Tumgik
#महाराष्ट्रातल्या
airnews-arngbad · 11 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
आरक्षण व्यवस्थेला कोणीही बाधा पोहोचवू शकणार नाही-केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही.
फ्लोरेन्स नाईटिंगल राष्ट्रीय परिचर्या पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून अयोध्येसाठी नांदेडहून पहिली रेल्वे. 
चंद्रपूर जिल्ह्यात आज चार शेतकऱ्यांचा वीजेचा धक्का बसून मृत्यू.
आणि
भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल.
****
देशातल्या आरक्षण व्यवस्थेला कोणीही बाधा पोहोचवू शकणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका मुलाखतीदरम्यान, आरक्षण संपवण्याबाबत विधान केलं होतं, त्या अनुषंगाने शाह यांनी, भारतीय जनता पक्ष असेपर्यंत आरक्षणाला कोणी धक्का लावू शकणार नाही, असं म्हटलं आहे. ट्विटरवरच्या एका संदेशातून शाह यांनी, आरक्षणविरोधी भूमिकेवरून राहुल गांधी तसंच काँग्रेस पक्षावर टीका केली. राहुल गांधी यांच्या या विधानामार्फत काँग्रेस पक्षाचेच आरक्षणविरोधी विचार व्यक्त होत असल्याचं शाह यांनी नमूद केलं.
भारतीय जनता पक्षाच्या देशभरातल्या विविध नेत्यांनी गांधी यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं पत्रकारांशी बोलतांना, काँग्रेस पक्ष हा मतांसाठी खोटं नरेटिव तयार करतात, हेच राहुल गांधी यांच्या वक्तव्यानं स्पष्ट झाल्याची टीका केली. ते म्हणाले..
भारताच्या संविधानाचा संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधीच सन्मान केला नाही. केवळ मतांच्या करता कशा प्रकारे ते खोटा नरेटीव्ह करतात, हे आता राहूल गांधीच्या वक्तव्याने स्पष्ट झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाची भूमीका स्पष्ट आहे. आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. हे आरक्षण बंद केले जाऊ देणार नाही.
****
जल जीवन मिशन तसंच स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत पाटील बोलत होते. घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, वैयक्तिक घरकुलं तसंच शौचालयांची कामं जलद पूर्ण करावीत, तसंच जल जीवन मिशनच्या सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. १५ व्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून या घटकांवर खर्च करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात याव्यात, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं
****
सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले एक कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. दूरसंचार विभागानं ही माहिती दिली. गेल्या पंधरवड्यात साडेतीन लाखांहून अधिक स्पॅम क्रमांक खंडित केले असून ५० संस्थांना काळ्या यादीत टाकल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासंदर्भात नीती आयोगानं दिलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. मुंबई आणि महानगर परिसराचं सध्याचं उत्पादन १४० अब्ज डॉलर इतकं असून २०३० पर्यंत हे उत्पादन ३०० अब्ज डॉलर्स इतकं करण्याचं उद्दिष्ट या समितीपुढे ठेवलं आहे. थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करणं, ती टिकवून ठेवणं, स्टार्टअप आणि रोजगार क्षमतेला चालना देणं आदी जबाबदाऱ्या या समितीकडे सोपवण्यात आल्या आहेत.
****
पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी कुटुंबासाठी पोषण अभियान लाभदायक ठरत आहे. या अभियानाच्या माध्यमातून वळणपाडा अंगणवाडी भागातल्या बालकांना ताजा पोषण आहार मिळत आहे. तसचं गर्भवती मातांना देखील पौष्टिक आहार पुरवला जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
फ्लोरेन्स नाईटिंगल राष्ट्रीय परिचर्या पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. परिचर्या क्षेत्रातल्या असामान्य सेवेसाठी परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आज राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात देशभरातल्या १५ परिचारिकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या चिपळूण इथल्या आशा बावणे यांचा समावेश आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे  देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल.
****
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेड इथून २० ते २२ सप्टेंबर दरम्यान निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी केलं आहे...
