#महाराष्ट्रातील कोरोना मृत्यू
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ मे २०२३ दुपारी १.०० वा.****
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट आज देशातल्या ४९९ शहरांसह देशाबाहेर जगातल्या १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. दुपारी दोन ते पाच वाजून वीस मिनिटे या वेळेत ही परीक्षा होणार आहे.
****
मणिपूर मधल्या परिस्थितीत सुधार होत असून, राज्यात सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी निमलष्करी दल प्रयत्न करत आहे. मणीपूरच्या राज्यपाल अनसुया उईके यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील सर्वाधिक हिंसाचारग्रस्त चूरचंद्रपूर जिल्ह्यात सकाळी सात ते दहा यावेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. आतापर्यंत या हिंसाचारात चोपन्न जणांचा मृत्यू झाला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
मणिपूरमध्ये मात्र आज नीट परीक्षा होणार नाही. इथे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरनीटची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या उमेदवारांसाठी परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असं राष्ट्रीय परीक्षा संस्था - एनटीएनं सांगितलं आहे.
***
दरम्यान, मणिपूरमध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून चौकशी करून सर्वतोपरी मदत करण्याचं तसंच या विद्यार्थ्यांना राज्यात सुख���ूप आणण्याची व्यवस्था केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फडणवीस यांनी तत्काळ मणिपूर सरकारशी संपर्क करून या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली, याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी मणिपूर पोलिस महासंचालकांशी संपर्क केला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील करहामा भागात आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. हा दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा असून कुलगाम इथला रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या भागात पोलीस, लष्कर आणि सुरक्षा दलाच्या जवांनांची संयुक्तपणे शोध मोहीम सुरू असताना ही चकमक उडाली.
****
कोयना धरण परिसरात आज पहाटे तीन वाजून ५३ मिनीटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. कोयनानगर पासून उत्तरेला पाच किलोमीटर अंतरावर भूकंपाची तीव्रता तीन रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली, तर भूकंपाचा केंद्रबिंदू ३० किलोमीटर खोल इतका होता. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही.
***
देशात गेल्या २४ तासात दोन हजार ३८० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, १५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पाच हजार १८८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या २७ हजार २१२ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७५ इतका आहे.
****
भारतीय नौदलाचं सर्वात जुनं आयएनएस मगर हे जहाज काल संध्याकाळी कोची इथल्यां नौदलाच्या तळावर झालेल्या समारंभात सेवामुक्त करण्यात आलं. हे जहाज जुलै १९८७ मध्ये भारतीय नौदलात दाखल झालं होतं. पाच हजार पाचशे टनांपेक्षा जास्त वजन वाहून नेणारं हे पाहिलं स्वदेशी जहाज आहे. ऑपरेशन समुद्र सेतू, कोविड-19 साथीच्या काळात जगाच्या विविध ठिकाणांहून भारतीयांना परत आणणे, २००४ मध्ये त्सुनामीतून वाचलेल्या १३०० नागरिकांना बाहेर काढणे याचबरोबर भारतीय सैन्यासह अनेक संयुक्त लष्करी सरावांमध्ये या जहाजाचा सहभाग होता.
****
कर्नाटकात सत्ताधारी भाजप सरकारविरोधात केलेल्या आरोपांसंदर्भात निवडणूक आयोगानं कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षांना नोटीस बजावली आहे. या आरोपांच्या पुराव्यांसह आज सायंकाळी सात वाजेपर्यंत उत्तर देण्यास निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. भाजप सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप करणाऱ्या जाहिराती काँग्रेसनं वृत्तपत्रातून प्रकाशित केल्या आहेत.
****
��ीड जिल्ह्यात केज तालुक्यात होळ इथल्या एका व्यायामशाळेत ४५ किलो चंदनासह एक गावठी कट्टा, एक पिस्तूल, दोन लोखंडी कोयते, पंधरा जिवंत काडतूसं यासह इतर घातक साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. या प्रकरणी तीन आरोपींविरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला. चंदन तस्करांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना संध्याकाळी साडे सात वाजता राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.
//**********//
0 notes
Text
महाराष्ट्र कोरोना अपडेट: गेल्या 24 तासात 4024 नवीन कोरोना रुग्ण, BA.5 प्रकाराचे 4 रुग्ण आढळले; दोन रुग्णांचा मृत्यू झाला
महाराष्ट्र कोरोना अपडेट: गेल्या 24 तासात 4024 नवीन कोरोना रुग्ण, BA.5 प्रकाराचे 4 रुग्ण आढळले; दोन रुग्णांचा मृत्यू झाला
कोरोना केस. प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय बी.जे. मेडिकल कॉलेज पुणेच्या ताज्या अहवालानुसार, BA.5 प्रकारातील 4 रुग्णही आढळून आले आहेत. मुंबईत कोरोनाचे एकूण 12341 सक्रिय रुग्ण आहेत, तर ठाण्यात 3611 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनाविषाणू) दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत 4024 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, तर दोघांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. 3028 रुग्णांनी…
View On WordPress
0 notes
Text
सावधान : कोरोनामुळे देशात एका आठवड्यात ७० मृत्यू
सावधान : कोरोनामुळे देशात एका आठवड्यात ७० मृत्यू
मुंबई : देशात कोरोना आटोक्यात येत असताना अचानक कोरोनाग्रस्तांची वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली, कर्नाटक, केरळसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. मागील 24 तासांत (दि. 12 जून रात्रीपर्यंत) देशभरात 8 हजार 84 नव्या कोनाग्रस्तांची नोंद झाली असून त्यापैकी महाराष्ट्रात 2 हजार 946 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यातील एकट्या…
View On WordPress
0 notes
Text
बीडमध्ये झाले मृतदेहाचे मौखिक शवविच्छेदन.......!
बीडमध्ये झाले मृतदेहाचे मौखिक शवविच्छेदन…….!
बीड दि.22 – येथील एका खाजगी रुग्णालयात कोरोना वरील उपचार सुरु असताना आत्महत्या केलेल्या कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाचे बीडच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आयसीएमआरच्या निर्देशांनुसार मृतदेहाची कोणतीही चिरफाड न करता मौखिक निरीक्षणांवरून हे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान कोरोनाग्रस्तांचे शवविच्छेदन करण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असावी . कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यास त्याचे…
View On WordPress
0 notes
Photo
कोरोना : महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर; २४ तासांत तब्बल ३० हजार ५३५ नवीन रुग्णांची नोंद एकूण मृत्यू संख्या ५३ हजार ३९९ इतकी झाली आहे | #Maharashtra #Coronavirus #30535newcases https://www.headlinemarathi.com/maharashtra-news/30535-new-corona-cases-in-maharashtra/?feed_id=52290&_unique_id=605820edb5be7
0 notes
Text
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा १०० पार
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने शंभरी पार करून १०१ वर पोहोचली आहे. तर देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा आता ५११ झाला आहे. पुण्यात तीन आणि साताऱ्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. काल संध्याकाळीही सांगलीत चार नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. आतापर्यंत देशभरात कोरोनाची लागण झालेल्यांपैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची जिल्हानिहाय…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्र कोरोना अहवाल: महाराष्ट्रात कोरोनाचा वेग वाढला, 550 नवीन रुग्णांमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला
महाराष्ट्र कोरोना अहवाल: महाराष्ट्रात कोरोनाचा वेग वाढला, 550 नवीन रुग्णांमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला
कोरोना चाचणी (फाइल फोटो) प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय महाराष्ट्रातील कोरोना: गेल्या दोन दिवसांची आकडेवारी पाहिली तर एका ओळीत असे म्हणता येईल की, बरे होणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे आणि कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र (महाराष्ट्रकोरोनाचा वेग पुन्हा वाढला आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांनी पाचशेचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी (29 मे) कोविडची 550 नवीन प्रकरणेकोविड…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 January 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा. ****
आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासासाठी प्रशासन आणि जनतेमध्ये योग्य समन्वय असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशभरातल्या आकांक्षित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते आज संवाद होते. उस्मानाबाद, हिंगोलीचे नंदुरबार, गडचिरोली, सिंधुदुर्ग, वाशिम, आणि यवतमाळ या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते. आज आकांक्षित जिल्हे देशाच्या प्रगतीतले अडथळे दूर करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या जिल्ह्यांसमोर असलेली नवी लक्ष्यं आणि आव्हानांसाठी पंतप्रधानांनी जिल्हाधिकार्यांना यावेळी शुभेच्��ा दिल्या.
