#मैदानावर!
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 7 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 28 January 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २८ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
पूर्वोत्तर भारत देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या मेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जेव्हा जागतिक व्यापारात भारताचा मोठा वाटा होता, तेव्हा देशाच्या पूर्वेकडच्या भागाचं महत्त्वाचं योगदान होतं, असं सांगून पंतप्रधानांनी, ओडिशाशी व्यापारी संबंध मजबूत करण्यात आसियान देशांनी तयारी दर्शवली असल्याचं सांगितलं. ही परिषद प्रामुख्याने जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली आहे. ओडिशाला पुर्वोदय दृष्टीकोनाचं केंद्र तसंच भारताचं आघाडीचं गुंतवणूक स्थळ आणि औद्योगिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या उद्देशाने ओडिशा सरकारने या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेतून राज्याला पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यातल्या ११ शहरांमध्ये १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर मधल्या गोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत जवळपास १५ कोटी नागरीकांनी पवित्र संगमात स्नान केलं आहे. या मेळ्यात उद्या पौष महिन्यातल्या मौनी अमावस्येनिमित्त दुसरं शाही अमृत स्नान होणार आहे. यानिमित्त महाकुंभमेळा क्षेत्रात भाविकांचं आगमन सुरू आहे. ��ाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. सरकारने सात-स्तरीय सुरक्षा योजना लागू केली असून, महाकुंभ परिसराला नो-व्हीआयपी झोन घोषित करण्यात आलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. तसंच येणाऱ्या भाविक आणि यात्रेकरूंसाठी आरोग्य सेवांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
देशात लोहमार्गांच्या जाळ्यातील २३ हजार किलोमीटरहून अधिक मार्गांवरून ताशी १३० किलोमीटर वेगानं रेल्वेगाड्या धावू शकतील अशा पद्धतीनं या मार्गांचं आधुनिकीकरण करून भारतीय रेल्वेनं एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर ताशी ११० किलोमीटरपर्यंत वेगानं गाड्या नेण्यास पूरक ठरावेत या उद्देशानं ५४ हजार किलोमीटर मार्ग अद्ययावत करण्यात आल्याचं, भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आलं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. राज्यातून एक हजार ५६० विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले असून औरंगाबाद विभागातून १५६ विद्यार्थ्यांचा पात्रता यादीत समावेश आहे.
नांदेड इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत काल ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कल्याण मिनगिरे यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
बर्ड फ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, असा खुलासा नांदेडच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. यासंदर्भात एक चित्रफित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत या आजारासंदर्भात अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं, त्यांनी सांगितलं.
परभणी इथं हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हजरत शहा तुराबुल हक दर्ग्याचा ऊर्स दोन फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी काल याचा आढावा घेतला. १५ दिवस चालणार्या या उर्स मध्ये देशभरातून भाविक आणि व्य��पारी मोठ्या संख्येने येतात. या काळात कायदा आणि सुरक्षा अबाधित राहण्यासाठी सर्व धर्मीय शांतता कमिटीची बैठक देखील घेण्यात आली.
भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज राजकोट इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.
0 notes
khabar24 · 7 days ago
Text
विकसित महाराष्ट्रासाठी संकल्पबद्ध होवून काम करूया : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
कस्तुरचंद पार्क मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात साजरा पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्यासह उत्कृष्ट कार्यासाठीविविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांचा सत्कार नागपूर, दि. २७ : नागपूर आणि विदर्भात विविध विकासकामे हाती घेण���यात आली आहेत. रोजगार निर्मिती, उद्योगांचा विकास, शिक्षण, आरोग्य, कृषी, महसूल अशा सर्वच क्षेत्रात विकास सुरु असून देशासह महाराष्ट्राच्या विकासासाठी…
0 notes
nagarchaufer · 9 days ago
Text
बीडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तरुणाचा मंत्र्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न 
बीड जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. बीडमध्ये मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला. मंत्री दत्तात्रय भरणे विश्रामगृहाकडे जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला.  बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हा मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला त्यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, वक्फ…
0 notes
darshanpolicetime1 · 29 days ago
Text
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला साजेशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार - महासंवाद
बारामती, दि.५: छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे १५ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत शहरातील रेल्वे मैदानावर आयोजन करण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला साजेशी क्रीडामय वातावरणात स्पर्धा आयोजित करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. क्रीडा विभागाच्यावतीने कबड्डी स्पर्धा आयोजनाच्या अनुषंगाने सादरीकरणवेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 1 month ago
Text
0 notes
6nikhilum6 · 6 months ago
Text
Pune : पीडीएफए सुपर डिव्हिजन लीग; दिएगो ज्युनियर्सची स्निग्मय एफसीवर निसटती मात
एमपीसी न्यूज : पीडीएफए सुपर डिव्हिजन लीगमध्ये (Pune) दिएगो ज्युनियर्सनी चुरशीच्या लढतीत स्निग्मय एफसीवर 4-3 अशी मात केली. दिवसातील अन्य सामन्यात ओमकार नाळेच्या गोल हॅट्ट्रिकच्या जोरावर एआयवायएफए स्काय हॉक्स नेगेम ऑफ गोल (जीओजी) फुटबॉल कोचिंग सेंटरविरुद्ध 9-3 असा मोठा विजय नोंदविला. बावधन येथील गंगा लीजेंड्स मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल लीगमध्ये दिएगो ज्युनियर्सनी स्निग्मय एफसीला चांगलेच झुंजवले.…
0 notes
automaticthinghoagiezine · 9 months ago
Video
youtube
घरच्या मैदानावर हेमंत गोडसे यांच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची घट..