अयोध्या येथे जाण्यासाठी जवळपास दोनशे लाभार्थ्यांची आम्हाला निवड करायची आहे. आमच्याकडे जवळपास तिर्थदर्शन योजनेमध्ये शंभरएक प्रस्ताव पात्र ठरले आहेत. असा दोनशे लाभार्थ्यांची पहिली ट्रेन आपल्या नांदेडमधून निघणार आहे. ती महाराष्ट्रातील पहिली ट्रेन असणार आहे. तर सर्व जेष्ठांना मी आवाहन करु इच्छितो की, आपण या योजनेचा लाभ घ्यावा. ३० सप्टेंबर पर्यंत आपल्याला नाव नोंदणी करता येणार आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यात आज चार शेतकऱ्यांचा वीजेचा धक्का बसून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर इथं शेतामध्ये खतांची फवारणी करत असताना ही घटना घडली. सदर घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचं रक्षण करण्यासाठी ही वीजेची तार लावल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुद्रांक शुल्क चुकवणाऱ्या तसंच मुद्रांक शुल्क वेळेवर न भरणाऱ्या नागरिकांसाठी शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अभय योजनेचा सोलापूर जिल्ह्यातील एक हजार १४२ जणांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्क विभागाचे थकीत असलेले पाच कोटी ६९ लाख १२ हजार ९८७ रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात या योजनेचा शंभर टक्के थकबाकीदारांनी लाभ घेतल्याची माहिती मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने देण्यात आली आहे
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने बीड, नांदेड तसंच हिंगोलीसह अनेक ठिकाणी 'स्वच्छता ही सेवा ' ही मोहीम १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत राबवल्या जाणाऱ्या विविध दैनंदिन उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
****
लातूर शहरातील विवेकानंद चौक परिसरात आज सकाळी भूगर्भातून आवाज झाला. त्यामुळे लातूर शहराला भूकंपाचा धक्का झाल्याची चर्चा होऊ लागली. मात्र भूकंप मापन केंद्रात भूकंपाची कसलीही नोंद झालेली नाही. त्यामुळे लातूर शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केलं आहे.
****
भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने गतविजेत्या मलेशियावर आठ विरूद्ध एक असा दणदणीत विजय मिळवला. राजकुमार पालने तीन, अराईजीतसिंह हुंडल ने दोन, तर जुगराजसिंह, हरमनप्रीत सिंह आणि उत्तमसिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताचा पुढचा सामना येत्या शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.
****
ज्येष्ठा गौरी पूजनाचा सोहळा आज घरोघरी साजरा झाला. काल घरोघरी स्थापन झालेल्या गौरींची आज पारंपरिक रितीरिवाजानुसार साग्रसंगीत पूजा करून, त्यांना पुरणपोळी, सोळा भाज्या आणि पक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. दरम्यान, पाच दिवसांच्या गणपतींचं आज अनेक भागात विसर्जन होत आहे.
****
शेतमालाला योग्य भाव देण्यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आज ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी शेतकरी कुटुंबातल्या महिला वर्गानं या आंदोलनात सहभाग घेतला.
****
यशवंतराव चव्हाण केंद्र, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय आणि एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर इथं चित्रपट चावडी हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमात आचार्य विनोबा भावे जयंतीनिमित्त 'दिशा स्वराज्याची' या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात येणार आहे. वीरेंद्र वळसंगकर यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केलं आहे. एमजीएम परिसरातल्या चित्रपती व्ही. शांताराम प्रेक्षागृहात येत्या शनिवारी १४ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता या माहितीपटाचं प्रदर्शन केलं जाईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचं, आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे सध्या अठरा दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरीकाठच्या गावांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्या व्यतिरिक्त गेवराई आणि माजलगांव तालुक्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून पुरामुळं बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरीत मदत पोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
0 notes
marathicelebscom · 20 days
Text
देवदत्त नागे साकारणार महादेव | स्टार प्रवाहची नवी मालिका उदे गं अंबे कथा साडे तीन शक्तिपीठांची
स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी पौराणिक मालिका उदे गं अंबे कथा साडे तीन शक्तिपीठांची विठुमाऊली आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे नवी पौराणिक मालिका ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’. देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या…
0 notes
marmikmaharashtra · 2 months
Link
https://marmikmaharashtra.com/romantic-action-love-story-naad-releases-hard-motion-poster-hits-theaters-on-october-11/
0 notes
Text
कोकम : कोकणातलं हे आगळंवेगळं फळ पोटाचा 'एसी' का आहे?
https://bharatlive.news/?p=152827 कोकम : कोकणातलं हे आगळंवेगळं फळ पोटाचा 'एसी' का आहे?