****
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं, त्या ७१ वर्षांच्या होत्या.
संगीत रंगभूमीलाच आपला श्वास, ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने मराठी रंगभूमीला समर्पित महान कलावंत आपण गमावला असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
****
मुंबईत ताडदेव भागातल्या एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. आज सकाळी ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या १३ गाड्यांच्या सहाय्यानं आग विझवण्यात आली. आग लागलेल्या ठिकाणी आणखी काही लोक अडकले आहेत का, याचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
विविध जिल्ह्यांच्या आगामी आर्थिक वर्षाच्या प्रारुप विकास आराखड्याला, अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत पवार यांनी, औरंगाबाद जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत २०२२-२३ या वर्षासाठी ३८५ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला, बीड ३६० कोटी रुपये, लातूर २९० कोटी रुपये, परभणी २४० कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास, मंजुरी दिली. नांदेड जिल्हा नियोजन विभागाला आगामी वर्षासाठी ३०३ कोटी ५२ लाख रुपये मर्यादेत, आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते, मात्र जिल्ह्याचा विस्तार तसंच विकास कामांची अत्यावश्यकता लक्षात घेता, वाढीव तरतुदीचा आग्रह पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या बैठकीत लावून धरल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली इथं झालेल्या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळालं आहे. एकूण पंधरा संघ सहभागी झालेल्या या स्पर्धेत, महाराष्ट्राने गोंधळ या लोककला प्रकाराचं अप्रतिम सादरीकरण केलं. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विजयी संघ आणि सांस्कृतिक कार्य विभागाचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणार्या मुख्य सोहळ्यात,"महाराष्ट्रातील जैवविविधता आणि जैव मानके" या विषयावरचा चित्ररथ सहभागी होणार आहे.
****
��न्न आणि औषध प्रशासन विभागाने औषध विक्रेत्या दुकानांवर लादलेले अनावश्यक निर्बंध न हटवल्यास, कोरोना प्रतिबंधक औषधांची विक्री बंद करण्याचा इशारा, राज्य औषध विक्रेते संघटनेनं दिला आहे. कोरोनाचे होम टेस्टिंग किट ज्या ग्राहकांना विकले आहेत त्यांची संपूर्ण माहिती ठेवणं, या औषध विक्रत्यांवर बंधनकारक करण्यात आलं आहे. या किटची ऑनलाईन विक्री जोरात सुरु असून, त्यावर कोणतेही निर्बंध नसताना औषध विक्रेत्या दुकानांवरचं ही सक्ती का अशी विचारणा संघटनेनं केली आहे.
****
औरंगाबाद शहरात सिडकोतल्या कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणीवर एक कोटी निधी खर्च करण्याऐवजी, त्यांच्या नावाने ग्रामीण भागातल्या युवक- युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करावी, अशी मागणी, खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन काल त्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना दिलं. महाराणा प्रताप यांच्या प्रती खरा आदर आणि सन्मान सैनिकी शाळाच असेल; या शाळेमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लष्कर, हवाई दल आणि नौदलात नोकरी उपलब्ध होईलच, तसंच विविध इतर शासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असं जलिल यांनी नमूद केलं.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्यानं नांदेडच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागानं येत्या २६ ते २९ जानेवारी या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे. इच्छुक उमेदवारांनी, नोंदणी करण्याचं आवाहन, सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलं आहे.
****
मराठवाड्यात २६ जानेवारीपासून आठवडाभर तापमानात घट होण्याची शक्यता, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान संशोधन केंद्रानं वर्तवली आहे.
****
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १५ जानेवारी २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी रीयर ॲडमिरल के पी अरविंदन यांनी मुंबईच्या नौदल गोदीचे ॲडमिरल सुपरिटेंडन्ट म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी रीयर ॲडमिरल बी. शिवकुमार यांच्याकडून काल हा पदभार स्वीकारला.
****
पिकांवरच्या रासायनिक फवारण्यांच्या वापरामुळे येत्या १५ वर्षात कर्करोगाचं प्रमाण ५० टक्क्यांनी वाढेल त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीवर भर द्यावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. गुजरात इथं शेतकऱ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काल ते बोलत होते. आपल्या लोकसभा मतदार संघात ५० टक्के शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहित करण्याचं उद्दिष्ट निर्धारित केल्याचं शाह यांनी यावेळी सांगितलं.
****
भारत निवडणूक आयोगानं राजकीय पक्��ांवर लादलेल्या प्रचारसभा आणि प्रचारफेऱ्यावरील निर्बंधांची कालमर्यादा २२ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. मात्र आयोगानं या पक्षांना काही बाबतीत सूट दिली असून, बंदिस्त सभागृहांत होणाऱ्या बैठकांमध्ये कमाल ३०० जणांना किंवा संबंधित सभागृहाच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के लोकांना किंवा राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणनं निर्धारित केलेल्या मर्यादेइतक्या लोकांना उपस्थित राहण्याची अनुमती दिली आहे.
****
मराठवाड्यात काल १ हजार ९१५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ५४०, नांदेड जिल्ह्यात ४२१, लातूर ४५३, उस्मानाबाद १८६, जालना १००, परभणी ११४, बीड ६४, तर हिंगोली जिल्ह्यात काल ३७ नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
दिल्ली इथं यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता आणि जैव मानकं’यावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, प्रजासत्ताक दिन सोहळा यावर्षीपासून २३ जानेवारीला सुरु होणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत हा सोहळा २४ जानेवारीपासून सुरु होत असे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 September 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २१ सप्टेंबर २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· शाळा उघडण्याबाबतच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
· मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरूद्ध गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप तर हा राजकीय कारस्थानाचा भाग असल्याचं, हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
· राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची रजनी पाटील यांना तर भारतीय जनता पक्षाची संजय उपाध्याय यांना उमेदवारी
· राज्यात दोन हजार, ५८३ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात पाच रुग्णांचा मृत्यू तर १२१ बाधित
· कोविड लसीची एकही मात्रा न घेतलेल्या नागरिकांना परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशाला मनाई
आणि
· मराठवाड्यात अनेक भागात पाऊस
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा उघडण्याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेतील, त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. कोविड महामारीमुळे बंद असल��ल्या देशभरातल्या शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत राज्यांनी विशिष्ठ कालावधीत निर्णय घ्यावा, याबाबत न्यायालयानं आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दिल्लीतल्या एका विद्यार्थ्यानं केली आहे. त्यावर न्यायालयानं आपलं मत मांडलं. कोविडची स्थिती प्रत्येक राज्यात वेगळी आहे, रुग्णवाढ विचारात घेऊन त्यानुसार खबरदारीची पावलं उचलणं गरजेचं असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. विद्यार्थ्याने जनहित याचिका दाखल करण्याऐवजी स्वत:च्या अभ्यासावर लक्ष द्यावं, असा सल्लाही खंडपीठानं यावेळी दिला.
****
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत मुंबई इथं दोन दिवसीय राज्यस्तरीय 'वाणिज्य उत्सव' परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसंच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या परिषदेत राज्यातली निर्यात संधी, पायाभूत सुविधा, बॅंकींग आणि वित्तीय सहकार्य या शिवाय खाद्य, कापड, इंजिनिअरिंग, केमिकल आणि औषध निर्मिती, जेम्स ॲण्ड ज्वेलरी या विषयातल्या संधी, यावर चर्चासत्रे घेण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातले २०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
राज्यातल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विशेष कार्यक्रम राबवणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. त्या काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पुढच्या दोन वर्षांत यासंदर्भात मोठा बदल घडवून येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. सध्याचं केंद्र सरकार दडपशाही करणारं सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला. ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा राजकीय सूडबुद्धीने होणारा वापर लोकशाहीसाठी घातक असल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.
****
राज्य सरकारमधले मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोल्हापूरला जाणाऱ्या सोमय्या यांना सातारा जिल्ह्यात कराड इथं पोलिसांनी रोखलं, त्यावेळी कराड इथं काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुश्रीफ यांच्या विरोधातले सर्व पुरावे सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाला देणार असून, त्यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार असल्याचं सोमय्या म्हणाले.