0 notes
pradip-madgaonkar · 10 months ago
Text
Pradip मैदानावर क्रिकेट खेळायला गेला असतो…
दुपारी घरी परत येताना बायकोला फोन करतो
आणि म्हणतो,
“थोडयाच वेळात घरी पोहोचतोय, आंघोळीला पाणी ठेव फ्रीजमध्ये.”
😂😂😂🤣🤣🤣😀😀😀😅😅😅
0 notes
bandya-mama · 10 months ago
Text
Bandya मैदानावर क्रिकेट खेळायला गेला असतो…
दुपारी घरी परत येताना बायकोला फोन करतो
आणि म्हणतो,
“थोडयाच वेळात घरी पोहोचतोय, आंघोळीला पाणी ठेव फ्रीजमध्ये.”
😂😂😂🤣🤣🤣😀😀😀😅😅😅
0 notes
gajananjogdand45 · 11 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/industrial-development-of-hingoli-will-be-done-through-irrigation-chain-chief-minister-eknath-shinde/
0 notes
airnews-arngbad · 7 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 28 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २८ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यातल्या ११ शहरांमध्ये १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर मधल्या गोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.
दरम्यान, ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या मेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. ही परिषद प्रामुख्याने जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली आहे.
एक देश एक निवडणूक या अंतर्गत देशपातळीवर एकाचवेळी निवडणूक घेण्यावर भर दिला जात असून, तरुणांनी त्यावर सविस्तर चर्चा करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. लोकशाहीमध्ये अशी चर्चा होण्याची गरज असून, तरुणांनी यात सहभागी व्हावं, असं ते म्हणाले.
देशात लोहमार्गांच्या जाळ्यातील २३ हजार किलोमीटरहून अधिक मार्गांवरून ताशी १३० किलोमीटर वेगानं रेल्वेगाड्या धावू शकतील अशा पद्धतीनं या मार्गांचं आधुनिकीकरण करून भारतीय रेल्वेनं एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर ताशी ११० किलोमीटरपर्यंत वेगानं गाड्या नेण्यास पूरक ठरावेत या उद्देशानं ५४ हजार किलोमीटर मार्ग अद्ययावत करण्यात आल्याचं, भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आलं. याशिवाय रेल्वेमार्गांवर आधुनिक सिग्नलिंग प्रणाली बसवणं, काही धोकादायक ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी कुंपण घालणं अशा कामांचाही रेल्वे मार्गांच्या आधुनिकीकरणाच्या कामांमध्ये समावेश करण्यात आलं आहे.
सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना मागे टाकत महाराष्ट्रानं अव��वल स्थान मिळवलं आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. राज्यात नोंदणी झालेल्या सुमारे सात लाख ६५ हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख ६९ हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे. ही खरेदी इतर राज्यांच्या तुलनेनं सर्वाधिक आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत खरेदी चालू राहणार असल्यानं सोयाबीन खरेदीच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसेल. गरज भासली तर केंद्र सरकारकडे खरेदीसाठी मुदत वाढवून मागीतली जाईल, असं रावल यांनी सांगितलं.
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी काल पुण्यात जीबीएस या आजाराबाबत आढावा बैठक घेतली. या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण मोठं असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. या आजारामागची कारणं शोधावीत, पाणीपुरवठा स्रोतांची, टँकरमधल्या पाण्याची तपासणी करावी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावं तसंच अन्य सर्वंकष उपाययोजना कराव्यात असे निर्देश आबीटकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. जीबीएसच्या रुग्णांवर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अतिरिक्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. अहिल्यानगर इथं काल शंभराव्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. संमलेनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, मोहन जोशी, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. अहिल्यानगर इथं सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचं राम शिंदे यावेळी म्हणाले. गेले तीन दिवस रंगलेल्या या नाट्य संमेलनात नाट्यदिंडी, विविध नाट्यप्रयोग, नृत्य गायन असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
नांदेड इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या अंतर्गत काल ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कल्याण मिनगिरे यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने शासन स्तरावर मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येतो. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा, असं आवाहन निमगिरे यांनी केलं.
बुलडाणा इथं अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्रात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचं लोकार्पण केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झालं. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगाना आवश्यक साहित्य जिल्ह्यातच सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते ४७ दिव्यांगांना तीन लाख ५१ हजार रुपयांचं साहित्य वाटप करण्यात आलं.
बर्ड फ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, असा खुलासा नांदेडच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. यासंदर्भात एक चित्रफित पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केली आहे.