महाराष्ट्रातल्या ...
0 notes
prakashmasale · 2 years
Text
Tumblr media
डिसेंबर महिना म्हणजे पार्टी आणि सेलिब्रेशन ! तुम्हीही नॉनव्हेज पार्टी प्लॅन करत असाल तर प्रकाश मसाले आणा आणि महाराष्ट्रातल्या विविध प्रांतातील अस्सल चवीचे नॉनव्हेज घरच्या घरीच बनवा.
0 notes
acharyaelections · 2 years
Text
आजच्याच दिवशी जवळपास सव्वा सातशे वर्षांपुर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. जन्माला येणं आणि आपलं संपुर्ण आयुष्य समाजाच्या कार्याला वाहून देणं हे संताचं फार मोठं वैशिष्ठ आहे.
1 note · View note
loksutra · 2 years
Text
Maharashtra Politics: महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये उपस्थित होते.
Maharashtra Politics: महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये उपस्थित होते.
भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये साजरा. महाराष्ट्र राजकीय बातम्या: भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर (नरेंद्र भोंडेकर) यांचा वाढदिवस गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे राजकीय संकट: एकनाथ शिंदे (एकनाथ शिंदेया बंडानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार संकटाच्या ढगाखाली आहे. उद्धव ठाकरेही मध्येच अडकले असून महाराष्ट्रातल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hometips-marathi · 3 years
Text
महाराष्ट्रातल्या मुसलमानांची मातृभाषा मराठीच असायला हवी असं हमीद दलवाई म्हणायचे
महाराष्ट्रातल्या मुसलमानांची मातृभाषा मराठीच असायला हवी असं हमीद दलवाई म्हणायचे
जेंव्हा जेंव्हा दोन मोठे व्यक्ती भेटतात, त्यांच्यात चर्चा -गप्पा गोष्टी होतात. अन त्यातून बरंच काही ज्ञान देऊन जातात. असेच दोन मोठे व्यक्ती म्हणजे हमीद दलवाई आणि नरहर कुरुंदकर. त्यांच्यात छान मैत्री होती. एका अशाच भेटीत त्यांच्या चर्चेचा विषय होता मुसलमानांच्या मातृभाषेचा. कथाकार, कादंबरीकार म्हणून हमीद दलवाई नुकतेच समोर येत होते. मराठीचे एक नवोदित मुस्लिम लेखक म्हणून मराठी लेखकवर्ग त्यांच्याकडे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 15 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला राज्यभरात प्रारंभ-गणेश स्थापनेसाठी सर्वत्र भाविकांची लगबग
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना तत्काळ पदमुक्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
पंजाबातल्या तिहेरी हत्याकांड प्रकारातल्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं अटक
आणि
पॅरिस पॅरालिम्पिकच्या समारोप सोहळ्यात तीरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल भारताचे ध्वजवाहक
****
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला आजपासून प्रारंभ झाला. लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी राज्यभर सर्वत्र जय्यत तयारी सुरू असून धार्मिक रितीरिवाज, परंपरेला जपत मंगलमूर्तीचा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग दिसून येत आहे. राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना झाली असून गणेश मंदिरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गणेशोत्सवानिमित्त आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या. हा उत्सव देशाच्या अनेक भागांमध्ये सामूहिक आनंद आणि सामाजिक उर्जेचं एक सुंदर उदाहरण असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं आहे. “भारतीय परंपरेत गणेशाला शुभ आणि विघ्नहर्ता मानलं जातं. संकटांपासून सर्वांचं रक्षण व्हावं आणि समृद्धी यावी” यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
****
मुंबईत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन इथे गणरायाची प्रतिष्ठापना झाली.
गणरायांचं कृपाछत्र सर्व महाराष्ट्रातल्या जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायांकडे केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभे राहील, राज्यातल्या सर्व नागरिकांसाठी सरकारनं दोन वर्षात विकासाचं पर्व आणलं असून शेतकरी आणि ज्येष्ठांच्या जीवनात बदल होत आहे याचं समाधान असल्याचं ते म्हणाले.