दरम्यान, सोमय्या यांचे आरोप पूर्णत: खोटे असून, हा राजकीय कारस्थानाचा भाग असल्याचं, हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
****
काँग्रेसनं राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या नावाला ��ंजुरी दिल्याचं सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. तर भारतीय जनता पक्षानं मुंबईचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. राजीव सातव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी अर्ज दाखल करायचा उद्या अखेरचा दिवस असून ४ ऑक्टोबरला मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १२वी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार, २४ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी या निकालावरील आक्षेप अथवा तक्रारी, २५ सप्टेंबर पर्यंत विहित अर्जाच्या नमुन्यात दाखल कराव्या, असं मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी एका पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
राज्यात काल दोन हजार, ५८३ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख, २४ हजार, ४९८ झाली आहे. काल २८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३८ हजार ५४६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार ८३६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ४० हजार ७२३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ४१ हजार, ६७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल १२१ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात काल ४९ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात ३५, औरंगाबाद १६, लातूर १५, परभणी तीन, नांदेड दोन, तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
****
कोविड लसीची एकही मात्रा न घेतलेल्या नागरिकांना परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशाला मनाई करण्याचा निर्णय, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी घेतला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, आणि लसीकरणासाठीच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळावा, या हेतूनं हा निर्णय घेतल्याचं, त्यांनी म्हटलं आहे. या निर्ण���ानुसार आता परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशासासाठी लस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक असणार आहे.
****
महाराष्ट्र विद्युत मंडळाकडून सक्तीनं होणारी वीज बिल वसुली थांबवावी, तसंच वीज पुरवठा खंडित करू नये, यासह इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे काल हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं, तहसील कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला. सेनगाव तालुक्यातल्या उपकेंद्रातून विदर्भात जाणारा वीजपुरवठा तातडीनं बंद करावा, नव्यानं मंजूर झालेल्या ३३ उपकेंद्रांचं काम तातडीनं सुरू करावं, यासह इतर मागण्यांचं निवेदन, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्याकडे यावेळी सादर करण्यात आल��.
****
महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासानं भारताला अनेक आयाम दिले आहेत. आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्रामध्ये, महाराष्ट्रातल्या अनेक विभुतींनी हा इतिहास समृद्ध केला असल्याचं मत, मुंबईतल्या एसएनडीटी विद्यापीठातल्या इतिहास विभागाच्या प्रमुख, प्राध्यापक डॉ मेहेरज्योती सांगळे यांनी व्यक्त केलं आहे. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत, आज डॉ सांगळे यांचं, ‘१८५७ च्या पूर्वी महाराष्ट्रातील सशस्त्र उठावांची माहिती’, या विषयावर व्याख्यान होणार आहेत. या व्याख्यानात त्या म्हणाल्या..
महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो अत्यंत दैदिप्यमान आहे.आणि कुठल्याही अन्यायी, अत्याचारी शासनकर्त्यांना प्रखरतेने समर्थपणे तोंड देण्याचं सार्मथ्य महाराष्ट्रातील जनतेने वेळोवेळी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रातील १८५७ चे जे सशस्त्र उठाव झाले. त्या उठावांचं स्वरुप पाहता आपल्याला हे लक्षात येईल की हे उठाव अत्यंत प्रखर होते. बीड, खान्देश, विजयापूर , सावंतवाडी, येथून सशस्त्र आणि छोट्या छोट्या मोठ्या निरंतन उठाव झालेले आपल्याला आढळतात
आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून आज सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी हे व्याख्यान प्रसारित केले जाणार आहे.
****
आरोग्य विभागातर्फे २१ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून पाळण्यात येतो. या अंतर्गत परभणी जिल्ह्यात एकूण तीन लाख सहा हजार ३७३ बालकांना, जंतनाशक गोळी देण्याचं उद्दीष्ट ठरवण्यात आलं असल्याचं, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या ज्या बालकांना आज जंतनाशक गोळी घेता आली नाही, तर त्यांना २८ तारखेला गोळी देण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनीही जिल्ह्यात २१ ते २८ सप्टेंबर पर्यंत जंतनाशक मोहिम राबवण्याचं जाहीर केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात नवीन क्रीडा संकुलासाठी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातली २५ एकर एवढी जागा देण्याची मागणी, खासदार संजय जाधव यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.
****
मराठवाड्यात अनेक भागात काल पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल सायंकाळनंतर पावसानं हजेरी लावली. बदनापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. घनसावंगी तालुक्यातल्या रवना, राणी उंचेगाव, निपाणी पिंपळगाव, दर्गा, अंबड तालुक्यातल्या मठ पिंपळगाव, शेवगा, आलमगाव या भागात पावसाने दोन तास हजेरी लावली. मंठा तालुक्यातल्या काही भागातही मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
परभणी, पूर्णा आणि जिंतूर तालुक्यात काल रा��्री जोरदार पाऊस झाला.
औरंगाबाद शहर परिसरातही काल सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. उस्मानाबाद शहरातही मुसळधार पाऊस झाला.
****
हवामान : येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, याच काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तसंच मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 July 2021 Time 7.10AM to 7.20AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १६ जुलै २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी ��िंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार.
· पंतप्रधान पीक विमा योजनेला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ.
· राज्यात पर्यटन विकासासाठी २५० कोटी रुपयांचा निधी तातडीनं वितरित करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश.
· कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव नसलेल्या गावांमध्ये शाळा सुरू.
· राज्यात आठ हजार १० नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यू तर २९४ बाधित.
आणि
· यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे, २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल, आज जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता मंडळाच्या संबंधित संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल दिली. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर हा ��िकाल पाहता येईल. याबाबत माहिती देताना शिक्षण मंत्री गायकवाड म्हणाल्या –
दहावीच्या परीक्षेसंदर्भामधे आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे. आपण तो जो निकाल आहे तो दुपारी एक वाजता लावत आहोत. एकूण मुले जे आहेत ते आहेत नऊ लाख नऊ हजार ९३१ आणि या परीक्षेमधे मुलींची संख्या आहे सात लाख अठ्ठेचाळीस ६९३ अशी एकूण सोळा लाख अठ्ठावन हजार ६२४ मुलं या परीक्षेमधे मुलांनी सहभाग घेतला.
****
फलोत्पादन वाढीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या सूचनांवर, राज्य शासन सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये काल ‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’, या विषयावर झालेल्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतलं उत्कृष्ट वाण उपलब्ध करणं, फलोत्पादनवाढीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देणं, प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचं वैशिष्ट्यपूर्ण फळपिक विकसित करुन त्याची ओळख निर्माण करणं, वसंतदादा शुगर इन्स्ट्यिट्यूटच्या धर्तीवर फळपिकांच्या संशोधनासाठी स्वतंत्र संस्था उभी करुन, प्रत्येक जिल्ह्यात फळनिहाय शाखा निर्माण करणं, आदी सूचना शरद पवार यांनी या बैठकीत केल्या. राज्यात फलोत्पादन वाढ आणि फळनिर्यातीला मोठी संधी असून, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र फळपिक जिल्ह्याचं वैशिष्ट्यं म्हणून विकसित करता येईल, असं शरद पवार यांनी या प्रसंगी सूचवलं.
****
नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून केंद्रानं सुरु केलल्या पंतप्रधान पीक विमा योजनेला यंदाच्या खरीप हंगामात २३ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्रानं याबाबत पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचा काल शेवटचा दिवस होता. कोविड-19 ची परिस्थिती आणि शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन, ही मुदतवाढ करत असल्याचं भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त सुनिलकुमार यांनी आदेशात म्हटलं आहे.
पिक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचं आहे, त्यांनी तात्काळ पिक विम्याची नोंदणी करावी, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलं आहे.
****
राज्यातल्या रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीनं पुढं येऊन रक्तदान करावं, असं आवाहन, अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे. स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणेतल्या सर्व घटक, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसिलदार, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेवून, नियमांचं पालन करुन रक्तदान शिबिरं आयोजित करावीत, असंही त्यांनी आपल्या आवाहनात म्हटलं आहे. वाढदिवस तसंच थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी आणि इतर तत्सम कार्यक्रमांच्या दिवशी रक्तदान शिबीरं आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. थॅलेसेमिया, कॅन्सर रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदात्यांनी पुढं यावं, असं त्यांनी नमूद केलं.
