग्णालयात पाहणीसाठी आल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात ४४५ धावांवर सर्वबाद झाला. जसप्रित बुमराहनं सहा, मोहम्मद सिराजनं दोन, तर नितीश कुमार रेड्डी आणि रविंद्र जडेजानं एक गडी बाद केला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या डावात एक बाद सहा धावा झाल्या होत्या.
गोव्यात पार पडलेल्या चौथ्या राष्ट्रीय ओपन तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या १५ खेळाडूंनी सुवर्ण पदक, एक रौप्य पदक आणि एक कांस्यपदक अशा १७ पदकांची कमाई केली. हे सर्व खेळाडू बीड जिल्हा क्रीडा संकुलातले डॉ. अविनाश बारगजे यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातले खेळाडू आहेत. देशभरातल्या ८०० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
राज्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. काल राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं सहा पूर्णांक चार दशांश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या दोन दिवसात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढत असून, काल सर्वाधिक निचांकी चार पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची काल सांगता झाली. तहसीलदार विलास तरंगे यांनी योगेश्वरी देवीची विधीवत होमहवन आणि महापूजा करून पूर्णाहुती दिली. त्यानंतर सायंकाळी श्री योगेश्वरी देवीची पालखी मिरवणूक अंबाजोगाई शहरातून काढण्यात आली. यावर्षी मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदीर परिसरात सलग नऊ दिवस पाच ते सहा हजार महिला आराध बसल्या होत्या.
0 notes
Text
दिलीप वळसे पाटलांनी टोचले ‘ त्या ‘ दोघांचे कान
दिलीप वळसे पाटलांनी टोचले ‘ त्या ‘ दोघांचे कान
महायुतीचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी इथे शरद पवार येऊन गेल्यानंतर काही तासांच्या आत ईव्हीएमच्या समर्थनार्थ भेट दिली त्यावेळी शरद पवार यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीत टीका केलेली होती त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील यांनी महायुतीच्या दोन्ही आमदारांचे कान टोचले आहेत. दिलीप वळसे पाटील हे यांनी मंचर येथे…
0 notes
Text
पूर्ण गुरु शिवाय ज्ञान समजू शकत नाही त्यामुळे गुरु कडून नाम दिक्षा घेऊन भक्ती केल्याने सर्व प्रकारचे लाभ होतात आधिक माहितीसाठी संत रामपाल जी महाराज यांचे अनमोल सत्संग अवश्य बघा आणि ज���ञान समजू घ्या रोज संध्याकाळी साधना चैनल वरती साडेसात वाजता
0 notes
Text
0 notes
Text
काल याने खूप अन्याय केला आहे, परमात्माच येऊन आपल्याला सदभक्ती देतात | Sa...
youtube
अवश्य ऐका हा शॉर्ट सत्संग: | Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
Text
youtube
के के वाघच्या 3000 विद्यार्थ्यांचा निसर्गस्नेही गणेशोत्सव 🌿💚
के के वाघ महाविद्यालयात 3000 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाडू मातीच्या गणपतींच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साकारला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या रक्षणाचा संदेश दिला. एकत्रितपणे निर्माण केलेल्या या सुंदर आणि सर्जनशील गणेशमूर्तींनी पर्यावरणस्नेही उत्सवाचा आदर्श घालून दिला आहे. चला, आपणही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया! 🌱🙏
0 notes
Text
Pradip आणि बायको स्कूटरवर चाललेले असतात…)
बायको : आहो! थांबा! थांबा!
(बायको स्कूटरवरून उतरून थोड्या अंतरावर पडलेली एक वस्तू उचलून बघते
आणि परत येऊन स्कूटरवर बसते.)
बायको : चला!
Pradip : काय झालं? काय होतं?
बायको : सोन्याची चेन होती.
Pradip : अगं! मग घेतली का नाही?
बायको : मला डिझाईन आवडलं नाही.
🤣🤣🤣😂😂😂😅😅😅😀😀😀
0 notes
Text
(Bandya आणि बायको स्कूटरवर चाललेले असतात…)
बायको : आहो! थांबा! थांबा!
(बायको स्कूटरवरून उतरून थोड्या अंतरावर पडलेली एक वस्तू उचलून बघते
आणि परत येऊन स्कूटरवर बसते.)
बायको : चला!
Bandya : काय झालं? काय होतं?
बायको : सोन्याची चेन होती.
Bandya : अगं! मग घेतली का नाही?
बायको : मला डिझाईन आवडलं नाही.
🤣🤣🤣😂😂😂😅😅😅😀😀😀
0 notes