****
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गणेश चतुर्थीला मुंबईच्या लालबागचा राजा, गणेश गल्लीतला मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते.
****
पुण्यात कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या पाच मानाच्या गणपतींचं ढोलताशाच्या गजरात आगमन झालं.
कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांनी लेझीम आणि ढोलपथकासह बाप्पाच्या मूर्ती घरी आणल्या. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा एक लाख ६६ हजार ८६७ घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होत असून १२२ सार्वजनिक गणपती विराजमान होत आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. सकाळच्या सुमारास घरोघरी गणपती स्थापना झाल्यावर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. या प्रसंगी खासदार संदिपान भुमरे, माजी मंत्री डॉ भागवत कराड, गृहनिर्माण, तसंच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक हजार ६६० गणेश मंडळाची नोंदणी झाली असून ५४४ गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जात आहे.
दरम्यान, उमेद स्वयं सहाय्यता समूहातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने गणेश मूर्तीं विक्री उपक्रम राबवण्यात आला, गणेश भक्तांनी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला. या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं वृत्त आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच श्री गणेशाच्या आगमनाचा उत्साह दिसून आला. शहरातल्या वीर सावरकर चौक, फुले मार्केट, गांधी चमन चौक, नूतन वसाहत या भागात भाविकांची गणेश मूर्तीसह पूजेचं साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून आली. दरम्यान, यावर्षी जालना गणेश फेस्टिवलच्या वतीनं आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गणेशोत्सवानिमित्त शहरात पोलीस प्रशासनाच्यावतीनं चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
****
गणेशोत्सव ते दिवाळी या कालावधीत नागरिकांनी मिठाई, प्रसाद आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी, तसंच जनतेनं अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही जिल्हा अन्न प्रशासनानं आवाहन केलं आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहरात महापालिकेकडून दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा महापालिकेकडून ५८ ठिकाणी १०५ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय २ बंद दगडखाणींच्या ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. तसच यंदा विसर्जनासाठी स्वयंचलित कन्वेअर बेल्टची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
****
जम्मू काश्मिरच्या विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू काश्मिरला राज्याचा दर्जा बहाल करण्यात येईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मू इथं एका प्रचार सभेत ते बोलत होते. कलम ३७० हटवल्यानंतर होत असलेल्या या विधानसभा निवडणुका ऐतिहासिक असल्याचं शहा यांनी नमूद केलं.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्यात आलं आहे. खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आ��ारे प्रशासकीय सेवेत नियुक्ती मिळवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावर केंद्र सरकारने त्यांना प्रशासकीय कायदा १९५४ नुसार कारवाई करत प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पदावरून तत्काळ पदमुक्त केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंजाबात फिरोजपूर इथं एकाच कुटुंबातल्या तीन सदस्यांची हत्या करणाऱ्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं पोलिसांनी अटक केली. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर पोलिसांनी सापळा रचून या सर्वांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. या सर्वांना फिरोजपूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील नऊजणांना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडे ५०० किलोग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा गांजा, रोख रक्कम, मोबाईल फोन, टेम्पो असा सुमारे पावणे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्वांवर भिवंडीतल्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
****
धुळे शहराजवळच्या मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांनी तिघांकडून विदेशी बनावटीचं पिस्तुल आणि ४ जिवंत काडतूसं हस्तगत केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
****
नांदेड शहरातल्या वजीराबाद पोलीस ठाणे हद्दीत अफिम बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. त्याच्याकडून २७ ग्रॅम अफिम जप्त करण्यात आलं. सुखविंदरसिंघ सुरेंद्रसिंघ कालो असं या युवकाचं नाव आहे. अफिम आणि एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण सहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
****
गोंदिया जिल्ह्यातल्या पोगझरा गावात नाल्याला आलेल्या पुरात एकाच कुटूंबातील दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन आणि दीड वर्षीय चिमुकल्यांचा समावेश आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या वणी-पिंपळगाव रस्त्यावर आज चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात तिघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. मृतांमधे दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. चारचाकीने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पॅरीस पॅरालिम्पिक स्पर्धेचा उद्या समारोप होत आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत २७ पदकं जिंकली आहेत. यात ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या पॅरालिम्पिकच्या इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. उद्याच्या समारोप समारोहात हे दोघे भारतीय पथकातले ध्वजवाहक असणार आहेत. दरम्यान, या स्पर्धेत धावपटू सिमरन महिलांच्या दोनशे मीटर टी १२ अंतिम फेरीत, दिलिप गावित पुरुषांच्या चारशे मीटर टी ४७ अंतिम फेरीत आणि नवदीप पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात काही काळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे बाजारात खरेदी- विक्री करणाऱ्यांची काही काळ तारांबळ उडाली होती. जालना इथंही पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं.