****
राज्यात पर्यटन विकासासाठी २५० कोटी रुपये निधी तातडीनं वितरित करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पर्यटन विकासाच्या प्रकल्पांचा आढावा, आणि पर्यटनवाढीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात, काल झालेल्या बैठकीत त्यांनी या संदर्भातल्या सूचना केल्या. राज्यातल्या पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या दहा जिल्ह्यांमध्ये, प्रायोगिक तत्वावर जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिल्याचंही, त्यांनी यावेळी सांगितलं. जिल्ह्यातल्या पर्यटन विकासात खाजगी संस्थांना सहभागी करुन घेण्यासाठी, जिल्ह्यांमध्ये पर्यटन संस्था स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. १९ जुलैपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. सुमारे दोन तास चाललेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या ग्रामीण भागात जिथं कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव नाही, अशा अनेक गावांमध्ये काल अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली. ज्या गावांमध्ये गेल्या एक महिन्यापासून एकही संसर्ग बाधित आढळलेला नाही अशा ठिकाणी, आखून दिलेल्या नियमांचं पालन करून, इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करायला, राज्य सरकारन परवानगी दिली होती. त्यानुसार मराठवाड्यात एक हजार ९०० शाळा सुरु झाल्या. त्यात औरंगाबाद ��िल्ह्यातल्या ५९५ गावांमधल्या, ८५२ शाळांचा समावेश आहे. मोठ्या खंडानंतर सुरु झाल्यानंतरही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची समाधानकारक उपस्थिती असल्याचं दिसून आलं.
दरम्यान, राज्यातल्या ग्रामीण भागात सरपंचाकडून ना हरकत प्रमाणपत्र अडवून ठेवल्यानं, खाजगी इंग्रजी माध्यमांच्या दोन हजार शाळा सुरू करण्यात आल्या नसल्याचा आरोप, औरंगाबाद इथल्या खाजगी इंग्रजी माध्यमांची संघटना, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन – ‘मेस्टा’ या संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी म्हटलं आहे.
****
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद - एआयसीटीईनं अभियांत्रिकी तसंच विविध व्यावसायिक तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग एक ऑक्टोबरपासून, तर नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग २५ ऑक्टोबरपासून सुरु होतील.
****
राज्यात काल आठ हजार १० नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६१ लाख ८९ हजार २५७ झाली आहे. काल १७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २६ हजार ५६० झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक चार दशांश टक्के झाला आहे. काल सात हजार ३९१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक १७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख सात हजार २०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल २९४ कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले मराठवाड्यात सर्वाधिक १४३ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ५१, औरंगाबाद ४८, लातूर ३२, परभणी १४, नांदेड तीन, जालना दोन, तर हिंगोली जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला.
****
राज्यात इतर मागास वर्गाच्या स्थगित झालेल्या राजकीय आरक्षणासाठी, सर्व पक्षांनी एकत्र येत सार्वत्रिक नेतृत्व करुन आरक्षण टिकवलं पाहीजे, असं राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल मुंबईत या संबंधी विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यासाठीचं नेतृत्व फडणवीस यांनी जरी केलं तरी आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असंही भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.
****
यंदाच्या शैक्षणिक प्रवेश सत्रासाठी राज्यातल्या ४१७ शासकीय आणि ५४९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी, काल प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते या प्रक्रियेचा प्रारंभ झाला. यंदा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ९२ हजार, तर खाजगीमध्ये ४४ हजार, अशा एकूण एक लाख ३६ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. एकूण ९१ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असून, ८० ��भ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण, तर अकरा अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण किंवा अणुत्तीर्ण ��मेदवार पात्र आहेत.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा इथल्या डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा बँक परवाना, भारतीय रिझर्व्ह बँकेनं रद्द केला आहे. बँकेच्या बिकट वित्तीय परिस्थितीमुळे ही कारवाई करण्यात आली. बँकेतून पैसे काढणं, जमा करणं, कर्ज देणं आदी व्यवहारांवर या अंतर्गत निर्बंध आणल्याची माहिती, रिझर्व बँकेनं दिली आहे. सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे कुलसचिव यांनीही ही बँक बंद करून बँकेसाठी अधिकारी नेमण्याचे आदेश जारी केले आहेत.
****
औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, महापालिका आणि उद्योगांच्या संघटनांतर्फे, काल औरंगाबाद शहरातल्या विविध भागात कोविड लसीकरण जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, उद्योजक मानसिंग पवार आणि जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फेरीची सुरुवात झाली. वाहनांवर चित्रफित आणि लोकगीत सादर करून यावेळी जनजागृती करण्यात आली, तसंच दुकानदारांच्या भेटी घेऊन लसीकरणाचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं. ज्या व्यापाऱ्यांचं लसीकरण झालं आहे, त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं. नागरिक तसंच भाजी आणि फळ विक्रेत्यांना या प्रसंगी मास्कचं वाटप करण्यात आलं.
****
राज्य शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाअंतर्गत येणाऱ्या, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला, आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं नांदेड इथं भूजल पुनर्भरण माहिती घडीपत्रिका आणि भिंतीपत्रिकेचं विमोचन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते काल झालं. विविध संवर्गातल्या भूजल वापरकर्त्यामध्ये भूजलाबद्दल जाणीव जागृती होण्याच्या दृष्टीनं, जिल्ह्यात सुमारे ११ वेबिनार घेण्यात आले असून, हे यापुढेही चालू ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती, भूजल विकास यंत्रणेकडून देण्यात आली.
दरम्यान, संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्हा कार्यालयाच्यावतीनं काल रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं.
****
पर्यावरणपूरक इमारतींच्या रचनांवर अधिक भर देऊन हरीत इमारतीची संकल्पना वृद्धींगत करण्यावर भर दिला पाहिजे, असं मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पांच्या विकास कामांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. भोकर इथं उभारण्यात येणारं शंभर खाटांचं ��ुग्णालय निसर्गपूरक करण्यावर भर द्यावा, असं त्यांनी यावेळी सांगितलं. नारवट इथल्या बांबू प्रकल्पाचा देखील त्यांनी आढावा घेतला. इमारतीच्या वास्तुस्थापत्यामध्ये कोणत्याही त्रुटी असू नये, याबाबत प्रत्येक विभाग प्रमुखांनी दक्षता घेण्याच्या सूचना, चव्हाण यांनी दिल्या.
****
नांदेड शहरालगतच्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे सर्व दरवाजे काल सायंकाळी बंद करण्यात आले. हे दरवाजे बंद केल्यामुळे गोदावरी नदी पात्रातील पुराचे पाणी ओसरत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड इथं जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल इंधन दरवाढ विरोधात जुना मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी तसंच सायकल मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार अमरनाथ राजूरकर, माजी राज्यमंत्री डी पी सावंत, माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
****
हवामान
राज्यात आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात बर्याच ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
देशात उद्या सोमवारपासून १८ वर्षावरील सर्वांना कोविड- १९ प्रतिबंधक लस मोफत देण्याची मोहीम राबवण्याची सरकारनं तयारी केली आहे. सर्व तरुण श्रोत्यांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित क��णार
** वेरूळ लेणीसह देशातील ७५ सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी योगाभ्यास आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन
** उद्यापासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्याची देशव्यापी मोहीम
** काँग्रेसनं जरी स्वबळावर निवडणूक लढवली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवेल- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
आणि
** औरंगाबादचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांची मराठा आरक्षणशी संबंधित निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल
****
सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या २१ जून रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. ‘उत्तम आरोग्यासाठी योग’ यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी साडेसहा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण सुरु होईल. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे विद्यार्थी योगासनांची प्रात्यक्षिकं सादर करतील.
देशभरातल्या उच्च शिक्षण संस्थांमध्येही उद्या योग दिनाचं आयोजन केलं जाणार आहे. लोकांना निरोगी जीवनशैली स्वीकारायला आणि घरीच राहून व्यायाम आणि योग करायला चालना देणं, हे या आयोजनाचं उद्दिष्ट आहे. यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ४५ मिनिटांच्या एकत्रित योग कार्यक्रमात भाग घ्यावा, असं आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगानं केलं आहे. त्यादृष्टीनं विद्यापीठं आणि महाविद्यालयांना आयोगानं सूचना जारी केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या औरंगाबाद नजिकच्या वेरूळ लेणीसह देशातील एकूण ७५ सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी योगाभ्यास आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ‘योग-एक भारतीय वारसा’ या अभियानांतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. वेरुळ लेणीसह पुण्याचा आगा खान पॅलेस, मुंबई नजिकची कान्हेरी लेणी आणि नागपूर इथं जुनं उच्च न्यायालय इमारत या महाराष्ट्रातील राष्ट्रीय महत्त्वाच्या अशा चार स्मारकांच्या ठिकाणी योग दिन साजरा होईल. वेरुळ लेणी इथं सकाळी सात वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
जागतिक योग दिना निमित्त उद्या भारतीय टपाल खात्याकडून टपाल तिकिटांवर विशेष रद्दीकरण शिक्का मारला जाईल.