0 notes
mahavoicenews · 1 year ago
Text
रोहित शर्माच्या रहस्यमय जगाचे अनावरण: एक व्यापक मराठी मार्गदर्शक
क्रिकेटच्या क्षेत्रात रोहित शर्माइतकी काही नावं चमकत आहेत. चित्तथरारक शतकांपासून ते उल्लेखनीय नेतृत्वापर्यंत, शर्माने भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. तथापि, मैदानावरील त्याच्या कारनाम्यांपलीकडे, या प्रतिष्ठित खेळाडूबद्दल, विशेषतः मराठी भाषिक चाहत्यांसाठी शोधण्यासारखे बरेच काही आहे.
रोहित शर्माचा प्रवास शोधत आहे: 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्रातील बनसोड येथे जन्मलेल्या रोहित शर्माचा क्रिकेट प्रवास प्रेरणादायी नाही. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या शर्मा यांची प्रतिभा लहानपणापासूनच दिसून आली. त्यांचे सुरुवातीचे संघर्ष आणि सर्व अडचणींवर यशस्वी होण्यासाठी चिकाटी या कथा आहेत ज्या मराठी संस्कृतीशी खोलवर प्रतिध्वनी करतात, जिथे लवचिकता आणि दृढनिश्चय हे अत्यंत मौल्यवान गुण आहेत.
स्टारडम वर उदय: शर्मा यांचा स्टारडमचा उदय हा उल्काच होता. त्याच्या मोहक स्ट्रोकप्ले आणि सातत्याने मोठी धावसंख्या करण्याच्या क्षमतेने त्याला प्रशंसा आणि जगभरातील क्रिकेट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले. 2007 मध्ये त्याच्या संस्मरणीय पदार्पणापासून ते एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मध्ये तीन द्विशतके झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू बनण्यापर्यंत, शर्माची कारकीर्द अनेक टप्पे देऊन सजली आहे.
कर्णधार आणि नेतृत्व: मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यावर शर्मा यांचे नेतृत्वगुण समोर आले. उदाहरणादाखल, त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले, ज्यात अनेक आशिया चषक विजय आणि 2013 मधील प्रतिष्ठित ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद यांचा समावेश आहे. त्याचे शांत वर्तन आणि रणनीतिकखेळ कौशल्यामुळे तो मैदानावर आणि मैदानाबाहेर एक आदरणीय नेता बनतो.
मैदानाबाहेरचे व्यक्तिमत्व: क्रिकेटच्या पलीकडे, रोहित शर्माच्या मैदानाबाहेरील व्यक्तिमत्त्वानेही चाहत्यांना मोहित केले आहे. त्यांचे परोपकारी प्रयत्न, विशेषत: वंचित मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवणे, समाजाला परत देण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. शर्माची नम्रता आणि त्याच्या वाढत्या यशानंतरही त्याच्या पायाभूत स्वभावामुळे तो क्रिकेटपटू आणि व्यक्तींसाठी एक आदर्श बनतो.
मराठी अभिमान: मराठी भाषिक चाहत्यांसाठी रोहित शर्मा हा केवळ क्रिकेटपटू नसून तो अभिमानाचे प्रतीक आहे. त्यांची महाराष्ट्रातील मुळे आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाची त्यांनी सतत केलेली पावती मराठी संवेदनांशी खोलवर रुजलेली आहे. शर्मा यांच्या मराठीतील मुलाखती आणि संवादातू��� त्यांची भाषेबद्दलची आवड आणि वैयक्तिक पातळीवर चाहत्यांशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
अधिक माहितीसाठी:-
नेहा पांडसे मालिका
मराठी मध्ये मगरमच्छ
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
रिझवान-यानसेनची बाचाबाची, चेपॉक मैदानावर तणाव(Video)
https://bharatlive.news/?p=179735 रिझवान-यानसेनची बाचाबाची, चेपॉक मैदानावर तणाव(Video)
पुढारी ऑनलाईन डेस्क : ...
0 notes
news-34 · 1 year ago
Text
0 notes
marmikmaharashtra · 1 year ago
Link
https://marmikmaharashtra.com/hingolis-dussehra-festival-has-a-tradition-of-168-years/
0 notes
nagarchaufer · 1 year ago
Text
भाजपवाल्यांनी आधी स्वतःची दोस्तशाही संपवावी , उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगोली इथे बोलताना ‘ मी गद्दारांवर बोलण्यासाठी आलेलो नाही. तुम्हीच आता ठरवा गद्दारांचे काय करायचे ते ? ‘ असे म्हणत भाजपने घराणेशाहीवर बोलण्याआधी स्वतःची दोस्तशाही संपवावी. लोकसभा निवडणुक मोदींविरोधात नसून लोकशाही संपवणाऱ्यांच्या विरोधात आहे असे म्हटलेले आहे. हिंगोली इथे रामलीला मैदानावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘ मी गद्दारांविषयी बोलण्यासाठी इथे आलेलो…
Tumblr media
View On WordPress
0 notes