****
0 notes
darshanpolicetime1 · 3 years
Text
महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार'; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ८ मार्च रोजी होणार सन्मानित
महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ८ मार्च रोजी होणार सन्मानित
नवी दिल्ली, 7 दिल्ली : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण 28 महिलांना ‘नारीशक्ती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष���ट्रातील तीन महिलांचा समावेश आहे. हे पुरस्कार वर्ष 2020 व 2021 साठीचे आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘नारीशक्ती पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कथक नृत्यांगना डाऊन सिंड्रोमप्रभावित सायली आगवणे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years
Text
नंदी, गणपती दूध पीत असल्याचे अनेक जिल्ह्यात अफवा | मंदिरात भाविकांची तुंबळ गर्दी; वैज्ञानिक कारण असल्याचा अंनिसचा दावा
नंदी, गणपती दूध पीत असल्याचे अनेक जिल्ह्यात अफवा | मंदिरात भाविकांची तुंबळ गर्दी; वैज्ञानिक कारण असल्याचा अंनिसचा दावा
मुंबई : महाराष्ट्रात (maharashtra) 21व्या शतकात लोक अंधश्रध्देवरती विश्वास ठेवत असल्याने अनेकांना नवल वाटले आहे. कारण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात गणपती आणि नंदी दूध पीत असल्याचे व्हिडीओ (video) भाविकांच्या मोबाईल फिरत असल्याचे निदर्शनास दिसून आले आहे. त्यामुळे अनेकांनी मंदिराची वाट धरली असून तिथं नंदी आणि गणपतीला दूध पाजत असल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. नंदी दूध पीत असल्याचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्रातल्या दंगलीसाठी उद्धव ठाकरे जबाबदार.. नितेश राणेंचा आरोप
https://bharatlive.news/?p=99125 महाराष्ट्रातल्या दंगलीसाठी उद्धव ठाकरे जबाबदार.. नितेश राणेंचा ...
0 notes
amhikastkar · 3 years
Text
[2nd] महात्मा ज्योतिराव फुले वेळ माफी यादी / यादी 2020
[2nd] महात्मा ज्योतिराव फुले वेळ माफी यादी / यादी 2020
ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना | कर्ज मुक्ती योजनेची यादी महाराष्ट्र | महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले सामना मफी योजना सूची एमजेपीकेएसवाय (mjpsky.maharastra.gov.in) यादी | सामना माफीची यादी महाराष्ट्रातल्या शहरांना खूप आनंद झाला आहे! प्रवास उद्धव ठाकरे ने कृषी वेळ प्रवास दुसरा (दुसरा)यादी जारी करा … ज्योतिराव फुले जनतेच्या मुक्ती योजनेचा अंतर्भाव केला गेला १ सूची००० पेक्षा जास्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hometips-marathi · 3 years
Text
बांबू लागवडीतून ४ ते ५ कोटींचे उत्पन्न शक्य आहे…? वाचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अनुभव
बांबू लागवडीतून ४ ते ५ कोटींचे उत्पन्न शक्य आहे…? वाचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अनुभव
काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती कि, जगभरातल्या तापमानात वाढ होत चाललीये. आता तुम्ही म्हणाल उन्हाळा आहे म्हंटल्यावर तापमान वाढणार नाही तर काय पाऊस पडणारे.. पण भिडू भौगोलिक उत्तर द्यायचं झालं तर सगळीकडं वातावरण सारखंच नसतं. जस आपल्याकडं दिवस असल्यावर विदेशात रात्र असती, तसंच हवामानात सुद्धा असतंय. त्यामुळे पहिली लाईन वाचूनच लगेच कमेंट करायला जाऊ नका. असो… तर एकूणच सगळ्या जगाचं तापमान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 15 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
ढोलताशाच्या गजरात आजपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वास सुरवात झाली आहे. लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी राज्यभर सर्वत्र जय्यत तयारी सुरू असून धार्मिक रितीरिवाज, परंपरेला जपत मंगलमूर्तीचा उत्सव दरवर्षीप्रमाणं यंदाही साजरा करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग पाहायला मिळत आहे. घरच्या बाप्पांसाठी आकर्षक सजावट ते अगदी पंचपक्वांनाच्या नैवेद्याचं नियोजनही महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक करत आहेत, राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना होत असून गणेश मंदिरांवरही रोषणाई करण्यात आली आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवानिमित्त आज देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव देशाच्या अनेक भागांमध्ये सामूहिक आनंद आणि सामाजिक उर्जेचं एक सुंदर उदाहरण असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं आहे. “भारतीय परंपरेत गणेशाला शुभ आणि विघ्नहर्ता मानलं जातं. संकटांपासून सर्वांचं रक्षण व्हावं आणि समृद्धी यावी” यासाठी आपण प्रार्थना केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