****
केंद्र सरकारच्या वतीनं उद्यापासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्याची देशव्यापी मोहीम सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच महिन्याच्या ७ तारखेला याबाबत घोषणा केली होती. या लसीकरणासाठीची सर्व तयारी करण्यात आली असून राज्यांना पुरवठ्यात वाढ केली जात आहे.
****
पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला लस उत्पादनासाठी अमेरिकेकडून निर्बंध हटवल्यानंतरही अद्याप कच्चा माल मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित नोवावेक्स या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस उत्पादनाला विलंब होण्याची शक्यता आहे.
****
काँग्रेसनं जरी स्वबळावर निवडणूक लढली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सांगलीत एका कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलतांना पाटील यांनी सध्या राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. निवडणुकांसंदर्भात जो काही निर्णय होईल, तो एकोप्याने घेतला जाईल, असं ते म्हणाले.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाशी युती करावी अशा मागणी करणारे पत्र पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेला त्रास थांबावा म्हणून ही युती करावी, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. याबरोबरच महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना पक्ष फोडत असल्याचा आरोपही त्यांनी या पत्रात केला आहे.
****
मराठा आरक्षण रद्द ठरवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशा मागणी करणारी याचिका औरंगाबादचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. घटनेतील तरतुदीनुसार ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा भंग होत असल्यामुळे न्यायालयानं हे आरक्षण रद्द ठरवलं होतं. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर पुनर्विचार करण्याची मागणीही पाटील यांनी याचिकेत केली आहे. राज्य सरकारनं मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याआधीच पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.
****
आंतरराष्ट्रीय योग दिनाची जनजागृती करण्यासाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी क्रांतीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. कोरोना जागतिक महामारी च्या काळात सर्वांना चांगले आरोग्य आणि ��र्यावरण संतुलनाची जाणीव झाली आहे. तेंव्हा प्रत्येकानं स्वतःपासून बदलाची सुरुवात करत आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी व्यायाम, योग याबरोबरच सायकल चालवणे देखील आरोग्य आणि पर्यावरण दृष्ट्या लाभदायी असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यावेळी म्हणाले. या रॅलीत सहभागी उत्कृष्ट सायकलपटूसाठीचा प्रथम पुरस्कार उमेश मारवाडी यांना तर द्वितीय पुरस्कार अश्विनी जोशी आणि तृतीय क्रमांक सोनम शर्मा या विजेत्यांना देण्यात आला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी इथल्या हिंदवी परमेश्वर चौरे या नऊ वर्षाच्या पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींन योगासनाच्या बाबतीत गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. आई-वडिलांकडून मिळालेले योगाचे धडे तसंच योगाचं पुस्तक वाचून निरालांबा पूर्ण चक्रासन या योगासनाविषयी तिनं माहिती मिळवली आणि सराव करत साडेपाच मिनीटात शंभर निरालांबा पुर्ण चक्रासन करून गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःच नाव कोरलं. या विक्रमानंतर आता तिने एशिया स्पर्धे पर्यंत मजल मारून भारतासाठी योग करण्याचं ध्येय असल्याचं सांगितलं आहे.
****
योगासन प्रशिक्षण सरावापुरतं मर्यादित न ठेवता जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे असं मत भारतीय योग संस्थानच्या औरंगाबाद आणि सोलापूरचे विभागीय प्रमुख डॉ. उत्तम काळवणे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादमध्ये आज त्यांना क्रीडा भारती योग पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक मानसिंह पवार उपस्थितीत होते. औरंगाबाद शहरात २०१२ पासून भारतीय योग संस्थानच्या माध्यमातून योग, प्राणायम, ध्यान, मुद्राअभ्यास आणि शुद्धीक्रिया या क्षेत्राचा प्रचार-प्रसार केला जात आहे. या माध्यमातून आजवर २५० योगशिक्षक, ४० योग प्रशिक्षण केंद्र आणि तीस ते ३५ हजार विद्यार्थी घडवल्याचं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जगप्रसिध्द अजिंठा लेणीच्या ह्यू पॉंइंट परिसरात आज बहुरंगी फुलझाडांचं बीजारोपण महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. लेणीच्या सौंदर्यात भर पडून त्याद्वारे पर्यटन आणि व्यवसायाला अधिक चालना, स्थानिकांना रोजगार संधी यादृष्टीनं सात��रा जिल्ह्यातील फुलांच्या विस्तीर्ण प्रदेशासाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठाराच्या धर्तीवर लेणी परिसरात हा ’झकास पठार’ विकसित केलं जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ग्रामविकास विभागातर्फे राज्यभर ‘झकास पठार’ हा उपक्रम राबवणार असल्याचं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी नमूद केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील पाच कोरोना विषाणू बाधित रूग्णांचा आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- रूग्णालय -घाटीत मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार ३८५ रुग्णांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता एक लाख ४५ हजार ३७८ झाली असून एक लाख ४० हजार ९५६ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १५ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार, ११ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ४५ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५९ हजार, ५९१ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या २८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात सध्या डेंगूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यात बाल रूग्णांचं प्रमाण जास्त आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** देशात पुढच्या ६ ते ८ आठवड्यात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याचा अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांचा इशारा
** आषाढी एकादशीला पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांसाठी राज्य परिवहन महामंडळ मोफत बसगाड्या पूरवणार
** पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात चर्चा
आणि
** शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीनं साजरा होणार
****
देशात पुढच्या ६ ते ८ आठवड्यात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याचा इशारा अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था म्हणजेच एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. सध्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्याचं दिसत असल्यानं, निर्बंध शिथील झालेले असल्याच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आपण अधिक सावध राहण्याची गरजही गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे.
****
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात २ कोटी ८७ लाख कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या मात्रा उपलब्ध असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं. आतापर्यंत मंत्रालयानं २८ कोटी ५० लाखांहून अधिक मात्रा उपलब्ध करुन दिल्या असल्याची माहितीही मंत्रालयानं दिली आहे.
****
कोविडग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा ३२ हजार ४६४ मेट्रीक टन द्रवरुप प्राणवायु आतापर्यंत देशाच्या विविध भागात ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे पोहचवला असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. ४४८ गाड्यांद्वारे १५ राज्यांमध्ये प्राणवायू पोहचवण्यात आला आहे.
****
आषाढी एकादशीला पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. मुंबईत आज ते बोलत होते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीनं करण्याच्या सूचना राज्य शासनानं दिलेल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान महामंडळाला मिळाल्याबद्दल परब यांनी समाधान व्यक्त केलं आहे. १९ जुलै रोजी या बस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थांना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालख्यांचा प्रवास मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंत एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व बसेस निर्जंतुकीकरण करण्यात येतील. तसंच प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीनं उपलब्ध करून देण्यात येईल, असंही परब यांनी सांगितलं.
****
यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी तसंच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वय असावा याकरिता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बंगळूरु इथं भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीदरम्यान येणाऱ्या काळात कृष्णा आणि भीमा नद्यांच्या पूराचं नियंत्रण कशा पध्दतीनं करता येईल आणि त्यात कोणत्या पध्दतीनं दोन्ही राज्यानं समन्वय ठेवता येईल याची चर्चा झाली.
यासंदर्भात माहिती देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.
एकंदर येणारा अलमट्टी धरणातील येवा आणि पुढे जाणारा येवा आणि महाराष्ट्रातील पडणारा पाऊस या सगळ्यावर डायनॉमिकली आपण जर कंट्रोल ठेवला तर मग कुठ���न किती पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती लेवल ठेवायची आणि खास करुन अलमट्टीची वर चांगलं नियंत्रण ठेवता येईल अशी चर्चा झाली. मला खात्री आहे की, आलेल्या पावसाळ्यात आणि पुढे देखील या पद्धतीत अधिक सुधारणा होत जाईल. या वर्षीच्या पावसाळ्यातील येणाऱ्या संभाव्य पुराची येईलचं असं नाही, पण जर आलाच पूर तर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समन्वय चांगल्या पद्धतीने साधण्यासाठी आजची बैठक उपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे.
****
राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रायगड जिल्ह्यात दुपारी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील सावित्री, गंधारी, कुंडलिका, आंबा, गाडी, उल्हास, पाताळ गंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वडखळ ते अलिबाग मार्गावर पर्यटकांची वाहनं मोठ्या प्रमाणात जमली असून कार्ले खिंडीत पर्यटकांची अँटीजेन चाचणी सुरू आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या पर्यटनाला बंदी आहे, पोलिस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड इथ महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महागाई विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं केंद्र सरकार विरूध्द तीव्र निदर्शन केली. परभणी जिल्ह्यातही जिंतूर इथं कॉंग्रेसच्यावतीनं शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करत तहसील कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव इथं एक एकर जागेमध्ये तीन हजार वृक्ष लागवडीची मोहीम आजपासून आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. आनंदवन घनवन योजनेतून एकाच जागी विविध प्रकारचे तीन हजार वृक्ष लागवड करून मियावाकी मिशन २०२१ बळकट करण्यासाठीची ही मोहीम आहे.
****
शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीनं साजरा होणार असल्याची माहिती शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन पद्धतीनं राज्यातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. वर्धापन दिन, कोरोना लसीकरण, रक्तदान शिबिरं, शैक्षणिक साहित्यांचं वाटप आदी सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा होणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं.
****
सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाकडून दिव्यांगांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम राबवण्यात आली, यामध्ये दोन हजार जणांना लसीच्या मात्रा देण्यात आली असल्याची माहिती लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी दिली. शासनाच्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींचे तातडीनं लसीकरण पुर्ण करुन घेण्याचा सूचना होत्या. त्यानुसार ही मोहीम राबवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुंबई पोलिसांच्या कुटुंबियांसाठी आयोजित केलेल्या कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण विशेष मोहिमेचा शुभारंभ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. या मोहिमेबाबत समाधान व्यक्त करून ठाकरे यांनी या विषाणुच्या उच्चाटनासाठी सर्वांना सरकारी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं.
****
लातूर शहरात उद्यापासून ३० वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. शहरातील जास्तीत जास्त तरुणांनी या मोहिमेचा लाभ घेत लसीकरण करून घ्यावं असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक हजार १३४ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ३८ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार ९९६ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या २५ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५९ हजार ५४६ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ३१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही त्यामुळे मंगल कार्यालयांना टप्याटप्यानं कार्यक्रमासाठी परवानगी मिळवून देण्यात येईल असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिलं आहे. लातूर जिल्ह्यातील मंगल कार्यालयं पूर्ववत सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी मंगल कार्यालय संघटनेच्या शिष्टमंडळानं आज लातूर इथं देशमुख यांची भेट घेऊन केली, त्यावेळी ते बोलत होते. व्यावसायिकांच्या मागणीचा सहानुभुतीपूर्वक विचार करून मार्गदर्शक सुचनांचं पालन करीत निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 May 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०६ मे २०२१ सकाळी ७.१० मि. ****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
· राज्य सरकारचा मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देणारा कायदा, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द.
· आरक्षणाबाबत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी तातडीनं निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती; आज केंद्र सरकारला पत्र पाठवणार.
· राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे माहिती न मांडल्यामुळे आणि संपूर्ण प्रक्रियेत समन्वय न ठेवल्यामुळे आरक्षण रद्द - विरोधी पक्षनेते, देवेंद्र फडणवीस.
· देशात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट अटळ असल्याच�� मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विज�� राघवन यांचा इशारा.
· राज्यात ५७ हजार ६४० नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १४१ जणांचा मृत्यू तर सहा हजार ६५८ बाधित.
· आरोग्य सुविधांसाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी रेपो दराने पुढील तीन वर्षासाठी बँकांना उपलब्ध करुन देण्याची भारतीय रिझर्व बँकेची घोषणा.
आणि
· सहकार अधिनियमात दुरुस्ती करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता.
****
राज्य सरकारचा मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देणारा कायदा, सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय आणि मागास आयोगाचा अहवाल, यावरुन मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरवलं जाऊ शकत नाही, असं न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे. १९९२ मध्ये इंद्रा सहानी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं, ५० टक्के आरक्षण मर्यादा घालून दिली होती. राज्यानं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे, या मर्यादेचं उल्लंघन होत असल्या कारणानं, या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला विविध याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयानं काल हा निकाल दिला.
५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यासारखी परिस्थिती नाही, असं सांगत इंद्रा सहानी खटल्याबाबत पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज वाटत नसल्याचंही, न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, ९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश न्यायालयानं वैध ठरवले आहेत.
****
न्यायालयाचा निर्णय हा महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि लढवय्या समाजाच्या दृष्टीनं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केल्यामुळे, आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याआधी शहाबानो प्रकरण, ॲट्रॉसिटी कायदा तसंच ३७० कलम काढण्यासंदर्भात, केंद्रानं तत्पर निर्णय घेऊन न्याय प्रियता दाखवली आहे. यासाठी घटनेतही बदल केले आहेत, आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निमित्तानं कुणी महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नये, जनतेनं उगाच डोकी भडकवून घेऊ नयेत, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहील, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढाकार घेण्यासाठी आपण केंद्र सरकारला पत्र पाठवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल जनतेशी संवाद साधताना सांगितलं, ते म्हणाले –
सर्वोच्च न्यायालयाने निकाल देतांना पुढचा मार्ग दाखवलेला आहे. आरक्षण देणं हा अधिकार केंद्र सरकारचा आणि माननीय रा��्ट्रपतींचा आहे. महाराष्ट्रामधे ज्या वेळेला हा निर्णय घेतला गेला, तेव्हा जे सर्व पक्ष एकत्रित आले होते, ते सर्व पक्ष आजसुध्दा एकत्रित आहेत. आम्ही एकमुखी आापल्याला विनंती करतो आहे की आपल्याला जे जे काही सहकार्य आमच्या राज्यातून पाहिजे असेल ते आम्ही करतो आहोत. या समाजाला न्याय देण्यासाठी आता केंद्र सरकारनी जास्त वेळ न लावता निर्णय घ्यावा. जर का आम्हाला तिकडे येऊन भेटण्याची आवश्यकता असेल तर ते ही आम्ही करायची तयारी आहे.
****
सर्वोच्च न्यायालयानं नमूद केल्याप्रमाणे, एकशे दोनाव्या घटनादुरुस्तीमुळे राज्यांना अधिकार राहत नसतील, तर मराठा आरक्षणाचा सामाजिक आणि शैक्षणिक मागास कायदा, केंद्र सरकारकडे पाठवण्याची राज्य शासनाची तयारी आहे, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष, अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. न्यायालयाचं विस्तृत निकालपत्र उपलब्ध झाल्यानंतर या पर्यायासह इतरही सर्व पर्यांयाचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल, मराठा समाजाला दिलासा मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले.
****
राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे माहिती मांडली नाही, या संपूर्ण प्रक्रियेत राज्य सरकारचा समन्वय नव्हता, त्यामुळे मराठा आरक्षण रद्द करण्याचा निराशाजनक निर्णय पाहायला मिळत आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात वार्ताहरांशी बोलतांना व्यक्त केली. या निर्णयानंतर राज्य शासनानं सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील तज्ज्ञ विधीज्ञांची एक समिती तयार करून, मराठा आरक्षणासंदर्भातील या निर्णयाची न्यायिक रणनिती ठरवून सर्वपक्षीय बैठकीसमोर मांडावी, मराठा समाजाच्या कल्याणासाठी असलेल्या योजना, विकास महामंडळ यांना निधी देऊन त्यांच्या योजना जोमानं सुरु ठेवाव्यात, अशी सूचना फडणवीस यावेळी केली.