गणरायांचं कृपाछत्र सर्व महाराष्ट्रातल्या जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायांकडं केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभे राहील, राज्यातल्या सर्व नागरिकांसाठी सरकारनं दोन वर्षात विकासाचं पर्व आणलं असून शेतकरी आणि ज्येष्ठांच्या जीवनात बदल होत आहे याचं समाधान असल्याचं ते म्हणाले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल असून आता महाराष्ट्र उद्योगपूरक बनला असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात उद्योग येत असल्यानं रोजगारनिर्मितीही होत असून राज्याची भरभराट होत आहे. देशाला पुढं नेण्याचं काम महाराष्ट्र करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
****
नागपूर इथं श्री गणेश मंदिर टेकडी इथल्या आराध्य गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आज पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पौराणिक श्रध्दास्थान अशी या गणेशाची ख्याती आहे. या ठिकाणी भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी ४० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत तसंच चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
****
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत दोनशे सत्तर उमेदवारी अर्ज वैध आढळले आहेत, तर ६२ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. सहा जिल्ह्यांतल्या २६ विधानसभेच्या जागांसाठी एकूण ३२९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. सोमवारपर्यंत नावं मागे घेता येतील. या टप्प्यासाठी २५ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची तारीख जवळ आल्यानं जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्ष प्रचार आणि रॅलीवर भर देत आहेत.
****
मध्यप्रदेशातील जबलपूर इथं आज सकाळी सोमनाथ एक्स्प्रेस या रेल्वेगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. सुदैवानं या अपघातात कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही. या घटनेनंतर रेल्वेप्रशासन आवश्यक उपाययोजना करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्टीय बाल पुरस्कारांसाठी नामांकनं पाठवण्याची मुदत या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत असून भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी वीर बालदिनी म्हणजेच २६ डिसेंबर रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. या संदर्भात पाच वर्षांपेक्षा जास्त आणि १८ वर्षांखालील अर्जदारांनी भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.
****
अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या सततचा पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे पिकांची पाहणी करून विमा भरपाई मिळण्यासाठी पीक विमा कंपनीकडे ४८ हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात बाधित पिकांचं सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या अंतर्गत कंपनीनं आतापर्यंत २६ हजार पूर्वसूचनांचं सर्व्हेक्षण पूर्ण केल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
गणेशोत्सव ते दिवाळी या कालावधीत नागरिकांनी मिठाई, प्रसाद आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी, तसंच जनतेनं अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही जिल्हा अन्न प्रशासनानं आवाहन केलं आहे.
****
0 notes
mhlivenews · 3 years
Text
राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई, दि. 7 :-  राष्ट्रीय स्तरावरील ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्या महाराष्ट्रातल्या तीन महिलांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. आंतरराष्ट्रीय महिलादिनी  उद्या (8 मार्च) या तिघींसह देशातील 29 महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या दिव्यांग कथक नर्तिका सायली नंदकिशोर आगवणे, पहिल्या महिला सर्पमित्र वनिता जोगदेव…
View On WordPress
0 notes