****
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारनं जोमानं बाजू मांडली, केंद्र सरकारनंही सर्वतोपरी प्रयत्न केले, त्यामुळे कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला आता कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनानं मिळून मार्ग काढावा, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चानं खंत व्यक्त करत, या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. औरंगाबाद इथं रमेश केरे पाटील आणि अप्पासाहेब कुढेकर यांनी क्रांती चौकात आत्मक्लेश आंदोलन केलं. परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जालना इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात, सरकार विरोधात सामूहिक मुंडण करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा, केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी दिला आहे. नवी दिल्लीत काल ते वार्ताहरांशी बोलत होते. या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहण्याचं आवाहन त्यांनी यंत्रणेला केलं आहे. देशातील संसर्गाची सध्याची परिस्थिती, आणि भविष्यातील परिस्थिती, याविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली. तिसरी लाट कधी येईल आणि किती काळ राहील याचा अंदाज वर्तवणं कठीण आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य तयारी करत असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातली आरोग्य व्यवस्था सक्षम केली जात असल्याचं सांगताना ते म्हणाले –
येत्या काही दिवसांत महाराष्ट्र हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाच पाहिजे ही आपली अटकळ नव्हे हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यादृष्टीने आपण हालचाल ही करतो आहोत. रेमडिसीवरचा पुरवठा हा आवश्यकतेनुसार आपण प्रत्येक जिल्ह्याला करतो आहोत. या सगळ्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल करतो आहोत की जेणेकरून तिसरी लाट, दुसरी लाट तर लवकर थोपवायची आहेच, पण तिसरी लाटसुध्दा जर का आली तर तिचा घातक दुष्परिणाम आपल्या राज्यावर होऊ द्यायचा नाही हा चंग बांधून आपलं महाराष्ट्र सरकार काम करत आहे.
****
राज्यात काल ५७ हजार ६४० कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ४८ लाख ८० हजार ५४२ झाली आहे. काल ९२० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ७२ हजार ६६२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. काल ५७ हजार ६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४१ लाख ६४ हजार ९८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८५ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख ४१ हजार ५६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सहा हजार ६५८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १४१ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २७, बीड ३७, लातूर ३१, नांदेड २१, परभणी ११, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी आठ, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सात रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ९४४ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात एक हजार ४३९, लातूर एक हजार ३०६, जालना ८२८, परभणी ७८५, उस्मानाबाद ७८३, नांदेड ४२२, तर हिंगोली जिल्ह्यात १५१ रुग्ण आढळले.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल विविध उपायांची घोषणा केली. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल माध्यमांना याबाबत माहिती दिली. देशाच्या आरोग्य सुविधांसाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, बँकांना रेपो दराने पुढील तीन वर्षांसाठी हा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, विशेष खिडकी योजना ३१ मार्च २०२२ पर्यंत खुली राहील, त्याचबरोबर ��ैयक्तिक कर्जदार तसंच सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना कर्ज पुनर्रचनेची संधी पुन्हा खुली असेल, असं दास यांनी सांगितलं. राज्यांची ओव्हरड्राफ्टची सुविधा ३६ दिवसांऐवजी ५० दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यांना ३० सप्टेंबर पर्यंत या सुविधेचा लाभ घेता येईल, असं त्यांनी सांगितलं. बँकेत खाते उघडण्यासाठी विविध श्रेणीत व्हीडिओद्वारे केवायसी प्रक्रिया राबवणार असल्याचंही दास यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीमुळे सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होऊ शकल्या नाहीत, या पार्श्वभूमीवर या सहकारी संस्थांचे अनेक सदस्य, अक्रियाशील सदस्य ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन, सहकार अधिनियमात दुरुस्ती करण्यास काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पाच वर्षांच्या कालावधीत सर्व सदस्य मंडळाच्या किमान एका बैठकीला उपस्थित असणं बंधनकारक आहे. मात्र कोविड साथीमुळे या बैठकाच होत नाहीत, परिणामी गेल्या पाच वर्षात जे सदस्य एकाही बैठकीला उपस्थित राहु शकले नाहीत, ते अक्रियाशील सदस्य ठरून, संस्थेच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रीमंडळानं मान्यता दिली.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित करून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात त्याचं विलीनीकरण करण्यासही, काल मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे नियोजन विभागाकडे हस्तांतरण करण्याचा निर्णयही, या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर सातारा इथं कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली.
****
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ, राज्यात काल भाजपनं ठिकठिकाणी आंदोलन केलं. विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूरचे जिल्हाध्यक्ष प्रवीण दटके यांनी, नागपुरात टिळक पुतळा इथं आंदोलन केलं.
औरंगाबाद शहरात माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुलजी सावे यांच्यासह कार्यककर्त्यांनी, निषेधाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. वैजापूर इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नायब तहसीलदार दीपाली खेडकर यांना याबाबत निवेदन दिलं.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही, बीड इथल्या भाजपा कार्यालयाबाहेर निषेध व्यक्त केला. यावेळी कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी दरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद इथं जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. परभणी जिल्ह्यात गंगाखेड जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांच्या उपस्थितीत, निषेध आंदोलन करण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या काटगाव इथल्या घट्टेवाडी शिवारात, काल दुपारी वीज पडून ३० शेळ्यांसह एका अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. धर्मेश कोळी असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे दोन रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द केल्या आहेत. मुंबई -जालना- मुंबई ही रेल्वे गाडी १० मे ते एक जुलैपर्यंत, आणि कोल्हापूर- नागपूर- कोल्हापूर ही रेल्वे गाडी, १० मे ते २८ जून दरम्यान धावणार नसल्याचं, रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. लातूर - मुंबई रेल्वेही ३० जूनपर्यंत बंद राहणार असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
परभणी इथं कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू केलेली असतांना, काही व्यापारी आणि विक्रेते छुप्या पद्धतीनं व्यवहार सुरु ठेवत आहेत. याबद्दल महसूल प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करुन गुन्हे नोंदवले जाईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर यांनी दिला आहे.
दरम्यान, परभणी शहरात संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करत दुकानं सुरु ठेवण्याऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध महापालिकेनं काल कारवाई केली. यावेळी शहरात शिवाजी चौकातली १० दुकानं आणि वसमत रोडवरील एका दुकानाविरुध्द कारवाई करत ४९ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. विनामास्क फिरणाऱ्या ४० नागरिकांनाही दंड ठोठावत आठ हजार रुपये वसूल करण्यात आले.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा, सेनगाव तालुक्यातील डोंगरी भागात सध्या मोहफुले संकलनाचं काम जोरात सुरू आहे. शासनानं मोहफुलांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** राज्य सरकारचा मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १६ टक्के आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
** मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आणि मागास आयोगाच्या अहवालावरुन मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे हे स्पष्ट होत नसल्याचं न्यायालयाचं मत
** न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि लढवय्या समाजाच्यादृष्टीनं दुर्देवी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच ठेवण्याचा निर्धार
** आरक्षणाचा बचाव करण्यात सत्ताधारी आघाडी सरकारला पूर्ण अपयश - चंद्रकांत पाटील
आणि
** शिक्षण हक्क कायद्यांतर्गंत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया संचारबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यावर राबवणार- शिक्षण संचालनालयाचं स्पष्टीकरण
****
मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरवले जाऊ शकत नाही, असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारचा मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १६ टक्के आरक्षण देणारा कायदा रद्द ठरवला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय आणि मागास आयोगाचा अहवाल यावरुन मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे हे स्पष्ट होत नसल्याचं न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे.
१९९२ मध्ये इंद्रा सहाणी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ५० टक्के आरक्षण मर्यादा घालून दिली होती. नऊ सदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला होता. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं केलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला विविध याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं आज हा निकाल दिला.
५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यासारखी परिस्थिती नाही असं सांगत इंद्रा सहानी खटल्याबाबत पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज वाटत नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान ९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश न्यायालयानं वैध ठरवले आहेत.
****
न्यायालयाचा निर्णय हा महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि लढवय्या समाजाच्यादृष्टीनं दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केल्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान आणि ��ाष्ट्रपतींनीच घ्यावा अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याआधी शहाबा��ो प्रकरण, ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात तसंच ३७०कलम काढण्यासंदर्भात, केंद्रानं तत्पर निर्णय घेऊन न्याय प्रियता दाखवली आहेच. यासाठी घटनेतही बदल केले आहेत. आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी,” अस ठाकरे यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निमित्ताने कुणी महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नये. जनतेनं उगाच डोकी भडकवून घेवू नयेत. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहील, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
****
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा लढा संपला नसून या पुढची कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर आम्ही आजपर्यंत संवैधानिक प्रक्रियेनं आणि पूर्ण क्षमतेनं हा विषय मांडल्याचं सांगितलं. ते म्हणाले…..
केंद्र सरकारच्या अखत्यारित हा विषय आहे. त्यांनी ही जबाबदारी घ्यावी. केंद्र सरकार म्हणतना की आता केंद्रसरकारच्या अखत्यारित हा विषय आहे. राष्ट्रपतींकडे हा अधिकार आहे. राज्यांनी तो शिफारस करुन पाठवावा. आम्ही सर्व ही प्रकीया पूर्ण करायला तयार आहोत. अजूनही हा लढा संपलेला नाही असं आमचं स्पष्ट मत आहे.
****
सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाच्या बाजूने याचिका दाखल केलेले सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले……
न्यायालयाच्या विरोधात आम्हाला बोलायचं नाही, परंतू हा निर्णय दुर्दैवी आहे. याचा परिणाम संपूर्ण तरुण पिढीवर होणार आहे. आणि याच्या बद्दल सुमारे एक हजार पेक्षा अधिक पानांची याची कॉपी आहे. ही पूर्ण फाइडिंगस आल्यानंतर, डिटेल्स ऑर्डर आल्यानंतर वकीलांसोबत चर्चा करुन समाजाच्या वतीने, तरुणांच्या वतीने काय पाऊल उचलायचं आणि कशा पद्धतीने पूढं जायचं याचा निर्णय आम्ही ऑर्डर आल्यानंतर घेऊ.
****
मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात बचाव करण्यात राज्यातील शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडी सरकारला पूर्ण अपयश आलं असून आघाडी सरकारमुळे मराठा समाजानं शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण गमावलं आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. यामुळे मराठा तरूण तरुणींच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला असून मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला माफ करणार नाही, असं ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारनं सातत्यानं चुका केल्या. परिणामी गेल्या वर्षी आधी सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षणाला स्थगिती आली आणि आता तर ते रद्दच झाले आहे असं ते म्हणाले.
****
राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चानं खंत व्यक्त करत, या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. ���रंगाबाद इथं रमेश केरे पाटील आणि अप्पासाहेब कुढेकर यांनी क्रांती चौकात आत्मक्लेश आंदोलन केलं. परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जालना इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, अंबड तालुक्यातल्या साष्टपिंपळगाव इथं राष्ट्रीय महामार्ग ५२ वर ठिय्या आंदोलन सुरू केल्यानं महामार्गावर अनेक वाहने अडकून पडली आहेत.
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकार विरोधात सामूहिक मुंडण करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
नाशिक शहरातील पंचवटी कारंजा इथं शिव पुतळ्या समोर समाजाच्या स्थानिक नेत्यांनी आरक्षणाचा लढा पुन्हा नव्या जोमाने लढण्याची शपथ घेत, आज रात्री समाजाची ऑनलाइन बैठक होणार असून त्यात आंदोलनाची भूमिका ठरविण्यात येईल असं मराठा क्रांती समाजाचे समन्वयक करण गायकर यांनी सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पश्चिम बंगालमध्ये झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज ठिकठिकाणी आंदोलनं केलं. विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्य भाजपाचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूर भाजपाचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी नागपुरात टिळक पुतळा इथं आज सकाळी आंदोलन केलं. औरंगाबाद शहरात माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुलजी सावे, यांच्यासह कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. वैजापूर इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार दीपाली खेडकर यांना याबाबतचे निवेदन सादर केलं. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही आज बीड इथल्या भाजपा कार्यालयाबाहेर निषेध व्यक्त केला. उस्मानाबाद इथं जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. नाशिक इथं भाजपच्या खासदार डॉ भारती पवार, आमदार सीमा हिरे, भाजप नेते विजय साने यांच्या उपस्थितीत तर धुळे शहरात खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत आंदोलन केलं. सोलापूर इथं आमदार विजयकुमार देशमुख, आमदार समाधान आवताडे, अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.
****
शिक्षण हक्क कायदा- आरटीई अंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया संचारबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यावरच राबवण्यात येणार असल्याचं शिक्षण संचालनालयानं स्पष्ट केलं आहे. आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात ९ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६८४ उपलब्ध जागांसाठी २ लाख २२ हजार ५८४ अर्ज दाखल झाले होते. शिक्षण संचालनालयानं ७ एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत जाहीर केली होती, त्यात ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील काटगाव इथल्या घट्टेवाडी शिवारात आज दुपारी वीज पडुन ३० शेळ्यांसह एका अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. धर्मेश कोळी असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे.
//*********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 April 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २१ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा. ****
आतापर्यंत १३ कोटी लाभार्थ्यांना लसीकरण करुन भारत सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश ठरला आहे. देशभरात काल जवळपास ३० लाख नागरिकांना लस टोचण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं.
दरम्यान, देशात काल नव्या दोन लाख ९५ हजार कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दोन हजार २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी ५६ लाख १६ हजार १३० झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ८२ हजार ५५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल एक लाख ६५ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत, एक कोटी ३२ लाख ७६ हजार ३० रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८५ पूर्णांक एक दशांश टक्के इतका आहे. देशात सध्या २१ लाख ५७ हजार ५३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
भारत आणि ब्रिटन दरम्यान सर्व विमान उड्डाणे येत्या २४ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आली आहे. ब्रिटननं जाहीर केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं एयर इंडियानं सांगितलं आहे. विमानांच्या उड्डाणांविषयी माहिती, तिकीटाचे पैसे परत करण्यासंर्भातली माहिती प्रवाशांना कळवण्यात येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं महाराष्ट्र-गोवा सीमा बंद केली आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी आता प्रत्येकाला रॅपिड अँटिजेन चाचणी करणं बंधनकारक असणार आहे.
****
श्रीरामनवमी आज साजरी होत आहे. ठिकठिकाणच्या राम मंदीरांमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा साजरा झाला. भाविकांना दर्शनासाठी मंदीरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांनी दाखवलेल्या सत्याच्या, लोककल्याणाच्या मार्गावरुन चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करु या, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
विविध शासकीय विभागांच्यामार्फत खाजगी माल वाहतूकदारांकडून जी वाहतूक करण्यात येते, त्यातील २५ टक्के माल वाहतूकीचं काम, राज्य परिवहन महामंडळास देण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे लवकरात लवकर ��िकाली काढण्यासाठी, शंभर जलदगती न्यायालयांना, एक एप्रिल, २०२१ ते ३१ मार्च २०२२ या एक वर्षाच्या कालावधीकरता मुदतवाढ देण्यास, तसंच सदर न्यायालयांकरता जिल्हा न्यायाधीश आणि कर्मचारी वर्गासह, एकूण ५०० पदे पुढे सुरु ठेवण्य���स, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागानं अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांच्या तयारीसाठी, नवीन योजना जाहीर केली आहे. यामध्ये १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, त्यांना दिल्ली अथवा महाराष्ट्रातील नामवंत खासगी संस्थांमध्ये, पूर्व परीक्षा ते मुलाखत या सर्व टप्प्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दहा द्रवरूप प्राणवायू खाटा उपलब्ध करून देण्याची मागणी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांना निवेदन दिलं आहे. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, अनेक लोक शहरापर्यंत उपचार घेण्यासाठी येण्यास तयार होत नाहीत, यामुळे तात्काळ अशी सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात यावी, या मागणीवर कदम यांनी भर दिला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी, उस्मानाबाद शहरातल्या एक, कळंब शहरातल्या एक आणि उमरगा शहरातल्या तीन खासगी रुग्णालयांच्या इमारतींना, समर्पित कोविड सुश्रुषा केंद्राचा दर्जा दिला आहे. या खाजगी रुग्णालयातल्या १३५ पैकी ८५ खाटा, कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय उस्मानाबाद शहरातल्या दोन खासगी रुग्णालयांमधल्या रुग्णखाटांची संख्या वाढवण्यास, आणि वाशी इथल्या दोन खाजगी कोविड सुविधा केंद्रातल्या वाढीव रुग्णखाटांनाही, जिल्हाधिकाऱ्यांनी आज मान्यता दिली.
****
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं, नवीन ५०० रुग्णखाटाचं कोविड सुश्रुषा केंद्र सुरू केलं जाणार आहे. थोरात यांनी काल संगमनेर शहर आणि तालुक्यातल्या प्रशासकीय तसंच आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.
****
रेमडेसिवीर इंजेक्शन औषध विक्रेताच्या मदतीने चढ्या भावात विकणाऱ्या दोघांना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली. ३७ हजार रुपयांना या इंजेक्शनची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, ही कारवाई करण्यात आली.
****
0 notes